जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही बॉलिवुडचे चित्रपट का आपटताहेत?
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
तस्मयी रॉय
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 18 November 2022
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा Hindi Cinema बॉलिवुड Bollywood तस्मयी रॉय Tasmayee Roy ब्रह्मास्त्र Brahmastra

गेल्या दोन वर्षांत बॉलिवुड अर्थात हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक मोठ्या स्टार्सचे सिनेमे पहिल्या आठवड्यातच एका पाठोपाठ आपटले आहेत. कोविडपूर्व काळात शेकडो कोटींचा धंदा करणाऱ्या या सिनेसृष्टीची व्यवसायाच्या बाबतीत चलती होती. मोठ्या स्टार्सचे सिनेमे शेकडो कोटींचा धंदा करत होते. ‘हंड्रेड क्रोर क्लब’, ‘फाइव हंड्रेड क्रोर क्लब’ (शंभर कोटी ते पाचशे कोटींची कमाई करणाऱ्या सिनेमाचे स्टार्स) निर्माण झाले होते. अक्षय कुमार, आमीर खान, शाहरुख खान या क्लबचे प्रणेते.

आता मात्र चित्र पालटलं आहे. मोठ्या स्टार्सचे सिनेमे दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ चालत नाहियेत. मोठं प्रमोशन, भरपूर जाहिराती, ब्रेकिंग न्यूज आणि स्टारच्या खाजगी जीवनासंबंधीची गॉसिप्स पेरूनही ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा अपेक्षित धंदा करू शकला नाही. ‘एम. के. रिसर्च’ या वित्तीय विश्लेषण करणाऱ्या जागतिक संस्थेच्या ठोकताळ्यानुसार २०२३मध्येही हिंदी सिनेसृष्टी अपेक्षेपेक्षा खूपच कमी धंदा करण्याची शक्यता आहे.   

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या उलट भारतात हॉलिवुडच्या सिनेमांनी मात्र चांगला धंदा केला. दक्षिणेतील ‘KGF’ आणि ‘RRR’ या चित्रपटांनीसुद्धा तिकीटबारीवर १००० कोटी कमावले. मग हिंदी सिनेसृष्टीचं काय चुकतंय? तर या सिनेमांचा तोच तो फॉर्म्युला आता चालेनासा झालाय, प्रेक्षकांना चांगला आशय असलेले सिनेमे हवेत.

Data on box office collections by Emkay Research

या वर्षी जवळपास हिंदी सिने-उद्योगाने जाहिरातींवर ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. सिनेव्यवसायाचे विश्लेषक अतुल मोहन म्हणतात- ‘‘केवळ मार्केटिंगमुळे सिनेमे कधीच चालू शकत नाहीत. किंबहुना, मार्केटिंगचा अवाढव्य खर्च हा संसाधनांचा अपव्यय आहे. ‘लायगर’ या हिंदी आणि तेलुगू सिनेमाचं अगदी अलीकडचं उदाहरण आहे. आशय आणि कथानक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आशयाची कमतरता स्टार कास्ट किंवा चांगलं मार्केटिंग भरून काढू शकत नाही.”

करोना काळात सिनेमा हॉल बंद होते, त्यामुळे प्रेक्षक ‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमझॉन प्राइम’ या ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे वळले. तिथे त्यांना अत्यंत चांगला आशय पाहायला मिळाला. दक्षिणेतील सिनेमेही चांगला आशय घेऊन येतात. मात्र पहिल्या आठवड्यात चांगला चाललेला हिंदी सिनेमा दुसऱ्या आठवड्यात धंदा करेल, याची खात्री नसते. कारण पहिल्या दिवशी सिनेमा पाहिलेले प्रेक्षक सोशल मीडियावर लिहितात-बोलतात. त्यांचे ते अभिप्राय ‘व्हायरल’ होतात. ते चांगले नसतील तर पहिल्या आठवड्यात ‘हाऊस फूल’ असणाऱ्या सिनेमाची दुसऱ्या आठवड्यापासून घसरण व्हायला सुरुवात होते. म्हणून खूपश्या सिनेमांचा निर्मिती खर्चही भरून निघत नाही. गर्दी खेचणाऱ्या मेगा स्टार्सचा करिश्मा आता चालेनासा झाला आहे. कारण परत तेच – रद्दड कथानक आणि हाताळणी आता प्रेक्षकांना नकोशी झाली आहे.

मोठे स्टार असलेल्या सिनेमाची पहिल्या आठवड्यात बॉक्स-ऑफिस कमाई सरासरी एक ते दीड अब्ज रुपयांपर्यंत असायची. कोविडनंतर ती ४० कोटी इतकी खाली आली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाने १६० कोटींचा धंदा केला, तरीही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार तो कमी आहे, कारण या सिनेमाच्या जाहिरातींवर त्यापेक्षाही जास्त पैसा खर्च झालेला होता. दुसऱ्या आठवड्यातच या सिनेमाची घसरण सुरू झाली. ४५० कोटी बजेट असलेल्या या सिनेमाने जेमतेम २०० कोटी कमवले.

अशाने खर्च कसा भरून निघणार? फायदा तर दूरची गोष्ट.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काही सिनेमांची कथा-पटकथा कोविडपूर्व काळात लिहिलेली आहे. कोविडनंतर प्रेक्षकांची रुची बदलली. त्यामुळे त्या सगळ्या सिनेमांकडेही प्रेक्षक पाठ फिरवणार का, ही शंका निर्माते-दिग्दर्सक यांना भेडसावते आहे. प्रेक्षकांना चांगला आशय मिळत असल्यामुळे हिंदी सिनेसृष्टीला आपल्यात काही वैचारिक आणि सर्जनशील बदल करावे लागणार आहेत. तिकिटाचे दर नेहमीच वाढत असतात. मल्टीप्लेक्समध्ये एका तिकिटाचा दर ३००च्या पुढेच असतो. मात्र त्या तुलनेत नेटफ्लिक्सची पाच जणांसाठीची मासिक वर्गणी ५०० रुपये इतकी कमी असते. अशा परिस्थितीत हिंदी सिनेमे प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात कसा यशस्वी होईल, हे मोठं आव्हान या सिनेसृष्टीपुढे आहे.

अतिसामान्य सिनेमांसाठी महागडी तिकीटं का विकत घ्यायची? कोविडच्या साथीदरम्यान प्रेक्षकांना चांगला आशय पाहायला मिळाला. एकीकडे दक्षिणेतील सिनेमांनी बाजी मारली, तर दुसरीकडे हिंदी सिनेमांचा दर्जा घसरत चालला आहे, अशी आजची स्थिती आहे.

‘दक्षिणात्य सिनेव्यवसायाकडून बॉलिवुडने धडे घेण्याची वेळ आली आहे’ असं ‘चेल इंडिया’चे चीफ ग्रोथ ऑफिसर कुमार अवनिष यांचे म्हणणे आहे.

दक्षिणात्य चित्रपट-व्यवसायाकडे संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना काय हवं आहे, हे जाणून घेण्याची कला अवगत आहे. त्यांचे सिनेमे स्थानिक संदर्भ असूनही भारतभरच्या प्रेक्षकांना आवडतात. हिंदी सिनेमांत मात्र अवस्तावता ठासून भरलेली असते. उच्चभ्रू कुटुंबाची पार्श्वभूमी, हास्यास्पद कथानक, आशयापेक्षा भरजरी पोशाख, पार्ट्या, झगमगीत सेट, परदेशातील प्रेक्षणीय स्थळं यांना दिलेलं अवास्तव महत्त्व, हे प्रकार आता लोकांना आवडेनासे झाले आहे. अस्सल आशयाची ओळख झाल्यामुळे प्रेक्षकांनी हिंदी सिनेमाकडे पाठ फिरवली आहे.

कोविड महामारीनंतर दक्षिणेकडील अनेक सिनेमे अनेक भाषांमध्ये डब केले गेले आणि ते मोठ्या पडद्यावर आले. संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय ते झाले. ‘अगदी गाजावाजा झालेला सिनेमासुद्धा कधीतरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईलच, थोडे दिवस थांबूया’ असा विचार आता प्रेक्षक करू लागले आहेत. ओटीटीमुळे जागतिक पातळीवरील उच्च दर्जाचा आशय उपलब्ध झाला. त्यामुळे काय पहायचं याबद्दल प्रेक्षक काटेकोर झाले आहेत.

Highlight on reviews, views and Net Box Office Collections (NBOC) by Emkay Research

हिंदी सिनेमाला अजूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल, तर त्याला सर्जनशील बनावं लागेल. नेटफ्लिक्सकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट खूप बोलक्या असतात. शिवाय त्यांच्या कथा आणि कथनं अत्यंत आकर्षक असतात. प्रेक्षकांची नाडी त्यांनी ओळखली आहे. नेटफ्लिक्स त्यांना स्पर्श करणारी भाषा वापरते. त्यांनी बनवलेले सिनेमाचे ट्रेलर आणि प्रमोशन प्रेक्षकांना आकृष्ट करणारे असतात.

प्रेक्षकांना थिएटरकडे उद्युक्त करण्यासाठी आणि त्यांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यासाठी हिंदी सिनेमा व्यवसायाला वाजवी तिकीट दर ठेवावे लागतील आणि प्रभावशाली, आशययुक्त जाहिरात मोहिमा राबवाव्या लागतील. पण हे सगळं जुळून येण्याच्या आधी काही काळ प्रेक्षकांचा दुष्काळ या सिनेसृष्टीला सहन करावा लागणार आहे. शिवाय मार्केटिंग युक्त्यांच्या पलीकडे जाऊन सर्जनशील ‘आशय’ तयार करण्याची गरज आहे. कथानकात जीव आणावा लागेल.

पण तरीही हा शेवट नाही. सारंच काही संपलेलं नाही. म्हणतात ना ‘पिक्चर अभी बाकी हैं दोस्त’!

................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख https://www.moneycontrol.com या पोर्टलवर २८ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://www.moneycontrol.com/storyboard18/how-it-works/why-is-bollywood-failing-to-take-off-despite-the-marketing-blitz-2269.htm

................................................................................................................................................................

अनुवाद : अलका गाडगीळ (लेखिका युनिसेफसाठी काम करतात.)

alkagadgil@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......