प्रत्येक ‘न्यूजरूम’मध्ये काम करणाऱ्या काही निवडक पत्रकारांसाठी…
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • ‘डाउन टु अर्थ’ या मासिकाच्या नोव्हेंबर २०२१च्या अंकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 02 December 2021
  • पडघम माध्यमनामा न्यूजरूम Newsroom पत्रकारिता Journalism बातमीदारी Reporting पत्रकार Journalist बातमी News गोदी मीडिया Godi Media गोदी पत्रकार Godi Journalist

आम्हा पत्रकारांच्या पेशात दिवसाची सुरुवात ‘आज काय करायचं?’ या चिंतेनं सुरू होते. म्हणायला ढिगभर बातम्या असतात, पण प्रत्येक बातमी तेवढी ‘दमदार’ नसते. ‘काय करायचं?’ ही चिंता त्यांनाच सतावते, जे काहीतरी करू इच्छितात, खोल निराशेनं घेरले जातात, वेड्यासारख्या बातम्या आणि ती पूर्ण करण्यासाठी ‘फॅक्ट्स’ शोधत फिरतात. असे पत्रकार प्रत्येक दिवशी उदास असतात. आपल्याच नजरेपासून दूर पळत राहतात.

तर दुसरीकडे पत्रकारितेच्या पेशात अशा लोकांचीही कमी नाही, जे काम कमी आणि शरीरप्रदर्शन जास्त करतात. ते ऑफिसमध्ये येतात, पण ट्विटरवर जास्त असतात. तिथं आपली उपस्थिती दाखवून देत राहतात, पण पैशाचं काम करत नाहीत. किंवा मग असं काम करतील ज्यात कवडीची जोखीम नसेल, अगदी रुटीन असेल. ते चांगलं करण्यासाठी कुठलेही प्रयत्न करत नाहीत. असे पत्रकार खूप ‘स्मार्ट’ असतात. करतील थोडंसं पण दाखवतील खूप. ट्विटरवर लिहितील, कुठून तरी कॉपी-पेस्ट करतील. पत्रकारितेविषयी चिंता व्यक्त करतील. न्यूजरूममध्ये पगार, पद याबाबत होणाऱ्या अन्यायाबाबत रडतील आणि मैफलीत आपली जागाही बळकावतील. पण आपल्या वाचक वा प्रेक्षकांसाठी कधी पुढाकार आणि मेहनत घेऊन काही तयार करणार नाहीत. अशा पत्रकारांचं आयुष्य प्रत्येक काळात ‘शानदार’पणे व्यतित होत राहतं. ते आपला आळशीपणा सहजपणे आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या कहाणीनं झाकण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या अन्यायाचे किस्से काम करणाऱ्या पत्रकारांकडेही काही कमी नसतात!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

न्यूजरूमची रचना अशा प्रकारे केलेली असते की, काम करणाऱ्या आणि न करणाऱ्या पत्रकारांचं मूल्यमापन एकाच प्रकारे केलं जातं. कॉर्पोरेट मानव संसाधन व्यवस्थापनाची व्यवस्था पत्रकारांवर थोपवली जाते. मला वाटत नाही की, त्यांच्याकडे न्यूजरूम व्यवस्थापनाचा कुठला पूर्ण आराखडा असतो. आणि हे काम संपादकाच्या ‘बस की बात’ नसतं. खासकरून आजकालच्या संपादकांच्या, जे केवळ नावालाच संपादक असतात. त्यांना कुणाला तरी हाकून काम करून घेणं, एवढाच अधिकार असतो. या प्रकारातून कमी पैशात जास्त काम करण्याची किंवा करून घेण्याची व्यवस्था निर्माण केली जाते. काही वेळा पैसा नसतोही आणि जिथं पैसा असतो तिथंही हेच ऐकायला मिळतं. त्याचा अर्थ असा होतो की, पैसा ही अडचण नाहीये. सिस्टिम पत्रकारितेसाठी नसते, पत्रकारितेच्या नावावर पैसे कमवण्यासाठी असते. यात चुकीचं काही नाही, पैसे कमवायला हवेत, पण पत्रकारितेच्या नावावर पैसे कमवत असताना तर पत्रकारिताच करायला हवी. बाकी काही नाही. असो, हा विषय इथंच संपवतो, कारण तो मोठा असल्यानं त्यावर अधिक सविस्तर लिहायला हवं.

अशा परिस्थितीत काम करणाऱ्या पत्रकारांवर काम न करणाऱ्या पत्रकारांचा मोठा प्रभाव पडतो. एकीकडे ते आधीच ‘आज काय करायचं?’ या विवंचनेत असतात आणि दुसरीकडे त्यांना हेही दिसत असतं की, बाकीचे पत्रकार मौजमजा करत आहेत. मला अनेक न्यूजरूममध्ये काम करणारे पत्रकार भेटतात, तेव्हा गप्पांमध्ये हा विषय येतोच. मी त्या सगळ्यांना सांगतो की, तुम्ही स्वत:लाच उत्तरदायी आहात, सहकारी आणि संपादक यांना नाही... त्यांच्यावर पगार आणि पद या दोन्हीबाबतीत अन्याय होतोय, हे माहीत असतानाही. अन्यायाशी लढण्यासाठी अन्याय सहनही करावा लागतो. कारण ही सतत चालणारी लढाई आहे. न्यायाची कुठलीही लढाई निर्विवादपणे जिंकली जात नाही.

‘गोदी अँकर आणि पत्रकारां’ची जीवनशैली पहा. त्यांचं सगळं कसं ‘मजेत’ चाललंय. पत्रकारितेत राहूनसुद्धा सत्य बोलणाऱ्या\सांगणाऱ्यांपेक्षा ते जास्त खूश आहेत. ते आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात प्रतिष्ठित आहेत आणि सुरक्षितही. तुम्हाला ठरवायचंय की, तुम्ही त्यांच्यासारखं जगू इच्छिताय का? मग तुम्ही मोठमोठ्या दलालांकडे पहा, जे लाखो-कोट्यवधी रुपयांचा ‘खेळ’ खेळत असतात. या चिरगुटांचा कशाला आदर्श घेता? दुसऱ्या बाजूला, हेही पहा जो ‘गोदी पत्रकार’ नाहीत, ते किती कष्ट घेत आहेत का? पत्रकाराला त्याच्या पत्रकारितेबरोबरच त्याच्या कामासंदर्भातल्या मेहनतीवरूनही पारखा. फरक तुमच्या लक्षात येईल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मला कुठल्याही परिस्थितीत काम करणाऱ्या पत्रकारांना भेटायला आवडतं. त्यांच्याकडूनच काम करण्याची प्रेरणा मिळते. अशा पत्रकारांना आपल्या अपयशाची कल्पना असते आणि ते कुठल्याही यशाच्या आशेनं काम करत नाहीत. फक्त काम करत राहतात. दिवसभरात अशा एखाद्या पत्रकाराची भेट झाली की, धन्य झाल्यासारखं वाटतं. व्यापक दृष्टीकोनातून पाहिलं तर न्यूजरूममध्ये कुणाच्याही बाबतीत न्यायाचं वर्तन होत नाही, त्याचे कसले मापदंडही नसतात. पण तरीही हे कारण पुढे करत काम न करणारे ते न करण्यासाठी शंभर बहाने शोधून काढतात. आणि काम करणारे ‘आज काय करायचं?’ या एकाच कारणामुळे मरमर मरतात. ते प्रत्येक दिवशी कठीण बातमी निवडतात आणि दमूनभागून जातात. प्रत्येक न्यूजरूममध्ये अशा प्रकारे काम करणाऱ्या पत्रकारांमधले पत्रकार स्वत:वर अपराधीपणाचं ओझं टाकत राहतात की, ‘आज काय करायचं?’ ही सामान्य स्वरूपाची चिंता नाही. हा चिंतेचा डोंगर छातीवरून ठेवून दिवसाची सुरुवात करावी लागते. माझ्याकडे अशा पत्रकारांच्या समस्येवर कुठलाही उपाय नाही, पण त्यांच्याविषयी खूप आपुलकी वाटते. मनातल्या मनात मी त्यांना सलाम करत राहतो.

आज सकाळी याच चिंतेचा सामना करत होतो, तेव्हा ‘डाउन टु अर्थ’ या नियतकालिकाच्या मुखपृष्ठाकडे लक्ष गेलं. ते करणाऱ्याविषयीचा आदरभाव उमळून आला. या विचारानं मन भरून आलं की, कुणीतरी किती मनापासून हे मुखपृष्ठ केलंय. याची कल्पना असताना की, असे विषय केवळ औपचारिकेचे झाले आहेत, किती कमी लोक ते वाचतील, तरीही अजित बजाज यांनी किती मन लावून हे आकर्षक मुखपृष्ठ केलंय. त्यासाठी त्यांनी किती विचार केला असेल, या अंकात पत्रकारांनी लिहिलेले लेख\बातम्या\वृत्तांत लोकांपर्यंत पोहण्यासाठी किती रंगांचा विचार केला असेल. काम मनात नसेल, तर असं काम होत नाही.

तात्पर्य हे आहे की, जोवर पत्रकारितेच्या पेशात आहात आणि जेवढं तुम्हाला शक्य आहे, तेवढं मन लावून करण्याचा प्रयत्न करा. पण कायमस्वरूपी राहण्याचा विचार करू नका. या देशात बाहेर पडण्याचे पर्याय कमी आहेत आणि दुसऱ्या कामाची निवड करणं सोपंही नाही. पण तरीही याच पेशात आयुष्यभर राहण्याचा विचार करत असाल तर त्रास होणार. विशिष्ट काळानंतर पत्रकारिता सोडून दिली पाहिजे. पण जोवर करत आहात, तोवर करत रहा. तुम्हाला जेवढं शक्य आहे, तेवढं करा, पण मनापासून करा. हे केलं नाही आणि ते होऊ शकलं नाही, याची भरपाई कधीही करता येणार नाही. जे केलं, जेवढं केलं, ते कसं केलं, त्याविषयी उत्तरदायी रहा.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आता प्रेक्षक हे ‘प्रेक्षक’ राहिलेले नाहीत. त्यांना तुम्ही आंब्याची स्टोरी दाखवलीत तर ते म्हणतात चिंचेची दाखवली नाहीत. अशा प्रेक्षकांची फिकीर करू नका. ते केवळ तुम्हाला निराश करण्यासाठी येतात. साऱ्या जगातल्या साऱ्या बातम्या एक पत्रकार करू शकत नाही. एका देशातल्या सगळ्या बातम्याही एक पत्रकार करू शकत नाही. अशी अपेक्षा करणारे मोठे बदमाश असतात, जे प्रेक्षक आणि फॅनचा वेश पांघरून येतात आणि तुम्ही केलेल्या कामाला ‘बेमतलब’ ठरवतात. असं करून ते सगळ्या प्रश्नांना पायदळी तुडवतात आणि त्यांचा सामना करण्यापासून स्वत:ला वाचवतात. त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपला ‘खोटेपणा’ जपायचा असतो. त्यांची चिंता करू नका, आपलं काम करत रहा.

हे लक्षात ठेवायला हवं की, तुम्ही केलेलं प्रत्येक काम हे ‘बेमतलब’ ठरवलं जाईल, आपल्या कामात तुम्हालाच ‘अर्थ’ भरायचा आहे. एखादा नवा रंग भरायचा आहे. जसा ‘डाउन टु अर्थ’च्या पत्रकारांनी आणि त्या अंकाचं मुखपृष्ठ करणाऱ्या अजित बजाज यांनी भरलाय.

ही पोस्ट प्रत्येक न्यूजरूममध्ये काम करणाऱ्या एक वा दोन पत्रकारांसाठी आहे. प्रत्येक न्यूजरूममध्ये काम करणारे एवढेच असतात. संख्येच्या प्रमाणानुसार पाच किंवा दहाही असू शकतात. प्रत्येक दिवशी जेवढं शक्य असेल तेवढं नव्यानं करण्याचा प्रयत्न करा, जुनं नव्यानं करण्याचा प्रयत्न करा. ‘डाऊन टु अर्थ’च्या मुखपृष्ठावरील रंगांसारखं उजळत रहा. सूर्यादयाचा रंग आहे...

अनुवाद - टीम अक्षरनामा

रवीश कुमार यांनी ११ नोव्हेंबर २०२१ रोजी फेसबुकवर लिहिलेल्या मूळ हिंदी पोस्टचा हा मराठी अनुवाद आहे

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......