बारसूची रणभूमी : आज कोकणी माणूस सत्तेच्या विरोधात धैर्याने उभा आहे. त्याचा हजारो वर्षांपूर्वीचा पूर्वज राजापूरच्या विस्तृत पठारावर उभा होता, तसाच

बारसू सोलगावमध्ये पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबद्दल नकारात्मक भावना तयार झाली आहे. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर सौम्य का होईना लाठीमार केल्यामुळेही असंतोषाचे वातावरण आहे. कोकणी माणूस हा अत्यंत निश्चयी आहे, हे त्याच्या संघर्षाचा दीर्घ इतिहास सांगतो. कोकणातील लोक पोलिसी खाक्याला घाबरत नाहीत किंवा राजकीय दबावालाही बळी पडत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आल्यावर ते कोणालाही शिंगावर घेऊ शकतात...

कोकणात चाललेली आंदोलनं विकासाच्या विरोधी नाहीत, तर त्यांनी जपलेल्या निसर्गाला ओरबाडण्याच्या विरोधात आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे

नाणार रिफायनरीबद्दल वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कोकणातल्या प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधातली आंदोलनं सगळ्यांसमोर आली आहेत. आधी जिंदालच्या जयगडच्या औष्णिक प्रकल्पाविरोधात आंदोलन पेटलं, मग जैतापूरवरून राजकारण, हिंसा सगळं झालं. काल जयगड, जैतापूर होतं, आता नाणार, बारसू सोलगाव आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्यातले गावकरी मायनिंगविरुद्ध अजूनही लढा देतायत...

समाजाच्या भविष्याचा विचार जर विवेकाच्या मार्गाने घडायचा असेल, तर ‘गांधीनगर’ हे त्या मार्गावरचे आश्वस्त करणारे एक स्थानक निश्चित असेल

एक अटळ वास्तव म्हणून भारताच्या फाळणीचा विचार करताना, या काळात धार्मिक मिषाने घडलेल्या अतोनात हिंसाचाराचा, दोन्ही बाजूंकडून दुबळ्या जीवांवर केलेल्या अन्याय-अत्याचाराचा, उदध्वस्त कुटुंबांचा, परागंदा स्त्रियांचा विचार जसा प्राधान्याने करायला हवा, तसाच या फाळणीत होरपळलेल्या एका जनसमूहाने दुबळेपणाला दूर करत सक्षमपणे उभ्या केलेल्या गांधीनगरसारख्या व्यापारी वसाहतीच्या यशोगाथेचेही चिंतन करायला हवे...

घटस्फोट प्रत्येक वेळी दुःखदच असेल असं नाही, मात्र तो बऱ्याच जणांना नेहमीच दुर्दैवी, तर काहींना चुकीचा वाटतो. हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे

या पुढे घटस्फोटाचं प्रमाण वाढतच जाणार, यात शंका नाही. पुढच्या दोन-तीन पिढ्यांत तर हे प्रकार खूप सर्रास होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, घटस्फोटामुळे खरंच सगळं काही वाईट होणार असतं का? तर नक्कीच नाही! कधी कधी घटस्फोट झाल्यानं माणसं सुखीही होतात, त्यांची प्रगती होते किंवा तब्बेत ठीक होते, अशीही उदाहरणं आहेत. एखाद्या माणसाला स्वतःच्या आयुष्यात बोलावून, त्याला नंतर निरोप द्यावा लागणं, हे सोपं नक्कीच नाही...

गोदावरी डांगे यांचं ‘एक एकर मॉडेल’ उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांत ५०,०००हून अधिक महिला शेतकरी वापरत आहेत. त्याविषयीच्या पुस्तकाची गोष्ट...

२०२०मध्ये कोविड-१९च्या सुरुवातीला लादलेल्या पहिल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान सर्व काही ठप्प झालं होतं. या काळात उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांत महिल्या शेतकऱ्यांसाठी गोदावरीताईंचं ‘एक एकर मॉडेल’ मोठं वरदान ठरलं. त्यामुळे त्यांनी शेतात वेगवेगळी पिकं घेतली आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यशस्वीपणे चालवला. आणि शिल्लक पीक स्थानिक बाजारपेठेत विकून थोडेफार पैसेही कमावले...