• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

गुजरात निवडणुकीचा धडा कोणाला संघर्षाचा अन् कोणाला फायद्याचा ठरेल?

गुजरातच्या निकालानं भारतीय जनमानस कोणत्या दिशेनं जाऊ शकते याचा मार्ग दाखवला आहे. भारत हा मध्यम मार्गी देश आहे. तो पूर्णपणे उजवा नाही आणि डावा नाही, हे दाखवून दिलेलं आहे. तो एकाला दुसरा पर्याय शोधत असतो. तो योग्य वेळी जागा दाखवून देतो. योग्य वेळी इशारा देतो. गुजरातचा इशारा विकासाच्या प्राध्यान्यक्रमाचा आहे. गुजरातचा इशारा समतोल विकासाची दिशा दाखवणारा आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Wed , 27 December 2017
  • 1 Comments
  • 2 Like

‘दुभंगलेला गुजरात’ भारतभर पसरला तर…?

गुजरातमध्ये उघडा पडलेला विशिष्ट प्रकारचा विकासवादी, द्वेषवादी मतदार भारतभर विस्तारला तर २०१९मध्ये देशाचा ‘गुजरात’ होऊ शकतो. मोदींना जो न्यू इंडिया हवाय, तो असा असेल तर संविधानानं दिलेली ‘आयडिया ऑफ इंडिया’ची संकल्पना धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. माणसाचा विचार करण्याचा अवयव हा मेंदू नसून खिसा आहे, हे जागतिकीकरणोत्तर काळात जास्त स्पष्ट होतंय. जगभर हे दिसतंय...

  • राजा कांदळकर
  • Tue , 26 December 2017
  • 0 Comments
  • 1 Like

सावध ऐका पुढल्या हाका…

निरकुंश सत्ता मिळाल्याची हवा सत्ताधारी पक्षाच्या डोक्यात गेली की, त्यांचा जनतेपासूनचा संपर्क कमी होतो. सर्वसामान्य जनतेनेच ती दिल्याचे वास्तव नाकारण्याएवढा उन्मत्तपणा अंगी येतो. हा उन्मत्तपणाचा फुगा गुजरातच्या जनतेने फोडला आहे. पूर्वीचे सरकार कसे होते हे वारंवार ऐकण्यासाठी लोकांनी तुम्हाला सत्ता दिलेली नाही, हे घरच्या मतदारांनी मोदीप्रणीत भाजपला ठणकावून सांगितले आहे...

  • देवेंद्र शिरुरकर
  • Wed , 20 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

आंदोलनांची ‘गुजरात क्रांती’!

देशभरच्या आंदोलनांना गुजरातच्या आंदोलनकर्त्यांनी एक महत्त्वाचा धडा दिलाय की, नुसतं आंदोलन उभं करून उपयोग नाही, तर मतपेटीतून सत्तापक्षाला आंदोलनकर्त्यांची ताकद दाखवून द्यावी लागते. देशभरातील आंदोलनकर्ते हार्दिक, जिग्नेश, अल्पेश आणि छोटुभाई यांच्याकडून हा धडा शिकले तर ‘गुजरात क्रांती’ची पुनरावृत्ती देशात इतरत्रही होऊ शकेल...

  • राजा कांदळकर
  • Wed , 20 December 2017
  • 0 Comments
  • 1 Like

अमित शहांना इशारा, नरेंद्र मोदींना दिलासा

भाजपला या निवडणुकीनं संदेश दिलाय की, अमित शहांची दादागिरी चालणार नाही. नरेंद्र मोदी यांचा विकासाचा विचार ठीक आहे. यापुढे भाजपनं विकास केला पाहिजे, अन्यथा आम्ही अन्य पर्याय निवडू असा इशारा गुजराती मतदारांनी दिलाय. गुजरातचा जनादेश २०१९सालासाठी मार्गदर्शक ठरेल असा आहे. भाजपने लोकांचे प्रश्न सोडवले तर ठीक, नाहीतर आम्ही काँग्रेसला निवडून देऊ, सत्तेवर बसण्याची संधी देऊ हा संदेश या निवडणुकीनं दिलाय...

  • राजा कांदळकर
  • Tue , 19 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गुजरातमध्ये भाजप जिंकली, पण काँग्रेसही फारशी हरलेली नाही!

सत्ता कुणाची येवो जनमताचा रेटा सत्ताधार्‍यावर राहिला तर लोकशाही मरत नाही. आणि विरोधी पक्षांच्या मनात आपण लढू शकतो, जनता आपल्याही संधी देऊ शकते, हा विश्वास जिवंत करण्याचं काम गुजराती जनतेनं लोकशाही मार्गानं पार पाडलं आहे. त्यांचं लोकशाहीवादी नागरिक म्हणून सगळ्यांनीच कौतुक केलं पाहिजे...

  • किशोर रक्ताटे
  • Tue , 19 December 2017
  • 2 Comments
  • 2 Like

बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपला निवडून दिलंय, गुजराती मतदार कुणाला निवडतात ते आज कळेलच

आज बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गुजरात विधानसभेचा निकाल जाहीर होणार. देशभर आणि जगभर (पाकिस्तानातसुद्धा!) या निवडणुकीविषयी उत्सूकता आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपच गुजरातमध्ये सत्तेवर येणार असा ठोस अंदाज वर्तवला आहे. पण गुजराती मतदार खरोखरच भाजपला निवडून देतात की, काँग्रेसला, याचा फैसला आज होईल.. दूध का दूध, पानी का पानी...

  • टीम अक्षरनामा
  • Mon , 18 December 2017
  • 0 Comments
  • 1 Like

प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया, सर्व्हे-पोल यांनी झाकोळली गुजरातची निवडणूक

गुजरात निवडणूक निकाल सर्व्हे, पोल यांविषयी शंका व्यक्त करण्यात आली. तसं बघितलं तर दिल्ली, बिहार विधानसभा निवडणुकीतच निवडणूक सर्व्हे चाचण्यांचा फोलपणा उघड झाला होता. त्यांच्यावरचा सत्तापक्षाचा प्रभाव जाहीर झाला होता. आता तर त्यांची विश्वासार्हता पूर्ण रसातळाला गेली आहे. या चाचण्यांचे सॅम्पल, त्यांची निवड, पद्धत याबद्दल पारदर्शकता नसते, असं योगेंद्र यादव यांनीच म्हटलं. ते बोलकं आहे...

  • राजा कांदळकर
  • Mon , 18 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

‘गुजरात मॉडेल’मध्ये उद्योगपती आहेत, आदिवासी नाहीत!

देशभर गवगवा झालेल्या विकासाच्या गुजरात मॉडेलमध्ये आम्हाला स्थान आहे की नाही, हा आदिवासींचा या निवडणुकीतला सवाल होता. त्या सवालावर भाजप नेते मूग गिळून गप्प होते. अनेक आदिवासी गावांत भाजप उमेदवारांच्या विरोधात आदिवासींनी रोष व्यक्त केला होता. पण त्याच्या ना बातम्या झाल्या, ना टीव्हीच्या स्टुडिओत त्या घोषणांचा आवाज पोचला...

  • राजा कांदळकर
  • Mon , 18 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गुजरातमधल्या राजकीय भूकंपाच्या खाणाखुणा प्रसारमाध्यमांना का दिसल्या नाहीत?

सत्ताधारी, प्रसारमाध्यमं यांचा यातून राजकीय भूकंपाच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न आहे, पण भूकंप तर होणारच आहे. त्याच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करून तो टळणार थोडाच आहे? हा भूकंप काँग्रेसच्या कर्तबगारीमुळे घडणार नसून, तर सत्ताधारी भाजपच्याच नादारीमुळे घडणार आहे. भाजपनं वाढवलेल्या लोकांच्या पिडेत त्याची पाळंमुळं आहेत...

  • राजा कांदळकर
  • Thu , 14 December 2017
  • 1 Comments
  • 3 Like

गुजरातमध्ये भाजपची चिडचिड आणि चिंता वाढतेय

भाजपला गुजरातमध्ये चिंता वाटते आहे. राहुल गांधी यांचा धडाका आणि त्यांना मिळत असलेला प्रतिसाद, यामुळे भाजप आश्चर्यचकित झाला आहे. भाजपला तळागाळातील संतापाची, विशेषत: तरुणांमधील संतापाची कल्पना आहे. जातीय समीकरणाची आपली किल्ली हरवल्याची, विशेषत: पटेलांबाबतच्या, याची भाजपला खंत आहे. स्थानिक नेतृत्व फारसं प्रभावी नसल्याची बोच आहे...

  • शेखर गुप्ता
  • Wed , 13 December 2017
  • 0 Comments
  • 4 Like

‘नो पॉलिटिक्स इज अवर पॉलिटिक्स’ हेच गुजराती मुस्लिमांचं ‘पॉलिटिक्स’!

“भाजप तर हिंदुत्ववादी पक्ष आहे. तो मुस्लिमांना जवळ करत नाही. उलट २००२च्या दंगलीत त्यांनी मुस्लिमांचा आवाद दडपला. तोंड दाबून टाकलं. त्यानंतर मुस्लिम समाजाचा आवाज आजतागायत बंद आहे. आम्ही आमच्या मुलांना सांगतो- ‘शाळा शिका, कॉलेज शिका, धंद्याचं शिक्षण घ्या. धंदे वाढवा.’ सामाजिक-राजकीय जीवनात वावरायला आजही आम्हाला भीती वाटते. म्हणून धंदा आणि घर हेच आमचं जग आहे.”...

  • राजा कांदळकर
  • Wed , 13 December 2017
  • 1 Comments
  • 4 Like

अमित शहा यांच्या हिकमती नेतृत्व शैलीच्या आख्यायिका

शहा यांच्या नेतृत्वशैलीची एवढी चर्चा करण्याचं कारण काय? तर हा काही एका व्यक्तीचा राजकीय प्रवास नाही. तर ते गुजरात भाजपचे कार्यकर्ते, नेते यांच्या समोरचं ‘रोल मॉडेल’ आहे. आज गुजरातमध्ये शहा यांच्या पावलावर पाऊल टाकत तालुक्या तालुक्यात, वॉर्डावॉर्डात छोटे छोटे अमित शहा कार्यरत आहेत. ते सर्वजण सार्वजनिक आयुष्यात साम, दाम, दंड, भेद वापरून भाजप वाढवत आहेत, मोदी यांना ताकद देत आहेत...

  • राजा कांदळकर
  • Tue , 12 December 2017
  • 0 Comments
  • 5 Like

गुजराती माणसांच्या राजकीय वर्तनाचं व्याकरण

यावेळची गुजरात विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक आहे. या निवडणुकीत भाजप हरला तर ‘मोदी लाट’ संपली असा अर्थ काढला जाईल. आणि भाजपच्या केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील सत्तेचा ‘परतीचा प्रवास’ सुरू झाला असंही समजलं जाईल. समजा भाजपची हार नाही झाली आणि विधानसभेतल्या जागा कमी झाल्या तरी गुजरातवरची भाजपची पकड ढिली झाली असं म्हटलं जाईल...

  • राजा कांदळकर
  • Mon , 11 December 2017
  • 1 Comments
  • 5 Like

गुजरातमध्ये भाजप भयग्रस्त आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सुस्त!

मोदींची लोकप्रियता तोपर्यंत आकाशाला गवसणी घालणारी आहे, अशा आभासात ठेवण्यात भाजपची प्रचार यंत्रणा यशस्वी ठरलेली होती. परंतु अचानक त्यांच्या या भूमिकेला छेद देणाऱ्या घटना घडू लागल्या. मोदींच्या सभांना प्रचंड गर्दी होत असल्याच्या बातम्या पेरल्या जाऊ लागल्या. पण सोशल मीडियावर मात्र लोक सभा सोडून जात असल्याच्या क्लिप्स व्हायरल होऊ लागल्या होत्या. भाजपच्या गोटात भयशंका तयार होण्याची ती सुरुवात होती...

  • धनंजय कर्णिक
  • Mon , 11 December 2017
  • 0 Comments
  • 3 Like

गुजरातच्या जनतेला कोण हवंय, याचा निर्णय अंतिम टप्प्यात आलाय!

लेवा-पाटीदार समाजानं बांधलेलं खोडलधाम हे राजकोट जिल्ह्यातील मंदिर हे नवं सत्ताकेंद्र म्हणून उदयाला आलं आहे. खरं तर ते तसं बनवलं आहे. पाटीदारांच्या निमित्तानं पुन्हा एकदा मंदिर आणि भाजपचं नातं नवीन वळणावर आलं हे लक्षात आलं. जे काही ‘विकासाचं गुजरात मॉडेल’ देशाच्या गळ्यात मारून व काँग्रेस विरोधाच्या लाटेवर स्वार झालेल्या भाजपला आता प्रयोगशाळेतील खोडलधाम आणि ऊमियाधाम यांनीच अडचणीत आणलं आहे...

  • निखिल देशमुख
  • Sat , 09 December 2017
  • 0 Comments
  • 3 Like

हेच ‘सर्वांगीण’ स्वच्छता अभियानाचं यश म्हणायचं का? 

गुजरातमधील ‘सेंटर फॉर एन्व्हार्नमेंटल एज्युकेशन’ या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त संस्थेला केंद्र सरकारकडून मिळणारं आर्थिक पाठबळ गेल्या वर्षीपासून बंद झालं आहे. सरकारनं असा निर्णय घेण्यामागे काय कारणं आहेत, याची आजवर फारशी वाच्यता झालेली नाही. मात्र इतर अज्ञात कारणांसोबत साराभाई घराण्यातील मल्लिका साराभाई या एक कारण असल्याची चर्चा आहे. कारण त्या भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या कलाकार आहेत...

  • किशोर रक्ताटे
  • Thu , 07 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

हार्दिक + अल्पेश + जिग्नेश : गुजरात ढवळून काढणारं त्रिकुट

हार्दिक + अल्पेश + जिग्नेश या तीन तरुणांनी गुजरातची रणभूमी यावेळी चांगलीच तापवली आहे. खरं तर या तीन तरुणांमुळे गुजरातचं राजकारण केवळ स्पर्धेच्या बाजूनं बदललं आहे, असं नाही तर त्यात मूलभूत बदल होत आहेत. हे बदल तिथल्या भविष्याच्या राजकारणाची पार्श्वभूमी तयार करत असल्यानं त्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल. या तिघांचा राजकीय जन्म मोदी केंद्रात गेल्यावर झालेला आहे, यात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत...

  • किशोर रक्ताटे
  • Tue , 05 December 2017
  • 2 Comments
  • 4 Like

विकासाचा प्राध्यान्यक्रम चुकल्यामुळे चिरंतन विकासाचं तीन पिढ्यांतील अंतर-दर्शन गुजरातमध्ये होतं  

चिरंतन विकासाचं तीन पिढ्यांतील अंतर विकासाचा प्राध्यान्यक्रम चुकल्यावर कुठे घेऊन जातं, याचं दर्शन यातून घडतं. गुजरात औद्योगिकदृष्ट्या इतिहास काळापासून प्रगत आहे. पण साक्षरतेचं महत्त्व महाराजा सयाजीराव गायकवाडांना किती पूर्वी कळलं होतं, ते आत्ताच्या उदारमतवादी सरकारला पुढे नेता आलेलं नाही. ते टिकवताही आलेलं नाही...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 04 December 2017
  • 0 Comments
  • 3 Like

गुजरात निवडणूक नरेंद्र मोदी-राहुल गांधी यांच्यासाठी अस्तित्वाची आहे, त्यांनी आपापली ताकद पणाला लावली आहे

थोडेबहुत अंतर असतं श्रद्धा व दबदबा यामध्ये. काही ठिकाणी श्रद्धा स्पष्ट दिसतात, तर दबदबा अनामिक असतो. काही ठिकाणी श्रद्धा अनामिक असते, पण दबदबा स्पष्टपणे दिसतो. काही ठिकाणी या दोन्हींच्या एकोप्यातून व्यापक अर्थानं जे वलय नावाचं भांडवल निर्माण होतं, त्याचा सगळेच पक्ष आपापल्या राजकारणासाठी वापर करत असतात...

  • किशोर रक्ताटे
  • Sat , 02 December 2017
  • 0 Comments
  • 3 Like

गुजरात घुसमटलेल्या मानसिकतेत, तिला मोदी केंद्रात गेल्यावरच आवाज काढता आलाय

हे सगळं असं असताना गुजरात प्रगतीच्या चर्चेत येतं, हा काय प्रकार आहे? काही विषयांना मर्यादेच्या पलीकडे महत्त्व दिलं की, काहींकडे दुर्लक्ष होतं. हे गंभीर आहे. शासकीय नोकरी गुजरातमध्ये आकर्षणाचा विषय कमी आहे. मात्र आजची तिथली बेरोजगारी पाहता तरुण शासकीय नोकरीसाठी आसुसलेला आहे. नव्यानं सरकारी नोकरीत येऊ इच्छिणार्‍यांचा आवाज अजून कोणत्याच राजकीय चर्चेचा भाग होऊ शकलेला नाही. हीच आजची तिथली मोठी शोकांतिका आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Fri , 01 December 2017
  • 0 Comments
  • 3 Like

गुजरातमध्ये परिवर्तनाला संधी आहे, मात्र ती अनेक ‘जर-तर’ अवलंबून आहे

एकतर भाजप एकतर्फी सत्तेत येईल असं मला आता वाटत नाही. कारण गेल्या दोन सर्व्हेत मोदींची गुजरातमधील लोकप्रियता जवळ १५ टक्यांनी कमी झालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची थोडीशी संधी आहे. पण काँग्रेस जिंकेल की नाही, यापेक्षा या निवडणुकीच्या वातावरणाचा फायदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत होईल. कारण काँग्रेसच्या जागा वाढतील. काँग्रेसची मतपेटी अधिक मजबूत होईल. त्यातून काँग्रेसला पुढचा प्लॅन करता येईल...

  • किशोर रक्ताटे
  • Thu , 30 November 2017
  • 0 Comments
  • 2 Like

काँग्रेसकडून अपेक्षा ठेवणाऱ्यांची संख्या वाढतेय, मात्र सत्तेत भाजपच येईल

सत्ता बदलात आपलं परिवर्तन होईल किंवा सत्ता बदल हाच आपला आशावाद असू शकेल असं काहीजण मानून आहेत. सत्ता परिवर्तनात आपलं भलं  होईल असं माणणारे खास करून एकतर एकदम गरीब आहेत किंवा वर्ग तीन अन् वर्ग चारचे सरकारी सेवक आहेत. गुजरात विकासाच्या मॉडेलमध्ये ज्यांना अग्रक्रमात स्थान मिळालेलं नाही, अशांच्या आशा सत्तेच्या वर्तुळात आपला किती आवाज उठवू शकतील, हे येणारा काळच ठरवेल...

  • किशोर रक्ताटे
  • Wed , 29 November 2017
  • 0 Comments
  • 3 Like

ज्यांना काँग्रेसकडून आशा आहे, ते काँग्रेससाठी काही करत नाहीत

भाजप सत्ताधारी पक्ष म्हणून लोकांच्या समोर सतत आहे. काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून गेल्या दोन दशकांत फारसा सक्रिय नसल्यानं या पक्षाला सगळ्याच स्तरावर संघर्ष करावा लागत आहे. अडचण एवढीच आहे, ज्यांना काँग्रेसकडून आशा आहे ते काँग्रेससाठी काही करत नाहीत आणि आपल्या विचारांच्या अभ्यासकांना सोबत घ्यायला काँग्रेस निवडणूक सोडून त्यांच्याकडे जाण्यात कमी पडत आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Tue , 28 November 2017
  • 0 Comments
  • 2 Like

“जर खरंच विकास झाला असता, तर मोदींना प्रचारसभा घ्याव्या लागल्या नसत्या”

चर्चेत एकानं मोदींची जुनी आठवण सांगितली. तो म्हणाला, “पूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना प्रचाराला आले, तेव्हा मोदींनी ‘काँग्रेस घाबरली म्हणून पंतप्रधानांना प्रचारात आणत आहे’, असं म्हटलं होतं. आता हीच गोष्ट मोदीजी विसरले आहेत का?” या माणसाच्या स्मरणशक्तीनं लोकशाही जिवंत असल्याचं अन लोक सजग असल्याचं आमच्या लक्षात आलं...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 27 November 2017
  • 0 Comments
  • 2 Like

मोदी विरोधात लढणारेच त्यांचा पर्यायी फायदा करून देत आहेत…

गुजरातमध्ये भाजपचा पराभव झालाच, तर तो आर्थिक धोरणातील अपयश खालपर्यंत पाझरल्याचा पराभव असेल. त्याशिवाय तो पराभव आव्हानांकडे अधिक उन्मादी पद्धतीनं पाहिलं गेलं, त्यामुळे झालेला असेल. अन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाचा अग्रक्रम चुकल्याचा असेल. त्यासाठी खरोबर ‘सबका साथ सबका विकास’ या भूमिकेकडे यावं लागेल...

  • किशोर रक्ताटे
  • Sat , 25 November 2017
  • 2 Comments
  • 2 Like

‘हूं छु विकास, हूं छु गुजरात...’

गुजरात विधानसभा निवडणूक सर्व बाजूंनी राष्ट्रीय आस्थेचा विषय बनली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. गुजरातमध्ये नेमकी कुणाची सरशी होणार, का होणार, अशा विविध प्रश्नांविषयी गुजरातमधील सर्वसामान्य जनतेपासून अभ्यासकांपर्यंत अनेकांशी प्रत्यक्ष बोलून निरीक्षणं मांडणारी ही खास लेखमालिका आजपासून...

  • किशोर रक्ताटे
  • Fri , 24 November 2017
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.