सईद अख्तर मिर्झा : ‘भारदस्त’ नावे असलेल्या चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शन करणारा ‘जबरदस्त’ लेखक- दिग्दर्शक!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अक्षय शेलार
  • सईद अख्तर मिर्झा
  • Sat , 16 January 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र सईद अख्तर मिर्झा Saeed Akhtar Mirza इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल International Cultural Artifact Film Festival आयसीएएफएफ ICAFF आयसीए फिल्म फेस्टिव्हल ICA Film Festival

या वर्षी ICA फिल्म फेस्टिव्हल १८ ते ३१ जानेवारी दरम्यान आहे. रविवार १७ जानेवारी रोजी उद्घाटन आणि सोमवार ३१ जानेवारी रोजी पुरस्कार समारंभाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवात ९० शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेंटरीज, १० इराणी फिल्मस, ६ स्पेशल स्क्रिनिंगज, १६ सिने टॉक, ६ सिने संवाद आणि Quiz Contest यांचा समावेश आहे... तर ‘जीवन गौरव पुरस्कार’ लेखक-दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांना देण्यात येणार आहे.

..................................................................................................................................................................

कोविड महामारीमुळे बऱ्याचशा चित्रपट महोत्सवांनी ऑनलाईन चित्रपट महोत्सवाचा पर्याय अवलंबला. पुण्यातील जुनून फिल्म्सतर्फे ‘इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल’ (आयसीएएफएफ) या चित्रपट महोत्सवाचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. या वर्षी हा चित्रपट महोत्सव १७ ते ३१ जानेवारी दरम्यान ऑनलाईन होणार आहे. यात ४५ देशांतून आलेल्या ९० लघुपट आणि माहितीपटांचे प्रदर्शन होणार आहे. दुर्मीळ चित्रपटांचे प्रदर्शन, सिनेमाशी निगडीत मुलाखती, ‘फोकस ऑन कंट्री’ या विभागांतर्गत निवडक इराणी चित्रपटांचे प्रदर्शन, असे या महोत्सवाचे स्वरूप आहे. 

या महोत्सवामध्ये दिला जाणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार या वर्षीदेखील प्रदान करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी हा पुरस्कार असगर वजाहत यांच्या हस्ते सागर सरहदी यांना प्रदान करण्यात आला होता. या वर्षी हा पुरस्कार सईद अख्तर मिर्झा यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने मिर्झा यांचा जीवनप्रवास व कलात्मक योगदान यांचा आढावा घेणारा हा लेख. 

सईद अख्तर मिर्झा हे नाव चित्रपट क्षेत्राशी दुरान्वये संबंध असलेल्या किंवा व्यावसायिक चित्रपटांच्या पलीकडे जाऊन चित्रपटांत रस असणाऱ्या प्रेक्षकास नवे नाही. मिर्झा ओळखले जातात, ते भारतातील समांतर चित्रपट चळवळीतील त्यांच्या योगदानाकरता. ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ (१९७८), ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ (१९८०), ‘मोहन जोशी हाजीर हो!’ (१९८४), ‘सलीम लंगडे पे मत रो’ (१९८९) यांसारख्या भारदस्त नावं असलेल्या चित्रपटांचं लेखन-दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

१९९५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नसीम’करता त्यांना लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्हींसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. शिवाय मिर्झा यांचं काम केवळ समांतर चित्रपट चळवळीपुरतं मर्यादित नाही. त्यांनी दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ आणि ‘इंतजार’ या दोन मालिकांच्या निर्मितीमध्येही आपलं योगदान दिलं आहे. त्यामुळे जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा होत असलेला गौरव यथायोग्यच आहे, यात कुठलीही शंका नाही. 

जाहिरातक्षेत्रात काम करण्यापासून सुरुवात करत मिर्झा यांनी सत्तरच्या दशकात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये (एफटीआयआय) प्रवेश घेतला. १९७६ मध्ये तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही माहितीपटांची निर्मिती केली. त्यानंतर ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’च्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. १९७८मध्ये प्रदर्शित झालेला ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ ते १९९५मधील ‘नसीम’ या चित्रपटांमधील आशयाकडे पाहिल्यास एक क्रमिक बदल दिसून येतो. ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ची मध्यवर्ती संकल्पना काय, तर एक आदर्शवादी तरुण सरंजामशाही आणि एकूणच भ्रष्ट सभोवतालामुळे त्रस्त आहे. तो सभोवतालचा भौतिकवाद, त्याच्या प्रेयसीची स्वप्नं, त्याला नक्की काय हवंय, याचा काहीच पत्ता नसणं, अशा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत वावरत आहे. भौतिकवादी, भांडवलशाही विचारसरणी असलेलं मध्यवर्ती पात्र आणि त्याचा मार्क्सवादी मित्र यांच्यातील वैचारिक भेदही इथं दिसतो. 

यानंतरच्या ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’मध्ये निम्नवर्गातील अल्बर्ट हा तरुण मध्यवर्ती भूमिकेत येतो. अरविंद देसाईच्या विरुद्ध असलेल्या अल्बर्टला काय हवंय ते माहीत आहे, तो त्या बाबतीत गोंधळलेला नाही. त्याला यश आणि पैसा हवा आहे. मात्र त्याचा गोंधळ आपल्या परिस्थितीबाबत कुणाला दोष देऊ पाहतोय, यात आहे. त्याच्या दृष्टीने त्याचा परिचय असलेले श्रीमंत लोक हे सभोवतालातील वर्गव्यवस्था आणि गरीब-श्रीमंत या भेदाला कारणीभूत नाहीत, तर निम्नवर्गातील उठसूट आंदोलन करणारा कामगार वर्ग खरा दोषी आहे.

चित्रपट जसजसा पुढे सरकतो तशा त्याच्या दृष्टिकोनात बदल घडून येईल, अशा घडामोडी घडतात. त्या अर्थी सईद मिर्झाच्या नायकांचा प्रवास हा गोंधळलेल्या आणि असहाय अवस्थेतील तरुणांपासून ते सभोवतालात काय चूक, काय बरोबर आहे, हे उमगणाऱ्या तरुणांच्या दिशेने होताना दिसतो. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘मोहन जोशी हाजीर हो!’मध्ये (१९८४) न्यायव्यवस्था आणि मुंबईतील झपाट्याने बदलत असलेली समाजव्यवस्था यांच्यावरील उपहासात्मक कथन येतं. ‘सलीम लंगडे पे मत रो’मध्ये (१९८९) आतापर्यंतच्या चित्रपटांमध्ये अस्तित्वात असलेला, नव्हे धुमसत असलेला क्रोध आणि अस्वस्थतेचं शिखर गाठलं जातं. ऐंशीच्या दशकातील मुंबईतील वाढता जातीयवादी संघर्ष आणि धार्मिक तेढ यांतून ‘सलीम लंगडे पे मत रो’मधील मध्यवर्ती मुस्लीम पात्रामध्ये उपजणारा क्रोध निर्माण होतो. धार्मिक, सांस्कृतिक आणि वांशिक ओळख या बाबी आणि राष्ट्रीयत्व, तसेच राष्ट्रवाद हे मुद्दे सर्वस्वी भिन्न आहेत की, परस्परसंबंध असलेले, हेदेखील या कलाकृतीमध्ये येतं. 

त्यानंतर येते ती मिर्झा यांची १९९५ मध्ये प्रदर्शित झालेली ‘नसीम’ ही शेवटची कलाकृती (जिचं त्यांनी लेखन-दिग्दर्शन असं दोन्ही केलं, या अर्थाने). ‘नसीम’ घडतो तो बाबरी मस्जिद पाडल्यानंतरच्या घटनेनंतर. नसीम ही पंधरा वर्षांची मुलगी आणि तिचे आजोबा सभोवतालात घडत असणाऱ्या घडामोडींचे साक्षीदार असतात.

मिर्झा यांनी दृक्-श्राव्य माध्यमात केलेलं काम पाहता जातीयवादी आणि धार्मिक तेढ, पात्रांची वांशिक आणि सांस्कृतिक ओळख आणि त्यांच्या आसपास घडणाऱ्या घडामोडी, राजकीय-सामाजिक मंथन यांमधील भेद हा त्यांच्या चित्रपटातील काही समान संकल्पना असल्याचं दिसतं.

‘नसीम’नंतर बराच काळ काहीही निर्मिती न करण्याबाबत मिर्झा म्हणतात की, मला जितकं सांगायचं होतं, तितकं सांगून झालं. बाबरी मस्जिद प्रकरणानंतर ‘मुसलमान का एक ही स्थान, पाकिस्तान या कब्रिस्तान’ असा दृष्टिकोन तयार झालेल्या परिस्थितीविषयी काहीच बोलावंसं उरत नाही.’ त्यामुळेच त्यानंतर त्यांनी चित्रपट निर्मितीमधून दीर्घ रजा घेतली. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पुढे २००८ मध्ये मिर्झा यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक ‘अम्मी : लेटर टू अ डेमोक्रॅटिक मदर’मध्ये त्यांनी आपल्या आईविषयीच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. त्यानंतर आलेली ‘द मंक, द मूर अँड मोजेस बेन जलून’ आणि ‘मेमरी इन द एज ऑफ अॅम्नेजिया’ ही दोन पुस्तकंदेखील आठवणी आणि भूतकाळ या संकल्पनांवर भर देणारी आहेत. वैयक्तिक, राजकीय तसेच सामाजिक स्तरावर भूतकाळ विसरणारे लोक आणि राष्ट्रं अस्तित्वात असण्याच्या या काळात आठवणींना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं मत मिर्झा मांडतात.

जातीयवाद आणि धार्मिक झगडे, तसेच राष्ट्रवादाच्या फोल संकल्पनांचं अस्तित्त्व असण्याच्या काळात मिर्झा त्यांच्या डाव्या विचारसरणीबाबत आग्रही आहेत. नैतिक-अनैतिक, योग्य-अयोग्य यांचा सर्वांना विसर पडला की, काय अशा काळात मिर्झा यांच्यासारख्या चित्रपटकर्त्याचे विचार कधी नव्हे इतके समयोचित झाले आहेत. त्यामुळेच या महोत्सवामध्ये त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने होत असलेला सन्मान समयोचित आहे. 

..................................................................................................................................................................

‘इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये निवड झालेले सर्व लघुपट, माहितीपट आणि चित्रपट तसेच इतर सर्व कार्यक्रम मोफत स्वरूपात या महोत्सवाच्या वेबसाईट आणि यू-ट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहेत. त्यांच्या लिंक्स -

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 18 January 2021

लोकहो,

सईद अख्तर मिर्झा म्हणतात की :

बाबरी मस्जिद प्रकरणानंतर ‘मुसलमान का एक ही स्थान, पाकिस्तान या कब्रिस्तान’ असा दृष्टिकोन तयार झालेल्या परिस्थितीविषयी काहीच बोलावंसं उरत नाही.’ त्यामुळेच त्यानंतर त्यांनी चित्रपट निर्मितीमधून दीर्घ रजा घेतली.
काश्मिरी हिंदूंना नेसत्या कपड्यांनिशी रातोरात हाकलून दिलं, त्यांचे निर्घृणपणे खून केले, त्यांच्या मुलीबाळी नासवल्या, त्यांची स्थावरजंगम मालमत्ता लुटली आणि हिंदू आपल्याच देशांत निर्वासित झाले तेव्हा मिर्झाबुवांनी निषेधाचं अवाक्षरही उच्चारलं नाही. हीच आम्हां हिंदूंची खंत आहे. जमल्यास काश्मिरी हिंदूंची व्यथा मिर्झाबुवांनी आपल्या कलाकृतीतनं जगाला दाखवून द्यावी. तेव्हढीच त्यांच्या दु:खावर फुंकर.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......