• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

कांचनने शेवटी स्वत:लाच ‘फू sssss’ केले!

कांचन कोपिष्ट नव्हता, पण संतापी होता. भिडस्त नव्हता, पण (नको तिथे) संकोची होता. तो उधळ्या तर बिल्कुल नव्हता, उलट वैताग यावा इतका काटकसरी होता. त्यातूनही निर्मात्याचे पैसे वाचावेत म्हणून एक रुपयाची झेरॉक्स न काढता एक-दीड किलोमीटर चालत जाऊन पन्नास पैशात ती काढण्याचा हट्टीपणा स्वत: करे किंवा सहाय्यकाला करायला लावे. अशा वेळी जर सहाय्यक म्हणाला, ‘वरचे पन्नास पैसे मी भरतो!’ की मग सगळं संपलंच...

  • संजय पवार
  • Tue , 16 June 2020
  • 3 Comments
  • 1 Like

मुळात मिळणारच ‘तीळ’! तो पुन्हा सात जणात करंडून खायचा या आपत्तीकाळात?

सदरहू निवेदनातील अपेक्षा भाबड्याच म्हणता येतील. तरीही विवेकी नागरिकांचा अधिकार, तसेच जबाबदारी या भावनेतून त्याचा आदरच करूया. मात्र या निवेदनातील शेवटच्या दोन अपेक्षा, आवाहने मात्र मला विस्मयकारी व सद्यस्थितीच्या आकलनापासून अनभिज्ञ वाटली. त्यातूनही ‘लेखक’ म्हणून या अपेक्षा असल्याने आश्चर्यच वाटले. हे सर्व मांडण्यामागे या लेखकांच्या प्रामाणिक भावनेचा अनादर व्हावा, असे अजिबात मनात नाही, पण...

  • संजय पवार
  • Mon , 08 June 2020
  • 0 Comments
  • 2 Like

​​​​​​​मा. प्रधानसेवक, आपले पत्र मिळाले. त्या पत्रास उत्तर पाठवतोय, जमल्यास वेळ काढून वाचा.

२०१४ पासून आपण वा आपले मंत्री असे कधी कुठे फिरले? मग ते मॉब लिंचिंग असो की युपी, दिल्लीतल्या दंगली. नोटबंदीत रांगेतले बळी असोत की शेतकरी आत्महत्या की आताची लॉकडाऊनमधील बेहाल जनता. दूरचित्रवाणी पडदा व आकाशवाणी व्यतिरिक्त आपण कुठे दिसलातच नाहीत, प्रधानसेवक! ज्याला तुम्ही ‘संवाद’ म्हणता तो संवाद नसून ‘संबोधन’ असते. आपण कायम एकतर्फी संबोधन करता. तुमच्या अमितभाईंच्या शब्दांत सांगायचं तर ‘क्रोनोलॉजी लक्षात घ्या’!...

  • संजय पवार
  • Wed , 03 June 2020
  • 0 Comments
  • 2 Like

माझे अंगण, माझे रणांगण॥ सरता सत्तेचे वंगण, तुटले रिंगण॥ झालो गणंग, कोकलत सुटलो भणंग॥

देवेंद्र फडणवीसांचे जे काही चाललेय, ते राजकारणही म्हणता येणार नाही, इतक्या हलक्या दर्जाचे आहे. त्यात वासरात शिंग मोडून राज्यपालही सामील झाल्याने आजोबा पोरात पोर होऊन पोरखेळ खेळताहेत का नातवंडे आजोबांचा घोडा करून दुडकी चाल खेळताहेत हेच समजेनासे झालेय. ‘ट’ला ‘ट’ लावून यमक जुळणी करत घोषणा देणे वा कार्यक्रम देणे यात भाजपला बहुधा रामदास आठवलेंशी स्पर्धा केल्याचे समाधान मिळत असेल...

  • संजय पवार
  • Tue , 26 May 2020
  • 0 Comments
  • 3 Like

कुलूपबंदीच्या कुलपाची चावी तर हरवून बसले नाहीए ना केंद्र व राज्य सरकार?

२० लाख हजार कोटीचं पॅकेज असो की सक्तीचा लॉकडाऊन, दोन्हीतून काही ठोस हाती लागलंय, लागतंय असं दिसत नाहीए. मग हे लॉकडाऊन मागे लॉकडाऊन पर्व कशासाठी? सामान्य जनता आता वाट पाहून कंटाळलीय. कशाचेच ठोस उत्तर वा उपाय ना केंद्राकडे आहे, ना राज्य सरकारांकडे. नुस्तीच चालढकल वा एकमेकावर ढकलाढकली चाललीय. यातून आता एक शंका मनात येऊ लागलीय… या कुलूपाची चावी तर हरवून बसले नाहीए ना केंद्र व राज्य सरकार?...

  • संजय पवार
  • Thu , 21 May 2020
  • 0 Comments
  • 2 Like

सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात ६० वर्षांत, एकही महिला मुख्यमंत्री नाही!

या देशात एखादी महिला एखाद्या राज्यात  मुख्यमंत्रीपदी असणे ही कृती खरं तर सर्वप्रथम महाराष्ट्रात व्हायला हवी होती. लोकशाहीतला हा एक महत्त्वाचा इतिहास आमच्या नावावर नोंदवायचा हक्क आम्ही गमावून बसलोय. राष्ट्रपतीपदाचा मान मात्र आम्ही राजकीय अपरिहार्यता व हुशारीनं मिळवला. पण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मात्र महिलेला सन्मानानं बसवण्यात आम्ही ६० वर्षं घालवलीत...

  • संजय पवार
  • Thu , 14 May 2020
  • 0 Comments
  • 2 Like

आणि मग आम्हीही छाती फुगवत गाणं म्हटले- ‘...जवानों फुल बरसाओ!!!’

सर्वोच्च दलांना शोभायात्रांचेच आदेश दिलेले पाहून हबकायलाच झाले. मेणबत्ती, थाळी वादन वगैरे नंतरही करोना कमी झालेला नाही. प्रश्न सुटलेले नाहीत. गोंधळाच्या, अनिश्चिततेच्या वातावरणातही केंद्र सरकारला पुष्पवृष्टी, रोषणाई, बँडवादन करावंसं वाटणं आणि अट्टाहासाने ते राष्ट्रप्रेम म्हणून थेट लष्करी दलांना करायला लावणे, हा विरोधाभास त्या ‘…पण तुम्ही खा’ या हिंदूराव पाटलाच्या  सूचनेसारखाच वाटला आम्हाला...

  • संजय पवार
  • Tue , 05 May 2020
  • 0 Comments
  • 4 Like

वेबसीरीजची उलटी गंगा आणि दात कोरून पोटे भरणारी मनोरंजक पत्रकारिता

सुजित सरकारच्या हवाल्याने एक गरमागरम बातमी केली. स्टॉक इंटिमेट सीन्सचा मोंटाज व आता या दृश्यांचे काय होणार? कलाकार तयार होतील? असे छाती बडवल्यासारखे प्रश्न व्हॉईसओव्हरमध्ये. खरा विनोदी भाग पुढेच होता. यावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्याही हाती लागेल तो/तीच्या. मराठीत फारशी नसलेली इंटिमसी पोटेभरू टीव्ही प्रतिनिधीने ओढूनताणून आणून बातमी उठावदार करायचा अत्यंत स्वस्त प्रयत्न केला...

  • संजय पवार
  • Wed , 29 April 2020
  • 0 Comments
  • 3 Like

बातापाटील नावाचा एक शिपाई चारपाटील पंतांच्या गोटांनी कसा वापरला, याचा ‘कुल’वृत्तांत!

बातापाटील पंतांच्या गोटातील कुठल्या पुरस्काराचा मानकरी करायचा; चारपाटील पंत गोटातील कुणाला महर्षि, आचार्य, स्वामी या उपाध्या द्यावयाच्या यावर खलबते चालू असून याला समांतर मुंबई गादीसच सुरूंग लावण्यासाठी बारभाईचे कारस्थानही शिजतेय. त्यासाठी दिल्ली सलतनीसह नागपुरातही काही घोडी गुडघ्याला बाशिंग बांधून फुरफुरूही लागलीत. बातापाटील नावाचा एक शिपाई चारपाटील पंतांच्या गोटांनी कसा वापरला याचा हा ‘कुल’वृत्तांत...

  • संजय पवार
  • Tue , 21 April 2020
  • 2 Comments
  • 2 Like

करोना व्हायरस आणि पाण्याच्या बुडबुड्यावरचे इंद्रधनुष्य!

वरकरणी सर्व चकचकीत व सामान्य दिसत्येय. पण शेतकरी आत्महत्या करतात तशी परिस्थिती आहे अनेकांची. जितकं झगमगतं, जिवंत, सळसळतं हे क्षेत्र तितकेच निर्दयी, क्रूर व असंवेदनशील. या विरोधाभासामुळेच कदाचित या क्षेत्राचं एकत्रित परिणामाचं चित्रं कधीच समोर येत नाही. त्यामुळेच महामारीत व महामारीनंतरही सर्वांत गाळात जाणारे हे क्षेत्र माध्यमांनाही विचारात घ्यावेसे वाटत नाही...

  • संजय पवार
  • Wed , 15 April 2020
  • 7 Comments
  • 2 Like

शिक्षित, श्रीमंत, सुप्रसिद्ध मुस्लीम आपल्या अशिक्षित, अंधश्रद्ध, गरीब मुस्लीम-बांधवांच्या मागे का उभे राहत नाहीत?

कुठे आहे सलमान खान, आमीर खान, शाहरूख खान? राज्यसभेत असताना वा नसतानाही जावेद अख्तर यांच्यासारखा एखादा अपवाद वगळता सैफ अली खानपासून फरान अख्तर, फराह खान, ए. आर. रहमान, सलीम सुलेमान ते अनेक गायक, गीतकार संगीतकार, उद्योजक, व्यावसायिक, साहित्यिक, प्राध्यापक हे सगळे आपल्या या सर्वसामान्य व गरीब लोकांच्या बाजूनं त्यांचा आवाज का बनत नाहीत? का छातीचा कोट करून त्यांच्यावर रोखलेले सर्व संशय परतवून लावत?...

  • संजय पवार
  • Fri , 10 April 2020
  • 0 Comments
  • 2 Like

करोना या एकाच आजारातून आज समाजात नवेच आजार तयार झालेत. आणि या सर्व आजारांवर एकाच वेळी नियंत्रण मिळवू शकेल, असा एकच एक सूत्रधार मिळणे, ही आजची निकड आहे.

आज घडीला देशात वरवर शांतता नांदत असली तरी जनता पूर्ण संभ्रमात आहे. रोजची वाढती आकडेवारी, तज्ज्ञांची विविध मते, निरीक्षणे, प्रसारमाध्यमांतल्या काहींचा अतिउत्साह तर सोशल माध्यमांवरचा उच्छाद याला केंद्र व काही राज्यप्रमुखांची बेबंद कारभाराची जोड, यामुळे काय खरं, काय खोटं, काय वस्तुस्थिती हे कळतच नाहीए. अशिक्षित जनता तर सैरावैरा झालीय, पण सुविद्य जनांचीही मती कुंठीत झालीय...

  • संजय पवार
  • Thu , 02 April 2020
  • 0 Comments
  • 2 Like

मोदी-भक्तांची ‘उबगवाणी तथाकथित राष्ट्रभक्ती’ आणि ध्रुवीकरणाची ‘कलाकारी’!

आता अनेक भाकडकथांप्रमाणे लॉकडाऊनमुळे घरोघरी नातेसंबंध घट्ट होऊ लागलेत वगैरे बातम्या पसरू लागल्यात. यंदा पाडव्याच्या शोभा यात्रा, संचलने रद्द करावी लागल्याने घरबसल्या आपला अजेंडा राबवत बसवायला ही तर आयतीच संधी. त्यामुळे गोमूत्र पिऊन किंवा थाळी घंटा नादातून बॅक्टेरिया फ्री भक्तांना पुढचे २१ दिवस हे नवनव्या भाकडकथा रचून व्हायरल करायला वेळच वेळ आहे...

  • संजय पवार
  • Thu , 26 March 2020
  • 0 Comments
  • 8 Like

फक्त ‘साथीच्या रोगाने येणारे मरण’ आपल्याला एकत्रित आणू शकते?

करोनाही औषध कंपन्यांच्या वेळापत्रकानुसार लस सापडून आटोक्यात येईल. पण पिढ्यानपिढ्यांच्या या विषाणूचं काय करायचं? सर्वोच्च न्यायालयाने भडखाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा म्हटले, त्यावर सरकारने कालहरणाचा खेळ केला. असाच प्रकार करोनावर गोमूत्राचा उपचार सांगणारे बाहेर आणि करोना बंगाली बाबा, मुसलमान असल्याने तातडीने जेलात! याबद्दल जनता व माध्यमे करोनाप्रमाणे एकतानता दाखवतील? त्याची माहिती ताबडतोब देतील?...

  • संजय पवार
  • Wed , 18 March 2020
  • 0 Comments
  • 4 Like

महागाई, बॅंकांची डबघाई, जागतिक रोगराई, देशातील प्रायोजित धार्मिक दंगाई आणि मोदी सरकारची सत्ता दांडगाई!

जगभरची पतमानांकने भारतीय अर्थव्यवस्थेतेची लक्तरे जागतिक वेशीवर टांगतातच आहेत. पण ‘इंटरनॅशनल ह्यूमन राईटस’ने थेट आपल्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेणे, हे तर त्याहून लांच्छनास्पद. मोदी सरकार व स्वत: मोदी यांना टीका, समीक्षा, विश्लेषण, उत्तरदायित्व या शब्दांचा तिटकारा आहे. हे करणारे वा सरकारकडे उत्तरे मागणारे ‘देशद्रोही’ एवढे एकच उत्तर हे सरकार गेली साडेपाच वर्षे अत्यंत घमेंड व दर्पाने देत आलेय...

  • संजय पवार
  • Thu , 12 March 2020
  • 1 Comments
  • 2 Like

‘मोबाईल जॅमर’ हा प्रयोग नाट्यगृहापलिकडेही विस्तारायला हवा!

मोबाईलच्या वेडाने आम्हाला हिंसक बनवत असंवेदनशीलही बनवलंय. अलीकडे महासत्ता जसा साथीच्या रोगाचा व्हायरस पसरवतात, तसा हा मोबाईल नामक व्हायरस या प्रचंड लोकसंख्येच्या व विविध आवडीनिवडी, विषमता, भेद असलेल्या देशात लोकांना जणू काही बुद्धिभ्रष्ट करण्यासाठी पसरवलाय काय असे वाटू लागलेय. देशाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणच या मोबाईल नामक छोट्या यंत्राने ढवळून काढलेय...

  • संजय पवार
  • Tue , 03 March 2020
  • 0 Comments
  • 2 Like

‘म्होरक्या’ हा चित्रपट एका वेगळ्या चळवळीचं प्रतिनिधित्व करतो, जी महाराष्ट्रात बहुजन प्रेक्षक तयार करतेय.

‘म्होरक्या’ हा चित्रपट आपल्याला शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या मुलाचं भावविश्व, स्वप्न दाखवतो. त्याचे शाळेच्या झेंडावंदनाच्या परेडचे म्होरक्या व्हायच्या स्वप्नाच्या या प्रवासात येणाऱ्या अडचणी, गावातला वेडा, वर्गमित्रांची दादागिरी, घरची नाजूक परिस्थिती, अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत, हा सिनेमा संपतो, तेव्हा आपल्या स्वप्नांचं काय काय होऊ शकतं, हे प्रेक्षक स्वत:शीच तपासू शकतो. म्होरक्या का महत्त्वाचा?...

  • संजय पवार
  • Tue , 25 February 2020
  • 0 Comments
  • 1 Like

​​​​​​पराभवामागून पराभव होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अहंकार अजूनही तसाच!

मोदींचा अहंकार असा की, त्यांना त्यांनी केलेल्या कायद्यात जो दुरुस्ती सुचवतो तो देशविरोधक, देशद्रोही व पर्यायाने पाकिस्तानी! आजवर कुठल्याही पंतप्रधानाने अशा प्रकारे पायरी पायरीवर विरोधकांना देशद्रोही, पाकिस्तानी व पाकिस्तान समर्थक मुस्लिमधार्जिणे ठरविण्यात इतकी शक्ती वाया घालवली नसेल! मोदी लोकशाही पद्धतीने सत्ता मिळवून लोकशाही पायदळी तुडवण्यात इंदिरा गांधींच्याही चार पावले पुढे गेलेत...

  • संजय पवार
  • Wed , 19 February 2020
  • 0 Comments
  • 4 Like

राजकारणात ‘झाडू’ कसा वापरायचा, हे केजरीवाल आणि ‘आप’ने दाखवून दिलंय! 

या निवडणूकीतून ‘आप’ने दाखवून दिले राजकारण जातीय-धार्मिक विद्वेष यापासून दूर ठेवत लोकांच्या मूलभूत प्रश्नांभोवती कसे केंद्रित करायचे. विषारी प्रचाराच्या जाळ्यात न अडकता ‘एकला चलो रे’ पद्धतीने आपले धोरण सोडायचे नाही. आणि फार मोठाले दावे घोषणा न करता जनसामान्यांच्या प्रश्नांशी जोडून घ्यायचे. आपच्या विजयाने सर्वच राजकीय पक्षांसाठी नवी आदर्श आचारसंहिता तयार झालीय...

  • संजय पवार
  • Wed , 12 February 2020
  • 0 Comments
  • 2 Like

‘झुंड’ : आतून-बाहेरून खरवडणारं नाटक आहे, म्हणून ते (तिकीट काढून) पहावे!

घटना घडताना, घडवताना जे दोन गट अथवा झुंडी एकमेकांना भिडून जख्मी करताना, होताना. त्याकडे मूक साक्षीदार म्हणून केवळ पाहत राहणाऱ्यांची झुंड या पहिल्या दोन झुंडींपेक्षा अधिक दोषी व गुन्हेगार आहे हा तो संदेश. झुंडशाहीचा निषेध करताना आपणही नकळत एका निष्क्रिय झुंडीचा भाग होतो, हे आपल्याला या नाटकातून आतून बाहेरून खरवडणारे आहे. हे एक प्रखर संवाद नाट्य आहे. त्याचा विषय राजकीय सामाजिक पर्यायाने सांस्कॄतिकही आहे...

  • संजय पवार
  • Mon , 03 February 2020
  • 0 Comments
  • 2 Like

‘तुकडे तुकडे गॅंग’ सहा वर्षे झाली तरी अखंड कशी?

‘तुकडे तुकडे गॅंग’ ही मोदी सरकार, भाजपची मानसिक गरज झालीय. त्यांना कायम जो एक काल्पनिक शत्रू तयार करायचा असतो, त्यासाठी ही गॅंग हातचा एक असल्यासारखी कामी येते. आजच्या भाजप व मोदी सरकारसाठी ‘तुकडे तुकडे गॅंग’ म्हणजे पंचिंग बॅगसह वेळोवेळी किंवा वेळ मारून न्यायला मारायचा पंच झालाय. एक दिवस आपल्या याच पंचवर भाजप नॉकआऊट व्हायची शक्यता वाढीस लागतेय...

  • संजय पवार
  • Tue , 28 January 2020
  • 1 Comments
  • 5 Like

या ‘भागवत पुराणा’तल्या वांग्यांचं करायचं काय?

भागवतांच्या या दोन मुलांच्या कायद्याची संभावना पुराणातील वांग्यांशीच करता येईल. कारण या ‘भागवत पुराणा’तही नवा कायदा पण रोख जुनाच आहे, हे चाणाक्षांना लगेचच कळेल. तेव्हा भागवतांसह भाजपने अलीकडे जे काही कायदे करताना येनकेन प्रकारे ते मुस्लीमकेंद्री होऊन त्यातून हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा जुनाच खेळ खेळायचा जो सपाटा लावलाय, त्याचाच पुढचा भाग म्हणजे ‘भागवत पुराणा’तून सुचवलेला नवा कायदा असणार आहे...

  • संजय पवार
  • Wed , 22 January 2020
  • 0 Comments
  • 2 Like

‘आरपारावलोकिता’ : उत्तरं मागणारा कथनाचा वेगळा प्रयोग

या कथनातून सर्व चळवळी, वाद, अभ्यासक यांच्यापुढे आरसा धरण्याची धिटाई दाखवलीय. ती कदाचित अनुल्लेखाने मारली जायची शक्यता आहे. त्यामुळे डॉ. विद्युत भागवतांनी केलेला हा प्रयोग जमला नाही असं म्हणत त्यातल्या प्रतिपादनाला सतरंजीखाली ढकलण्याचा चलाख प्रयत्न नक्कीच केला जाईल. कादंबरी प्रकाशित होऊन बरेच महिने झाले तरी साहित्य वा चळवळीशी संबंधित पर्यावरणात याची पुसटशीही दखल घेतली गेलेली दिसत नाही...

  • संजय पवार
  • Thu , 16 January 2020
  • 0 Comments
  • 2 Like

इकडे योगी-मोदी-शहा, तिकडे ट्रम्प!

भाजपने एक राजकीय पक्ष म्हणून मोदा-शहा-योगी यांना ‘गो अहेड’ म्हणणे म्हणजे स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेणे! भाजपमधल्या काहींना तरी ‘अंधेरे में एक प्रकाश’ या घोषणेने पेटवलेला वणवा आठवत असेल, तर त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून ही कीड आपल्या लोकशाहीला लागणार नाही हे पहावे. अन्यथा लोक वाजपेयींचेच ‘आओ फिरसे दिया जलाये’ ही ओळ घेऊन नव्या मशाली पेटवतील...

  • संजय पवार
  • Wed , 08 January 2020
  • 0 Comments
  • 3 Like

मंत्रिमंडळ विस्तार की वडिलोपार्जित सत्तेचे हस्तांतरण?

उद्धव ठाकरेंचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील काही घराण्यांच्या पुढच्या पिढीची ‘प्री-केजी स्कूल’ आहे. आता ही मुलं पदव्युत्तर होईपर्यंत याच शाळेत, याच अग्रक्रमानं आपली जागा राखून ठेवणार. याला विस्तारशाही म्हणावं काय? हे मंत्रिमंडळ म्हणजे ‘घराण्यांचे पाळणे हलवणारे मंत्रिमंडळ’ आहे. यात आदित्य ठाकरेंचा समावेश म्हणजे सरंजामी पद्धतीनं मांडीवर बसवण्याचाच प्रकार!...

  • संजय पवार
  • Wed , 01 January 2020
  • 0 Comments
  • 3 Like

ते ७०० का ९०० लोक आता कुठे गेले?

आता हे सर्व घडत असताना, विशेषत: कला क्षेत्रात जे घडवले जात आहे, त्यावर या सातशे ते नऊशे देशभक्तांचे काय म्हणणे आहे? त्यांना याबाबत काही भूमिका घ्यावीशी वाटणार की नाही. मध्यंतरी एका मराठी वृतवाहिनीवर काही मराठी कलावंतांची कलम ३७०बाबतची अज्ञ बालिश बडबड ऐकली होती. ती ऐकून त्यांच्यासारख्याच त्या सातशे ते नऊशे लोकांची देशभक्ती किती उथळ व प्रचारकी आहे, याचा अंदाज त्यांच्या सोशल मीडियावरील बडबडीतूनही येतो...

  • संजय पवार
  • Fri , 20 December 2019
  • 0 Comments
  • 4 Like

अस्वस्थ तरुणाईचे काय करणार?

भाजपचा पारंपरिक मतदारही म्हणू लागलाय की, भाजपला चार फटके देणे गरजेचे होते. सत्तेचा खूपच लवकर माज चढलाय यांना! या पारंपरिक मतदारांच्या घरातला नवा मतदार व काँग्रेस, राष्ट्रवादीला विटलेला नवा मतदारही आता पुन्हा या भ्रष्ट व अकार्यक्षम पक्षांकडे शिवसेनेला पुढे करून वळतोय. ही अस्वस्थता समजून घेण्याचीही गरज वाटत नाही, इतके मोदी सरकार असंवेदनशील वागतेय...

  • संजय पवार
  • Thu , 05 December 2019
  • 1 Comments
  • 2 Like

‘सिंहासन – २’ लिहिण्याची /चित्रित करण्याची क्षमता असलेला कुणी लेखक/पत्रकार/दिग्दर्शक  दिसतोय या नाट्यमय काळात?

सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे, ते पाहून अनेकांना ‘सिंहासन’ या चित्रपटाची आठवण होत असेल. विशेष म्हणजे साधू व तेंडुलकर हे दोघेही तत्कालीन वृत्तपत्रीय पत्रकार होते. आपल्या नोकरीतील दैनंदिन नित्यनूतन घटना व अनुभव यांचा अत्यंत कसदार वापर या दोघांनी आपल्या सृजनात्मक लिखाणात केला. आज असे किती पत्रकार आपल्याला दिसतात, ज्यांच्यामध्ये ही क्षमता आहे?...

  • संजय पवार
  • Fri , 29 November 2019
  • 2 Comments
  • 2 Like

शरद पवारांनी केली जम्माडी गंमत!

पवार गेम सुरू झाला. अगदी सुरुवातीला पवार म्हणाले- आम्हाला जनादेश विरोधात बसण्याचा आहे. पुढे म्हणाले- आघाडीत लढलोय तर काँग्रेसशी बोलावे लागेल. राष्ट्रवादीचे पत्र तयार तर काँग्रेसचे आलेच नाही. मग पवार म्हणाले- आम्ही काँग्रेसची वाट पहातोय. काँग्रेस म्हणाली- विचार करावा लागेल. मग विचार करण्याच्या बैठका सुरू झाल्या. शिवसेना भिरभिरत्या नजरेनं पाहत राहिली. परत त्रिकोण साधण्याच्या कसरती सुरू झाल्या...

  • संजय पवार
  • Fri , 22 November 2019
  • 0 Comments
  • 5 Like

न्यायालयाने सरकारला रामलल्लाची ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’ देऊन, त्यानिमित्ताने करावयाच्या राजकारणाचे अधिकारही बहाल केलेत!

राममंदिर विवादाचे नवे पर्व सुरू झालेय. या निकालाचा कोण कसा अर्थ लावतो यावर बरेच काही अवलंबून आहे. मुस्लीम संघटनांनी या निकालावर भाष्य करताना एक उचित शंका उपस्थित केलीय- या निकालाला आधारभूत मानून काशी-मथुरा विवादाचाही असाच सोक्षमोक्ष लावला जाईल? हे उलटसुलट दावे प्रतिदावे चालूच राहणार आहेत. मात्र या सारांशरूपी बाहेर आलेल्या निकालातून काही शंका, विसंगती दिसतात. त्याचे निरसन कोण करणार?...

  • संजय पवार
  • Mon , 11 November 2019
  • 4 Comments
  • 3 Like

स्वस्त मनोरंजनाच्या हमीसह, सत्तापुनर्स्थापनेचा डेली सोप!

आमदार घटूनही भाजपचा तोरा कारण नसताना वाढलेला आहे. तर सत्तेत सहभागी होण्यासाठी टोकाची विधाने करण्यापेक्षा प्रत्यक्ष वाटाघाटीत राजकीय चातुर्य सेनेने का दाखवले नाही. हा साप मुंगूसाचा खेळ खेळून शेवटी एकत्रच नांदणार असतील तर वाहिन्यातील स्वस्त मनोरंजनासारखा हा रोजचा ड्रामा कशाला? आता मतदार या डेलीसोपमध्ये कुणाचे पात्र महत्त्वाचे ठरणार हे कळून आपल्याला कधी मोठ्ठ्याने हसायला मिळणार याची वाट पाहत डेलीसोप पाहताहेत...

  • संजय पवार
  • Thu , 07 November 2019
  • 0 Comments
  • 3 Like

भाजपच्या अहंकाराला सेनेच्या वाघनखांनी शेवटी गुदगुल्याच केल्या!

सेना सत्तेच्या सारीपाटात तर हरलीच आहे, पण मागची पाच वर्षे आम्हीच सत्ताधारी नि आम्हीच विरोधी ही जी टिमकी वाजवून घेतली, ती यावेळी त्यांना वाजवता येणार नाही, कारण यावेळी विरोधक १००+ आहेत. युतीच्या घटलेल्या संख्याबळाने त्यांच्यात आता लढण्याची ऊर्जा निर्माण झालीय. राष्ट्रवादी आक्रमक राहणार. त्यांच्याकडे २५ नवे चेहरे आहेत आणि राम शिंदे, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, खडसे कन्या यांना घरी बसवल्यामुळे ते ‘किलर’ ठरलेत...

  • संजय पवार
  • Fri , 01 November 2019
  • 0 Comments
  • 5 Like

निवडणुका आणि माध्यमांचं ‘तेच ते आणि तेच ते’!

निवडणुका आणि त्याचं वार्तांकन यात तेच ते तेच ते वर्षानुवर्षं चाललेलंच पुढे चाललंय. फरक काय झालाय तर ब्लँक अँड व्हाईटचं कलर झालंय. शब्दांच्या जोडीनं ध्वनिचित्रं आलीत. तंत्रज्ञान बदललं, मात्र आशय तोच राहिलाय. उलट तो अधिक सवंग आणि आता तर थेट विकावू झालाय. दरबारी भाट इतिहासात होते, ते आताही प्रकटलेत आणि मधल्या काळातली ध्येयवादी, परखड, शोधक पत्रकारिता संपवून सवंगता, तोचतोचपणा रूजवलेला दिसतो...

  • संजय पवार
  • Wed , 23 October 2019
  • 0 Comments
  • 3 Like

मग्रुर, असंवेदनशील सरकार आणि प्रशासनाची मुजोरी मोडीत काढा!

विरोधाचा न्याय्य, सनदशीर व संवेदनशील आवाज दडपायचा व प्रकल्प विरोध म्हणजे विकासाला विरोध आणि विकासाला विरोध म्हणजेच राष्ट्रद्रोह अशी नवीच व्याख्या या दडपशाहीसाठी वापरली जातेय. आजवर एकही हुकूमशहा या जगात अजिंक्य राहिलेला नाही. त्यांचे शेवटही तसेच करुण झालेत. मग तो कुणी सत्ताधारी असो की एखादी राजवट. मोदी, फडणवीस व ठाकरे यांना आपण लोकांना गॄहित धरता कामा नये, हे समजावून सांगण्याची वेळ व संधी आलीय...

  • संजय पवार
  • Fri , 11 October 2019
  • 1 Comments
  • 4 Like

महानायक इतका ‘दुर्लक्षित’ का राहिला सर्वोच्च सन्मानानंतरही?

बच्चन ही एक जिवंत आख्यायिका आहे, हे त्यांच्या कट्टर विरोधकाला पण मान्य करावे लागेल. पण त्यांचा सारा प्रवास, त्यातले चढउतार आणि त्यातून सुरक्षित वाट शोधून पुढे जाणारे बच्चन त्यांच्या या व्यामिश्र व्यक्तित्वामुळेच एवढा मोठा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावरही त्या अर्थाने बेदखल राहिले असावेत! बाकी विनोद खन्नाला मरणोत्तर फाळके सन्मान देऊन या पुरस्काराची गेलेली इभ्रत परत आलीय, हेही काही कमी नाही...

  • संजय पवार
  • Thu , 03 October 2019
  • 0 Comments
  • 7 Like

‘बहिष्कृत’, ‘गुलाम’ म्हणून एकदा जन्म घेऊन पहाच नितीनजी!

नितीनजी, ज्या सहजतेनं तुम्ही ‘कुणाचं भलं झालं?’ असं विचारलेत ना… त्याच सहजतेनं या विजयादशमीला रेशीम बागेत जाल, तेव्हा शेजारच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्रपरिवर्तन दिनासाठी जमलेल्या लोकांना पहा, तिथला माहौल पहा आणि तिथं कुणालाही विचारा आरक्षणानं काय झालं? गुलामी भोगलेल्यांचे वारस आत्मसन्मानाची जी गौरवगाथा तुमच्यासमोर गातील, तेच तुमच्या विधानाला खोडून काढणारं बाणेदार उत्तर असेल!...

  • संजय पवार
  • Wed , 25 September 2019
  • 3 Comments
  • 6 Like

अनेकदा ‘अलका कुबल’ भासणाऱ्या सरिता आवाड क्षणात वीज चमकावी तशा ‘स्मिता पाटील’ होऊन जातात!

हे आत्मकथन महत्त्वाचं अशासाठी आहे की, यात जवळपास पाच दशकातील सामाजिक, राजकीय, सांस्कॄतिक, स्थित्यंतरांचा पैस आहे. नवी स्वप्ने, आकांक्षा, यांचे रुजणे, फुलणे आणि नंतर संपून जाणे आहे. वैयक्तिक जगण्याच्या लढाईसोबत, राजकीय, सामाजिक परिवर्तनासाठीचा सक्रिय सहभाग, राग, लोभ आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हा एका भानावर आलेल्या स्त्रीचा कौटुंबिक ते सामाजिक पातळीवरचा लढा आहे...

  • संजय पवार
  • Tue , 17 September 2019
  • 0 Comments
  • 3 Like

‘मुंबई’ची ‘तुंबई’ करणाऱ्यांना मुंबईकर धडा शिकवतील या निवडणुकीत?

खरं तर मुंबईच्या समुद्राचीच नाही, तर संपूर्ण मुंबईच एक कचरापेटी झालीय. या समारंभाआधी काही दिवस मुंबईला जी अवकळा आली होती, ती पाहता, या भविष्यकालीन कोट्यवधी रुपयांच्या योजनांचे असे सोहळे करणं मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखंच आहे. पण मुंबईकरही आता सर्व प्रकारच्या जखमांना सरावला असून वर मिठाच्या पाण्यानेच आंघोळ करतो. इथल्या राज्यकर्त्यांनी आपली किंमत फोलपटाएवढीही ठेवलेली नाही, हे तो जाणतो...

  • संजय पवार
  • Wed , 11 September 2019
  • 1 Comments
  • 5 Like

एवढे ‘राष्ट्रप्रेमी’ आहात, तर देशाची आर्थिक स्थिती सुधारून दाखवा!

स्वत:चं कथित राष्ट्रवाद, देशभक्तीचं टुमणं बाजूला ठेवून सरकारनं एककल्ली पद्धतीनं किंवा अध्यादेश किंवा रात्रीत निर्णय पद्धती सोडून मंत्रीमंडळाचा म्हणून निर्णय घ्यावा. तज्ज्ञांचा सल्ला ऐकावा. चुकलेल्या विरोधकांना अवश्य तुरुंगात डांबावं. पण त्यापलीकडे ज्यांचा सल्ला देशासाठी उपयोगी पडेल, त्यांना सन्मानानं बोलवावं. जसं वाजपेयींनी ‘आपत्ती व्यवस्थापना’साठी शरद पवार व शेतीप्रश्नासाठी शरद जोशींना बोलवलं होतं...

  • संजय पवार
  • Wed , 04 September 2019
  • 2 Comments
  • 4 Like

राष्ट्रीय पुरस्कारावरची ‘सावली!’

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व अभिनेता यासाठी ‘उरी’ या चित्रपटाचा विचार ही तर सरकारची मोठीच सावली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुवर्णकमळ विजेत्या चित्रपटाचा किंवा सर्वोत्कृष्ट हिंदी, मराठी, बंगाली, मल्याळी चित्रपटाचा दिग्दर्शक न ठरता ‘उरी’चा दिग्दर्शक ठरावा, हा त्या पुरस्काराचा अपमान आहे. तीच गोष्ट विकी कौशलची. त्यानं आजवर केलेल्या चित्रपटातील सर्वांत सवंग व सुमार चित्रपट ठरेल ‘उरी’...

  • संजय पवार
  • Wed , 14 August 2019
  • 0 Comments
  • 4 Like

आपल्या ‘लायकीचे’ सरकार ‘आपल्याला’ मिळते!

ज्यांची मुळंच प्रश्न विचारायचे नाहीत अशा भूमीत रुजलेली, त्यांच्याकडून राजकीय शहाणपण, प्रगल्भपणा आणि संयम यांची अपेक्षा करणं तसं चुकीचंच हे पुन्हा एकदा दिसून आलं. शंभरावर माणसं केवळ रांगेत उभी राहून मेली, त्या नोटबंदीचं समर्थन करणारेच काल पुन्हा ढोल बडवत होते! याला ‘संमोहन’ म्हणणं फारच चुकीचं ठरेल. कालचा जल्लोष, समाजमाध्यमावरची उन्मादी भाषा, विकृत संदेश पेरणी, हे सर्व मूर्ख, बिनडोकपणाचं...

  • संजय पवार
  • Wed , 07 August 2019
  • 3 Comments
  • 12 Like

एक जीव, एक संकुल : नवी आपातकालीन महानगरी योजना!

लोक घराबाहेर पडू नयेत यासाठी घरातच काम, थिएटर, खाद्यान्न यांचा पुरवठा करावा. मोठ्या संकुलातच दहन व दफन यांची सोय असावी. ‘एक जीव, एक संकुल’ या जीवनशैलीला प्रोत्साहन देऊन ‘सदर इसम या संकुलात अमूक दिवशी, अमूक साली जन्मला. इथेच वाढला, अमूक दिवशी इथंच दफन झाला. त्यानं या पृथ्वीचा फक्त एवढे चौरस फूटच वापर केला.’ अशी पाटी लावावी! सध्याच्या सरकारलाही आवडेल अशीच ही योजना आहे. विचार करा...

  • संजय पवार
  • Wed , 31 July 2019
  • 1 Comments
  • 3 Like

‘मेरा नाम जोकर’ आणि ‘गोपी’ पडले, मधल्या मध्ये ‘जॉनी मेरा नाम’ चालला!

आता भाजप शिवसेनेत कुणी कधी जायचं, कुठून निवडणूक लढवायची हेही ठरवणार! सेनेला ‘हो’ म्हणण्याशिवाय पर्याय नाही. कारण सेनेनं बाणा दाखवत एखादा सरप्लस नाकारला तर भाजप त्याला काँग्रेससह कुठेही पाठवून निवडून आणवू शकतं! तर या सर्व निवडणूक पूर्व राजकारणात सेनेचा भाव परभारे वाढत चाललाय. आता शिवसेना हीच खऱ्या अर्थानं भाजपची ‘बी टीम’ झालीय. भाजपसाठी सेनेच्या जागाही त्यांच्याच असल्यासारख्या...

  • संजय पवार
  • Sat , 27 July 2019
  • 0 Comments
  • 3 Like

थेट मुख्यमंत्रीपद! अलिबागहून आला काय?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पेंग्विन सांभा‌ळायचं काम नसतं की, ओपन जीममध्ये व्यायाम करायचा नसतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला इतकं डेली रुटीन असतं की, स्वतंत्रपणे नाईट लाइफ एन्जॉय करता येत नाही. महाराष्ट्राचा भावी (!) मुख्यमंत्री आवाज फुटलेला नसताना एवढ्या जागा नि तेवढ्या जागा देऊ, असे चिमखडे बोल बोलत नाही. मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहणाऱ्यांनी आधी पालिकेचा कारभार सुधारावा...

  • संजय पवार
  • Mon , 22 July 2019
  • 1 Comments
  • 3 Like

खेकड्यांनी मुंग्यांना मागे टाकले!

खेकड्यांना अभय मिळण्याचं आणखी एक ठोस कारण म्हणजे कंत्राटदार आमदार व मंत्री ज्या पक्षाचे, तो पक्ष मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करतो. आणि खेकडे हे तर मराठी माणसाचं नैसर्गिक प्रतीक! एक खेकडा दुसऱ्या खेकड्याला वर जाऊ देत नाही. त्यामुळे टोपलीत न झाकता ते ठेवता येतात. खेकड्यांची लज्जतदार गोष्ट फडणवीस यांना परिचयाची किंवा चवीची नसली तरी त्यांची वृत्ती, मराठी माणूस, त्यांचा प्रातिनिधिक पक्ष याची नीटच माहिती त्यांना आहे...

  • संजय पवार
  • Wed , 10 July 2019
  • 0 Comments
  • 2 Like

विनाशकारी विकासाच्या गोड स्वप्नातून बाहेर पडू या!

आता कुणी म्हणेल की, सीमेवर जवान उभे राहतात रात्रंदिन, तर तुम्ही चार तास फलाटावर उभं राहू शकत नाही? सियाचीनमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान पहारा देतात आणि तुम्ही गुडघाभर, कमरेभर पाण्यात चालायला रडता? सरकार जर तिकडे शत्रू राष्ट्राच्या घरात घुसून मारण्यात गुंतलं असेल, तर त्यांना तुम्ही गटारं नि रेल्वे वेळापत्रकं दाखवत रडणार? आणि विकास हवाय तर खोदकामाचं ध्वनिप्रदूषण, हरितपट्ट्याचं सपाटीकरण, वृक्षतोड हे सहन करा...

  • संजय पवार
  • Wed , 03 July 2019
  • 0 Comments
  • 3 Like

नवा ‘प्रायोगिक’ रंगमंच केवळ ‘आकाराने’ प्रायोगिक असेल की ‘अभिव्यक्ती’नेही?

सेन्सॉर प्रमाणपत्रावर आधी प्रायोगिक असलेलं नाटक अधिक पैसे भरून व्यावसायिक झालं! पुढे त्यांनी व्यावसायिक म्हणूनही पारितोषिकं मिळवली, स्वीकारली! याचा अर्थ आज निव्वळ सेन्सॉर प्रमाणपत्रावरून कुणाचंही नाटक फटक्यात प्रायोगिक अथवा व्यावसायिक होऊ शकतं. जितक्या सहज कुणी कुमारी जोशी सौ. पटवर्धन होत तसं. या अशा पायावर उभ्या राहणाऱ्या प्रसंगी कलेप्रती अनैतिक वागणाऱ्या तथाकथित रंगकर्मींसाठी प्रायोगिक रंगमंच उभारणार?...

  • संजय पवार
  • Wed , 26 June 2019
  • 0 Comments
  • 2 Like

महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोण? वंचित की मनसे?

लोकांना जसा सशक्त सत्ताधारी हवा असतो, तसाच आक्रमक विरोधी पक्ष हवा असतो. देशात भाजप, कम्युनिस्ट, तृणमूल काँग्रेस, सपा, राजद यांना लोकांनी ती संधी दिली होती. महाराष्ट्रात तर स्थापनेपासून ४० वर्षं लोकांनी सेनेला ती संधी दिली होती. सेना भाजपमुळे ‘स्वबळ’ दाखवू शकत नाही आणि विरोधात राहण्याची सेनेची मानसिकता नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ढासळत्या प्रभावक्षेत्रात हे दोन पक्ष नीट रणनीतीनं मुसंडी मारू शकतात!...

  • संजय पवार
  • Sat , 22 June 2019
  • 0 Comments
  • 2 Like

प. बंगाल : तिरंगा ते भगवा व्हाया लाल

जी चूक काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केली, तीच चूक ममतादीदी करताहेत. मोदी-शहांनी ममतांना राजकीय विषयावर नाही तर धार्मिक मुद्द्यांवर घेरलेय. मग तो दुर्गापूजा, ईद मिलाद असो की जय श्रीरामचा नारा असो. धार्मिक धुव्रीकरणात स्थलांतरित, तरुण नवमतदार आणि उदारीकरणाचा लाभार्थी नवश्रीमंत हा पहिला आकर्षित होतो...

  • संजय पवार
  • Wed , 12 June 2019
  • 0 Comments
  • 2 Like

शिक्षण, आरक्षण, भाषा आणि बरेच काही

अलीकडे अनेक गोष्टींचं ‘ऑडिट’ करायची नवी सरकारी कार्यपद्धती विकसित झालीय. त्या अंतर्गत ९०नंतरच्या जागतिकीकरण, खाजगीकरणोत्तर शिक्षणाचं ऑडिट व्हायला पाहिजे. अमर्त्य सेनसारखे अर्थतज्ज्ञ प्राथमिक शिक्षणावरची अंदाजपत्रकीय हेळसांड दाखवून त्याचं गांभीर्य सांगतात, तरी विकासाभिमुख सरकारांना नव्या आयआयटी व एम्स सुरू करण्यात अधिक रस...

  • संजय पवार
  • Tue , 04 June 2019
  • 1 Comments
  • 2 Like

डॉ. पायल तडवी आत्महत्या : अजून किती भ्रमात राहणार?

डॉक्टरी शिकणाऱ्या मुंबई महानगरातील ‘मुलींची’ ही मानसिकता, तर जिल्हा नि तालुका पातळीवरील शाळा, महाविद्यालयं, वसतीगृह यांची काय अवस्था असेल? रोहीत वेमूला आयआयटी नामक चिरेबंदी वाड्यातच चिणला गेला ना? डॉ. पायल तडवीच्या निमित्तानं हेच सिद्ध झालं की, जातीचा संसर्गजन्य रोग तसाच आहे. अॅट्रॉसिटीसारखी लसही हा रोग जुमानत नाही, हेच वास्तव दर्शवतोय. आपण रोगमुक्त आहोत, हा भ्रम आता तरी दूर होईल?...

  • संजय पवार
  • Fri , 31 May 2019
  • 1 Comments
  • 3 Like

मोदीविजय : सशक्त सत्ताधारी आणि प्रतिकूल व्यवस्थेत भरकटलेले विरोधक

सर्वच बाबतीत असमान पायावर लढवलेली ही निवडणूक लोकशाही चौकटीत नियमानुसारच झाली व आम्ही ढोर मेहनत केली, याचा आभास निर्माण करण्यात मोदी-शहा यशस्वी झाले. आणि मतदारांनाही त्याच आभासात शाश्वत नेतृत्वाची मोदींची प्रतिमा व विरोधकांची भरकटलेली प्रतिमा दाखवत, ही निवडणूक एकहाती खिशात टाकली! लोकशाहीचा देखावा हुबेहूब निर्माण करण्यात भाजप व मोदी-शहा यशस्वी झाले...

  • संजय पवार
  • Sat , 25 May 2019
  • 0 Comments
  • 5 Like

साहित्यिक, कलावंत आणि सत्तेचे राजकारण

सांगा कुठे भेटायचं? कुठे लेखाजोखा मांडायचा? राज ठाकरेंच्या व्हिडिओनंतरही उरलीसुरली लाज, खोटारडेपणा, दांभिकपणा उघड करून घ्यायची इच्छा असेल तर जरूर या. पण तत्पूर्वी लक्षात घ्या, आम्ही विचार, प्रवृत्तीला विरोध केलाय. तुम्ही थेट व्यक्ती व राजकीय पक्षाचं समर्थन करताहात. सत्तेच्या राजकारणात मुरलेल्या पक्षाची अशी उघड पाठराखण तुमच्याच कलाविष्काराचा गळा घोटू शकते. तेव्हा मग मदतीची याचना करू नका!...

  • संजय पवार
  • Wed , 15 May 2019
  • 0 Comments
  • 5 Like

एक होता वामन!

गेल्या सात-आठ वर्षांतला वामन मला एखाद्या बेटावरचा एकांडा कोळी (Oldman and Sea) वाटायचा. आजूबाजूला काय घडतंय यावर त्याची नजर होती, तो व्यक्तही व्हायचा, पण लिहायचा पूर्णत: वेगळंच. वामन हा एखाद्या तुळतुळीत गोट्यासारखा होता. तो ना डावा होता, ना उजवा, ना आस्तिक, ना नास्तिक. तो सगळं होता आणि काहीच नव्हता...

  • संजय पवार
  • Thu , 09 May 2019
  • 0 Comments
  • 4 Like

गुलामांची लोकशाही!

आजही आमच्यात ‘सर्वसमानते’च्या दिवशीही ‘विशेष’ लोक असतात. ते रांगेत उभे राहिले, मतदान केले याचे कौतुक! त्यांना टिपायला कॅमेरे आसुसलेले, पण दुर्गम भागात, उष्ण प्रदेशात, विपन्न अवस्थेत, नरकासम वस्तीत राहणारे रांगा लावतात, टक्का वाढवतात, तिकडे कुणाचे फार लक्ष नाही. करीनाच्या कडेवरच्या तैमूरची सर धारावीतल्या कुणा कृष्णाबाईच्या कडेवरच्या पोराला कशी येणार?...

  • संजय पवार
  • Wed , 01 May 2019
  • 0 Comments
  • 4 Like

‘जात’केंद्री निवडणुकीत ‘बाईच्या जाती’चं स्थान काय?

भाजपच्या शायना एन.सी. यांनी स्वपक्षाला घरचा आहेर देत म्हटलं की, भाजपमध्ये महिला उमेदवार आहेत, पण त्या बहुसंख्य नेत्यांच्या लेकीबाळी, पत्नी, सूना! शायना एन.सी. सारख्यांची खदखद आणखीनच विदारक वाटते, जेव्हा पक्ष स्मृती इराणी, जयाप्रदा आणि प्रज्ञा सिंग-ठाकूर यांच्यासारख्यांना उमेदवारी देतो. यातल्या स्मृती इराणी आता भाजपीय असल्या तरी त्या भाजपमध्ये ‘पॉप्युलर स्टार’ म्हणूनच आल्या होत्या...

  • संजय पवार
  • Fri , 26 April 2019
  • 1 Comments
  • 2 Like

कुठल्याही ‘कलाकृती’ला कुणीही, कुठल्याही काळात विरोध करू नये; बंदी घालू नये!

कलाकृती प्रदर्शनाची माध्यमे\साधने बदलताहेत. त्यामुळे यापुढे कशावरही बंदी घालायची तर थेट माणूसच मारावा लागेल. कारण त्या माणसाच्या हातात पुस्तक नाही तर किंडल असेल. सिनेमाचे प्रदर्शन रोखणे, थिएटर फोडणे निरुपयोगी होईल. कारण प्रेक्षक सिनेमा हातात मोबाईलवर घेऊन फिरत असेल. हे सर्वच अभिव्यक्ती बाबत होईल. आणि तेव्हा कलाकृतीला विरोध म्हणजे ती घरात, हातात, बघणारा वाचक-प्रेक्षकच मारावा लागेल...

  • संजय पवार
  • Tue , 16 April 2019
  • 0 Comments
  • 4 Like

राज ठाकरेंच्या तोफा आणि माध्यमांची ‘मोदी बचाव’ चौकीदारी!

थेट चॅनेलला धमकी देणारा पंतप्रधान, वृत्तवाहिनी मुकाट स्वीकारते, तेव्हा दारुड्या नवऱ्याचा मार मुकाट खाणारी महिला डोळ्यासमोर येते! राज ठाकरेंनी दारूगोळा ठासून भरून तोफा मैदानात आणल्यात. पण ‘मोदी बचाव’ म्हणून चौकीदारी करणारा पगारी मीडिया तो दारूगोळा वाया घालवणार! आता जनतेनेच मोदी आणि लाचार मीडिया यांना त्यांची ‘जागा’ दाखवायला हवी. राज ठाकरेंना साथ द्यायला हवी...

  • संजय पवार
  • Wed , 10 April 2019
  • 0 Comments
  • 5 Like

‘आवेश’ आणि ‘गणवेश’ पांघरला म्हणजे ‘कर्तव्यप्रावीण्यता’ येते असं नाही!

पाच वर्षं हा काळ तसा कमीच, पण कुणालाही तो तेवढाच मिळतो. त्या पाच वर्षांत तुम्ही जे काही कराल, त्यावर पुढची पाच वर्षं ठरतात. तुम्ही पाच वर्षं मागची ७० वर्षंच काढत बसलात, तर जनता म्हणणार ‘अरे पांड्या, दिलीत ना पाच वर्षं. त्याच्यात किती काय करतोय ते सांग. पाच वर्षाखेरीस किती काय केलंस ते सांग.’ १०० दिवसांत अनेकांना खडी फोडायला पाठवणारा चौकीदार आता विनवणी काय करतो?...

  • संजय पवार
  • Thu , 04 April 2019
  • 1 Comments
  • 2 Like

काँग्रेस ‘रोपवाटिका’ केंद्र

पूर्वीश्रमीचे प्रधानसेवक आणि विद्यमान चौकीदारांना एक गोष्ट तर मान्य करावीच लागेल की, भले काँग्रेसनं ७० वर्षांत देशाची वाट लावली असेल, पण विद्यमान भाजपसाठी जिंकून येऊ शकणाऱ्या उमेदवारांचं ‘वाण’ आपल्या ‘रोपवाटिके’त तयार करून ठेवलंय! देशात अमित शहा आणि महाराष्ट्रात चंद्रकांतदादा पाटील आणि गिरीश महाजन तर या ‘रोपवाटिके’च्या प्रेमातच पडलेत. ते रोज सांगतात, ‘बघा, आता रोजच एक नवी रोप घेऊन येणार आम्ही!’...

  • संजय पवार
  • Tue , 26 March 2019
  • 1 Comments
  • 4 Like

भाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर?

‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली! स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं! त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे!...

  • संजय पवार
  • Thu , 21 March 2019
  • 0 Comments
  • 3 Like

कुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ!

या आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार?...

  • संजय पवार
  • Thu , 14 March 2019
  • 1 Comments
  • 4 Like

‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक

एक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय! देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा!...

  • संजय पवार
  • Wed , 06 March 2019
  • 1 Comments
  • 7 Like

स्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर?

ज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर! काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही...

  • संजय पवार
  • Wed , 27 February 2019
  • 0 Comments
  • 2 Like

कमळाचा ‘डार्ट’ आणि ‘शिवट्या’ पिंजऱ्यात!

आता क्रम लावला तर काय दिसतं? फडणवीस-शहा आले. मातोश्रीवर गेले. दोन्ही ठाकरेंना गाडीत घातलं. वरळीत आणलं. घोषणा फडणवीसांनी केली, समारोप शहांनी. मध्ये सहमतीचे चार शब्द ठाकरेंचे! संपलं. सर्व भाजपीयांचा भाव असा होता, मुलगा भरकटला होता, त्याला समजावून परत आणलंय, चुका पोटात घेऊन समजही दिलीय!...

  • संजय पवार
  • Thu , 21 February 2019
  • 1 Comments
  • 3 Like

उद्या ‘भंग’ करायला ‘औचित्य’च उरलं नाही, तर आपण काय करू?

‘औचित्या’चा मुद्दा पुढे करून जे पालेकरांना बोल लावताहेत, त्यांना विचारावंसं वाटतं की, तुम्हीच होता ना दुर्गा भागवतांचं कौतुक करणारे? तुम्हीच होता ना पुलंनी महाराष्ट्रभूषण स्वीकारताना ठोकशाहीवर बोलल्यावर टाळ्या वाजवणारे? चुकीची गोष्ट घडत असेल तर प्रसंगी ‘औचित्यभंग’ करायला हवा. नागरिकच जर ‘औचित्या’च्या नावाखाली गप्प बसले, तर शासन चार पावलं पुढे जात ‘औचित्य’ही बंद करेल...

  • संजय पवार
  • Fri , 15 February 2019
  • 1 Comments
  • 6 Like

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ‘निवडक’ भाषा वैभव!

फडणवीसांचे हे निवडक भाषावैभव कदाचित पुढच्या सहा महिन्यांत अधिकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा ते वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजू शकतात! प्रचारात भाजपच्या वाचाळ तोफांप्रमाणे निवडक भाषावैभव दाखवणारे फडणवीसही किती वाहवत जातात, ते लवकरच कळले. तूर्तास त्यांनी विरोधकांना जी उपमा दिली, त्यातून ते आता मोदींच्या अधिक प्रभावात आले म्हणता येईल. ते चांगलं की वाईट हे कळेलच या वर्षांत!...

  • संजय पवार
  • Tue , 05 February 2019
  • 0 Comments
  • 4 Like

स्मृतिभ्रंश काळात, त्यांच्या मनात त्यांनी कसली उजळणी केली असेल?

आयुष्याच्या अखेरीस स्मृति जाणं हे चांगलं का वाईट? कोरी पाटी घेऊन आलो, ती तशीच कोरी घेऊन जायची, यालाच पूर्णविराम म्हणायचा? मरणानंतर काहीच नसतं. काहीच उरत नाही असं विज्ञान सांगतं. अध्यात्म सांगतं, आत्मा अमर; तर कार्यरूपानं अमरपण बहाल करण्याची सोय माणसानं विकसित केलेली. अशा वेळी जिवंतपणीच स्वत:च्या विस्मरणात शिरलेली ही थोर क्रियाशील मंडळी त्या शेवटच्या काळात नेमकी कशाशी झुंजत असतील?...

  • संजय पवार
  • Fri , 01 February 2019
  • 1 Comments
  • 5 Like

‘आभाळ पेलताना’ : आंबेडकरी कवयित्रींचा महत्त्वाचा दस्तावेज

‘आभाळ पेलताना’ या शीर्षकाचा हा कवितासंग्रह तब्बल १९ कवयित्रींचा प्रातिनिधिक कवितासंग्रह आहे. या संग्रहातील सर्व कवयित्री आंबेडकरी प्रेरणेतून लेखन करतात. हे संपादकियातून मांडले गेले आहेच. पण प्रत्येक कवयित्रीचा परिचय व लेखनप्रेरणाविषयक टिपणातून ते दृग्गोचर झाले आहे. हा संग्रह एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहेच, पण यातील अनेक कवयित्रींकडून अधिक कवितालेखनाची अपेक्षा वाढवणारा आहे...

  • संजय पवार
  • Fri , 25 January 2019
  • 0 Comments
  • 3 Like

सिनेमाचा पडदा आणि प्रचार, अपप्रचार आणि बायोपिकच्या युद्धात हरवतेय ‘गोष्ट’!

एकच बरी गोष्ट झालीय हिंदी सिनेमातला हिरो सेंट्रिकपणा कमी होऊन छोट्या गावातल्या, छोट्या माणसांच्या आयुष्याच्या गोष्टी येऊ लागल्यात. नायक-नायिका ग्लॅमर उतरवून मातीत उतरू लागलेत. पूर्वी हे भाषिक चित्रपटात होई, आता ते मुख्य हिंदी सिनेमातही होऊ लागलंय. मात्र कृतक राष्ट्रवादाचा राजकीय रोग जितक्या लवकर या क्षेत्रातून बाहेर जाईल किंवा त्याचं समूळ उच्चाटन होईल तेवढं कलाविश्व ‘कला’ म्हणून निष्पक्ष, निर्मळ राहील...

  • संजय पवार
  • Mon , 21 January 2019
  • 0 Comments
  • 5 Like

उंटाचा मुका आणि लिलिपूट सारस्वत

या सगळ्यात खरी गोची झालीय ती संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांची. त्यांना सन्मानानं मिळालेलं अध्यक्षपद त्या या तोतयांसारखं बंड करून भिरकावून देण्याइतक्या ‘सिलेक्टिव्ह’ नाहीत. त्यांची गत ‘असून अडचण नसून खोळंबा’सारखी झालीय. त्या कवयित्री म्हणून जितक्या तरल, संवेदनशील आणि संयत आहेत, तशाच विचारीही आहेत. मात्र बंडखोर, विद्रोही नाहीत. समन्वयवादीच म्हणता येतील...

  • संजय पवार
  • Fri , 11 January 2019
  • 2 Comments
  • 4 Like

‘नाट्यगृहां’च्या नामकरणातून ‘कलावंत’च गायब!

आमच्या मते यापुढे धोरण म्हणून शासन, महापालिका ते ग्रामपंचायची यांना एक अध्यादेश द्यावा. क्रीडा\कलासंकुले, नाट्य\सिने कलादालने यांना त्या क्षेत्रातील व्यक्तींचेच नाव द्यावे. ऐतिहासिक पुरुष\स्त्री, राजकीय नेते यांची नावे देऊ नयेत. शिवाय ज्या नावाने आधीच महाराष्ट्रात कुठे नामकरण, तशाच कला\नाट्यगृहाला झाले असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळावी. व्यक्तीची थोरवी कुठेही लादू नये...

  • संजय पवार
  • Thu , 03 January 2019
  • 0 Comments
  • 1 Like

भारतीय एकजिनसतेला उदध्वस्त करणाऱ्या राजवटीचा हिशेब चुकता करण्याचे ‘वर्ष’ आले!

मोदींना पर्याय शोधण्यापेक्षा मोदींना पायउतार करणं हाच देशाची विस्कटलेली घडी नीट बसवण्यासाठीचा तरणोपाय आहे. कुणीही चालेल, पण मोदी सरकार नको, अशी तीव्र गरज आज देशाला आहे. त्याची भरपाई सर्वांत प्रथम यांना मतपेटीतून पदच्युत करूनच सुरू करावी लागेल. २०१४भले मोदी-शहांचं होतं, पण २०१९ मात्र १२५ कोटी सुजाण भारतीयांचं असेल. याच नववर्षाच्या शुभेच्छा!...

  • संजय पवार
  • Thu , 27 December 2018
  • 3 Comments
  • 4 Like

ज्योतिरादित्य सिंधीया, सचिन पायलट आणि राहुल गांधी

राहुल गांधींना काँग्रेसच्या बुजुर्गांसोबत सत्ता गाठायची आणि टिकवायची असेल तर त्यांना खूप मर्यादा तरी पडतील किंवा त्यांना अकाली प्रौढ व्हावं लागेल! तिथून जो काँग्रेसचा डोलारा गडगडला तो आजतागायत सावरलेला नाही. ज्योतिरादित्य सिंधीया, सचिन पायलट आणि राहुल गांधी यांनी बुजुर्गांना कुशलतेनं हाताळून पक्षाला नवं रूप दिलं, तरच काँग्रेस पूर्वपदी येईल!...

  • संजय पवार
  • Thu , 20 December 2018
  • 0 Comments
  • 3 Like

तंबूत शिरलेला उंट बाहेर काढण्याची सनदशीर प्रक्रिया सुरू…

आणि ११ डिसेंबर २०१८ रोजी स्वारासह उंट तंबूबाहेर काढण्याच्या मोहिमेला प्रारंभिक यश मिळालं. तंबूवाल्यांचा आत्मविश्वास वाढलाय. उंटासह आत घुसून तंबूचा मूलाकारच बिघडवलेल्या स्वाराला ‘गर्वाचं घर खाली’ कसं येतं हे दाखवायचा चंग सगळ्यांनी बांधलाय. १२५ कोटीतले काही कोटी एका रात्रीत असे अंगावर येतील याची कल्पना नसलेला उंट आणि सांडणीस्वार आता खऱ्या अर्थानं नतमस्तक होऊ पाहताहेत...

  • संजय पवार
  • Sat , 15 December 2018
  • 2 Comments
  • 4 Like

ब्राह्मण परिषद : वृत्तवाहिनीची घिसाडघाई, उघडा डोळे, बघा नीट!

शेवटी आरक्षण नाही, तर आर्थिक मदत द्या. आणि आता वाटलं तर आरक्षणही आपण घ्यावं, असा जवळपास ठरावच या परिषदेत झाला! यूट्युबवर ही चर्चा अवश्य पहा. वर्णवर्चस्ववादी मानसिकतेचा ताठा, लग्न जमत नाही, दक्षिणा कमी मिळते अशा व्यथा आणि आपणच कसं आपलं संचित सांभाळत नाही वगैरे मुक्ताफळं ऐकण्यासारखी आहेत...

  • संजय पवार
  • Wed , 05 December 2018
  • 7 Comments
  • 6 Like

लोकांचे मित्र, लोकांना देताहेत मित्रत्वाचा सल्ला – ‘भाजप हटाओ, देश बचाओ’

येत्या दोन डिसेंबरला ‘लोकांचे मित्र’ लोकांना मित्रत्वाचा सल्ला देणार आहेत – ‘भाजप भगाओ, देश बचाओ’! आता हे ‘लोकांचे मित्र’ काय करतात? तर संसदीय लोकशाही, संविधान, सर्व प्रकारची समानता, विज्ञाननिष्ठा इ. गोष्टींची प्राथमिकता मान्य करत या अनुषंगानं ‘नागरिक’ म्हणून जगण्याचं, आचारविचाराचं स्वातंत्र्य आहे, त्याची जाणीव करून देतात...

  • संजय पवार
  • Tue , 27 November 2018
  • 2 Comments
  • 8 Like

‘लोकपाल’वाले, मेणबत्तीवाले, तिरंगेवाले, सिटीझन चार्टरवाले कुठल्या बिळात जाऊन बसलेत?

२० नोव्हेंबरचा ‘लोकसत्ता’ आणि एनडीटीव्ही ‘प्राईम टाईम’ यांनीच ही बातमी तपशीलात छापलीय. बाकी मराठी वृत्तवाहिन्या मराठा, धनगर आरक्षण आणि अजगरानं सात कोंबड्या गिळल्या किंवा अवनीच्या बछड्यांनी घोड्याची शिकार केली व त्याहीपेक्षा महत्त्वाच्या दीपवीर लग्नाचे फोटो, दृश्य मिळवण्यासाठी तममगत होत्या...

  • संजय पवार
  • Wed , 21 November 2018
  • 1 Comments
  • 4 Like

राममंदिरासाठी आरोळ्या मारणाऱ्यांना स्त्रियांनी विचारलं पाहिजे- मंदिर बांधताय? बांधा. पण शबरीमालात बरोबर घेऊन चला

सत्तांतराचा खेळ, आता पुन्हा मतदानाच्या जवळ येत चाललाय, तसा विकास मागे सारत धर्माचा उग्र चेहरा पुढे येऊ लागलाय. फलकबाजीत चार वर्षं निघून गेली. आता पाच वर्षांचा ताळेबंद मांडताना ना ‘अच्छे दिन’ म्हणता येताहेत, ना ‘सबका साथ, सबका विकास’. त्यामुळे हुकूमाच्या पानासारखी मंदिर निर्माणाची घोषणा काढली गेलीय. वातावरण तापवलं जातंय. शहरांची नावं बदलली जाताहेत...

  • संजय पवार
  • Fri , 16 November 2018
  • 1 Comments
  • 3 Like

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस : खट्टा आणि मिठा!

मोदींप्रमाणेच फडणवीस हेही स्वयंसेवक आहेत. त्यामुळे त्या विचारांचा अजेंडा त्यांनी सनातनच्या अटका, त्याला अर्बन नक्षलींचा उतारा आणि एकबोटेंना शोधून काढताना संभाजी भिडेंना राजाश्रय, या गोष्टी चलाखीने केल्या. त्याचप्रमाणे सदाभाऊंना आपल्या घरात घेताना खानदेशात महाजनांना प्रस्थापित करत खडसेंचं विस्थापन अधिक गडद केलं. मोदींकडे ल्यूटन्स जेटली आहेत, तर फडणवीसांकडे कोल्हापुरी चंद्रकांतदादा!...

  • संजय पवार
  • Mon , 05 November 2018
  • 1 Comments
  • 7 Like

कविता ‘शिकविण्यापेक्षा’, तिचं ‘राजकारण’ का होतंय?

मराठीला विद्यार्थी मिळत नसताना महाविद्यालयंच काय, विद्यापीठातील मराठीचे वर्ग बंद पडायच्या मार्गावर असताना ‘साहित्य’ साहित्यबाह्य कारणांनी बाद करून आपलं राजकारण तापवू पाहणाऱ्यांना विद्यार्थी शरण जातात हे समजू शकतो, पण शिकवणारे प्राध्यापकही त्यात सहभागी व्हावेत? विद्यापीठ यांना पगार ‘शिकवण्यासाठी’ देते की, अंतर्गत ‘राजकारण’ करण्यासाठी?...

  • संजय पवार
  • Tue , 09 October 2018
  • 1 Comments
  • 4 Like

वसंत गुर्जरानंतर ‘मला(ही) भेटले गांधीजी’!

शेवटी एका ठिकाणी टेकत म्हणाले, येत्या वर्षभरात मी लिहिलेलं पाठ्यक्रमात बदल न करता आणून दाखवावं यांनी. राष्ट्रपिता म्हणे! निरोपाच्या वेळी विचारलं, आता कुठे जाणार? पापणी लवायच्या आत म्हणाले, पाकिस्तानात! माझ्या विचारांना तिकडेच जा म्हणतात ना हल्ली! असं म्हणून झपाझपा ते दिसेनासे झाले...

  • संजय पवार
  • Wed , 03 October 2018
  • 10 Comments
  • 4 Like

ते सगळे ‘लोक’ गेले कुठे?

हेच सर्व २०१३-१४मध्ये जे गळे काढत होते, भगवी उपरणी घालून बैलगाड्या चालवत होते. रस्त्यावर फतकल मारून दगडाच्या चुलींवर भाकरी थापत होते. रेल्वे फलाटांची उंची मोजत होते. गुंतवणूकदारांना टोपी लावणाऱ्यांसाठी गळ्याच्या शिरा ताणत होते. मेट्रोचं भाडं वाढलं तर रूळावर झोपत होते. घोटाळेबाजांसाठी तुरुंगाच्या तारखा सांगत होते...

  • संजय पवार
  • Wed , 26 September 2018
  • 3 Comments
  • 8 Like

साहित्य व्यवहारातला उपेक्षित कावळा : निमित्त : ‘बलुतं’ची चाळिशी

‘बलुतं’च्या मुखपृष्ठाची कहाणी नंतर कधीतरी ऐकली, वाचली. कुठे ते आणि केव्हा ते आठवत नाही. मुखपृष्ठ कृष्णधवल करण्यात आर्थिक विचार होता की, ‘स्मृति’ म्हणून त्या कृष्णधवल ठेवल्या हे सर, गांगल आणि दया पवारांनाच माहीत. या दुसऱ्या आवृत्तीच्या चित्रातला कावळा त्यांनी ज्या पद्धतीनं चितारलाय, तो खास षांताराम टच. पण या त्रिकुटानं अजरामर मुखपृष्ठाची भर मराठी पुस्तकविश्वात घातली हे मात्र नक्की...

  • संजय पवार
  • Tue , 18 September 2018
  • 1 Comments
  • 1 Like

भाजप सरकारला चार वर्षांतच ‘स्मृतिभ्रंश’ जडलाय?

माध्यमांना अंकित करून किंवा मालकांना धाकदपटशा दाखवून काही काळ ईप्सित साध्य करता येईल. पण मोदी सरकारनं लक्षात ठेवावं की, अख्ख्या देशाचा तुरुंग केलेल्या इंदिरा गांधींनाही लोकांनी घरी बसवलं होतं. जगाचा इतिहास आहे की, सर्वशक्तिमान वाटणारा हुकूमशहा कायम मनातून धास्तावलेला भेकड असतो. त्यामुळे तो संवादाला, चर्चेला घाबरतो...

  • संजय पवार
  • Wed , 12 September 2018
  • 1 Comments
  • 8 Like

स्वरा भास्कर, अरुंधती रॉय, नंदिता दास, शबानासह अनेक जणी...

स्वरा भास्कर, अरुंधती रॉय, नंदिता दास, शबाना आझमी आणि त्यांच्यासारख्या अनेक जणी केवळ राजकीय शेरेबाजी करत नाहीत. त्या व्यवस्था, मानवाधिकार, विषमता, भेदभाव यावर प्रामाणिक व अभ्यासूपणे बोलतात. त्या प्रागतिक विचारांच्या सहप्रवासी आहेत. बुद्धिवादी स्त्रियांना, कलावंतांना राखी सावतंच्या जोडीला बसवून काय साधताहेत सवंग टीकाकार?...

  • संजय पवार
  • Tue , 04 September 2018
  • 3 Comments
  • 8 Like

दोन्ही काँग्रेस, भाजप आणि काही ‘सनातन’ प्रश्न

इतर हिंदुत्ववादी गट, संघटना यांना यातून काय संदेश जातो? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच या देशातला हिंदुत्वाचा चेहरा आहे. संघाचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक काम हे संविधानाच्या चौकटीत समरसतेतून ‘हिदू राष्ट्र’ तयार करण्याचं आहे. संघ हा फक्त प्रेरकाचं काम करतो. हिंदुत्वासाठी तुम्ही रचनात्मक सामजिक काम करा, सांस्कृतिक कामातून ‘बलसागर भारत’ मोहीम पुढे न्या...

  • संजय पवार
  • Wed , 29 August 2018
  • 0 Comments
  • 3 Like

अशांततेचा अजगरी विळखा

पूर्वी काश्मीर किंवा ईशान्य भारतात अशांतता असे. पण आता संपूर्ण देशभरच विविध प्रकारची अशांतता भरून आहे. अराजकपूर्व परिस्थितीचीही लक्षणे आहेत. पण पुढच्या निवडणुकीचा हंगाम नजरेत ठेवून राजकीय पक्ष, माध्यमं आणि तथाकथित समाजगट शांत आहेत. नुरा कुस्त्यांचे आखाडे भरपूर गर्दीत चालू आहेत. पण मांडीवरची खरी थाप उत्तम ‘बोली’सह विकली गेलीय!...

  • संजय पवार
  • Sat , 25 August 2018
  • 1 Comments
  • 4 Like

पवार सरांचे ‘असणे’ आणि ‘नसणे’

‘मुझको मेरे बाद जमाना ढुढेंगा’ अशी करुणाही ते कधी भाकत नसत. या धिप्पाड देहाला विसंगत असे दोन भाग त्यांच्यात होते. अत्यंत मृदु आवाज आणि निष्कपट मन! वयानं मोठ्या झालेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना वयानं वाढणारे सर म्हणजे ‘लहान मूल’च वाटे. सर मोठ्यानं ओरडले असते तरी त्यांचा आवाज दोन-तीन डेसिबलच्या वर गेला नसता...

  • संजय पवार
  • Sat , 18 August 2018
  • 0 Comments
  • 2 Like

नवी ‘बहुपडदा’ संस्कृती आणि मनसे

मनसेचिसेनं उलट मागणी अशी केली पाहिजे, चित्रपटगृहात आत खानपान सेवा बंद, पाण्याव्यतिरिक्त इतर काही नाही नेता येणार. स्वच्छ व मोफत पाण्याची सोय असावी. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मोबाईल जॅमर बसवायला हवेत. सिनेमा बघण्यासाठी लागणारी एकाग्रता या तिन्ही गोष्टी (खानपान, मोबाईल, आपसांत बोलणं इ.) भंग करतात. मनसेचिसेनं चित्रपट कसा बघावा हे शिकवावं...

  • संजय पवार
  • Wed , 08 August 2018
  • 2 Comments
  • 4 Like

या रे या सारे या! लवकर, भरभर सारे या!

मराठा समाज आरक्षण आंदोलन ना आता सरकारच्या आटोक्यात येतंय, ना आंदोलनाच्या नेतृत्वाच्या. सरकार शेवटी पोलिसी बळ वापरून आणि खटले भरून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुव्यवस्थेवर बोट ठेवून करेल. त्यातून आणखी हिंसा भडकेल, जी आंदोलन नेतृत्वालाही जुमानणार नाही. या अराजक सदृश्य परिस्थितीतून सरकार बाहेर पडेल, भरडलं जाईल. सामान्य जनता आणि आंदोलकही सहानुभूती गमावून बसतील...

  • संजय पवार
  • Wed , 01 August 2018
  • 0 Comments
  • 8 Like

देशातील प्रादेशिक पक्ष आणि शिवसेना!

आपला पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नसून प्रादेशिक पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्ष प्रादेशिक अस्मितेवरच टिकू शकतात, सत्ता मिळवू शकतात, हे शिवसेनेला ज्या दिवशी कळेल आणि हिंदुत्वाच्या घोड्यावरून उतरून शिवरायांच्या हिंदवी रयतेच्या राजाची संकल्पना हाडीमासी भिनवेल, तेव्हाच ती शिवसेना म्हणून टिकेल, उरेल. अन्यथा आजसारखी भाजपच्या अन्नछत्रात पत्रावळ घेऊन ‘मर्दा’सारखे अभिनय करत उभे राहायचे!...

  • संजय पवार
  • Tue , 24 July 2018
  • 3 Comments
  • 3 Like

मंगेश जोशीचा ‘लेथ जोशी’ एखाद्या कवितेसारखा अनुभव देतो!

मंगेश जोशीच्या ‘लेथ जोशी’नं एकाच चित्रपटातून अनेक गोष्टी शिकण्याची संधी दिलीय. त्यातली सर्वांत महत्त्वाची म्हणजे भावनातिरेक टाळून रेल्वे ज्या लीलया रूळ बदलते, त्या पद्धतीनं तो समाज बदल दाखवतो, तोही तटस्थपणे. ‘संजू’वर तुटून पडणाऱ्या व ‘झिंगाट’वर थिरकणाऱ्या कोलाहलात ‘लेथ जोशी’ एखाद्या कवितेसारखा अनुभव देतो. म्हणून तो पाहायला(च) हवा...

  • संजय पवार
  • Tue , 17 July 2018
  • 2 Comments
  • 2 Like

आता तरी मुंबईचं ‘ऑडिट’ होईल का?

सत्ता जर राजकारण करून मिळते, तर सत्तेतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे राजकीय नजरेतून, धोरणातूनच पाहायला हवं. म्हणजे एखादी बरी\वाईट घटना घडते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही राजकारणी तिथं जातात. या जाण्यातच त्यांचं त्यांचं राजकारण असतं आणि संसदीय लोकशाहीत ते अपरिहार्य आहे. तेव्हा ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं? अगदी जीवित हानी झाली असेल तरीही त्याकडे राजकीय भूमिकेतूनच पाहायला हवं...

  • संजय पवार
  • Wed , 11 July 2018
  • 0 Comments
  • 3 Like

या राज्यात पोलीस दल आहे?

महिना-दोन महिन्यांपूर्वी पोलीस दलात अनेक बदल्या केल्या गेल्या, नियमानुसार. म्हणजे राज्यात पोलीस दल असावं. त्यात नियुक्त्या होताहेत, पण त्या दलाचं, खात्याचं जे अस्तित्व दिसायला हवं ते मात्र कुठेच दिसत नाही. मात्र त्याच वेळी काही ठिकाणची त्यांची कार्यतत्परता पाहून वाटतं की, हे कंत्राटी कामगार आहेत का?...

  • संजय पवार
  • Tue , 03 July 2018
  • 0 Comments
  • 2 Like

प्लॅस्टिक बंदीवरची ‘इलॅस्टिक’ (म्हणजे ताणलेली) चर्चा

एखाद्या गोष्टीवर बंदी आली की, या देशात, त्याचा धाक न वाटता लगेच त्याच्या चोरवाटा तयार करण्याचं काम सुरू होतं. या बंदीची अमलबजावणी ज्या खात्यांर्गत, कर्मचारी यांच्याकडे जाते, त्यांच्या चिरीमिरीचं नवीन दालन उघडतं. त्यात मग अन्न, औषध, प्रशासन, शॉप अॅक्टपासून आरोग्य, स्वच्छता खात्यासह पोलिस यांचेही वाटे ठरवले जातात. याशिवाय या बंदीचं वैशिष्ट्य असं असतं की, ती नोटबंदीसारखी कधीच देशभर लागू होत नाही!...

  • संजय पवार
  • Thu , 28 June 2018
  • 0 Comments
  • 4 Like

नव्या कार्यकारिणीचा ‘नाट्य संमेलनाचा सुविहित प्रयोग’

उद्धव ठाकरे हे काही राज ठाकरेंसारखे सिनेमा\नाटकवाल्यांचे ‘डार्लिंग’ नाहीत. किंबहुना या मंडळींपासून ते चार हात लांब राहतानाच दिसतात. बा‌ळासाहेबांचा हा वारसा त्यांनी राज यांना टाळी न मागता\देता देऊन टाकलाय. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आठवणींचे दालन उद्धव ठाकरेंनी उभारलेले आहेच. त्यामुळे हा प्रकल्प ते पूर्ण करतील. परिषदेची नवी यंग ब्रिगेड त्यांना उत्साही साथ देईलच...

  • संजय पवार
  • Tue , 19 June 2018
  • 0 Comments
  • 3 Like

माओ, भिडे, पगडी आणि भेटीगाठी

इसिस, लष्कर-ए-तोयबा, तालिबानी, सिमी वगैरे लोकांनी हात न घातलेल्या भारतीय प्रधानसेवक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याचा कट करणारे हे माओवादी कम नक्षलवादी आहेत तरी कोण? आजच्या सत्ताधाऱ्यांचा आणि त्याला संलग्न संघटनांचा मुख्य शत्रू मुसलमान आणि पाकिस्तान. त्यांच्यात जी धमक अथवा राग दिसला नाही, ती यांच्यात कुठून आली? माओवादी कम नक्षलवादी हिंदूविरोधी आहेत? ...

  • संजय पवार
  • Thu , 14 June 2018
  • 4 Comments
  • 5 Like

‘बिस्लेरी’ ते ‘ऑक्सिजन पार्लर’

आज, ५ जून. पर्यावरण दिन. सध्याच्या जाहिरातबाज सरकारला धुमधडाक्यात साजरा करायला आणखी एक निमित्त! हल्ली पर्यावरण म्हटलं की, जल, जंगल, जमीन याचीच चर्चा होते. आजच्या पर्यावरण दिवसाच्या पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग आणि नाणार प्रकल्पाबाबत सरकार भूमिका स्पष्ट करेल? खरं तर या सर्व प्रश्नांवर कुठलाच राजकीय पक्ष प्रामाणिक नाही. ते फक्त सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष आहेत. जनताभिमुख कुणी नाही...

  • संजय पवार
  • Tue , 05 June 2018
  • 3 Comments
  • 4 Like

देवेंद्र फडणवीसांचा ‘शहा’जोग सल्लावजा ‘आदेश’!

पालघरला मुख्यमंत्र्यांची जी काही ‘वाणी’ किंवा ‘मन की बात’ व्हायरल झालीय, ती भाषा केंद्रातल्या मोदी-शहा जोडगोळीची देन आहे. सामदामदंडभेद हीच मोदी-शहा यांची विजयनीती आहे. जोडीला सोशल मीडियावरचा उन्माद, थैलीशहांचा अविरत पुरवठा आणि कायदा सुव्यवस्थेला कुणाही सत्ताधाऱ्याप्रमाणे बटिक बनवायचं. या अत्यंत खूनशी राजकारणाला वा नीतीला ‘कुटनीती’, ‘चाणक्य नीती’ म्हणून लेबलं लावायची...

  • संजय पवार
  • Tue , 29 May 2018
  • 2 Comments
  • 4 Like

घोडे की दूम पे जो मारा हथौडा…

राजभवन म्हणालं, ‘असो. तसंही या वयात तुम्हाला दगदगच झाली असती आप्पा. ठणका कमी व्हायचा असेल तर तुम्हीही कुणासाठी तरी राजीनामा द्या आणि हे असं राजभवन जवळ करा! इथं ना कसली दगदग, ना ददात. पुन्हा शपथ घेणारा होण्यापेक्षा शपथ देणारा हा मान मोठा. तो वेगळाच.’ आप्पांनी उपरण्यानं तोंड पुसत ‘काफी’ म्हटलं. राजभवन चमकून म्हणालं, ‘आप्पा, जिंकायचं तर ‘काफी’ सोडा नि ‘जिलेबी-फाफडा’ची सवय करा. त्यानं म्हणे सर्व जखमा लवकर भरतात!’...

  • संजय पवार
  • Tue , 22 May 2018
  • 0 Comments
  • 1 Like

विजयाचं मशीन आणि विरोधक

भाजप असा निवडणुका जिंकण्याचं बूथ स्तरापासून नियोजन करत असताना काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांची संघटनात्मक बांधणी ही रामभरोसे आहे. अमेरिकेचा अध्यक्ष कोण असावा यासाठी रशियन अध्यक्ष सक्रिय होण्याच्या हा काळ आहे. या नव्या काळाची कृष्णनीती भाजप कोळून पितेय आणि विजय मिळवतेय. त्याकडे दुर्लक्ष करून साम, दाम, दंड, भेद नि मशीनवर अपयश ढकलणं म्हणजे साप सोडून भुई धोपटणं...

  • संजय पवार
  • Wed , 16 May 2018
  • 0 Comments
  • 3 Like

कल्पना दारिद्रयाचे सोहळे आणि वाहिन्यांची नफेखोरी

नवा मराठी सिनेमा आशय, विषय, सादरीकरणात वेगळ्याच पातळीवर जाताना, हे असं कल्पना दारिद्रय दाखवणारे व अंतिमत: वाहिन्यांचं उखळ पांढरं करणारे सोहळे हवेत कशाला? त्यापेक्षा वाहिन्यांनी प्रक्षेपण हक्क विकत घेताना जी मुजोरी दाखवली जाते, ती कमी करून मराठी निर्मात्याला सन्मानानं वागवावं आणि त्याच्या कलाकृतीला योग्य ते मोल द्यावं...

  • संजय पवार
  • Tue , 08 May 2018
  • 2 Comments
  • 4 Like

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?, पार्ट – २

मुख्यमंत्र्यांच्या आसनासह सरकार स्थिर आहे, कारण राजकीय सोंगट्या मुख्यमंत्री नीट हलवताहेत. पण हे सर्व ज्या जमिनीवर चाललंय, त्या जमिनीखाली कित्येक सुरूंग आहेत. त्याची जाणीव महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतरच भाजप ठेवेल ही आशा. अन्यथा जनताच सिक्वेल पूर्ण करेल!...

  • संजय पवार
  • Wed , 02 May 2018
  • 1 Comments
  • 1 Like

माफ करा, न्या. लोया, तुम्ही नेताजी सुभाषचंद्र नाही!

सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोयांना न्याय दिलाच नाही. उलट असं वाटतंय, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी केलेल्या बोभाट्याचा विंचू या पावण्यांच्या काठीनं मारला. न्यायव्यवस्थेच्या मानसन्मानाची बाब ठणकावून सांगताना सर्वोच्च न्यायालयासह, सत्ताधारी पक्षही हे विसरला की, तक्रार एका न्यायाधीशाच्या आकस्मिक मृत्यूचीच आहे. न्यायालयानं न्या. लोयांच्या मृत्यूचं प्रतीकस्वत:साठीच वापरलं!...

  • संजय पवार
  • Sat , 28 April 2018
  • 3 Comments
  • 5 Like

बांगड्यांचा अपमान का करता नामर्दांनो!

प्रतीकं आणि मिथकं यातून बाहेर पडत थोडं उच्चरवानं सांगायला हवं की, बांगड्यांचा अहेर तथाकथित मर्दांना पाठवू नका. आम्हाला बांगड्यांचं ओझं नाही की, ते तेवढंच आमचं स्त्रीधन नाही. आता सती पेटणार नाहीत, तशी बांगडीही फुटणार नाही की, कुंकू पुसलं जाणार नाही. आता सौभाग्यलेणी, स्त्रीधन अडगळीत ठेवतोय आम्ही. स्वसन्मान, आत्मनिर्भर आणि जीवशास्त्रापलीकडला स्वलिंगभाव हे आमचं नवं निशाण आहे...

  • संजय पवार
  • Tue , 17 April 2018
  • 5 Comments
  • 10 Like

अंदाज अपना अपना

‘अंदाज अपना अपना’ आमचा म्हणाला ‘उद्या भाईला जामीन मिळणार!’ कसं काय बुवा? तर आमच्या मते वृत्तवाहिन्यांनी मेळाव्याच्या यशस्वीतेवर मोहर उमटवण्याऐवजी वाहतूक कोंडी, प्राण्यांच्या उपमा नि सेनेबद्दल नरमाई हेच विषय बनवले संध्याकाळपासून! वर लालभाई, मराठा मोर्चाशी तुलना! आता ही चर्चा तोडायची तर उद्या भाईजान बाहेर यायला हवा आणि कॅमेरे बांद्रा पूर्ववरून पुन्हा बांद्रा पश्चिमला जायला हवेत...

  • संजय पवार
  • Wed , 11 April 2018
  • 2 Comments
  • 5 Like

कदाचित संपूर्ण जग हेच एक संघशाखा आहे, असंही पुराव्यानिशी सिद्ध होईल!

आता अचानक हुतात्मा राजगुरू स्वयंसेवक होते याचे पुरावे बाहेर आलेत. संघाला हे कळायला २०१८ साल का उजाडावं लागलं? २०१९ जवळ आलं म्हणून? स्विस बँकेकडून जसा आपण खातेदारांच्या यादीसाठी पाठपुरावा करतो, तसा संघाकडून एकदाच गुप्त स्वयंसेवकांची यादी मागवावी. कदाचित संपूर्ण जग हेच एक संघशाखा आहे असंही पुराव्यानिशी सिद्ध होईल. ट्रम्प, पुतीन, मोदी काळात असं घडल तर आश्चर्य वाटायला नको. जमाना डेटा लिकचा आहे...

  • संजय पवार
  • Wed , 04 April 2018
  • 3 Comments
  • 4 Like

उंदरांनी (जी इभ्रत) नेली, ती गोळ्यांनी (खुलासा केल्यानं) परत येईल?

मंत्रालयात जर इतके उंदीर असतील तर मग ‘स्वच्छ भारत’, ‘डिजिटल भारत’, ‘मिनिमम गव्हर्नन्स’, ‘पेपरलेस वर्किंग’ या सगळ्याचं काय झालं? का आता उंदीर हे विद्येच्या देवतेचं वाहन असल्यानं आणि मंत्रालयात ते मोठ्या संख्येनं आढळल्यानं तिथं विद्येच्या देवतेचा अष्टौप्रहर वावर आहे असं समजायचं? आणि मंत्रालयाच्या तळमजल्यावर नंदीप्रमाणे उंदराची प्रतिष्ठापना करणार हे सरकार? ...

  • संजय पवार
  • Wed , 28 March 2018
  • 4 Comments
  • 1 Like

उपहासाचा विषय असलेले पप्पू राहुल गांधी गरजतात आणि बाजूला पडलेले राज ठाकरे पुन्हा केंद्रस्थानी येतात, हेसुद्धा काय कमी आहे?

काल-परवापर्यंत भाजपसाठी उपहास, टिंगल आणि हेटाळणीचा विषय असलेले पप्पू राहुल गांधी गरजतात आणि बाजूला पडलेले राज ठाकरे पुन्हा केंद्रस्थानी येतात, हेसुद्धा काय कमी आहे? यंदाच्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, केंद्र व राज्यातील भाजपच्या हिंदुत्ववादी सरकारसाठी मसाला दुधात काळ मीठ पडावं तसा गेला! राहुल गांधींनी, तर रात्री राज ठाकरेंनी मोदी, मोदी सरकार आणि भाजप यांना नेम धरून धरून लक्ष्य केलं...

  • संजय पवार
  • Wed , 21 March 2018
  • 3 Comments
  • 2 Like

लाल तारा : पूर्वेकडून अस्त आणि पश्चिमेकडून उदय

या लाल वादळानं राजकीय वातावरण आणि चर्चाच फिरवली नाही तर ईशान्येतल्या विजयानंतर संघाच्या बैठकीला आलेलं अनन्यसाधारण माध्यम महत्त्व उडवून लावलं. भैय्याजी जोशींच्या पत्रकार परिषदेसह बैठकीचं शेवटचं सत्र गिळून टाकलं. इतकंच नव्हे तर ईशान्यतले नवे विक्रमादित्य सुनील देवधर यांची पुणे पत्रकार परिषदेनं ठेवलेली मुलाखतही अडगळीत टाकली...

  • संजय पवार
  • Wed , 14 March 2018
  • 7 Comments
  • 3 Like

श्रीदेवी, अश्विनी आणि आणखी कुणीही…

श्रीदेवी काय किंवा अश्विनी काय, वाहिन्यांनी त्यांच्या खाजगीपणाचा सन्मान करावा किंवा त्याचा वाईट पद्धतीनं बभ्रा होणार नाही याची काळजी घ्यायला काय हरकत होती? कुठल्याही व्यवसायात नफ्याचं लोणी हे अंतिम ध्येय असणार, असायला हरकत नाही. पण मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी ओरपणं हे अधम व्यवसायातच लागू होतं...

  • संजय पवार
  • Tue , 06 March 2018
  • 1 Comments
  • 4 Like

भेकड, दांभिक व पराभूतांची भाषा

जी भाषा आम्हीच आमच्या जीवनातून वगळत आलोय; तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला काय नि नाही मिळाला काय, सारखंच! भाषा आणि मराठी संस्कृती याबाबत आपण सगळेच भेकड, दांभिक व पराभूत मानसिकतेत आहोत, हे एकदा आरशासमोर कबूल करूया. तेवढं केलं तरी या भाषेसाठी काहीतरी प्रामाणिकपणे केल्याचं समाधान आपल्याला मिळेल...

  • संजय पवार
  • Wed , 28 February 2018
  • 5 Comments
  • 5 Like

…तुला शिकवीन चांगलाच धडा

आज पूर्व पाकिस्तानातून येणारे बांगलादेशी लोंढे आपल्याला तापदायक ठरलेत. एरवीही युपी, बिहार, आंध्र ही मुस्लीमबहुल राज्यं, काही शहरं आपल्याला ‘पाकिस्तान’ वाटतात. उद्या अख्खा पाकिस्तानच भारताचा भाग झाला तर तो काय फक्त जमिनीचा तुकडा नसणार! त्यावरच्या माणसांसह येणाऱ्या वृत्ती-प्रवृत्तींना तेव्हा धडा शिकवणार का, त्यांना पाठीशी घालणाऱ्या अमेरिका-चीनला?...

  • संजय पवार
  • Mon , 26 February 2018
  • 1 Comments
  • 1 Like

माध्यमांनी केला लक्ष्मीकांत देशमुखांचा ‘एन्काऊंटर’!

‘राजा तू चूकत आहेस, हे सांगितलं पाहिजे’ हे देशमुखांनी त्या व्यासपीठावरून, तेही बडोद्यात म्हणणं याला निश्चितच महत्त्व होतं, पण अपवाद वगळता बहुसंख्य माध्यमांनी देशमुखांच्या भाषणाची दखल जुजबी, आतील पानांत वगैरे घेतली. त्यांचं भाषण छापण्याची तसदी तर किरकोळीत घेतली गेली. एकूणात सर्व माध्यमांनी देशमुखांचं भाषण, त्यातील मुद्यांसकट जवळपास कचर्‍यात टाकलं...

  • संजय पवार
  • Mon , 26 February 2018
  • 3 Comments
  • 3 Like

सुनील कर्णिक : आपला ‘बुकमॅन’

सुनील कर्णिकांची शोधक नजर जशी सुशोभित बागेवर असते, त्याहून अधिक ती बागेबाहेरच्या कचराकुंडीवर असते. समाजानं टाकून दिलेले, दुर्लक्षिलेले, कमअस्सल मानून भिरकावलेले विषय, लेखन, लेखक, प्रकाशक, विक्रेत, वाचक कर्णिक वेचून घेतात आणि आपल्यासमोर तो बोळा अशा पद्धतीनं उचकून, उलगडून सरळ करून मांडतात की, आपल्याला आपल्यासकट आपल्या तथाकथित समाजाची लाज वाटावी!...

  • संजय पवार
  • Tue , 13 February 2018
  • 1 Comments
  • 4 Like

मरणाच्या ‘सुलभ’ वाटा

विकासाच्या प्रचंड मोठ्या दळणवळणात मनुष्य जीव कवडीमोल ठरलाय. तो ट्रेनमध्ये गुदमरून मरतो, दरवाज्यात लटकताना पडून मरतो, रूळ ओलांडताना मरतो, पुलावर मरतो, जिन्यात घसरून-तुंबलेल्या पाण्यात-गटारात पडून मरतो, गाडीसकट जळून-बुडून मरतो, धडकेनं मरतो, समूहानं मरतो, एकटा सायकलीवरून मरतो.नव्या जीवनशैलीत प्रत्येक गोष्टीला प्राईस टॅग आहे. तुमच्या अकाली, अपघाती मरणाला सोडून...

  • संजय पवार
  • Tue , 30 January 2018
  • 1 Comments
  • 6 Like

डार्विन, डार्विन काय म्हंतोस?

आता आम्हाला सांगा डॉ. सत्यपाल यांच्यासारख्यांना ही जी दिव्य व दूरदृष्टी प्राप्त झालीय, ती वेदांपासून की माकडापासून? बहुधा तो डार्विन हा मनुष्यप्राणी नसून एक मर्कटच असावा साक्षात! त्याला मनुष्यजन्माचं स्वप्न पडलं असावं. आणि खात्रीनं सांगतो, त्या दिवशी होलिकोत्सव असणार आणि त्यानं भांग प्यायली असणार! आता भांगेला तुम्ही आद्य ड्रग मानायलाच तयार नसाल तर चर्चाच थांबली!...

  • संजय पवार
  • Tue , 23 January 2018
  • 6 Comments
  • 9 Like

यह ‘अंदर’ की बात है…

आश्चर्यकारकरित्या या भूकंपानं अजिबात विचलित न होता मोदी सरकारनं ‘ये अंदर की बात हैं’ म्हणून सपशेल हात झटकले. त्यामुळे या बंडाची वात पूर्ण स्फोट होण्याआधीच विझली. आता तर सारवासारव, डॅमेज कंट्रोल करण्याची वेळ व्यथित चौघांवर आली आहे. सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांचं अनुकरण करत दखलच घेतली नाही. (किंवा मोदी धक्कातंत्राप्रमाणे ते भविष्यात याची परतफेड करतीलही!)...

  • संजय पवार
  • Tue , 16 January 2018
  • 1 Comments
  • 2 Like

भीमा कोरेगाव आणि वृत्तवाहिन्यांची ‘गुरु’दक्षिणा

शोधपत्रकारितेच्या, पत्रकारांच्या संरक्षणासाठी आवाज उठवू इच्छिणाऱ्या या वाहिनीसह ‘गुरुग्रस्त’ वाहिन्यांना आमची एक सूचना अथवा गृहपाठ, स्वाध्याय अथवा आव्हान. त्यांनी शोध पत्रकारितेचा वसा घेऊन खालील गोष्टींची शोध घ्यावा. १) संभाजी भिडे आणि मनोहर भिडे या दोन व्यक्ती की एकच? २) गणपत महार, गणोजी शिर्के यांपैकी संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार नेमका कोणी केला? ३) शिर्के आडनावच पुढे शिवले कधीपासून झालं?...

  • संजय पवार
  • Wed , 10 January 2018
  • 6 Comments
  • 11 Like

तमाशा ऑफ ह्युमॅनिटी

या शहरात किड्या-मुंग्यांसारखी माणसं रोज मरत असतात. मरणारांच्या सामाजिक दर्जानुसार रुदाली भाव ठरवतात आणि त्याप्रमाणात गळे काढतात. ‘ह्युमॅनिटी’चाही वेगळा शेअर बाजार या नव्या सरकारच्या काळात जन्माला आलाय आणि तिथंही ठराविक भांडवलदार, गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण ही प्राथमिक जबाबदारी समजली जाते. अशा काळात खऱ्या ‘ह्युमॅनिटी’चा ‘तमाशा’ होणारच!...

  • संजय पवार
  • Tue , 02 January 2018
  • 1 Comments
  • 3 Like

२०१७ : बेस्ट ऑफ ‘कळ’फलक (संजय पवार)

प्रसिद्ध नाटककार, स्तंभलेखक संजय पवार यांचं ‘अक्षरनामा’वरील ‘‘कळ’फलक’ हे बंद्या रुपयासारखं खणखणीत साप्ताहिक सदर. वर्षभरात या सदरात प्रकाशित झालेल्या लेखांपैकी काही उत्तम अशा लेखांची ही झलक. त्यातून वर्षभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरही प्रकाश पडतो... आणि त्यांवरचं संजय पवार यांचं मर्मभेदक भाष्यही जाणून घेता येतं...

  • टीम अक्षरनामा
  • Tue , 26 December 2017
  • 0 Comments
  • 1 Like

मराठी रामदेवबाबा!

भारतातील एक योद्धा व द्रष्टा शेतकरी नेता म्हणून ओळखल्या गेलेल्या शरद जोशींचा भाकड गायींचा सिद्धान्त किंवा मागणी खोटी ठरवून उलट त्याच्या उत्पन्नाचा पुरावा देणारा हा फॉर्म्युला एव्हान देशभर सोडा, राज्यभर कसा नाही प्रसिद्ध पावला? आजही शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणाऱ्या परमेश्वर यांनी राजू शेट्टी, पाशा पटेल, विजय जावंधिया, सदाभाऊ खोत यांना आपल्या शेतावर बोलावलं का नाही?...

  • संजय पवार
  • Tue , 26 December 2017
  • 2 Comments
  • 2 Like

गड खचला… सिंह दमला!...

अखंड भारतात कुणीही हा प्रश्न विचारला नाही की, ‘नीच प्रवृत्ती’ आणि ‘नीची जात’ यांचा परस्परसंबंध काय? खालच्या प्रतीचा आणि खालच्या जातीचा हे दोन वेगळे, स्वतंत्र विशेष आहेत. एखादा ‘नीट प्रवृत्ती’चा हा ‘नीच जाती’चा ठरत नाही. उच्चजातीयही ‘नीच’ असू शकतो! पण अय्यरांना भाषा व व्याकरण शिकवणारे सगळे मोदींना ‘भाषाकोविद’ ठरवून मोकळे झाले! ...

  • संजय पवार
  • Wed , 20 December 2017
  • 1 Comments
  • 1 Like

गिनती चालू हो गयी?

थोडक्यात काँग्रेसला जे नेहरू-गांधी घराण्याबद्दल वाटतं, तेच भाजपला मोदींबद्दल वाटतंय! जिंकून देताहेत ना मग करा नमन! आता मोदी आणि राहुल गांधी वेगळ्या अर्थानं एकाच रेषेवर उभे आहेत. जिंकून देण्याची क्षमता! जगात तुम्ही काहीही विकत घेऊ शकता. पण सामान्य माणसाचा मताधिकार विकत घेण्याइतकं श्रीमंत कुणीच असू शकत नाही. काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळताना भाजपसाठी या पुढच्या हाका आहेत...

  • संजय पवार
  • Tue , 12 December 2017
  • 0 Comments
  • 5 Like

छकुली आणि मी

छकुलीशी काहीही संबंध नसताना, पार कोर्टात जाऊन निकाल ऐकून आले. खरं तर त्या गर्दीत मला हंबरडा फोडावासा वाटत होता. अगदी मोठ्यानं. छाती फुटली असती इतक्या जोरात. छकुलीसाठी नाही. माझ्यासाठीच. छकुलीचं नाव कळलं नाही, तसं माझंही नाव कुणाला माहीत नाही. छकुलीला रेप करून मारणारांची नावं जशी कळली, तसंच माझ्यावर प्रेम करून जीवानिशी गेलेल्या त्या माझ्या प्रियकराचं नावंही तुम्हाला माहीत आहे. नितीन आगे!...

  • संजय पवार
  • Thu , 07 December 2017
  • 2 Comments
  • 4 Like

‘सुप्रिम’ कोण? सरकार की सर्वोच्च न्यायालय?

आता न्यायालय आणि सरकार यांच्यातच ‘सुप्रीम कोण?’ असा वाद वाढतोय. एकमेकांचा अधिक्षेप होणार नाही, याची काळजी घेत दोघंही एकमेकांना आपापली ‘जागा’ दाखवण्याच्या अहमहमिकेत लागलेत. या गदारोळात राष्ट्रपती लिखित सरकारी भूमिका वाचतील, तर पंतप्रधान वरातीमागून घोडं आणत ‘मन की बात’ करतील. तोवर विद्वेष आणि हिंसेच्या आक्रमक वातावरणात ‘सुप्रीम कोण?’, हा प्रश्न विवेकी जनांना छळत राहिल...

  • संजय पवार
  • Thu , 30 November 2017
  • 1 Comments
  • 4 Like

अस्मितावाले, सिनेमावाले आणि बँडबाजा बारातवाले

आजवर हिंदू-मुस्लिम, स्पृश्य-अस्पृश्य, वेश्या-परित्यक्त्या, पोलिस-गुन्हेगार असे असंख्य विषय पडद्यावर येऊन गेले. पण ना कुणाची अस्मिता दुखावली, ना इतिहासाची मोडतोड झाली, ना जातीचा अपमान वाटला, ना कुणाला व्यावसायिक शिंतोडे वाटले. ‘संत तुकाराम’मधल्या मंबाजीने ना ब्राह्मण दुखावले की, ‘ताजमहाल’मधली अवीट गाणी ऐकताना कुणाला त्यात ‘तेजोमहाल’ दिसला नाही...

  • संजय पवार
  • Tue , 21 November 2017
  • 1 Comments
  • 2 Like

‘मी लाभार्थी’ थर्ड डिग्रीचा! - अनिकेत कोथळे (२६)

महाराष्ट्रीय जनहो! तुम्ही आम्ही आपण सर्वच या मायबाप सरकारचे असे ना तसे ‘लाभार्थी’ आहोत. आपल्या सर्वांच्याच कहाण्या कदाचित जाहिरातीत येणार नाहीत. त्यांना प्रसिद्धी मिळणार नाही. अशा वेळी रसून न बसता, जे कुणी ‘मी लाभार्थी’ म्हणून झळकले, मिरवले त्यांच्याबद्दल कणमात्र असूया न बाळगता आपण आपल्याला मिळालेला लाभ, आपणच एकमेकांना सांगायला हवा. आपणच आपला आधार (क्रमांक नव्हे!) बनूया...

  • संजय पवार
  • Tue , 14 November 2017
  • 0 Comments
  • 3 Like

एक ‘गोळी’ घालू बाई, दोन ‘गोळ्या’ घालू

आपल्याकडे अनेक मंत्री, आमदार, पिस्तलं बाळगून असतात. उद्या ते निर्मितीच हाती घेतील! ‘मेक इन इंडिया’च्या नावावर पप्पू, टप्पू, यादव, युपीतली खान मंडळी, मुंबईतल्या टोळ्या यासुद्धा या नवीन धंद्यात पैसा ओततील? उद्योगस्नेही सरकारचे जे काही खास उद्योगपती आहेत, त्यांच्यासाठी हा आणखी नवा उद्योग मुठीत येऊ शकेल. पुढे कदाचित एका पिस्तुलासोबत एक सॅटेलाईन फोन मोफत अशी योजनाही येईल...

  • संजय पवार
  • Tue , 07 November 2017
  • 1 Comments
  • 4 Like

भंजाळलेले नरेंद्र मोदी, पर्यायाने उजळलेले राहुल गांधी!

‘शोले’मधला गब्बर म्हणतो- ‘जो डर गया, समझो मर गया!’ तर मोदींच्या करिष्म्यासमोर पाचोळा झालेले विरोधक मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही तसं उभं राहू लागले आणि मोदींसकट भाजप आणि रा.स्व.संघ भंजाळले. त्यामुळे पुन्हा राष्ट्रगीत, राममंदिर, ताजमहाल हे पोतडीतले साप बाहेर निघू लागलेत! या सर्व धावपळीत फार काही विशेष न करता राहुल गांधी यांची प्रतिमा उजळत गेली...

  • संजय पवार
  • Tue , 31 October 2017
  • 2 Comments
  • 4 Like

वेतनवाढीची म्हैस, एसटी आणि जनहित याचिका

आश्चर्य म्हणजे सरकारला दोन वर्षं वेतन करार करायला वेळ मिळत नाही, सोयीसुविधा द्यायला जमत नाही, प्रवाशांच्या जीवाशी खेळ अशा जुन्या, नादुरुस्त गाड्या हे कामगार स्वत:चा जीव धोक्यात घालून चालवतात. यासाठी सरकार, महामंडळ यांना एकही सवाल हे जनहित दक्ष याचिकाकर्ते आणि न्यायालय करत नाही. एकदा एसटी स्टँडवरच्या मुताऱ्या, कँटीन, क्लॉकरूममध्ये नाझी छावण्यासारखं वातावरण असतं...

  • संजय पवार
  • Tue , 24 October 2017
  • 1 Comments
  • 3 Like

भानू काळे यांचे प्रकट चिंतन वजा स्वगत वजा निरीक्षण आणि आपण!

‘अंतर्नाद’च्या भानू काळ्यांना न दिसलेले अनेक नवे लेखक सातत्यपूर्ण व कसदार लेखन करताहेत! तेही कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, नाटक अशा सर्व साहित्य प्रकारांत. तुम्हाला ग्रेस दिसतो, पण अक्षयकुमार काळे दिसत नाहीत, हा दोष त्या दोघांचा नाही तर भानू काळ्यांसारख्या मनोरा संपादकांचा आहे! भानू काळेंनी ‘अंतर्नाद’ ऐकतानाच बाहेरचा आवाजही ऐकावा. तो कदाचित मोठा, कर्कश वाटेल, पण सनईत कितीही श्वास भरलात तरी ती ‘तुतारी’ नाही होणार!...

  • संजय पवार
  • Wed , 11 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

आमच्या राखेतून उडू दे तुमचे स्वप्नपक्षी!

किती अपात्रांच्या भजनी लागलो होतो गेल्या, साठ वर्षांत! गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद, राजेशाही, पेशवाई, शिवशाही, रामराज्य, लोकराज्य, लोकशाही, एक ना दोन! नॅचरल जडीबुटीची एकत्रित औषधी असावी तशी तुमची एकाधिकारशाही, कशी ऑरगॅनिक स्वदेशी-विदेशी मशागतीवर पोसलेल्या सर्व वैचारिक किटकांचा नाश करून, गोमातेच्या शुद्ध मलमूत्रतुपासारखी साजूक, सात्त्विक आणि गुणकारीही...

  • संजय पवार
  • Fri , 06 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

‘फेसबुक’ ठीक हो! ‘फेस टु फेस’ कधी भिडणार?

एका पक्षाच्या नेत्यानं आता किती जणांच्या पोस्ट वाचायच्या? कविता झेलायच्या? प्रतिपादनं मांडायची, खोडायची? आपल्या कोशात जाऊन बसलेले राज ठाकरे फेसबुक वरून पुन्हा कोशातच जाणार. केवळ निवडणुका आल्यावरच मैदानं शोधायची? ‘फेसबुक’पेक्षा ‘फेट टु फेस’ हा व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारा राजकारणाचा खरा पाया आहे. आज लोकांच्या असंतोषाला वाचा फोडणारा आवाज हवाय, व्हर्च्युअल नाही तर खऱ्या भूमीवर...

  • संजय पवार
  • Tue , 26 September 2017
  • 1 Comments
  • 1 Like

तोही एक सदोष मनुष्यवध होता, हाही एक सदोष मनुष्यवध आहे…

मुंबई पोलिसांनी कामगारनगरातील सहा मुलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय! पोलिसांची ही तत्परता डॉ. खोलेबाईंची तक्रार घेताना दिसून आलीच होती. पण या पोरांवर थेट सदोष मनुष्यवधाचंच कलम काय म्हणून लावलं? आणि जे तर स्पष्ट झालं तर मग रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यासाठी कंत्राटदार, पालिका, आयुक्त, वार्ड ऑफिसर यांपैकी किती जणांवर आजपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावलाय?...

  • संजय पवार
  • Wed , 20 September 2017
  • 0 Comments
  • 2 Like

कुठे गौरी लंकेश आणि कुठे डॉ. (!) खोलेबाई!

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात. त्याप्रमाणेच सनातनीपणा हा काही लोकांच्या सोबतच दहन अथवा दफन होतो. शेकडो वर्षांची ही लढाई कणाकणानं पुढे जात असताना नव्या राजकीय वातावरणात ही भूतं चोरपावलांनी समाजात शिरताहेत. या फटी बुजवण्याचं काम हीच खोलेंना चपराक व गौरीला आदरांजली!...

  • संजय पवार
  • Thu , 14 September 2017
  • 2 Comments
  • 5 Like

एनडीए, राऊत आणि ‘ध’चा‘मा’

सेनेकडे राजकीय परिपक्वता कधीच नव्हती, पण एक बाणेदार संघटन होतं. सत्तेवर लाथ मारण्याची हिंमत बाळासाहेब नेहमी सांगत, तडकाफडकी निर्णय घेत. उद्धव ठाकरे नुसतेच बोलतात आणि करून दाखवल्याचं पोस्टर लावतात. (जे पुढच्या पावसात वाहून जातं.) २५ वर्षांच्या अनुभवानंतरही भाजप जेव्हा ‘मित्रपक्षांना ‘ध’रून असावं’ असं म्हणतो, तेव्हा त्यांना ‘धरून मारावं’ असं म्हणायचं असतं...

  • संजय पवार
  • Tue , 05 September 2017
  • 0 Comments
  • 1 Like

मन की ‘बाता’ मारणारे ‘निरो’!

एवढ्या सगळ्या ठिकाणी सातत्यानं, तपशीलवार व (एकट्यानंच) बोलूनही प्रधानसेवकांचं काही तरी सांगायचं (खरं तर ऐकवायचं) राहूनच जातं. मग त्यांनी यावर एक उपाय शोधून काढला. सरकारी प्रसारमाध्यम रेडिओ म्हणजे आकाशवाणी, इथून ‘मन की बात’ सांगायची! हे मन पुन्हा जनमन नाही, तर त्यांचंच मन! आता प्रधानसेवक असल्यानं त्यांचं मन हे त्यांचं मन नाही, ते सव्वाशे कोटी भारतीयांचंच मन!...

  • संजय पवार
  • Wed , 30 August 2017
  • 0 Comments
  • 3 Like

‘ट्रिपल’चा डोस आणि भारतीय आणि मुस्लीम

मुस्लीम व ख्रिश्चन धर्मांतरावर आक्रमक होणारे हिंदुत्ववादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतरावर, लक्ष्मण मानेंसह भटक्या विमुक्तांनी केलेल्या धर्मांतरावर किंवा हनुमंतराव उपरे यांनी ओबीसींसह केलेल्या धर्मांतरावर ‘ब्र’ काढत नाहीत. कारण या तिघांनी हिंदू धर्माच्या जातवर्चस्वाला आव्हान देत माणूसपणाच्या किमतीसाठी बौद्ध धर्म स्वीकारला. पण यावर हिंदुत्ववादी अक्षराने बोलत नाहीत...

  • संजय पवार
  • Sat , 26 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

‘मोदी-शहां’ची गाडी उताराला लागली?

संसदेतल्या उपस्थितीवरून खासदारांना ‘आता कसंही वागा २०१९ साली माझ्याशी गाठ आहे’, असा दम देणाऱ्या पंतप्रधानांना एखाद्या खासदारानं त्यांचंही हजेरी पुस्तक दाखवून ‘आता कसंही वागा, २०१९ला जनतेशी गाठ आहे’, हे सांगायला हरकत नव्हती! कदाचित यापुढे महाराष्ट्राचे नाना पटोले हे काम करतील, अशी आशा करायला हरकत नाही. या सर्व परिस्थितीचा पंतप्रधानांना अंदाज नसेल असं म्हणणं वेडेपणाचं ठरेल...

  • संजय पवार
  • Mon , 21 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

हलकटांची निर्लज्ज धडाडी आणि शहाण्यांची स्मशान शांतता

इतकी संतापदायक घटना घडली, व्हॉटसअॅपवर चार फुलझड्या पेटल्या. बाकी सगळं शांत शांत! का नाही रान पेटलं? गल्ली ते दिल्ली सत्ताधाऱ्यांना का नाही जाब विचारला गेला? यावेळीच का ही स्मशानशांतता? का आम्ही वाट पाहतोय की, बाबासाहेब कचरा उचलतानाची पोस्टर्स लागतील आणि त्याचवेळी पंतप्रधान सूतकताईच्या गांधींच्या पोझमधून उठून संविधानाची प्रत घेऊन एक बोट उंच केलेली पोझ कधी घेताहेत याची?...

  • संजय पवार
  • Tue , 08 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

सब के सब ‘बीके’ हुए हैं!

विरोधकांचं आशास्थान नितीशकुमार यांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि रात्रीत बिहारमध्ये ‘चड्डी पहन के फुल’ म्हणजेच ‘कमल’ खिला! ७६ साली ‘अंधरे में एक प्रकाश’ म्हणण्याइतपत तरी वाव होता, आशा होती. आता सवाल तरी कुणाला करायचा? कारण आजूबाजूला पाहिल्यावर वाटतं- इथं काही ‘स्व’ला आवाहन करणारं विचारायचं म्हणजे ‘अंधों की गलियों में आईना बेचना’! त्यातूनही प्रयत्न करावा तर ‘सब के सब साले पहलेसे बिके हुए है’!...

  • संजय पवार
  • Thu , 03 August 2017
  • 1 Comments
  • 3 Like

एक ‘आरजे’ बीएमसी को…

आरजे मलिष्का काय, वागळे काय, ‘ईपीडब्ल्यू’चे संपादक काय, या मच्छरांची सर्वशक्तीमान सत्तेला नेमकी भीती वाटते कशाची? त्यांच्या ‘किटक’सदृश्य उपस्थितीची? की त्यांच्या अणकुचिदार दंशांची? जशी हत्तीला मुंगी कानात शिरायची वाटते तशी?... सोनूचा भरोसा आज बीएमसीवर नाय, पण उद्या तो राज्य मंत्रालय किंवा केंद्र सरकारवरही राहिला नाही तर? तेव्हा राधासुता तुझा धर्म काय राहिल हे लवकर कळेलच!...

  • संजय पवार
  • Wed , 26 July 2017
  • 0 Comments
  • 5 Like

योगी आदित्यनाथ आणि साबण : ‘फेस’ टू ‘फेस’!

गुजरातमधील दलितांनी योगीजींचा निषेध म्हणून १२५ किलो वजनाचा साबण बनवला. त्यावर एका बाजूला गौतम बुद्ध व दुसऱ्या बाजूला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा एम्बॉस केल्या आणि या साबणाचं नाव ठेवलं, ‘तथागत’! योगीजींनी तो वापरून ‘नाही निर्मल मन, काय करील साबण’ हे वचन काही क्षण बाजूला ठेवून त्यांच्या साबणनीतीला धरून हा साबण वापरून संविधानिक शुर्चिभूतता अंगिकारावी व सनातन मळ काढून टाकावा, असं माफक पण क्रियाशील उद्दिष्ट ठेवलेलं...

  • संजय पवार
  • Thu , 20 July 2017
  • 0 Comments
  • 1 Like

पीएम ट्विटर हँडलपर, जनता सलीम के हाथों सलामत!

अमरनाथ यात्रा ही केवळ हिंदूंची तीर्थ, धार्मिक यात्रा नाही तर काश्मीर खोऱ्यातील अर्थव्यवस्थेचा ती प्रमुख भाग आहे. यात्रे दरम्यान भाविकांना लागणाऱ्या सर्व गोष्टी स्थानिक मुसलमानच पुरवतात. हा भाईचारा, हा सलोखा पाकिस्तानला सलला नाही तरच नवल. त्यामुळे ते हरप्रकारे यात मोडता घालायचा प्रयत्न करणार. हा प्रयत्न ध्रुवीकरण करून, छात्या फुगवून धुळीस मिळवता येणार नाही, तर ‘भारतीय’ म्हणून एकत्रित राहूनच तो मिळवता येतो. ...

  • संजय पवार
  • Wed , 12 July 2017
  • 0 Comments
  • 3 Like

फडणवीस, तुमचे ‘घाशीराम’ आवरा!

सध्या जे सरकार राज्यात व देशात आहे, ज्या पक्षाचं आहे, तो पक्ष त्यांची विचारधारा स्त्रीला देवी, माता किंवा थेट दासी मानते. त्यांचं स्त्री उदात्तीकरण देशाच्या भूप्रदेशाला भारतमाता संबोधतं, तर गायीला गोमाता. त्यांच्या राज्यात, तुरुंगात असे व इतके अत्याचार घडावेत? कैद्याचा मृत्यू व्हावा? आणि महिला आयोगाच्या अध्यक्षबाई जखम नाही म्हणून मृत कैद्याच्या आप्तस्वकीयासह कायदाप्रेमी जनतेच्या जखमेवर मीठ चोळतात?...

  • संजय पवार
  • Tue , 04 July 2017
  • 1 Comments
  • 5 Like

“भला तेरा ‘दलित’ मेरे ‘दलित’ से ज्यादा ‘दलित’ कैसा?”

तुम्ही दलित आणलात आम्ही दलितातली दलित आणली. म्हणजे कास्ट आणि जेंडरमध्ये आमचा सामाजिक न्याय मोठा. आणि तुमचा दलित हा दलित कसला! तो तर स्वयंसेवक! दलित भाजपीय म्हणजे भगवी झाक असलेला निळा, सॅफरोनिक ब्ल्यू! आमचा उमेदवार तसा नाही. दलित आणि स्त्री असा दुहेरी शोषणाचं प्रतीक असलेला, पार ‘मनुस्मृती’ने बडवलेला दलित उमेदवार आहे. आमच्या क्रांतीमुळे तुमची समरसता म्हणजे चुलीवरच्या मटणासमोर गोड वरण!...

  • संजय पवार
  • Tue , 27 June 2017
  • 0 Comments
  • 5 Like

परवाच्या पराभवाला जबाबदार काँग्रेस!

२०१४ पासून तो शेपूट घालूनच बसला होता. हूं नाही की चूं नाही. आपल्या सैन्यावर गोळीबार दूरच, इस्लामाबादेतून मान वळवून बघायचीही हिंमत नाही. गिरनारचा सिंह दिल्लीत वास्तव्याला आल्यापासून पार गळपटलाय शेरखान! निमूट शाल पांघरून, दिलेली मिठाई खात बसतो! अशा शोचनीय शत्रू राष्ट्राच्या अकरा लोकांनी १२५ करोड जनतेच्या हातातोंडातला घास नाक खाजवून दाखवत घेऊन जावा? स्वत:च फस्त करावा? या शोचनीय पराभवाला, मानहानीला कारण काँग्रेस...

  • संजय पवार
  • Tue , 20 June 2017
  • 0 Comments
  • 3 Like

चला, मोदीमुक्त भाजप करू या!

शीर्षक बरोबरच आहे. अजिबात गफलत झालेली नाही. गोंधळ नाही. उपहास, उपरोध किंवा खास भाजप स्टाईल नावीन्यपूर्ण शब्दप्रयोगही नाही. आहे, ते विधान आहे. ठाम विधान आहे. सदिच्छा म्हणा हवं तर. सद्यकालीन दोन तृतीयांश बहुमतासह सत्तेवर असलेल्या, २५ वर्षांहून अधिक वय असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या पक्षांतर्गत निर्णयात ढवळाढवळ करण्याचीही आमची इच्छा (आणि देशद्रोही धमक) नाही. तरीही आम्ही असं का म्हणतोय? ...

  • संजय पवार
  • Tue , 30 May 2017
  • 3 Comments
  • 3 Like

ना खाया, ना पिया…गिलास तोडा उसका बाराना!

तर इथून पुढे लक्षात ठेवा, भारत बदलतो म्हणजे मोदींचा कुर्ता बदलतो. भारत बदलतो म्हणजे मोदींचं जॅकेट बदलतं. भारत बदलतो म्हणजे मोदींचं ताजं भाषण. भारत बदलतो म्हणजे मोदींची नवी घोषणा. भारत बदलतो म्हणजे मोदींच्या नव्या घोषणेची सर्व प्रसारमाध्यमांतील जाहिरात. भारत बदलतो म्हणजे सरकार विरोधात कुठेच काही छापून, लिहून न येणं, प्रक्षेपित न होणं, व्हायरल न होणं. भारत बदलतो म्हणजे मोदीच पंतप्रधानपदी आजन्म राहणं...

  • संजय पवार
  • Tue , 23 May 2017
  • 2 Comments
  • 3 Like

देश बदल रहा है, तरी मानतच नायत साले!

दानवेंचा हा सूर इथला नाही, तर थेट दिल्लीतला आहे. तिथे जी जोडी आहे ती याच टेचात असते की, आता सगळं सुजलाम सुफलाम आहे. आता नाव ठेवायला जागाच नाही. जो नाव ठेवेल, त्याच्या जिभेला हाड नाही किंवा तो ठार आंधळा, बहिरा आहे. त्याला ‘मुका’ करण्याची सोय खास माध्यमांद्वारे केली जाते. माध्यमं हे सरकार पारदर्शीपणाचा अर्क आहे असंच समजून चाललीत. आता ‘नेशन वाँटस टु नो’ की, अपोझिशन किती निकम्मे आणि सरकार किती भक्कम आहे ते!...

  • संजय पवार
  • Wed , 17 May 2017
  • 1 Comments
  • 5 Like

तीच भूमी, तेच प्रश्न, तीच लढाई!

मुक्ता टिळक या बहुधा शिक्षित असाव्यात. तरीही त्या जेव्हा अज्ञानमूलक बोलतात, तेव्हा त्यांचे डोके ठिकाणावर आहे का, हे विचारणं भाग पडतं. आणखी एक घासून गुळगुळीत झालेला मुद्दा. आरक्षणात फक्त प्रवेश घेताना गुण कमी-जास्त हे तत्त्व पाळलं जातं. आरक्षणातल्या विद्यार्थ्याला परीक्षेत, गुणांत आरक्षण नसतं. तिथं ३५च्या खाली नापास, ६० पर्यंत प्रथम वर्ग, पुढे डिस्टिंक्शन हे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्यालाही लागू असतं. ...

  • संजय पवार
  • Tue , 09 May 2017
  • 3 Comments
  • 4 Like

मुंगी, आम्ही आणि मेरुपर्वत

गडकरींच्या प्रतिभाभंजनाविरोधात उभे राहिलेल्या रंगकर्मींची पोंक्षेंच्या नथुराम नाटकातून होणाऱ्या गांधी प्रतिमाभंजनावर काय भूमिका आहे? ते म्हणतील, ते नाटक आहे, कलास्वातंत्र्य वगैरे. मग ‘राजसंन्यास’ही नाटक आहे. त्यातही सत्याचा अपलाप होऊ शकतो. गांधींचा वध गौरवणारे पोंक्षे गडकरींच्या प्रतिमासंवर्धनासाठी पुढे येतात?...

  • संजय पवार
  • Tue , 25 April 2017
  • 0 Comments
  • 3 Like

उन्मादाला ‘चपराक’ अशी बसेल की…

राजकीय यशानं संघ परिवाराला जो उन्माद चढलाय. त्यामुळे गोहत्या, राममंदिर आदि विषयावर शिरच्छेदापर्यंत जिभा सैल सुटल्या आहेत, तर कुणी तरुण विजय ‘दक्षिणेत आम्ही काळ्यांसोबत राहतोच की!’ म्हणून बेलगाम वर्णवर्चस्ववादी बोलतो! संघ परिवाराने आपला हा हिंदू राष्ट्रवादाचा भगवा उन्माद थांबवावा. अन्यथा या देशातला सच्चा भारतीय या उन्मादाला अशी चपराक देईल की, ज्याचा प्रतिध्वनी खैबरखिंडीतही ऐकू येईल!...

  • संजय पवार
  • Tue , 11 April 2017
  • 0 Comments
  • 4 Like

तुकाराम मुंढे आणि ‘हयवदनी समाजा’च्या भाबड्या नैतिकतेचा पेच

अधिकाऱ्यांचा देव करायचा हे आपल्या रक्तातील गुलामीचंच लक्षण आहे. मग तो अधिकारी सुलतानाचा असो, छत्रपतींचा असो, पेशव्यांचा असो की पंचम जॉर्ज, व्हिक्टोरिया राणी, नेहरू, इंदिरा गांधी की नरेंद्र मोदींचा असो. गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांना आलेलं ग्लॅमर, त्यातून मिळणारी पदं, त्यातून मिळणारी अर्धी सत्ता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी याचा कैफ जडून वाया गेलेल्यांची यादी वर दिलेली आहेच, त्यातलं नवं नाव तुकाराम मुंढे....

  • संजय पवार
  • Tue , 04 April 2017
  • 1 Comments
  • 6 Like

सब के सब साले मरीज है!

दोन नंबरचा मरीज कधीच बरा होणारा नसतो. आणि सध्या सर्वत्र या दोन नंबरच्या मरिजांची संख्या वाढतेय. म्हणजे इतकी की सरकारी इस्पितळासारखी अवस्था. मरीज ज्यादा. डॉक्टर कम. अशा वेळी आपण काय करायचं? तर आपण या दोन नंबरच्या मरिजामधले जेवढे एक नंबरच्या मरिजात आणता येतील तितके आणावे. हे मरीज समाजात वाढून, त्यांचा प्रार्दूभाव वाढू नये म्हणून आपण आपल्या कोशातून बाहेर येऊन ही नवी रोगराई हा समाज गिळण्याआधी सुदृढ करायला हवा....

  • संजय पवार
  • Tue , 28 March 2017
  • 0 Comments
  • 4 Like

नंगेसे खुदा भी डरता है!

भरभक्कम बहुमत मिळवलेल्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी जवळपास आठ दिवसांच्या गुप्त खलबतांनंतर मोदी-शहा यांनी या राज्याच्या योगी आदित्यनाथ यांची निवड केल्याची बातमी पाहिली आणि अगदी सहजोदगार आला तोंडी- ‘नंगेसे खुदा भी डरता है!’ एक योगी, पंतजली उद्योगानं उद्योगपती बनला. आता हे दुसरे योगी मुख्यमंत्री बनले. याच क्रमानं लता श्री श्री रविशंकर जुलैमध्ये राष्ट्रपती झाले तर आश्चर्य वाटायला नको....

  • संजय पवार
  • Tue , 21 March 2017
  • 4 Comments
  • 5 Like

आता चर्चा ‘पराभवाची’ हवी

जगभरच विद्रोहात बेदखल झालेले आज पुन्हा पृष्ठभागावर येताहेत. २०१४ला भारतात मोदी आणि २०१७ला अमेरिकेत ट्रम्प, २०१६ साली ब्रेग्झिट, इसिसचा उदय हे निव्वळ योगायोग नव्हेत. हा एखाददुसऱ्या पक्षाचा, व्यक्तीचा पराभव नव्हे, तर हा संपूर्ण साठोत्तरी चळवळीचा समग्र पराभव आहे. त्यामुळे त्या पराभवाचं विश्लेषणही तसंच व्हायला हवं....

  • संजय पवार
  • Tue , 14 March 2017
  • 1 Comments
  • 4 Like

देवेंद्र फडणवीसांची, भाजपची पारदर्शक धूळफेक!

उद्धव ठाकरेंना स्वत:चं अस्तित्व व कर्तृत्व दाखवायची संधी चालून आलीय. त्यांनी महापालिकेत भाजपने दिलेला केकवॉक स्वीकारतानाच राज्यातील सत्तेतून बाहेर पडून २०१९पर्यंत विरोधी पक्षाची भूमिका बजवावी. दोन्ही काँग्रेस व भाजपच्या धोरणात फारसा फरक नाही आणि भाजपच्या पारदर्शक धूळफेकीला बळी न पडता सेनेनं स्वतंत्र अस्तित्व टिकवलं तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि प्रसंगी भाजपलाही पर्याय म्हणून उभं राहण्याची सेनेला संधी आहे. ...

  • संजय पवार
  • Tue , 07 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

‘मराठी भाषा दिन’ की ‘मराठी अजीर्ण दिन’?

दरवर्षी २७ फेब्रुवारीला साजरा होणारा ‘मराठी भाषा दिन’ हा दिवसेंदिवस ‘मराठी अजीर्ण दिन’ होत चाललाय. मराठी मंत्रालयाच्या दारात लक्तरे नेसून उभी आहे असं म्हणणाऱ्या वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनीच मराठी भाषा दिन साजरा करून… छे छे लक्तरे कुठे ही तर भरजरी पैठणी नेसून उभी आहे, असं सांगण्याचा उरबडवा दिवस म्हणजे ‘मराठी भाषा दिन’!...

  • संजय पवार
  • Tue , 28 February 2017
  • 2 Comments
  • 3 Like

भारतीय जलिकट्टू पार्टी

जलिकट्टू व भाजप यांचा बादरायण संबंध आम्ही जोडतोय असं कुणाला वाटेल, पण तसं नाही. जलिकट्टू जसा एकाच वेळी कायम जोखडाखाली मुंडी घालून हिंडणाऱ्या बैलाला दिलेली मोकळीक आणि त्या मोकळीकीत त्याच्यातलं जनावर जागं करण्यासाठी माणसाने गाठलेली जनावराची पातळी असा खेळ आहे. तद्वतच सध्याचा भाजप आणि सरकार यांच्याकडे पाहता येईल. बैलाला खेळवताना माणसात जसा उन्माद चढतो, तसा हल्ली कुठल्याही निवडणुकीत भाजपला उन्माद चढतो...

  • संजय पवार
  • Tue , 21 February 2017
  • 2 Comments
  • 4 Like

रेनकोट आणि शॉवर कॅप

मनमोहनसिंग निदान सर्वांग तरी वाचवतात, मोदी शॉवर कॅप घालून हमामात सुरक्षित आंघोळ करतात. वाढता दर्प व अहंकार विरोधकांना कस्पटासमान समजतो. मोदींना त्या प्रसिद्ध कव्वालीचा मुखडा नक्कीच माहीत असेल – ‘चढता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा.’ ती कव्वाली मोदींनी शांतपणे ऐकावी, काही काळ भाषणबाजी बंद करून. मोदीभक्तांनीही जरूर ऐकावी आणि रेनकोट व शॉवर कॅप यातला फरक जमला तर समजून घ्यावा!...

  • संजय पवार
  • Tue , 14 February 2017
  • 0 Comments
  • 4 Like

…मला बाई जायाचं नांदायला!

एकटीने मला ही जड जाणार, तुम्हालाही. शेवटी धनी हवा, घरधणीन हवी, तर घराला शोभा. बरं मामंजींना वचन दिलं होतं, आता जातेय पण पुन्हा नक्की येईन. आले की नाही? आज सगळे दीर भेटले. सगळे विचारात पडले. म्हटलं वेळ लावू नका, आत सांगा मी आलेय. मी. मी स्वत:, स्वत:च्या पायाने, विनाअट…नांदगावकर स्वगत म्हणत होते. एका राजकीय महानाट्यातलं सम्राटाच्या अध:पतनानंतरचं स्वगत!...

  • संजय पवार
  • Tue , 07 February 2017
  • 1 Comments
  • 4 Like

सेना ‘इतिहासजमा’ होईल?

सक्रिय राजकारणातून साहेब लांब झाले आणि उद्धवजी आले. तोवर भूयारी रस्ता राजमार्ग झाला होता. सेनेचा वापर योग्य तेवढा झाला होता. आणि पुराणकथेप्रमाणे हा राक्षस आता देवाच्याच जिवावर उठायला लागला याची जाणीव झाली. वेळही ठरली आणि आता मोदीपर्वात सेना ‘इतिहासजमा’ करण्याची पद्धतशीर कारस्थाने सुरू झालीत. काँग्रेस आणि भाजप एकमेकांना पाण्यात पाहत असले तरी देशात केवळ द्विपक्षीय लोकशाही असावी यावर अद्वैतासारखं एकमत आहे...

  • संजय पवार
  • Tue , 31 January 2017
  • 2 Comments
  • 4 Like

जळता निखारा गिळलेला माणूस!

असंख्य आठवणी घेऊन परवा भैय्यालाल भोतमांगे गेला. सर्वोच्च न्यायालयाला एक तारीख उधार देऊन गेला. फाशीवरून जन्मठेपेवर आलेल्यांना कदाचित चौदा वर्षांचा दिलासा देऊन गेला. बायकोची बदनामी, मुलांची स्वप्नं काळजात कोरून गेला. भैय्यालाल गेली दहा वर्षं एक जळता निखारा गिळून जगत होता. परवा चिता पेटली असेल. नंतर राख साचली असेल. राख सावडायला कुणी गेलंच असेल तर त्याला तो जळता निखारा परवाही जळतानाच दिसला असेल!...

  • संजय पवार
  • Tue , 24 January 2017
  • 1 Comments
  • 6 Like

मोदी मला भेटले

मोदी मला भेटले त्याची ही गोष्ट एकाच अपवादाने पुन्हा भेटत राहते. ईश्वरप्रतिरूप झालेले मोदी मला फक्त एकाच ठिकाणी भेटले नाहीत. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात, मुलांना प्राथमिक शिक्षण देणाऱ्या, यशोदाबेन नरेंद्र मोदी या प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेच्या शाळेत मोदी मला भेटले नाहीत. अर्थात कुसुमाग्रज म्हणालेच होते, ज्यांना हवाय त्यांच्यासाठी ईश्वर आहे, ज्यांना नकोय त्यांच्यासाठी तो नाही. या वाक्यासह शेवटी मोदी मला भेटले...

  • संजय पवार
  • Tue , 17 January 2017
  • 1 Comments
  • 8 Like

सोयगावकरांचा सोयीचा निषेध

राज्यात होणाऱ्या विविध पालिका निवडणुका, एक मराठा-लाख मराठा या बिगर नेतृत्वाच्या समूहाला आपल्याकडे वळवण्यासाठी उत्सूक सर्व राजकीय पक्षांसह सर्व मराठा संघटना, या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने स्वत:ची राजकीय पक्ष म्हणून केलेली नोंदणी, हा ताजा इतिहास लक्षात न घेता राणाभीमदेवी थाटात सूर लावणं म्हणजे अंधारात कुत्र्याचं केकाटणं. कारण ‘मराठ्यां’ना दुखवण्याचं पातक कुठलाच राजकीय पक्ष करणार नाही!...

  • संजय पवार
  • Tue , 10 January 2017
  • 2 Comments
  • 4 Like

‘याडं लागलं, याड लागलं!’

‘सैराट’ आवडतो किंवा नावडतो. पण त्याचवेळी एक मोठा वर्ग ‘डिसीजनलेस तटस्थ’ राहतो. आपल्या तटस्थतेची भीती वाटावी असं वातावरण आजूबाजूला उभं केलं गेलंय! त्यामुळे तुम्ही समर्थक नसाल पण विरोधकही करत नसाल आणि तटस्थ राहत असाल तर तुमची तटस्थता तुमची मूकसंमती म्हणून समर्थनात मोजली जातेय. आणि तुम्हाला प्रेमाचं, भक्तीचं ‘याड लागलं’ असं जाहीर केलं जातंय....बंद्या रुपयासारखं खणखणीत साप्ताहिक सदर...

  • संजय पवार
  • Tue , 03 January 2017
  • 3 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.