सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे...

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक...

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली...

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज...

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे...

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे...

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात...

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल...

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे...

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे...

‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ : आसपासच्या उलथापालथीने अस्वस्थ होणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आस्थेच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे पुस्तक आहे...

गेल्या दहा वर्षांत याबाबत विरोधाभासाचे राजकारण होतेय, ते प्रतिमांच्या व्यक्तिकेंद्रित आभासात जनमानसाच्या लक्षातच येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पोकळ घोषणांच्या झुल्यावर झळकणारे समाजमन भव्य दिव्य सूचित करण्याचा आभासीकेत अडकले आहे. बधीर झाले आहे. धार्मिक उन्मादात सामाजिक ताणतणाव वाढत आहेत. धार्मिक प्रदूषणाला नैतिकतेच्या आवरणाखाली धर्मभोळेपणाचा राजकीय मुलामा देऊन वाटचाल सुरू आहे...

ह्या देशाचे करंटेपण असे की, सतत तेहतीस वर्षे काम करणाऱ्या या तपस्व्याच्या कार्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दखल तर घेतली गेली नाहीच, परंतु त्याच्या कामात अडथळे मात्र आणले गेले

“या देशाचे दुर्दैव आहे की विवेकाच्या आधारावर उभी केलेली कोणतीही चळवळ येथे यशस्वी होत नाही. दांभिक प्रदर्शन, पायी चालणे, लंगोटी नेसणे, केस वाढवणे, खाण्यापिण्याचे काही विलक्षण नियम पाळणे अशा युक्त्यांनी येथे व्यक्तित्व निर्माण होते. लेनिन, स्तालीन, किंवा माओ-त्से-तुंग यांना अशा युक्त्या कराव्या लागल्या नाहीत. परंतु त्यांनी जे काम केले, तसे हजारो ढोंग्यांच्या हातून होणार नाही. असे लोक लोकांची दिशाभूलच करतील...”...

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या...

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे...

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!...

जागतिकीकरणाच्या परिणामांच्या परिप्रेक्ष्यात १९९०नंतरचा महाराष्ट्र, जनजीवन आणि जनआंदोलने, हे या पुस्तकाचे मध्यवर्ती सूत्र आहे...

नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आणि आर्थिक नवउदारमतवादी धोरणे राबवण्याच्या प्रक्रियेतून जगभर प्रचंड बदल झाले. महाराष्ट्रातल्या बदलांचा मागोवा या घेतला असून तो वाचकांना एक व्यापक दृष्टी देऊ शकतो. यात महाराष्ट्रातले विविध प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी वैचारिक भूमिका स्पष्ट करणारे महत्त्वाचे लेख आहेत. सर्व प्रत्यक्ष चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात वैचारिक स्पष्टता दिसते...

लेखिकेने स्त्री-पुरुष समता, समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, विवाह, संततीनियमन, सामाजिक काम, ब्रह्मचर्य यांवरच्या लिखाणातून ‘रॅडिकल गांधी’ उभा केला आहे. यातच या पुस्तकाचे योगदान सामावले आहे

वास्तविक म.गांधींच्या कार्याचा ऐतिहासिक दृष्टीने विचार करून आजच्या काळाला उचित असा विचार त्यातून शोधला पाहिजे. या ऐवजी ऐतिहासिक व समग्रदृष्टीचा त्याग करून अस्मितांचे जतन सुरू आहे. अर्थातच यात गांधींच्या अनुयायांचाही दोष आहेच. या पार्श्वभूमीवर परिवर्तनवादी लेखिका व झुंजार कार्यकर्त्या निशा शिवूरकर यांनी या पुस्तकात ‘गांधीजी आणि स्त्री-पुरुष समते’च्या विविध पैलूंचा चिकित्सक विचार केला आहे...

नव्वदोत्तर कवितेला देशीवादी, सौंदर्यवादी किंवा महानगरी अशा कोणत्याही चौकटीत बसवणे तिच्यावर अन्यायकारकच ठरेल, कारण ही कविता सर्व प्रकारच्या चौकटींचा निषेध करते

मराठी कवितेत उत्तर-आधुनिक विचार पूर्णांशाने प्रकट झाला आहे, असे जरी ठामपणे म्हणता येत नसले, तरी प्रस्तुत ग्रंथात निवडलेल्या आठ कवींच्या कवितांमधून ‘उत्तर-आधुनिक संवेदन’ प्रभावीपणे व्यक्त झाले आहे, असे म्हणता येते. नव्वदोत्तर कालखंडातील उत्तर-आधुनिक जाणिवा व्यक्त करणाऱ्या या आठ कवींनी आपापल्या अनुभवक्षेत्राशी संबंधित प्रश्न प्रामाणिकपणे आजच्या वर्तमानाच्या भाषेत जोरकसपणे उपस्थित केले आहेत...

नाळ तोडायच्या आधीपासून चितेपर्यंत, बाळहंबरापासून हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन् संघर्षमय झाला, अशा जगातल्या सगळ्याच जातिधर्मांच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन् माझ्या प्रिय आईला ही कादंबरी समर्पित

जुनाट बुरसटलेल्या पायवाटा सोडून अशी बंडखोर अशिक्षित स्त्री ही स्त्री-मुक्तीच्या नव्या वाटा कशा शोधत असेल? स्वतःच्याच घरात निर्वासितांसारखं जीवन जगूनही अन् आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सतत उपेक्षेची जन्मठेप भोगूनसुद्धा शापितासारखं जीवन व्यतीत करणारी स्त्री खंबीरपणे कशी लढली असेल? तिच्या याच बंडाची अन् संघर्षाची गोष्ट कादंबरीत मांडण्याचा मी पोटतिडकीनं प्रयत्न केलाय...

‘आम्हीही भारताचे लोक’ : तृतीयपंथीयांबद्दलच्या पूर्वग्रहांनी सामाजिक मानसिकतेला प्रचंड विळखा घातला आहे. त्यातून सुटायचे असेल, तर आपल्या पूर्वग्रहांचे ‘डी-कंडिशनिंग’ करावे लागेल!

तृतीयपंथीयांच्या अनेक समस्या या पुस्तकात मांडल्या आहेत. त्या काय आहेत ते समाजापर्यंत पोहोचणे व त्यांच्याबद्दल जागृती होणे अपेक्षित आहे. परंतु फक्त समस्या मांडून हे पुस्तक थांबत नाही, तर या समस्यांच्या निवारणासाठी काय करता येईल, याचा ऊहापोहही राजकीय पक्ष, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक संस्था, शासकीय विभाग अशा वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून त्यात केला आहे. त्यामुळे हे पुस्तक कृतिशीलतेला चालना देणारे आहे...

‘पत्र आणि मैत्र’ : मराठी साहित्यव्यवहाराचे आणि विशेषत: मुद्रण\प्रकाशन-संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या ग्रंथातून लेखक, वाचक आणि समीक्षक ही त्रिपुटी नेमकी कशी आहे, हेही उमगते

दिलीपरावांविषयीचे लेख आणि त्यांच्या मुलाखती यांशिवाय या ग्रंथामधील अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांनी लिहिलेली पत्रे. यातील सर्वाधिक पत्रे दिलीपरावांनी आपल्या लेखकांना लिहिली आहेत. आणि बहुतेक वेळा ही पत्रे संबंधित लेखकाच्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्याशी साधलेला एक प्रकारचा मुक्तसंवाद आहे. दिलीपरावांनी जिथून आपली कारकीर्द सुरू केली, त्या नियतकालिकाचे नावच ‘माणूस’ होते...

दिलीप माजगावकर मराठी प्रकाशनक्षेत्रात ‘मशागतीच्या माळीकामा’त रमले. त्यांनी वाचकांच्या मनात चांगल्या साहित्याची जाण पेरली

दिलीपरावांचे लेखन, भाषणे, मुलाखती यांच्यातील महत्त्वाचे गुण म्हणजे त्यांची निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता. यातील सातत्य विस्मयचकित करणारे आहे. ही निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता व्यक्तीबद्दल, व्यवसायाबद्दल, साहित्याबद्दल आणि त्यापलीकडे अवघ्या समाजाबद्दल दिसते. दिलीपराव ही व्यक्ती त्यांच्या भिडस्त स्वभावामुळे स्वतःला लेखक मानत नसली, तरी त्यांच्या लेखनातून हे चिंतन अल्पाक्षरात आणि म्हणूनच रेखीवपणे प्रकट होत असते...

‘तत्त्वभान’ हे आधी वाचनाचे ‘निमंत्रण’ आणि मग चर्चेचे ‘निमंत्रण’ आहे, ‘आमंत्रण’ नाही. सर्व प्रकारच्या वाचकांसाठी हे ‘निमंत्रण’ आहे

या ग्रंथाचे वाचन ही तत्त्वचिंतनाची पूर्वतयारी आहे. ती पूर्वतयारी करणे म्हणजे तत्त्वज्ञानाच्या चिंतन पद्धतीचा अवलंब करणे, वाचकाला मदतकारक ठरेल, अन्यथा त्याचे चिंतन केवळ ‘स्वैरकल्पनाधारीत तत्त्वचिंतन’ होण्याचा धोका नाकारता येत नाही. तत्त्वज्ञानाच्या चिंतनपद्धतीचा अंगीकार करणे याचाच अर्थ तत्त्वचिंतनाच्या परिभाषेत विचार करणे. या ग्रंथाचे वाचन, मनन व चिंतन आणि मग चर्चा हे ‘तात्त्विक चिंतनाचे प्रशिक्षण’ आहे...

वैयर्थतेने भरलेल्या, असहिष्णुतेने चिरफाळत चाललेल्या, भयाण हिंसेच्या, क्रौर्याच्या टकमक टोकावर उभ्या असलेल्या सद्यकालीन सभोवाराचा उभा-आडवा छेद आणि वेध घेणारं हे जळजळीत शोभनाट्य आहे

‘प्रतिक्षिप्त’ हे शीर्षक या स्तंभलेखनपर पुस्तकाला देताना पवारांना नेमकं काय अभिप्रेत आहे कल्पना नाही, परंतु मज्जारजू आणि मेंदूतही संदेशवहन पोहचवून भयंकराच्या दरवाजासमोर धडका मारायला लावणारं, कृतिशील हस्तक्षेपाकडे निर्देश करणारं, हे मौलिक पुस्तक आहे, असं आवर्जून अधोरेखित करावंसं वाटतं. ‘प्रतिक्षिप्त’ म्हणजे भाषेच्या चौफेर हुकमी फटकाऱ्यांचं तीव्र ज्वालाग्राही रसायन...

ही कादंबरी पारलिंगी व्यक्तींच्या ‘सांस्कृतिक अदृश्यते’ला एक चांगले प्रत्युत्तर देते, त्यांच्या ‘सांस्कृतिक घुसमटी’ला वाचा फोडते आणि एलजीबीटी इत्यादी समुदायाच्या ‘विद्रोही संस्कृती’चा एक सुंदर नमुना पेश करते!

एका पारलिंगी स्त्रीला नायिका म्हणून दाखवून - तिच्या इच्छा, आकांक्षा, भावना, तिचे विचार, तिचा प्रेमासाठीचा शोध - ही कादंबरी तिला ‘वेगळी’, ‘विचित्र’ म्हणून नाही, तर तुमच्या-आमच्या सर्वांसारखीच एक ‘माणूस’ म्हणून समोर ठेवते. पारलिंगी व्यक्तींना ‘माणूस’ म्हणून अशी आदराची वागणूक देणारी ही कादंबरी मराठी साहित्यातील पितृसत्ताक, विषमलिंगी नियमाच्या चित्रणाच्या इतिहासाला जोरकसपणे छेद देते...

‘बदलता भारत’ : भारतीय स्वातंत्र्याची कहाणी कुठून व कशी सुरू झाली, ती कुठवर पोहोचली आणि ती अजूनही अधुरी का राहिली आहे, याचा शोध घेणारा महाग्रंथ

स्वातंत्र्याला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. जगात काही शतके सर्वाधिक वर्चस्वशाली असणाऱ्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध इथल्या कोट्यवधी जनतेने अथक संघर्ष करून मिळवलेले हे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य संग्रामाचा आणि स्वातंत्र्योत्तर देशउभारणीचा आजवरचा दोन शतकांहून अधिक असा हा काळ. अशा आपल्या इतिहासावर विविध अंगांनी बोलणाऱ्या, त्याचे अंतरंग उकलणाऱ्या आणि त्यातून भारताच्या भविष्याची दिशा दाखवणाऱ्या लेखांचा हा महासंग्रह...

काव्यविषयाच्या नवजाणिवेच्या अनुषंगाने रेगे सर्वार्थाने नवकवी ठरतात, परंतु नवकाव्याच्या अग्रतेचा मान, नवकाव्याच्या प्रवर्तकतेचा मान रेग्यांना देता येणार नाही

नवकवितेचे प्रवर्तक मर्ढेकरच; रेगे हे नवकवी होय. कारण प्रवर्तकाला मागे तशी परंपरा निर्माण व्हावी लागते. मर्ढेकरांच्या तशी परंपरा निर्माण झाली. तशा पद्धतीने काव्यनिर्मितीची संवेदना मर्ढेकरांच्या कवितेने दिली. परंतु रेग्यांची कविता ‘निःसंग’ राहिली. रेग्यांची वृत्ती स्त्रीच्या लास्यसौंदर्यावर पुष्ट झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा केंद्र व काव्याचा परीघ स्त्रीकेंद्री राहिला...

‘गिधाडांची मेजवानी’ हे पुस्तक सामान्य नागरिकांना ‘खऱ्या भारता’ची ओळख करून देणारा आराखडा आहे. मला ठाऊक असलेल्या भारताच्या वास्तवाची ही एक प्रामाणिक नोंद आहे

आपल्या लोकशाहीच्या हृदयावर अनैतिकतेने मोठा हल्ला केला आहे, भारतीय संस्थांची अवस्था मोडकळीस आली आहे. हे सर्व भ्रष्ट आणि अनैतिक घटक एकत्र येऊन भारतातील बहुसंख्य नागरिकांना लाचार करू पाहत आहेत. या लाचार जनतेला आत्महत्या करायला भाग पाडले जात आहे. अशा मृत्यूंबद्दल वर्तमानपत्रांत येणाऱ्या एकसुरी बातम्या आणि भारतातील उच्चभ्रू लोकांची वाढती असंवेदनशीलता यामुळे मला या पुस्तकासाठी शोधपत्रकारिता करावीशी वाटली...

मी परत भानावर आले, तेव्हा माझ्या मनातील ताण-तणाव आणि खळबळ निमाली होती. माझ्या या आयुष्यातील तिसऱ्या व अखेरच्या पर्वाच्या नांदीचे सूर मनात झंकारू लागले

बापूंच्या निधनानंतरची गेली दहा वर्षं मी कामात व्यग्र राहिले. परंतु माझ्या अंतर्मनामध्ये सर्व काही थिजून गेल्यासारखी निःस्तब्ध शांतता अनुभवत होते. आता हळूहळू अंतर्मनाला जाग येऊ लागली होती. या अवस्थेतून विधाताच मार्ग दाखवील याची मला खात्री होती. माझ्या मनातली अस्वस्थता हळूहळू वाढत चालली होती. या डोंगरांच्या सान्निध्यात राहून मी दुभंगलेल्या व नवनवीन शोधांमुळे भेदरलेल्या जगापासून पळून तर जात नव्हते ना?...

सर्चिंग आणि सर्फिंगच्या सवयीला चटावलेले जनमानस असताना लिखित स्वरूपातील फुकटचे सल्ले वाचणारे वाचक म्हणजे विरक्त वृत्तीचे सात्त्विक जणच...

सर्चिंग आणि सर्फिंगच्या सवयीला चटावलेले जनमानस असताना आम्ही हे फुकटचे सल्ले लिहिण्याचे धाडस केले आहे. आम्ही दिलेले असे सल्ले कधी कधी स्वअनुभवावरून आहेत किंवा निरीक्षणातून आलेले आहेत. खरे सांगायचे तर असे सारे काही आम्ही अप्रत्यक्षपणे सुचवले आहे. असे करण्याचे कारण म्हणजे उच्छादाच्या या कालखंडात माहितीलाच ज्ञान समजून जो तो ज्ञानसंपन्न झाल्याच्या आनंदात आत्ममग्न असल्याने आम्ही ही सावधगिरी बाळगली आहे...

‘चित्रपट-अभ्यास’ : चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही (आपल्याकडे तर अजूनही प्रचलित असलेली) समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे

जी कलाकृती काळाच्या पटलावर निःसंशयपणे सिद्ध होणारी आहे, त्यांना सहसा ‘अभिजात कलाकृती’ असे म्हटले जाते. इथे अशा अभिजात चित्रपटांचीच निवड केलेली दिसते. अशा चित्रपटांचे विश्लेषण करण्याने कलात्मक उत्तमाची एक सखोल जाण आपसूकच निर्माण होते. त्यांतील व्यापक व सूक्ष्म अशा जीवनदर्शनाने प्रगल्भता वाढीस लागते. ‘मुळातला अभ्यास करण्यासाठीचा पहिला गंभीर धडा’ या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध करून दिला आहे...

‘नोआखाली’ - गांधीजींसाठी हे एक अग्निदिव्यच होते. तेथे त्यांना केवळ बाह्य परिस्थितीशीच नव्हे, तर स्वतःच्या अंतर्मनाशीदेखील संघर्ष करावा लागला!

गांधीजींचे संपूर्ण जीवन हे मानव कल्याणासाठी धगधगणारे यज्ञकुंड होते. ग. त्र्यं. माडखोलकरांनी लिहिले आहे की, येथे हा अद्वितीय याजक स्वतःच यज्ञ होऊन गेला. या याजकाच्या पूर्णाहुतीची सुरुवात नोआखाली येथेच झाली आणि अंत दिल्लीमध्ये. मानवाच्या इतिहासात सत् आणि असत् शक्तिंमध्ये अखंड चाललेल्या संघर्षात चिरंतन सत् मूल्यांच्या रक्षणासाठी गांधीजींचे नोआखालीत जाऊन राहणे, यास फार मोठे महत्त्व आहे...

आजच्या लेखकाला मराठीच्या खर्‍या स्वरूपाचे आकलन झाले नाही, तर भिकार लेखकांनी लटपटी करून अध्यक्ष होण्याचे हे समारंभ बिनकामाचे ठरतात

आता एकभाषिक राजकारण फोफावले असले, तरी मराठी ही एका विशाल हिंदू महाव्यवस्थेत या उपखंडात विकसित झालेली एक व्यवस्था आहे, आणि आपल्या पोटभाषा - खानदेशी, अहिराणी, वर्‍हाडी, झाडी, कोंकणी याही मराठीच्या उपव्यवस्था म्हणून विकसित झाल्या पाहिजे. तरच मराठी ही प्रबळ होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ह्या सगळ्या मराठीच्या बोलींचाही सहभाग वाढवावा, असेही पिंपरी-चिंचवडच्या साहित्य संमेलनाचा आढावा घेताना सुचवावेसे वाटते...

गांधींचा ईश्वर पारंपरिक पद्धतीचा ईश्वर नाही, तो पूर्ण सत्याच्या रूपातला होता. मात्र गोरांना कोणत्याही रूपातला ईश्वर मुळातच मान्य नव्हता, इतके ते कट्टर नास्तिक होते…

गांधीजींचा ईश्वर कुठल्याही अर्थाने चमत्कार करणारा, स्वत:चे अस्तित्व त्या आधारे टिकवून ठेवणारा अशा प्रकारचा ईश्वर नाही. त्यांची ईश्वराची कल्पना निराकार पद्धतीची आहे. त्यांना कुठल्याही कर्मकांडाची गरज भासत नाही. गोरांच्या समोर असलेली ईश्वराची संकल्पना आणि तिची समाजात असलेली राबवणूक आणि गांधीजींचा ईश्वर यांचा मेळ जमून येत नाही. तरीही गोरा गांधीजींशी संवाद करताना त्याच ईश्वर कल्पनेच्या आधारे बोलतात...

नंदा खरेंनी वैचारिक प्रबोधनाला वेगळ्या स्तरावरचे कार्यच मानले आहे. त्या अर्थाने ते ‘ॲक्टिव्हिस्ट’च आहेत. उत्तर-आधुनिकतावाद उर्फ ‘पोस्ट-मॉडर्निझम’च्या ‘इंटेलेक्चुअल फॅशन’च्या विरोधात ते ‘वैचारिक तलवार’ घेऊन उभे ठाकतात

‘नंदा खरे निर्मित-दिग्दर्शित’ ही एक न स्थापलेली, अदृश्य भासणारी, पण अस्तित्वात असलेली संस्थाच होती. या सर्व व्यापक नेटवर्किंगचे व त्यातून येणाऱ्या मुद्द्यांचे, तसेच समाजातील समस्यांचे दर्शन आपल्याला या लेखनात प्रत्ययास येते. किंबहुना म्हणूनच कार्यकर्ते त्यांच्याकडे सातत्याने येत, त्यांच्याशी चर्चा करत आणि काही बौद्धिक / वैचारिक शिदोरी बरोबर घेऊन जात...

देवल-खाडीलकरांपासून मराठी नाटक आणि रंगभूमी समाजाभिमुख आणि विचाराभिमुख राहूनदेखील ‘मराठी नाट्याभिरूची’ मात्र वैचारिकतेशी फटकूनच राहिलेली दिसते!

वैचारिकता हे एक मूल्य मानणाऱ्या काही नाटककारांनी आणि त्यांच्या नाटकांनी त्या त्या काळात अल्प प्रमाणातील का होईना ‘नाट्याभिरूची’ समृद्ध, संस्कारित केलेली आहे. ही अभिरूची तात्कालिकापेक्षा मूलभूत स्वरूपाच्या जीवनानुभवाची / नाट्यानुभवाची मागणी करणारी आहे. आणि म्हणूनच ती, संस्कृती संवर्धनाचा आग्रहही धरणारी आहे. हीच आजच्या विषण्ण, उदास आणि चिंतीत करणाऱ्या ‘नाटकीय’ वर्तमानात एक दिलासाजनक बाब आहे...

‘स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान’ या छोटेखानी ग्रंथामुळे स्वामी विवेकानंद यांच्या कोल्हापूर भेटीबाबत असणारे अनेक गैरसमज दूर होतील!

राहुल माळी स्वामी विवेदाकनंद यांच्या चरित्र व कार्याचे निस्सीम भक्त आहेत. परंतु त्यांची ही भक्ती आंधळी नाही! किंवा ती त्यांच्या अंधश्रद्धेचा भाग नाही. स्वामी विवेकानंदांच्या कोल्हापूर भेटीबाबत अनेक गैरसमजुती आहेत. त्यांचे वास्तव्य कोल्हापुरातील कोणत्या पेठेत, कोणत्या बंगल्यात होते? त्यांची व्याख्याने कोणत्या ठिकाणी झाली? इत्यादीसंबंधी गैरसमजुती आहेत. त्यांचे निराकरण करण्याचा या ग्रंथात केला आहे...

निसर्ग विनाश हीच आपल्या दैनंदिन जीवनातील ‘मनोविकृती’ झाली आहे. निसर्गनाशामुळे समाजाची ‘मानसिक अवस्था’ बिघडत चालली आहे!

निसर्ग हाच अडथळा मानून त्याला नाहिसं करण्याचा चंग बांधला आहे. हे ऱ्हासपर्व मानवकेंद्री मानलं जात असलं, तरी ते प्रत्यक्षात भांडवलशाहीकेंद्री आहे. निसर्ग खरवडून संपत्तीची निर्मिती हा तिचा बाणा आहे. या उद्ध्वस्तीकरणात धोरणकर्ते सक्रिय सामील आहेत आणि ते सामान्य माणसाला ‘लाभार्थी’ बनवण्याचा वेग वाढवत आहेत. सामूहिक विवेकशून्यता (मूर्खपणा) वाढत चालली आहे. त्यातून उत्पन्न झालेला अंतर्बाह्य कोलाहल मानवाला पेलवेनासा ...

अत्यंत दुर्दैवी आयुष्य वाट्याला येऊनही मी अत्यंत दुर्मीळ असं, ‘अर्थपूर्ण’, मूल्यात्म आयुष्य दुर्दम्य चिवटपणाच्या बळावर ताठ मानेने जगले…

स्वतःच्या कुठल्याही चांगल्यासाठी हवी ती किंमत मोजणं, कमालीचा संयम या सर्व घटकांनाच जगण्याचा आधार बनवलं. कितीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी एकटीने; धैर्याने नि वैचारिक व भावनिक परिपक्वतेच्या आधारे तिला सामोरी गेले. माझं लिखाण, संशोधन वगैरेंची सभोवतालच्या प्रस्थापित समाजाला नोंद घ्यायला भाग पाडलं. या सगळ्याचा मला सार्थ असा अभिमान आहे. प्रयत्नपूर्वक शाबूत ठेवलेला आत्मसन्मान नि संवेदनशीलता मी मरू दिली नाही...

‘शब्द कल्पिताचे’ : पत्रात लिहिणारा आणि वाचणारा अशा दोहोंचेच हृद्गत असते. काळाच्या पात्रात त्यातली तात्कालिकता विरून जाते आणि उरतो तो प्रसंगातल्या जगण्याचा गंध…

पत्र हा वाङ्मयप्रकार वापरून दोन काळांचा संवाद व्हावा, ही या संकल्पनेमागील मुख्य भूमिका होती. तिला न्याय देण्यात बरेच लेखक आपले ‘निर्मिती’चे सत्व घेऊन उतरले आहेत. काही पत्रं मात्र फारच भावविभोर झाली आहेत. ती वाचताना आपण हळहळतो. अनामिक हुरहूर लागून राहते. डोळ्यांच्या कडाही ओलावतात. अशी मनात रूतून बसणारी पत्रेही या संग्रहात बरीच आहेत. लिहिणारा आपले भावबळ घेऊन तिथे उतरला असल्याचे त्यातून स्पष्ट दिसते...

इंग्रजीत ‘शेक्सपिअर डिक्शनरी’ आहे. त्यात त्याच्या समग्र वाङ्मयातील शब्दांचे अर्थ, उदाहरणे वगैरे दिलेली आहेत. मनात विचार आला, त्या धर्तीवर एखादा कोश का लिहू नये? आणि मला कालिदासाचे नाव सुचले…

मी मोठा संशोधक नाही की, कालिदासाचा किंवा इतर संस्कृत ग्रंथांचा विशेषतः साहित्याचा सखोल अभ्यास केलेला नाही. पण कालिदास वाङ्मय वाचताना काही विचार सुचले किंवा मनात प्रश्न उभे राहिले. त्यात खूप उणीवा असतील किंवा ते चुकीचेही असू शकतील, पण ते सारे ‘परिशिष्ट’ विभागांत समाविष्ट केले आहेत. त्यामुळे कुणाला संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली, तर ते माझे सद्भाग्य समजेन...

या पुस्तकात नुसताच कोरडा निधर्मीपणा नाही, तर एकूण मानवजातीच्या कल्याणाच्या मार्गाचा घेतलेला शोध आहे… असा मार्ग जो बुद्धीलाच नव्हे, तर उदात्त भावनेलाही आवाहन करेल

डॉ. यशवंत मनोहरांसारखे आंबेडकरवादी विचारवंत विपश्यनासाधना ही आंबेडकरवादाच्या विरोधी मानतात, तर रत्नाकर गायकवाडांसारखे ज्येष्ठ प्रशासक असे मानतात की, आंबेडकरांना विपश्यना मान्यच होती. या टोकाच्या दोन्ही मतांमध्ये अडचणी आहेत. आंबेडकरी ‘नवयान’ आणि गोएंकांचे ‘विपस्सनायान’ यांच्यात शत्रुभावी विरोध नाही. दोघांचे वेगळेपण जपणे आणि तरीही दोघांमध्ये समन्वय घडवणे, संवाद घडवणे शक्य आहे, असे मला वाटते...

‘माझा समुद्र प्रवास’ : ‘केसरी’च्या फायलींमध्ये धूळ खात पडलेले, कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेले एक महत्त्वाचे प्रवासवर्णन

गोपाळराव जोशी विक्षिप्त तर होतेच, परंतु त्यांनी आपल्या पत्नीला खूप खस्ता खाऊन डॉक्टर केले. या त्यांच्या सर्वोत्तम कार्यामुळे त्यांच्या विक्षिप्तपणाकडे समाजाने डोळेझांक केली, परंतु त्यांच्या विक्षिप्तपणामुळे त्यांच्या आणखी काही गुणांकडेही दुर्लक्ष झाले. उदा. त्यांच्यापाशी असणारे लेखनाचे गुण, त्यांची बेधडक वृत्ती, रसभरित वर्णन करण्याची हातोटी, अशा अनेक गुणांची साधी दखलही महाराष्ट्राने घेतली नाही...

‘पालकनीती’ ही एक वैचारिक चळवळ आहे, मात्र तिचं स्वरूप संघर्षाचं नाही, जिव्हाळ्यातून आलेल्या जाणिवेचं आहे. त्यामागचा हेतू - मुलं माणूसपणानं वाढावीत - इतका मूलगामी आणि साधा आहे

‘पालकनीती’ मासिक बाजारू जगापासून लांब होतं आणि आहेच, त्यामागचा हेतू - मुलं माणूसपणानं वाढावीत - इतका मूलगामी आणि साधा आहे. न्याय, ऋजुता, समता अशा मानवी मूल्यांवर या मासिकाची बैठक आधारलेली असावी, हे सुरुवातीपासून मानलेलं तत्त्व. पालकत्व निभावणं म्हणजे मुलांचं संगोपन, आरोग्य, शिस्त, इतकं राहू नये, यासाठी ‘पालकनीती’नं मुलाचं वाढणं समजावून घ्यायला आजवर मदत केली, पालकांना विचार करायला भाग पाडलं...

भोसले यांची दृष्टी अत्यंत जाणीवपूर्वक राजकीय आणि बाजू घेणारी आहे. भटक्या-विमुक्तांचा इतिहास हा चोर-लफंग्यांचा इतिहास नसून तो ‘शोषितां’चा इतिहास आहे!

हुशार लोक इकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून संस्कृतीचे आवाहक, रंगीबेरंगी, उठावदार आणि लालित्यपूर्ण असे चित्र रेखाटतात. जगण्यातले संघर्षाचे संबंध दृष्टीआड लोटावेत म्हणून संस्कृतीचे उदात्तीकरण केले जाते. भोसले संस्कृतीचा परामर्श घेताना या प्रवृत्तीला बळी पडण्याचे टाळतात. त्याऐवजी ते भटक्या-विमुक्तांच्या जीवनात घडून येऊ पाहणाऱ्या रूपांतरणाच्या प्रक्रियेत त्यांच्या संस्कृतीची मांडणी करतात...

न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती लोकांच्या हक्कांचे राखणदार असले, तरी त्यांचं रक्षण फक्त त्यांची सद्सद्विवेकबुद्धी व सचोटी याच दोन बाबी करू शकतात!

कर्णाला कवचकुंडलं होती, तशीच ती सद्सद्विवेकबुद्धी व सचोटीची कवचकुंडलं न्यायाधीशाला/न्यायमूर्तीला मिळतात. ती असेपर्यंत तो/ती कायमच अभेद्य असतात. न्यायसंस्थेवर, न्यायाधीशावर शिंतोडे उडवले जातात, त्याचं/तिचं चारित्र्यहनन केलं जातं. तेव्हा ते नि:शस्त्र असतात. सोशल मीडिया, लोक किंवा माध्यमं, यांच्याशी त्यांना कायद्यानंच लढावं लागतं. न्यायालयीन मूल्यांनी त्यांचं तोंड बंद केलेलं असतं व हात बांधलेले असतात...

ही कहाणी पुढे जमीन केव्हा दिसेल याची शाश्वती नसताना, अथांग सागरात झोकून देण्याची इच्छा, दुर्दम्य आशावाद, साहसे, संकटे, यशापयश यांची पर्वा न करणाऱ्या वेड्या पीरांची आहे!

मध्ययुगीन कालखंडातील जगाच्या शोधमोहिमा मुख्यतः युरोपामधूनच सुरू झाल्या. त्यातही पोर्तुगाल व स्पेन या दोन देशांचे वर्चस्व शंभर वर्षांपेक्षाही जास्त काळ टिकून होते. डच आणि ब्रिटिशांनी त्यात नंतर उडी घेतली. या सागरी शोधमोहिमांची सुरुवात कशी झाली, विस्तार कसा झाला, त्यातून जगाच्या वेगवेगळ्या भूभागांचे आणि सागरी मार्गांचे शोध कसे लागले व यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखा यांचा आढावा घेणारे हे लेखन आहे...

या बदलत्या जगानं आम्हा डॉक्टर्सना विक्रेता बनवलं आणि पेशंट्सना ग्राहक! चोख पैसे मोजून दिली-घेतली जाणारी बाजारातली एक वस्तू झाली आमची वैद्यकीय सेवा!

वैद्यकीय व्यवसायातली गैरव्यवहारांची पाऊलवाट बघता बघता कशी एक सर्वव्यापी त्सुनामी झाली, आपल्या पायाखालची वाळू कशी सरकून गेली, हे मलाच नव्हे, तर अनेकांना समजलंही नाही. व्यक्तिगत पातळीवर आम्ही आपापले किल्ले लढवत असताना, आजूबाजूला मात्र नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पातळीवरच जग इकडचं तिकडे झालं. भांडवलाची आणि अनुषंगानं आलेल्या पाशवी कॉर्पोरेट तत्त्वज्ञानाची मजबूत पकड आमच्या वैद्यकीय व्यवसायावर आली...

मुंबईच्या करड्या रंगाच्या मृत समुद्राकडे पाहत बसलेल्या निशिकांतच्या पाठीवर सावकाशपणे सूर्य उगवला. त्याने घातलेला श्रीनिवासचा शर्ट घामाने त्याच्या पाठीला चिकटला होता

किशोर कदम – “ ‘मोनोक्रोम’ म्हणजे ‘ब्लॅक अँड व्हाईट’ किंवा कुठल्यातरी एकाच रंगाच्या अनेक छटांमध्ये डेव्हलप केलेला फोटोग्राफ किंवा चित्र. एखाद्या फिल्मची निगेटिव्ह जी फक्त ‘ब्लॅक अँड व्हाईट’ छटांमध्येच पूर्ण पावते. सचिन कुंडलकरची नवीन कादंबरी याच अर्थछटांची गोष्ट सांगत पुढे जाते. ‘मोनोक्रोम’ ही जेमतेम एकशे सतरा पानांची कादंबरी मराठी साहित्यात बहुदा कुठे, कधीच न हाताळल्या गेलेल्या विषयावर आहे.”...

‘मोठी माणसे’ : पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळातील ही माणसे आहेत. त्यांच्या जीवननिष्ठेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी आणि दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे

या व्यक्तिचित्रांमधील काकासाहेब गाडगीळांचा एक अपवाद वगळता इतर कोणीही कधीही सत्तेत नव्हते. सत्ता ही आपल्या आयुष्यभराच्या ठरवलेल्या कामासाठी एक पायाभूत आवश्यकता आहे, असे त्यांनी मानलेच नाही. सत्तेसाठी तडजोडी करणे तर सोडून द्या, पण सत्ता जवळ येत असतानाही तिचा अव्हेर केला. काकासाहेब गाडगीळांचा समावेश यात करण्याचे एक कारण आहे. सत्तेमध्ये राहूनसुद्धा ज्यांच्या अंगाला किंवा मनाला सत्ता चिकटलीच नाही...

‘राजारामशास्त्री भागवत यांचा भाषाविचार’ : राजारामशास्त्री भागवत यांच्या विचारांची मुख्य चौकट ‘महाराष्ट्रवाद’ व ‘देशीवाद’ ही आहे. ते ‘महाराष्ट्रवादा’पासून सुरुवात करतात आणि ‘देशीवादा’वर जाऊन स्थिरावतात

‘देशीवाद’ हा विचार भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेला आहे. त्यांच्या विचारांचे पूर्वसुरी भागवत. या गोष्टीचे आत्मभान एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा अभ्यास करणाऱ्या विचक्षण विचारवंतांना अजून आलेले दिसत नाही. खरे तर भागवत आणि नेमाडे यांच्या देशीवादाचे तुलनात्मक संशोधन झाले पाहिजे. मुख्य मुद्दा म्हणजे भागवत यांच्या विचारांची एक चौकट ‘देशीवाद’ ही होती. या चौकटीत मनीषा खैरे यांनी भागवत यांचे विवेचन केलेले आहे...

शास्त्रीजी ‘परंपरावादी’ झाले नाहीत, मार्क्सचा प्रभाव पडून ‘मार्क्सवादी’, गांधींचा बौद्धिक-नैतिक प्रभाव असून ‘गांधीवादी’ आणि रॉय यांचा प्रभाव पडून ‘रॉयवादी’ही झाले नाहीत (उत्तरार्ध)

शास्त्रीजींनी मार्क्सिझम, सोशॅलिझम, रॉयीझम, गांधीवाद, या सगळ्या विचारधारा खूप तपशिलाने अभ्यासल्या होत्या. धर्मशास्त्र अभ्यासलेलं होतं, परंतु तत्त्वज्ञ होण्याची क्षमता असूनही एका नव्या ‘दर्शना’ची निर्मिती काही त्यांच्याकडून होऊ शकली नाही. त्यांच्याच काळामध्ये जावडेकरांनी एक प्रयत्न केला मार्क्सवाद आणि गांधीवादाच्या समन्वयाचा. अशा कुठल्याही ‘दर्शना’ची निर्मिती शास्त्रीजींकडून झाली नाही...

साने गुरुजी आणि वि. स. खांडेकर यांचे सच्चे अनुयायी आणि कृतिशील वारसदार | ‘सत्यवादी’, ‘सच्चाई’ यांचे समीकरण | व्यक्ती उकल करतानाचा संवाद परिमल

प्रसिद्ध लेखक, संशोधक, संपादक, अनुवादक आणि समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने १५ ऑक्टोबर २०२० रोजी एकदिवसीय ऑनलाइन नॅशनल वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्या मंथनातून त्रिखंडी गौरवग्रंथाची निर्मिती झाली. हा ग्रंथ भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केला आहे. या तिन्ही खंडांनी संबंधित संपादकांनी लिहिलेल्या मनोगतांचा हा संपादित अंश...

या मुलाखतीतून विषयांची विविधता आणि आशयाची गहनता स्पष्ट होईल आणि या सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कलाविषयक जाणिवा, सामाजिक भान आणि वैचारिक निष्ठा, यांत खूप जास्त एकात्मता असल्याचेही लक्षात येईल

व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वत:च्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेपआणि आजच्या समाजजीवनावर भाष्य, ही चतु:सूत्री समोर ठेवून या मुलाखती घेतलेल्या असल्यामुळे त्या वाचनीय आणि संग्राह्य झालेल्या आहेत. ‘आम्हा घरी धन शब्दांचिच रत्ने...’ हा अभंग साहित्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या मुलाखतखंडाला लागू होतो. आणि ‘जे का रंजले गांजले...’ हा अभंग समाजकार्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखत खंडाला लागू होतो...

यशवंत रास्ते सर : पुस्तकांवरील ‘अव्यभिचारी निष्ठे’ने त्यांनी जो उत्तमतेचा ध्यास घेतला, त्यामुळे ते ग्रंथपाल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू शकले

रास्ते सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवांचे स्मरण ठेवून महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकांकडून स्वेच्छापूर्वक निधी जमा करून, त्यांनी अनेक कमकुवत आर्थिक गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सहाय्य केले. दर महिन्याला त्या विद्यार्थ्यांच्या खात्यात विशिष्ट रक्कम जमा होईल आणि त्याच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण होतील, याची ते काळजी घ्यायचे...

मोदींमध्ये काही गुण आहेत, हे त्यांचे विरोधक मान्य करत नाहीत आणि मोदींच्या काही मर्यादा आहेत, असे त्यांचे समर्थक मानत नाहीत. या दोन टोकाच्या दृष्टीकोनांतून वाट काढत हे पुस्तक लिहिले आहे…

नरेंद्र मोदी हा विषय अनेकांसाठी संवेदनशील आहे. गुणांबरोबर दोषांचीही चर्चा व्हावी, मात्र गुणांचे वर्णन करताना भक्तिभाव येऊ नये आणि मर्यादा सांगताना द्वेषभाव असू नये, याची काळजी घेण्याचा प्रयत्न मी केला आहे. व्यक्तीमधील दोष हे भिंतीसारखे असतात, तर गुण खिडकी-दरवाजासारखे असतात, असे महात्मा गांधी म्हणाल्याचे मी वाचले होते. मी मोदींबाबत गांधीजींचा भिंत-खिडकीचा दृष्टीकोन ठेवला आहे...

स्वदेशात व समाजात आवश्यक कर्तव्यकर्मे करून स्वावलंबन साध्य करता करता स्वाध्याय, स्व-अनुशासन, उद्योग व सहयोग याद्वारे जी स्वत:ची व समाजाची ओळख प्राप्त होते, ते शिक्षण!

एकदा गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मी आनंददायी मुक्त शिक्षणाची कल्पना वर्णन करून सांगितली, व विचारले, ‘कुणा-कुणाला अशी शाळा आवडेल?’ सर्व मुले निर्विकार चेहर्‍याने चुपचाप बसून राहिली. कोणीच हात वर केला नाही. अशी शाळा असू शकते, यावर त्यांचा विश्वासच बसला नसावा. शिवाय समोर त्यांचे शिक्षक उभे होते. त्यांच्या देखत आवड व्यक्त करण्याची त्यांची बिशाद नव्हती...

‘एकट्याचे गाणे’ : कविवर्य शंकर रामाणी यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्याच्याशी अविभाज्यपणे जोडली गेलेली त्यांची कविता, याचे दर्शन घडवणारे पत्रसंचित

आपण पाठवलेल्या पत्राला दुसऱ्याने तत्परतेने उत्तर पाठवले नाही की, अतिशय अस्वस्थ होणारे आणि पत्रांमागून पत्रे पाठवणारे रामाणी, मागील पत्रात आपण पाठवलेल्या कवितेवर दुसऱ्याने आपले मत कळवले नाही, तर विलक्षण नाराज होणारे, रागावणारे रामाणी, आपल्या कवितेतील शब्दाशब्दाप्रती सदैव सजग राहणारे आणि नेहमीच उत्कृष्टतेचा, परिपूर्णतेचा ध्यास घेणारे रामाणी, अशी त्यांची अनेक मनस्वी रूपे या पत्रांमधून प्रकटताना दिसतील...

गेल्या चाळीस वर्षांत चीनने आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान कसे मिळवले आणि त्यामुळे चीन व जगापुढे काय प्रश्न निर्माण झालेत, याची चर्चा या पुस्तकात आहे

नियतीने चीन आणि भारत यांना एकत्र आणून ठेवले आहे. हे देश शेजारी असूनही या दोन देशांतील समाजांमध्ये फारसा संपर्क नाही. उलट दोन्ही देशांमध्ये १९६२च्या युद्धामुळे कटुता आहे. दोन्ही देशांत राष्ट्रवादाची तीव्र भावनाही आहे. चीनशी मोठा व्यापार असला तरी त्यातील चीनच्या वर्चस्वामुळे तो तणावपूर्ण वाटतो. चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी प्रभावाच्या संदर्भात चीनने उभे केलेले आव्हान समजून घेणे आवश्यक आहे...

माझी वैचारिक निष्ठा निरीश्वरवादाशी आहे; परंतु ज्यात मी जन्मले आहे, त्या हिंदू धर्माविरोधात बंडखोरीचा मार्ग पत्करून मी निरीश्वरवादाकडे वळलेले नाही…

हा असा क्षण आहे, असा तिठा आहे आणि असा संदर्भ आहे, त्याच्या अनुषंगाने मी वयाची साठ वर्षे ओलांडलेली स्त्री, ‘मी हिंदू स्त्री का नाही?’, हे विस्ताराने सांगू इच्छिते. मी बहुसांस्कृतिक स्वरूपाच्या महानगरी तसेच प्रादेशिक वातावरणाशी परिचित आहे. मी स्वतः स्त्रीवादी आहे. अशा वेळी वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या स्त्रीवाद्यांनी युक्तिवादाच्या माध्यमातून दिलेली आव्हाने स्वीकारण्याची माझी तयारी आहे...

या ‘जलनायिकां’नी आपल्या दुष्काळग्रस्त भागात पाणी आणलं. या परिणामाइतकाच या प्रत्येकीचा प्रवास सुंदर आहे. प्रेरणादायी आहे. आणि तो थांबलेला नाही...

‘जलनायिका’ सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागातला पाण्याचा मुद्दा घेऊन भिडल्या आहेत. त्यांच्यात स्वतःबद्दल जागृत झालेला विश्वास, वर्षानुवर्षं त्यांनी सहन केलेल्या घुसमटीची जाणीव आणि आपल्या अस्तित्वाला अर्थ देणारं काम करण्याचं मोटिवेशन आणि उर्मी, या सगळ्यांचा परिपाक आहे. त्यांच्या बदलेल्या स्व-प्रतिमेच्या साक्षात्कार त्यांना त्यांच्या तहानलेल्या गावांमध्ये पाणी आणण्याच्या प्रक्रियेत करता आला...

वाकाटकांनी विदर्भात ‘सुवर्णयुग’ निर्माण केले, परंतु त्यांच्याबद्दल अतिशय त्रोटक माहिती असल्याने हे पुस्तक अभ्यासकांना उपयुक्त ठरेल

प्राचीन विदर्भाच्या इतिहासात वाकाटकांचा काळ हा सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल, असा हा कालखंड आहे. ‘वाकाटक’ घराण्याचा शासनकाळ साधारणत: इसवी सन २५० ते ५५० मानला जातो. या तीनशे वर्षांच्या काळात विदर्भाला वाकाटकांनी समृद्धी आणली. वाकाटक राजे पराक्रमी व ऐश्‍वर्यसंपन्न होते. तसेच ते प्रजाहितदक्ष, धर्मसहिष्णू, कला व स्थापत्याचे भोक्ते होते. हा कालखंड; राजकीयदृष्ट्या समृद्ध व आपला ठसा उमटवणारा कालखंड होता...

‘प्रतिष्ठान’चा ‘सर्वज्ञ श्रीचक्रधर अष्ट जन्मशताब्दी विशेषांक’ : सर्वज्ञांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश

प्रस्तुत वर्ष हे सर्वज्ञ श्रीचक्रधरांचे अष्ट जन्मशताब्दी वर्ष! मराठी भाषकांसाठी ही मोठीच आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या भूमीत पहिल्यांदा समाजक्रांतीचे बीज पेरले ते श्रीचक्रधरांनी. वर्णव्यवस्थेला नाकारत सर्व जातीवर्णातल्या लोकांना त्यांनी जवळ केले. स्त्रीस्वातंत्र्याचा उच्चार जाहीरपणे करत त्यांना मोक्षाचा अधिकार बहाल केला. मराठीसारख्या लोकभाषेला धर्मभाषेचा दर्जा देऊन तिच्या वापराचा आग्रह धरला...

मी प्रामाणिकपणे ‘कृष्णदेवराय’ सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. वैभवशाली जगाच्या केंद्रस्थानी कृष्णदेवरायाने जसं स्वत:ला बघितलं असेल, तसं त्याचं चित्र उभं करण्याचा हा प्रयत्न आहे

हे पुस्तक उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे, पण आख्यायिका, लोकगीतं आणि लोकस्मृती यांचाही यात गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. मी प्रथम कृष्णदेवरायाचं ‘अमुक्तमाल्यदा’ हे उत्कृष्ट काव्य वाचलं, तेव्हा भारावून गेलो होतो. एक ऐतिहासिक स्रोत म्हणून क्वचितच याचा अभ्यास केला जातो. मात्र अशा साहित्याचं संवेदनशील वाचन नेहमीच कवीच्या मनाची एक अनन्यसाधारण खिडकी उघडून देतं, असं मला वाटतं...

शिक्षण म्हणजे मुलांना ‘शिकवून काढणं’ नसून स्थानिक संस्कृतीविषयी संवेदनशील राहून, ‘शिकायचं कसं’ यासाठी तयार करणं, हा विचार या पुस्तकातून पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येतो

हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वाच्या अशा भाषाशिक्षण, गणितशिक्षण, शिक्षणातील मूल्यं, भाषा आणि सत्ता, लोकशाहीचं शिक्षण परीक्षांचं ‘व्यसन’, ज्ञानरचनावाद, बालसाहित्य आणि त्याचं शिक्षणातलं स्थान, संस्कृतीसापेक्ष संवेदनशील शिक्षण, ऑनलाइन शिक्षण, मध्यमवर्गीय मुलांसाठीची शाळानिवड, शिक्षणाचं माध्यम अशा अनेक विषयांचा ऊहापोह करतं. ‘निगुतीच्या बालककेंद्री शिक्षणा’चं महत्त्व अधोरेखित करण्याचं काम करतं...

पाब्लो पिकासो यांचे ‘गेर्नीका’ आणि साल्वादोर दाली यांचे ‘पर्सिस्टन्स ऑफ मेमरी’ : जुलमी व पाशवी शक्तीचे प्रभावी प्रतीक आणि काळ व अवकाश या संकल्पनांचा नवा व अनोखा अर्थ

या पुस्तकात प्रामुख्याने कलेविषयीचे लेख आहेत. मात्र केवळ कलाविचार असे त्यांचे स्वरूप नाही, तर ज्या राजकीय-सामाजिक पर्यावरणात कला आकार घेते, साकार होते, तो काळही पाटकरांनी उभा केलेला आहे. कलेला राजकीय-सामजिक संदर्भ असतातच. त्यांचा अन्वयर्थक उलगडा करत पाटकर विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान यांचेही दाखले उचित ठिकाणी देतात. ‘कलेचा सामाजिक भाष्यकार’ या भूमिकेतूनच पाटकरांनी हे लेखन केलेलं आहे...

माझी इस्लामवरची श्रद्धा आणि माझ्या देशावरचं माझं प्रेम, यांत कुठेही कधीही विसंवाद नव्हता. खरं सांगायचं, तर माझ्या या दोन्ही निष्ठा एकमेकांशी अगदी जवळून गुंफलेल्या होत्या

अमुविचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस गोमांसभक्षणाला बंदी घातली. आपल्या देशबांधवांच्या धार्मिक श्रद्धा दुखवायच्या नाहीत. हा उद्देश त्यामागे होता. आज मुस्लीम समाजानं हे ठरवायचं आहे की, आपण अशा काही प्रकारे ताज्या संदर्भाशी आणि वस्तुस्थितीशी जोडलेले राहणार आहोत का? माझ्या धर्मबांधवांना माझा सल्ला असा राहील की, तुमच्या देशबांधवांच्या सामाजिक चालीरीतीबाबत संवेदनशील रहा...

गर्जती महाराष्ट्री २ : शेतकऱ्यांचा नायक, निष्कलंक, महाराष्ट्र भगीरथ, दुबळ्यांचा आवाज, गुरुवर्य, एकच नाथ, भाजपचे दादा, राष्ट्रवादीचा वाघ, ग्रासरूटचा पुढारी, झुंजार, विदर्भवीर, छत्रपती शाहूंचा वारसा, धाडसी, सीएमची सावली...

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव गेल्या वर्षी झाला. या वर्षी ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईच्या लोकमुद्रा प्रकाशनाने ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. राजा कांदळकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील १०१ प्रभावशाली व्यक्ती आणि २१ उगवत्या ताऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे...

गर्जती महाराष्ट्री १ : हिंमतवान, बिनटाका डॉक्टर, गाडगेबाबांचा वारकरी, अंजूमनचा नेता, आरोग्य समाजवादी, बेडर सीपी, निषक्ष अधिकारी, कल्पक कर्तबगार, जॉर्जचा वारसा, सावरपाडा एक्सप्रेस, निडर बेबाक....

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव गेल्या वर्षी झाला. या वर्षी ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईच्या लोकमुद्रा प्रकाशनाने ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. राजा कांदळकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील १०१ प्रभावशाली व्यक्ती आणि २१ उगवत्या ताऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे...

२१ उगवते तारे : तेजस ठाकरे, सुरज येंगडे, कुणाल कामरा, रणजितसिंह डिसले, कौस्तुभ विकास आमटे, राहुल घुले, राज कांबळे, उमर खालिद, सुजात आंबेडकर, कुणाल राऊत, रोहित पवार, आलिया भट, रिंकू राजगुरू...

महाराष्ट्रीयन आयकॉन्सबद्दलचं हे कॉफी टेबल बुक. हे आयकॉन्स् विविध क्षेत्रांतले आहेत. राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्र, संशोधन, समाजकारण, साहित्य, खेळ, सिनेमा अशा सर्वच प्रभावी क्षेत्रांतल्या आयकॉन्सचा यात समावेश आहे. महाराष्ट्र दगडधोंड्यांचा खराच, पण नररत्नांची खाणही आहे. ही रत्ने या आयकॉन्समध्ये सापडतील. यात कुणाचाही नंबर लावलेला नाही. क्रमवारी नाही. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात अव्वल आहेच...

बहुजनांचा पंडित, सांस्कृतिक बंडखोर, लढणारा लेखक, फुल्ल टीआरपीवाला, ‘पानिपत’कार, सत्यशोधक संपादक, पहिली सुपरस्टार, नटसम्राट, बुद्धिमान नटरंग...

महाराष्ट्रीयन आयकॉन्सबद्दलचं हे कॉफी टेबल बुक. हे आयकॉन्स् विविध क्षेत्रांतले आहेत. राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्र, संशोधन, समाजकारण, साहित्य, खेळ, सिनेमा अशा सर्वच प्रभावी क्षेत्रांतल्या आयकॉन्सचा यात समावेश आहे. महाराष्ट्र दगडधोंड्यांचा खराच, पण नररत्नांची खाणही आहे. ही रत्ने या आयकॉन्समध्ये सापडतील. यात कुणाचाही नंबर लावलेला नाही. क्रमवारी नाही. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात अव्वल आहेच...

सूत्रधार, पाणीवान, वन मॅन इंडस्ट्री, सत्याग्रही फकीर, रोडकरी, उद्योग रत्न, अणुऊर्जावान, व्हॅक्सीनवाला, गांधीयन उद्योजक, बंदिवान विचारवंत, पॉवरफुल न्यूज अँकर, अर्थशास्त्रज्ञ आणि संघर्ष नायिका

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव गेल्या वर्षी झाला. या वर्षी ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईच्या लोकमुद्रा प्रकाशनाने ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. राजा कांदळकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील १०१ प्रभावशाली व्यक्ती आणि २१ उगवत्या ताऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे...

जयंत पवार यांनी मराठी कथेच्या धमन्या रुंदावण्याचे काम केले. दुय्यम, गौण म्हणून हिणवल्या गेलेल्या या वाङ्मयप्रकारास प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार आहे

मराठी कथेचा आशयाविष्कारात्मक विस्तार करण्यात जयंत पवार यांचा वाटा महत्त्वाचा आहे. कथेची बलस्थाने त्यांनी समोर आणली. शोषित, वंचितांच्या जीवनानुभवाला आवाज दिला. गेल्या चारेक दशकामध्ये नवभांडवली व्यवस्थेच्या आक्रमणाचा जनसामान्यांच्या जगण्यावर काय परिणाम झाला, याचा तळा-मुळातून शोध घेण्याचे काम केले. प्राचीन मिथकीय सृष्टीचा नवा अन्वयार्थ लावत पुढील लेखकांना नवा परिप्रेक्ष्य उपलब्ध करून दिला...

‘धरणसूक्त’ : प्रभावी निसर्गचित्रणे, सहजतेने उभ्या राहणाऱ्या व्यक्तिरेखा, तांत्रिक बाबींना मानवी व्यवहाराची जोड, जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक वृत्ती, यांमुळे ही मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी ठरते

कादंबरीचे लेखक विलास शेळके हे स्वत: प्रयोगशील अभियंते आहेत. शासनाच्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यामुळेच असा एक आगळावेगळा अनुभव ते आपल्या कादंबरीतून साकार करू शकलेले आहेत, असे म्हणावे लागते. याचा अर्थ असा की, जीवनाच्या विविध क्षेत्रांतील प्रतिभावंत जोपर्यंत साहित्याच्या क्षेत्रात येत नाहीत, तोपर्यंत मराठी साहित्याचे पात्र विस्तृत होणार नाही...

‘निळे आकाश’ या पुस्तकातून १६ यशस्वी दलित उद्योजकांच्या कथा आपल्यासमोर येतात. वंचित समाजातील अनेक नवतरुण, महिला, मध्यम तसेच ज्येष्ठ वर्गामध्ये त्या नवचेतना जागवणाऱ्या ठरतील

महाराष्ट्रासारख्या विविधता, विपुलता आणि पुरोगामी चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या राज्यात मातृभाषेत असलेल्या या उद्योजकांच्या कथा अनेक अल्पशिक्षित, उपेक्षित तरुणांना मार्गदर्शक ठरतील. यातील काही कथा या महाराष्ट्रातीलच असल्याने त्यांना ते अधिक भावेल. कठोर आणि प्रतिकूल परिस्थितीतील या उद्योजकांचा प्रवास, तरुणांनी पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची प्रेरणा देतील...

नीलचक्रांकित तिरंगी राष्ट्रध्वज हा आपल्या भूतकाळातील सर्व राष्ट्रीय भावना आणि भविष्यकाळाबद्दलच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्णपणे व्यक्त करणारा आहे

स्वतंत्र भारताची राज्यघटना ठरवण्यासाठी घटना समिती नेमण्यात आली होती. या घटना समितीने अशोक चक्रांकित राष्ट्रध्वजाला मान्यता दिली. या नव्या राष्ट्रध्वजातील तीन रंग हे स्वातंत्र्याचे सत्य, शांतीची शुचिता व समृद्धीचे सौंदर्य व्यक्त करणारे असून, त्यावरील अशोक चक्र हा प्रगतिपर सद्धर्मपालनाचा निदर्शक आहे. प्रखर भूतकाळ आणि उज्ज्वल भविष्यकाळ, या दोन्हीकडे एकाच वेळी लक्ष ‌वेधण्याचे काम तिरंगा करतो...

माधव कृष्ण सावरगावकरांनी स्वत:साठी ‘अलोन’ ही नाममुद्रा निवडली आणि ती सार्थ ठरवली. या इंग्रजी शब्दाचे एकटा, एकाकी, सुटलेला, दुरावलेला, तुटलेला अशा अनेक अर्थछटा एकवटून कवी पुन्हा दशांगुळे उरतोच

काही थोरामोठ्यांचा प्रश्न खराखुरा अस्वस्थ करणारा असतो. त्यांना आणि वाचकांनाही, बालकवी म्हणाले – ‘कोठुनि येते काही कळेना उदासीनता ही हृदयाला?’ ग्रेस स्वत:मध्ये डोकावून विचारतात- ‘माझ्या मना तुला रे दुखते कुठे कळू दे’. अलोन यांच्या कविता वाचताना असे वाटले की, कवीच्या दु:खाची कारणे लौकिकामध्येसुद्धा आहेत. पण कवी त्याच्या स्वभावधर्मानुसार तपशील सांगत नाही...

पत्रकारिता हे एक दर्शन आहे, पवित्र कर्तव्य, धर्म आहे, असे म्हणणे आज ‘हास्यास्पद’ ठरले आहे. अशी पत्रकारिता लोकशाहीची ‘रक्तवाहिनी’ व ‘आधारस्तंभ’ कशी काय राहू शकते?

माध्यमांच्या या शक्तीचे मात्र भयदेखील लोकमानसात आहे. त्यामुळे तटस्थता, वस्तुनिष्ठता ही पत्रकारितेची ग्रांथिक वैशिष्ट्ये तेवढी उरतील असे भय वाटू लागले आहे. पत्रकार आणि पत्रकारिता यांचे हे बदलते स्वभाव हा जगभरातच माध्यमाच्या नीतिमत्तेसंबंधांत दक्ष असणाऱ्यांसाठी चिंतेचाच विषय आहे. वृत्तपत्राचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे यापैकी कोणत्या वर्गाचे? पत्रकारांचे की मालक-संचालकांचे?...

मी ‘सुधारक युगा’तील पर्वांची मांडणी करताना आदी पर्वाला ‘फुले-रानडे पर्व’, मध्य पर्वाला ‘टिळक-शिंदे-शाहू पर्व’ आणि अंतिम पर्वाला ‘गांधी-शिंदे-आंबेडकर पर्व’ असे म्हटले आहे (उत्तरार्ध)

फुले-रानडे पर्वाची पूर्वतयारी दादोबा पांडुरंग, लोकहितवादी आदि यांनी केली होती. त्यांची मांडणी महत्त्वाची असली तरी त्यांचा ठसठशीत प्रभाव पडून त्यातून स्वतंत्र परंपरा निर्माण होऊ शकल्या नाहीत. एरवी फुले आणि रानडे यांच्या धर्मसमाजांची मुळे दादोबांमध्ये शोधता येतात. लोकहितवादी तर ब्राह्मणांचे आद्य टीकाकार. फुल्यांपासून तर प्रबोधनकार ठाकरे व आंबेडकर यांच्यापर्यंतच्या सुधारकांना त्यांचा उपयोग झाला आहे...

या माणसाशी लग्न करण्याच्या आधीपासून एक मनस्वी कलाकार म्हणून त्यानं माझ्या आयुष्यात स्थान मिळवलेलं होतं. मी या कलाकाराची जबरदस्त फॅन होते आणि आजही आहे

इतकं प्रचंड मोठं यश मिळवताना तो घेत असलेली मेहनत, त्याचा अभ्यास, त्याचे कष्ट, त्याची पॅशन हे मी अनुभवलं ते बायको म्हणून. आणि वाटायला लागलं, हे सगळं लोकांसमोर यायला हवं. यश मिळणं कसं आणि कधी शक्य होतं, हे आजच्या पिढीला कळायला हवं. कामाची इतकी प्रचंड व्याप्ती असलेल्या या कलावंताचं आयुष्य तरुण कलाकारांना समजायला हवं. आपल्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून अशोकनं आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून धोके पत्करलेले आहेत...

एकदा राख झाल्यावर आपण कोण होतो, हा प्रश्न आपल्याला पडणार नाही. तोपर्यंत हिंदू म्हणून जगण्याची आणि ‘हिंदू’ कादंबरी वाचण्याची धडपड आपण करत रहायला हवी

कालांतराने पहिली कादंबरी गाजल्यावर मग दुसरी, मग चौथी असे उदाहरणार्थ लेखन चमत्कार दाखविण्यात बिझी झाल्याने, पांडुरंगाच्या हातून आर्तता निसटली ती निसटलीच. उरले ते कसब आणि प्रचंड कष्टाळुपणे तावांमागून तावांवर ताव मारत राहणे. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर या ‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखकांविषयी तुच्छतादर्शक बोलून बोलून दमल्यावर शेवटी पांडुरंगाने स्वत:च २०१४ साली ज्ञानपीठाच्या पायरीवर आपलेही बूड टेकले...

पालकत्वाच्या जबाबदारीचा सामना मुलांमधील लैंगिक जाणिवा, लैंगिक प्रवृत्ती, लैंगिक वर्तन, लैंगिक कुतूहल किंवा लैंगिक प्रेरणा यांच्याशी सतत होत असतो

असं जेव्हा जेव्हा होतं, तेव्हा तेव्हा अनेक पालक गोंधळून, चक्रावून जातात व चुकतात, हे मी गेली ३६ वर्षं सतत पाहत आलो आहे. म्हणूनच लैंगिकता व पालकत्व यांची जिथं जिथं गुंफण होते, अशा अनेक नाजूक विषयांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, वेगळ्या प्रकारे विचार करणं कसं शक्य आहे, याचं प्रात्यक्षिक देता यावं, आपल्याला सुचले नसले तरी मार्ग काढण्याचे इतर पर्याय नक्कीच असतात, हे दाखवून देता यावं, यासाठी हे पुस्तक लिहिलं...

‘माऊथ फ्रेशनर’ या संग्रहातील कविता व्यथा, वेदना आणि अस्वस्थेच्या कविता आहेत. भारतीय संविधान, लोकशाही समाजवादी विचारधारा ही कवीची वैचारिक भूमिका आहे. याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये दिसते!

आपल्या देशातील संमिश्र संस्कृती, गंगा-जमुनी तहजीब आणि सहिष्णूतेचा वारसा नष्ट करण्याचे षडयंत्र सांप्रदायिक शक्तींनी गेल्या काही वर्षांमध्ये नियोजनपूर्वक रचले आहे. या संकुचित राष्ट्रवादाच्या राजकारणाला काही प्रमाणात यशही मिळते आहे. याची जाणीव या कवीला आहे. द्वेष, दुहीच्या या राजकारणाचा त्यांना त्रास होतो आहे. ही चिंता कवीने सहज, साध्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांमध्ये विविध कवितांमधून व्यक्त केलेली आहे...

मनाचे ‘समाधान-असमाधान’ यातून रोजच्या निरस जगण्यात उभे राहणारे नाट्य, हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. या कथा माणसातल्या सौंदर्याबरोबरच विरूपतेचेही दर्शन घडवतात आणि विजिगीषेबरोबरच माणसाच्या आत्मनाश, आत्मघाती वृत्तीवरही बोट ठेवतात

मानवी स्वभाव वैशिष्ट्ये-वैगुण्याचा कोपरा नि कोपरा तपासत प्रिय-अप्रिय वैश्विक सत्यापाशी वाचकास आणून सोडते, ती अस्सल कथा किंवा ‘माणूस असा का वागतो?’ या प्रश्नाचे सोपे उत्तर देण्यापेक्षा ‘माणूस असाही वागतो’ असे सुचवते ती अस्सल कथा- या काही निकषांवरही प्रस्तुत संग्रहातल्या कथा उजव्या ठराव्यात, अशा आहेत. यातल्या काही कथांनी एक सामान्य वाचक म्हणून माझा पिच्छा पुरवला आहे...

देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे आद्य प्रवर्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! परंतु हिंदू महासभा, गीता प्रेस परिवार यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारप्रवाह रा.स्व. संघाच्याही आधीपासून सक्रिय होता!

महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या सजग नागरिकांचा असा समज असतो की, देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे आद्य प्रवर्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! परंतु हिंदू महासभा (स्थापना १९०५), गीता प्रेस परिवार यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारप्रवाह रा.स्व. संघाच्याही आधीपासून सक्रिय होता. एवढेच नाही तर देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे जनकत्व आणि राजकीय सूत्रे उत्तर भारतातील याच गटांकडे जातात...

‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेतकऱ्याच्या निमित्ताने जोतीरावांनी एकूण तत्कालीन ग्रामीण महाराष्ट्राचेच वास्तव चित्र रेखाटलेय! 

या पुस्तकाबाबत दुर्गा भागवत म्हणतात, “महात्मा फुल्यांनी येथल्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहून साधारण १८८० वगैरेच्या दरम्यान हे पुस्तक लिहिले. त्यांच्या काळात अन्य कुणाला शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर पुस्तक लिहिणे सुचू नये, यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो. त्यांनी इतरही अनेक परोपकाराची आणि आणि लोकहिताची कामे केली. ती केली नसती तरी ‘शेतकऱ्याचा असूड’ या एकाच पुस्तकानेही त्यांचे मोठेपण सिद्ध झाले असते.”...

हे पुस्तक दलित अस्तित्वाची मांडणी करणारा एक दस्तऐवज आहे. दलित आणि दलितेतरांच्या उच्चभ्रू वर्तुळांकडेही भिंग लावून पाहण्याचं काम हे पुस्तक करतं...

आजच्या जातीय-भांडवली भारतात दलित म्हणून जगणं याचा नेमका अर्थ काय? भय आणि दडपशाहीशिवाय मोकळेपणाने विचार करण्यासाठी, जगण्यासाठी एखाद्या समूहाला जेव्हा कुठलाच अवकाश दिला जात नाही, तेव्हा त्या समूहाला आपण कसं समजून घ्यायचं? दलित ‘असणं’ हे आत्ता ‘असणं’ आहे. हे पुस्तक पहिल्या पिढीतील सुशिक्षित दलितांचा दृष्टिकोन मांडतं आणि विविध विचारसरणींचा प्रभाव असलेल्या बदलत्या जगाचा अनुभव हा दलित कसा घेतो, हे सांगतं...

उतू जाणाऱ्या सुखातही दुःखाचे चटके देणारा विकास हवा की, अभावातही आंतरिक सुख देणारे समाधान हवे, हे ठरवण्याची निर्णायक वेळ आज आली आहे!

प्रगती आणि विकासाच्या वेगाचा अतिरेकी ध्यास घेणारा अमेरिकन नागरिक आज युरोपियन देशांच्या तुलनेत आपली झोप कमी करून एका वर्षात तेरा महिने काम करतो. तरीही तो स्वतःला कायम असुरक्षित समजत असतो. ही विकासाची सूज की, प्रगतीचा बुडबुडा? दुसरीकडे विकासविषयक अनेक उणिवा आणि अभाव असतानाही चिमुकला भूतान आत्मिक समाधानाचा ध्यास धरतो आहे. उतू जाणाऱ्या सुखातही दुःखाचे चटके देणारा विकास हवा की, अभावातही आंतरिक सुख देणारे समाधान हवे,...

उदारमतवाद हा लोकशाही मूल्यांच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेला मानसिक घटक असून, तो मनाच्या खुलेपणाशी खूप जवळून जोडला गेला आहे

आपल्या समूहामध्ये राहणे, आपल्या समूहाला पसंती देणे आणि इतर समूहांपासून दूर राहणे होय. असे करणे हे सामान्य मानवी वर्तन असते, सोपे असते. त्याचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक फायदेदेखील असतात. परंतु, हे वर्तन हुकूमशाही पद्धतीच्या राजकीय व्यवस्थेला अनुरूप असे आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये याउलट वर्तन अपेक्षित असते. आपल्याहून जे वेगळे लोक आहेत, त्यांना समजून घेणे आणि सर्वसमावेशक असणे, हे लोकशाहीशी सुसंगत वर्तन आहे...

संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असलेले मेंढा (लेखा) हे काही एकच गाव नाही. मग त्या सर्व गावांमध्ये असे का घडत नाही? याचा अर्थ स्पष्ट आहे की, ही सर्वांमध्ये असलेली मानवी क्षमताच आहे, जी कुठेही प्रगट होऊ शकते!

जशी देशात लोकसभा, राज्यात विधानसभा तशीच गावात ग्रामसभा व शहरातील मोहल्ल्यात मोहल्लासभा आहे. या ग्रामसभा व मोहल्लासभा स्वयंभू आहेत. त्यांना कुणी निवडून दिलेले नाही, म्हणूनच त्यांना कुणी पाडूसुद्धा शकत नाही. अशी ग्रामसभा व मोहल्लासभा हेच राजकीय व सामाजिक सांगाड्याचे पायाभूत घटक (बेसिक युनिट) आहेत. अशी जिवंत ग्रामसभा किंवा मोहल्लासभा एखादे लहान राजस्व गाव, टोला, पाडा, मोहल्ला किंवा हाऊसिंग सोसायटीसुद्धा असू शकेल...

‘लोकशाही’ हा एक प्रवास आहे, ते एक जीवनमूल्य आहे. पण, ‘बहुमतशाही’ या प्रवासालाच खीळ घालते. बहुमतशाहीचा धोका लोकशाहीला नेहमीच राहणार आहे

लोकशाहीला एक प्रकारची बहुमतशाही मानणे म्हणजे लोकशाहीचा आत्माच हिरावण्यासारखे आहे. कारण, लोकशाहीतील गाभ्याचे तत्त्व समतेचे आहे. समता याचा अर्थ, सर्व व्यक्तींच्या ठिकाणी व्यक्ती म्हणून समान प्रतिष्ठा असणे. व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची आहे, कोणत्या प्रदेशातील, कोणती भाषा बोलणारी, स्त्री-पुरुष की ट्रान्सजेंडर, कौशल्यवान की अकुशल, श्रीमंत की गरीब, यांचा विचार न करता सर्व व्यक्तींच्या ठिकाणी समान प्रतिष्ठा असते...

लोकशाहीत ‘एक व्यक्ती - एक मूल्य’ हे तत्त्व टिकवायचे असेल, तर सांविधानिक कायद्याद्वारे समाजाच्या राजकीय तसेच आर्थिक जडणघडणीचे स्वरूप निश्चित करणे आवश्यक आहे!

निवडणुकांच्या माध्यमातून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी व राज्यकर्ते यांच्यावर खरे तर लोकांच्या हिताच्या सामाजिक व आर्थिक जडणघडणीचे स्वरूप व त्यावरील नियंत्रण ठरवणे याचे उत्तरदायित्व होते. पण, गेल्या ७५ वर्षांत निवडून आलेले राज्यकर्ते नेहमीच भांडवलदार व उच्चवर्ग यांच्या हिंतसंबंधांना पोषक राहिले. कारण, स्वातंत्र्यानंतर घटनाकारांच्या उद्दिष्टातील ‘लोकशाही भारत’ घडवण्याचे स्वप्न दूर-दूर जात राहिले...

हा संग्रह विद्वानांच्या पसंतीस उतरेल आणि प्रा. मोहन गोविंद धडफळे नावाचे ‘संमोहन’ (गारूड) त्यांच्या मनावर अधिराज्य करेल...

भारतविद्या, भाषाशास्त्र, आणि कोशविज्ञानात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी हा ग्रंथ एक अमोल ठेवा ठरेल. संस्कृत आणि पाली साहित्याच्या क्षेत्रात भरघोस काम केलेल्या काही अभ्यासकांच्या जीवनात डोकावण्याची संधी, या ग्रंथाच्या निमित्ताने आपल्याला मिळेल. आमच्या लाडक्या सरांच्या फक्त अभ्यासू वृत्तीचेच प्रतिबिंब या संग्रहात पडले आहे, असे नव्हे तर त्यांच्या चिकित्सक, चौकस, आणि मिश्किल वृत्तीचेही दर्शन आपल्याला यातून होईल...

आजच्या तरुणाची ‘ही’ अवस्था तर, ‘उद्याच्या माणसा’चे चित्र कसे असेल? मला तरी ते चित्र तंत्रसज्ज आदिमानवासारखे मुक्त, निसर्गप्रेमी दिसते. मनाची ती खरी ‘लोकशाही’ अवस्था!

मला ते आदिमानवाचे चित्र दिसते. तो एकटा लाख वर्षांपूर्वी जग पादाक्रांत करत निघाला आहे. त्याने सोयीसोयीने माणसे जोडली आहेत. आजचा तरुण - समोर लॅपटॉप, हातात मोबाइल - मला त्या आदिमानवासारखाच भासतो. तो त्याला हवी ती गोष्ट मिळवतो, कोठेही जोडला जाऊ शकतो. त्याची वेगवेगळी ‘नेटवर्क’ असतात, तो वेगवेगळ्या ‘कम्युनिटीं’चा मेंबर असतो. ती नेटवर्क वा त्या कम्युनिटी त्या तरुणाच्या जीवनाचा भाग होऊ इच्छित नाहीत...

या तिसऱ्या खंडात जे लेख घेण्यात आले आहेत ते संकीर्ण आहेत. पण किरकोळ नक्कीच नाहीत. गांधीजी आणि भाषा ही चर्चाही तितकीच महत्त्वाची, जितकी गांधीजी आणि मार्क्सवाद...

माझ्यावर मराठी भाषेचे उपकार आहेत. मी आणि गांधीजी दोघेही गुजराथी. गांधी समजण्यासाठी महाराष्ट्राचा राजकीय-सामाजिक पट, त्यावर पडलेली गांधींची (समर्थक-विरोधक) छाप, एकूण महाराष्ट्रातील गांधीविषयक वैचारिक चिंतन वाचणे आवश्यक आहे. मराठीत खूप वाचलेले असल्याने मला त्याचा लाभ झाला, हे ही प्रस्तावना लिहिण्यामागचे पहिले कारण. मला हे कबूल केले पाहिजे की, मराठीइतका बहुआयामी विमर्श माझ्या मातृभाषेत, गुजराथीत झालेला नाही...

या खंडात म. गांधींच्या विचारांची परीक्षा जगातील इतर थोर विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात केली आहे. त्यात सॉक्रेटिसपासून आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्यापर्यंतच्या विचारवंतांचा समावेश आहे!

गांधींच्या विचारांचा विविध लेखकांनी जो वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास केला, त्याचे आकलन करण्यास हे लेख साह्यभूत होतील. म. गांधींचे विचार विश्वव्यापक आणि समृद्ध आहेत आणि या विचारांचा विकास नंतरच्या लोकांनी पण केला आहे. आजच्या आपल्या समस्या समजून घेण्यासाठी व त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा आपणास उपयोग होणार आहे. प्रत्येक लेखकाने एका विशिष्ट अशा विचारवंताच्या विचारांच्या संदर्भात गांधीविचारांची चर्चा केली आहे...

गांधीजींचे व्यक्तिमत्त्व, गांधीविचारांचे काही पैलू, यावर प्रकाश टाकणाऱ्या या पहिल्या खंडात, सर्वच अभ्यासकांनी गांधींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे केवळ आकलनच मांडले नाही, तर गांधी विचारांच्या प्रस्तुततेचेही अधोरेखन केले आहे!

जवळजवळ पाच पिढ्यांमधल्या अभ्यासकांच्या लेखांचा यात समावेश आहे. टिळक-टागोरांची एक पिढी, नेहरू-आचार्य भागवत यांची एक पिढी, कुरुंदकर-पळशीकर यांची एक पिढी, चौसाळकर-सुमंत यांची एक पिढी व आताची चैत्रा रेडकरांची पिढी. पहिल्या मराठी गांधी चरित्राला टिळकांनी प्रस्तावना लिहिल्याला शंभर वर्षे होऊन गेल्यावरही गांधींचे व्यक्तित्व, गांधीविचार अभ्यासकांना खुणावत आहे, चिकित्सेचा मोह घालत आहे...

जर ‘डिजिटल माध्यमां’ना आपल्या विचारांनुसार चालवण्याचा राजकीय प्रयत्न यशस्वी झाला, तर पत्रकारितेचं काही प्रमाणात राहिलेलं स्वतंत्र अस्तित्व संपायला वेळ लागणार नाही

स्वतंत्रपणे पत्रकारिता करणार्‍यांसाठी ‘डिजिटल माध्यम’ खुलं आहे. मीडिया हाऊसेसवर असलेला दबाव, त्या ठिकाणी असलेली पत्रकारितेची नोकरी आणि दबावामुळे होणारा मानसिक त्रास, यामुळे डिजिटल माध्यमाकडे एक संधी म्हणूनही बघितलं जातं आहे. ही माध्यमांमधली खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणावी लागेल. मात्र ही माध्यमं जितक्या मुक्तपणे बातम्या देण्याचं काम करतात, तितक्याच प्रमाणात काही विशिष्ट वर्गाकडून याचा गैरवापरही केला जातो...

आज एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना, दुसरीकडे इथल्या भटक्या विमुक्तांना आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करता येत नाही, अशी विदारक स्थिती पाहायला मिळते

दर पाच वर्षांनी येणाऱ्या राजकीय निवडणुकांमध्ये अनुभवांती पसंती-नापसंतीनुसार राज्यकर्ते निवडण्याचे अधिकार मतदारांना आहेत. सर्व समाजाच्या व्यापक हितासाठी स्वतंत्र बुद्धीने व निर्भयपणे मतदान करणे हा राजकीय प्रामाणिकपणा होय. आपल्या समाजव्यवस्थेत असलेली ऐतिहासिक विषमता, काहींचे शोषण, काहींकडे होणारे दुर्लक्ष, यांवर मात करून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे...

जोपर्यंत आपण ‘ट्रान्स कम्युनिटी’च्या समस्यांना आपला मुद्दा बनवत नाही, तोपर्यंत तिची प्रगती शक्य नाही. आपण सर्वांनी मिळून सर्वसमावेशक समाजाची संकल्पना प्रत्यक्षात आणायची आहे

सध्याचा ट्रान्सजेंडर कायदा लैंगिकतेच्या प्रमाणीकरणाबद्दल बोलतो. वस्तुस्थिती अशी आहे की, एक मोठा वर्ग अजूनही आपली लैंगिकता सर्वांसमोर उघड करण्यास घाबरतो आहे. त्यामुळे नुसते कायदे कितपत प्रभावी ठरतील, हे येणारा काळच सांगेल. कुठलेही बिल समाजाचा दृष्टीकोन बदलू शकत नाही. त्यासाठी आपल्यालाच राजकीय लढाईबरोबर सामाजिक लढाईदेखील लढावी लागणार आहे आणि ती लढाई भारताच्या वेगवेगळ्या भागांत सुरू आहे...

राजकीय लोकशाहीतील महिलांचा टक्का वाढणे, ही केवळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाही, तर संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी, सामाजिक परिवर्तनासाठी अत्यावश्यक पायरी आहे

एक महिला पंतप्रधान होऊन देशातील महिलांची स्थिती बदलत नाही, तर सर्वस्तरीय निर्णय प्रक्रियेत महिलांचा टक्का जेवढा वाढत जाईल, तेवढी ती विकसित होत जाईल. महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वामुळे विकासाचे दृष्टीकोन, कामाची दिशा, ध्येय-धोरणे, प्रश्नांची मांडणी आणि उपाययोजनांची संधी हा साराच अवकाश बदलत असल्याचे पंचायत राज व्यवस्थेने सिद्ध केले आहे. आमूलाग्र बदल झाले, तरच राजकारणातील ‘ग्लास सीलिंग’ भेदणे शक्य आहे...

जसं जुगारामध्ये जुगार चालवणाऱ्याचा नाही, तर तो खेळणाऱ्याचा संसार उदध्वस्त होतो; तशीच अवस्था आपल्या मतदारांची झाली आहे. त्यांच्याकडून हा खेळ खेळून घेतला जातोय...

मतदान केंद्राबाहेर मर्सिडिजने येणारा आणि पांगूळगाड्यावर येणारा एकाच रांगेत उभा राहतो. एवढंच नाही, तर त्या दोघांच्याही मताची किंमत माणूस म्हणून एक आहे, समान आहे. अन्यथा, आपल्या देशात ना भाषा एक आहे, ना प्रांत, ना मानवानेच निर्माण केलेला धर्म एक आहे; ना निसर्गाने दिलेला रंग एक आहे, ना हिमतीने कमावलेला मान-सन्मान, धन एक आहे. फक्त नि फक्त संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार एक आहे, तिथेच आम्ही फक्त एकमेकांच्या बरोबरीत आहोत...

आपल्या विकास संकल्पना वा ध्येयधोरणांची पुनर्रचना करणं गरजेचं आहे. कारण, शहरी असो की ग्रामीण, हा देश सांविधानिक लोकशाहीच्या स्थिरतेत सतत प्रगतिशील असायला हवा

देशांतर्गत आणि देशाबाहेरील स्थलांतराचा परिणाम हा केवळ ‘ब्रेन ड्रेन’ म्हणून नाही, हा एकूणच राष्ट्राच्या जडणघडणीतील मोठा अडसरसुद्धा आहे. देशातील लोकशाही मूल्यांवरील ‘ट्रस्ट डेफिसिट’ कमी करणे आणि लोकशाही प्रक्रियेतील कृतिशील सहभाग वाढवणे, असे दोन उद्देश ठेवूनच शहरीकरण आणि स्थलांतर यांचे अर्थ शोधावे लागतील. अन्यथा, भारतीय लोकशाहीला  घटनेतील मानवी मूल्यांचा विसर पडलाय की काय, असे म्हणायची वेळ येईल...

या पुस्तकाचा विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा मांडणारा विभाग वाचवत नाही. एखाद्या प्रश्नाचे परिणाम किती भीषण असतात, हे ते प्रकरण वाचताना जाणवत राहते, अस्वस्थता येते. हे पुस्तक वेदनेची सनद आहे. दुःखाचा हुंकार आहे

या पुस्तकात किरण चव्हाण यांनी संकलित केलेल्या आत्महत्या केलेल्या शिक्षकांची यादी वाचली. ती संख्या आणखीही मोठी आहे, पण ती यादी वाचताना, वेदना होताना आश्चर्यही वाटत होते. याचे कारण या आत्महत्यांनी महाराष्ट्राच्या समाजजीवनावर ओरखडासुद्धा उमटवला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता फक्त संख्येत मोजल्या जातात, तशीच स्थिती आज शिक्षकांच्या आत्महत्यांची झाली आहे...

मुस्लीम समाजात प्रगतिशील विचारांचे प्रवाह बलवान केल्याशिवाय आणि हिंदू व मुस्लीम समाज प्रत्येक प्रश्नावर कोणता विचार करत आहेत, याबाबत उपभपक्षी जागरूकता निर्माण झाल्याशिवाय आपल्या देशातील लोकशाही परिपक्व होऊ शकणार नाही

सर्वसामान्यपणे मुस्लीम समाजाबाबत हिंदू माणूस उदासीन असतो. मुस्लीम समाज हा निरनिराळ्या प्रश्नांचा कोणत्या पद्धतीने विचार करत आहे, याबाबत आस्थेवाईक जिज्ञासा लोकशाहीच्याही हिताची ठरेल आणि देशाच्याही हिताची ठरेल, हे बौद्धिकदृष्ट्या पटत असूनही हिंदू माणूस मुस्लीम समाजाच्या मानसिक आंदोलनांबाबत उदासीनच राहतो. हा उदासीन असणारा माणूस प्रश्नांचा कोणताही अभ्यास न करता मुस्लीमविरोधी असतो...

जे अस्पृश्यतेचे ‘सफरर’ नाहीत, मात्र ‘छद्म साक्षीदार’ आहेत, ते जातीअंताच्या लढ्याकडे आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे कसे पाहतात, याचा नमुना ही कादंबरी आहे

ही कादंबरी आहे एक दीर्घकाळ नुसतीच नावाला टिकून राहिलेल्या, अवमूल्यन झालेल्या हिंदू संस्कृतीक जीवनशैलीच्या शोकात्मतेची. तिला ‘मराठीतली अभावपुजनाचा प्रघात पाडणारी कादंबरी’, असेही म्हणता येईल. छद्म अशा साक्षीदार घटकाला आपली मुळे आणि मूल्य कोसळत आहेत, हे एका बाजूला वाटते, तर त्याच वेळी जातिव्यवस्था ही रंगीबेरंगी फुलपाखरासारखी आहे, असेही वाटत राहते. हे निराधार आकलन मोठे करणारी ही कादंबरी आहे...

मागच्या जन्मीचे पाप, या जन्मीचे भोग याच्याशी कर्करोग होण्याचा सूतराम संबंध नाही, हे विज्ञानाधारित सत्य वाचकांपर्यंत पोहोचावे, हा या पुस्तकामागचा उद्देश आहे

या पुस्तकात कर्कविज्ञानाच्या आजवरच्या इतिहासातल्या दोन ओळींत, दोन वाक्यांत दडलेल्या चित्तवेधक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टी माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे, संयम, जिद्द आणि सृजनशीलतेचे विहंगम दर्शन घडवणाऱ्या आहेत. या गोष्टींमध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेची, प्रज्ञा-प्रतिभेची लख्ख प्रतिमा उमटली आहे. त्यातून कर्कविज्ञानाचा मानवी चेहरा वाचकांच्या नजरेपुढे येण्यास मदत होईल, अशी आम्हाला आशा आहे...

‘मी समाजवादी आहे. मात्र, समाजवाद ही परिपूर्ण वा निर्दोष रचना आहे, असं मानत नाही. मात्र, ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायानं मी समाजवादी आहे…’

मी समाजवादी आहे, असं विवेकानंद म्हणालेत हे खरं; पण आम्ही समाजवादी आहोत, असं म्हणून समाजवादी होता आलं असतं, तर स्वतंत्र पक्ष सोडून भारतातले इतर सगळे पक्ष कमी-अधिक वेळ समाजवादी होते, असं म्हणावं लागेल! पण ही सांगून होणारी गोष्ट नाही. ती व्यवहारात दिसावी लागते. मार्क्स सांगतो, समाजवादाला, कोणत्याही परिवर्तनाला धर्मचिकित्सेपासून सुरुवात होते आणि धर्मचिकित्सा करणं हे असिधाराव्रत आहे. ती अग्निपरीक्षा आहे...

हा ग्रंथ केवळ नेहरू कुटुंबाचा इतिहास, त्यांचा वारसा, त्यांचा विचार, यांपुरता मर्यादित नाही. हा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांचा झपाटलेला आढावा आहे

पंडित नेहरू हयात असताना, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, जगभर त्यांची प्रचंड प्रतिष्ठा असतानाही, ‘नेहरूंनंतर कोण?’ या प्रश्नाची उघड चर्चा होत असे. वेक्स हॅन्गेन या तत्कालीन ख्यातनाम अमेरिकन पत्रकाराने १९६० ते १९६३ या काळात, भारतीय राजकारणाचा सखोल अभ्यास केला. अशा अनेक नामवंत नेत्यांच्या तसेच मुत्सद्द्यांच्या, पत्रकारांच्या आणि अभ्यासकांच्या मुलाखती घेतल्या. नेहरू हयात असतानाच त्यांनी एक ग्रंथ लिहिला - ‘After Nehru, Who?...

परकी भाषा शिकताना दुसऱ्यांचा परिप्रेक्ष्य कल्पनेने समजून घेण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते. त्यातून आपण माणूस म्हणून अधिक उदार, अधिक संवेदनशील बनतो

परकी भाषा शिकताना दुसऱ्यांचा परिप्रेक्ष्य कल्पनेने समजून घेण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते. त्यातून आपण माणूस म्हणून अधिक उदार, अधिक संवेदनशील बनतो. एक चांगला नागरिक बनणं, आपल्या सभोवतीच्या लोकांसोबत संबंध प्रस्थापित करणं आणि समाजाला सकारात्मकरीत्या योगदान देणं हे भाषा शिक्षणातून साध्य होऊ शकतं. देश, प्रदेश व जग यांच्यामध्ये खरीखुरी एकात्मता हे २१व्या शतकातील विवेकी समाजाचं ध्येय आहे. विदेशी भाषा शिकण्या...

वर्णाश्रमांच्या चौकटीत शक्य होती ती स्वधर्मसाधना वर्ण-आश्रम-जात-रहित झालेल्या वर्तमान सामाजिक परिस्थितीतही व सदासर्वदा शक्य आहे

मी अमुक, मी तमुक, हे माझे अन्‌ हे मला हवे आहे, अशा प्रकारच्या भूमिका जगणारा मानव यथासांग स्वधर्मसाधना करून संत श्रीज्ञानेश्वर म्हणतात, त्याप्रमाणे ‘विश्वव्यापी मानव’ झाल्याचे अनुभवतो. या अर्थाने त्याचा तो सानुभव स्वधर्म हा विश्वव्यापी मानवधर्म होतो. आपल्या ‘स्व’रूपाचे सदासर्वदा स्मरण राखत व कोणत्याही भूमिकेचा दुराग्रह न धरता इष्ट कर्तव्याचरण निष्काम भावनेने करत राहणे म्हणजे सर्वोत्तम स्वधर्माचे पालन...

कलावंत असो किंवा दिग्दर्शक असो, त्याचा प्रत्येक प्रयोग हा नवीनच असतो. यशाचं कुठलंही गमक, कुठलंही निश्चित सूत्र असू शकत नाही. त्याचप्रमाणे अपयशाचंही नेमकं कारण कोणाला कळत नाही

यातले कुठलेही कलावंत आपल्या यशानं कधीच हुरळून गेले नाहीत. त्यांनी अपयशाला जसं धैर्यानं पचवलं, तसंच यशालाही ते खूप संयमानं सामोरे गेले. त्यांच्या या संयमानंच त्यांचा भविष्यकाळ, भावी काळातील त्यांचं काम अधिक सुकर केलं. दीर्घकालीन केलं. या कलावंतांबरोबरच त्यांच्या सहकाऱ्यांना, तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिक वर्गालासुद्धा ते दिलासा देणारं, आनंद देणारं सिद्ध झालं, असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल...

न्गुगीचा नायक सत्य आणि न्यायाच्या शोधात मशाल घेऊन फिरतो आणि सत्ताधारी वर्गाने निर्माण केलेल्या भांडवलशाहीधार्जिण्या देशभक्ती व राष्ट्रवादाच्या मिथकासमोर प्रश्न उपस्थित करतो

या कादंबरीने केनियन समाजात एक अभूतपूर्व वादळ निर्माण केलं आणि या कादंबरीच्या नायकाने उपस्थित केलेले प्रश्न लोकांच्या तोंडी आले. नोंद घेण्याजोगी गोष्ट अशी की, कादंबरीचा नायक मातीगारी हे एक पात्र न राहता एका वास्तविक लोकनेत्याच्या रूपात लोकांत ओळखले जाऊ लागले. केनियाच्या सरकारने मातीगारीला अटक करण्याचे फर्मानही जारी केले होते. जेव्हा त्यांना कळले की, मातीगारी हा वास्तविक प्राणी नसून एक फिक्शनल पात्र आहे...

आगरकरांविषयी विशेष सहानुभूती असूनही लेखकांनी टिळकांना जास्तीत जास्त समजून घेऊन जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे, हे या चरित्राचे वैशिष्ट्य आहे

भागवत-प्रधानांचा प्रस्तुत चरित्रग्रंथ वेगळ्या आणि स्वतंत्र भूमिकेतून लिहिला आहे. त्यामुळे त्याचे स्थान अबाधित आहे. दुसरे असे की, त्यांनी टिळकविचारांचे विवेचन करताना आंतरराष्ट्रीय भूमिकेतून व आशिया खंडाला केंद्रस्थानी ठेवून केले आहे. त्यामुळे वर्तमान परिस्थितीतही ते उपयुक्त ठरेल. इंग्रजीत असल्यामुळे मराठी वाचक मागील ६५ वर्षे या चरित्रग्रंथाला वंचित झाला होता. ही उणीव आता भरून निघाली आहे...

समाजवादी आणि गांधीवादी जीवनदृष्टी घेऊन राजकारण करू इच्छिणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाने आपल्या आयुष्यात आलेल्या मोठ्या, कर्तबगार, तऱ्हेवाईक, तसेच ‘यशस्वी’ माणसांचा घेतलेला हा शोध आहे

लोकोत्तर व कर्तबगार व्यक्तींच्या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने जात, धर्म, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजिक न्याय, समाजवादी राजकारण, हिंदुत्ववाद्यांचे देशाला विषमतेकडे आणि दुःस्थितीकडे नेणारे धोरण या साऱ्यांची चर्चा ‘व्यक्तिरंग’मध्ये येते. त्याचप्रमाणे गेल्या पन्नास-साठ वर्षांतील भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणूनही या पुस्तकाचे महत्त्व वादातीत आहे...

आपला समाज, आपले शेजारी यांचा विचार करायला शिकवणारं हे पुस्तक एकमेकांपासून तुटत चाललेल्या, आत्मकेंद्री आणि स्वार्थी वृत्तीनं पछाडलेल्या आपल्या समाजाकरता फार आवश्यक आहे!

सचोटी, प्रामाणिकपणा, निष्ठा, सभ्यता, शेजारधर्म हे सगळे गुण जेम आणि स्काऊटना त्यांच्या आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये दिसतात आणि तेच प्रसंगी क्रूर, निष्ठुर, अमानुष होतानाही ते पाहतात. चांगुलपणाचा पराभव होताना पाहतात; पण दुष्टावाही जिंकत नाहीच, हेही त्यांच्या लक्षात येतं. या सगळ्याचा अर्थ लावायची त्यांची धडपड हेच त्यांचं मोठं होणं आहे. हार्पर लीचं श्रेष्ठत्व हे की, हे सूत्र ती कुठेच उघडपणे स्पष्ट करत नाही...

मोल्सवर्थ आणि त्यांच्या हाताखालच्या सात संस्कृत-मराठी शास्त्रींनी संपादित केलेल्या शब्दकोशातला ‘ट्याहां’ आतापर्यंत किती लोकांनी अचूक लिहिला असेल?

१३ जुलै २०२१ रोजी जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांची १५०वी पुण्यतिथी साजरी झाली. त्यांना महाराष्ट्रात ‘मोलेसरशास्त्री’ किंवा ‘मोरेश्वरशास्त्री’ या नावानेही ओळखले जाते. १८५७मध्ये मोल्सवर्थ आणि त्यांच्या हाताखालच्या सात संस्कृत-मराठी शास्त्रींनी संपादित केलेल्या शब्दकोशातल्या ६०,००० हून जास्त शब्दांमध्ये ‘ट्याहां’ हा शब्द आहे. तो मुंबईतल्या ३०६ बाळांच्या निमित्ताने एकाच दिवशी असंख्य वाचकांनी पुन्हा एकदा वाचला...

गरिबांकडे अतिशय कमी साधनं असल्यामुळे आर्थिक दृष्टीनं पाहता त्यांच्या अस्तित्वाविषयी काहीच शिकण्यासारखं नाही, असा त्याचा अर्थ काढला जातो

शिक्षणात खूप काही करण्यापेक्षा मोजक्या गोष्टी करणंच कसं हितावह ठरू शकेल, आर्थिक वृद्धीसाठी चांगल्या दर्जाच्या नोकऱ्यांची गरज का असते, अशा अनेक मुद्द्यांना हे पुस्तक स्पर्श करतं. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, आशा ही अतिशय गरजेची का असते आणि ज्ञानावाचून काहीच का साध्य होऊ शकत नाही, या गोष्टींविषयी हे पुस्तक सांगतं. यश नेहमीच खूप दूर आहे असं वाटत असलं, तरी दर वेळी ते खरंच इतक्या दूर असतं असं नाही!...

एखादा प्रदेश अन्यायकारकरित्या बळकावल्यानंतर त्याच्या न्याय्य हक्कासाठी भांडणाऱ्याबद्दल ‘जैसे थे’ स्थिती ठेवू इच्छिणाऱ्याची जी भूमिका असेल, तीच कर्नाटकची आहे

सीमाभागातले मराठे आणि महाराष्ट्राला लागून नसलेल्या प्रदेशांतील मराठे यांच्या सीमाप्रश्नविषयक भूमिकेत द्वैत आहे, ते स्वाभाविकही आहे. पण, या मंडळींच्या लक्षात येत नाही की, महाराष्ट्राने बंगलोर-म्हैसूरला लागून असलेला मराठी प्रदेश मागितलेला नाही. अगदी धारवाडही मागितलेलं नाही. त्यामुळे सीमाभागातल्या मराठी लोकांचं दुखणं उर्वरित कर्नाटकातल्या मराठ्यांना कळणार नाही...

महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच मुख्यमंत्र्यांनी पदावर असताना सीमाप्रश्नाबद्दल अनुकूल भूमिका घेतलेली होती, मात्र या सर्वांमध्ये शरद पवारांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची होती

महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांना बरेचदा या पराभवामुळे आता ही लढाईच सोडून द्यावी म्हणजे ‘वेटिंग फॉर गोदो’च्या नाटकातून सीमावासीयांना मुक्त होता येईल असं वाटतं. मात्र सीमाभागात घडणाऱ्या घडामोडींची महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रातल्या किती जणांना माहिती असते? किंवा त्याबद्दल काही करावेसे वाटते? हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांना सीमाप्रश्न म्हणजे केवळ बेळगावचा प्रश्न वाटतो...

सार्वमत आणि निवडणुका ही जनमानस जाणून घेण्याची दोन स्वतंत्र साधनं आहेत, एवढं साधं भान ज्या आयोगाला नाही, त्याच्याकडून वस्तुनिष्ठ अहवालाची अपेक्षा बाळगणं, हा वेडेपणाच ठरेल...

महाजनांनी राज्य पुनर्रचना आयोगाचे सिद्धांत आणि निष्कर्ष त्यांना जिथे सोयीचे आहेत, तिथे चलाखीने वापरले आहेत, हे कासरगोडच्या प्रश्नाने सिद्ध होते. कासरगोडमधली पंचावण्ण टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या मल्याळी भाषक असल्यामुळे तो भाग केरळला द्यावा, असे राज्य पुनर्रचना आयोगाने सुचवले होते. असा निर्णय देताना भाषिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही मुद्द्यांचा आपण विचार केला आहे, असं राज्य पुनर्रचना आयोगाने म्हटलं होतं...

समकालीन भारतात सीमाभागातल्या मराठी माणसांनी केंद्र सरकारची अनास्था आणि कर्नाटक सरकारची दडपशाही, अरेरावी यांच्या विरोधात दिलेला लढा ऐतिहासिकच मानला पाहिजे

आज हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय त्यावर जो निर्णय देईल, त्याची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे, असं काही जणांना वाटतं. मला तसं वाटत नाही. सर्वोच्च न्यायालय पोकळीत जगत नाही. कायद्याचा कीस काढणं आणि नियमांवर बोट ठेवणं हे जरी सर्वोच्च न्यायालयाचं काम असलं, तरी सर्वोच्च न्यायालयापुढे वस्तुस्थितीची जी माहिती येते, त्यामध्ये लोकांच्या परिस्थितीचा मागोवा असतोच...

पुष्पाताईंनी मागे ठेवलेला विचार आणि वारसा यांमुळे समकालातल्या प्रश्नांना भिडण्याचं बळ आपल्याला आणि येत्या पिढ्यांना मिळावं

वैचारिक स्पष्टता, निर्भीड उच्चार आणि लोकशाहीवादी मूल्यांवर अढळ निष्ठा असलेला सच्चा स्वर पुष्पा भावे यांच्या रूपानं सत्तरच्या दशकापासून महाराष्ट्रात लाभलेला होता. सामाजिक-राजकीय जनआंदोलनं, वंचित-दलित-कष्टकऱ्यांचे संघर्ष, साहित्य, संस्कृती, स्त्रीवादी विचारांच्या चळवळी, अशा अनेक क्षेत्रांमध्ये पुष्पाताईंनी आघाडीवर राहून काम केलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. एकाच व्यक्तिमत्त्वाला लाभलेले हे विविध पैलू होते...

आज आता, वाल्याचा वाल्मिकी झाल्यानंतर, विराट आपला तो मस्तवालपणा खुल्या दिलानं मान्य करताना दिसतो. यालाही अर्थातच एक जिगर लागते

विराटने घेतलेल्या मेहनतीचं फलित जसं त्याच्या कामगिरीतून मैदानात दिसतं. तसंच ते त्याच्या पाठीराख्यांच्या वाढत्या संख्येतूनही दिसतं. तसं पाहता, शेजारी पाकिस्तानशी आपली खुन्नस जुनीच. त्यामुळे उभय देशांतल्या नागरिकांनी एकमेकांच्या गुणवत्तेचं खुल्यादिलाने कौतुक करण्याचे प्रसंग क्वचितच येतात. निःशंकपणे ते निमित्त विराटनं पाकिस्तानला मिळवून दिलं. एकेकाळचा पार्टीबॉय विराट आता, संबंध क्रिकेटविश्वाचा आदर्श बनला...

मनोहर सोनवणे यांच्या कथांना जागतिकीकरणाचा व्यापक संदर्भ आहे. त्यामुळे ‘ब्रँड फॅक्टरी’ला सामाजिक-सांस्कृतिक आशयाची डूब आहे

कथासंग्रह वाचल्यावर वाटतं की, ही माणसं वीसेक वर्षांनंतर पुन्हा भेटतील तर किती बरं होईल. हे ‘ब्रँड फॅक्टरी’चं यश आहे. जगात सतत नवं घडत असतं. तत्त्वज्ञ, इतिहासकार, शास्त्रज्ञ वगैरे मंडळी या परिवर्तनाची आपापल्या परीने शास्त्रीय समीक्षा करत असतात. लेखक शास्त्राच्या पलीकडे जातो आणि वास्तवाची कलात्मक पुनर्रचना करतो; सामाजिक-राजकीय वास्तवाला जीवनानुभवाचा समग्रपणा देतो. सोनावणे यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडलीए...

१९६७च्या निवडणुकीतील निकाल हे लोकमताचे खरे निदर्शक आहेत. बेळगाव-कारवारसंबंधी निर्णय घेताना तरी न्या. महाजन यांना त्यांचे हे मत निश्चितच उपयोगी पडले असेल!

कधी काळी कुणी एकमताने काय निर्णय घेतला होता व तोच कसा ‘यावश्चंद्रदिवाकरौ’ कायम राहिला पाहिजे, यावरच न्या. महाजन यांनी महाराष्ट्राला व्याख्यान सुनावले आहे. न्या. महाजन यांना माहीत होते की, राज्य पुनर्रचना मंडळाने व विधेयकाने महाराष्ट्र व गुजरात राज्ये नाकारली, पंजाब व हरियाणा राज्ये नाकारली, मंबई महाराष्ट्राला देण्याचे नाकारले. मग हैदराबाद विधानसभेने ‘एकमता’ने घेतलेला निर्णयच तेवढा कसा अपरिवर्तनीय ठरतो?...

महाजन अहवाल, देवाणघेवाण, तडजोड या शब्दांनाही सीमावासीयांनी थारा देता उपयोगाचे नाही. त्या वांझोट्या चर्चेमुळे जनतेत फाटाफूट मात्र होईल

पाटसकर निवाड्यापासून आपण आता सार्वमतावर आलो आहोत. महाराष्ट्र विधानसभेनेही एकमताने यास मान्यता दिली आहे. आता केंद्र सरकारची मान्यता मिळवणे बाकी आहे. ती महाराष्ट्रातील नेत्यांनी त्वरित मिळवावी यासाठी दडपण वाढवले पाहिजे. फाटाफूट निर्माण करण्याचे आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांना यश आलेले नाही. ही आनंदाची गोष्ट आहे, पण बेसावध राहूनही भागणार नाही. मून चालणार नाही. नव्या दमाने वाटचाल करावी लागेल...

सीमाभागात राहणारे लोक कर्नाटकबद्दल एवढे कडवट का आहेत, असा प्रश्न ज्यांना पडतो; त्यांनी कर्नाटकच्या वर्तनाची चिकित्सा केली पाहिजे

सीमाभागातला लढा हा मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा लढा आहे, पण मराठी माणसांच्या इतरही ओळखी आहेत; जातीच्या, धर्माच्या! या ओळखींचा परस्परांशी संघर्ष होऊ शकतो आणि त्याचा लढ्यावर परिणाम होऊ शकतो. गेल्या तीनेक दशकांमधे धार्मिक ध्रुवीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे, त्यातून सीमाभागातल्या मराठी माणसांची हिंदू ही ओळख ठळक करण्याकडे काही लोकांचा कल निर्माण झाला आहे. त्याचा तात्कालिक फायदा असला तरी दीर्घकालीन तोटाच झाला आहे...

शेअर बाजारात व्यवहार करून तुम्हाला फारसा ताण न घेता, निवांतपणे, भरपूर उत्पन्न कमावायचे असेल, तर तुम्हाला फक्त हे पुस्तक हाताशी ठेवायचे आहे.

शेअर बाजारात व्यवहार सुरू करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. पण इंटरनेट असो, टीव्ही वाहिन्या असोत किंवा या विषयावरची उपलब्ध पुस्तकं असोत... सहसा अगदी प्राथमिक बाबी तुम्हाला कोणी सांगत नाही. सगळ्यांची माहिती ही एका किमान पातळीच्या वरची असते. साहजिकच, या बाजारात पहिल्यांदा प्रवेश करणारा गुंतवणूकदार बिचकतोच. त्याच्याकडे पैसा असतो, गुंतवण्याची इच्छा असते, पण योग्य मार्गदर्शनाच्या अभावी तो माघारी जातो...

महाराष्ट्राची सीमाप्रश्नाबद्दलची बाजू न्याय्य आहे, हे माझ्यातल्या कार्यकर्त्यालाच वाटतं असं नाही, तर माझ्यातल्या राज्यशास्त्राच्या भाषिक राजकारणाच्या अभ्यासकालाही वाटतं.

हा केवळ भावनिक आणि अस्मितेचा प्रश्न आहे असं मी मानत नाही. राज्याराज्यांतल्या कायदेशीरपणाचा आणि सामूहिक नीतीमत्तेचा हा प्रश्न आहे असं मला वाटतं. खेडे हा घटक, भाषिक, बहुसंख्या आणि लोकेच्छा, हे राज्य पुनर्रचनेचे चार मूलाधार महाराष्ट्राने कल्पनेतून निर्माण केलेले नाहीत. स्वातंत्र्योत्तर भारतात ज्या ज्या वेळी सीमांची निश्चिती करायचा प्रयत्न झाला, त्या त्या वेळी या तत्त्वांचा विचार केला गेला आहे...

ऑर्वेलच्या अंतरंगाचा वेध घेताना त्याचं व्यक्तित्व आणि साहित्य यांचा संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचकांना ऑर्वेलशी जोडणारा पूल ठरावं...

कलावंताचा प्रवास कष्टप्रद असतो, याची त्याला जाणीव नव्हती का? निश्चितच होती! पण ‘करून जावे असेही काही...’ हा त्याचा ध्यास होता. म्हणूनच तो त्या खडतर वाटेवर चालत राहिला. त्या प्रवासाचं खणखणीत मोल चुकवण्याची त्यानं तयारी ठेवली होती. एकट्यानं चालताना त्याला यातना झाल्या, पण तो खचला नाही. मार्गापासून ढळण्याचा विचारही त्याला कधी शिवला नाही. त्यासाठी स्वावलंबीपणे जगला. अनेक बाबतीत तो गांधीजींसारखा होता...

नकळत्या वयात मुलांच्या हातून झालेल्या चुकांना क्षमा केली जात नाही, सरसकट त्यांच्यावर ‘गुन्हेगार’ असा शिक्का मारला जातो आणि परतीच्या वाटा बंद केल्या जातात

या मुलांकडे बघण्याचा समाजाचा, पोलिसांचा, न्याययंत्रणेचा दृष्टिकोन खूपच नकारात्मक आहे. खरं तर आपण आणि आपल्यातलेच काही जण त्यांना जे देतोय, तेच ही मुलं आपल्याला परत करतायेत आणि तरीही बोट त्यांच्यावर रोखण्यात आपण पुढे आहोत. या मुलांचा भवताल पूर्णपणे बदलणं ही लगेचच होणारी गोष्ट नाही; पण त्यांना सन्मानानं जगण्यासाठी जरूर ती साधनं देणं आणि कायद्याचं संरक्षण पुरवून सक्षम करणं ही तर करता येण्यासारखी गोष्ट आहे...

घटनेला अभिप्रेत असलेले धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ नागरिक विरुद्ध संघाला अभिप्रेत असलेले संकुचित वर्चस्ववादी हिंदू असा हा लढा आहे!

गुरू गोळवलकर यांना अभिप्रेत असलेलं नागरिकत्व म्हणजे ‘अल्पसंख्याक हिंदूं’च्या मेहरबानीवर अल्पसंख्य समाजाने राहावे व सवर्णांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून दलित, आदिवासींनी राहावे हाच विचार, व्यवहार सर्वांवर लादण्याचे ‘राजकारण’ आहे. समरसता विरुद्ध समता, असा खरा संघर्ष आहे. घटनेला अभिप्रेत असलेले धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ नागरिक विरुद्ध संघाला अभिप्रेत असलेले संकुचित वर्चस्ववादी हिंदू असा हा लढा आहे...

“बिली विल्डर यांनी म्हटलंय की, ‘फिल्मी डायलॉग हे एखाद्या गरीब माणसाने टेलिग्राम लिहावा तसे लिहायला हवेत.’ पण कधी कधी तुम्हाला ‘भाषणबाजी’ही करावी लागते.” - जावेद अख्तर

हिंदी चित्रपट क्षेत्रात जावेद अख्तर यांचं नाव खूपच मोठं आहे. त्यांनी सलीम खान यांच्याबरोबर ८०च्या दशकात खूप महत्त्वाच्या पटकथा लिहिल्या (जंजीर, दीवार, शोले, त्रिशूल). १९८१ मध्ये त्यांनी गीतलेखनाला सुरुवात केली. ‘हवा हवाई’ (मिस्टर इंडिया) पासून ‘एक लडकी को देखा...’ (१९४२ ए लव्ह स्टोरी) पर्यंत त्यांनी गीतलेखनात वैविध्यपूर्ण भाषेचा आणि छंदांचा उपयोग गेला. काल त्यांचा ७५वा वाढदिवस होता...

‘दुसऱ्या फाळणी’ची शक्यता वर्तवण्यापूर्वी या कथा वाचायला हव्यात. नाहीतर पुन्हा एकदा माणुसकीचा मुडदा बेवारसपणे रस्त्यावर पडलेला आपल्याला पहावा लागेल!

हल्ली दुसऱ्या फाळणीची चर्चा होऊ लागली आहे. ती अटळ आहे किंवा आपला देश हळूहळू त्या दिशेने चालला आहे. त्याची चर्चा करण्याआधी पहिली फाळणी, तिचे परिणाम समजावून घ्यायला हवेत. प्रसिद्ध अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांनी हिंदी-उर्दूतील भारतीय लेखकांच्या एकंदर १७ कथांचा या संग्रहात अनुवाद केला आहे. मंटो, कृष्णा सोबती, भीष्म साहनी, कुर्रतुल-एन-हैदर, अज्ञेय, गुलज़ार, उपेन्द्रनाथ अश्क अशा मान्यवर लेखकांच्या या कथा आहेत...

समाजशास्त्राचा अवलंब न करता एखादी जात सामाजिकदृष्ट्या मागासलेली, असा निष्कर्ष काढणे सर्वस्वी चुकीचे!

आरक्षणात सामाजिक मागासलेपणाची अट सांगितली जाते. पण सामाजिक मागासलेपण म्हणजे काय? त्याचे निकष कोणते? त्याची शास्त्रीय संशोधनपद्धती कशी असावी? मूलत: सामाजिक मागासलेपण ही एक गुणात्मक, तुलनात्मक व सापेक्ष अशी समाजशास्त्रीय संकल्पना आहे. यांसारख्या विविध प्रश्नांची चर्चा करणारे ‘सामाजिक मागासलेपणाचे समाजशास्त्रीय विश्लेषण’ हे डॉ. बाळासाहेब सराटे, अॅॅड श्रीराम पिंगळे यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...