सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे...

वागळेंसारख्या ज्येष्ठ पत्रकारावर झालेल्या हिंसक हल्ल्याची बातमी, ‘लोकमान्य लोकशक्ती’ असलेलं ‘लोकसत्ता’सारखं प्रतिष्ठित-नामांकित वर्तमानपत्र इतकं ‘सामान्यीकरण’ करून देत असेल तर…

‘लोकसत्ता’ची ही बातमी वाचून अनेक प्रश्न पडतात. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहेत. ते नुसते पाहताना आपलासुद्धा थरकाप उडतो. हा हल्ला केवळ निखिल वागळे यांनाच ‘टार्गेट’ करून केला गेला, हेही त्या व्हिडिओमधून सरळ सरळ दिसतं. हल्लेखोर केवळ वागळे यांनाच ‘टार्गेट’ करताना दिसतात. तरीही ‘लोकसत्ता’च्या बातमीचं शीर्षक आहे – ‘पुण्यात पुरोगामी कार्यकर्त्यांवर भाजपचा हल्ला’...

मध्यमवर्ग कोण्याही देशाचे बौद्धिक, कलात्मक, वैज्ञानिक वा क्रीडाविषयक नेतृत्व करत असतो, त्याने स्वयंप्रज्ञ होणे थांबवले आहे. तो अंधभक्त व प्रचारक बनला आहे

मध्यमवर्ग नेतृत्वस्थान त्यागून पाठिराखा, अनुयायी बनू लागला आहे. ज्या माध्यमांमध्ये या मध्यमवर्गाची शंभर टक्के उपस्थिती असे, त्यातून तो गायब झालेला आहे. वैचारिक द्वंद्व तो आता टाळतो. वस्तुस्थिती त्याला भिववते. प्रतिवाद आणि दुसरी बाजू त्याची हवा काढते. खुशमस्करी, चापलुसी, स्तुती हे मध्यमवर्गाचे गुण बनले आहेत. पुनरुज्जीवन चाहणाऱ्या हिंदुत्ववादी सामाजिक-राजकीय विचारांचा मध्यमवर्ग आता ‘नवभारता’चा नेता झालेला आहे...

या टीव्ही वाहिन्यांच्या ‘पडद्यावरती’ चाललंय काय? त्यांच्या ‘पडद्याखाली’ चाललंय काय? अगदीच सराईतासारखे काही सेकंदांचे नाट्याविष्कार घडत आहेत...

माध्यमे जर लोकशाही राज्यव्यवस्थेत एवढा थेट हस्तक्षेप करू धजतील, तर उद्याचे पक्ष, त्यांचे विचार आणि देशाचे नेते यांची जडणघडण आणि लालनपालन तीच करत राहतील. म्हणजे माध्यमांचे मालक, त्यांचे संपादकीय हस्तक आणि व्यापार-उद्योग यांमधले मित्र, यांचेच अप्रत्यक्ष राज्य देशावर चालणार असे झाले. तुम्ही विचारपूर्वक मतदान करा की करू नका, राज्यकर्ते तुमचे प्रतिनिधी न बनता या माध्यमिक राज्यसंस्थेची खेळणी बनून जातील ...

पत्रकार ‘आत्मसन्मान’ कार्यालयात गहाण ठेवून कुटुंब चालवण्यासाठी कसेबसे दिवस ढकलत आहेत आणि ‘चौथा स्तंभ’ म्हणून लोकशाहीचे ओझे वाहत असल्याचे उसने अवसान आणत आहेत…

जांभेकर, टिळक-आगरकरांची पत्रकारिता आता राहिली नाही. वर्तमानपत्र हे आता एक विकाऊ ‘प्रॉडक्ट’ बनले आहे. त्याच्याकडून समाजसुधारणेची अपेक्षा बाळगणे अनाठायी. आता पत्रकारितेची उद्दिष्ट्ये काय, तर ‘टू इन्फॉर्म, एज्युकेट अँड एन्टरटेन’. त्यातही ‘इन्फॉर्म’ आणि ‘एन्टरटेन’ हे एकत्र करून ‘इन्फोटेनमेंट’ हा प्रकार चालू आहे. तोही अगदी ‘सुमार दर्जा’चा. याला पत्रकार जबाबदार आहेत, तसेच प्रसारमाध्यमांचे मालकही...

अधेमध्ये बातम्या छापते ते ‘वृत्तपत्र’, जाहिरातींच्या अधेमध्ये बातम्या देणारी ती ‘न्यूज-चॅनेल्स’ आणि जाहिरातींच्या अधेमध्ये मनोरंजन करणारी ती ‘मनोरंजन माध्यमे’…

चॅनेल-माध्यमे ही मूर्तिमंत धंदेवाईकता आहे. कुस्त्यांची दंगल लावावी, तशा चर्चांचे फड लावून, अनेक राजकीय, सामाजिक, क्वचित बौद्धिक मंडळींमध्ये टकरीच्या सांडांप्रमाणे झुंजवून अनेक मार्गांनी त्याचे दाम ते वसूल करत असतात. याव्यतिरिक्त विशिष्ट भूमिकेला झुकते माप देण्यासाठी त्या त्या बाजूच्या मंडळींकडून थेट अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात देणग्या स्वीकारतात... धंदा चोख करतात आणि ‘प्रामाणिकपणाच्या बैलाला ढोल’ म्हणतात...

वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन, विविध धर्माच्या आणि पंथाच्या धर्माधिकाऱ्यांना भेटून जुने पायंडे मोडण्याची पोप जॉन पॉल यांची परंपरा पोप फ्रान्सिस यांनी चालू ठेवली आहे

पाच मार्च २०२१पासून पोप फ्रान्सिस यांनी इराकच्या आपल्या पाच दिवसांच्या ऐतिहासिक दौऱ्याची सुरुवात केली. याआधी पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारताला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात १९८६ला आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ला भेट दिली होती. साधारणतः एखाद्या मोठ्या व्यक्तीला संतपदाचा मान द्यायचा असल्यास पोप स्वतः त्या देशात जाऊन समारंभपूर्वक ही घोषणा करतात...

केतकर हे महाराष्ट्राचे रेनेसाँ व्यक्तिमत्त्व आहे - मानवी अस्तित्वाचा जैवउत्क्रांतीपर व पर्यायाने सामाजिक राजकीय वेध घेणारे! 

त्या वेळेचा ‘मटा’ हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मापदंड होता व मध्यमवर्गीयांच्या तथाकथित बुद्धिमत्तेचे गंडस्थळ. केतकर हे त्याचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यावेळचे ‘मटा’चे प्रत्येक पान संकल्पना, सुसूत्रता व एका अमूर्त समग्रतेने भरलेले असे. त्यातील अदृश्य हात हा संपादकांचा असतो, हे हळूहळू लक्षात येऊ लागले होते. अग्रलेखातील वा विचारातील मांडणी व त्याचा सर्वसमावेशक वैश्विक दृष्टिकोन कोणीही सहजासहजी नाकारू शकत नसे...

अर्णब गोस्वामीच्या अटकेमुळे भारतीय ‘पत्रकारिता’ अजिबातच धोक्यात आलेली नाही. उलट ती मोदी सरकार आणि त्यांच्या छत्रछायेखाली चरणाऱ्या ‘गोदी मीडिया’वाल्यांनीच धोक्यात आणलेली आहे!

अर्णब गोस्वामी यांची ‘पत्रकार’ म्हणून असलेली विश्वासार्हता कधीच धोक्यात आलेली आहे. ‘पत्रकारिते’च्या नावाखाली ते जी काही मीडिया ट्रायल्स, उद्दामपणा करत आहेत, त्यातून एकंदर भारतीय ‘पत्रकारिते’चीच विटंबना होत आहे. ती होऊ द्यायची नसेल तर देशातल्या ‘कणा’ शाबूत असलेल्या पत्रकारांनी, संपादकांनी, प्रसारमाध्यमांनी गोस्वामींच्या अटकेचा संबंध पत्रकारितेशी, माध्यमांच्या स्वातंत्र्याशी लावू नये...

डिजिटल क्रांतीने ‘न्यूज’चं ‘नॉईज’मध्ये, ‘सेन्स’चं ‘सेन्सेशन’मध्ये आणि ‘क्रेडिबिलीटी’चं ‘केऑस’मध्ये रूपांतर केलं आहे!

नवीन माध्यमं आणि तंत्रज्ञानामुळे झालेला मोठा बदल म्हणजे लोकांचा माहितीचा स्त्रोत बदलला आहे. आता पारंपरिक (Traditional Media) नाही, तर नव्या माध्यमांद्वारे लोकांना बातमी आधी कळते. माध्यमांच्या दृष्टीनं हा खूपच मोठा बदल आहे. त्याचं कारण म्हणजे, नव्या माध्यमांचा असलेला वेग. नव्या तंत्रज्ञानामुळे ज्या क्षणाला घटना घडते, त्याच क्षणाला ती लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे वृत्तपत्र आणि टीव्ही या पारंपरिक माध्यमांना धक्का बसला आहे...