जर लोकशाहीला, संविधानिक मूल्यांना वाचवायचे असेल, तर सर्वांत पहिल्यांदा ‘गोदी मीडिया’पासूनच लोकशाहीचे रक्षण करावे लागणार आहे. कारण आता माध्यमेच ‘लोकशाहीचे मारेकरी’ बनली आहेत

आज ‘सांप्रदायिकता’ हीच पत्रकारिता झालेली आहे. जर तुम्ही सांप्रदायिक नसाल, जर तुम्ही मुसलमानांच्या विरोधात नसाल, तर ‘गोदी मीडिया’त नेमके काय करता, हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे. तुम्हाला ‘गोदी मीडिया’त पत्रकार व्हायचे असेल, तर सांप्रदायिक असणे आणि ‘मुस्लीमविरोधी’ असणे, ही सर्वांत मोठी अट आहे. जर तुम्ही ‘सांप्रदायिक’ असाल, तर याचा अर्थ तुम्ही ‘लोकशाहीवादी’ असूच शकत नाही...

सुनीताबाईंची ‘जिव्हाळघरटी’ : रेषा आणि रूपातील सौंदर्य काव्यात्म भाषेत समजून घेताना सुनीताबाई आचवलांच्या मैत्रीण झाल्या! (लेखांक : तिसरा)

रेषा हे आचवलांसाठी सौंदर्याने अवकाशावर केलेले लिखाणच होते. रेषा अवकाशाच्या निराकारतेवर निश्चितता आणि अनिश्चितता यांचा खेळ मांडून बसलेली होती. आचवल तो खेळ आपल्या धडकत्या हृदयाने बघत होते. सौंदर्य, विचार आणि कल्पना यांच्या संयोगातून जे आकारांचे स्फटिक मनात तयार झाले त्यांची प्रतिबिंबे म्हणजे आचवलांचे लिखाण. सगळेच सौंदर्यपूर्ण. रूपाने आणि त्याच्या भोवती नाचणाऱ्या प्रकाशाच्या संगीताने आचवलांचे जग नाचत होते...

कामाच्या ओझ्याखाली दबून जगणं विसरलेली कुटुंबं बघितल्यावर वाटतं की, यांना ‘पहेली’ सिनेमातल्याप्रमाणे एखाद्या भुताने येऊन प्रेमानं जगायला व एकमेकांना वेळ द्यायला शिकवावं

आम्ही एवढे केले म्हणून पुढच्या पिढीने एवढे काम करावे, असे म्हणणे बरोबर नाही. कारण प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा जास्त सोयीसुविधा व वेगळ्या प्रकारचे आव्हान झेलत असते. मुंबईमध्ये अति प्रदूषण झाल्याने नागरिकांवर आणि कामांवर सरकारने बंधनं आणली आहेत. तीच स्थिती दिल्लीची आहे. अति काम, मानवी हाव, आंधळी व्यापारी वृत्ती व निसर्गाला गृहीत धरणे, यामुळे ही वेळ आली आहे...