तेलुगू सिनेमांत हैदराबादच्या इतिहासाचे जाणूनबुजून विकृतीकरण केले जाते…
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सी. यामिनी कृष्णा
  • ‘वीरा तेलंगणा’, ‘राजन्ना’, ‘माँ भूमी’ आणि ‘अनहिअर्ड’ या सिनेमांतील व्यक्तिरेखांचा कोलाज
  • Tue , 03 October 2023
  • कला-संस्कृती चलत्-चित्र खिडकी कलेक्टिव्ह Khidki Collective हैदराबाद संस्थान Hyderabad State निज़ाम Nizam मुक्तिसंग्राम रझाकार - सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद Razakar : The Silent Genocide of Hyderabad असदुद्दीन ओवैसी Asaduddin Owaisi एमआयएम MIM ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन All India Majlis-e-Ittehadul Muslimeen

‘खिडकी कलेक्टिव्ह’ (Khidki Collective) हा इतिहास, राजकारण आणि संस्कृती यांवरच्या सार्वजनिक चर्चेला प्रोत्साहन देणाऱ्या युवा इतिहासकारांचा एक संच\ग्रूप आहे. दख्खनचा बहुभाषिक-बहुधर्मीय इतिहास, संस्कृती आणि साधनं जपणं, हा त्यांचा उद्देश आहे. त्यांची सध्या हैदराबाद मुक्ती संग्राम आणि १९४८च्या पोलीस अ‍ॅक्शनवरील ‘एकच कथानक असल्याचे धोके’ ही मालिका ‘newsminute’ या इंग्रजी पोर्टलवर प्रकाशित होत आहे. ‘खिडकी कलेक्टिव्ह’च्या स्वाती शिवानंद, यामिनी कृष्ण आणि प्रमोद मंदाडे यांनी हे लेख एकत्र आणले आहेत. ही मालिका कन्नड, उर्दू, तेलुगूमध्येही प्रकाशित होत आहे. आजपासून ती ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होईल.

ही मालिका १९४८च्या पोलीस कारवाईबद्दल विविध पर्यायी दृष्टीकोन मांडण्याचे काम करते. हैदराबाद संस्थानाच्या ‘मुक्तीसंग्रामा’च्या स्वरूपातल्या प्रभावी मांडणीचा सध्याच्या द्वेषयुक्त राजकारणासाठी वापर होतो आहे. ही मालिका या ढोबळ मांडणीला आव्हान देऊन, या घटनेतील गुंतागुंत उलगडण्याचे काम करते.

या मालिकेतला हा दुसरा लेख...

.................................................................................................................................................................

‘रझाकार - सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद’ या हैदराबादवरील एका ‘ऐतिहासिक चित्रपटा’ची घोषणा २०२३च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करत अधिकृतपणे करण्यात आली. त्याच्या १४ जुलै २०२४ रोजी झालेल्या ‘पोस्टर लाँच’ कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाचे तत्कालीन तेलंगणा प्रमुख बंडी संजय कुमार यांच्यासारखे मोठे नेते उपस्थित होते. तेलंगणातील आणखी एक महत्त्वाचे भाजप नेते गुडूर नारायण रेड्डी यांनी या प्रकल्पाला भाजपने दिलेल्या पाठिंब्याची जाहीरपणे वाच्यताही केली.

हिंदुत्वादी संघटनांनी १९९०च्या दशकापासून ‘१७ सप्टेंबर’ या दिवसाला हैदराबाद राज्याच्या ‘मुस्लीम’ रझाकारांच्या (मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन अंतर्गत निमलष्करी स्वयंसेवक दल) आणि ‘जुलमी मुस्लीम निजामा’च्या हिंदूंवरील अत्याचारापासूनचा ‘मुक्तीदिन’ म्हणून संबोधण्यास सुरुवात केली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’चे  (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यासारख्या ‘रझाकारां’सोबत काम करून, स्वतंत्र राज्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या आकांक्षांचा विश्वासघात केला आहे, असे नुकतेच अमित शहा यांनी जाहीरपणे बोलले आहेत.

अशा प्रकारे शब्दांचा सैल वापर करत हिंदुत्वादी पक्ष कोणत्याही मुस्लिमाला ‘रझाकार’ ठरवण्यास आणि त्याद्वारे ‘हिंदूविरोधी’ व ‘भारतविरोधी’ ठरवण्याची मोकळीक घेतो. ‘रझाकार - सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद’सारखे चित्रपट हे इतिहासाचे पुनर्लेखन, मिथकांचा प्रचार आणि त्यांना सतत केंद्रभागी ठेवून भीतीचे दाट धुके निर्माण करण्याच्या मोठ्या प्रकल्पाचा भाग आहेत.

परंतु ‘सायलेंट जेनोसाईड’ ही ‘रझाकार’ या कल्पनेवरील लोकप्रिय ‘सांस्कृतिक निर्मिती’च्या परंपरेतील एक नवी भर असेल. हैदराबाद राज्याचा इतिहास आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी झालेल्या त्याच्या विलिनीकरणाचा संदर्भ असणारे अनेक चित्रपट आहेत. त्यांचा इतिहास १९७९पर्यंत मागे जातो. त्या वर्षी गौतम घोष दिग्दर्शित ‘माँ भूमी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

१९४६ ते १९५१ दरम्यान झालेल्या तेलंगणातील सशस्त्र बंडाची कथा मांडणारा हा पहिला चित्रपट. त्याची सहनिर्मिती बी. नरसिंग राव या कम्युनिस्ट चित्रपट निर्मात्याने केली आहे. त्यांना तेलंगण चळवळीच्या इतिहासाचे सिनेमा माध्यमातून दस्तऐवजीकरण करायचे होते. हा चित्रपट तेलंगणातील शेतकरी आणि मजुरांच्या दृष्टीकोनातून हैदराबाद राज्याच्या विलिनीकरणाचे चित्रण करतो.

त्याचबरोबर तो तेलंगणातील खेड्यांमध्ये दोरा (प्रबळ जातीचे जमीनदार) यांच्या अत्याचारांचे आणि ‘संघम’ (ग्रामस्तरीय कम्युनिस्ट संघटना) यांनी शेतकरी आणि शेतमजुरांना दोरांच्या विरुद्ध कसे एकत्र केले, याचेही चित्रण करतो. यामध्ये मुस्लिमांना शेतकरी आणि मजुरांचे ‘कॉम्रेड’ आणि ‘सहकारी’ म्हणून दाखवले आहे.

हा चित्रपट रझाकारांचा मुस्लिमांशी सरळ सरळ संबंध जोडण्यास विरोध करतो. त्याऐवजी आपल्याला दिसते की, हैदराबाद भारतीय संघराज्यात सामील झाल्यानंतरही, एके काळी निजामाच्या हाताखाली काम करणारे दोरा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सशस्त्र बंड सुरू ठेवण्यास भाग पाडतात. किंबहुना भारतीय लष्कराच्या हातून शेतकरी मरताना दाखवले आहेत. विलीनीकरणानंतरही तेलंगणात कशी सरंजामशाही चालू होती, हे या चित्रपटाच्या शेवटच्या भागातून स्पष्ट होते.

त्यानंतर तीन दशकांनी आर. नारायण मूर्थीचा ‘वीरा तेलंगणा’ (२०१०) आला. २०००च्या दशकात तेलंगणा राज्याच्या चळवळीचे पुनरुत्थान झाल्यामुळे १९४०च्या दशकातील बंड आणि इतर घटनांमध्ये रस वाढला होता. आपल्या कलाकृतींतून डावा विचार मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आर. नारायण मूर्थी यांच्या या चित्रटातील शेतकरी बंडाचे कथन ‘माँ भूमी’सारखेच होते.

हा चित्रपट तेलंगणातील बंडखोरीमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तींच्या वास्तविक जीवनातील कथांवर बेतलेला आहे. यात शेख बंदगी (प्रबळ जातीचे जमीनदार विसनूर रामा चंद्र रेड्डी यांच्या अन्यायाला आव्हान दिल्यामुळे या मुस्लीम शेतकऱ्याची हत्या केली गेली), मखदूम मोहिउद्दीन (उर्दू मार्क्सवादी कवी आणि चळवळीचा एक प्रमुख नेता), शोएबुल्ला खान (उर्दू दैनिकाचा संपादक, निजाम आणि रझाकारांविरुद्ध लिहिल्याबद्दल हत्या झाली), चकाली आइलम्मा (विसनूर रामा चंद्र रेड्डी विरुद्ध बंड करणारे चळवळीचे आणखी एक प्रमुख महिला नेत्या), दोड्डी कोमरय्या आणि तनू नाईक (संघर्षात शहीद झालेले शेतकरी), यांच्या भूमिका आहेत. त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आंध्र महासभेची चळवळ आणि काँग्रेसची भूमिकादेखील चित्रित करण्यात आली आहे.

तथापि, निजामाकडून हैद्राबाद राज्याबाहेरील मुस्लीम पुरुषांना सैन्यात सामील करून घेतले जात असे, असे दाखवून ‘माँ भूमी’च्या उलट ‘वीरा तेलंगणा’ इस्लाम आणि रझाकार यांच्यात एक स्पष्ट संबंध प्रस्थापित करतो. शेतकरी उच्च जातीच्या जमीनदारांच्या अन्यायाचा बळी ठरत होते, तरी अशा प्रकारे रझाकारांची हिंसा ही केवळ धार्मिक हिंसा म्हणून सादर केली गेली.

२०११मध्ये जेव्हा तेलंगण राज्य आंदोलन त्याच्या शिखर टप्प्यावर होते, तेव्हा ‘राजन्ना’ (राज्यसभा खासदार व्ही. विजयेंद्र प्रसाद लिखित-दिग्दर्शित आणि नागार्जुन अभिनित) हा चित्रपट आला. एसएस राजामौली यांचे विजयेंद्र प्रसाद हे वडील आहेत आणि त्यांनी ‘आरआरआर’सह अनेक ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटांची कथा लिहिली आहे. ते आता भाजपची मातृसंस्था आणि वैचारिक पालक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरव करणाऱ्या चित्रपट आणि वेबसीरिजवर काम करत आहेत.

‘राजन्ना’मध्ये उजव्या हिंदू विचारसरणीला सोयीचे असेच ऐतिहासिक कथन सादर करण्यात आहे. नायक राजन्ना (नागार्जुन) ‘स्वातंत्र्यसैनिक’ असतो. तो भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यानंतर महाराष्ट्रातून तेलंगणात येतो. तेथील शेतकरी आणि आदिवासींच्या, विशेषत: आदिलाबाद जिल्ह्यातील नेलाकोंडापल्ली गावात सरंजामदार डोरास आणि डोरासनी (प्रबळ जातीचे जमीनदार आणि जमीनदारीन) यांनी केलेली दुर्दशा पाहून अस्वस्थ होतो. मग तो आपल्या गायनातून शेतकऱ्यांना डोरा आणि डोरास यांच्याविरुद्ध बंड करण्याची प्रेरणा देतो.

डोरा आणि ‘मुस्लीम’ राज्यकर्त्यांच्या अत्याचाराचे चित्रण करताना या चित्रपटात असेही दाखवले आहे की, मुस्लीम राज्यकर्त्यांनी स्त्रियांवर ‘स्तन’कर (Breast tax) लादला. केरळमध्ये एकेकाळी हा कर लागू करण्यात आलेला होता. तिथे मागास जाती आणि दलित महिलांना त्यांचे स्तन झाकण्याची परवानगी नव्हती. त्यासाठी त्यांना कर भरावा लागत असे. हैदराबाद राज्याने असा कर लादल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. तरीही या चित्रपटात त्याचा वापर करण्यात आला आहे.

यात रझाकारांच्या मदतीने एका डोराने राजण्णाला मारल्याचे दाखवले आहे. काही वर्षांनंतर त्याची आठ वर्षांची मुलगी मल्लम्मा डोरा आणि डोरास यांच्या अत्याचारापासून गावाला मुक्त करण्याचा विडा उचलते आणि दिल्लीला जाऊन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भेट घेऊन ‘मुस्लीम’ राज्यकर्त्यांची राजवट रद्द करण्याची विनंती करते. जणू ही तेलंगणातील लोकांची भारतीय संघराज्यात सामील होण्याची ‘सार्वत्रिक’ इच्छा होती!

या चित्रपटाततली राजन्ना ही पूर्णपणे काल्पनिक कथा ‘संघम’ या जनसंघटनेची आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सहभागाची भूमिका अत्यंत चाणाक्षपणे पुसून टाकते. तेलंगणातील बंडखोरी हा एक सामूहिक प्रयत्न होता, या चित्रपट मात्र त्याला एका व्यक्तीच्या कथेत परावर्तीत करण्यात आले आहे.

इतिहासकार ए.जी. नुरानी आणि सुनील पुरुषोत्तम यांच्या म्हणण्यानुसार १९४०च्या दशकात, मराठवाडा आणि त्याच्या सभोवतालच्या भागात हिंदू उजव्या संघटना मोठ्या प्रमाणात कार्यरत होत्या. त्यांच्या सदस्यांनी हैदराबाद राज्यातील मालमत्ता आणि पायाभूत सुविधांवर हल्ले केले. राजन्ना हे पात्र त्यावरून बेतल्यासारखे वाटते. तेलंगणाच्या बंडात उजव्या हिंदू संघटना किंवा त्यांच्या ‘स्वातंत्र्यसैनिकां’ची कोणतीही भूमिका नसताना, अशा प्रकारचे चित्रण वास्तव आणि ऐतिहासिक सत्य धूसर करण्याचेच काम करते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

शिवाय यातील चवीपुरते घेतलेले ‘चांगला मुस्लीम’ असलेल्या ‘स्वातंत्र्यसैनिका’चे पात्र वगळता, इतर सर्व मुस्लीम पात्रे शेतकरी आणि महिलांवर अत्याचार करताना दाखवली आहेत. या चित्रपटात रझाकारांची हिंसा ही मुस्लिमांनी हिंदूंवर केलेला जुलूम म्हणून दाखवली आहे. जातीय बाजू आणि हिंसाचाराच्या इतर गुंतागुंतीच्या बाबींना कानाआड केले आहे.

तेलंगणाच्या निर्मितीनंतर अगदी अलीकडे ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ वर ‘अनहिअर्ड’ ही ऐतिहासिक नाट्य असलेली वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. ही मालिका १९२०च्या दशकात सुरू होते आणि सुरुवातीलाच काँग्रेसच्या स्वयंसेवकांची हत्या करणाऱ्या अन्वर नावाच्या माणसाचा उल्लेख करते. रझाकार दल १९३०च्या दशकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आले आणि हैदराबाद प्रदेष काँग्रेसची स्थापना १९३८मध्ये झाली. मात्र ही मालिका अस्तित्वात नसलेल्या इतिहासावर वर्तमानातील राजकारण थोपवून करून हैदराबाद राज्याच्या इतिहासाला ‘जमातवादी’ दाखवते.

२०१६ साली आलेल्या ‘टेरर’ या सिनेमात प्रियदर्शी पुलीकोंडा या अभिनेत्याने क्रांतिकारक बद्रीची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याला हिंसेद्वारे वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवायचे असते. त्याला नंतर हैदराबाद राज्यात फाशीची शिक्षा सुनावण्याली जाते. या पात्राचे स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्याशी साम्य दिसते. प्रत्यक्षात त्या वेळी पंजाब आणि हैदराबादच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत फारसे साम्य नव्हते. शिवाय एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हैदराबाद राज्यात फाशीची शिक्षा रद्द करण्यात आलेली होती. ‘राजण्णां’प्रमाणेच हा चित्रपटही इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास करतो.

राष्ट्रवाद हा या सगळ्याचा मुख्य आधार आहे. गांधी आणि नेहरू यांची सविस्तर चर्चा केली जात असताना, तेलंगणातील बंडखोरीचा फक्त एकदा उल्लेख येतो. त्यामुळे यात हैद्राबाद राज्याचा तपशील क्षुल्लकपणे येतात. १९४८च्या पोलीस कारवाईत हैदराबादच्या विध्वंसाचा उल्लेख करताना ‘अनहिअर्ड’ने चाणाक्षपणे हैदराबादवासियांवर दोष ठेवला आहे.

हैदराबादमधील विलयपूर्व आणि नंतरच्या हिंसाचाराचे श्रेय पूर्णपणे रझाकारांना दिले जाते, ज्यामध्ये भारतीय सैन्याने केलेल्या हिंसाचाराचा आणि हजारो मुस्लिमांच्या हत्येचा उल्लेखही नसतो. निजामाच्या सैन्याने भारतीय पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून पोलीस कारवाई केली गेली, हेदेखील चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. निजाम भारतीय संघराज्यात सामील झाला असता, तर हैद्राबादला पोलीस कारवाई आणि हिंसेपासून वाचवता आले असते, यावर जोर देण्यात आला आहे.

विशिष्ट समकालीन राजकीय परिप्रेक्ष्य असल्याने रझाकारांचे चित्रण करणाऱ्या या सर्व कृतींमध्ये काही समान घटक आहेत.

यामध्ये रझाकार रूमी टोपी आणि शेरवानी घातलेला दिसतो, जो अनेकदा उर्दूमध्ये बोलतो. उर्दू ही एक राज्य भाषा होती. आणि म्हणूनच अगदी निजाम राजवटीच्या शेवटी तिला विरोध झाला, तरी निजामाच्या राजवटीच्या समाप्तीपर्यंत विविध धर्मातील लोकांनी तिचा वापर केला. निजाम राजवटीला कट्टर विरोध करणारे तेलुगू कवी दशराधि रंगाचार्य यांनीही आपल्या आठवणींमध्ये या भाषेबद्दलच्या प्रेमाविषयी लिहिले आणि त्यावर कोणताही जातीय रंग लादू नये, असे प्रतिपादन केले आहे. तथापि अशा प्रकारचे व्यंगपूर्ण चित्रण रझाकार आणि मुस्लिमांचे ‘एकजीनसीकरण’ करतात.

आणखी एक म्हणजे वरील सर्व कलाकृती या भारतीय लष्कर आणि आक्रमक हिंदूंकडून मुस्लिमांविरुद्ध पोलिसांच्या कारवाईनंतर झालेल्या हिंसाचारावर मौन बाळगून आहेत. सुंदरलाल समितीच्या अहवालानुसार या हिंसाचारात कमीत कमी २७,००० ते ४०,००० जीव गेले. त्यापैकी बहुतेक जण मुस्लीम आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तेलुगू चित्रपटांमध्ये मुस्लिमांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जात नाही, कारण त्यात मुख्यतः हिंदू विश्वाची कल्पना असते. त्यात मुस्लीम पात्र केवळ चवीसाठी असतात.

तेलंगणाची अस्मिता, स्वतंत्र राज्याची मागणी आणि निर्मिती यासाठी १९४०चा इतिहास महत्त्वाचा बनला आहे. सर्वच पक्ष राजकीय लाभ मिळवण्यासाठी तेलंगणातील शेतकरी बंडाच्या वारशावर दावा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेलंगणातील कोणत्याही प्रकारच्या बंडाशी किंवा आंदोलनाशी कुटलाही संबंध नसलेल्या भाजपला तर तो इतिहास आजकाल फारच महत्त्वाचा वाटू लागला आहे.

‘राजन्ना’सारखे काही ऐतिहासिक चित्रपट त्यासाठी मार्ग तयार करत आहेत. एकदा का एखाद्या चळवळीचे अ-इतिहासीकरण (इतिहासापासून वेगळे करणे) झाले की, राजकीय फायद्यासाठी कोणीही तिचा सहजपणे वापरू करू लागतो.

वरीलपैकी कोणताही चित्रपट जातप्रश्न पुढे आणत नाही. याउलट ‘राजन्ना’ तर केरळमधला स्तन कर उचलून तेलंगणात आणतो. हा कर केरळमध्ये त्रावणकोरच्या उच्च जाती शासक वर्गाने खालच्या जातींवर लादला होता. थोडक्यात, जातीय अत्याचाराचे ऐतिहासिकदृष्ट्या दस्तऐवजीकरण करण्यासाठी जाणूनबुजून मुस्लिमांचे चुकीचे प्रतिमांकन उभे करणे आणि हिंदू त्यांचे बळी असल्याचे दाखवण्यासाठी त्यांना ‘लबाड’ म्हणून सादर केले जाते.

हे कथन हिंदू-मुस्लीम संघर्ष सुलभीकरण करून मांडते. जातीबद्दल बोलायचे झाले, तर तेलंगणाच्या सशस्त्र संघर्षावर दावे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांना अत्याचारी डोरांशी असलेले संबंध मान्य करावे लागतील. पर्यायाने ‘जुलमी मुस्लीम रझाकारां’च्या एकेरी कथेपासून दूर जावे लागेल आणि रझाकार व अत्याचारित शेतकरी यांच्यातील विविध संबंधांबद्दलही बोलावे लागेल. त्यामुळे ते टाळून बाकी सगळे केले जाते. जेव्हा जातीचा मुद्दा केंद्रस्थानी येईल, तेव्हा हिंसाचाराला ज्या हिंदू-मुस्लीम रंगात रंगवलेले आहे, त्याचे नवे रूप समोर येऊ शकते. 

.................................................................................................................................................................

मूळ इंग्रजी लेखासाठी पहा -

https://www.thenewsminute.com/telangana/how-telugu-cinema-has-been-distorting-the-history-of-telangana-rebellion

.................................................................................................................................................................

अनुवाद - रूपेश मडकर

लेखिका सी. यामिनी कृष्णा चित्रपट इतिहास, शहरी इतिहास आणि डेक्कनच्या इतिहासावर काम करतात. त्या ‘खिडकी कलेक्टिव्ह’च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......