मी मराठी वर्तमानपत्रं का वाचत नाही?
पडघम - माध्यमनामा
सुभाष मेहेत्रे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 06 January 2021
  • पडघम माध्यमनामा पत्रकार Journalist पत्रकारिता Journalism वृत्तवाहिन्या News Channel वृत्तपत्र Newspaper करोना Corona अग्रलेख Editorial

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारीचा (१८१२) आणि त्यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले दैनिक सुरू केले तेही ६ जानेवारी (१८३२) रोजीच. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मराठी वर्तमानपत्रांच्या स्थितीगतीचा लेखाजोखा मांडणारा हा लेख...

.................................................................................................................................................................

१.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मराठीतल्या एका आघाडीच्या वर्तमानपत्रातून मला फोन आला. तेव्हा समोरच्या व्यक्तीशी साधारणपणे पुढीलप्रमाणे संवाद झाला -

‘नमस्कार, मी अमूक अमूक. अमूक वर्तमानपत्रातून बोलतोय. तुम्ही आमचे वर्तमानपत्र वाचता का?’

‘नाही वाचत, मी फक्त इंग्रजी वर्तमानपत्रं आणि इंग्रजी न्यूज-फीचर्स पोर्टल वाचतो.’

‘अहो, तुम्ही मराठी असून मराठी वर्तमानपत्र वाचत नाही. अशानं आपली मराठी भाषा कशी टिकणार?’

‘मराठी वर्तमानपत्रं वाचल्याने मराठी भाषा टिकते, असं तुम्हाला कुणी सांगितलं?’

‘अहो, पण मराठी वर्तमानपत्रं वाचायला हवीत. नाहीतर ती टिकणार कशी?’

‘ती टिकवायला हवीत, असं मला वाटत नाही.’

‘बाप रे, तुम्ही फारच धाडसाने बोलताय.’

‘नाही, खरं तेच सांगतोय.’

‘असो, तुम्ही आमचं वर्तमानपत्रं वाचा. येत्या काही दिवसांत आम्ही आमच्या वर्तमानपत्रात वाचक-फ्रेंडली बदल करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आमचे वर्तमानपत्र नक्की आवडेल आधीपेक्षा.’

‘आधी मला आवडायचे तुमचे वर्तमानपत्र, आता आवडत नाही.’

‘का आवडत नाही?’

‘कारण त्यात आवडण्यासारखं काहीच नसतं.’

‘बातम्या, लेख, अग्रलेख, शनिवार-रविवार पुरवण्या ही आमची अनेक वर्षांपासून खासीयत आहे.’

‘होती, आता नाही.’

‘तुम्हाला असं खरंच वाटतं?’

‘हो.’

‘असो, आम्ही लवकरच आमच्या वर्तमानपत्रात वाचकांना केंद्रस्थानी ठेवून काही आमूलाग्र म्हणता येतील असे बदल करत आहोत.’

‘करा, पण मला तुमचं वर्तमानपत्र वाचावंसं वाटत नाही.’

‘आता वाटेल.’

‘माहीत नाही.’

‘तुम्ही फारच नकारात्मक झाला आहात, असं वाटत नाही का?’

‘अजिबातच नाही. तुम्हाला मी खरं तेच सांगतोय.’

‘आमच्या वर्तमानपत्रातलं तुम्हाला काय आवडत नाही.’

‘अख्खं वर्तमानपत्रच आवडत नाही.’

‘म्हणजे नेमकं काय?’

‘बातम्या बंडल असतात. लेख सुमार असतात. अग्रलेख भुक्कड असतात आणि रविवार पुरवण्या वडा-पाव बांधण्याच्या लायकीच्या. अनेकदा बातम्याच अग्रलेख म्हणून खपवलेल्या असतात किंवा इंग्रजीतली माहिती चुरचुरीत शैलीत मराठीत भाषांतरित केलेली असते.’

(तुम्ही इतर कुठले बदल करण्यापेक्षा संपादक किंवा मालक बदला, असं बोलायचा मोह मला झाला होता, पण मी तो प्रयत्नपूर्वक आवरला. कारण इतकीही तुच्छता बरी नाही.)

यावर फोनवरील व्यक्ती गपगार झाली.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

दोन दिवसांनी परत याच वर्तमानपत्रातून एका मुलीचा फोन आला.

परत थोड्याफार फरकाने हेच सगळं संभाषण झालं.

त्यानंतर दोन दिवसांनी परत एका व्यक्तीचा फोन आला. त्याला सांगितलं, ‘याआधी मी तुमच्या वर्तमानपत्रातून फोन केलेल्या दोन व्यक्तींना सांगितलंय. आता तेच परत पुन्हा सांगण्याचा कंटाळा आलाय मला. तुम्ही दुसरा कुणी माणूस शोधा’. त्यावर त्याने ‘हो, का बरं बरं. त्यांची नावं काय होती?’ असं विचारलं. मी सांगितलं –

‘ती मी लक्षात ठेवली नाहीत’.

त्यावर त्याने फोन ठेवून दिला.

परत दोन दिवसांनी याच वर्तमानपत्रातून एका वेगळ्याच व्यक्तीचा फोन आला.

त्याला मी तेच सांगितलं. त्यानेही ‘हो, का बरं बरं. त्यांची नावं काय होती?’ असं विचारलं. मी सांगितलं –

‘ती मी लक्षात ठेवली नाहीत’.

अजून एक-दोनदा याच वर्तमानपत्रातून फोन आले. व्यक्ती त्याच होत्या की, वेगळ्या होत्या, हे मी लक्षात ठेवलं नाही, पण त्यांना मी पुन्हा घशात आलेला रागाचा कढ आवरत सांगितलं की, ‘तुमच्या वर्तमानपत्रातून आतापर्यंत पाच-सात वेळा फोन आलाय. तेच ते पुन्हा पुन्हा सांगण्याचा मला कंटाळा आलाय. तुम्ही कृपा करून नवीन बकरा शोधा’.

२.

मार्चपासून भारतात करोनामुळे लॉकडाउन सुरू झाला. लवकरच सगळं ठप्प होत गेलं. त्यात वर्तमानपत्रांमुळे करोनाचा संसर्ग वाढतो, अशा बातम्या सोशल मीडियातून कुणीतरी दुष्ट बुद्धीने पसरवल्या. त्यामुळे अनेकांनी वर्तमानपत्रं घरी घेणं बंद केलं. बाहेर जाऊन विकत घेण्याची किंवा वाचण्याची सोयही एव्हाना बंद झाली होती. काही दिवस तर लॉकडाउनमुळे वर्तमानपत्रंही बंदच होती. नंतर ती हळूहळू सुरू झाली. अनेक वर्तमानपत्रांनी ‘आम्ही पूर्ण काळजी घेऊन वर्तमानपत्राची छपाई करतो आहोत, वर्तमानपत्रांपासून कुठल्याही प्रकारे करोनाचा संसर्ग पसरत नाही.’ असे खुलासे पहिल्या पानावर छापले. तरीही बरेच लोक वर्तमानपत्रं भीतीपोटी घ्यायला तयार नव्हते. करोनाचा ज्वर हळूहळू कमी होत गेला, तशी वर्तमानपत्रं सोसायटीच्या वॉचमनकडे दिली जाऊ लागली. लोक ते आपल्या सोयीने घरी घेऊन वाचू लागले.

पण दरम्यानच्या काळात अनेकांचं वर्तमानपत्रांचं वाचन बंद झालं होतं. त्यातल्या काहींनी ई-पेपर वाचायला सुरुवात केली होती. काही ऑनलाईन पोर्टल्स वाचू लागले होते. बरेच जण सोशल मीडियावर बराच वेळ घालवू लागले होते. त्यावर अनेक बातम्यांचे सतत अपडेट येत राहतात. अनेक वर्तमानपत्रं, पोर्टल्स सतत बातम्या-लेखांच्या लिंक्स शेअर करतात. त्यांना फॉलो करून लोक बातम्यांबाबत अपडेट राहू लागले.

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

या सर्व प्रकारामुळे अनेक वर्तमानपत्रांचा खप कमी झाला. करोनाचं कारण देत अनेक वर्तमानपत्रांनी रोजच्या अंकाची पानं कमी केली. काहींनी आपल्या फारशा फायद्यात नसलेल्या आवृत्त्या बंद केल्या; कामगारकपात केली, पगारकपात केली. येन केन प्रकारे वर्तमानपत्रांनी तग धरण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मराठीतल्या काही वर्तमानपत्रांचा खप जवळपास २०-२५ टक्क्यांपासून ते ५० टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे आपला खप पुन्हा आधीएवढा करण्यासाठी वर्तमानपत्रं अशा प्रकारे वेगवेगळ्या वाचकांना फोन करत असल्याची माहिती मला काही मित्रांकडून समजली.

३.

मी करोनाच्या आधी म्हणजे जवळपास दीडेक वर्षांपासून मराठी वर्तमानपत्रं वाचणं बंद केलं आहे. त्याआधी मी मराठीतील आघाडीची रोज तीन-चार वर्तमानपत्रं वाचायचो. रविवारी तर सात-आठ मराठी वर्तमानपत्रं विकत घ्यायचो. म्हणजे रोजचे किमान अडीच-तीन तास वर्तमानपत्रं वाचनासाठी द्यायचो. त्याचबरोबर ‘हिंदू’, ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘हिंदुस्तान टाइम्स’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ही इंग्रजी वर्तमानपत्रं; ‘आउटलुक’, ‘इंडिया टुडे’, ‘ओपन’, ‘द वीक’ ही इंग्रजी साप्ताहिकं, ‘फ्रण्टलाईन’ हे पाक्षिक हेही वाचायचो. पण हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की, सगळ्यात बथ्थड मराठी वर्तमानपत्रं आहेत. त्यातल्या बातम्या दिवसेंदिवस कुचकामी होत चालल्या आहेत. बातम्या बऱ्या म्हणाव्यात इतके अग्रलेख बंडल असतात. इंग्रजी मजकुराचा चुरचुरीत शैलीत अनुवाद करून किंवा आपल्या वार्ताहरांनी आदल्या दिवशी दिलेल्या बातम्या दुसऱ्या दिवशी संपादक महाशय आपल्या खास शैलीत लिहून काढतात. त्याला चटकदार शीर्षक देतात आणि पांडित्याचा आव आणत कुणाबद्दल तरी तुच्छता व्यक्त करतात किंवा सरकारला चार खडे बोल सुनावत असल्याचा आव आणतात. पण प्रत्यक्षात ही सगळी बंडलबाजी असते.

वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून खरी बातमी समजण्याचे दिवस आता संपल्यात जमा आहेत. त्यातून फक्त ती बातमी लिहिणाऱ्याची मानसिकता आणि त्याचं भाषिक दारिद्र्य तेवढं समजतं. अग्रलेखातून ना दृष्टीकोन मिळतो, ना कुठला विचार समजतो. बातमीतून जशी खरी बातमी शोधावी लागते, तसंच अग्रलेखातून संपादकाला नेमकं काय म्हणायचंय आणि कशासाठी म्हणायचंय, हे शोधावं लागतं. स्थानिक प्रश्नांचं ठार अज्ञान, पण आंतरराष्ट्रीय प्रश्नांची मात्र खडानखडा माहिती, असला प्रकार बहुतेक मराठी वर्तमानपत्रांच्या अग्रलेखांतून दिसतो. त्याचं कारण उघड आहे - स्थानिक प्रश्नांबद्दल बारकाव्यांनिशी लिहिण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते; आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबत इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेला मजकूर ऑनलाईन वाचता येतो आणि १५-२० वर्षं पत्रकार म्हणून काम केल्यानंतर शैलीबाज पद्धतीने मराठी अनुवादही करता येतो. शिवाय खिल्ली उडवणे, तुच्छता व्यक्त करणे, सबुरीचा सल्ला देणे किंवा विसंगती दाखवणे, या गोष्टींसाठी फारशी बुद्धिमत्ता लागत नाही. फेसबुक, ट्विटरवर तर या छापाचे गुळाचे गणपती पायलीला पासरी या वजनावर सापडतात. त्यातून हेच सिद्ध होतं की, इतरांबद्दल तुच्छता हीच मराठीमध्ये सध्या स्वत:चं पांडित्य सिद्ध करण्याची कसोटी झालेली आहे.

संपादकीय किंवा ओपेड पेजवरील लेख आणि रविवार पुरवणीतील सदरे यातून सकस कमी आणि भाराभर कचराच मारला जातो. शिवाय लौकिक असलेली किंवा आघाडीची म्हटली जाणारी मराठी वर्तमानपत्रे फोकनाड, अर्धसत्य, कुणाची तरी बाजू घेणाऱ्या किंवा कुणाबद्दल तरी आकस व्यक्त करणाऱ्या बातम्या मोठ्या प्रमाणावर छापू लागली असल्याचे ऑनलाईन पोर्टल्स, सोशल मीडियामुळे समजू लागले. त्यामुळे रोजची वर्तमानपत्रं वाचताना नवीन कुठलीच माहिती मिळेनाशी झाली. उलट डोक्याला तापच होऊ लागला. शिवाय बऱ्याचशा बातम्या आदल्या दिवशीच सोशल मीडियावर किंवा ऑनलाईन पोर्टल्सवर वाचायला मिळू लागल्या. मग मराठी वर्तमानपत्रं वाचण्यासाठी रोज नाहक अडीच-तीन तास कशासाठी खर्च करायचे आणि महिन्याला दीड-दोन हजार रुपये कशाला खर्च करायचे, असा प्रश्न पडू लागला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

केवळ अग्रलेख व इतर लेखांसाठी? तर त्यातही काही दम राहिलेला नाही. बहुतेक मराठी वर्तमानपत्रांच्या अग्रलेखांची लांबी बातम्यांपेक्षाही कमी झालेली आहे. आणि एकाही वर्तमानपत्राचा संपादक त्या तीन-चारशे शब्दांतही निदान वाचनीय म्हणावा असाही अग्रलेख लिहू शकत नाही. ज्या मोजक्या वर्तमानपत्रांचे अग्रलेख ७००-८०० शब्दांचे असतात, त्यातही ‘दूध कम, पानी ज्यादा’ असाच प्रकार बहुतेक वेळा असतो. रोजचे आणि रविवार पुरवणीतले लेख व मुखपृष्ठकथा वा सदरे हीसुद्धा फारशी वाचनीय नसतात. त्यातही फापटपसारा जास्त आणि सुमार वकुबाचेच जास्त प्रदर्शन असते. मग कशासाठी वाचायची मराठी वर्तमानपत्रं?

परिणामी, मी ती बंद करून टाकली. तेव्हापासून मी मराठी वर्तमानपत्रं वाचत नाही. आठवड्यात दोनदा किंवा एकदा महत्त्वाच्या मराठी वर्तमानपत्रांच्या ई-आवृत्त्या चाळतो, पण त्यासाठी जेमतेम तासाभराचा वेळ देतो; त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात खर्च करत नाही.

तरीही गेल्या दीड-दोन वर्षांपासून माझं काहीही अडलेलं नाही. कुठलीही महत्त्वाची बातमी मिस झाली किंवा कुठला महत्त्वाचा लेख मिस झाला, असंही झालेलं नाही.

त्यामुळे मराठी वर्तमानपत्रं मी वाचत नाही, याचा मला या दीड-दोन वर्षांच्या काळात अजिबात पश्चात्ताप झालेला नाही.

त्यात मी राजकारणी नाही, उद्योगपती नाही की पत्रकार नाही. त्यामुळे प्रत्येक ‘ब्रेकिंग न्यूज’ मला ताबडतोब समजलीच पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. ती आरामात समजली किंवा दुसऱ्या दिवशी समजली तरी चालतं. मला ज्या विषयांत रस आहे, त्यांतल्या बातम्या मात्र मला शक्य तेवढ्या लवकर समजायला हव्या असतात. त्या मला सोशल मीडिया आणि ऑनलाईन पोर्टल्सच्या माध्यमातून समजतात. त्यासाठी मला मराठी वर्तमानपत्रं वाचायची गरज नाही.

४.

नारायण राणे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट. त्यांनी तेव्हा त्यांच्या सरकारबद्दल रोजच्या वर्तमानपत्रात काय काय बातम्या येतात, हे जाणून घेण्यासाठी काही माणसं पगारावर ठेवली होती, असं सांगतात. ही माणसं रोज मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रं वाचून त्यांतल्या त्यांच्या सरकारविषयीच्या बातम्या त्यांना सांगत असत. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण मी राजकारणी नाही, सामान्य नोकरदार माणूस आहे. त्यामुळे राणे यांच्यासारखी वर्तमानपत्रं वाचण्यासाठी चार-दोन माणसं पगारावर ठेवणं मला परवडणारं नाही. भविष्यात मी जरा श्रीमंत झालो, तर ही हौस काही काळ पुरवून घ्यायला मला आवडेल म्हणा! पण तोवर मराठी वर्तमानपत्रांचा दर्जा अजूनच खालावलेला असेल, असं मला निदान सध्याची त्यांची घसरण पाहून वाटतं आहे. यदाकदाचित ती थांबून त्यांनी स्वत:ला सुधारलं, तर चांगलीच गोष्ट आहे, नपेक्षा मी सध्याच त्यांच्या वाट्याला जात नाही.

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

मराठीमध्ये मराठी वर्तमानपत्रांच्या देदीप्यमान पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्यापासून आचार्य अत्र्यांपर्यंत आणि गोविंद तळवलकर, अनंत भालेराव, आचार्य जावडेकर, यदुनाथ थत्ते, ह. रा. महाजनी, प्रभाकर पाध्ये, रंगा वैद्य, श्री. ग. मुणगेकर, श्री. ग. माजगावकर, सदा डुम्बरे, अरुण टिकेकर, कुमार केतकर यांच्यापर्यंत अनेक विद्वान आणि कर्तबगार संपादकांचा उल्लेख करता येईल. ही परंपरा आता मराठीत राहिलेली नाही. अलीकडच्या पंचवीस-तीस वर्षांत महाराष्ट्राच्या अनेक परंपरांचं पार ‘माकड’ झालं आहे. त्याला पत्रकारितेची परंपराही अपवाद राहिलेली नाही. एखादी महनीय व्यक्ती गेली की, ‘आमच्या आयुष्यात किंवा समाजजीवनात पोकळी निर्माण झाली आहे’ असे म्हणण्याची किंवा लिहिण्याची मराठीत पद्धत आहे. खरं तर कुठल्याही महनीय व्यक्तीचं निधन त्याच्या कुटुंबीयांसाठी, तेही काही काळासाठी पोकळी निर्माण करणारं ठरतं. बाकी ती व्यक्ती ज्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असते, त्यात क्षेत्रातली ‘पोकळी’ काही महत्त्वाकांक्षी, धूर्त, लबाड आणि सुमार लोक लगोलग भरून काढतात. संधी ही क्षितिजासारखी असते. त्यामुळे ती शक्य तेव्हा झडप घालून पकडावी लागते. सुमार लोक ते काम निष्ठेने करतात. त्यामुळे अंतिमत: त्या क्षेत्राचं आणि एकंदर समाजाचं नुकसान होतं. तसंच मराठी पत्रकारितेचंही झालेलं आहे.

हे नुकसान येत्या काही काळात भरून येण्याची शक्यता नाही. कारण हे गळू मराठी पत्रकारितेला बाधलं, त्यालाही बरीच वर्षं झाली; वीस वर्षं तरी नक्कीच. मात्र हा काळ एखाद्या व्यक्तीसाठी मोठा असला, तरी संस्थेसाठी फार लहान असतो. त्यामुळे या काळात मराठी पत्रकारितेला बाधलेलं गळू पुरेसं वयातच आलेलं नाही. ते तसं वयात यायला, त्याची पूर्ण वाढ व्हायला आणि मग एकदाचं फुटायला अजून बराच काळ लागेल, असं मला वाटतं. ते जेव्हा फुटेल तेव्हा मराठी पत्रकारितेला पुन्हा झळाळी येईलही कदाचित. एखादी गोष्ट बिघडत चालली की, ती सुरुवातीच्या टप्प्यावरच दुरुस्त करावी लागते; पण दुर्दैवाने मराठी पत्रकारितेबाबत तसं झालं नाही, आणि आता ही जखम ‘प्राथमिक औषधोपचारा’ने बरी होऊ शकत नाही. त्यासाठी ‘अक्सिर इलाजा’चीच गरज आहे. तो होण्यासाठी गळू फुटण्याची नितांत गरज आहे, असं मला वाटतं. तोवर हे गळू ठुसठुसत राहणार, सलणार आणि मराठी पत्रकारितेचं आरोग्य बिघडवत राहणार. गटारगंगेत स्नान करून कुणी पवित्र तर सोडाच स्वच्छही होत नाही. त्यासाठी तिचा प्रवाह स्वच्छ, निर्मळ करावा लागतो; पण ते एकट्या-दुकट्या माणसाचं काम नसतं. त्यासाठी अनेकांच्या ‘निश्चयाचं बळ’ आणि बहुतेकांच्या ‘अंतरीची तळमळ’ लागते. आत्ममग्न सुमारांची धाडसी फौज कितीही शिस्तप्रिय, संघटित असली तरी ती हे काम करू शकत नाही. त्यासाठी या फौजेचा पराभव तरी करावा लागतो किंवा तिची हकालपट्टी तरी. हेही तसं एकट्या-दुकट्याचं काम नाही; आणि दुष्कर कामांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावण्याची हल्ली महाराष्ट्रात परंपरा राहिलेली नाही; निदान मराठी साहित्यात आणि पत्रकारितेत तरी नक्कीच नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

अशा परिस्थितीत, माझ्यासारखी सामान्य माणसं काय करू शकतात? ती या परंपरेपासून स्वत:ला तोडून घेऊ शकतात; तिला शरण जाणं नाकारू शकतात, आणि निदान स्वत:ला तरी वाचवू शकतात. तेच मी सध्या करतो आहे.

५.

काही वर्षांपूर्वी एका मराठी वाङ्मयीन मासिकाच्या संपादकांनी ‘मी पेप्सी वा कोक का पीत नाही?’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. संपादक महाशय पूर्वीश्रमीचे डावे, पण विद्यमान काळात उजव्या विचारसरणीकडे झुकलेले. तरीही त्यांनी हा लेख चांगला लिहिला होता. मला तो आवडलाही होता. त्या लेखाचा एका ओळीत सारांश असा की, ही पेयं आपल्या शारीरिक आरोग्यासाठी अपायकारक आहेत. त्या चालीवर असं म्हणता येईल की, ‘मी मराठी वर्तमानपत्रं का वाचत नाही?’ याचं स्पष्ट उत्तर असं आहे की, ती माझ्या मानसिक आरोग्यासाठी फारशी लाभदायक राहिलेली नाहीत. मी अभिनेता किंवा बॉडी बिल्डर नाही. त्यामुळे माझं शरीर हे माझं ‘भांडवल’ नाही. मात्र आपलं आरोग्य किमान तंदुरुस्त असावं, असं मला वाटतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सध्याचा काळ हा मानसिक आरोग्य बिघडवणारा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सोशल मीडिया ते मोठ्या प्रमाणावर बिघडवण्याचं काम करतो, हे माझं अनुभवान्ती मत झालं आहे. फारसं वाचन नसणारे अनेक जण तिथं भारंभार गप्पा मारत सतत कुणाबद्दल तरी तुच्छता व्यक्त करत असतात. ते पाहून मला आयटी सेल आणि या तुच्छतावाद्यांमध्ये फारसा फरक करावासा वाटत नाही. ही तुच्छता हल्ली मला मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर जो ‘फोकनाड’ गोष्टींवरून गदारोळ चालू असतो, तसाच काहीसा प्रकार मराठी वर्तमानपत्रांमध्येही पाहायला मिळतो. मी सोशल मीडिया पूर्णपणे टाळू शकत नसलो, तरी त्यावरील फोकनाड गोष्टी आपल्या वॉलवर येणार नाहीत, याची मात्र पुरेपूर काळजी घेतो. जे मला हवं असतं, वाचायला आवडतं, त्यालाच मी माझ्या वॉलवर स्थान देतो. बाकीच्यांना सरळ ‘अनफ्रेंड’ किंवा ‘ब्लॉक’ करून टाकतो. त्यामुळे मला माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं राखायला मदत होते. निदानपक्षी ते सतत उकळत राहत नाही किंवा विकृतीला बळी पडत नाही. थोडक्यात, सोशल मीडियावर कार्यरत राहूनही मला माझं मानसिक आरोग्य योग्य प्रकारे सांभाळता येतं, म्हणून मी या माध्यमाचा अजूनही वापर करतो आहे. तसं मला मराठी वर्तमानपत्रांबाबत अजून तरी जमत नाही. कदाचित छापील शब्दांच्या विश्वासार्हतेचे संस्कार आजवर माझ्यावर झालेले असल्यामुळे हल्ली त्यातल्या फोकनाडपणाचा जास्त त्रास होतो. त्यापासून स्वत:चं मानसिक आरोग्य सांभाळणं कष्टप्रद होतं. त्यामुळे मी ती वाचणंच सोडून दिलंय…

६.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि देशातील अत्यंत विश्वासू असे एक पत्रकार रवीश कुमार अनेकदा आपल्या टीव्हीवरील कार्यक्रमात प्रेक्षकांना ‘तुम्ही टीव्ही पाहू नका, निदान तो पाहणं कमी करा; मलाही सतत पाहू नका’ असं सतत सांगतात. मी काही तेवढा मोठा माणूस नाही. त्यामुळे इतरांना ‘तुम्ही मराठी वर्तमानपत्रं वाचू नका’ असं मी सांगू शकत नाही. मागच्या दीड-दोन वर्षांपासून मी ती वाचत नाही, एवढं मात्र खरं…

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......