‘आदिपुरुष’ : ‘रामायणा’ची ३०३वी आवृत्ती! (हा सिनेमा कसा चांगला आहे, हे सांगण्यापेक्षा तो वाईट का नाही, हे सांगण्यासाठी हा प्रपंच)
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्रीकांत आगवणे
  • ‘आदिपुरुष’चं एक पोस्टर
  • Sat , 24 June 2023
  • हिंदी सिनेमा कला-संस्कृती आदिपुरुष Adipurush ओम राऊत Om Raut मनोज मुत्तसीर Manoj Muntashir रामायण Ramayana राम Ram रावण Ravana प्रभास Prabhas सैफ अली खान Saif Ali Khan

‘आदिपुरुष’चा नको इतका गवगवा झाल्यामुळे त्याच्या तिकिटाचे भाव उतरले, कदाचित या शुक्रवारपर्यंत सिनेमा पण खाली उतरेल. हा सिनेमा प्रचारकी थाटाची उबग आणणारा असणार, त्यामुळे मी तो पाहणं टाळणार होतो, पण तो ‘ट्रॅश’ असल्याची इतकी टीका झाल्याने माझ्या ‘मस्ट वॉच लिस्ट’मध्ये आली… त्यात भाव कमी... 

नमनालाच सांगतो, ऐकला तितका काही हा सिनेमा वाईट नाही. तो कंटाळवाणा आहे, पण वेगळ्या कारणाने... बेसुमार मारामारी आता कंटाळवाणी होते, अगदी बऱ्यापैकी ‘कोरिओग्राफ’ केलेली असली तरी. असो, पण हा सिनेमा कसा चांगला आहे, हे सांगण्यापेक्षा तो वाईट का नाही, हे सांगण्यासाठी हा प्रपंच.

‘रामायणा’च्या संदर्भात एक गोष्ट आहे. ती अशी की, राम राजा बनतो (रामाचा एकेरी उल्लेख जवळच्या माणसाचा करतो त्या आपलेपणाने) लक्ष्मण, सीता, हे दोघे बाजूला उभे आणि हनुमान पायाशी खाली बसलेला, अशा ग्रुप फोटोसाठी पोझ देऊन असलेले...

तितक्यात रामाची अंगठी बोटातून घरंगळून फरशीवरच्या एका भेगेत पडते. (नवीन संसदेसारखं राजवाड्याचं नूतनीकरण विक्रमी वेळेत पूर्ण केलं असावं). ती अंगठी पार पाताळात जाते. आता ती मौल्यवान अंगठी मिळणार कशी? त्या छिद्रातून केवळ आणि केवळ हनुमानच सूक्ष्म रूप धारण करून जाऊ शकत असल्याने, तो लगेच रामाची परवानगी घेऊन अंगठीच्या शोधात निघतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

हनुमान पार पाताळात, खोल समुद्रातल्या नागराज्यात पोचतो. नागराज त्याचं अदबीनं स्वागत करतो. हनुमानाचं येण्याचं कारण कळताच सेवकाला अंगठी घेऊन यायला सांगतो. सेवक एक तबक घेऊन येतो. त्यात एकसारख्या दिसणाऱ्या पुष्कळ अंगठ्या असतात. नागराज म्हणतो, ‘यातली तुझ्या रामाची अंगठी शोधून घेऊन जा.’ हनुमान गोंधळात पडतो. नागराज पुढे म्हणतो, ‘या साऱ्या अंगठ्या रामाच्याच आहेत. तू जेव्हा पाताळातून वर जाशील, तेव्हा या रामाचा काळ संपून दुसऱ्या ‘रामायणा’ची सुरुवात झालेली असेल...’

रामाची कथा तीच, राम तोच, सीताही तीच, हनुमानही तोच, पण गोष्ट मात्र वेगळी. हे प्रत्येक वेळी, प्रत्येक काळात घडतं. ए. के. रामानुजन यांच्या ‘Three Hundred Rāmāyaṇas’ या निबंधातल्या प्रस्तावनेतील ही गोष्ट. हे पुस्तक दिल्ली विद्यापीठाने अभ्यासक्रमातून काढूनदेखील युगे लोटली... ‘कलियुग, कलियुग’ म्हणतात, ते आणखी दुसरं काय असणार! तर गोष्टीचा मथितार्थ असा की, ‘रामायणा’ची बरीच रूपं आहेत. ऐकणारा-सांगणारा वेगळा, तशी गोष्ट वेगळी.

भारतात राम-सीता बहीण-भाऊ, रावण-सीता बाप-लेक अशीदेखील रामायणे आहेत. मूळ रामायण ‘इलियड’ची उचलेगिरी असल्याची बोलवाही आहेच. एवढंच काय, पण सीतेच्या दृष्टीकोनातून रामायण प्रसिद्ध आहे. हे सीतेचं रामायण आदिवासी भागात प्रचलित आहे आणि पूर्वभारतातल्या लोककलेत त्याचे पडसाद दिसतात. बंगाली पट्टचित्र या गोष्ट-चित्र कथनात (ग्राफिक नॉवेल) हे सहज बघायला मिळतं.

जसं हे छायाचित्रं किती सुंदर आहे! १९२३ साली जर्मनीत छपाई झालेलं… धारवाडच्या जुन्या दत्त मंदिरातलं. यातला हनुमान सर्वसाधारण शरीरयष्टीचा दिसतो आहे, सीतामाय तर किती आपलेपणाने रामाच्या मांडीवर बसलीये... आदर्श जोडपं म्हणजे सीतारामच असं दिसतं… त्यांचा प्रेमळ रोमान्सही दिसतो. आता नशीब म्हणायचं की, अजून यावरून कोणाच्या भावना दुखावल्या गेलेल्या नाहीत.

रामायण हे करुण रसानं ओतप्रोत भरलेलं महाकाव्य. ते काळाच्या, स्थळाच्या सीमा ओलांडून गेलं. त्याची अमीट छाप इतक्या वर्षांनंतरही कमी ना होता वेगवेगळ्या रूपांत-प्रकारांत जिवंत राहिली. रामानंद सागर यांचं ‘रामायण’ हे ‘वाल्मिकी रामायणा’सारखं ‘मेनस्ट्रीम’ झालं. आपण फक्त ‘मेनस्ट्रीम’लाच ओळखणार आणि बाकी सब बंद, असं कसं चालणार? कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, तरी ‘सबाल्टर्न’ संस्कृती नदीच्या अंतःप्रवाहासारखी वाहत राहणार... पण आपण नदी-नाले बुजवून एकसाची विकासाचे इमले बांधणारे!

‘आदिपुरुष’चा लेखक मनोज मुत्तसीर. मुत्तसीर म्हणजे विस्कटलेला, असा उर्दू शायराना नाव ल्यालेला, नया नया संघाच्या वळचणीला लागलेला आणि ‘आदिपुरुष’च्या वादावर संघाने हात वर केल्यानंतर ‘शुक्ला’ आडनाव लावणारा... जितके कथनकार, तितक्या रामायणकथा.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

मनोज उत्तर प्रदेशचा आहे. तो म्हणतो, त्यांच्याकडे उठताबसता रामाचा उल्लेख होतो, दर पंधरवड्याआड रामकथा वाचन, वर्षातून एकदाच येणारी पण जिकडेतिकडे होणारी रामलीला… आजी-काकूकडून ऐकलेल्या रामकथेवर त्याचा पिंड पोसला आहे. या सामग्रीवर त्याला नवीन रूपात ‘रामायणा’ची गोष्ट सांगायची आहे. जी त्याने आणि ‘आदिपुरुष’च्या टीमने सांगितली आहे. त्यात त्यांना हवे ते प्रसंग घेतले, हवे ते प्रसंग वाढवले वा कमी केले... हे असं चालायचंच.

डहाणूच्या धर्मांतर केलेल्या आदिवासीं (सॉरी वनवासी)कडून थाळ्यावर (परातीमध्ये पोळ्यातलं मेण आणि त्यावर खोवलेला ज्वारीचा दांडा या सामग्रीवर बनवलेलं वाद्य) ‘रामायणा’ची गोष्ट तीन तास ऐकलीये आणि तीन दिवसही. ‘दास्तानगोय’, ‘बातपोष’ जशी गोष्ट खुबीनं वाढवतात, तसंच. टीव्ही रामायणाची फुटपट्टी करून सगळ्या रामायणाची मापं काढली जातात, त्यातला हनुमान तर थेट पंजाबी बोलतो. मग या बजरंगाच्या डायलॉगवर काहूर का? ‘तेल तेरे बाप का...’ हे अमोघ लीला प्रभूच्या (इस्कॉन स्वामी) प्रवचनातून उचललं आहे, याची आता मनोजने कबुली दिली आहे. अंगाशी आलं की, झटकून टाकलं...

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

हा सिनेमा ओम राऊतने ‘तानाजी’च्या पुण्याईही मिळवला, सैफ-प्रभाससारखी तगडी स्टारकास्ट जमवली, पैसा जमवला, कारण त्याला एक नवीन कथन सादर करायचं होतं. जे कथन त्याच्या आजूबाजूला चाललेल्या घडामोडींवर भाष्य करणारं असेल किंवा त्याचं प्रतिबिंब त्यात असेल. ओम राऊतला दिग्दर्शक म्हणून इतिहासाची मोडतोड केल्यानंतर पुराणकथा अधिक ‘आव्हानात्मक’ वाटली असावी.

‘रामायणा’ची ‘दो हंसो का जोड बिछड ग्यो रे’ ही कथा ‘कवीला झालेला शोक- त्यातून निर्माण झालेला क्रोध - रागात दिलेला शाप- शापातल्या पंक्तीतील असलेला छंद याची झालेली जाणीव, त्या छंदात बांधलेले श्लोक आणि त्या श्लोकांचं काव्य’ या क्रमाने घडली आहे. हा क्रम पुढे सिनेमा, टीव्ही, अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स या वाटांवरून चालूच राहणार.

या कथेत ओम राऊतला कमी ‘पॉवर’ असलेला मानव आणि ‘सुपरपॉवर’ असलेला रावण, यांतला संघर्ष दाखवासा वाटला. हे म्हणजे ‘बॅटमॅन विरुद्ध जोकर’सारखंच की! (पण उलटी रचना). तो व्हिडिओ गेम खेळत खेळत मोठा झाला आहे. ‘अस्त्रालय’मध्ये फिल्ममेकिंग शिकलाय (ऑस्ट्रेलिया नाही- श्री श्री रविशंकर असं सांगतात की, महाभारतातल्या अर्जुनाने महासंहारक अस्त्र म्हणजे न्यूक्लिअर लपवून ठेवलेली ही जागा. म्हणून अस्त्रालयात मधोमध अगदी निर्जन वाळवंट आहे!) आपण वेदकाळापासून आण्विक प्रगत ना!

तर ओमने पुढे ‘महाभारत’वाला संजय हा ‘व्हीआर गॉगल्स’ घालून दाखवला, तर आपण नाकारणार काय? जशी सृष्टी, तशी दृष्टी. त्याच्या बाबांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘मास्टर हेड’मध्ये गणपती बसवला होता. त्यामुळे माध्यमांचे संकेत, त्यांचे अलिखित नियम, यांची मोडतोड त्याला नवीन नाही. आपण ‘महाराष्ट्र टाईम्स’मधला तो गणपती चालवून घेतला, तर ‘आदिपुरुष’ पण चालवून घेतला पाहिजे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

ओमच्या रावणाने घातलेले कपडे (फॅशन डिझायनर नचिकेत बर्वेकृत), काळ्या रंगांत रंगलेली लंका, टॅटू केलेलं असुर, हे तुम्हाला याआधी DC comics, मारवेलच्या सिनेमात, पुस्तकांत दिसलं, तर लक्षात घ्या की, ओम हा या पिढीचा माणूस आहे. आणि तो संवेदनशील असल्याने त्याच्यावर प्रभाव पडणार. आपण ‘दुसऱ्याचं ते आपलं’ या भ्रातृभावाने काही गोष्टी उचलल्या, तर त्यात काय एवढं मोठं!

‘आदिपुरुष’ हा जगन्नाथाचा रथ आहे, तो सर्वांनी ओढायचा आहे. आणि पैसे गुंतले आहेत, ते परत मिळवायचे असतील, तर जे लोक भक्तिभावानं हजार रुपयाची तिकिटं काढून DC- Marvelचे सिनेमे बघतात, त्यांच्या चवीनुसार सिनेमे बनणारच की! ‘ग्राहक का संतोष हाच फायदा’, ‘मजा आया ना?’ असं बोलबच्चन देशभर चाललं आहे. त्या गिऱ्हाईकांना डोळ्यासमोर ठेवून हा सिनेमा ओमने बनवलाय.

तिकडे युरोप-अमेरिकेसारख्या संस्कृतीहीन जगात सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, आयर्नमॅन हे सुपरहिरो आहेत. त्यांना लोक खरं मानतात, ते भेटावेत म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालतात. या अशा गोष्टी ऐकून-पाहून ओमने निर्मात्यांना विनंती केली की, प्रत्येक सिनेमामध्ये एक जागा हनुमानासाठी ‘रिझर्व्ह करा’. या आर्जवाकडे आपण संवेदनशील दृष्टीनं पाहिलं पाहिजे.

ओम व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, अल्टरनेटिव्ह रिअ‍ॅलिटी, चॅट-जीपीटीच्या युगातला तरुण मुलगा आहे... त्याला चिरंजीवी हनुमान सिनेमा पाहायला नक्की येईल, ही खात्री आहे. त्याचा मुन्नाभाईसारखा केमिकल लोच्या झालेला नाही, तर आपला लोच्या झालाय. मूड असता, तर हनुमानाच्या सीटवर बसला, म्हणून आपण लोकांचे खून पाडले असते! आपण मटनावरून खून करणारे!! आता ओमला हसतोय… हे काही बरोबर नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

जसा मनोज मुत्तसीर, तसा ओम राऊत हा ‘आपला’ माणूस आहे. त्याबद्दल शंका नको. त्याला भगवा रंग प्राणाहून प्रिय आहे, म्हणून अगदी सीताही गेरुवा नेसत नाही… बिकिनी नाही चालत, तर साडी कशी चालेल? पंचकन्या मंदोदरी बिनटिकलीची आहे. का? कारण ती ब्राह्मण असली, तरी पापी रावणाची बायको आहे. रावणाची सोन्याची लंका काळीकुट्ट दाखवली आहे...

इतका काटेकोर विचार करून हा सिनेमा बनवला आहे. आणि आपण ‘उचलली जीभ...’ आपण ठरवून उमेदवार पाडतो, तसं ‘कुजबुज गॅंग’ करून सिनेमा पाडायची, हा आजकाल आपला छंद झाला आहे. हे काही बरोबर नाही.

पीटर ब्रूकने जेव्हा ‘महाभारता’ची कास्टिंग केली (आपल्या दृष्टीनं सरसकट चुकीची), तेव्हा त्याने त्याच्या दोन प्रदीर्घ भारतप्रवासात मिळालेल्या अनुभवावर जगभरातून मोजके अभिनेते निवडले... त्याचा भीम काटकुळा आहे. त्यावर तो म्हणतो, भीम इतका शक्तिशाली आहे की, त्यामुळेच तो प्रचंड नम्र आहे. मला भीमात नम्रपणा दिसतो! प्रभासलाही ‘बाहुबली’पासून नम्र, मातृभक्त, राजनिष्ठ असण्याची सवय लागली आहे. आणि तो त्याच्या अंगभूत आकसलेल्या चेहऱ्यानं वावरतो. हे मान्य केलं पाहिजे की, तो रावणाला मारताना खुनशी दिसत नाही, सीतेला मिठी मारताना उगाच खोटा वाटत नाही...

तसाच रावणही. सैफने बरहुकूम काम केलं आहे. दहा तोंडं रावणाला गोंधळवून टाकतात, तसं  सैफला आता वाटत असेल- नक्की चुकलं कुठे? जर ओमच्या ‘तानाजी’मध्ये ‘उदयभान राठोड’ काळे-काळे कपडे घालून दक्खनच्या उन्हाळ्यात दिवस-रात्र वावरू शकतो, त्याचं हिंदू राजस्थानी न दिसता ‘मुस्लीम’ दिसणं चालतं (‘...ते त्यांच्या कपड्यावरूनच ओळखू येतात’- मोदी), तर या प्रेक्षकांना नक्की काय हवंय?

सगळ्या हिंदी सिनेमांचा लसावि काढून, त्याची यथेछ टिंगल करून बनवलेला ‘पुष्पा’ धो धो चालतो, ठोकताळ्यातून काढलेला ‘पठाण’ चालतो, आनंदीबाई-मस्तानी एकत्र नाचताना चालतात, ‘पद्मावती’ची नुसती वेलांटी काढून ‘पद्मावत’ झाला तरी चालतो... मग ‘आदिपुरुष’ का नाही? भारतीय प्रेक्षकांना झेपेल-पचेल इतकी बाळगुटी पातळ करून पाजायची? त्यांना जरासुद्धा डोक्याला ताप करून घ्यायचा नाहीये, हे ओमच्या, सैफच्या कधी लक्षात येणार?

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

‘आदिपुरुष’वरून इतकं काहूर उठायचं कारणच काय? हा सिनेमा प्रेक्षकांची जितकी समज आहे, तेवढ्याच समजेचा आहे. आपण ‘पोस्ट ट्रुथ’ काळात राहतो... आपण आपली बुद्धी कपडे देऊन भांडी विकत घेतो, तशी विकून टाकली आहे. आपल्या सारासार बुद्धीचा वापर करण्याऐवजी सांगोवांगीवर विश्वास ठेवून वागतो, बोलतो, खून करतो, खुनी-बलात्काऱ्यांना पाठिंबा देतो. ‘खरं सत्य असं काही नसतंच मुळी’ अशी ‘पोस्टमॉडर्न’, भोंगळ, गुळगुळीत वाक्य बोलणं, हेच आपलं ‘राजकीय भूमिका’ घेणं असतं… हाच बोटचेपेपणा असतो. मूक भूमिका ही पाठिंबा देण्याची भूमिका असते, हे काही नवीन सांगायला नको.

आपले कथानायक काळाच्या ओघात देव बनले, हे या पिढीसाठी बदलणार नाहीत, हे कसं  चालेल? राम अयोध्येत जन्माला म्हणून त्या जागेसाठी आपण कत्तली करतो, या नरसंहाराला यज्ञकार्यात मदत करावी तशी आर्थिक मदत देतो... आपल्याला मायकेल अँजेलोच्या ‘डेव्हिड’वरून चोरलेला ‘सिक्स पॅक अ‍ॅब्ज’वाला ‘विश्व हिंदू परिषदे’चा राम चालतो, वरच्या छायाचित्रात दिसतो, तसा साधा मानवी राम! गरोदर बायकोला घराबाहेर काढणारा, घरावरचा हक्क सोडणारा, बऱ्याच प्रसंगी गोंधळलेला, असा आपल्यातला वाटावा असा राम, आणि तो असा स्खलनशील आहे, म्हणूनच इतकी वर्षं संस्कृतीत टिकलेला राम आता गायब केलाय. त्याला आपण अडगळीत टाकलाय.

‘राम राम’ या शब्दांनी आपण एकेकाळी नमस्कार करायचो, आता त्याची ‘जय जय श्रीराम’ अशी धमकी केलीय. तरी आपण ‘आदिपुरुष’वर टीका करतो, हे काही बरोबर नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

लग्नाच्या बायकोला वाऱ्यावर सोडून तिची ओळखच नाकारणारे, म्हाताऱ्या आईला मिरवून स्वतःची जाहिरात करणारे, सख्या भावांना घरगुती कार्यक्रमातून दूर सारणारे, शपथेवर खोटे बोलणारे, शत्रूराष्ट्राला घाबरणारे, खोट्या शिक्षणाच्या गमजा मारणारे, मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवणारे आणि ‘पडे तो भी टांग उपर’ असे पंतप्रधान जर एकपत्नी, एकवचनी, मातृभक्त, आज्ञाधारक रामाचं नाव घेऊन सत्तेत येऊ शकतात आणि अशा लोकांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून ओमने हा सिनेमा बनवला, तर त्याची चूक कशी?

जे अक्षरशः रोज ‘theater of absrud’ जगतात, त्यांनीच जर या सिनेमातल्या प्रयोगांना समजून नाही घेतलं, तर मग कोण घेणार? ‘आदिपुरुष’ तिकीटबारीवर चालेल, हा ओमचा विश्वास या लोकांनी खोटा ठरवला, हे काही बरोबर नाही. 

या लेखाला ‘३०३वं रामायण’ असं नाव दिलंय. त्यामागे सुरुवातीला उल्लेख केलेल्या रामानुजनच्या ‘Three Hundred Rāmāyaṇas’चा संदर्भ आहे. ३०१वी रामायणाची आवृत्ती आपण साऱ्यांनी अयोध्येत दंगल करून-बाबरी पाडून लिहिली आहे, नंतरची आवृत्ती सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी स्वतःवरच्या लैंगिक शोषणावरच्या आरोपापासून स्वतःच कोर्ट, स्वतःच वकील, स्वतःच जज बनून स्वतःची निर्दोष सुटका करून घेतली ती. म्हणून ‘आदिपुरुष’ हे तीनशे तीनवं रामायण!

.................................................................................................................................................................

लेखक श्रीकांत आगवणे पूर्णवेळ भटके असून उरलेल्या वेळात MIT-ADT येथे सिनेमा माध्यमाचे शिक्षक म्हणून काम करतात.

mydharavi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......