‘वाइल्ड वाइल्ड कंट्री’ आणि ‘सर्चिंग फॉर शिला’ – रजनीश उर्फ ओशो यांचा खरा चेहरा दाखवणारी बेवसिरीज व माहितीपट
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुहास किर्लोस्कर
  • ‘वाइल्ड वाइल्ड कंट्री’ आणि ‘सर्चिंग फॉर शिला’ यांची पोस्टर्स
  • Mon , 10 May 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र वाइल्ड वाइल्ड कंट्री Wild Wild Country सर्चिंग फॉर शिला Searching For Sheela ओशो Osho

‘वाइल्ड वाइल्ड कंट्री’ या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सहा भागांच्या वेबसिरीजमध्ये पहिल्या भागात रजनीश उर्फ ओशो यांचा उदय आणि दुसऱ्या भागात त्यांच्या आश्रमात जाऊन जर्मन दिग्दर्शक वूल्फगँग डोब्रोलनी यांनी केलेले शुटिंग दाखवले आहे. याचसोबत ‘सर्चिंग फॉर शिला’ हा शकून बात्रा दिग्दर्शित माहितीपटही नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. ओशो यांच्या आश्रमात काय उद्योग चालायचे, याचा साद्यंत वृत्तांत या दोन्हीमधून आपल्यासमोर येतो.

भांडवलशाही, अध्यात्म, सुख, समाधान यांवर भाषण देता देता ध्यानधारणा करण्याची भुरळ पाडणारे अनेक बाबाबुवा आणि तथाकथित आध्यात्मिक गुरू आहेत. १९६८च्या दरम्यान रजनीश उर्फ ओशो यांनी अध्यात्मामध्ये ‘सेक्स’ हा विषय वाढवला आणि त्याचेही व्यवस्थित मार्केटिंग केले. त्यांचे भक्त भारताबाहेरही मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ‘ओशो भक्ती’ला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. पुण्यातल्या त्यांच्या आश्रमात अनेक परदेशी पाहुणे येण्यास सुरुवात झाली. परिणामी त्यांना मोठा आश्रम तयार करण्याची गरज भासली. शिष्यांची संख्या ७००० पासून एक लाखापर्यंत वाढवणे, हे उद्दिष्ट होते. ओशो यांनी त्यांची पूर्वीची लक्ष्मी ही सेक्रेटरी बदलली आणि शिला या षोडशवर्षीय महिलेची नेमणूक केली. तेव्हाच्या भारत सरकारने मोठ्या प्रमाणावर जमीन हस्तगत करण्यासाठी परवानगी न दिल्यामुळे शिलाने अमेरिकेत अँटेलोप, ओरेगॉन या ५० जणांची लोकवस्ती असलेल्या गावात ८०,००० एकर जमीन विकत घेतली. त्यानंतर हळूहळू तिथे एकेक गैरप्रकार घडत गेले. स्थानिक लोकांच्या जमिनी गेल्या, बराच ‘खून-खराबा’ झाला, सामूहिक विषप्रयोग झाले. 

स्वतःला भगवान आणि संत म्हणवून घेणारे ओशो ‘व्यक्तिगत सेक्रेटरी’ शिलाबद्दल ‘ती खुनी आहे’ असा आरोप करतात, तिला २० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होते आणि ३९ महिन्यांच्या शिक्षेनंतर चांगल्या वर्तणुकीमुळे तिची सुटका होते, हे सगळेच प्रकरण थरारक म्हणावे असे आहे. शिला या ‘व्यक्तिगत सेक्रेटरी’सोबतचे संबंध बिघडल्यानंतर ओशो यांचे संतुलन बोलताना बिघडल्याचे आपण बघतो. हे प्रकरण नेमके काय आहे, ओशो यांची क्रेझ कशी निर्माण झाली, आश्रमात नेमके काय चालायचे, याचा लेखाजोखा सप्रमाण दाखवणाऱ्या या दोन माहितीपटांचा हा मागोवा.   

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

या दोन्ही माहितीपटांमधून ओशो आश्रमातला स्वैराचार उघडकीला आल्यानंतर आता तिथली काही शिष्यमंडळी म्हणत आहेत की, पुण्यातल्या रजनीश आश्रमात सर्व काही करण्यास ‘तेव्हा’ मुभा होती. नग्नावस्थेतील शिष्य उन्मादाच्या अवस्थेत काहीही उद्योग करत आहेत, बेभान झाले आहेत, हे सर्व शूट झाले आणि भक्त सोडून इतरांना जाग आली! (अर्थात भारतात आपण याची अनुभूती घेत आहोत, की कोणाचेही भक्त सारासार विचार करण्याचे सोडून देतात!). पुण्यात कोरेगाव पार्कमधल्या रजनीश आश्रमात नग्न भक्तांचा स्वैराचार कसा होता, याचे शुटिंग वूल्फगँग डोब्रोल यांनी कौशल्याने करून या माहितीपटाद्वारे उपलब्ध झाले आहे.

या वेबसिरीजच्या प्रत्येक भागामध्ये ओशो यांचा भोंदूपणा आणि लुटारू वृत्ती यांची अनेक उदाहरणे समोर येतात. सर्वसाधारणपणे डोके ताळ्यावर असलेल्या आणि भक्त नसलेल्या व्यक्तींना ओशो यांनी कसे मूर्ख बनवले, याचे प्रत्यंतर या वेबसिरीजमध्ये पुराव्यासह दिसते.

अँटेलोप, ओरेगॉनचे महापौर, गावातले स्थानिक, ओशो यांची परमभक्त आणि सेक्रेटरी शिला यांच्या मुलाखतींमधून, तेव्हाच्या टीव्हीवरील बातम्यांमधून, तेथील वस्तुस्थितीचे चित्रीकरण करून ही माहितीपट – वेबसिरीज तयार केली आहे. ओशो यांच्या ‘व्यक्तिगत’ सेक्रेटरी शिला यांनी टेलिव्हिजन मुलाखतीमध्ये अभिमानाने सांगितल्याचे आपण बघतो की, “आम्ही जगातील एकमेव वसाहत आहोत, जिथे आम्ही सेक्सचा अत्यंत खुलेपणाने आनंद घेत आहोत”. शिष्यांची संख्या वाढवण्यासाठी ओशो आणि त्यांची व्यक्तिगत सचिव कोणत्या स्तराला गेले, याची आपल्याला कल्पना येते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एका मुलाखतीमध्ये शिला म्हणते- ‘बाबा रजनीशकडे १३ नव्हे, २० रोल्स राईस गाड्या आहेत.’ एक काळ असा होता, ज्या वेळी जागतिक स्तरावर शिला एकापेक्षा एक बोल्ड वाक्ये बोलत होती, जेणेकरून अधिक प्रसिद्धी मिळेल आणि ओशो यांचे अनुयायी वाढतील. अगदी अलीकडच्या शिलाची मुलाखत या माहितीपटासाठी घेताना ती अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवल्यामुळे फार समाधानी असल्याचे बघायला मिळते. ओशो यांच्या नावाने चालवलेल्या संस्थांनी किती कोटींची माया जमवली याचा हिशेबही आपण बघतो. ओरेगॉनमध्ये जागा मिळवणाऱ्या शिलाच्या लक्षात आले की, आपले गुरू आणि रजनीश यांचे शिष्यगण ड्रग्जमध्ये अडकले आहेत, तेव्हा तिला ओशो आश्रम सोडावा लागला. तिच्या जागी वेगळ्या शिष्येची तत्परतेने नेमणूक करण्यात आली, परंतु ओशो यांच्याबाबतीत अनेक सत्ये उजेडात आली.

ओशो यांची एक शिष्या म्हणते की, एकाग्रता साधण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, परंतु हे अर्धसत्य आहे. उपक्रमशीलतेमधून तुम्ही सेक्सची वेगळी मजा घेऊ शकता, हे ओशो यांचे तत्त्व creativityला काळिमा फासणारे आहेच, शिवाय एकाग्रतेचा सोयीस्कर अर्थ काढणारे आहे. अनेकांना मानसिक आधार हवा असतो आणि अशा भक्तांना वेड लावण्याचे तंत्र ओशो यांच्यासारख्यांना चांगलेच अवगत असते. एखादा लोकप्रिय गायक ज्याप्रमाणे दोन्ही हात आकाशाकडे दाखवतो आणि श्रोत्यांना वाटते की, वरचा स्वर लागला… असाच भूलभुलैया असले बुवा तयार करतात. 

‘ही महनीय व्यक्ती फक्त भगवान नव्हे, त्यांच्या बोलण्यामधून मा सरस्वतीचे दर्शन होते’ वगैरे भाषा आपण ऐकतो. अशा कथा पसरवणे हा भक्तांचा उद्योग असतो, याचे प्रत्यंतर येते. अर्थात ओशो आश्रमात स्त्रियांचे होणारे लैंगिक शोषण, लहान मुलांवर झालेले अत्याचार यावर ही वेबसिरीज काही भाष्य करत नाही. जेन स्टॉर्क यांनी रजनीशपूरम या आश्रमातील त्यांचे अनुभवकथन त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केले आहे. त्यांच्या मुलांचेसुद्धा लैंगिक शोषण झाले होते. त्याचाही उल्लेख या वेबसिरीजमध्ये नाही. 

क्षेत्र धार्मिक असो, आध्यात्मिक असो, राजकीय असो, सांगीतिक असो वा शैक्षणिक, कोणताही गुरू असा असावा की, त्याने शिष्याला प्रश्न विचारण्यास उद्युक्त करावे. प्रत्यक्षात या सर्व क्षेत्रांत आपण गुरू असे बघतो, ज्यांना प्रश्न आवडत नाहीत, हुशार शिष्य आवडत नाहीत. ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ हे तत्त्व पाळणाऱ्या शिष्यांची चलती असते आणि त्यांचीच गर्दी असते. खाजगी सेक्रेटरी शिला एका ठिकाणी मुलाखतीमध्ये म्हणतात- ‘मानवतेच्या दृष्टीकोनातून काही जणांचा मृत्यू झाल्यास त्यात विशेष वाईट वाटून घेण्यासारखे काहीही नाही.’ 

या वेबसिरीजमध्ये आपण एकेक मुलाखती बघतो, सत्य परिस्थिती बघतो आणि अचंबित होतो, की मेंदूचा उपयोग न करणाऱ्यांची किती स्पर्धा आहे! ओशो आश्रमात आलेल्यांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी झगडताना आपण शिला यांना बघतोच, परंतु त्या पुढे जाऊन शिष्यांना आवाहन करतात की, ‘आपला एक माणूस मारला, तर त्यांची १५ माणसे मारा’. कालांतराने रजनीश आणि शिला यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि अमेरिकेतल्या आश्रमात एफबीआयचा प्रवेश झाला.  पुढे जर्मनीमध्ये शिलाला अटक झाली. 

“I am not claiming that I am son of God.  I am simply saying that I was asleep & I am awake. You are asleep and you can be awake also”, अशा वाक्यांतून भक्त आपल्याला ‘भगवान’ असे संबोधतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे ओशो दिसतात. कोणी कोणाच्या भजनी लागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरीही भक्तगण आपल्या गुरूचे अनुयायी वाढतील यासाठी प्रयत्न करतात, व्यक्तिगत श्रद्धेचे सामूहिक वेडामध्ये रूपांतर होते. जागा बळकावल्या जातात, निसर्गाचा ऱ्हास करून नदीपात्रात सत्संग आयोजित केले जातात, लोकांकडून हजारो रुपयाची वर्गणी गोळा करून साधू म्हणवणारे पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात... 

चॅपमान वे आणि मॅक्लेन वे या दिग्दर्शकांनी पुराव्यानिशी काही प्रसंग दाखवले आहेत, स्थानिक रहिवाश्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत, शिला यांची मुलाखत आहे, काही भक्तगणांच्या मुलाखतींमधून एकेक ‘उद्योग’ पाहायला मिळतात. शिला यांनी ओशो आश्रम सोडल्यानंतर रजनीश यांनी तोंड उघडले आणि शिलावर तिघांच्या खुनाचा आरोप केला. ‘पोलिसांनी जर काही कारवाई केली नाही तर माझी माणसे योग्य कारवाई करतील’ असा दम देताना ओशो पाहायला मिळतात. “मी कधीच तिच्यावर प्रेम केले नाही, तिचे माझ्यावर प्रेम असेल पण मी सेक्रेटरीवर प्रेम करणार नाही असे ठरवले होते. तिच्या प्रेमाचा आता अतिरेक होत आहे, ती आता चेटकीण बनली आहे. मी वेश्येवर प्रेम करत नाही’ वगैरे उद्गार स्वत:ला ‘भगवान’ म्हणवणारे ओशो उच्चारतात.   

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्यानंतर ओशो यांनी हास्या नावाच्या सेक्रेटरीची नेमणूक केली. संतापी भाषणानंतर भक्ताचा टाळ्यांचा कडकडाट, रजनीशबाबाचे नृत्य बघावयास मिळते. त्यानंतर रजनीश बाबाचा बराच वेळ, शिला कशी चोर होती, यासंबंधी मुलाखती देण्यात गेला. शिलाचा द्वेष करण्याच्या ओघात ओशो यांनी कशा पद्धतीने पातळी सोडली, हे शेवटच्या दोन भागांत दिसते. तिघांच्या खुनाच्या आरोपावरून शिलाची २० वर्षांसाठी तुरुंगात रवानगी झाली. ‘सर्चिंग फॉर शिला’ या माहितीपटामध्ये मुलाखत देताना शिला म्हणते- “त्यांचेही माझ्यावर प्रेम होते, जे आमच्या दोघांच्या छायाचित्रांमध्ये ते माझ्याकडे जसे बघत आहेत, त्यामधून कोणालाही सहज समजेल.” 

अनेक जण सारासार विचार न करता आणि आचरण व कृती याची सांगड न घालता भक्तगण एका बुवाच्या भजनी लागतात, अनेक गैरप्रकार आणि अत्याचार करतात, याचे वैषम्य वाटते. एका स्त्रीला शिक्षा होते, परंतु पुरुष नामानिराळा राहतो.

सहा भागांची ‘वाइल्ड वाइल्ड कंट्री’ वेबसिरीज नंतर नंतर कंटाळवाणी होत जाते. तिची लांबी कमी करता आली असती. मात्र तरीही ही वेबसिरीज बघायला हवीच. अनेक लोक एखाद्या व्यक्तीच्या मागे डोके गहाण ठेवून कसे लागतात, भक्त हे नामोनिधान लाभल्यावर डोके बधीर कसे होते, ‘मास हिस्टेरिया’ म्हणजे काय, हे वास्तव या वेबसिरीज आणि माहितीपटातून संयमितरीत्या समोर येते. 

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......