‘इंडियन मॅचमेकिंग’मधून न दिसणारी भारतीय विवाहातली एक कुरूप बाजू
कला-संस्कृती - चलत्-चित्र
ए.बी. कार्ल मार्क्स सिद्धार्थर
  • ‘इंडियन मॅचमेकिंग’ वेबसिरीजमधील एक दृश्य
  • Sat , 08 August 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र इंडियन मॅचमेकिंग ठरवून केलेले लग्न arrange marriage वेबसिरीज Web series

‘नेटफ्लिक्स’वर नुकतीच प्रसारित झालेली ‘इंडियन मॅचमेकिंग’ ही वेबसिरीज सामाजिक माध्यमांमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून पाश्चिमात्य देशांतील प्रेक्षकांसमोर भारतीय विवाहासंबंधीच्या बऱ्याच गोपनीय बाबी उघड केल्या गेल्या. या वेबसिरीजच्या ट्रेलरमध्ये प्रत्यक्ष आयुष्यात उच्चभ्रू मुला-मुलींचे विवाह जुळवणाऱ्या सीमा टपारिया यांनी भारतीय विवाहाबाबत काही महत्त्वाच्या घटकांची यादी दिली आहे. ती अशा -

१) भारतीय समाजात विवाह हे दोन कुटुंबांतील नातं असतं. म्हणून पालक आपल्या मुला-मुलींना विवाहासंबंधी मार्गदर्शन करतात आणि हेच तर विवाह जुळवणी करणाऱ्याचं काम असतं.

२) विवाह जुळवणं हे अवघड काम आहे.

३) मुला-मुलीच्या कुंडल्या जुळत नसतील तर विवाहासाठीचे प्रयत्न निरर्थक ठरतात.

पण भारतीय कुटुंब आणि विवाहसंस्थेची कोड्यात टाकणारी बाजू म्हणजे या ‘अतुल्य भारता’ची फारशी ओळख नसलेल्या परदेशी व्यक्तीला भारत वाईट अर्थाने ‘अतुल्य’ वाटू शकतो.

भारतीय पालक – खरे सूत्रधार

Unmarriageability (सामाजिकदृष्ट्या वैवाहिक नातेसंबध जोडण्यास अयोग्य असणं)

१) भारतात जातीच्या बाहेर लग्न न करण्याची प्रथा आहे.

२) त्यातून जातीवर आधारलेली वंशप्रथा अधोरेखित होते

३) भारतीय समाजात एक प्रथा म्हणून भेदभाव मोठ्या प्रमाणावर पाळला जातो.

Unmarriageability किंवा ‘सामाजिकदृष्ट्या वैवाहिक नातेसंबध जोडण्यास अयोग्य असणं’ हा शब्द कुठल्याही शब्दकोशामध्ये सापडणार नाही, परंतु भारतीयांमध्ये तो टोकदारपणे दिसून येतो. हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी भारतीय पालक आपल्या मुलांना आंतरजातीय विवाहाबाबत कसं मार्गदर्शन करतात, हे पाहण्याची गरज आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

भारतीय समाजात मुलगा वा मुलगी कनिष्ठ जातीचे असूनही दोघांच्या पालकांची संमती आणि साथीने विवाह झाला तर तो ‘सामाजिकदृष्ट्या वैवाहिक नातेसंबध जोडण्यासाठी अयोग्य असण्या’चा कलंक मिटवण्यासाठीचा एक मार्ग समजला जाऊ शकतो. अशा आंतरजातीय विवाहासाठी केवळ पालकांच्या संमतीनेच भारतीय समाज बदलू शकतो? भारतात लग्नं कशी ठरवली जातात, हे पाहिल्यास याचं उत्तर मिळू शकतं.

भारतीय समाजात एखादी व्यक्ती त्याचा किंवा तिचा जीवनसाथी कोण असावा हे स्वत: ठरवत नाही, तर त्याचा निर्णय संपूर्ण कुटुंब घेतं. भारतातील विवाह हे कौटुंबिक स्वरूपाचं कार्य आहे. ‘ठरवून केलेल्या विवाहा’तून कुटुंब विवाहाबाबतीत निभावत असलेली भूमिका अधोरेखित होते.

या बाबतीत कुटुंबातील कोणती व्यक्ती प्रमुख भूमिका बजावते?

या प्रश्नाचं उत्तर भारतीय कुटुंबात झालेले सामाजिक-सांस्कृतिक बदल लक्षात घेऊनच देता येईल. भारतीय कुटुंबांची संयुक्त कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे वाटचाल झाली आहे. संयुक्त कुटुंबात विवाह ठरवण्यात वधु-वरांच्या आई-वडिलांबरोबरच कुटुंबातील इतर ज्येष्ठ मंडळींचाही महत्त्वपूर्ण सहभाग असतो. विभक्त कुटुंबात फक्त आईवडिलांचीच भूमिका महत्त्वाची असते. मात्र दोन्ही प्रकारच्या कुटुंबांत पुरुषप्रधानता असल्यानं पुरुष मंडळींचंच म्हणणं महत्त्वाचं मानलं जातं. कुटुंब कुठल्याही प्रकारचं असो, वधुवराच्या आवडीनिवडी योग्य प्रकारे लक्षात घेतल्या जातात.

अशा परिस्थितीत जेव्हा एखादा उच्चभ्रू जातीचा मुलगा जातीबाहेरच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तीही त्याच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा व्यक्त करते, तेव्हा साहजिकच तिला घरच्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. तिला ज्यांची मनधरणी करावी लागते, ते कुटुंबाचे असे सदस्य असतात, जे ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधासाठी बरोबरीचे नसण्या’च्या कलंकाला पुसण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात. दुर्दैवाने भारतात प्रत्येक जातीतल्या कुटुंबातील सदस्यांची वैचारिक बैठक ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधासाठी बरोबरीचे नसणे’ यास एक परंपरागत रूढी म्हणून बळ देते.

कोण असतात ही महत्त्वाची माणसं, ज्यांची मनधरणी तिला करावी लागते?

हे असतात, कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी. बहीण-भाऊ नाही, तर खुद्द आई आणि वडील! ती आपल्या आई-वडिलांचं मन वळवू शकली, तरी जातबांधव या आंतरजातीय विवाहाला विरोध करतात. समाज याबाबतीत कुजबुज करू शकतो, पण उघडपणे बोलू शकत नाही. आणि कुजबुजला तरी तो बाहेरचा असतो. त्यामुळे त्याची कोणी फारशी दखल घेत नाही. समाज नियम मोडणारी मुलगी तर नक्कीच नाही.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘ठरवून केलेल्या लग्ना’च्या मुळांचा शोध… ‘मनुस्मृती’पासून ‘इंडियन मॅचमेकिंग’पर्यंत…

..................................................................................................................................................................

विवाह अमान्य असणाऱ्या मित्र-नातेवाईकांचं समाधान मुलीच्या आई-वडिलांकडून केलं जाऊ शकतं. आई-वडील उत्तम मार्गदर्शक बनू शकतात, ते त्यांचं कर्तव्यही असतं.

वास्तवात, जेव्हा या मुलीला कनिष्ठ जातीचा मुलगा आपला जावई म्हणून स्वीकार करण्यास तिच्या आई वडिलांची संमती मिळवण्यात अपयश येतं, तेव्हा परिस्थिती कशी बदलते? तिच्या आई-वडिलांचा नकार जातबांधवांना उघड बोलण्याचा अधिकार बहाल करतो. जातीबाह्य लोकांशी त्यांचे नातेसंबंध स्थापित होऊ न देण्यासाठी ते व्यापक समाजभावनेच्या दृष्टीनं ओरड करतात. मुलीनं तिच्या काही मित्र-नातेवाईकांना समजवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचे प्रयत्न अपयशी ठरतात.

खरं म्हणजे, पालकच या निर्णयाविरोधात असल्यानं तिला तिच्या मित्र-नातेवाईकांना पटवून देणं अशक्य होतं. घराण्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्यामुळे जीव घेतला गेल्याची अनेक उदाहरणंही आपल्या आसपास आहेत. प्रतिष्ठेच्या अहंकारापायी झालेल्या खुनामागे आई-वडिलांच्या विरोधाचीच ‘प्रेरणा’ असते. पालकांचा अशा रीतीनं आंतरजातीय विवाहाला असलेला विरोधच या जीवघेण्या कृत्याला आणि जातपंचायतीला अधिकार बहाल करतो. भारतीय पालक आपल्या मुलांची सामाजिक जडणघडण ही अशा प्रकारे करतात!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

म्हणून आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात पालक केवळ समाजाचा भाग नाहीत, तर ते स्वतः एक समाज आहेत, जे ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधात एकमेकांच्या बरोबरीचे नसणे’ या जातीव्यवस्थेच्या घातक अंधश्रद्धेला मिटवू शकतात. आंतरजातीय विवाहाला त्यांची केवळ होकारात्मक संमती भारतीय समाज व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणार नाही, परंतु ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधाठी बरोबरीचे नसणे’ हा कलंक पुसून टाकण्यात आड येणाऱ्या जातीव्यवस्थेच्या मोठ्या आव्हानाला ताकदीनं तोंड देण्याची पुरेशी क्षमता त्यात आहे.

विवाह ठरवण्यात मध्यस्थी करणाऱ्या टपारिया त्यांच्या ग्राहकांत असणारा ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधासाठी एकमेकांच्या बरोबरीचे नसण्या’चा कलंक दूर करण्याचे आश्वासन देतील काय, हे मला माहीत नाही, पण मला हे माहीत आहे की, भारतातील लोक हे जातीच्या संदर्भात फारच प्रतिगामी व बुरसटलेले आहेत. ‘नेटफलिक्स’ने त्यांच्या भारतीय विवाह जुळवणीच्या पुढच्या मालिकेसाठी ही रंगीत तालीम समजायला हरकत नाही. प्रायश्चित्त घेण्याचा तोच एक योग्य मार्ग आहे!

..................................................................................................................................................................

ए.बी. कार्ल मार्क्स सिद्धार्थार हे ‘UNCASTE : Understanding Unmarriageability - The Way Forward To Annihilate Caste’ या पुस्तकाचे लेखक आहेत.

अनुवादक : प्रा. विलास भुतेकर व प्रा. प्रियदर्शन भवरे हे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे अध्यापन करतात. 

..................................................................................................................................................................

मूळ इंग्रजी लेख countercurrents.org या संकेतस्थळावर २४ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 14 August 2020

सिद्धार्थार बुवा,

तुम्हा मार्क्सिस्टांची एक चाल आम्हाला माहितीये. आम्ही आमचा सोडून बाकीचे सर्व समूह तोडून फोडून टाकू. म्हणूनंच भारतीय विवाहांना तुम्ही प्रतिष्ठाहत्येच्या पातळीवर उतरवायची तुम्ही खटपट करताय. ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधाठी बरोबरीचे नसणे’ हा प्रकार जगभरात सर्वत्र अगदी युरोपातही दिसून येतो. इंग्लंडमध्ये युवराज चार्ल्सशी डायनाचं लग्नं झाल्यावर तिच्या वडिलांना ( तत्कालीन आर्ल स्पेन्सर यांना ) आपलं सामाजिक स्थान उंचावल्याचा पराकोटीचा आनंद झाला होता. त्याच वेळी डायना राजघराण्यातली नाही म्हणून हाकाटीही झाली होती (जी नंतर विरली). तसंच केट मिडलटनचा युवराज विलियम याच्याशी विवाह ठरल्यावर केटबाई अतिमध्यमवर्गीय असल्याने राजघराण्याशी संबंध जोडण्यायोग्य नाहीत, अशी बोंब उठली होती. मग भारतीयांनी जर सामाजिक स्थान बघून लग्नं केली तर तो घोर अपराध का म्हणून?

याचं कारण एकंच दिसतंय. ते म्हणजे तुम्हा मार्क्सिस्टांची महत्त्वाकांक्षा. आम्ही आमचा सोडून बाकी सगळे समूह तोडून फोडून टाकू. हीच ती आसुरी महत्त्वाकांक्षा. भारतात जातींची स्थानं घट्ट कधीच नव्हती. शिंदे व होळकर तथाकथित बहुजन असूनही स्वत:च्या कर्तृत्वाने वर चढलेत. फार काय पानिपतात पकडले जाऊन मुस्लीम गुलाम झालेले बुगती मराठेही स्वत:च्या बळावर गुलामगिरीतनं मुक्त झाले. सध्या आधुनिक शिक्षण घेऊन बलुचीस्थानाच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावताहेत. या बुगती मराठ्यांमुळेच पाकिस्तानचे बलुच्यांवर केलेले अत्याचार जगासमोर येताहेत.

सांगायचा मुद्दा काये की, भारतीय जाती स्वत:ची प्रगती साधण्यास सक्षम आहेत. तुम्हां मार्क्सिस्टांच्या सहानुभूतीची गरज नाही, आणि जातीनिर्मूलानाची तर नाहीच नाही.

आपला नम्र,
-गामा पैलवान

Gamma Pailvan

Fri , 14 August 2020

कटपेस्टात कायतरी जाम गडबड झाली. विंडोज क्लिपबोर्डावर कसलीशी भुतं नाचताहेत माझ्या. मशीन रीबूट करायला पायजेल. तत्पूर्वी प्रतिसाद दाकावायचा परत एक प्रयत्न करतो.
-गामा पैलवान

Gamma Pailvan

Fri , 14 August 2020

सुशील धसकटे, लेखाबद्दल धन्यवाद. चव्हाणांचं हे वाक्य महत्त्वाचं वाटलं :

“शिक्षण व शहाणपण हातात हात घालून कसे पुढे जाईल, हा आजचा प्रश्न आहे.”
माझ्या मते हा प्रश्न कधीच सुटणार नाहीये. कारण की वर ज्याला शिक्षण म्हटलंय ते शिक्षण नाहीच्चे मुळी. आपण जे शाळाकॉलेजात शिकतो ते केवळ प्रशिक्षण आहे. कसलं प्रशिक्षण आहे ते बरं?
ते आहे कारकून बनायचं प्रशिक्षण. भले पदवी काहीही असो, विद्यार्थी कारकूनच बनणार. बदल तिकडे पाहिजे.
आपला नम्र,
-गामा पैलवान -------------- काय बोलणार यावर. तिच्या वेदना संपून ती पुढील मार्गाला लागावी. यापलीकडे काही बोलणं शक्य नाही. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा!
-गामा पैलवान -------------- सिद्धार्थार बुवा,

तुम्हा मार्क्सिस्टांची एक चाल आम्हाला माहितीये. आम्ही आमचा सोडून बाकीचे सर्व समूह तोडून फोडून टाकू. म्हणूनंच भारतीय विवाहांना तुम्ही प्रतिष्ठाहत्येच्या पातळीवर उतरवायची तुम्ही खटपट करताय. ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधाठी बरोबरीचे नसणे’ हा प्रकार जगभरात सर्वत्र अगदी युरोपातही दिसून येतो. इंग्लंडमध्ये युवराज चार्ल्सशी डायनाचं लग्नं झाल्यावर तिच्या वडिलांना ( तत्कालीन आर्ल स्पेन्सर यांना ) आपलं सामाजिक स्थान उंचावल्याचा पराकोटीचा आनंद झाला होता. त्याच वेळी डायना राजघराण्यातली नाही म्हणून हाकाटीही झाली होती (जी नंतर विरली). तसंच केट मिडलटनचा युवराज विलियम याच्याशी विवाह ठरल्यावर केटबाई अतिमध्यमवर्गीय असल्याने राजघराण्याशी संबंध जोडण्यायोग्य नाहीत, अशी बोंब उठली होती. मग भारतीयांनी जर सामाजिक स्थान बघून लग्नं केली तर तो घोर अपराध का म्हणून?

याचं कारण एकंच दिसतंय. ते म्हणजे तुम्हा मार्क्सिस्टांची महत्त्वाकांक्षा. आम्ही आमचा सोडून बाकी सगळे समूह तोडून फोडून टाकू. हीच ती आसुरी महत्त्वाकांक्षा. भारतात जातींची स्थानं घट्ट कधीच नव्हती. शिंदे व होळकर तथाकथित बहुजन असूनही स्वत:च्या कर्तृत्वाने वर चढलेत. फार काय पानिपतात पकडले जाऊन मुस्लीम गुलाम झालेले बुगती मराठेही स्वत:च्या बळावर गुलामगिरीतनं मुक्त झाले. सध्या आधुनिक शिक्षण घेऊन बलुचीस्थानाच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावताहेत. या बुगती मराठ्यांमुळेच पाकिस्तानचे बलुच्यांवर केलेले अत्याचार जगासमोर येताहेत.

सांगायचा मुद्दा काये की, भारतीय जाती स्वत:ची प्रगती साधण्यास सक्षम आहेत. तुम्हां मार्क्सिस्टांच्या सहानुभूतीची गरज नाही, आणि जातीनिर्मूलानाची तर नाहीच नाही.

आपला नम्र,
-गामा पैलवान

Gamma Pailvan

Fri , 14 August 2020

सिद्धार्थार बुवा, तुम्हा मार्क्सिस्टांची एक चाल आम्हाला माहितीये. आम्ही आमचा सोडून बाकीचे सर्व समूह तोडून फोडून टाकू. म्हणूनंच भारतीय विवाहांना तुम्ही प्रतिष्ठाहत्येच्या पातळीवर उतरवायची तुम्ही खटपट करताय. ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधाठी बरोबरीचे नसणे’ हा प्रकार जगभरात सर्वत्र अगदी युरोपातही दिसून येतो. इंग्लंडमध्ये युवराज चार्ल्सशी डायनाचं लग्नं झाल्यावर तिच्या वडिलांना ( तत्कालीन आर्ल स्पेन्सर यांना ) आपलं सामाजिक स्थान उंचावल्याचा पराकोटीचा आनंद झाला होता. त्याच वेळी डायना राजघराण्यातली नाही म्हणून हाकाटीही झाली होती (जी नंतर विरली). तसंच केट मिडलटनचा युवराज विलियम याच्याशी विवाह ठरल्यावर केटबाई अतिमध्यमवर्गीय असल्याने राजघराण्याशी संबंध जोडण्यायोग्य नाहीत, अशी बोंब उठली होती. मग भारतीयांनी जर सामाजिक स्थान बघून लग्नं केली तर तो घोर अपराध का म्हणून? याचं कारण एकंच दिसतंय. ते म्हणजे तुम्हा मार्क्सिस्टांची महत्त्वाकांक्षा. आम्ही आमचा सोडून बाकी सगळे समूह तोडून फोडून टाकू. हीच ती आसुरी महत्त्वाकांक्षा. भारतात जातींची स्थानं घट्ट कधीच नव्हती. शिंदे व होळकर तथाकथित बहुजन असूनही स्वत:च्या कर्तृत्वाने वर चढलेत. फार काय पानिपतात पकडले जाऊन मुस्लीम गुलाम झालेले बुगती मराठेही स्वत:च्या बळावर गुलामगिरीतनं मुक्त झाले. सध्या आधुनिक शिक्षण घेऊन बलुचीस्थानाच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावताहेत. या बुगती मराठ्यांमुळेच पाकिस्तानचे बलुच्यांवर केलेले अत्याचार जगासमोर येताहेत. सांगायचा मुद्दा काये की, भारतीय जाती स्वत:ची प्रगती साधण्यास सक्षम आहेत. तुम्हां मार्क्सिस्टांच्या सहानुभूतीची गरज नाही, आणि जातीनिर्मूलानाची तर नाहीच नाही. आपला नम्र, -गामा पैलवान

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......