अजूनकाही
प्रसिद्ध विडंबनकार रामदास फुटाणे यांचा ‘कासा-२०’ हा नवा करोनाकाळातल्या विडंबनाचा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. अनघा प्रकाशन, ठाणे तर्फे प्रकाशित झालेल्या या संग्रहाला फुटाणे यांनी लिहिलेले मनोगत आणि तीन विडंबन कविता...
..................................................................................................................................................................
आचार्य अत्रे नेहमी म्हणत. सोपं मराठी लिहा- जे शेतकऱ्याला आणि कामगारालासुद्धा कळलं पाहिजे. त्यांना ज्ञानेश्वर कळतो, तुकाराम कळतो. तुम्ही काय त्यांच्यापेक्षा मोठे आहात का?
सोपं लिहा. परंतु मराठी साहित्यात दुर्बोधता हाच कधी कधी सदगुण ठरत असतो.
या भाष्यकविता म्हणजे मराठी मनाची एक सल आहे. हा अस्सल देशी वाण आहे…
ज्यांनी व्यवच्छेदक रेषा, अस्मिता, सव्यसाची, आकृतीबंध हे शब्द आयुष्यात कधी उच्चारले नाहीत अशांनाही कळावं, अशा या मराठीतील भाष्यकविता – ‘कासा-२०’.
चांगभलं!
..................................................................................................................................................................
पुन्हा पुन्हा येईन
अचानक लाल निळ्या
काटेरी चेंडूंनी,
संपूर्ण शरीराभोवती पिंगा
घालण्यास सुरुवात केली
मी चिडलो
मी हात उगारणार तोच
चेंडूनाच हात फुटले
लाल काटेरी हात
निळे काटेरी हात
सर्व काटेरी चेंडूंनी मला अलगद उचलून एका झाडाच्या फांदीवर
आदळले
रागारागात फुत्कारले –
‘बोल, झाडावरचे पक्षी गेले कुठे?’
मी कण्हत काही बोलण्यापूर्वीच सर्वांनी उचलले व एका उंच टॉवरवर
आदळले
घोंगावत म्हणाले –
‘बोल, टॉवरखालची झाडे गेली कुठे?’
मी टेरेसवरील वायरला पकडणार तोच सर्वांनी उंच फेकले अन संसदेत
पडलो
तिथे सर्वांनी कॉलर पकडून विचारले –
‘बोल, या सभागृहत पाठवणारी मतदार यादीतील माणसे गेली कुठे?’
मी राजदंड पकडीत उठणार तोच सर्वांनी माझाच चेंडू करीत आकाशात
उंच फेकले
एकच विचारले-
सांग तुझा ईश्वर कुठे राहतो?
शोध घे
अन्यथा मी पुन्हा येईन
पुन्हा येईन.
..................................................................................................................................................................
लोकसंख्या
धाकटा विषाणु म्हणाला –
जग झालं हिंडून
आता चायनाला जाऊ
इथं आला कंटाळा
वुहानमध्ये राहू
थोरला चिडला –
परदेशी झालो तेथे
घरात कोण घेतील?
ज्याने दिला जन्म तेच
व्हॅक्सिनसुद्धा देतील
जगातील विषाणूंचा
एकच असतो नारा
लोकसंख्या वाढेपर्यंत
भारत देश हमारा
..................................................................................................................................................................
सलून
देशाचा जीडीपी
हळू हळू मंद झाला
डोईचा ग्रोथरेट पाहून
सलूनला आनंद झाला
तज्ज्ञांनी विंचरले तरी
गुंता काही सुटत नाही
बजेटला कात्री लावणे
सरकारलाही चुकत नाही
विरोधकांच्या हातात
नेहमीचाच वस्तरा
सालाबादची ओरड-
पॅकेज तेवढं निस्तरा
..................................................................................................................................................................
‘कासा-२०’ या रामदास फुटाणे यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5294/Kasa-20
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment