गेल्या काही वर्षांमध्ये माणसांच्या मरणांच्या इतक्या बातम्या आपण नियमितपणे ऐकतोय की, आता बधीर होऊन त्या अक्षरांपलीकडचं क्रौर्य समजायची संवेदनाच नष्ट होऊन जाईल की काय असं वाटतं

आपण स्मृतिभ्रंशाच्या काळात जगत आहोत. ‘माणसाचा वेळच संपून गेलाय’ अशी दिलीप चित्र्यांच्या कवितेतली एक ओळ आहे. सामूहिक स्मृतीचं मेमरी कार्ड कालबाह्य झालंय. इतक्या वेगानं, भराभर दृश्यं बदलताहेत की आपल्याला विचलित करून गेलेलं आदलं दृश्य कोणतं होतं, हेही सामूहिक स्मृतीच्या मेमरीकार्डात उमटत नाही. लोकशाहीची पायाभूत मूल्यं आणि संविधानातले निर्देश दिवसाढवळ्या पायदळी तुडवले जाताहेत...

त्या लोककथेप्रमाणेच, समाजातले अनेक तरुण पुंगीवाल्याच्या मागे मोहीत होऊन जातायत आणि हा पुंगीवाला त्यांना खाईच्या दिशेने घेऊन जातो आहे

लेखक बुचकळ्यात पडून समाजाकडे पाहतो आहे. समाजात विभाजनवादी निरर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढवणारा खेळ मांडला जातोय. आता, त्या पाठोपाठ कुठल्याशा सिनेमाचं समर्थनसुद्धा करण्यात येतं आहे. आता त्यामुळे, सिनेमाही तुमचा आणि आमचा झाला. कला विभाजित झाली. उपद्रव आणि उपद्रव. उन्माद आणि उन्माद. जनतेच्या भोळ्या मनाशी चालवलेला हा खेळ लेखक पाहतो आहे. माणसांचं विभाजन होताना पाहतो आहे आणि विद्वेषाचं गणितही मांडलेलं पाहतो आहे...

लक्ष्मीकांत देशमुख : “अंधांच्या संस्थेला दिलेली जमीन असेल किंवा पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी केलेलं काम असेल, हे लातूरच्या कारकिर्दीतील महत्त्वाचं काम आहे, असं मी मानतो.”

लातूरला प्रांताधिकारी म्हणून काम करत असताना व्यापक सामाजिक हित, तसंच शासनाचं हित कधीही नजरेआड केलं नाही. उलट त्यांच्या हितरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली व कार्यही केलं. एका अशाच प्रकरणी मी शासनाची शहराच्या मध्य भागातली बहुमोल अशी जमीन वाचवली, त्यासाठी मला बदलीची शिक्षा झाली. आपली भूमिका घेऊन काम करण्याचा परिणाम किती सकारात्मक असू शकतो, हा मला लातूरच्या कारकिर्दीनं दाखवलेला मार्ग होता...

खरा मुद्दा, मराठी साहित्यविश्व प्रकाशक-लेखक-वाचक अशा तीनही पातळ्यांवर आत्मवंचनेतून बाहेर येऊन व्यावसायिक परिवर्तन घडवून आणण्याचा आहे...

काही मोजकेच अपवाद वगळता कोणीही मराठी प्रकाशक आपले छान चाललेय, असे म्हणताना सहसा आढळत नाही. अपवाद वगळता, मी केवळ लेखनावर मस्त जगतोय, असे कोणी एक लेखक म्हणताना आढळत नाही किंवा नैमित्तिक ग्रंथप्रदर्शने किंवा साहित्यसंमेलने वगळता कोणी एक वाचक साहित्यात रमलेला आढळत नाही... अकरा-बारा कोटी लोकसंख्या असलेल्या मराठी मुलुखात जेमतेम एक हजाराची आवृत्ती संपणे म्हणजे प्रकाशन-लेखकांसाठी ‘एव्हरेस्ट’ शिखर गाठणे असते!...

भारताच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय मेळाव्यांत फलज्योतिषावर मंत्रीलोक समर्थनपर भाषणे देतात, यावरून आपल्या समाजाची वैज्ञानिक पातळी किती खालावली आहे, याची जाणीव होते

मराठी साहित्याकडे पाहिले की, त्यात ‘विज्ञान-साहित्य’ किती अल्प प्रमाणात आहे, ते दिसून येईल. विज्ञानकथालेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आणि प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल (आदर असला तरी) एक प्रकारची भीती दिसून येते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले, असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत...

संमेलनाध्यक्षपदी दिब्रिटोंची निवड करणं, ही आजच्या कलुषित सांस्कृतिक वातावरणाच्या व धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर, हे महामंडळानं केलेलं एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे!

धार्मिक कारणावरून फादर दिब्रिटोंना विरोध करणारे त्यांचं वसईतलं कार्य लक्षात घेत नाहीत. आज मुंबई अमराठी म्हणजे इंग्रजी मोठ्या प्रमाणात झाली आहे, पण वसईचं मराठीपण आजही कायम आहे. त्यामध्ये फादर दिब्रिटो व त्यांच्या ‘सुवार्ता’ या मासिकाचा मोठा हात आहे. या परिसरातील मराठीत लिहिणाऱ्या ख्रिश्चन लेखक-कवींची एक दमदार फळी आज साहित्यप्रांती आपली नाममुद्रा कोरत आहे...

फादर दिब्रिटोंच्या साहित्याची मुळे त्यांच्या जन्मगावाच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या मातीत आहेत. त्यांची मराठी भाषेची ओज त्यांच्या सुपीक वालुकामय जमिनीच्या पोतात आहे!

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची मराठी साहित्यक्षेत्रातील तपस्या तशी प्रदीर्घ आहे. ती आजकालची नाही. ती सुरू झाली ते धर्मगुरू होण्यापूर्वीपासून. त्याला आता जवळजवळ ६० वर्षे झाली. धर्मगुरू झाल्यानंतरही या साधनेला ते चिटकून राहिले. दिब्रिटो यांची साहित्यिक जडणघडण काही अंशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत - पुण्यात - झाली. वसईत आल्यावर त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वत:ची लेखनशैली त्यांनी निर्माण केली...

संमेलनाध्यक्षपदी दिब्रिटोंची निवड करणं, ही आजच्या कलुषित सांस्कृतिक वातावरणाच्या व धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर, हे महामंडळानं केलेलं एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे!

फादर दिब्रिटो यांची संमेलनाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल महामंडळाचं अभिनंदन! त्यांनी काय विचार केला माहीत नाही. पण आजच्या कलुषित झालेल्या सांस्कृतिक वातावरणाच्या व धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर फादर दिब्रिटोंची निवड करणं, हे महामंडळानं केलेलं एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे! मुक्तीबोध यांनी ‘पार्टनर तुम्हारा पॉलिटिक्स क्या है’ असा भेदक प्रश्न विचारला होता, त्याची आठवण या निर्णयामुळे झाली...

आयोजक संस्थेने व महामंडळाने झुंडशाहीपुढे व दबावापुढे जो लोटांगण घालण्याचा भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी प्रक्षुब्ध आहे!

यवतमाळच्या आयोजक संस्थेने व महामंडळ, त्याचे अध्यक्ष यांनी उद्घाटक म्हणून भारताच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भीड पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्या नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आधी निमंत्रण देऊन मग ते मागे घेतल्याचा जो अगोचरपणा आणि झुंडशाहीपुढे व दबावापुढे लोटांगण घालण्याचा जो भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी उदास आहे, चिंतीत आहे आणि त्याहून जास्त प्रक्षुब्ध आहे...