‘झुंड’ हा सिनेमा फक्त एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नसून, सर्वच सामाजिक व आर्थिक वर्गातील लोकांचे डोळे उघडणारा आहे

‘झुंड’च्या शेवटी अमिताभ बच्चन यांनी न्यायालयातील प्रसंगामध्ये अत्यंत योग्य पद्धतीनं व नाटकी न होता झोपडपट्टीतील गरीब मुलांचे प्रश्न समाजासमोर आणले आहेत. अशा मुलांना सरसकट पापी, गुन्हेगार न ठरवता सहसंवेदना वापरून त्यांना समजून कसं घ्यावं, हे ‘झुंड’मधून शिकायला मिळतं. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या व अभिनयाचा कोणताही अनुभव नसलेल्या कलाकारांनी काम केल्यानं ‘झुंड’ काळजाला भिडतो. कुठेही नाटकी वाटत नाही...