अजूनकाही
‘राजहंस प्रकाशन’ आणि ‘अक्षरनामा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जानेवारी २०२१ रोजी कादंबरीकार अभिराम भडकमकर यांच्या ‘इन्शाअल्लाह’ या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण स्पर्धा’ जाहीर करण्यात आली. १ ते २८ फेब्रुवारी हा या स्पर्धेचा कालावधी होता. ‘अक्षरनामा’वर दररोज प्रकाशित होणाऱ्या लेखांमधून या स्पर्धेबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय ‘अक्षरनामा’चे फेसबुक पेज, ट्विटर पेज, व्हॉटसअॅप ग्रूप आणि टेलिग्राम चॅनेलवरही या स्पर्धेविषयी सातत्याने माहिती दिली गेली. याशिवाय राजहंस प्रकाशनाच्याही फेसबुक पेजेसवरूनही ही माहिती शेअर केली गेली.
या स्पर्धेचे नियम आणि अटी यांची सविस्तर माहिती ३० जानेवारी २०२१ रोजी ‘अक्षरनामा’वर एका टिपणाद्वारे देण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी २८ फेब्रुवारीअखेर एकंदर आठ परीक्षणे आली, तर एक परीक्षण २ मार्च रोजी आले.
परीक्षण कमीत कमी १५०० तर जास्तीत जास्त ३००० शब्दांचे असावे असा नियम असताना तीन परीक्षणे अनुक्रमे ४२७, ५१८ आणि ९६६ शब्दांची आली. कुठल्याही पुस्तकाचे परीक्षण काटेकोर शब्दसंख्येत करणे हे तसे कठीणच काम असते. त्यामुळे या तिन्ही परीक्षणांसाठी शब्दसंख्या आणि दर्जा असे दोन्ही निकष लावले गेले. त्या निकषांवर मात्र ही तिन्ही परीक्षणे बाद ठरली. दोन परीक्षणे ही ‘परीक्षण’ या संज्ञेला पात्र ठरणारी नसल्याने तीही बाद ठरवण्यात आली. एक परीक्षण स्पर्धेची तारीख उलटल्यानंतर आल्याने तेही बाद ठरवले गेले.
परिणामी स्पर्धेसाठी केवळ तीन परीक्षणे उरली. त्यातील एक परीक्षण तब्बल ५४२५ शब्दांचे, एक १०२६ शब्दांचे आणि एक १५७२ शब्दांचे होते. त्यामुळे या तिन्ही परीक्षणांसाठी शब्दसंख्या आणि दर्जा असे दोन्ही निकष लावले गेले. दर्जाचा निकष लावताना पुढील दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला -
१) कादंबरीकाराने जो विषय मांडला आहे, त्याचा पुरेशा साक्षेपाने विचार केला गेला आहे का?
२) लेखकाने जो वाङ्मयप्रकार निवडला आहे, त्याचा पुरेशा साक्षेपाने विचार केला गेला आहे का?
या निकषांनुसार या तीन परीक्षणांना पुढीलप्रमाणे बक्षीसे देण्यात येत आहेत -
१) प्रियांका तुपे - पहिले बक्षीस (राजहंसची दर्शनी २००० रुपये किमतीची पुस्तके)
२) अजिंक्य कुलकर्णी - दुसरे बक्षीस (राजहंसची दर्शनी १५०० रुपये किमतीची पुस्तके)
३) राजेंद्र नाईकवाडे - तिसरे बक्षीस (राजहंसची दर्शनी १००० रुपये किमतीची पुस्तके)
याशिवाय तीन परीक्षणांची ‘उत्तेजनार्थ’ म्हणून निवड केली जाणार होती. मात्र या वर्गवारीत घ्यावे असे एकही परीक्षण योग्य वाटले नाही. अगदी सुरुवातीला शब्दसंख्या व दर्जा या निकषांवर बाद केलेली परीक्षणेही. असो.
विजेत्या तिन्ही स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन! त्यांना त्यांचे बक्षीस लवकरच राजहंस प्रकाशनाकडून पाठवण्यात येईल आणि त्यांची परीक्षणे १२ मार्च रोजी ‘अक्षरनामा’वर प्रसिद्ध करण्यात येतील.
..................................................................................................................................................................
कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची ‘इन्शाअल्लाह’ ही नवी कादंबरी नुकतीच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. दारिद्रयात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का? त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी.
‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5223/Inshallah
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment