सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......

‘अ‍ॅनिमल’ : सद्य परिस्थितीशी संबंधित सामाजिक-सांस्कृतिक पडघम एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून ‘हुकुमी एक्क्या’सारखे कशा प्रकारे वापरले जात आहेत, याचे हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे

मनोरंजन म्हणून ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट जरूर पाहायला हवा, परंतु त्याच्या आडून सांगितल्या जाणाऱ्या ‘विचारा’त नेमकी काय गडबड आहे, तो जाणीवपूर्वक बनवलेल्या एखाद्या योजनेचा वा प्रोपगंडाचा भाग तर नाही ना, याचीही खातरजमा करून घेतली पाहिजे. उत्तम दिसणारं पेय चवीलाही उत्तम असतंच असं नाही, त्यात ‘भेसळ’ही असू शकते. कधी कधी तर ते आपल्या निरोगी ‘शारीरिक स्वास्थ्या’च्या दृष्टीनं ‘अपायकारक’ही असू शकतं.......

‘ए स्मॉल फॅमिली बिझनेस’ : आर्थिक भ्रष्टाचाराच्या संदर्भात पूर्णपणे संवेदनाहीन झालेल्या माणसांचं, कुटुंबाचं आणि समाजाचं नाटक

आधुनिक शहरी जीवनात ‘आर्थिक भ्रष्टाचार’ (नैतिक भ्रष्टाचार नव्हे) अनेक प्रकारचा असतो आणि अनेक पातळ्यांवर घडत असतो. या मुद्दा या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. कथानक दिल्लीत घडतं. काळ आजचा. हा प्रयोग फार्सिकल असून हसवता हसवता गंभीर आशयाकडे नेतो. काळ ऐंशीच्या दशकातला आहे. तेव्हा भांडवलशाही, त्यातील सर्व पातळ्यांवरचा भ्रष्टाचार वगैरेंची चर्चा सुरू झाली होती. आता तर आपल्याला भ्रष्टाचाराबद्दल काहीही वाटत नाही.......

अंजली मेघवाल आणि महिमा बासोर या दोन खंबीर दलित महिला पोलीस निरीक्षकांच्या कहाण्या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर आल्या आहेत. तुम्ही पाहिल्यात?

ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगला ‘कंटेट’ मिळू लागल्यामुळे हिंदी सिनेजगताला छोट्या पडद्यावर येणं भाग पडू लागलं आहे. शिवाय ‘स्टारकास्ट’पेक्षा आशय महत्त्वाचा ठरू लागल्यामुळे खऱ्याखुऱ्या कहाण्या सांगायला सुरुवात झालीय. अलीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या ‘दहाड’ आणि ‘कटहल’ या दोन्ही कलाकृतींमध्ये दलित महिला पोलीस अधिकारी मुख्य भूमिकेत आहेत. त्या कोण्या सवर्ण रक्षणकर्त्याविना स्वत:च्या बळावर उभ्या राहिलेल्या आहेत.......

‘सोलोकोरस’ ही इतरांच्या दुःखाने ज्यांचे मन भरून येते आणि ते त्यांच्या उक्ती-कृतीतून झिरपत राहते, अशा लोकांशी संवाद साधण्याची धडपड आहे...

चांगुलपणाचा काफीला तयार व्हावा आणि आपल्या आजूबाजूला दिसणारा घनदाट अंधार थोडा तरी विरळ करावा, यासाठीची ही एक धडपड आहे. आपणही त्यातला एक भाग होण्यासाठी, आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या आतल्या, गोठत चाललेल्या संवेदनशीलतेला जागं करण्यासाठी, माणूसपणाच्या निकषावर आपण नेमके कुठे आहोत, हे तपासून पाहण्यासाठी आणि संवादाचा पूल अव्याहत चालू ठेवण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी, ‘सोलोकोरस’ पाहायला हवा!.......

लेखक-कलाकार आणि त्यांना लगाम घालणारी शासनव्यवस्था, या दोन शक्तींत कायमच रस्सीखेच सुरू असते. म्हणूनच ‘बागी अलबेले’सारख्या कलाकृती सतत सादर होत राहिल्या पाहिजेत…

सामान्य दर्जाची कला समाजावर कितपत प्रभाव टाकू शकते? अशा कलांवर सरकारने बंदी घालावी का? यात सरकारात नोकरी करणाऱ्या नोकरशहांचा अहम गोंजारला जातो का? या नाटकात एक महत्त्वाचा संवाद आहे. ‘कलाकारों का कब्रस्तान’च्या दिग्दर्शकाला पोलीस इन्स्पेक्टर सांगतो- ‘नवीन नियमांप्रमाणे सत्य दाखवणे गुन्हा आहे. तुम्ही देशद्रोही आहात’. त्यावर दिग्दर्शक उत्तरतो- ‘आरसा तोडून कोणाचं भलं झालं आहे?’ .......

आढावा राजदत्तांच्या चित्रपटांचा : त्यांच्याइतकी पारितोषिके आजपर्यंत कोणत्याही दिग्दर्शकाला मिळालेली नाहीत. १९८२ ते १९८६ या सलग पाच वर्षांमध्ये दिग्दर्शनाची सात पारितोषिके मिळवण्याचा मोठा विक्रम त्यांच्या नावावर आहे

‘पाठलाग’चे चित्रीकरण सुरू असताना राजाभाऊंना आई खूपच आजारी असल्याचा निरोप आला. त्यांनी दत्ताजींना गाण्याचे कोणते प्रसंग कसे चित्रित करायचे ते सांगितले आणि ते पुण्याला निघून गेले. त्यांनी गाण्याचे प्रसंग चित्रित केले. ते पाहिले आणि त्यांनी दत्ताजींची पाठ थोपटली. संकलनाच्या वेळी वसंत साठे व एम. बी. सामंत हे दोघेही उपस्थित होते. त्यांनी तेथेच ‘माझा एक चित्रपट राजाभाऊ करणार आणि दुसरा दत्ता करणार’ असे जाहीर केले.......

दशकभरापूर्वी मध्यमवर्गावर ‘ब्रँड आमीर खान’च्या असलेल्या मोहिनीमुळे असा सिनेमा अगदी सहजपणे तगून गेला असता, परंतु आज ‘लालसिंग चढ्ढा’च्या अपयशाने त्या ब्रँडच्या शेवटावर शिक्कामोर्तब केले आहे!

‘ब्रँड आमीर खान’ला लागलेले ग्रहण खूप मोठा धडा देताना दिसत आहे. आजचे प्रगतीशील राजकारण हा सत्तेत प्रभावी स्थानी असलेल्या नीतिवानांच्या कृतीचा परिपाक जराही नाही, तर राजकीय संघर्षात टिकून राहण्यासाठी विविध सामाजिक घटकांना एकत्र करून त्यांना सत्तेच्या पटावर चुकीच्या दिशेला घेऊन जाण्याचा हा परिणाम आहे. जाहीर दिलगिरी व्यक्त करून आणि आपल्या देशभक्तीची ग्वाही देऊनही, आमीर या सिनेमाला अपयशापासून रोखू शकला नाही.......

संजय गणोरकर : “सुपात धान्य आहे आणि सुपाबाहेर शेतकऱ्यांची प्रेतं पडली आहेत असं ते शिल्प... त्यातून मला दाखवायचं होतं की, लोकांना धान्य हवंय, पण शेतकरी नकोय.”

हिवाळ्याचे दिवस होते. मोटारसायकलने निघालो होतो. माझ्यापुढे एक रिक्षा होती. त्यातून पांढर्‍या कपड्यात बांधलेल्या प्रेताचं डोकं आणि पाय बाहेर आले होते. बराच वेळ त्या रिक्षाच्या मागे होतो. मी खूप अस्वस्थ झालो. एक क्षण असा की, मला असह्य झालं. मग मी ओव्हरटेक केलं, तेव्हा मला रिक्षात तोंडाला काही न बांधलेले दोन म्हातारे आई-वडील मांडीवर प्रेत घेऊन बसले आहेत आणि रिक्षा चालवणाऱ्यानं तोंड झाकलं असल्याचं दिसलं.......

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सत्याचा अपलाप आहे. त्याच्या निर्मितीमागील भावना शिव म्हणजे कल्याणकारक नाही. त्यामुळे एक कलाकृती म्हणून त्यात सौंदर्य नाही!

हा एक राजकीय चित्रपट आहे, असे विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टपणे सांगितले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कोण कोणाचा प्रचार करत आहे, हे समजण्यासाठी बुद्धीवर अधिक जोर देण्याचीदेखील आवश्यकता नाही. मग राजकारणासाठी आपल्या देवतांचा असा वापर केल्याबद्दल तथाकथित संस्कृतीरक्षक आक्षेप का घेत नाहीत? दिग्दर्शकाची दृष्टी स्वार्थामुळे विकृत झाली आहे. त्यामुळे त्याने एक आभासी विश्व निर्माण केले आहे जे वास्तवापासून दूर आहे.......

‘जय भीम’ : भारतीय समाजामध्ये व्यक्तीच्या आणि समाजसमूहांच्या सामाजिक व न्यायिक प्रतिष्ठेकरता लढले जाणारे विविधांगी विचारांचे लढे अंतिमतः आंबेडकरांच्या विचारमार्गानेच परिपूर्ण होऊ शकतात, हा विधायक मूल्यसंदेश या चित्रपटाने भारतीय समाजापुढे ठेवला आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान, त्यांचे लोकशाहीवादी तत्त्वज्ञान आणि त्यांचे एकंदर विचारभान देशातील सर्व लोकांच्या मुक्तीचा सर्वाधिक कालसुसंगत असा वारसा ठरतो, याचे कलात्मक पातळीवरील आविष्करण हा चित्रपट करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या आजच्या कालखंडात आंबेडकरांचा संविधानिक आणि वैचारिक वारसा हा नित्यनूतन ठरतो, याचे भान हा चित्रपट भारतीय समाजाला गंभीरतापूर्वक देतो.......

समीर चंदा हे एक विद्यापीठ होते. त्यांनी घडवलेली कला दिग्दर्शकांची एक पिढी आत्मविश्वासाने मोठमोठ्या चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन करत आहे

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत कलादिग्दर्शनाचा त्यांचा अनुभव दीर्घ होता. त्या दोघांचे समीकरण इतके जुळले की, केवळ एकमेकांच्या दृष्टादृष्टीतूनच चित्रपटाशी निगडित आवश्यक गरजा समीरदा ओळखत. मणिरत्नम यांच्याव्यक्तिरिक्त श्याम बेनेगल, गौतम घोष, सुधीर मिश्रा, राकेश ओमप्रकाश मेहरा, सुभाष घई, विशाल भारद्वाज यांसारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर कला-दिग्दर्शनाचा त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे.......

भारतीय नृत्यासाठी ‘भारतीय संस्कृती’ची जाण असणं आवश्यक आहे, वाचन चांगलं हवं आणि मेहनतीची तयारी हवी. ते सगळं माधुरीमध्ये आहे.

हिंदी सिनेसृष्टीत १९८८ साली ‘तेजाब’मध्ये एका मुंबईच्या मराठी मुलीनं ‘एक दो तीन’ करत जो धुमाकूळ घातला, तो ‘न भूतो न भविष्यति’ असा होता. त्या सिनेमाचा नायक जरी अनिल कपूर असला तरी ‘तेजाब’ माधुरी होती. तिनं रंगवलेलं पात्र वडिलांच्या शोषणाला बळी पडलेलं व स्टेजवर पैशासाठी काम करणारं असतं. माधुरीनं या भूमिकेत कमालीची तीव्रता दाखवली आहे. उत्कृष्ट हिंदी उच्चार हे या सिनेमातलं नवख्या माधुरीचं मोठं वैशिष्ट्य आहे.......

शैलेन्द्र : ‘गीतकार शैलेन्द्र ही सिनेसंगीताच्या दुनियेत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट होती. चित्रपटगीतांना शैलेंद्रने साहित्याची उंची गाठून दिली.’

शैलेन्द्र फक्त ४३ वर्षांचे आयुष्य जगले. ‘ये रात भीगी भीगी’ या गाण्यातल्या दुसऱ्या कडव्यातल्या अंतर्मुख करणाऱ्या ‘जो दिन के उजाले में न मिला, दिल ढूंढे ऐसे सपने को, इस रात की जगमग में डूबी मैं ढूंढ रही हूं अपनेको’ या ओळी ऐकल्यावर गीतकार गुलज़ारचे शब्द आठवतात- “गीतकार शैलेन्द्र ही आमच्या गीतकारांच्या दुनियेत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट होती. चित्रपटगीतांना शैलेंद्रने साहित्याची उंची गाठून दिली.”.......

‘किंग ऑफ द रॉक’ एल्विस अरोन प्रिस्लेशिवाय विसाव्या शतकातल्या संगीताला नवीन दिशा देणाऱ्या महान संगीतकारांची यादी पूर्ण होऊ शकत नाही!

एल्विसने अमेरिकन संगीताचा बाजच बदलून टाकला. त्याचा प्रभाव नंतर आलेल्या मॅडोना, जॉर्ज मायकेल, एमिनेम, जस्टीन टिंबरलेक अशा अनेक  गायकांवर पडला. ब्लूज संगीत एल्विसच्या प्रभावातून बाहेर पडू शकत नाही. ते कृष्णवर्णीयांचं, पण या गोऱ्या एल्विसने ते आपलंसं केलं. काळ्या-गोऱ्यांमधील दरी मिटवणारी व्यक्ती म्हणून एल्विसकडे पाहिलं जातं. एल्विसने या संगीताचा ताबा घेतला आणि संगीतविश्व ढवळून काढून त्यात आमूलाग्र परिवर्तन केलं.......

नय्यारा नूर यांनी कदाचित ‘त्या’ वेळेच्या आधीच थांबण्याचा निर्णय घेतला असेल… पण त्यामुळेच त्यांचा ‘दौर’ लक्षात राहण्याची जास्त शक्यता आहे

“या गाण्याच्या ओढीनेच मला माझा नवरा मिळवून दिला… शहरयार झैदी. ते आंतर-महाविद्यालयीन संगीत स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा माझे प्रतिस्पर्धी असायचे आणि नेहमी मला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळायची, तर त्यांना दुसऱ्या क्रमांकाची. ते हेली कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधित्व करायचे. एकदा बेगम अख्तरची रेकॉर्ड शोधताना दुकानात आमची गाठ पडली. एकच रेकॉर्ड आणि आम्ही दोन गिऱ्हाईक! ‘आपण लग्न करू आणि एकच रेकॉर्ड ऐकू!’.......

सैतान म्हणून स्वत:भोवतीची अनेक युगांची कवचं काढल्यावर ‘लुसिफर’ला स्वतःच्या खऱ्या रूपाची जाणीव होते. आपला, माणसांचा प्रवासही असाच असतो!

‘नेटफ्लिक्स’वरील ‘लुसिफर’ (२०१६-२१) या मालिकेमध्येही तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या अंगानं लुसिफर म्हणजेच सैतानाच्या गोष्टीचा वापर केला आहे. ही मालिका खूपच ‘इंटरेस्टिंग’ आहे. या मध्ये जशा माणसाच्या गोष्टी दाखवल्या आहेत, तशाच पौराणिक वा दैवी पात्रांच्याही. त्या समांतर पद्धतीनं चालू राहतात. ‘जादुई वास्तववादा’चा आधार घेत मानवी स्वभाव, आसक्ती, इच्छा यांना नाट्यमय पद्धतीनं मांडण्यात आलं आहे.......

सत्यजित राय यांनी नव्या ध्वनीची आकर्षक वळणे रेखून आपली चित्रसांगीतिक ओळख पटवण्याचा ध्यास घेतला, हेच खरे त्यांच्या संगीताचे मूलतत्त्व म्हणता येईल!

वैचारिक अंगाला कलानिर्मितीत स्थान नाही, असे सुदैवाने राय यांचे मत नव्हते. याच कारणाने चित्रपटात संगीताने काय कार्य करावे आणि तसे (च) का, या प्रश्नांविषयी त्यांची स्वतःची भूमिका विकसित होत गेली. ही भूमिका चूक की बरोबर, कशीही असो, ती त्यांची स्वतःची होती, हे निश्चित. ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाच्या संगीतातून दिसणारी त्यांची भूमिका चित्रसंगीताला मान्यता देणारी असली तरी त्यांच्या एकंदर दृष्टिकोनाशी विसंगत होती का.......

सत्यजित राय यांची गणना डी सिका, फेडरिक फेलिनी, किंवा अकिरा कुरोसावा यांच्याबरोबर केली गेली. भारतीय सिनेमासाठी ही एक मोठीच गोष्ट होती, आहे

राय यांच्या चित्रपटांचा एका सूत्रात विचार करता येईल की, नाही माहीत नाही, परंतु एक खरे की, माणूस आणि त्याची वृत्ती-प्रवृत्ती हा त्यांच्या चिंतनाचा भाग आहे. ते परिस्थिती हादेखील एक महत्त्वाचा घटक मानताना दिसतात. आपल्या चित्रपटांबद्दल सत्यजित राय यांनी असे म्हटले होते की, मध्यमवर्गीय बंगाली संस्कृतीमधील प्रेक्षक मला अभिप्रेत असतो. त्याचमुळे त्यांनी बदलत चाललेल्या मूल्यांना स्वत:चे असे एक ‘स्टेटमेंट’ दिले.......

पी. शेषाद्री यांना सिनेमा म्हणजे ‘इंटरटेनमेन्ट, इंटरटेनमेन्ट आणि फक्त इंटरटेनमेन्ट’ हे मान्य नाही, ते म्हणतात- सिनेमा म्हणजे ‘एन्लायटनमेन्ट, एन्लायटनमेन्ट आणि फक्त एन्लायटनमेन्ट’!

चित्रपटसृष्टीतील कलामूल्य कमी दर्जाचे ठरवत असल्याची खंत व्यक्त करणारे पी.शेषाद्री आजही सामाजिक जाणीवेचा वसा घेऊन चित्रपट निर्माण करत आहेत. त्यांच्या चित्रपटांत तथाकथित मनोरंजन नाही, मोठी स्टार कास्ट नाही म्हणून ओटीटी माध्यमावर हे चित्रपट उपलब्ध होऊ शकत नाहीत. चांगल्या चित्रपटांची ओढ असणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढली तर कदाचित हे चित्र बदलू शकेल. आपण त्या दिवसाची वाट पाहू या.......

वाईट रिव्ह्यू लिहिण्यासाठी पेन परजून बसलेला ईगो आपला पराभव खुल्या मनाने मान्य करतो. हे करत असताना आपली पत गमावतो, प्रामाणिकपणाची किंमत मोजतो...

‘रॅटटुई’ हा चित्रपट आपल्याकडील पंचतंत्राच्या कुळीतली कथा घेऊन आला आहे. गुणवत्ता नसून केवळ वारसा म्हणून मालकी/सत्ता हाती आलेले, गुणवत्ता असूनही हलक्या कुळातील असल्याने हक्काचे स्थान नाकारले गेलेले, त्यांना ते मिळते आहे, असे दिसताच ते हिरावून घेण्याचा आटापिटा करणारे अनुक्रमे लिंग्विनी, रेमी (उंदीर) आणि स्किनर ही तीन पात्रे मानवी प्रवृत्तींची प्रतीके आहेत. यापलीकडे चौथे महत्त्वाचे पात्र आहे अंतोन ईगो.......

‘शिकवण्या’पेक्षा ‘शिकणं’ अधिक फलदायी, आनंददायी असतं, पण तो केवळ शब्दांचा खेळ इतकंच महत्त्व आपण त्याला देतो. तो विचार वास्तवदर्शी आहे, हे समजण्यासाठी पायपरच्या नजरेनं जग पाहता यायला हवं!

वय वाढून बसलेल्या त्याच्या मागच्या पिढीला खडकामागे लपून लाटेपासून बचाव करता येतो, याची समज नव्हती, तशीच लाटांना न घाबरता अंगावर घेतलं तर भरपूर अन्न कमी श्रमात जमा करता येतं याचीही. साहजिकच पिलाच्या ‘संस्कारा’त ती असण्याचं कारण नव्हतं. खडकाआडची सुरक्षितता ही त्याच्या भीतीच्या प्रेरणेची प्रतिक्रिया म्हणून लागलेला शोध होता, तर अन्नाचा वेध घेण्याचं कौशल्य बाहेरच्या कुणाकडून त्यानं आत्मसात केलं .......

‘आटपाडी नाईट्स’ : साधारण विरुद्ध धडधाकट शरीरयष्टीचा पुरुष यांच्याबाबतच्या लैंगिक गैरसमजाला छेद देण्याचा प्रयत्न

‘भारतात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश केला गेलेला आहे. परंतु लैंगिक शिक्षण हे अभावानेच शिकवले जाते. आजही लैंगिक शिक्षणावर बोलणे लाजिरवाणी कृत्य मानलं जातं.’ या वाक्यातून ध्वनीत होणारा अर्थ या सिनेमाचा गाभा आहे. वैवाहिक जीवनात लैंगिक गैरसमजामुळे निर्माण होणारी अनागोंदी कुटुंबाबरोबर सामाजिक रचनेला कशी घातक आहे, याचं अत्यंत मिश्किलपणे चित्रण दिग्दर्शकानं उभं केलं आहे.......

‘द काइट रनर’ बघताना मानवी जीवनात अपराधीपणा, विश्वासघात, नि:स्वार्थी प्रेम या भावनांचं केवढं महत्त्वाचं स्थान आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती येते!

एके दिवशी अमीरला त्याच्या वडिलांच्या अफगाणीस्तानातील मित्राचा, रहिमचा निरोप मिळतो. या भेटीत रहिम अमीरला जे सांगतो ते ऐकून अमीर अनेक पातळ्यांवर उदध्वस्त होतो. पहिलं म्हणजे अफगाणीस्तानचा त्याग करून अमेरिकेत आश्रय घेणं, यात मातृभूमीचा विश्वासघात आहे. हा धक्का अमीर कसाबसा पचवतो तर दुसरा धक्का त्याची वाटच बघत असतो. रहिम अमीरला सांगतो की, हसन त्याचा सावत्र भाऊ आहे. अमीरच्या वडिलांचे व हसनच्या आईचे संबंध असतात.......