२०२० हे वर्ष हिंदी चित्रपटातील विषयांचे वैविध्य आणि दिग्दर्शनामधील धाडसी प्रयोगांनी गाजवले!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • २०२० या वर्षातले काही महत्त्वाचे दिग्दर्शक आणि त्यांचे चित्रपट
  • Sat , 26 December 2020
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा Hindi Cinema छपाक थप्पड गुलाबो सिताबो तानाजी शुभमंगल जादा सावधान रात अकेली है लुडो भोसले शकुंतलादेवी गुंजन सक्सेना सिरियस मेन Serious Men

‘छपाक’ आणि ‘तानाजी’ यांनी एकमेकांशी ‘पंगा’ घेऊन २०२० या वर्षाची सुरुवात झाली. फेब्रुवारी महिन्यात अनुभव सिन्हा यांनी प्रेक्षकांना आरसा दाखवून सणसणीत ‘थप्पड’ लगावली असतानाच अचानक लॉकडाऊनमुळे १७ मार्चपासून थिएटर सात महिन्यांसाठी बंद झाली. त्यामुळे सिनेमागृहात प्रदर्शित झालेले चित्रपट या वर्षी कमीच आहेत. लॉकडाऊन काळात घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट बघणाऱ्यांची संख्या वाढली, कारण घरात अडकलेल्यांना चित्रपट हे करमणुकीचे साधन असलेला उत्तम उपाय सापडला. १५ ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरू झाली तरीही चित्रपटगृहांची स्वच्छता आणि दोन प्रेक्षकांमध्ये योग्य ते अंतर राखून आसनव्यवस्था तयार करणे, यामध्ये नोव्हेंबर उजाडला. प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देणार नाही, याचा अंदाज आल्यामुळे अद्याप नवीन हिंदी चित्रपट नियमितपणे रिलीज होण्यास सुरुवात झालेली नाही. तरीही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट रिलीज झाले. अशा कठीण परिस्थितीही काही उल्लेखनीय चित्रपट बघता आले, चित्रपट कथा-दिग्दर्शन-कॅमेरा यामध्ये काही नवनवीन प्रयोग झाले आणि अभिनयाचे उत्तम आविष्कारही बघावयास मिळाले. अनुभव सिन्हा, हनी त्रेहान, अनुराग बसू, देवशिष माखीजा, अनुराग कश्यप, राजेश कृष्णन, शुजीत सरकार अशा दिग्दर्शकांनी गाजवलेल्या सरत्या वर्षाचा हा धावता आढावा. 

‘थप्पड’ हा चित्रपट या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात अग्रस्थानी आहे. ‘मुल्क’, ‘आर्टिकल 15’ यांसारख्या चित्रपटांमधून दिग्दर्शक अनुभव सिन्हा प्रत्येक वेळी समाजात रोज आसपास घडणारे प्रसंग दाखवून आपल्याला विचार करायला लावले. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला एक थप्पड तर मारली आहे, त्यात एवढे ताणून धरण्यासारखे काय आहे, असा प्रश्न अनेक स्त्री–पुरुष पात्रे नायिकेला विचारतात आणि आपल्याला भोवतालाची जाणीव होते. सिनेमॅटोग्राफर सौमिक मुखर्जी, इवान मुलीगन यांचे दिग्दर्शकाबरोबर ट्युनिंग इतके जमले आहे की, तिघेही अनेक प्रसंगामधून एकच भाषा बोलतात. ऑफिसला जाणारे दोघे शेजारी आपण एकाच फ्रेममध्ये बघतो. पुरुषाला डबा, ऑफिस बॅग, पाण्याची बाटली आणि पाकीट वगैरे हातात देणारी स्त्री आपण बघतो आणि त्याच्याच शेजारच्या घरात राहणारी स्त्री यासाठी कोणावरही अवलंबून नाही, हे आपण बघतो. अशा अनेक प्रसंगांमधून हा चित्रपट समजून बघणे प्रेक्षकांवर सोडले आहे.

लेखक अनुभव सिन्हा आणि मृण्मयी लागू या दोघांनीही या चित्रपटात ‘घरगुती हिंसाचार’ हा विषय अत्यंत संयतपणे मांडला आहे. मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीतसुद्धा सिनेमाप्रमाणे संयत आहे. एडिटर यशा रमचंदानी यांनी प्रसंगांची मालिका उत्तमरीत्या गुंफली आहे. तापसी पन्नूचा अभिनय अप्रतिम. सुरुवातीला ‘रोजची’ कामे ती ज्या उत्साहाने करते, तीच कामे त्या प्रसंगानंतर कशा पद्धतीने करते, ते बघण्यासारखे. रत्ना पाठक-शाहचे काळजी करणे आपल्या अंगावर येते हे विशेष. तन्वी आझमी, कुमुद मिश्रा यांचा अभिनयात छा गये!

दुसरा उल्लेखनीय चित्रपट ‘रात अकेली है’. या चित्रपटाचे खरे नायक तीन, स्मिता सिंग यांची कथा-पटकथा-संवाद, पंकज कुमार यांची सिनेमॅटोग्राफी आणि हनी त्रेहान यांचे दिग्दर्शन. पंकज कुमार यांनी ‘तुंबाड’सारख्या चित्रपटात कॅमेरा ही काय चीज आहे, याचे प्रत्यंतर दाखवले होते. ‘रात अकेली है’मध्ये अंधारामधून दिसणाऱ्या कंदिलाच्या प्रकाशातील व्यक्ती आणि छाया-प्रकाशाचा लपंडाव प्रेक्षणीय आहे. अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक नात्याने काम केल्यानंतर हनी त्रेहान या चित्रपटात ‘who done it’ याचे सामाजिक संदर्भ सहजतेने दाखवले आहेत, ते खासच आहे.

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

नायक आणि अभिनयाची कमाल करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दृष्टिकोनातून जसजसे एकेक पात्र समजत जाते, तसतशी आपली समज वाढत जाते. खुनाचा तपास हाच फक्त या चित्रपटाचा विषय न राहता आपल्याला सामाजिक प्रश्नही समजतात. ‘रात अकेली है’ हा चित्रपट ‘Knives out’ या २०१९मध्ये रिलीज झालेल्या इंग्रजी चित्रपटावर बेतला आहे. रियान जॉन्सन लिखित दिग्दर्शित चित्रपट एका रईस वृद्धाच्या खुनाच्या तपासावरच आहे. जेम्स बॉण्ड डॅनियल क्रेग अभिनित चित्रपटात एकाच घरातील अनेकांवर संशयाची सुई असताना खुनी कसा शोधला जातो, हे दाखवले आहे. हा चित्रपट प्रेक्षणीय आहे, पण याला भारतीय सामाजिक-मानसिक संदर्भ देत ‘रात अकेली है’ लिहिला आहे, हे विशेष. सिनेमाची आवड असणाऱ्यांनी दोन्ही चित्रपट बघावे आणि दोन्हीचा आनंद घ्यावा, असे होते.

या वर्षीच्या प्रयोगशील चित्रपटामध्ये ‘लुडो’, ‘भोसले’ अशा चित्रपटांचा अंतर्भाव करावा लागेल. अनुराग बसू यांनी चार खेळाडूंचा ‘लुडो’ खेळ आपल्याला गुंगवून टाकत शिताफीने दाखवला.  चार नायक–नायिका यांच्या चार वेगवेगळ्या कथा एकमेकात कशा गुंतत जातात आणि एकमेकांवर कुरघोड्या कशा कराव्या लागतात, हे दिग्दर्शक या नात्याने दाखवण्याची अवघड कामगिरी अनुराग बसू यांनी केली. स्वभावाचे प्रतिबिंब असणाऱ्या रंगांचा वापर खुबीने केला आहे.  उदा.  लाल रंग (बटुकेश्वर तिवारीचा - अभिषेक बच्चन), पिवळा रंग (आकाश चौहानचा -आदित्य रॉय कपूर), हिरवा रंग (आलोकचा - राजकुमार राव), निळा रंग (राहुल - रोहित सराफ). खेळाच्या पटावर ज्याप्रमाणे त्याच ‘घरा’मधून इतराना मागे टाकता टाकता पुढे जातो, तद्वत चित्रपटात काही प्रसंग पुन्हा दिसतात, पण त्याचा संदर्भ वेगळा असतो, जो आपल्याला फोकस – आउट ऑफ फोकसमधून समजतो. अजय शर्मा यांनी एडिटिंगमधून चतुराईने चार गोष्टींचा मेळ असा घातला आहे की, त्यातले बारकावे सजगपणे बघताना समजले तर आपल्याला कोडे सुटल्याचे समाधान मिळते. अभिषेक आणि छोट्या इनायत वर्मा या दोघांमधील नातेसंबंध कमीत कमी संवादांमधून कोणत्याही ड्रामाशिवाय अभिषेकच्या उत्कट अभिनयामुळे प्रभावी झाले आहेत. पकंज त्रिपाठीचा डॉन अनोखा आहे. राजकुमार रावने ‘मिथुन’ स्टायलिश भूमिका त्याच लकबीने इतक्या शिताफीने केली आहे की, ‘न्यूटन’सारखे चित्रपट करणारा हाच आहे, यावर विश्वास बसत नाही. सान्या मल्होत्रा, फातिमा शेख, शालिनी वत्स, पर्ली मानी यांनी साकारलेली पात्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि कलाकारांच्या गर्दीतही लक्षात राहतात. ‘लाईफ इन मेट्रो’चे दिग्दर्शक अनुराग बसू यांनी लेखन आणि दिग्दर्शन याचा तोल सांभाळत एक वेगळा डाव मांडला आहे. थोडा लांबलेला हा चित्रपट वेगळा प्रयोग म्हणून स्तुत्य. 

‘भोसले’ चित्रपट हा एक वेगळा अनुभव देणारा होता. हवालदार भोसलेच्या कंटाळवाण्या आयुष्याची अनुभूती प्रेक्षकांना आस्तेकदम देत देत एकेक घटना चित्रपटाचा नूर पालटते. हा चित्रपट म्हणजे शास्त्रीय संगीतामधला बडा ख्याल आहे. तो बघण्यासाठी तसा पेशन्स हवा. तो दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांचा आहे. जीग्मेत वांगचुक यांचा कॅमेरा या चित्रपटाचा नायक आहे. मोजक्या संवादामधून कॅमेऱ्याच्या भाषेतून दिग्दर्शक प्रेक्षकांना एक गोष्ट सांगितली आहे. भोसलेच्या आयुष्याचा गणेशमूर्ती निर्माण करण्यापासून विसर्जन करण्यापर्यंत लावलेला संबंध (analogy), कॅमेरा अँगल, अर्थपूर्ण क्लोजअप खासच. श्वेता वेंकट यांचे एडिटिंग उत्तम. मंगेश धाकडे यांनी पार्श्वसंगीतामध्ये पुन्हा एकदा बाजी मारली. देवशिष माखीजा, शनाया राजगोपाल, मिराट त्रिवेदी यांनी पटकथा उत्तम लिहिली आहे, पण शेवट गुंडाळला आहे. देवशिष माखीजा यांनी अनोख्या पद्धतीने चित्रपट दिग्दर्शित केला आहे. असे प्रयोग करण्यासाठी त्यांनी जे धाडस दाखवले, त्याला सलाम. मनोज वाजपेयी या अष्टपैलू अभिनेत्याने ज्या बारकाव्यासह भोसले उभा केला आहे, ते अभ्यासण्यासारखे आहे. या चित्रपटात मनातला कोलाहल संवादाशिवाय दाखवणे मनोज वाजपेयी यांनी कौशल्यपूर्वक परंतु अभिनयाचा बडेजाव न मिरवता केली आहे. मराठी माणूस विलासची भूमिका संतोष जुवेकर यांनी उत्तमरीत्या वठवली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अ‍ॅसिड अ‍ॅटॅकमुळे मानसिकदृष्ट्या खचलेली नायिका कायद्याचा लढा कसा देते, यावर प्रामुख्याने भाष्य करणारा ‘छपाक’ हा चित्रपट मल्याळम सिनेमा ‘उयरे’चा रिमेक होता. मूळ चित्रपटाचा उद्देश नायिका सकारात्मक दृष्टीकोनातून उभे राहून आपले उद्दिष्ट कसे साध्य करते हाच आहे आणि त्यामध्ये दिग्दर्शक (मनु अशोकन) तुलनात्मकरित्या यशस्वी झाला होता. मल्याळम चित्रपटात सुंदर दिसणारी नायिका घेण्याचा मोह टाळला आहे, याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. या चित्रपटातील हल्ल्यानंतर दाखवलेला चेहरा खरा वाटतो, चित्रपट यशस्वी होण्यासाठी तयार केलेला वाटत नाही.

या चित्रपटाच्या तुलनेत ‘छपाक’ फिका पडला. यामध्ये दिपिकाचे द्वंद्व दाखवायचे की, तिची कोर्ट केस यामध्ये मेघना यांचा गोंधळ उडालेला दिसला. फ्लॅशबॅक हे वडिलांनी उत्तमरीत्या वापरलेले तंत्र मेघना यांनी प्रयोजन नसताना इथे वापरले. अतिका चौहान आणि मेघना गुलजार यांची पटकथेमध्ये कठीण प्रसंगांमधून सावरल्यानंतरची नायिकेची प्रेमकहाणी अनाठायी वाटते. दिपिका पदुकोणला आवाजामध्ये वैविध्य आणण्यास वाव होता. चित्रपटातल्या प्रत्येक फ्रेममध्ये दिपिका दाखवण्याचा मोह मेघना गुलजार यांनी तरी टाळायला हवा होता. इतिहासाचा विपर्यास करून काढलेले ‘तानाजी’सारखे गल्लाभरू चित्रपट बघण्यापेक्षा वर्तमानकाळातल्या प्रश्नांवर भाष्य करणारे आशयघन चित्रपट केव्हाही उजवे, एवढीच जमेची बाजू.

मनु जोसेफ यांच्या ‘पेन’ ओपन बुक अवार्ड २०११ आणि ‘द हिंदू लिटररी प्राईझ’ विजेत्या कादंबरीवर आधारित ‘सिरीयस मेन’ या चित्रपटात मुलांसाठी पालकांची चालणारी गळेकापू स्पर्धा कुठे जाणार, हा विषय हाताळला गेला. तरीही आपण चित्रपटातल्या बाप-लेकाच्या कथेमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतत नाही. दिग्दर्शक निरज पांडे आणि सिनेमॅटोग्राफर अलेक्झांडर सुरकाला यांचा हा चित्रपट तुकड्यातुकड्यांत चांगला वाटतो, पण त्याचा एकसंध परिणाम होऊ शकला नाही. तरीही हा चित्रपट बघावा नवाजुद्दिन सिद्दिकीच्या अभिनयासाठी, ज्याने पुन्हा एकदा नैसर्गिक अभिनयाने आपल्या मनाचा ठाव घेतला. बापाची तगमग, त्याचे स्वगत, त्याची विचार करण्याची पद्धत आणि बायको-मुलगा-बॉस-शाळा-ऑफिस या सर्व पातळीवर होणारी तारेची कसरत नवाजुद्दिनने अप्रतिमरीत्या दाखवली. पालकांनी मुलांवर लादलेले अपेक्षांचे ओझे हा चित्रपटाचा विषय असेल तर पहिल्या तीन मिनिटांत मुलाच्या आई-वडिलांची सेक्स पोझिशन आणि त्यामागचा नायकाचा ‘विचार’ दाखवून दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे होते, असा प्रश्न पडला.

‘चोक्ड’मध्ये वस्तुस्थितीची जाणीव करून देणारी कथा, उत्तम दिग्दर्शक, कलाकारांचा उत्तम अभिनय असे असूनही पटकथेची मांडणी फसल्याचे जाणवले. नोटबंदीच्या काळात एखाद्या बँक कर्मचाऱ्याला वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे असे वाटले, अशा एका सर्वसामान्य बँक कॅशीअरची ही कथा. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गॅंग्ज ऑफ वासेपुर’, ‘अग्ली’ यांसारखे उत्तम चित्रपट दिग्दर्शन करणाऱ्या अनुराग कश्यपने इतर चित्रपटाप्रमाणे इथेही पात्रांच्या स्वभावतले बारकावे विलक्षणरीत्या दाखवले आहेत. संयमी खेरने साकारलेली नायिकेची भूमिका उत्तम आहेच, पण खरी बाजी मारली आहे ती अमृता सुभाषने. तिची संवादफेक, प्रत्येक प्रसंगाप्रमाणे बदलणारे चेहऱ्यावरचे भाव, देहबोली सगळेच अप्रतिम. निहित भावे यांनी पटकथा लिहिताना पात्रपरिचय, विकास कोलप यांचे कला दिग्दर्शन कॉलनीमधल्या नैसर्गिक वातावरणात आणि प्रकाश योजनेत झाले आहे. सुरुवातीला अनेक तपशिलात गुंतवून ठेवणारा हा चित्रपट क्लायमॅक्स लवकर उरकल्यानंतर फसला आणि अचानक ‘संपला?’ असा धक्का बसला!

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

पैशाच्या दुनियेकडे विनोदी पद्धतीने बघता बघता सत्य अनोख्या पद्धतीने सांगणारा ‘लुटकेस’ हा हलका फुलका पण परीणामकारक चित्रपट कुणाल खेमू, गजराज राव, रसिका दुग्गल यांच्या अभिनयाने नटलेला होता. राजेश कृष्णन यांनी चित्रपट वेगवान होईल, याकडे विशेष लक्ष दिले आहे, जे अशा कॉमेडीसाठी गरजेचे होते. कुणाल खेमुने यापूर्वीही विनोदाचे अप्रतिम टायमिंग दाखवले आहे. या चित्रपटामधे तो पेसे भरलेल्या बॅगकडे बघतो, ते दृश्य पुन्हा बघावे असे आहे. रसिका दुग्गलने वेबसिरीजमधून छाप पाडली आहेच, तसेच याही चित्रपटात तिचा नैसर्गिक अभिनय दाद देण्यासारखा आहे. 

झगमगीत दुनियेतील मानसिक अस्वास्थ्य दाखवणारा ‘कामयाब’ या चित्रपटाने आपल्यातला माणूस जागा ठेवण्याची आठवण करून दिली. ग्लॅमर नाहीसे झाल्यानंतर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे काय होत असेल, असाच प्रश्न चित्रपट बघताना आपल्याला पडतो. संजय मिश्रा हा कमाल अभिनेता आहे याचा पुनःप्रत्यय प्रत्येक चित्रपटात येत राहिला. राधिका आनंद, हार्दिक मेहता यांनी लिहिलेली पटकथा आपल्याला पहिल्या पाच मिनिटांत त्या वातावरणात घेऊन गेली. हार्दिक मेहता यांनी चित्रपट अतिशय तरलतेने दिग्दर्शित केला, पण शेवट अधिक परिणामकारक होऊ शकला असता. शब्दांच्या पलीकडची भाषा सांगणे, हेच तर चित्रपटाचे खरे काम आहे आणि या चित्रपटाने ते उत्तमरीत्या केले.

‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट म्हणजे मिर्झा (अमिताभ) या ८० वर्षाच्या घरमालक आणि बांके (आयुष्यमान खुराणा) या भाडेकरू यांच्या एकमेकांवरील कुरघोड्याचा खेळ होता. जुही चतुर्वेदी यांनी पटकथेमध्ये मिर्झा आणि बांके यांची व्यक्तिमत्त्वे फार तपशिलात लिहिली आहेत, पण आयुष्यमान खुराणा व्यतिरिक्त इतर भाडेकरूंना या चित्रपटात अगदीच चिल्लर समजले आहे, ते मालक-भाडेकरूंच्या भांडणात खटकते. एका हवेलीमध्ये बराचसा चित्रपट घडतो, तरीही ते ‘नाटक’ वाटत नाही, हे शूजित सरकार या दिगदर्शकाचे कौशल्य. चंद्रशेखर प्रजापती यांनी एडिटिंग करताना अशा कुरघोडीच्या खेळाला साजेसा वेग दिला असता तर अजून बहार आली असती. चित्रपटात सर्वात लक्षवेधी भूमिका प्रदीप जाधव यांनी आर्ट डायरेक्शनमध्ये केली. घराच्या चौकटीच्या फ्रेममधून घेतलेले काही अँगल अप्रतिम आणि प्रसंगास अनुसरून आहेत.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

अमिताभ बच्चन यांनी कायिक आणि अभिनयासह साकारलेला मिर्झा अप्रतिम होता. पूर्ण चित्रपटभर अमिताभ जसा पाठीत वाकून चालतो, वाकून मान तिरकी करून बघतो, कधीही न हसता खतरूड स्वभावाने विचार करतो, धक्का बसल्यासारखा पडतो. आयुष्यमान खुराणा हा उत्तम अभिनेता ज्या टेचात अमिताभसमोर उभा राहिला त्याला तोड नाही. आयुष्यमानचे बोलीभाषेचे उच्चारण, संवादफेक सुंदर. ‘...वरना ठोक देंगे तुम्हे’ असे तो अमिताभला ज्या पद्धतीने म्हणतो, ते लाजवाब होते! विजयराज कोणत्याही भूमिकेत भाव खाऊन जातो, तसेच इथेही.

‘शकुंतलादेवी’, ‘गुंजन सक्सेना’, ‘तानाजी’ यांसारख्या चित्रपटांनी बायोपिकचा धसका घ्यावा अशी परिस्थिती निर्माण केली आहे. भ्रमनिरास करणाऱ्या चित्रपटामध्ये ‘शकुंतलादेवी’ चित्रपटाचा क्रमांक वरचा आहे. जिनियस लोक जिनियस का असतात, ही आपल्याला एक उत्सुकता असते. आपल्याकडे बायोपिक बनवताना त्यांचे खाजगी आयुष्य दाखवतात, त्यांच्या बेडरूममध्ये शिरतात, त्यांची प्रेमप्रकरणे दाखवतात... दाखवत नाहीत ते फक्त ते ज्या विषयात ते तज्ज्ञ होते तो विषय. कारण त्याविषयाचा अभ्यास करण्याची आपल्याला सवय नाही. विद्या बालनने साकारलेली शकुंतलादेवी फारच नाटकी वाटते, ती खोटी हसते, भावभावना विरहित बोलते. शकुंतलादेवी अवघड गणिते पटापट कसे सोडवायच्या, त्यांनी कोडी तयार करून त्याची उत्तरे सोडवण्याच्या ट्रिक सांगून गणितामध्ये मुलांचा इंटरेस्ट वाढावा, यासाठी काय केले याबद्दल अनु मेनन दिग्दर्शित चित्रपटात काहीही नाही. शकुंतलादेवी यांच्या आयुष्यात किती पुरुष आले, त्यांचे लग्न कसे अयशस्वी झाले, त्यांना मुलीला वाढवायला कसे जमले नाही वगैरे. चित्रपटात गणित फार दिसत नाहीच, याउलट तुम्ही हे शिकता की जिनियस असण्याचे दुष्परिणाम काय आहेत.

‘गुंजन सक्सेना’ हा बायोपिक श्रीदेवी-बोनी कपूर कन्या जान्हवीला पुढे आणण्यासाठी तयार केलेला असल्यामुळे त्याच्या मूळ कथेमध्ये बरेच बदल करून हवाई दलातील बाकीचे जवान खुजे दाखवले, मूळ घटनेमधील दुसरी पायलट विद्या राजन चित्रपटात दिसली नाही. उच्च निर्मितीमूल्ये, मार्क वूल्फ (Skyfall, Mission Impossible फेम) यांनी चित्रित केलेले अफलातून हेलिकॉप्टर स्टंट, पंकज त्रिपाठीचा नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय, मनिष नंदन यांची उत्तम फोटोग्राफी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. चित्रपटातील प्रमुख भूमिका जान्हवी कपूर भावविरहीत चेहऱ्याने केली आहे, ही चित्रपटातील सर्वांत मोठी उणीव आहे. जान्हवीला पूर्ण चित्रपटात कुठेही जखम होत नाही, तिचा मेकअप कुठेही पुसला जात नाही. शरण शर्मा यांनी चित्रपट दिग्दर्शन करताना प्रत्येक फ्रेममध्ये जान्हवी कपूर दिसेल याची दक्षता घेतली आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

तिसरा बायोपिक ‘तानाजी’. हा चित्रपट उत्पन्न मिळवण्याच्या मापदंडावर तो यशस्वी गणला जाऊ शकतो. परंतु इतिहासाच्या अभ्यासाचा अभाव, गंभीर प्रसंगानंतर मधूनच नृत्य करणारे सेनापती-मावळे आणि स्त्रिया, तकलादू व्हीएफएक्स अशा अनेक उणीवा असूनही प्रेक्षकांनी निव्वळ भावनेच्या आहारी जाऊन सिनेमाला गर्दी केल्याचे जाणवले. खलनायक मगरीचे मांस खाताना दाखवणे, उदयभान हा राठोड आहे हे लपवून ठेवणे, मराठा विरुद्ध राजपूत असे युद्ध न दाखवता मुस्लीम सैन्य दाखवणे, भगव्या झेंड्यावरील ओम, नायकाचे खिंडीमधून पक्ष्याप्रमाणे विहार करणे, नायकाचे सैनिक तलवारबाजी करतात त्यावेळी शत्रूचे सैन्य तलवारीचे घाव झेलण्यासाठी उभे असल्याचे दाखवणे असे प्रकार इतिहासाशी प्रतारणा आहेतच, शिवाय अभ्यास नसल्याचे निदर्शकही आहे. उत्तम बायोपिक तयार करायला आपण कधी शिकणार?      

‘शुभमंगल जादा सावधान’ हा चित्रपट ‘शुभमंगल सावधान’चा सिक्वेल असला तरीही त्यातला वेगळा प्रश्न हाताळताना पहिल्या चित्रपटाची सफाई आणि उत्स्फूर्तता ‘सावधान’मध्ये हरवली.  कंगना राणावत अभिनित ‘पंगा’मध्ये तिच्याच आधीच्या अभिनयाची सरमिसळ होती. यशस्वी झालेला फॉर्म्युला घेऊन कलाकाराची निवड करून त्याभोवती गुंफले गेलेले चित्रपट फसतात याची ही उदाहरणे आहेत. ‘छलांग’ हा चित्रपट खेळाच्या प्रशिक्षित शालेय शिक्षकापेक्षा ओळखीने नेमणूक केलेल्या शालेय शिक्षक सहाय्यकाच्या विजयाची कथा होता, ज्यामध्ये आळशी असलेला नायक काही विशेष कुवत नसताना जिंकल्याचे दाखवले आहे. राजकुमार राव या गुणी कलाकाराने आता चित्रपट निवडीबद्दल चोखंदळ रहायला हवे. 

‘चिंटू का बर्थडे’ हा अक्षरशः एकाच घरात घडणारा चित्रपट विनय पाठकच्या अभिनयासाठीच उल्लेखनीय ठरला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट इरफान खानच्या अभिनयासाठी आवर्जून बघण्यासारखा होता. तमिळ चित्रपट कांचनाचा हिंदी रिमेक ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव ‘नको देवराया अंत आता पाहू’ असे असते तर अधिक उचित झाले असते. अक्षयकुमारकडून दोन व्यक्तिमत्त्वांचा अभिनय आणि त्यामधील वैविध्य बघण्याची अपेक्षा धरणे हेच मुळात गैर आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘घूमकेतू’ हा चित्रपट फसलेल्या पटकथेचे उत्तम उदाहरण होते. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट सुशांत सिंग रजपूतचा शेवटचा चित्रपट आहे, इतकेच त्याचे महत्त्व, अन्यथा या चित्रपटात उल्लेखनीय काहीही नाही. ‘क्लास ऑफ 83’ हा हुसेन झैदी यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट बॉबी देओलमुळे असहनीय होतो. ‘सडक २’, ‘भूत’ (द हाँटेड शिप), ‘घोस्ट स्टोरीज’, ‘सुरज पे मंगल भारी’, ‘लव्ह आज कल’, ‘जवाने जानेमन’, ‘स्ट्रीट डान्सर’, ‘तोरबाज’, ‘दुर्गामती’ असे काही चित्रपट आले आणि गेले. 

उत्तम कलेक्शन मिळवणाऱ्या चित्रपटात ‘तानाजी’, ‘बागी ३’, ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’, ‘शुभमंगल जादा सावधान’, ‘मलंग’ यांच्यानंतर ‘छपाक’चा नंबर लागतो. त्यानंतर ‘लव्ह आज कल’, ‘जवानी जानेमन’ यानंतर नवव्या क्रमांकावर ‘थप्पड’ या नितांत सुंदर चित्रपटाचा क्रमांक गल्ला जमवण्यात लागतो. यावरून आपण चित्रपट कलेच्या जाणीवामध्ये किती मागे आहोत, हे सिद्ध होते. प्रेक्षकांच्या लायकीप्रमाणे चित्रपट तयार होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांची समज वाढल्यानंतर दर्जेदार चित्रपट तयार होऊ शकतात. लोकप्रिय आणि रसिकप्रिय यांमधील सीमारेषा धूसर करणे हे प्रेक्षकांच्या हातात आहे, पण त्यासाठी कलेबद्दलच्या जाणीवा समृद्ध होण्याची गरज अधोरेखित होते. अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे जगभरात काय दर्जाचे चित्रपट होतात, त्यामध्ये आपण कुठे आहोत, हे लक्षात येत असल्यामुळे सुरुवातीच्या ‘आकर्षणा’नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्जेदार चित्रपट/वेबसिरिज बघणाऱ्यांची, तसेच काय बघायचे, याचा विचार करून निवड करणाऱ्या रसिकांची संख्या वाढत आहे, हे सकारात्मक लक्षण आहे. 

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......