डोंबिवलीक येवा, साहित्य संमेलन आपलाच आसा!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • संमेलनाचे बोधचिन्ह व मुख्य मंडप
  • Fri , 03 February 2017
  • साहित्य संमेलन Sahitya Sammelan आगरी युथ फोरम Agri Youth Forum सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल Savlaram Maharaj Sport Complex

९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  आजपासून, शुक्रवार रविवारपर्यंत डोंबिवली (पूर्व) येथील पु. भा. भावे साहित्य नगरी अर्थात ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकूल इथं होत आहे. काल रात्री उशिरापर्यंत संमेलनाची जोरदार तयारी सुरू होती. डोंबिवलीमध्ये होणारं हे संमेलन फारशा कुठल्याही ताज्य वादाशिवाय होऊ पाहत आहे. संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवर राजकारण्यांचा भरणा, नियोजनातला काहीसा ढिसाळपणा आणि बहुधा अपुरी पडणारी जागा, अशा काही गोष्टींची चर्चा आजपासून पुढची दोन दिवस होत राहीलच. गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवडला डी.वाय.पाटील यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या संमेलनाशी या संमेलनाची तुलना कालपासूनच सुरू झाली होती आणि त्याबाबतीत डोंबिवलीच्या संमेलनाने मार खाल्ला असाही वहिम व्यक्त केला जात होता. असो. अशा चर्चांना अंत नसतो. काल संध्याकाळपर्यंत संमेलनाची जोरदार तयारी आयोजक संस्था करत होती. त्याची ही चित्रमय झलक...

साहित्य संमेलनाचे मुख्य प्रवेशद्वार - पु. भा. भावे साहित्य नगरी

खालच्या बाजूला दिसणारे संमेलनस्थळाचे प्रवेशद्वार क्रमांक दोन. डावीकडे दिसणारा मुख्य मंडप

मुख्य मंडप. संमेलनाचे उदघाटन, समारोप आणि काही महत्त्वाचे कार्यक्रम याच व्यासपीठावर होतील.

मुख्य मंडपासमोरील भव्य आसनव्यवस्था. किमान दहाएक हजार लोक बसू शकतील एवढा मोठा हा मंडप आहे.

मुख्य मंडपासमोरील भव्य आसनव्यवस्था. व्यासपीठाच्या डाव्या बाजूने घेतलेले छायाचित्र

मुख्य मंडपाच्या डाव्या बाजूला ग्रंथप्रदर्शन असून त्यात तीनशेच्या आसपास पुस्तकांचे स्टॉल्स आहेत.

मुख्य मंडपाच्या उजव्या बाजूची तयारी काल रात्री उशिरापर्यंत चालू होती. हे छायाचित्र संध्याकाळचे आहे.

कवीसंमेलन व इतर परिसंवादासाठीचा छोटा मंडप उजवीकडे तर डावीकडे भोजनकक्ष आहे.

भोजनकक्षाची आतील रचना. इथे पापलेट, बांगडा आणि सुरमई मिळेल की नाही हे अजून माहीत नाही! आज दुपारीच कळेल.

छोटीशी भूक व तहान भागवणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. हे स्टॉल्स प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून येताना डाव्या बाजूला आहे तर, मुख्य प्रवेशद्वारातून येतानाही ते डाव्या बाजूलाच लागते.

मुख्य प्रवेशद्वार व प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून आत आल्यानंतर दिसणारा संमेलनाचा मुख्य मंडप.

साहित्य संमेलन ही महाराष्ट्रातील एक अभूतपूर्व अशी सांस्कृतिक घडामोड आहे. डोबिंवलीत ज्या म्हात्रे क्रीडा संकुलमध्ये हे संमेलन होत आहे, त्याचा गेल्या १०-१२ दिवसांत पुरता कायापालट झाला आहे. ती मूळ जागा २२ जानेवारीपर्यंत कशी होती, हे पाहण्यासाठी http://www.aksharnama.com/client/article_detail/443 या लिंकवर क्लिक करा.

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......