‘गेम ऑफ थ्रोन्स’ हे शेक्सपिअर थाटाचे नाट्य आहे, ज्याला झोंबी छापाच्या चित्रपटाचा विळखा आहे!
कला-संस्कृती - टीव्ही मालिका
युव्हाल नोआ हरारी
  • ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे एक पोस्टर
  • Wed , 04 March 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti टीव्ही मालिका गेम ऑफ थ्रोन्स Game of Thrones

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही टीव्ही मालिका संपून आता जवळपास वर्ष होईल. या मालिकेचे १७ एप्रिल २०११ ते १९ मे २०१९ या कालावधीत आठ सीझन्समध्ये एकंदर ७३ भाग प्रकाशित झाले. ही अमेरिकन मालिका HBO या वाहिनीवरून प्रसारित झाली आणि जगभर पाहिली गेली. अतिशय लोकप्रिय ठरली. या मालिकेविषयी प्रसिद्ध इतिहासकार युव्हाल नोआ हरारी यांचा हा लेख. 

सत्ता म्हणजे काय? त्यासाठी माणसं काय शकतात? कोणत्या थराला जाऊ शकतात, हे समजावून घेण्यासाठी ही मालिका पाहिलीच पाहिजे. 

.............................................................................................................................................

‘गेम ऑफ थ्रोन्स’ हे शेक्सपिअर थाटाचे नाट्य आहे, ज्याला झोंबी छापाच्या चित्रपटाचा विळखा आहे. ‘सत्ता म्हणजे काय?’ या प्रश्नाभोवती ते फिरते. त्यातल्या काही अर्थगर्भ क्षणी अधिकाराच्या निसरडेपणाबद्दल शांतचित्ताने विचार करावा असे वाटते. इतर वेळी मात्र ते अत्याधुनिक स्पेशल इफेक्ट्सचा प्रेक्षकांवर भडिमार करते.

वेस्टरोजच्या इतिहासातच विविध पद्धतींमधील संघर्ष आहे. त्याकडे वास्तव आणि अद्भुतता यांतील भव्य लढाई म्हणून बघितले जाऊ शकते. कथानक एका दोषी पण वास्तवात असलेल्या लॅनिस्टर या कुटुंबाभोवती आहे. या कुटुंबाने सैतानी, जादुई आणि अतिंद्रिय शक्तीच्या वाढत्या झुंडींविरुद्ध जिवाच्या आकांताने फारशी आशा नसलेली लढाई केली आहे.

स्वतःला कसलीही झळ न लागता आगीतून चालू शकणाऱ्या, आपल्या शत्रूंना भीती दाखवण्यासाठी आणि जाळून मारण्यासाठी ड्रॅगनशी दोस्ती ठेवणाऱ्या डायनेरीस टारगेरियनशी  लॅनिस्टर पूर्वेकडे सामना करतात. उत्तरेला स्टार्क टोळी राजकारणात आणि अर्थकारणात दुबळी असते, पण ते कुटुंब आपल्या रूप बदलणाऱ्या खुनी मुलीचा, ‘तीन डोळ्यांचा डोमकावळा’ झालेल्या मुलाचा अभिमान बाळगत असते. या डोमकावळ्याला दिव्य दृष्टीची देणगी असते. ख्रिस्ताप्रमाणे जो मानवजात वाचवण्यासाठी मेला आणि रहस्यपूर्णरित्या जिवंत झाला, अशा प्रकारच्या सावत्र मुलाचाही त्या लोकांना अभिमान आहे. आणखी उत्तरेकडे सर्वांत भयंकर (आणि कंटाळवाणा) शत्रू आहे. मृतांची फौज (Army of dead), ज्यांनी वेस्टेरोजवर विजय मिळवण्यासाठी आणि सर्व जीवसृष्टी नष्ट करण्यासाठी सातत्याने दक्षिणेकडे कूच केले आहे. (सुदैवाने मृतांनी पुष्कळ वेळ घेतला. त्यामुळे आणखी रोमहर्षक घटना उलगडायला बराच वाव होता.)

काही काळ लॅनिस्टरना ताबडतोब धोका रूप बदलणाऱ्या स्टार्क्सकडूनही निर्माण झाला नाही आणि आग ओकणाऱ्या ड्रॅगनकडूनही. तो झाला स्टॅनिस बरॅथिऑनकडून. हा पोलादी सिंहासनासाठी (आयर्न थ्रोन) आणखी एक स्पर्धक होता. त्याने किंग्ज लँडिंगला वेढा घातला होता. वरवर पाहता स्टॅनिस हा अत्यंत क्रूर सेनापती वाटला तरी शक्तिमान लाल चेटकिणीचा नोकर होता. तिने काळी जादू करून तिचे शत्रू नष्ट केले होते. ती राक्षसांना जन्म देऊ शकत होती आणि मृतांमधूनही लोकांना जिवंत करू शकत होती. नंतर किंग्स लँडिंगवरचा लॅनिस्टरचा ताबा  जवळजवळ सुटलाच आणि तो गेला एका कट्टर धार्मिक पंथाकडे, ज्याचा प्रमुख होता सत्तापिपासू   आणि कसलेही विधिनिषेध नसलेला मठाधिपती.

या वेगळ्याच जगातील जंजाळात लॅनिस्टर कधीही निराश झाले नाहीत. तसेच त्यांचे वास्तव ते विसरले नाहीत. त्यांचे शत्रू चेटुक, जादू आणि अंधश्रद्धा यावर भरवसा ठेवत असताना आयर्न थ्रोन आणि सेवन किंगडमवर आपली पकड राखण्यासाठी लॅनिस्टर संपूर्णपणे विज्ञान, अर्थकारण आणि व्यवहारातील राजकारणावर विश्वास ठेवून होते.

सुरुवातीला लॅनिस्टर मंडळींनी त्यांच्या सोन्याच्या खाणीतून संपत्ती मिळवली. आपले कर्ज नेहमी फेडायचेच हे त्यांच्या कुटुंबाचे ब्रीद होते. किती वास्तववादी, विशेषतः स्टार्कच्या विनाशी ‘Winter is coming’ आणि ग्रेजॉयच्या रहस्यमय ‘What is dead may never die’शी तुलना करता. पहिल्या हंगामात लॅनिस्टर स्टार्कवर केवळ शहराच्या सुरक्षारक्षकांना लाच देण्याची युक्ती वापरून मात करतात आणि आयर्न थ्रोन मिळवतात. याची स्टार्क मंडळींनी कल्पनाही केलेली नसते. नंतरच्या हंगामात लॅनिस्टर यांनी अद्भुत स्टार्क विरोधात त्यांचे सर्व राजकीय आणि आर्थिक कौशल्य पणाला लावले. काही क्लृप्त्या, हत्या आणि चतुरपणे जोडलेल्या विवाहसंबंधाच्या सहाय्याने ते रॉब स्टार्कला हरवतात आणि विंटरफेल येथे स्टार्कचा तळ न्यायला लावतात.

किंग्ज लँडिंगवर जेव्हा स्टॅनिस बॅरॅथिओन हल्ला करतो, तेव्हा लॅनिस्टर त्यांना रसायनांच्या साहाय्याने परतवतो. ते बॅरॅथिओनचा ताफा जाळून टाकण्यासाठी गन पावडर तयार करतात. जेव्हा धार्मिक माथेफिरू राजधानीवर जवळजवळ ताबा मिळवतात, तेव्हा पुन्हा ही गन पावडर उपयोगी पडते आणि सर्सई लॅनिस्टर शहराच्या मुख्य प्रार्थनास्थळी त्यांना उडवून देऊन धार्मिक कट्टरांचा समूळ नाश करते.

अजेय भासणाऱ्या डायनेरीस टारगेरियनच्या ड्रॅगन्सशी जेव्हा सर्सईचा सामना होतो, तेव्हा ती लगेच रसायनाकडून भौतिकशास्त्राकडे वळते. हवेमध्येच ड्रॅगनना थांबवून त्यांची जाड कातडी व हाडे  भेदतील अशी मोठी दस्त्याची धनुष्ये तयार करण्यासाठी एक अभियांत्रिक कामाला लावते. नंतर मृतांमधून जिवंत झालेले स्टार्क मृतांच्या फौजेतील एका सैनिकाला कैद करतात आणि लॅनिस्टरना दहशत वाटावी म्हणून किंग्ज लँडिंगपर्यंत ड्रॅगनच्या पाठीवरून नेतात. तरीही सर्सई जेव्हा हे भीषण भूत बघते, तेव्हा त्याची पर्वा न करता अर्थकारणावरचा आपला विश्वास अबाधित राखते. स्टार्क आणि ड्रॅगन क्वीनला फसवण्यासाठी घाबरल्याचे ढोंग करते, पण वास्तवात नवीन भाडोत्री सैनिकांसाठी आणि ते वेस्टेरोजला पाठवण्यासाठी ती आयर्न बँकेकडून मोठे कर्ज उभारणीत व्यग्र असते.

शेवटच्या हंगामात झोंबी, ड्रॅगन, आपले रूप बदलणारे, तीन डोळ्यांचा डोमकावळा आणि स्नो- ख्राईस्ट हे सगळे शेवटच्या कळसाध्यायाच्या लढाईसाठी एकत्र होतात. सर्सई लॅनिस्टर तिच्या सर्व अभियंत्यांवर, बँकर्सवर आणि भाडोत्री सैनिकांवर पूर्ण विश्वास ठेवून असते.

शेवटचे एपिसोड बघण्याआधी मी आपला या आशेवर होतो की, ड्रॅगन आणि झोंबी कदाचित एकमेकांना मारून टाकतील आणि आयर्न थ्रोन सर्सई लॅनिस्टरसाठी राहील जिथे ती सेवन किंगडममध्ये नवीन सुवर्णयुग आणण्यासाठी तिचे राजकारण, अर्थकारण आणि विज्ञानावरील प्रभुत्व दाखवत राहील. हो, मला माहीत आहे की, सर्सई ही कमालीची दुष्ट आहे. पण इतिहासकार म्हणून मला या गोष्टींचा आदर वाटतो की, तिने कायमच वास्तवातील समस्यांना वास्तवातील उत्तरे शोधली तर बाकी सर्वांनी वास्तवातील समस्यांना अतिंद्रीय उत्तरे तरी शोधली किंवा वास्तवातील समस्यांकडे संपूर्णच दुर्लक्ष केले. (एक सहज उदा.- डायनेरीस टारगेरियन ड्रॅगनच्या सततच्या मदतीशिवाय एका शहरात शांतता ठेवू शकत नव्हती.) सर्सई इतकी दुष्ट का झाली, हे कधीच स्पष्ट केले गेले नाही. ती आत्मकेंद्री आणि तिरस्करणीय आहे आणि तिने अनेक उमरावांचा आणि राजकारण्यांचा विश्वासघात केला आहे, त्यांना ठार केले आहे, पण निष्पाप नागरिकांवर तिने काय अत्याचार केले?

अरेरे, लॅनिस्टरचे सुवर्णयुग कधीच अवतरले नाही. वेस्टेरोजमधून झोंबी आणि ड्रॅगन दोघेही लगेच गेले हे खरे आहे, पण निराशाजनक स्थितीत अकल्पनीय घडलेल्या घटनांमुळे अकार्यक्षम स्टार्क लोकांना विजयाची फळे चाखायला मिळाली, तर सर्सई आणि जेमी लॅनिस्टर राजवाड्याच्या भग्नावशेषात गाडले गेले. असं दिसतंय की, शोच्या शेवटी निर्मात्यांना कल्पनांचा तुटवडा आला असावा म्हणून त्यांनी सोपे उत्तर शोधले आणि वास्तवावर अद्भुताचा विजय होऊ दिला.

तरी शेवटी वास्तव जिंकलेच म्हणायचे. शोच्या शेवटच्या सिझनमध्ये आपल्याला कळतं की, अक्षरशः काहीच बदललं नाही. सात सिझन्सनंतर असंख्य लढाया, लाखो मृत्यू आणि अनेकानेक अतिंद्रिय हस्तक्षेप होऊन वेस्टेरोजची सामाजिक-राजकीय व्यवस्था अगदी तशीच राहिली. प्रशासकीय मंडळांमध्ये सरंजाम मंडळी बसून नेव्हीला आर्थिक पुरवठा कसा करायचा आणि कुंटनखाणे कसे बांधायचे याची चर्चा करत राहिली. तुम्हाला वाटलं असेल की, आग ओकणाऱ्या   ड्रॅगन्सचा सामना आणि मृतांच्या फौजेशी लढाईचा लोकांवर फार परिणाम होतो.

अनुवाद - माधवी कुलकर्णी

.............................................................................................................................................

मूळ इंग्रजी लेखासाठी पहा - 

https://www.wired.com/story/game-of-thrones-a-battle-of-reality-versus-fantasy/

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......