‘David Attenborough : A Life on Our Planet’- अभ्यासू वृत्तीनं ९५ वर्षांच्या आयुष्यात अनुभवलेले पृथ्वीवरील बदल
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुहास किर्लोस्कर
  • ‘David Attenborough : A Life on Our Planet’ या लघुपटाचं एक पोस्टर
  • Tue , 16 February 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र डेव्हिड अ‍ॅटनबरो David Attenborough डेव्हिड अ‍ॅटनबरो - अ लाइफ ऑन अवर प्लॅनेट David Attenborough : A Life on Our Planet

डेव्हिड अ‍ॅटनबरो हे निसर्ग-जंगल-जीवशास्त्र समजावून सांगणारं एक अग्रगण्य नाव. त्यांनी ‘बीबीसी’साठी केलेल्या फिल्म-डॉक्युमेंटरी सिरीजमधून आपल्याला सुजाण आणि सजग बनवलं आहे. निसर्गाची माहिती जगभरात फिरून अभ्यासू वृत्तीनं घेऊन ती आपल्याला ‘बीबीसी वर्ल्ड’तर्फे अनेक डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून सोप्या शब्दांत सांगण्याचं कार्य डेव्हिड अ‍ॅटनबरो गेली अनेक वर्षं करत आहेत. आज वयाच्या ९५व्या वर्षीसुद्धा त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. आजवर त्यांनी पृथ्वीतलावर वेगवेगळ्या उपखंडात फिरून तेथील जैववैविध्याची (Bio-diversity)ची माहिती घेत काय बदल अनुभवले आणि आयुष्याच्या या टप्प्यावर सिंहावलोकन करताना त्यांना काय वाटतं, याचा ‘आँखो देखा हाल’ त्यांच्याकडून ‘David Attenborough : A Life on Our Planet’ या फिल्म-डॉक्युमेंटरीमधून नेटफ्लिक्सवर बघता येतो. 

अ‍ॅटनबरो यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये निसर्गशास्त्रात पदवी शिक्षण घेतल्यानंतर १९५२ साली ‘बीबीसी टेलिव्हिजन’मध्ये ‘झू क्वेस्ट’ ही सिरीज सुरू केली. १९६४ मध्ये ‘बीबीसी-२’ची स्थापना झाल्यानंतर ब्रिटनमध्ये कलर टीव्ही सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. १९६९पासून ‘बीबीसी प्रोग्राम डायरेक्टर’ झाल्यानंतर चार वर्षांनी त्यांनी ‘डेस्क जॉब’ सोडून आपल्या आवडत्या उद्योगात म्हणजेच प्रोग्राम तयार करण्यास पुनश्च सुरुवात केली. ‘The Tribal Eye’ (१९७५), ‘Life on Earth’ (१९७९), ‘The Living Planet’ (१९८४), ‘The Trials of Life’ (१९९०), अशा अनेक उत्तमोत्तम सिरीजची निर्मिती केली. त्यांची १९९५ची ‘The Private Life of Plants’ ही सिरीज त्यांनी तयार केलेल्या सर्वोत्तम निर्मितीपैकी एक म्हणता येईल. ‘The Life of Birds’ (१९९८) ही, पक्षी कसे उडतात-घरटी कशी करतात-स्थलांतर कसे करतात, याचा अभ्यास करणारी १० भागांची सिरीज पुनःपुन्हा बघण्यासारखी आहे. निसर्ग समजावून सांगण्याची त्यांची शैली अनोखी आहे. त्यामुळे जगातील सर्वोत्तम अभ्यास कथाकथनकार – निवेदकांमध्ये अ‍ॅटनबरो यांचं नाव घेतलं जातं.

गेल्या ९५ वर्षांमध्ये पृथ्वीतलावर काय बदल झाले, मनुष्याने पृथ्वी काबीज करता करता प्राणीमात्रांची संख्या कशा पद्धतीनं कमी केली, त्याची कारणमीमांसा, त्याचे दुष्परिणाम आणि भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, याचा ऊहापोह दृश्यमाध्यमातून बघणं रंजक आणि तितकंच अभ्यासपूर्ण ठरतं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

गेल्या शतकामध्ये पृथ्वीवरील जैवविविधता कशा पद्धतीनं कमी होत आहे, आपल्या पुढच्या पिढीसाठी हे वैभव टिकवणं का आवश्यक आहे, अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह आपल्याला सप्रमाण बघावयास मिळतो आणि आपण वेगवेगळ्या जंगलातील प्रसंग अ‍ॅटनबरो यांच्या साक्षीनं बघतो.

अ‍ॅटनबरो यांचा जन्म झाला १९२६ साली. तेव्हापासून लोकसंख्या कशी वाढत केली, कार्बनच्या पाउलखुणा, मनुष्याचा हव्यास आणि त्यामुळे जंगलं कशी कमी होत गेली, हा औत्सुक्याचा विषय ठरेल. १९३७ साली २.३ अब्ज लोकसंख्या होती, त्या वेळी पृथ्वीवरील ६६ टक्के भूभाग जंगलसंपत्तीनं वाढला होता. लोकसंख्या ज्या वेगानं वाढत गेली, ते अचंबित करणारं आहे. १९७८मध्ये ४.३ अब्ज, १९९७मध्ये ५.९ अब्ज, २०२०मध्ये ७.८ अब्ज.

याचा दुष्परिणाम असा झाला की, जंगलसंपत्तीचं क्षेत्र ६६ टक्क्यांवरून ५५–४६ असं कमी होत होत आता ३५ टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. वातावरणातील कार्बन २८० (प्रती अब्ज)वरून ४१५ भाग (प्रती अब्ज) इतका वाढला. या वेगानं येत्या १०० वर्षांत आपण पुढील पिढीसाठी काय वाढून ठेवलं, याची कल्पना येऊ शकते. आतापर्यंतच्या इतिहासात ६५ दशलक्ष वर्षांत पाच सामूहिक विलोपनामध्ये (Mass Extinction) अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या. आता पुढे काय होणार? माणूस आपल्या कर्तृत्वानं निसर्गच नष्ट करणार की काय?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

डॉक्युमेंटरीची सुरुवात होते चेर्नोबिल जवळच्या शहरापासून. तिथं १९८६ साली अणुस्फोट झाला. त्यानंतर तिथल्या सरकारला उशिरा जाग आली व लोकांनी ते शहर रिकामं करायला सुरुवात केली. युक्रेनमधल्या या शहरात आज उंच इमारती रिकाम्या असल्या तरीही झाडंझुडपं वाढली आहेत. मनुष्याचा शिरकाव नसल्यामुळे प्राणी–पक्षी–जीवसृष्टी वृद्धिंगत होण्यास सुरुवात झाली आहे. अ‍ॅटनबरो तिथं समक्ष हजर राहून आपल्याला त्याची कारणमीमांसा सांगतात. मनुष्यानं कमी हस्तक्षेप केल्यास जीवसृष्टी कशी उभी राहू शकते, याचा उत्तम नमुना आपल्या बघावयास मिळतो.

पृथ्वीवर माणसानं स्वतःचं आयुष्य सुखकर होण्यासाठी निसर्ग ओरबाडण्यास सुरुवात केली, माणसं वाढली, शहरांची व्याप्ती वाढली, माणसानं जंगलांवर अतिक्रमण केलं. स्वतःला अन्न पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी आपण शेती करण्यास सुरुवात केली. एकाच पद्धतीचं पीक अधिक प्रमाणावर घेतल्यामुळे निसर्गाचं संतुलन बिघडण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्रात प्रमाणापेक्षा अधिक उस पिकवण्यामुळे जमिनीचा लोप पावणारा कस, उसाला लागणारं पाणी याबद्दल आपल्याला माहीत आहेच. दुसऱ्या महायुद्धानंतर माणसाच्या रोजच्या वापरातील तंत्रज्ञान वाढीस लागलं, माणसाच्या सोयीसुविधा वाढल्या, परंतु त्याची किंमत निसर्गाला द्यावी लागली, कारण त्याचं संतुलन आपण बिघडवलं.

महाबळेश्वरसारख्या निसर्गसंपत्तीमध्ये आजही सामूहिक जंगलतोड होत आहे. १० वर्षांपूर्वी बघितलेल्या घनदाट जंगलात आज आपल्याला माळरान दिसत आहे, परंतु त्यावर कोणाचाही अंकुश नाही. अ‍ॅमेझॉनच्या जंगलात निसर्गाचा असाच विनाश सुरू आहे. तिथं मध्येच वणवा पेटवला जातो, त्यावर कोणी काहीतरी मलमपट्टी करतं, परंतु अजून ५० वर्षांचा विचार करण्यास कोणालाही वेळ नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आजचा विचार करून आपण जंगलं ओरबाडत आहोत. याचे परिणाम आपल्याच पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषणा आपण ऐकतो, परंतु सरकारी उद्देश सफल झाला, हे दाखवण्यासाठी उंदीरमारीची (Gliricidia)ची झाडं टेकड्यावर लावली जात आहेत, ज्यावर कोणतेही पक्षी घरटे करत नाहीत. अशी झाडं लावल्यामुळे स्थानिक वृक्षांची वाढ होत नाही. टेकड्यावरील जैववैविध्य कमी होत आहे, टेकड्यांचं क्षेत्र आक्रसतं आहे आणि त्यावर बांधकामाना परवानग्या दिल्या जात आहेत. आपल्या घराजवळ वाढलेले वृक्ष आपल्याला नकोसे झाले आहेत. त्यामुळे आपण महानगरपालिकेत फोन करून, माणसं बोलावून ते वृक्ष एकाच बाजूनं कापायला सांगतो, काही वर्षांनंतर त्याचं संतुलन बिघडल्यावर तो वृक्ष उन्मळून पडतो. त्यामुळे आपल्याला खिडकीतून इतर इमारती स्पष्टपणे दिसतात, झाडांचा अडथळा होत नाही, आणि आपण आनंदी होतो. यामध्ये आपल्याला काहीच गैर वाटत नाही. असो.

आपल्या हव्यासामुळे आपणच केलेला निसर्गाचा ऱ्हास या डॉक्युमेंटरीमध्ये आपल्याला बघावास मिळतो.

निसर्गाचा आपला अभ्यास असो वा नसो, त्यामधील वैविध्याचे बारकावे आपल्याला ज्ञात असो वा नसो, डेव्हिड अ‍ॅटनबरो आपल्याला त्यांच्या प्रवासाच्या साक्षीनं आणि निवेदनाच्या ओघवत्या शैलीत दृश्य माध्यमाचा चपखल वापर करता करता त्यांच्याबरोबर घेऊन वेगवेगळ्या जंगलांची सैर करत हा विषय समजावून सांगतात. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय देणार आहोत, याची प्रचीती या दीड तासाच्या डॉक्युमेंटरीमधून येते.

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......