अर्जुन दत्ता : मध्यमवर्गाचे लोभस चित्रण करणारा दिग्दर्शक
कला-संस्कृती - चलत्-चित्र
संतोष पाठारे 
  • अर्जुन दत्ता आणि त्यांच्या काही चित्रपटांची पोस्टर्स
  • Sat , 25 September 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र अर्जुन दत्ता Arjunn Dutta अब्यक्तो Abyakto गुलदस्ता Guldasta श्रीमती Srimoti थ्री कोर्स मिल Three Course Meal

भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणाऱ्या मासिक सदरातील हा नववा लेख...

..................................................................................................................................................................

व्यावसायिक आणि कलात्मक यांचा सुवर्णमध्य साधणारे चित्रपट आपल्याकडे समांतर चळवळीतील चित्रपटांच्या बरोबरीने निर्माण होऊ लागले. हृषीकेश मुखर्जी, बासू चटर्जी यांनी या मध्यममार्गी सिनेमाला वलय मिळवून दिलं. ‘मिली’, ‘रजनीगंधा’, ‘छोटीसी बात’ या चित्रपटांतून मध्यमवर्गीय माणसांचे जग, त्यांच्या भावविश्वातील ताणेबाणे याचं मनोज्ञ चित्रण करण्यात आलं. अमोल पालेकर, विद्या सिन्हा, झरिना वहाब हे अगदी आपल्यातील वाटणारे नायक-नायिका या चित्रपटांच्या केंद्रस्थानी होते. या चित्रपटातील व्यक्तिरेखा परंपरावादी जीवनधारणा असलेल्या आणि आधुनिक जगातील जीवनशैली आपलसं करू पाहणाऱ्या  होत्या. रोजचं चाकोरीतील आयुष्य जगताना निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांना सामोर जाणाऱ्या पात्रांच्या साध्या सहज कथा हे या चित्रपटांचे वैशिष्ट्य होते. मध्यममार्गी चित्रपटांचा हा लोभस प्रवाह ऐंशी-नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर आलेल्या अवास्तव मनोरंजनवादी चित्रपटांच्या लाटेमुळे लुप्त झाला. या प्रवाहाला पुन्हा एकदा नवीन शतकात संजीविनी मिळाली.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला उभी राहिलेली मल्टीप्लेक्स, जागतिकीकरणामुळे प्रयोगशील चित्रपट निर्मितीला मिळालेले प्रोत्साहन या सगळ्याचा परिणाम भारतातील सर्व प्रदेशातील होतकरू, सर्जनशील दिग्दर्शकांच्या कलानिर्मितीवर झाला. अनेक कलावंतांना आपली विशिष्ट्य शैली गवसली. सरधोपट निर्मितीचा मार्ग सोडून अनेकांनी वेगळ्या वाटा धुंडाळल्या. यातील एक नाव म्हणजे बंगाली दिग्दर्शक अर्जुन दत्ता!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हृषीकेश मुखर्जी, बासू चटर्जी यांनी निर्माण केलेल्या मध्यममार्गी चित्रपटांचा वारसदार म्हणून अर्जुन दत्ताचे नाव घ्यावे लागेल. गेल्या चार–पाच वर्षांत त्याने ‘अब्यक्तो’, ‘गुलदस्ता’, ‘श्रीमती’ आणि ‘थ्री कोर्स मिल’ हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यापैकी ‘अब्यक्तो’ आणि ‘गुलदस्ता’ या चित्रपटांना  अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या क्षेत्रात कोणतीही ओळख नसताना आणि कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता अर्जुन दत्ता या क्षेत्रात आला आहे. चित्रपट पाहण्याची आवड त्याने लहानपणापासून जोपासली होती. शाळेमध्ये नाटक दिग्दर्शित करण्याचा अनुभव त्याने घेतला. समाजशास्त्राची पदवी घेतल्यानंतर त्याने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात यायचा निर्णय पक्का केला. स्वतःची क्षमता आजमावण्यासाठी त्याने ‘सिक्स्थ सेन्स’ हा लघुपट दिग्दर्शित केला. या लघुपटाला नेटपॅकचं नामांकन मिळालं, कान महोत्सवातील लघुपट विभागात त्याची निवड झाली. या यशाचा फायदा त्याला पूर्ण लांबीचा चित्रपट करण्यासाठी झाला. अॅडव्हर्ब या कंपनीने त्याला ही संधी दिली. अर्जुन दत्ताने त्यांना ‘अब्यक्तो’ची कथाकल्पना ऐकवली. कथेतील नाविन्य निर्मात्यांना आवडलं आणि त्यामुळे अर्जुन दत्ताचं दिग्दर्शक होण्याच स्वप्न सत्यात उतरलं. आपल्या आसपास वावरणाऱ्या लोकांच्या कथा सिनेमातून मांडायच्या, हे त्याने सुरुवातीलाच नक्की केलेलं होतं. आईचा लाडका असलेल्या अर्जुनने आईच्या मैत्रिणींचं जगणं खूप जवळून पाहिलं होत. अशाच एका स्त्रीची गोष्ट त्याने ‘अब्यक्तो’मध्ये मांडली.  

नात्यामधील दुराव्याचे मुख्य कारण असते, दोन व्यक्तींमधील थांबलेला संवाद. मग हे नातं पती-पत्नीचं असो की आई-मुलाचं! आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वर्तनाचा अनेकदा आपण गैरअर्थ लावतो आणि त्या नात्याची फरफट सुरू होते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

असाच विसंवाद ‘अब्यक्तो’मधील साथी (अर्पिता चटर्जी) आणि इंद्र (अनुभव कांजीलाल) या माय-लेकामध्ये निर्माण झालेला असतो. दिल्लीतील एका कंपनीत इंजिनीअरची नोकरी करणारा इंद्र वडिलांच्या मृत्यूनंतर कोलकात्याला येतो. लहानपणापासून आईने त्याला काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेले असते. आईच्या हटवादी स्वभावाला कंटाळलेल्या इंद्रला त्याचे वडील आणि त्यांचे मित्र रुद्र (आदिल हुसेन) यांच्या अधिक जवळचे वाटतात. वडिलांच्या मृत्यूनंतर घरी आलेला इंद्र आईबरोबर तुटक वागतो. साथी इंद्रच्या या वागण्याने हवालदिल होते. रुद्रकाकाकडून इंद्रला जेव्हा त्याच्या आईच्या वागण्यामागील सत्य समजते, तेव्हा त्याच्या मनातील मळभ दूर होते.

इंद्र आणि साथी यांच्या संबंधांमधील ताण अर्जुन दत्ता पहिल्याच दृश्यातून अधोरेखित केला आहे. आपला नवरा आणि रुद्र यांच्यातील संबंधांचा परिणाम इंद्रवर होऊ नये म्हणून साथी प्रयत्न करत राहते. अबोध इंद्र आपल्या आईचे वागणे समजू शकत नाही. त्याच्या मनातील आईविषयीची अढी वाढत जाते. सत्य समजल्यानंतर मात्र त्याच्या मनातील आईबद्दलचा आदर वाढतो. चित्रपटाच्या या वळणावर अर्जुनच्या पटकथेत आलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले वडील आणि रुद्रकाका यांच्यातील संबंधाबद्दल समजूनसुद्धा इंद्रच्या मनातील त्यांच्याबद्दलचे प्रेम कमी होत नाही. नातेसंबंधांचा मोकळ्या मनाने स्वीकार करणारा इंद्र हा आजच्या पिढीचा प्रतिनिधी आहे. रुद्र, कौशिक आणि इंद्र या पुरुष व्यक्तिरेखांचे आलेख पुरेसे स्पष्ट दाखवणारा अर्जुन दत्ता साथीच्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवतो. नवऱ्याचे त्याच्या मित्राबरोबर असलेले समलैंगिक संबंध समजल्यावर कोलमडून गेलेली साथी इंद्रच्या लैंगिक धारणाबद्दल अधिक सजग होते. मानसिक घुसमट सहन करत आपल्या मुलाचा विचार करणारी ही सर्वसामान्य स्त्री मुलाकडून जिव्हाळ्याची अपेक्षा करते. आपल्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारलं तर आयुष्य सुंदर होऊ शकते, या समेवर ‘अब्यक्तो’ येतो.

अर्जुन दत्ताने स्त्रीमनाचे कंगोरे किती सूक्ष्मपणे अभ्यासले आहेत, याचा प्रत्यय केवळ ‘अब्यक्तो’च नव्हे तर त्याचे ‘गुलदस्ता’ आणि ‘श्रीमती’ हे चित्रपट पाहतानासुद्धा येतो. कुटंबवत्सल असणाऱ्या आणि फारशा महत्त्वाकांक्षी नसणाऱ्या मध्यमवर्गातील स्त्रियांचे चित्रण सातत्याने करणरा अर्जुन दत्ता म्हणतो की, ‘मला माणसांच्या गोष्टी सांगण्यात रस आहे. माझ्या चित्रपटात केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तिरेखा स्त्रियांच्या असल्या तरीही त्यातील पुरुष व्यक्तिरेखासुद्धा तेव्हढ्याच तोलामोलाच्या आहेत. हे पुरुष खलनायक नाहीत. त्यांना आपापले विचार, विकार आहेत. ते स्त्रीचा सन्मान करतात.’

‘अब्यक्तो’मधील इंद्र, रुद्र, कौशिक या पात्रांकडे पाहताना अर्जुनच्या म्हणण्यातील तथ्य समजून घेता येते. माणसातील चांगुलपणावर असलेला विश्वाससुद्धा त्याच्या कथांमधून सातत्याने दिसतो. ‘अब्यक्तो’मध्ये त्याने हाताळलेला विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. दोन व्यक्तींमधील समलैंगिक संबंधाचा त्यांच्या कुटुंबावर होत असलेल्या गडद परिणामांचे दर्शन आपल्याला ‘अब्यक्तो’मध्ये घडते. दोन पुरुषांमधील मानसिक आणि शारीरिक गुंतवणूक हा नाजूक विषय आपल्या समाजात अप्रियच आहे. अशा विषयावर पटकथा रचताना त्यातील संवेदनशीलता अर्जुन दत्ताने जपली आहे. एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून हा विषय मांडल्यामुळे त्याला आपोआपच खोली प्राप्त झाली आहे. आशयामधील ही खोली अर्जुन दत्ताच्या ‘गुलदस्ता’ आणि ‘श्रीमती’मध्ये किंचित कमी झालेली दिसते. मात्र त्यातून त्याने मांडलेले  विचार, मध्यमवर्गीय प्रेक्षकांना भावणारे आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अर्जुन दत्ताच्या ‘गुलदस्ता’वर हृषीकेश मुखर्जींच्या ‘बावर्ची’, ‘खुबसूरत’ या चित्रपटांचा प्रभाव आहे. एखाद्या अनोळखी माणसाने भरलेल्या कुटुंबात दाखल होऊन त्या कुटुंबातील सदस्यांच्या समस्या हसत खेळत दूर करणे हे आशयसूत्र आपल्याला परिचित आहे. डॉली बागरी (स्वस्तिका मुखर्जी) ही ‘गुलदस्ता’मधील प्रमुख व्यक्तिरेखा. ‘बावर्ची’प्रमाणेच अर्जुन दत्ता डॉलीचं वैयक्तिक आयुष्य आणि त्यातील ताणतणाव यांना शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवतो. डॉली सौंदर्य प्रसाधने आणि औषधे घरोघरी जाऊन विकणारी सेल्सगर्ल आहे. श्रीरूपा (अर्पिता चटर्जी) आणि रेणू (देवजानी चटोपाध्याय) या दोन गृहिणींच्या घरी ती नियमितपणे  प्रसाधने घेऊन जात असते. अघळपघळ वागणारी पण मनाने निर्मळ असलेल्या डॉलीला श्रीरूपा आणि रेणू यांच्या कुटुंबात सुरू असलेल्या विसंवादाची चाहूल लागते. श्रीरूपाचा नवरा त्याच्या ऑफिसमधील एका मुलीमध्ये गुंतलेला असतो, तर रेणूचा तरुण मुलगा तुकाई (अनुभव कांजीलाल) ड्रग्जच्या आहारी गेलेला असतो. डॉली आपल्या या दोन मैत्रिणींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात झालेलं गुंता सोडवण्यास मदत करते. स्वतःच्या आयुष्यात असलेली दुःख, समस्या बाजूला ठेवून आपल्या सहृदयांसाठी झटणारी माणसे समाजात वावरत असतात. डॉलीसुद्धा अशाच निरालस  माणसांपैकी एक. अर्जुन दत्ता तिची गोष्ट सांगताना तितक्याच सच्चेपणाने सांगतो. कोलकात्यासारख्या शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गाच्या जीवनशैलीचे चित्रण तो आत्मीयतेने करतो. त्याची गोष्ट सांगण्याची पद्धत थेट आहे,  सहज आहे. त्याच्या या प्रक्रियेत अर्पिता चटर्जी, अनुभव कांजीलाल, स्वस्तिका मुखर्जी हे कलाकार, सुप्रतिम भोल हा प्रकाशचित्रणकार, रक्तिम गोस्वामी सारखा नृत्यरचनाकार आणि सौम्य रित हा संगीतकार, अशी सगळी सर्जनशील कलावंतांची टीम सोबतीस असते.

‘श्रीमती’ हा करोनाच्या संकटामुळे अजून चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होऊ न शकलेला चित्रपटसुद्धा  खास अर्जुन दत्ताच्या शैलीचा पुढचा अध्याय आहे. नवरा, सासू, मुलगा, नणंद याच्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या श्रीमती (स्वस्तिका मुखर्जी)ची अगदी कोणत्याही सर्वसामान्य घरात घडू शकेल, अशी ही गोष्ट आहे. स्त्रीने आपले करिअर घडवण्यासाठी घराबाहेर पडावे, आपले अस्तित्व सिद्ध करावे, अशा टप्प्यावर आपण आलेलो असताना काही स्त्रिया त्यांच्या घराला सांभाळणे, हेच आपले करिअर मानतात. आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करून दाखवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असू शकत नाही. आपण आपल्या क्षमता आणि मर्यादा ओळखून आपले जीवन संपन्न करू शकतो आणि आपल्या आसपासच्या लोकांनासुद्धा सुखी करू शकतो, याची जाणीव झालेली श्रीमती या चित्रपटात आपल्याला भेटते. कुटुंबात रमलेल्या, काहीशा गोंधळलेल्या श्रीमतीने स्वतःमध्ये बदल घडवून  आणण्याचा हा प्रवास सुखद आणि मनोरंजक आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अर्जुन दत्ताची जडणघडण ज्या शहरात झाली आहे, ज्या मध्यमवर्गात तो वावरला आहे, त्याच्या गोष्टी आपल्या सुरुवातीच्या चित्रपटातून मांडण्याचा त्याने यशस्वी प्रयत्न केला आहे. आता तो या चित्रपट व्यवसायात स्थिरावला आहे. आपल्या पहिल्या तीन बंगाली चित्रपटानंतर ‘थ्री कोर्स मिल’ या हिंदी चित्रपटातील एक कथा तो दिग्दर्शित करतो आहे. या कथेचे शीर्षक आहे ‘बिर्याणी’! ही ‘बिर्याणी’ झणझणीत असणार आहे, याचे संकेत त्याने दिले आहेत. मध्यममार्गी चित्रपटांची शैली यशस्वीपणे हाताळलेल्या अर्जुन दत्ताकडून वेगळ्या प्रयोगाची अपेक्षा आहेच. ‘बिर्याणी’ ही अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा करू या!

..................................................................................................................................................................

या सदरातील आधीचे लेख

वेत्रीमारन : सामान्यांच्या जगण्याचा हुंकार टिपणारा कल्पक दिग्दर्शक

कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत!

राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक

पी. शेषाद्री यांना सिनेमा म्हणजे ‘इंटरटेनमेन्ट, इंटरटेनमेन्ट आणि फक्त इंटरटेनमेन्ट’ हे मान्य नाही, ते म्हणतात- सिनेमा म्हणजे ‘एन्लायटनमेन्ट, एन्लायटनमेन्ट आणि फक्त एन्लायटनमेन्ट’!

नाग अश्विन : कला आणि व्यवसाय यांचा तोल सांभाळणारा दिग्दर्शक

ज्या कलावंतांनी स्वबळावर उत्तर-पूर्व प्रदेशातील सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून दिलंय, त्यात रीमा दासला अग्रक्रम द्यावा लागेल

डॉ. बिजू दामोदरन : समाजातील उपेक्षितांच जगणं तितक्याच भेदकपणे मांडणारा दिग्दर्शक

सुकुमार :  शंभर टक्के मनोरंजनाची हमी देणारा कल्पक आणि यशस्वी दिग्दर्शक

..................................................................................................................................................................

लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत. 

santosh_pathare1@yahoo.co.in

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......