अजूनकाही
शहीद भगतसिंग विचारमंच, पुणेतर्फे पुण्यात १९ मार्च २०२३ रोजी ‘आठवा नास्तिक मेळावा’ झाला. या मेळाव्याला यंदा प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी, स्तंभलेखक संग्राम खोपडे यांच्या उपस्थिती लाभली. दोघांचाही भाषणांनी हा मेळावा रंगतदार आणि तर्कनिष्ठ केला. या मेळाव्यात ‘परमेश्वरावर मात!’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात परमेश्वर-देव-ईश्वर, मूर्तिपूजा, देव आणि धर्म, देव आणि देव, देव आणि आत्मा, देव आणि विश्व, देव आणि उत्क्रांतिवाद, देव आणि मानव, देव आणि अंधश्रद्धा या नऊ विषयांवर जवळपास १०० प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांना उत्तरेही सुचवलेली आहेत. हे प्रश्नपत्रिकेसारखे पुस्तक आपल्या देवाविषयीच्या संकल्पना अधिक नेटक्या, नेमक्या आणि अभ्यासू करणारे आहे. अशा या अफलातून पुस्तकाची ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
बहुतेक सर्व आस्तिक लोक असे समजतात की, नास्तिक मंडळींची अश्रद्धा हीदेखील त्यांच्या श्रद्धेसारखाच एक आंधळेपणाने मान्य केला जाणारा विश्वास आहे. त्यांचा आणि एखाद्या नास्तिकाचा सामना घडत नाही, याचे अगदी साधे कारण हे आहे की, नास्तिक मंडळी संख्येने अगदीच थोडी असतात. याउलट नास्तिक माणसाची मात्र रोज अनेक आस्तिक मंडळींशी गाठ पडते, कारण तो बहुतांशी आस्तिक असणाऱ्या समाजात राहत असतो. त्यामुळेच आस्तिक लोकांची विचार-प्रणाली आणि त्यातले कच्चे दुवे नास्तिकाला चांगले परिचयाचे असतात. पण आस्तिक माणसाला मात्र बुद्धिप्रामाण्यवादी विचारामागचे तर्कशास्त्र क्वचितच ठाऊक असते.
परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलच आम्ही प्रश्न उपस्थित करतो, याचे तुम्हाला महदाश्चर्य वाटेल. असा प्रश्न करण्याची तुम्हाला भीती तर वाटत नाही ना? परमेश्वराच्या अस्तित्वाची शंकादेखील घेणे म्हणजे पाप आहे, असे तर तुम्ही मानत नाही ना?
समजा, अगदी परमेश्वर असलाच तरी इतर अनेक धर्मविरोधी, समाजविरोधी, नीतिविरोधी आणि बेकायदेशीर अशा फसवाफसवी, लाचखोरी, जुगार, तस्करी, काळाबाजार, खोटेपणा, बलात्कार, या दुष्कर्मासारखे, ‘विचार करणे’ हे काही पाप नव्हे. तो तर मोठा गुण आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आस्तिक मंडळींचे दोन भाग पाडता येतील : एक धर्मगुरू मंडळी आणि दुसरे त्यांचे अनुयायी. पैकी धर्मगुरूंनी ईश्वरविषयक शास्त्रांचा अभ्यास केलेला असतोच, आणि त्यांनी स्वतःच्या मनाची कवाडे पूर्णपणे बंद केली नसतील आणि त्यांची विचारशक्ती पूर्णपणे नष्ट झालेली नसेल, तर त्यातील बहुतेक जणांना निदान त्यांच्या खोल अंतःकरणात, त्यांच्या श्रद्धेच्या आणि शिकवणुकीच्या भ्रामकतेची जाणीव झालेली असतेच. पण धंद्याच्या आणि काही अन्य कारणास्तव त्यांना आपली श्रद्धा कायम ठेवावी लागते. हा गट त्यामुळे सुधारण्याच्या पलीकडला असतो.
दुसरा गट असतो निष्पाप नागरिकांचा आणि त्यांना सर्व प्रकारचे अंधविश्वास बाळगायला उद्युक्त केले जाते. जर संधी मिळाली तर अंतर्मुख होऊन, पूर्ण विचार करून आपल्या चुकीच्या समजुती गरज पडल्यास सुधारण्याची त्यांची तयारी असते. अगदी पक्के श्रद्धावादी आणि धंदेवाईक परमेश्वरभक्त फारच थोडे असतात, बाकी
९० टक्के जनता ही अशा अनिश्चित विचारांची असते. प्रत्यक्षात ही मंडळी कुठल्या तरी धर्माची वा पंथाची अनुयायी असल्याचे दिसते, त्याचे कारण त्यांची व धर्माची वा पंथाची असणारी भौतिक मानसिक जवळीक होय. इतर धर्माशी वा पंथांशी यांचा कधी संपर्क आलेला नसतो. एकदा का यांचा बुद्धिप्रामाण्यवादी प्रश्नांच्या फैरींशी सामना झाला की, आपण बाळगत असलेल्या श्रद्धा या कुठल्याही शास्त्रीय, तार्किक, वैचारिक किंवा फार काय सामान्य अक्कलहुषारीच्या (कॉमनसेन्सच्या) कसोटीलाही उतरत नाहीत, हे त्यांना समजून येईल. बुद्धिप्रामाण्यवादी विचार कुठल्याही गोष्टीबाबत शंका घेऊ शकतो. मग गोष्ट कोट्यवधी लोक मानत ती गोष्ट असो वा हजारो वर्षे चालत आलेली असो.
असे शेकडो वा हजारो प्रश्न उपस्थित करता येतील आणि ते सर्व मांडायचे ठरवले, तर मोठमोठे ग्रंथ निर्माण होतील. त्यामुळे आम्ही त्यातले फक्त १००पेक्षाही कमी असे महत्त्वाचे प्रश्न निवडले आहेत. हे प्रश्न बुद्धिवाद्यांना नेहमी पडतात, पण श्रद्धावाद्यांना कधीच सुचत नाहीत. अशा श्रद्धावाद्यांना विचार करायला उद्युक्त करणे, हा या प्रश्नावलीचा प्रधान हेतू आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
निदान काही श्रद्धावादी मंडळींना तरी ही प्रश्नावली वाचल्यावर बुद्धिप्रामाण्यवादी सिद्धान्त मान्य होतील, अशी आशा आहे. पण परमेश्वर या विषयासंबंधी हे लोक नुसता विचार किंवा पुनर्विचार जरी करू लागले, तरी या प्रश्नावलीचा हेतू साध्य होईल.
ईश्वरवादी आणि बुद्धिवादी यांच्यातील वाद कित्येक शतके चालू आहे. पण समोरासमोर वाद होताना अनेकदा चर्चा विषय सोडून जाते आणि वाद अनिर्णित राहतो. या प्रश्नावलीतून दोन्ही विचारांच्या मंडळींना संबंधित विविध विषयांचे सुसूत्र आणि तर्कसंगत विवेचन करता येईल असे वाटते.
तोंडी वादविवादात थोडक्यात पुढील अडचणी उद्भवतात -
१) श्रद्धावाद्यांच्या तुलनेने बुद्धिवादी अत्यल्प आहेत.
२) दोघांनाही पुरेसा मोकळा वेळ मिळणे शक्य नसते.
३) आक्रमक भूमिका घेणारा वादपटू योग्य मुद्दे मांडणाऱ्या कम-ताकद विरोधकावर मात करू शकतो.
४) वयोवृद्ध वा उच्च दर्जाच्या माणसाला झुकते माप मिळते.
५) मुद्दा हरणाऱ्याला अपमानित झाल्यासारखे वाटते.
६) विषयाच्या मर्यादेत राहून संगतवार पुढे जाणे अवघड असते.
७) वादपटूंना तात्काळ उत्तर देण्याचे अवधान पुरेसे नसते.
८) दोघेजण एकच पद निरनिराळ्या अर्थाने वापरत असतात.
९) बाजू मांडण्यातील विसंगती लगेच लक्षात येऊ शकत नाही.
१०) वादाची वा निकालाची नोंद राहू शकत नाही.
यातील काही प्रश्न व त्यांची उत्तरे कदाचित हेटाळणीच्या स्वरूपाची वा तिरकस वाटतील, पण त्यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. निरनिराळ्या पातळीवरील अनेक लोकांकरता ही प्रश्नावली असल्यामुळे सर्व प्रकारची उत्तरे सुचवलेली आहेत. प्रश्नांच्या बाबतही असेच केले आहे.
थोडक्यात, लोकांना विचार करायला उद्युक्त करणे आणि बुद्धिप्रामाण्यवादाची तत्त्वे पटवून देणे, हा या प्रश्नावलीचा हेतू आहे. श्रद्धावाद्यांची टवाळी करणे हा नव्हे.
हा या प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे. साहजिकच यात पुढील आवृत्तीचे वेळी पुष्कळच सुधारणा करता येतील. त्या दृष्टीने बुद्धिप्रामाण्यवादाच्या हितचिंतकांनी सूचना अवश्य कराव्यात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
वाचकांना सूचना : कृपया प्रश्नाची उत्तरे देण्यापूर्वी पुढील गोष्टी लक्षात घ्या-
१) तुम्ही आस्तिक नसाल तर ही प्रश्नावली तुमच्याकरता नाही. तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी असाल, तरी याचा उपयोग तुम्ही तुमच्या आस्तिक मित्रांच्या दाव्यातील विसंगती दाखवून देण्याकरता करू शकाल. जरी तुम्ही आस्तिक असाल आणि परमेश्वरावरचा तुमचा विश्वास केवळ अंधविश्वास आहे, किंवा परमेश्वराचे स्पष्टीकरण करता येणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल, तरी तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची गरज नाही. जे सर्वशक्तीनिशी देवाचे समर्थन करू पाहतात, त्यांच्यासाठी ही प्रश्नावली आहे.
२) तुम्ही आस्तिक असाल, तर ओळीने प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. योग्य उत्तरावर खूण करा किंवा अयोग्य भाग खोडून टाका. एकमेकांशी विसंगत नसणाऱ्या दोन वा अधिक उत्तरांवरही तुम्ही खूण करू शकता. जिथे उत्तरे सुचवलेली नाहीत, तिथे तुमचे उत्तर थोडक्यात पण स्पष्टपणे लिहा.
३) पुढच्या प्रश्नांची उत्तरे लिहितेवेळी, तुम्हाला वाटल्यास, पुन्हा मागे येऊन, आधीच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कितीही वेळा बदलू शकता, तेव्हा उत्तरे लिहिताना पेन्सिल व रबर वापरलेले बरे.
४) मात्र सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे आपली विधाने परस्परविरोधी नाहीत, याची तुम्हाला खात्री पटेल.
५) प्रश्नावली पुरी करण्यासाठी वेळेचे बंधन नाही. तुम्ही एक वा दोन वर्षे घेतलीत तरी चालेल. पण आमची एकच विनंती आहे की, या मोठ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पूर्णपणे देता येईपर्यंत देवाचे समर्थन करणारे दावे करू नका.
६) या प्रश्नांची उत्तरे देण्याकरता तुम्ही कोणत्याही धर्माच्या कोणत्याही ग्रंथाचा आधार घेऊ शकता. तुमच्या कोणाही मित्रांचा, किंवा धर्मगुरूंचाही सल्ला घेऊ शकता.
७) अखेर हा नाद तुम्ही सोडून दिलात तर तुम्ही आमच्यातलेच एक झालात. तुम्ही इतरांना हा ज्ञानप्रकाश देण्याचा प्रयत्न करा.
८) या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देणे तुम्हाला शक्य झाले नाही, तर त्यात लाज वाटू देऊ नका. अद्याप कोणालाही ते जमलेले नाही.
९) आजचे बहुतेक सर्व बुद्धिप्रामाण्यवादी हे एके काळचे श्रद्धावादी आस्तिकच होते. त्यामुळे आजच्या श्रद्धावाद्यांना उद्याचे बुद्धिप्रामाण्यवादी होण्यात काही चूक नाही. आमची अपेक्षा एवढीच आहे की, विचार करा, विचार करा, विचार करा आणि मगच कृती करा.
१०) कोणत्याही तऱ्हेची विसंगती न ठेवता वा अस्पष्ट, द्वयर्थी उत्तरे न देता ही सर्व प्रश्नावली सोडवून दाखवणाऱ्या पहिल्या माणसास १००० रुपये बक्षीस दिले जाईल.
‘परमेश्वरावर मात’ – ए. हरनाथ ए. सूर्यनारायण
मराठी अनुवाद – डॉ. शरद अभ्यंकर
शहीद भगतसिंग विचारमंच, पुणे, पाने – ४०, मूल्य – दिलेले नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment