‘कौन प्रवीण तांबे?’ : व्यवस्थेने नापास केलेल्या गुणवंत खेळाडूची गोष्ट
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘कौन प्रवीण तांबे?’ या सिनेमातील एक प्रसंग व पोस्टर
  • Wed , 06 April 2022
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा कौन प्रवीण तांबे? Kaun Pravin Tambe प्रवीण तांबे Pravin Tambe जयप्रद देसाई Jayprad Desai श्रेयस तळपदे Shreyas Talpade अंजली पाटील Anjali Patil

कारकिर्दीच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या कलाकाराची, खेळाडूची यशोगाथा नेहमीच गायली, लिहिली आणि वाचली जाते. त्यावर चरित्रपट निघतात, ते बघायला गर्दी होते. पण रूढार्थाने यश न मिळालेल्या खेळाडूची गोष्ट सांगितली जात नाही. अशा खेळाडूने/कलाकाराने आत्मचरित्र लिहायचे ठरवले, तरी छापणार कोण? छापले तर वाचणार कोण? आणि त्यांच्याबद्दल यशस्वी खेळाडू/कलाकार बोलणार का?

सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रॉजर फेडरर, पी. व्ही. सिंधू किती असतात? शंभरात दोन किंवा तीन? क्रिकेट टीममध्ये निवड होणाऱ्या खेळाडूंची संख्या १५ असते. टेस्ट मॅच, वन डे आणि 20-20 साठी वेगवेगळे संघ निवडले, असे गृहीत धरले तरी भारतामधून ४५ खेळाडू निवडले जातात. प्रत्यक्षात मात्र आपली निवड व्हावी, यासाठी हजारो खेळाडू दिवस-रात्र मेहनत घेत असतात, रात्रंदिवस त्यांना निवड झाल्याचीच स्वप्ने पडत असतात. त्याच्या कितीतरी पटीने अधिक खेळाडू स्वतःची किमान रणजी स्पर्धेमध्ये निवड व्हावी, अशी आस लावून असतात. त्यातल्या यश न मिळालेल्या खेळाडूंच्या मनाची अवस्था काय होत असेल? खेळाचा सराव अखंडपणे करण्यासाठी त्यांना कसे बळ मिळत असेल?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

समाज यशोगाथा गाण्यात मग्न असतो. झगडणाऱ्या युवकाचे आयुष्य कसे आहे, याची कोण फिकीर करतो? आपण सुजाण नागरिक या नात्याने त्या गोष्टीही वाचायला हव्यात. कोणाच्या काही चुका झाल्या असतील, कोणाला चुकीचा मार्ग दाखवणारे गुरू मिळाले असतील, कोणीतरी योग्य निर्णय योग्य वेळी घेण्यात कुचराई केली असेल, कोणाचे ध्येय चुकले असेल.... असंख्य कारणे असू शकतात. त्यांच्या चुकांमधून आपण शिकू शकतो. स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे, पण ज्यांनी कष्ट करून स्पर्धेत भाग घेतला, त्यांची कथा बघायलाच हवी... त्यातलाच एक म्हणजे प्रवीण तांबे.

मुंबईतल्या एका चाळीत राहणारा प्रवीण तांबे उत्तम फलंदाज आहे, पण त्याहीपेक्षा तो उत्तम मध्यमगती गोलंदाज आहे. चाळीत राहणाऱ्या प्रवीणला रणजीमध्ये निवड होण्यासाठी कायम झगडावे लागले, अगदी खेळाचा दर्जा उत्तम असतानाही. असे का झाले असावे? त्याने कोचच्या सांगण्याप्रमाणे बॉलिंगची स्टाइल बदलली नाही म्हणून? तो ‘संपर्क’ ठेवण्यात, संवाद साधण्यात कमी पडला? राजकारण आडवे आले?

खेळाडूने कशावर लक्ष केंद्रित करावे? खेळामध्ये शैली बदलणारा कोच मिळाला तर काय करावे? ‘दंगल’ चित्रपटातले उदाहरण आपल्याला माहीत आहेच. खेळाडूने कोणाकोणाची चापलुसी करावी? गुरूची? बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांची? खेळ खेळत राहावे की, बॅकअप प्लॅन असावा, असे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत राहतात, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. प्रवीण तांबेची ही कथा आपल्याला एका बातमीदाराच्या माध्यमातून समजते, ज्याने कायमच त्याची अवहेलना करण्यात धन्यता मानली.

राहुल द्रविडने एकदा प्रवीण तांबेची गोष्ट सांगितली. त्यामुळे तो प्रसिद्ध झाला आणि आता त्याच्या आयुष्यावर चित्रपट निघाला. त्यासाठी राहुलचे खास कौतुक. त्याचा व्हिडिओ यु-ट्यूबवर आहे. जरूर बघावा आणि त्यानंतर ‘डिस्ने हॉट स्टार’वर नुकताच रिलीज झालेला ‘कौन प्रवीण तांबे?’ हा चित्रपटही. शीतल भाटिया, सुदीप तिवारी यांना असा चित्रपट निर्माण करण्याचे आणि जयप्रद देसाई यांनी दिग्दर्शन करण्याचे धाडस करावेसे वाटले, हे विशेष.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

सुरुवातीच्या श्रेयनामावलीमधील एक शब्द पांढरा आणि एक शब्द रंगीत दाखवला आहे. इथूनच आश्वासक सुरुवात असल्याचे जाणवते. किरण यज्ञोपवीत यांनी पटकथा लिहिताना चाळीतल्या वातावरणाशी प्रेक्षकांची नाळ जुळवल्यानंतर प्रवीण तांबेच्या आयुष्यातील रोजचा झगडा दाखवला आहे. त्यामुळे त्याचे रणजी क्रिकेटसाठी निवड होण्याचे स्वप्न अधिक प्रभावीपणे पुढे येते. कपिल सावंत संवाद यांनी मुंबईतल्या चाळीतल्या वातावरणानुसार हिंदी-मराठी मिश्र संवाद लिहिले आहेत. अन्यथा हिंदी चित्रपटात आतापर्यंत पंजाब बऱ्याच वेळा दिसला आहे, पण महाराष्ट्र अभावानेच दिसला.

अनुराग सैकिया यांचे संगीत ठीक. साई पियुष यांना पार्श्वसंगीतामधून काही प्रसंग अधिक प्रभावीपणे पुढे येण्यास आणि प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक वाढण्यास मदत करण्यास वाव होता. गोरक्षनाथ खंदे यांचे संकलन उत्तम, विशेषतः मैदानावरच्या प्रसंगातून चाळीतला प्रसंग जोडून पुन्हा मैदान दाखवतानाचे संकलन लाजवाब. सुधीर पलसाने यांनी फोकस-आउट ऑफ फोकस सिनेमॅटोग्राफीमधून उत्तम दाखवले आहेत.

श्रेयस तळपदेची प्रवीण तांबेच्या भूमिकेसाठी निवड अगदी दाद देण्यासारखी. या भूमिकेसासाठी दुसऱ्या कोणाचा विचारही आपण करू शकत नाही. खरे तर या गुणी अभिनेत्याला ‘इकबाल’नंतर चतुरस्त्र अभिनय दाखवण्यास योग्य भूमिका मिळाल्या असत्या, तर हिंदी चित्रपटास नैसर्गिक अभिनय करणारा अभिनेता मिळाला असता. परमव्रत चट्टोपाध्यायने रजत सन्याल या बातमीदाराची भूमिका त्याच्या नेहमीच्या शैलीत केली आहे. (‘कहानी’ चित्रपट आठवावा) आशिष विद्यार्थी यांचा कोच कमाल आहे. अंजली पाटील ही आश्वासक अभिनेत्री तिच्या अभिनयासाठी लक्षात राहते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कोणाचे काय चूक, कोणाचे बरोबर, हा प्रश्न नाही. कोणाला राजकारण जमते, कोणाला जमत नाही. कितीही कठीण प्रसंग असला तरीही न डगमगता खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे हे प्रत्येक जण करू शकत नाही. अनेक क्रिकेट सामन्यात ‘द वॉल’ राहुल द्रविडने विकेट फेकली नाही, मनावर ताबा ठेवून शांतपणे अर्धशतके, शतके ठोकली. तरीही किती जणांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले. जनसामान्यांचा हिरो सचिन तेंडुलकर होता, राहुल द्रविडला तितकी लोकप्रियता लाभली नाही. उलट राहुल आउट झाल्यानंतर सचिन तेंडुलकर येणार, या कारणास्तव प्रेक्षक जोरात टाळ्या वाजवायचे. तरीही राहुल खेळत राहिला, स्वतःच्या स्टाईलने, थंड डोक्याने. त्यामधूनच त्याला प्रवीण तांबेसारख्या unsung heroला जगासमोर आणावेसे वाटले असेल?

UPSC असो की CA-IMS असो किंवा NDA असो वा PSI सारख्या परीक्षा. त्या देणारे किती असतात आणि त्यामध्ये पास होऊन नंतर मुलाखतीमध्ये किती जणांची निवड होत नाही, का होत नाही, याचाच अभ्यास केला, तर मुलाखत देणारे त्या चुका टाळू शकतात. म्हणूनच ‘कौन प्रवीण तांबे?’ असे विचारू नये. त्याची माहिती घ्यावी, चित्रपट बघावा...

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Shridhar Marathe

Thu , 07 April 2022

छान ! सिनेमा बघायची उत्सुकता वाढली.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......