भव्य ग्रंथदिंडी काहीशा बोचऱ्या थंडीत उस्मानाबादकरांसाठी ऊब आणणारी ठरली!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • ग्रंथदिंडीची छायाचित्रे
  • Fri , 10 January 2020
  • पडघम साहित्य संमेलन विशेष फादर फ्रान्सिस दिब्रिटो Father Francis Dibroto अ. भा. मराठी साहित्य संमेलन

आजपासून उस्मानाबाद इथं ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास सुरू झालेली भव्य ग्रंथदिंडी उस्मानाबादकरांसाठी काहीशा बोचऱ्या थंडीत ऊब आणणारी ठरली. तब्बल १५ वर्षांनी उस्मानाबादमध्ये सहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांचा उत्साह ग्रंथदिंडीमध्ये पाहायला मिळत होता.

उस्मानाबादमधील तेर हे गाव संत गोरोबा यांचं जन्मगाव. त्यामुळे सहित्य संमेलनस्थळाचं 'संत गोरोबाकाका सहित्यनगरी' असं नामकरण केलं आहे.

ग्रंथदिंडीमध्ये संत गोरोबाकाका यांचा पुतळा लक्ष वेधून घेत होता

संत गोरोबाकाका यांच्या पुतळ्यासमोर बाल वारकरी हरिनामाचा गजर करत होते

त्याचबरोबर संत गोरोबाकाका यांच्या नावाची गाडी आणि देखावेही होते

संत गोरोबाकाका याच्या मातीच्या गोळ्यातून मडकी घडवणार्‍या चाकाची हलती प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती

शालेय मुलं आणि मोठे यांचा उत्साह ओसंडत होता

मुली आणि महिला यांची संख्या लक्षणीय होती

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचे अध्यक्ष असल्याने त्यांचं जन्मगाव, वसई इथून आलेले अनेक ख्रिस्ती बांधव ग्रंथदिंडीमध्येही सह्भागी झाले होते

बाबा रामदेव यांनी ग्रंथदिंडीमध्येही आपली जाहिरात करण्याची संधी सोडली नाही. यातून आपण मराठी माणसं कधी बोध घेणार?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 14 January 2020

फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रकृती अचानक का बिघडली या ग्रंथदिंडीच्या वेळेस? हिंदू धर्मग्रंथ डोक्यावर घ्यावे लागतील म्हणून तर नाही?
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......