जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!
पडघम - साहित्यिक
विश्वास पाटील
  • ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
  • Mon , 12 January 2026
  • पडघम साहित्यिक विश्वास पाटील Vishwas Patil मराठी साहित्य संमेलन Marathi Sahitya Sammelan

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६ सातारा येथे १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश...

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

१.

मित्रहो, अध्यक्ष या नात्याने मी मांडलेले विचार हे स्वतंत्र असतील. ते कोणा एका राजकीय संप्रदायाच्या बाजूचे आहेत की, विरोधातले असे ठरवण्याचा बादरायण खटाटोप कृपया कोणी करू नये. मराठी साहित्य, मराठी भाषा, तिचे अस्तित्व, मुंबईसारख्या आमच्या नगरीचे भवितव्य, यांबाबत काही रोखठोक मुद्दे असतील, जे कोणाला आवडतील किंवा नाहीही, पण ते मांडणे मला क्रमप्राप्त आहे. ते तुम्ही माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचे उत्तरदायित्वच असेल.

आज या संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने ही संधी देशाच्या आझादीसाठी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झुंज दिलेल्या एका कार्यकर्त्याच्या मुलाला मिळाली आहेच, पण त्याहीपेक्षा एका अशिक्षित शेतकरी मातेच्या लेकरांकडे हे पद चालून आले आहे, या गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटतो.

मी इयत्ता १०वी मध्ये असताना पुण्याच्या ‘तरुण भारत’च्या कथास्पर्धेत माझ्या स्त्री प्रश्नावर ‘कायदा’ नावाच्या कथेला महाराष्ट्र स्तरावरचा पुरस्कार मिळतो, वयाच्या १७व्या वर्षी ‘आंबी’ नावाची स्त्रीप्रधान कादंबरी लिहिणे, वयाच्या बावीशीत ‘पानिपत’सारख्या विषयाला हात घालणे, २७व्या वर्षी ‘पांगिरा’, २८व्या वर्षी ‘पानिपत’, ऐन तिशीमध्ये ‘झाडाझडती’ अशा कलाकृती इतक्या तारुण्यात माझ्या हातून कशा प्रसवल्या होत्या, याचे आज मला आश्चर्य वाटते. पण त्याबाबत सखोल चिंतन करता त्या प्रश्नाचे एकच उत्तर मिळते. ते म्हणजे, माझे माझ्या मन्मंगल मराठी मातीवर, इथल्या थोर संस्कृतीवर आणि गौरवशाली इतिहासावर जडलेले प्रेम. जे अजूनही माझ्या रक्तमांसाचा, ध्यासाचा आणि श्वासाचा एक अविभाज्य भाग बनून राहिले आहे.

तशी लेखक घडण्यासाठी पूर्णतः विषम परिस्थिती माझ्या वाट्याला आली होती. माझ्या नेर्ले गावची लोकसंख्या १२३४. शिकलो जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि मारुतीच्या मंदिरात. पण गावपरिसराला संपन्न निसर्गाचा वारसा होता. वारणा नदीचे महापूर, पाठीशी सह्याद्रीच्या रांगा, एकीकडे पन्हाळगड, दुसरीकडे विशालगड आणि दूर पलीकडे प्रचितगड, अशी शिवरायांच्या इतिहासाने माझी पाठराखण केली होती. लोकसंगीत, लोकगीते, तमाशा, भारुड यांच्या संगतीत बालपण गेले.

माझ्यातल्या कादंबरीकाराला सातारच्या सकस मातीने घडवले आहे, ही वस्तुस्थिती. पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी, तसेच ग्रामीण भागातील उद्ध्वस्त माळराने, या पार्श्वभूमीवर ‘पांगिरा’ नावाची कादंबरी मी इथे फलटणच्या वास्तव्यात लिहिली. ‘पानिपत’सारखी कलाकृतीसुद्धा मला सुचली ती इथे साताऱ्याच्याच मातीमध्ये. इतकेच नव्हे तर ‘झाडाझडती’चा नायक खैरमोडे गुरुजी मला इथेच भेटला. जेव्हा आंधळी धरणाच्या निर्मितीसाठी केळी आणि पेरवीच्या बागांना दहिवडीकडे बुलडोझर लावले गेले होते, तेव्हा त्या जुल्माविरुद्ध धावून आलेले कॉम्रेड वर्धमान निकम किंवा कृष्णाकाठच्या पुराच्या पाण्यात बुडणारा आपला महारवाडा वाचवण्यासाठी संघर्षाच्या समरांगणात उतरलेले सावंत गुरुजी, तसेच उजणीच्या धरणग्रस्तांसाठी झुंजणारे प्रा. तु. मा. सरडे गुरुजी, याशिवाय ‘बळीराजा’वाले संपतराव पवार आणि भारत पाटणकर, संतराम पाटील, नाना शेटे आणि ‘यशदा’ व इतरत्र ऐकलेली बाबा आढाव आणि मेधा पाटकर याची भाषणे; अशा लढाऊ कार्यकर्त्यांच्या परंपरेने माझ्या लेखणीतला खैरमोडे गुरुजी घडवला.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

२.

शंभर वर्षांमागे म्हणजे १९२७मध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये जगप्रसिद्ध कादंबरीकार ई. एम. फॉस्टरने ‘द अस्पेक्ट ऑफ नॉव्हेल्स’ म्हणजेच कादंबरी वाङ्मयाचे घटक या विषयावर खूप मोठी व्याख्याने दिली होती. कथा, व्यक्तिरेखा, आदी घटकावर विस्तृत चर्चा केली. पुढे अभ्यासकांनी नाट्य आणि संघर्ष या दोन विशेष घटकांनाही महत्त्वाचे स्थान दिले आहे.

कादंबरी हा वाङ्मयप्रकार तर पूर्णतः परदेशी म्हणता येणार नाही. भेदीकीची रात्रभर चालणारी गाणी, सुबरानं मांडलं गा म्हणत धनगरांची रात्रभर ढोल आणि खैताळावर रंगणारी दीर्घ कथानके आणि त्यांचे पट कादंबरीसदृश्य आहेत. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाच्या हद्दीवर एका रेल्वे स्टेशनवरच्या घटनेतून निर्माण झालेली काशीबाईची लावणी, चिल्याबाळाची गोष्ट, बटऊमोहनाचा वग या साऱ्या कथानकांचा पट हा मूलगामी कादंबरी आणि नाटकांचाच पट वाटतो. ‘रामायण’ आणि ‘महाभारता’च्या कथा हा व्यास आणि वाल्मिकीसारख्या शब्दप्रभूंच्या लेखणीचा महाचमत्कार आहे.

आपल्याकडे स्वातंत्र्याच्या आंदोलनावर किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या जनांदोलनाची दाहकता दाखवणारी, अगर ज्या पुण्यामध्ये बुद्धीचे बृहस्पती राहतात, त्या पुण्यातल्या पानशेतच्या प्रलयावर एखादी जबरदस्त कादंबरी घडलेली नाही. याच पार्श्वभूमीवर सांगायचे तर श्रेष्ठ आसामी लेखक श्री. वीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांची ‘लोकांचे राज्य’ ही अतिशय उत्कृष्ट कलाकृती मान्य करावी लागेल. जिचे आपल्या कवयित्री शांता शेळके यांनी नितांत सुंदर भाषांतर केले आहे.

या भूमीतल्या शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेला हात घालणारा पहिला बंडवाला विद्रोही साहित्यिक म्हणजे महात्मा जोतिबा फुले. ज्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ नावाची महागाथा १८८१मध्ये लिहिली. शेतकरी नावाच्या दरिद्रीनारायणाची कैफियत इंग्रजसाहेबाला कळावी म्हणून ते सामान्य कुणब्याच्या पेहरावात ब्रिटिशसाहेबाला भेटले असे मानतात. शेतकरी वर्गाची परवड आमच्या सदानंद देशमुख यांनी आपल्या ‘बारोमास’ कादंबरीमध्ये उत्तम पद्धतीने मांडली आहे. व्यंकटेश माडगूळकरांची ‘काळी आई’, आनंद यादवांचा ‘गोतावळा’, उद्धव शेळके यांची ‘धग’, र. वा. दिघे यांची ‘आई आहे शेतात’ अशा आमच्या साहित्यकृतींनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना मांडल्या आहेत.

मात्र आज नोकरी नाही, म्हणून प्रत्येक खेड्यात शेकडो मुले बिनालग्नाची आहेत. बेकारीत पोळणाऱ्या मुलाशी लग्न करण्याऐवजी डोक्यावर अक्षताच न पडलेल्या बऱ्या अशा विचाराने शेकडो मुलींचे विवाह लांबणीवर पडले आहेत. शेतीमालाला भाव नाही. ही भयानक शांतता आणि अस्वस्थता उद्याच्या भीषण भविष्याला आमंत्रण देणारी आहे, हे बिलकूल विसरू नका.

१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव कर्पे नावाच्या चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने कुटुंबियांसह पहिली आत्महत्मा केली. १९९५ ते २०२२ म्हणजे २७ वर्षांत ९६ हजार २४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०२४मध्ये हा आकडा २ हजार ६३५वर गेला आहे. याचा दुसरा सरळ अर्थ दिवसाला सुमारे शेतकरी आजही या महाराष्ट्र भूमीमध्ये आपले जीवन संपवत असतात.

बळीराजांच्या आत्महत्यांचे हे विषारी पर्व म्हणजे या भूमीतील सर्व राजकीय पक्षांचे, समाजाचे नव्हे तर आम्हा लेखक कलावंताचेसुद्धा अपयश आहे. मातीतून मोती फुलवणाऱ्या गरीब कष्टकऱ्यांना झाडाला टांगून स्वतःचे जीवन संपवताना किती यातना होत असतील! गेल्या ४४ वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधणे आणि त्याचे निवारण करणे हे कोणालाही जमलेले नाही. खरे कारण म्हणजे काय, तर शेतकऱ्याला शेतीचा धंदा करणेच परवडत नाही. म्हणून तो म्हणे मरणाला मिठी मारतो. याच्या उलट गेल्या ४४ वर्षांत म्हणजेच जवळपास गेल्या अर्ध शतकाच्या प्रवासात, कोणाही सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबाने किंवा त्यांच्या नातेवाईकाने, अगर साध्या नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीपासून संसदेपर्यंतच्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीने अगर त्याच्या जवळच्या नातेवाईकाने सुरू केलेला कोणताही धंदा कधी बुडाला आहे, असे कोणाला दाखून देता देईल का? मग बिचाऱ्या शेतकऱ्यांच्याच वाट्याला हे असे दुःखी जीवन का यावे?

आज इथे या ठिकाणी, एका शेतकरी मातेचा पुत्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला, या गोष्टीची जाणीव ठेवून मी शासनाकडे कळकळीची विनंती करतो आहे की, ‘लाडक्या बहिणी’प्रमाणेच मातीशी झट्या घेऊन धान्य पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी. एकीकडे त्या मतदान करण्यासाठी उपयोगी पडतीलच, पण त्याच वेळी जात शेतकऱ्याची असल्यामुळे त्या अन्नधान्य पिकवण्याचा आपला मूळ धर्मसुद्धा अजिबात विसरू शकणार नाहीत, याची मला खात्री आहे.

कोणतेही राज्य चालवताना त्याचे अर्थकारण महत्त्वाचे असते. त्यामुळेच शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी सुरत, जालनापूर, हुबळी, अहमदनगर, जुन्नर, राजापूर ते वेल्लोर आणि जिंजीपर्यंत मुसाफिरी व मोहिमा राबवल्या. हिंदवी स्वराज्याच्या वृद्धीसाठी पैसा उभारला. आजच्या भाषेत ‘निधी’ निर्माण केला. परंतु शिवरायांच्या स्वराज्याचा पाया हा निधी नव्हे, तर ‘न्याय आणि नीती’वर आधारलेला होता. आणि जिथे न्याय वेळेत मिळत नाही, तिथे अवनीतीची कळा चढते, हे सूत्र शिवरायांनी प्रमाण मानले होते.

अनेकदा शिवरायांची तुलना नेपोलियन नेपोलियन बोनापार्ट यांच्याशी केली जाते. दोघेही अल्पायुषी. नेपोलियन ५२ वर्षांचे, तर शिवरायांना अवघे ४९ वर्षांचे आयुष्य लाभले. नेपोलियनचे साम्राज्य त्यांच्या हयातीत नष्ट झाले, परंतु जगाच्या हृदय सिंहासनावरून शिवराय अद्यापी खाली उतरले नाहीत.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शासन नव्हे तर समाजानेसुद्धा ग्रंथ आणि सांस्कतिकडे मोठ्या मनाने पाहायला शिकले पाहिजे. अनेकदा आपल्या कुटुंबातले चार सदस्य मल्टीप्लेक्समध्ये जातात. चारशे रुपयांचे प्रत्येकी एक प्रमाणे पॉपकॉर्न खुशीने खातात. आणि ते खाता-खाता मराठी पुस्तकांच्या किमती खूप भडकल्या असून ३०० रुपयाच्या खाली पुस्तक मिळत नाही, असा गंभीर मुद्रेने विचार करतात. आज घराघरामध्ये आमच्या देव्हाऱ्याचा विस्तार वाढला आहे. पण अनावश्यक धोंड म्हणून घराघरातली व्यक्तिगत छोटी ग्रंथालये नष्ट झाली आहेत. मराठी भाषेमध्ये जी थोडीफार पुस्तके खपत असतील, त्यांनासुद्धा आज पायरसीच्या वाळवीने हैराण करून सोडले आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

३.

आज शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिसिटी बोर्ड मर्यादित वेळ वीज देते. त्यामुळे वाळणारी पिके वाचवण्यासाठी शेतकरी रात्रीचे सापाच्या फणीवर पाय ठेवून उसात उतरतात. आता तिथे बांधाबांधावर बिबटेभाऊ त्यांच्या स्वागतासाठी हजर आहेत. नुकत्याच असेंब्लीमध्ये सरकारने दिलेल्या आकड्यानुसार एकट्या जुन्नर तालुक्यात गेल्या वर्षांत ५४ व्यक्ती मृत्युमुखी आणि १५० जखमी झाल्या. या बिबट्यांनी शेतकऱ्यांची सुमारे २६ हजार जनावरे ठार मारली. हा प्रकार फक्त एका जुन्नर तालुक्यातला. तिकडे कर्नाटकाच्या हद्दीवर जंगली हत्ती रानेच्या-राने उद्ध्वस्त करत सुटले आहेत.

कोर्टामधून घाईघाईने हुकूम मिळवून प्राण्यांना आमच्यापासून दूर पळवणाऱ्या या तथाकथित प्राणीमित्रांना आमच्या संस्कृतीचा आणि मानव व पशुंच्या पूर्वापार नात्यांचा इतिहासच ठाऊक नाही. खरे तर मौर्यकाळापासून वनराज हत्ती जंगल सोडून नगरानगरांत मनुष्यमात्रांत येऊन मिसळला. पोटच्या पोराप्रमाणे पुढे हजारो वर्षं गावोगावच्या मंदिरामध्ये आणि मठामध्ये हजारो हत्तींचे पालन व्हायचे. हे प्राणीमित्र चौपाटीवर घोडी फिरू देत नाहीत, यांनी मठा-मठातील ऋषीमुनींचे पूर्वापार हत्ती नेले. अलीकडेच ‘महादेवी’ हत्तीणीच्या संरक्षणासाठी हजारो नागरिक आणि गावेच्या गावे डोळ्यातले अश्रु आवरत रस्त्यावर उतरली होती. हत्तीपालन आणि अश्वपालन सम्राट अशोकापासून शिवाजी राजांपर्यंत अनेक युगप्रवर्तक महापुरुषानी केले आहे. हत्तीघोड्यांचे पालन, संगोपन, आरोग्य व आहार या विषयावर पुरातन काळापासून शास्त्रोक्त विचार आणि संशोधन झालेले आहे. तिसऱ्या शतकाच्या दरम्यान मतंग ऋषिनी ‘गजशास्त्र’ लिहिलं. अश्वशास्त्र किवा अश्वपरीक्षेबाबत शालीहोत्र मुनीनी पुरातन काळी सखोल संशोधन आणि लेख केलेले आहे. त्या पागांची व पिलखान्यांची कसलीही माहिती या ‘सो कॉल्ड’ प्राणीमित्रांना नाही...

एका कुठल्या तरी सर्कशीत अपघाताने २५-३० जनावरे मृत्युमुखी पावली, म्हणून भारतातील सर्कशीमध्ये प्राणी वापरावर बंदीच आणली गेली. अरे, दर वर्षी मोटार अपघातामध्ये १ लाख ७७ हजार माणसे मृत्युमुखी पडतात. म्हणजे रोज सरासरी ४८५ लोक मरण पावतात, म्हणून वाहतुकीसाठी रस्तेच बंद करायची तुमच्यामध्ये आहे का हिंमत? लक्षात ठेवा, भारतीय सर्कशीची पाठराखण या भूमीमध्ये लोकमान्य टिळक, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी केली आहे. सर्कशीची जन्मभूमी केरळच्या आधी मुंबई प्रांत आणि त्यातही आमच्या पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील ‘तासगाव’ ही आहे. एकट्या तासगावात एकेकाळी राष्ट्रीय दर्जाच्या १५ सर्कशी होत्या. या पार्श्वभूमीवर मी बिबटे आणि रानटी हत्तीसारखे प्राणी मोकाट सुटण्याऐवजी सर्कशीमध्ये वापरायला पुन्हा परवानगी द्या, अशी समाजाला व शासनाला विनंती करतो. प्राणिमित्रांनी समाजास वेठीस धरण्याचा आगाऊपणा करू नये.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

न्यायमूर्ती रानडे यांनी साहित्य संमेलनाचा घाट घातला, त्या वेळी त्यांचं वय ३८ वर्षांचं होतं. नंतर २२ वर्षांनी याच महादेव गोविंदानी ‘मराठा सत्तेचा उदयास्त’ नावाचा मौलिक ग्रंथ लिहून प्रबोधनाला खऱ्या अर्थी चालना दिली. देशाच्या आझादीचे आंदोलन असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा नामांतराचा लढा, अगर आणीबाणीसारखा प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक आणि निर्णायकी वळणावर मराठी साहित्य संमेलन चार पावले आघाडीवरच राहिले आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

४.

२०११मध्ये भारत सरकारने देशातील ११ वरिष्ठ लेखक-कवींना चीनच्या दौऱ्यावर पाठवले होते. त्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय होते. ज्यामध्ये माझाही समावेश होता. तेव्हा मी चीनच्या शांघाय बेटाला भेट दिली. एके काळी शांघाय ही महानगरी म्हणजे एक मोठे गिरणगावच होते. तिथे मुंबईसारख्या ६०-६५ कापड गिरण्या होत्या. मूळ शांघायमधला एकही गिरणी कामगार आता त्या शहरात उरली नाही. त्यांचे वंशज रोज ७०-८० किलोमीटर अंतरावरच्या खेड्यांतून रोज रेल्वेच्या दांड्याशी लोमकळत रोजगारासाठी रोज शांघायमध्ये येतात.

याच पार्श्वभूमीवर मी जेव्हा आमच्या मुंबईच्या गिरणगाव, लालबाग आणि परळचा विचार करतो. माझे सख्खे दोन चुलते मिल मजदूर होते. माझ्या बालपणी मी पाहिलेली ती मुंबई- जी सकाळी गिरण्यांच्या भोंग्यावर जागी व्हायची. हिची कहाणी नारायण सुर्वे, बा. सी मर्ढेकर आणि नामदेव ढसाळांनी आपआपल्या काव्यातून सांगितली आहे. मुंबई नावाच्या महानगरीत जवळपास ६५ गिरण्या, २ लाख ८० हजारहून अधिक गिरणी कामगार आणि गिरण्यांवर आधारित अशा इतर उद्योग धंद्यातील मिळून ८ लाख कामगार आणि त्यांचे कुटुंबकबिले जगत होते.

परळ-लालबागेत ज्याला गाववाल्यांच्या खोल्या म्हटल्या जायच्या. त्या एकेका दहा बाय पंधराच्या खोलीत किमान सत्तर सत्तर कामगार राहायचे. गिरणीतल्या कामाच्या पाळीसारख्या झोपायलाही पाळ्या असायच्या. खरं युद्ध सकाळी सुरू व्हायचं. संडासांची संख्या मर्यादित. त्यामुळे डालड्याचा डबा हाती घेऊन ४०-४० लोकांची लाईन लागायची. पुढे लोक जेव्हा मला तुम्ही जीवनात कळावेदना जिरवायला कुठं शिकलात, असा प्रश्न करतात तेव्हा मला माझ्या बालपणीच्या त्या चाळी आठवतात. त्याच नगरीचा मी पुढे कलेक्टर झालो.

२६ /१९च्या वेळी मी मुंबई उपनगर जिल्हयाचा जिल्हाधिकारी होतो. मुंबईच्या अंडरवल्डमधल्या अनेक घटना मला हुतात्मा विजय साळसकर यांनी सांगितल्या होत्या. त्यातून ‘लस्ट फॉर मुंबई’ ही माझी सर्वांत आवडती कादंबरी जन्म पावली. पण मी आजही एकाच प्रश्नाने हैराण आहे, कुठे गेली ती सुमारे दहा लाख कुटुंबे? कधी पडला आहे तो प्रश्न, या भूमीतल्या इतिहासकारांना किंवा समाज अभ्यासकांना?

काळ मोठा कठीण आला आहे. तो गिरणगाव जिथे माझ्या खेडेगावातल्या प्रत्येक घरातला एक मजूर काम करत होता, जिथे आमच्या पाच-पाच पिढ्यांनी घाम गाळला, रासायनिक द्रव्ये शोषून जीवन संपवले, त्या ठिकाणी आता ५०-५० मजली टॉवर्स उभे आहेत. साठ-साठ कोटींचे फ्लॅट विकले जातात. प्रत्येक फ्लॅटमध्ये, प्रत्येक मजल्यावर सुंदर स्विमिंग पूल आहेत. पण अंगावरच्या फाटक्या वस्त्रानिशी ज्या गिरणी कामगारांना आपला गिरणगाव सोडावा लागला, त्यांना आज ३०-३५ वर्षांनंतर सुद्धा वचन दिलेली हक्काची घरे मिळालेली नाहीत. ही सारी श्रमिकांची करुण व वादळी गाथा मी माझ्या ‘लस्ट फॉर मुंबई’ या कादंबरीमध्ये लिहिलेली आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

आज इथे या ठिकाणी, एका शेतकरी मातेचा पुत्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला, या गोष्टीची जाणीव ठेवून मी शासनाकडे कळकळीची विनंती करतो आहे की, ‘लाडक्या बहिणी’प्रमाणेच मातीशी झट्या घेऊन धान्य पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी. एकीकडे त्या मतदान करण्यासाठी उपयोगी पडतीलच, पण त्याच वेळी जात शेतकऱ्याची असल्यामुळे त्या अन्नधान्य पिकवण्याचा आपला मूळ धर्मसुद्धा अजिबात विसरू शकणार नाहीत, याची मला खात्री आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

५.

१८७८मध्ये जे आमचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले, ज्याचा आमच्या महात्मा फुल्यांनी ‘घालमोड्यादादांचे संमेलन’ असा केलेला उल्लेख नेहमी टाळीच्या एका वाक्यासाठी दिला जातो. त्याच्या पल्याड खोलवर जाऊन तत्कालीन परिस्थितीचा अधिक गांभीर्यानं विचार करायला हवा. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ला झाली. त्याच्याही आधी सात वर्षं आमचं मराठी साहित्य संमेलन जन्माला आलं आहे. म्हणजे या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनानं हात घातला आहे.

मुळात न्यायमूर्ती रानडे यांनी साहित्य संमेलनाचा घाट घातला, त्या वेळी त्यांचं वय ३८ वर्षांचं होतं. नंतर २२ वर्षांनी याच महादेव गोविंदानी ‘मराठा सत्तेचा उदयास्त’ नावाचा मौलिक ग्रंथ लिहून प्रबोधनाला खऱ्या अर्थी चालना दिली. देशाच्या आझादीचे आंदोलन असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा नामांतराचा लढा, अगर आणीबाणीसारखा प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक आणि निर्णायकी वळणावर मराठी साहित्य संमेलन चार पावले आघाडीवरच राहिले आहे.

१५ ऑक्टोबर १९३८ या दिवशी मुंबईत भरलेल्या २३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बॅ. विनायक दामोदर सावरकर होते. जेव्हा साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा आणि तलवारी हाती घ्या’ असा संदेश त्यांनी दिला होता. तेव्हा सावरकरांच्या अध्यक्षतेखाली १९३८मध्ये म्हणजेच ८७ वर्षांपूर्वी भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या क्रमांकाचा असा ठराव पास झाला होता की, ‘हिंदुस्थानातील सर्व प्रमुख देशी भाषांची वाढ होऊन, प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच महाविद्यालयीन शिक्षणही त्या त्या प्रांतातील देशी भाषेतून दिले जावे.’

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिंहासनासमोर झुकत नाहीत, हे या भूमीतल्या साहित्यिकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

६.

आज एकीकडे आम्ही ‘अभिजात भाषा’ म्हणत स्वतःच्याच कौतुकाचे ढोल वाजवत फिरत आहोत, पण आम्हा सर्वांचेच वर्तन मायमराठीच्या विकासासाठी मारक असल्याचे, मी नव्हे तर आमचे नियम, अधिनियम आणि कागदपत्रे सांगतात. केंद्र आणि राज्य शासनाने लेखक आणि प्रकाशक यांच्यावर जो १८ टक्के जीएसटी लावला आहे. तो तात्काळ रद्द करावा, कारण मुळात प्रकाशन व्यवसायच आतबट्यातला आहे.

शासन नव्हे तर समाजानेसुद्धा ग्रंथ आणि सांस्कतिकडे मोठ्या मनाने पाहायला शिकले पाहिजे. अनेकदा आपल्या कुटुंबातले चार सदस्य मल्टीप्लेक्समध्ये जातात. चारशे रुपयांचे प्रत्येकी एक प्रमाणे पॉपकॉर्न खुशीने खातात. आणि ते खाता-खाता मराठी पुस्तकांच्या किमती खूप भडकल्या असून ३०० रुपयाच्या खाली पुस्तक मिळत नाही, असा गंभीर मुद्रेने विचार करतात. आज घराघरामध्ये आमच्या देव्हाऱ्याचा विस्तार वाढला आहे. पण अनावश्यक धोंड म्हणून घराघरातली व्यक्तिगत छोटी ग्रंथालये नष्ट झाली आहेत. मराठी भाषेमध्ये जी थोडीफार पुस्तके खपत असतील, त्यांनासुद्धा आज पायरसीच्या वाळवीने हैराण करून सोडले आहे.

२०१२पासून राज्यातल्या मराठी शाळेच्या कोणत्याही नव्या तुकडीला शासकीय अनुदान मिळत नाही. म्हणजेच गेल्या १३ वर्षांत एकही नवी मराठी शाळा सुरू झालेली नाही. २०२५मध्ये एका आकडेवारीनुसार एका वर्षात ६५ नव्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मंजुरी मिळालेली आहे. एकट्या मुंबईत या कालावधीत १०६ मराठी शाळा बंद करण्याचा आम्ही पराक्रम घडवून आणला आहे. बाहेर गावी काय घडले असेल, याची पुरी माहिती नाही.

इंग्रजीसारख्या भाषेला कैवारी कमी आहेत म्हणून की काय, मुंबई आणि नागपूरसारख्या महापालिकांनी स्वतःच्या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा आचरट उद्योग आरंभला आहे. ज्या मराठी शाळामध्ये २०पेक्षा संख्या कमी पटसंख्या असेल तर ती शाळा बंद करून तिथली शाळा जवळच्या दुसऱ्या शाळेत हलवायची आणि या साऱ्या डामरट उद्योगाला ‘सक्षमीकरण’ असं गोंडस नाव द्यायचं. वास्तवात हे सक्षमीकरण आम्ही मराठी शाळांचं करतोय की, ‘इंटरनॅशनल स्कूलवाल्यां’चा हाच खरा प्रश्न आहे.

माझा इंग्रजी किंवा हिंदी भाषेला मुळीच विरोध नाही. आईच्या दुधावर वाढलेले बालक जसे बलवान असते, तसेच तिच्या मुखातल्या शब्दावर ते अधिक बलवान बनते. लक्षात ठेवा आईच्या शब्दसंस्कारात वाढलेले जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळेत वाढलेले मूल तुमची जन्मभर श्रावणबाळासारखी काळजी घेईल. ते तुम्हाला कधीही वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणार नाही. गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्रातील जे शास्त्रज्ञ आंतराष्ट्रीय स्तरावर गाजले. त्यापैकी ९८ टक्के मराठीतूनच शिकले होते.

महात्मा फुल्यांनी हंटर साहेबांसमोर या देशातले शिक्षण आमच्याच भाषेत मिळावे असा आग्रह धरला होता. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बॅ. सावरकर असताना त्यांनी प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मातृभाषेतूनच मिळायला हवे, असा ठराव केला होता. महात्मा गांधीनींही मृत्यूच्या पाच दिवस आधी या देशातील लोकांची प्रगती ही फक्त मातृभाषेच्या माध्यमातून होऊ शकते, असे सांगितले होते. यापेक्षा कोणाची अधिक प्रमाणपत्रे हवीत?

एकुणच मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. उद्या तुमच्या देव्हाऱ्यावर विठोबासमवेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात, असे वाटत असेल, तर वेळीच झोपेतून जागे व्हा.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......