‘छत्रपती शिवाजी महाराज’ हाच जीवनमंत्र बनलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची थोडक्यात ओळख करून देणारा लघुपट
कला-संस्कृती - चलत्-चित्र
टीम अक्षरनामा
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील लघुपटातील एक दृश्य
  • Tue , 16 November 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र शिवशाहीर Shivshahir बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare शिवाजी महाराज Shivaji Maharaj राजा शिवछत्रपति Raja Shivchhatrapati

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं काल पुण्यात वयाच्या ९९व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं. लहानपणापासूनच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रानं झपाटून गेले होते. पुढे तोच त्यांचा ध्यास, श्वास बनला. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांनी ‘राजा शिवछत्रपति’ (१९५७) हे शिवाजी महाराजांचं रसाळ, शाहिरी चरित्र लिहिलं. या चरित्रानं महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना शिवचरित्राची गोडी लावली. शिवाजी महाराजांची ओळख करून दिली. महाराष्ट्रात आजही या चरित्राचा लोकप्रिय पुस्तकांमध्ये समावेश केला जातो. त्याच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हाच जीवनमंत्र बनलेल्या बाबासाहेबांची थोडक्यात ओळख करून देणारा हा लघुपट...

२०१५ साली बाबासाहेबांना महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्तानं ११ मिनिटे ५ सेकंदांचा हा लघुपट नरेंद्र बेडेकर यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयासाठी बनवला होता. या लघुपटाचं लेखन सागर देशपांडे यांनी केलं आहे. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......