• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘द वुमन इन द विंडो’ : ‘फिल्म न्वार’चा जन्मदाता

‘पेस्ट’ या ऑनलाइन नियतकालिकानं ऑगस्ट २०१५ मध्ये ‘फिल्म न्वार’ या शब्दप्रयोगाला ७० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त १०० सर्वोत्कृष्ट न्वार चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली, त्यात ‘द वुमन इन द विंडो’ पहिल्या क्रमांकावर होता. कदाचित त्याविषयी मतभेद होऊ शकतील. पण ‘फिल्म न्वार’ ही सिनेमाची स्वतंत्र शैली म्हणून ओळख निर्माण करण्याचं या सिनेमाचं श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही...

  • चिंतामणी भिडे
  • Sat , 23 December 2017
  • 0 Comments
  • 5 Like

द टेस्टफुल एट्थ : शंभर नंबरी व्हिंटेज टॅरँटिनो, टॅरँटिनोचा आठवा सिनेमा

टॅरँटिनोचा सिनेमा त्याचा स्वत:चा असतो. ‘द हेटफुल एट’ त्याचा आठवा सिनेमा आहे. आणि आठपैकी आठही चित्रपटांनी ठसा उमटवणं किंवा इम्पॅक्ट सोडणं हे येरागबाळ्याचं काम नाही. यू लव्ह हिम, यू हेट हिम, बट यू कॅन नॉट इग्नोर हिम! ‘द हेटफुल एट’नं टॅरँटिनोच्या अन्य चित्रपटांइतका म्हणजे रिझर्व्हायर डॉग्ज, पल्प फिक्शन, किल बिल यांच्याइतका हंगामा केला नाही. बॉक्स ऑफिसवरही त्यानं बक्कळ कमाई केली अशातला भाग नाही...

  • चिंतामणी भिडे
  • Mon , 11 December 2017
  • 0 Comments
  • 6 Like

आम्ही ‘बी’ग्रेडी

विशेष सूचना : ‘फ्रॉम डस्क टिल डॉन’ बघण्यापूर्वी इंटरनेटवर त्याचं सविस्तर कथानक शोधून किंवा त्याचे रिव्ह्यू वाचण्याच्या भानगडीत पडू नका. थेट चित्रपटच बघा. ताजा कलम : हा चित्रपट बघण्यापूर्वी किमान तासभर काहीही खाऊपिऊ नका...

  • चिंतामणी भिडे
  • Mon , 30 October 2017
  • 0 Comments
  • 5 Like

आखिर बाप बाप होता हैं!

एखाद्याकडून फसवली गेलेली व्यक्ती त्याचा बदला घेण्यासाठी एक मोठी बोगस यंत्रणा उभी करते, मग त्याच्यावर जाळं फेकून त्या यंत्रणेत त्याला खेचते आणि त्याला फसवते... ओळखीची वाटते ना ही कल्पना? हिंदी चित्रपटसृष्टीत या मध्यवर्ती कल्पनेवर दोन महत्त्वाचे सिनेमे आले. पहिला ‘ब्लफमास्टर’, दुसरा ‘खोसला का घोसला’...

  • चिंतामणी भिडे
  • Mon , 16 October 2017
  • 0 Comments
  • 6 Like

डर्टी हॅरी : मॅन विथ द नेम

‘डर्टी हॅरी’च्या यशानंतर याच मालिकेतील ‘मॅग्नम फोर्स’, ‘द एन्फोर्सर’, ‘सडन इम्पॅक्ट’ आणि ‘द डेड पूल’ हे चार चित्रपट आले. पण त्यातल्या एकाचंही दिग्दर्शन सिगलनं केलं नाही. हे चारही चित्रपट उतरत्या क्रमानं निष्प्रभ ठरत गेले. ईस्टवूडनं ‘द डेड पूल’नंतर वयाचं कारण देत डर्टी हॅरी न साकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर या चित्रमालिकेची अखेर झाली...

  • चिंतामणी भिडे
  • Tue , 03 October 2017
  • 0 Comments
  • 3 Like

द वर्ल्ड इज अॅन इव्हिल प्लेस

ल्यूमेटला त्याच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत पाच वेळा ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं. चार वेळा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आणि एकदा सर्वोत्कृष्ट पटकथाकार म्हणून. प्रत्येक वेळी ऑस्करनं त्याला हुलकावणी दिली. अखेरीस स्वत:चीच शरम वाटून की, काय ऑस्कर अकॅडमीनं त्याला २००५ साली जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. जणू ऑस्करच्या लेखी ल्यूमेट आता संपला होता. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत त्याने ऑस्करला सणसणीत चपराक दिली...

  • चिंतामणी भिडे
  • Mon , 18 September 2017
  • 0 Comments
  • 4 Like

नथिंग ‘डर्टी’ अबाउट इट!

रूसो म्हणजे हॉलिवुडमधलं बडं प्रस्थ. रूसो खुर्चीतनं उठला आणि ‘चित्रपटाच्या निगेटीव्ह्ज जाळून टाका आणि इन्शुरन्सचे मिळतील तेवढे पैसे घेऊन गप्प बसा’ असं म्हणून तिथून निघून गेला. रूसोच्या या शब्दांनी त्या एग्झिक्युटीव्ह्जचा उरलासुरला धीरही खचला. स्टुडिओतल्या कोणालाच चित्रपट फारसा आवडला नव्हता. या चित्रपटाचं काही खरं नाही, असाच सगळ्यांचा सूर होता. पहिलीच निर्मिती आणि इतकी अवलक्षणी निघावी?...

  • चिंतामणी भिडे
  • Mon , 04 September 2017
  • 0 Comments
  • 4 Like

‘रनअवे ट्रेन’ - आज झालो मुक्त मी!

निव्वळ थरारपट म्हणून ‘रनअवे ट्रेन’मध्ये नेहमीच्या ट्रिक्स आहेतच. चित्तथरारक कसरती आणि ते पाहून प्रेक्षक म्हणून आपली ताणली जाणारी उत्कंठा, हे सगळे नेहमीचे प्रकार ‘रनअवे ट्रेन’मध्ये आहेतच; पण हे प्रसंग म्हणजे हा चित्रपट नव्हे! हॉलिवुडच्या थरारपटात असतात तशा तांत्रिक करामती यात नाहीत. शक्य तितकं वास्तव चित्रीकरण केलंय. त्यामुळेच हा थरार देखील वरवरचा न राहता मनाला भिडतो...

  • चिंतामणी भिडे
  • Mon , 31 July 2017
  • 0 Comments
  • 5 Like

‘फ्रेन्झी’ : मास्टर ऑफ सस्पेन्सचा अखेरचा मास्टरपीस

‘फ्रेन्झी’च्या नंतर हिचकॉकने ‘फॅमिली प्लॉट’ हा अवघा एक चित्रपट केला. त्यानंतर पुढच्या चित्रपटाची जुळवाजुळव करत असतानाच, १९८० साली वयाच्या ८०व्या वर्षी त्याचं निधन झालं. त्यामुळेच हिचकॉकच्या या ‘अखेरच्या मास्टरपीस’चं सिनेइतिहासातलं स्थान मोलाचं आहे. ‘फ्रेन्झी’चा अनाहूतपणे एका गाजलेल्या मराठी चित्रपटाशी संबंध आहे. तो मराठी चित्रपट म्हणजे सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकापेक्षा एक’...

  • चिंतामणी भिडे
  • Mon , 17 July 2017
  • 0 Comments
  • 5 Like

एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे...

‘क्यू अँड ए’मध्ये वंशद्वेष कधी उघड, तर कधी अप्रत्यक्ष आहे. व्हाइट सुप्रीमसिस्ट्सच्या अरेरावी आणि अतिरेकीपणावर थेट बोट ठेवण्याचं धाडस ल्युमेट दाखवतो; पण दुर्दैवाने क्राइम थ्रिलरसारख्या सवंग ज्यॉनरच्या आवरणाखाली ल्युमेटचा हा मास्टरपीस दुर्लक्षित राहतो. कथेच्या पातळीवर थ्रिलर असलेला हा सिनेमा निव्वळ थ्रिलर न राहता त्यातून वर्चस्ववाद, वर्णश्रेष्ठत्व, वंशभेद, अहंकार यांचा जीवघेणा आविष्कार बघायला मिळतो...

  • चिंतामणी भिडे
  • Sat , 03 June 2017
  • 0 Comments
  • 4 Like

पाल्माचं झिंग झिंग झिंगाट

त्याचा शेवटचा धो धो चाललेला सिनेमा १९९६ साली प्रदर्शित झालेला ‘मिशन इम्पॉसिबल’ होता. त्यानंतर गेल्या २० वर्षांत त्याने यशाचं तोंड पाहिलेलं नाही. २००२ साली प्रदर्शित झालेला ‘फेम फटॅल’देखील बॉक्स ऑफिसवर सडकून आपटला होता. पण आज ‘फेम फटॅल’ कल्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो. पाल्माला आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर यदाकदाचित संधी मिळालीच तर आपल्या चित्रपटांच्या बाबतीत तो काही सुधारणा करेल की नाही, कल्पना नाही....

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 21 May 2017
  • 0 Comments
  • 5 Like

सरळसोट चोरीचा ‘उलटसुलट’ मामला

‘द किलिंग’ हा फिल्म न्वारमधला एक महान चित्रपट समजला जातो. त्याच्या दिग्दर्शकाचा हा तिसरा चित्रपट. त्या आधीच्या दोन चित्रपटांमध्ये तो स्वत:ची शैली आणि स्वत:चा आवाज शोधण्यासाठी धडपडत होता. ‘द किलिंग’मध्ये त्याला तो सापडला. त्यामुळेच हा चित्रपट त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट समजला जातो. चित्रपटात जशी प्रसंगांच्या उलटसुलट क्रमाची गंमत आहे, तसंच काहीसं दिग्दर्शकाच्या प्रत्यक्ष आयुष्यात घडलं....

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 07 May 2017
  • 0 Comments
  • 4 Like

नॉट सो सिंपल : ब्लड सिंपल

जोएल आणि एथन या कोएन ब्रदर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्वयीचा हा पहिलाच चित्रपट. चित्रपट बनवायला पैसे नव्हते म्हणून दोघांनी आधी या चित्रपटाचं एक ट्रेलर बनवलं आणि जवळपास वर्ष-दीड वर्षं विविध लोकांना ते ट्रेलर दाखवून कसेबसे १५ लाख डॉलर उभे केले. पण दोघांची मेहनत फळाला आली. बॉक्स ऑफिसवर त्यावेळी हा चित्रपट फारसा चालला नाही, पण सनडान्स चित्रपट महोत्सवात चित्रपटाला ग्रँड ज्यूरी प्राइज मिळालं. ...

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 23 April 2017
  • 0 Comments
  • 5 Like

टॅरँटिनो वजा टॅरँटिनो

तुम्ही क्वांटिन टॅरँटिनोचे डायहार्ड फॅन आहात? त्याच्या सिनेमातली हिंसा, विक्षिप्त व्यक्तिरेखा, गमतीशीर संवाद, त्याचं अफलातून टेकिंग, स्वत:ची अशी खास व्हिज्युअल स्टाइल, एडिटिंग पॅटर्न यावर तुम्ही फिदा आहात? मग तुम्ही त्याचा ‘जॅकी ब्राउन’ अजिबात बघू नका! कारण यातलं काहीच ‘जॅकी ब्राउन’मध्ये नाही....

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 09 April 2017
  • 0 Comments
  • 4 Like

हिचकॉकच्या रहस्यदालनाची टोपी उडवणारी गोष्ट

निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता मेल ब्रुक्स याचा हा चित्रपट म्हणजे आल्फ्रेड हिचकॉकच्या गाजलेल्या चित्रपटांची भन्नाट पॅरडी आहे. ‘नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट’, ‘व्हर्टिगो’, ‘सायको’, ‘द बर्ड्स’, ‘डायल एम फॉर मर्डर’, ‘द 39 स्टेप्स’, ‘मरीन’, ‘फॉरेन करस्पाँडंट’, ‘रीअर विंडो’, ‘रेबेका’, ‘स्पेलबाउंड’ अशा हिचकॉकच्या असंख्य गाजलेल्या, चित्रपटकलेत मापदंड ठरलेल्या चित्रपटांवर आधारित ही पॅरडी आहे. पण या खिल्लीत कुठलाही विखार नाही....

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 12 March 2017
  • 2 Comments
  • 5 Like

‘इन अ लोनली प्लेस’ : न्वार शैलीतली अटळ शोकांतिका

‘इन अ लोनली प्लेस’ बघताना हिचकॉकच्या ‘शॅडो ऑफ अ डाउट’ची आठवण येते. एखाद्याविषयी खात्री नाही, पण नुसताच पराकोटीचा संशय आहे. आणि या संशयानंच त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं. बरं ज्याच्याविषयी संशय आहे त्याला सगळं कळूनसवरूनही तो पुन्हा पुन्हा आत्मनाशाकडे झेपावत राहतो. त्यामुळे त्याचं यश आणि व्यक्तिगत आयुष्य झाकोळून जातं. पण तो स्वभावापुढे हतबल आहे आणि नायिका परिस्थितीपुढे....

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 26 February 2017
  • 0 Comments
  • 3 Like

थरार, रहस्य, विनोदाची अफलातून भेळ

‘स्टॅलाग 17’ हा बिली वाइल्डरचा हा भन्नाट सिनेमा कमाल आहे. म्हटलं तर तो युद्धकैद्यांचं आयुष्य दाखवणारा, त्यांची कुतरओढ, घालमेल दाखवणारा चित्रपट आहे, म्हटलं तर कॉमेडी आहे, म्हटलं तर सस्पेन्स देखील आहे. ‘स्टॅलाग 17’ला कुठल्याच एका मापात बसवता येत नाही. मुळात युद्धकैद्यांवर आधारित इतका तुफान हास्यस्फोटक सिनेमा करण्याची कल्पनाच भारी आहे...

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 12 February 2017
  • 0 Comments
  • 4 Like

ड्रेस्ड टु किल : व्हिंटेज ब्रायन ड पाल्मा

‘ड्रेस्ड टु किल’ हा ड पाल्माच्या थ्रिलर मालिकेतला धमाल चित्रपट आहे. टिपिकल ‘हू डन इट’ पद्धतीचा हा चित्रपट नाही. त्यामुळेच रहस्यमय असूनही पुन्हा पुन्हा पाहताना कुठली अडचण येत नाही. उलट ड पाल्माने आता जवळपास निवृत्ती घेतल्यासारखी परिस्थिती असताना हा चित्रपट व्हिंटेज ड पाल्माचा पुनःप्रत्यय देणारा आहे. प्रेक्षकांचे फारसे लाड न करता, तरीही त्यांचं उत्तमपैकी मनोरंजन करेल, अशा चित्रशैलीत ड पाल्माचा चित्रपट उलगडतो....

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 29 January 2017
  • 1 Comments
  • 6 Like

हिंसेच्या पलिकडला ‘कॅलिफोर्निया’

केवळ हिंसा दाखवणं एवढाच ‘कॅलिफोर्निया’चा हेतू नाही. संस्कृतीची पुटंच्या पुटं चढल्यामुळे आपल्या मूळ प्रेरणांपासून दुरावलेला आजचा सोफेस्टिकेटेड मनुष्य आणि आजही या आदिम प्रेरणेला चिकटून असलेल्या त्या आदिमानवाचा प्रतिनिधी यांच्यातला हा सामना आहे. थ्रिलर, सस्पेन्स, अॅक्शन, रोड मूव्ही अशा विविध ज्यॉनरमध्ये हा चित्रपट फिरतो, पण त्याचा गाभा हा फारच उच्च दर्जाचा, मानवी वर्तणुकीच्या गुंत्याचा आहे. ...

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 15 January 2017
  • 0 Comments
  • 4 Like

कळसुत्री बाहुला अर्थात ‘द माँचुरियन कँडिडेट’

राजकीय पटलावर एखाद्या नव्या ताऱ्याचा अनपेक्षितपणे उगम झाला की, त्याच्याकडे संशयाने बघितलं जातं. सध्याचा ‘माँचुरिअन कँडिडेट’ आहे डोनाल्ड ट्रम्प. ट्रम्प रोजच्या रोज वादग्रस्त ट्विट्स करून ही खळबळ शमू न देण्याची खबरदारी घेत आहेत. निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली हे सर्वश्रुत आहे. ट्रम्प हे ‘मांचुरियन कँडिडेट’ आहेत, असा रश्दींचा दावा होता. आता बोला!...

  • चिंतामणी भिडे
  • Tue , 03 January 2017
  • 0 Comments
  • 4 Like

‘द केन म्युटिनी’ : अपरिहार्य बंडाची करुण कहाणी

‘द केन म्युटिनी’ प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत बोगार्टने मृत्यूला कवटाळलं. सिगरेट आणि दारूचा शौकीन असलेल्या बोगार्टला कॅन्सर झाला होता, पण पडद्यावरच्याच बेदरकारपणाने प्रत्यक्ष जीवनातही वागण्याची सवय त्याला बहुधा जडली असावी. डॉक्टरकडे जाण्याच्या फंदात न पडता तो काम करत राहिला. ‘द केन म्युटिनी’तलं बंड तो जिंकू शकला नाही, तसंच मृत्यूविरुद्धचं बंड जिंकणंही त्याला शक्य झालं नाही!...

  • चिंतामणी भिडे
  • Tue , 20 December 2016
  • 0 Comments
  • 3 Like

‘द थर्ड मॅन’ : युद्धोत्तर ऱ्हासपर्व

क्लायमॅक्सप्रमाणेच प्रदीर्घ असा प्री क्लायमॅक्सही चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेणारा ठरला. संपूर्ण व्हिएन्ना शहराचं सांडपाणी ज्या ठिकाणी येतं, त्या भुयारी गटारात अखेरीस लाइमची नाकाबंदी होते. शहराचा होत असलेला ऱ्हास, माणसांचं अवमूल्यन, समाजाचं अध:पतन, ढासळणारी नैतिक मूल्य या सर्वांचा अपरिहार्य शेवट अखेरीस गटारगंगेतच व्हायचा, हेच जणू यातून रीड आणि ग्रीनला दाखवायचं होतं. ...

  • चिंतामणी भिडे
  • Sun , 04 December 2016
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.