या देशात जर कोणाच्या विचारांनी झपाटले जाण्याची आवश्यकता असेल, तर ती महात्मा गांधींच्याच, असा मला विश्वास वाटतो!
माझा मुलगा सत्यजित हा मार्क्सवादाने झपाटला होता. तो एकदा मला म्हणाला की, ‘बाबा, तू फारच गांधींचा पक्षपाती झाला आहेस.’ मी त्याला उत्तर दिले, ‘ही जर चूक असेल, तर ती मी मान्य करतो. आणि म्हणून गांधी आणि त्यांचे विरोधक या विषयाचा अभ्यास करायला घेतला आहे. अखेरीस मी कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो ते पाहूया, पण या देशात जर कोणाच्या विचारांनी झपाटले जाण्याची आवश्यकता असेल, तर ती गांधींचेच असा मला विश्वास वाटतो.’...