‘चे’ गव्हेराचे लिखाण हा जणू क्रांतिकारी भूतकाळातून क्रांतिकारी भविष्याकडे वाहत असलेल्या प्रवाहात सोडून दिलेल्या बाटलीतला संदेशच
ग्रंथनामा - झलक
एजाज अहमद
  • ‘चे’ या पुस्तिकेचे मुखपृष्ठ
  • Sat , 10 October 2020
  • ग्रंथनामा झलक चे चे गव्हेरा एजाज अहमद फिडेल कॅस्ट्रो

काल चे गव्हेराचा ५३वा हौतात्म्य दिन होता. त्यानिमित्ताने त्याच्या दोन लेखांची पुस्तिका जनशक्ती प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेचा मराठी अनुवाद उदय नारकर यांनी केला आहे. ‘क्यूबातील समाजवाद आणि माणूस’ आणि ‘त्रिखंडाला संदेश’ हे चे गव्हेराचे दोन लेख, त्याचा जीवनपट, मारिया देल कार्मेन अरिएत गार्सिया यांचा चे गव्हेराविषयीचा लेख इत्यादी मजकूर या पुस्तिकेत आहे. या पुस्तिकेला प्रसिद्ध मार्क्सवादी अभ्यासक एजाज अहमद यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचे हे पुनर्मुद्रण…

..................................................................................................................................................................

‘‘मानवता हीच मातृभूमी’’ - जोसे मार्ती

‘‘२१ व्या शतकातील माणूस घडवू या - आपण आपल्या हातांनीच.’’ - चे गव्हेरा

अर्नेस्टो ‘चे’ गव्हेरा (१९२८-१९६७)चे हे दोन अभिजात दर्जाचे लेख आपण प्रकाशित करत आहोत. ‘चे’ गव्हेरा हा मनुष्य भविष्यात जगला. भांडवल आणि साम्राज्य यांनी घडवलेल्या जगाशी कायमचा विद्रोह करत जगला. अशा जगाचं क्रांतिकारक परिवर्तन करणारा सैनिक म्हणून जगला. त्याचं लिखाण समजून घेताना आपल्याला एक मोठी समस्या भेडसावते. तो आपल्याहून अत्यंत भिन्न अशा ऐतिहासिक काळात जगला. त्याच्या काळात सुमारे एक तृतीयांश मानव समाजवादी देशांत रहात होता. तो भांडवलशाही आणि कम्युनिझम, साम्यवाद, या दोन जागतिक व्यवस्थांच्या दरम्यान रात्रंदिवस चालणाऱ्या युद्धाचा काळ. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या तीन खंडात, या त्रिखंडात, राष्ट्रीय मुक्तीलढे पेटलेले होते. हे होते, म्हटले तर, साम्राज्यवादविरोधी त्यागमय, गौरवशाली लढ्याचे युग. कोट्यवधी, अगणित लोकांना दिसत होती त्यातील क्रांतिकारी राष्ट्रवाद आणि साम्यवाद यांची आंतरिक घट्ट वीण. त्यामुळे ‘चे’ गव्हेराचे लिखाण हा जणू क्रांतिकारी भूतकाळातून क्रांतिकारी भविष्याकडे वाहत असलेल्या प्रवाहात सोडून दिलेल्या बाटलीतला संदेशच होता. तो संदेश आता आपल्या हाती लागला आहे.

साम्राज्यवादाने आणि त्याच्या हस्तकांनी त्याची हत्या केली, तेव्हा ‘चे’ होता अवघा ३९ वर्षांचा. अनेक जणांच्या जीवनाची ऊर्जा सामावून वेगाने आकाशात भ्रमण करणारा तो ताराच होता. तो प्रशिक्षित डॉक्टर होता, पण शिक्षण घेत असताना, विद्यार्थिदशेतच त्याने अख्खी लॅटिन अमेरिका पालथी घातली होती. अर्जेंटिनात जन्मलेल्या ‘चे’ने मार्क्सवादाची बाराखडी गिरवली ग्वाटेमालामध्ये, १९५४ साली. तिथेच त्याने साम्राज्यवादाविरुद्ध लढण्यासाठी स्वच्छेने हातात शस्त्र घेतले. सीआयएने आर्बेन्झचे प्रागतिक सरकार मारेकऱ्यांच्या साहाय्याने बंड करून उलथवून टाकले होते. ते बंड मोडून काढण्यासाठी डॉक्टर असलेल्या ‘चे’ने हाती शस्त्र घेतले. तेथून तो मेक्सिकोत निसटून गेला आणि तिथे त्याची फिडेलशी भेट झाली. पहिल्या भेटीतच फिडेलचा विश्वास संपादन करून त्याने क्यूबाच्या क्रांतीशी आयुष्यभराची बांधिलकी पत्करली. देशाच्या बाहेरून लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या पथकात तो डॉक्टर म्हणून सामील झाला. पण थोड्याच अवधीत बंडखोर लष्कराचा आघाडीचा कमांडर बनला. इतकंच नव्हे, तर तो जिवंतपणीच गनिमी युद्धतंत्रातील एक दंतकथा बनून गेला.

क्रांतीनंतर ‘चे’ने क्रांतिकारी सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या स्वीकारल्या. नॅशनल बँकेचा अध्यक्ष, उद्योगमंत्री म्हणून काम तर केलेच; पण युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील देशोदेशीच्या राजधान्यांत क्यूबाचा सतत भटकणारा राजदूत, अल्जियर्स ते न्यूयॉर्कपर्यंतच्या अगणित आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील क्यूबाचा प्रवक्ता म्हणूनही अथक श्रमत राहिला. यातील काही भेटी व्यापार आणि राजनैतिक करारांसाठी केलेल्या खुल्या आणि अधिकृत असायच्या; आणि त्यातूनच सोव्हिएत युनियन आणि समाजवादी देशांसोबत क्यूबाचे बहुआयामी संबंध प्रस्थापित होऊन दृढ झाले. तर काही भेटी या साम्राज्यवादाविरुद्ध ठिकठिकाणी विविध क्रांतिकारी आघाड्या खोलण्यासाठी गुप्तपणे दिलेल्या असायच्या. त्यापैकी बोलिव्हियात क्रांतिकारी युद्ध छेडण्यासाठी दिलेली भेट सर्वांत महत्त्वाकांक्षी होतीच, पण ती अखेरचीही ठरली. तिचा उद्देश बोलिव्हियापुरता मर्यादित नव्हता. तेथून क्रांती अर्जेंटिनामध्ये पसरवायची होती. पण ती भेटच दुदैवी ठरली. त्याच्या गनिमी लढाईसाठी उभारलेल्या तळावर सीआयएच्या नेतृत्वाखालील बोलिव्हियन सैन्याच्या तुकडीने हल्ला करून तो उदध्वस्त तर केलाच, पण त्यातच ‘चे’ची निर्घृण हत्या करण्यात आली.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

एक अतिशय खळबळजनक आणि चित्तथरारक घडामोडींनी भरलेलं कृतिशील क्रांतिकारकाचं आयुष्य तर ‘चे’ जगलाच, पण तो आपल्या पाठीमागे समृद्ध अशा वैचारिक वारसादेखील ठेवून गेला आहे. त्यातील बरेच लिखाण स्पॅनिशमध्ये असून ते अजून इतर भाषांमध्ये अनुवादित झालेले नाही. त्याची जबरदस्त चिकित्सक अभ्यासू वृत्ती आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेची झलक दाखवणारे दोन लेख आपण या पुस्तिकेत प्रकाशित करत आहोत. दोन्ही लेख विशिष्ट हेतूने लिहिलेले असल्याने त्यातील आशयाला त्या उद्दिष्टांची चौकट लाभली आहे. पण त्यात समाविष्ट असलेल्या ऊर्जस्वल कल्पना आणि विचारांचे त्याच्या विचारसरणीत कित्येक वर्षे थैमान चालू होते आणि त्यांची बीजे आधीच्या कित्येक लेखांत आणि भाषणांत आढळून येतात. ‘बंडखोर लष्कराचे आमाजिक आदर्श’ (१९५९), ‘क्यूबा : ऐतहासिक अपवाद की वसाहतवादविरोधी लढ्यातील अग्रदल?’ (१९६१), ‘क्रांतिकारक डॉक्टर’ (१९६०), ‘तरुण कम्युनिस्ट बनताना’ (१९६२) हे आणि इतर कित्येक लेख आणि भाषणे अतिशय संस्मरणीय ठरले आहेत. त्याविषयी खूप बोलले गेले आहे आणि पुढेही बोलले जाणार आहे.

आपण त्याच्या ‘त्रिखंडाला दिलेला संदेश’ या लेखापासून सुरवात करू या. क्यूबाने आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकतील देशांची एक ‘त्रिखंड परिषद’ भरवण्यात पुढाकार घेतला होता. ३ ते १५ जानेवारी १९६६च्या दरम्यान हवानामध्ये. त्या परिषदेत ८२ देशांतून ५१२ प्रतिनिधी आणि २७० अभ्यागत एकत्रित आले होते. १५ जानेवारी या परिषदेच्या अखेरच्या दिवशी ‘OSPAAAL’ ही आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील जनतेच्या एकजुटीची संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेने तिन्ही खंडांच्या कानाकोपऱ्यात चालू असलेल्या साम्राज्यशाहीविरोधी लढायांच्या बातम्या जगातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी ‘ट्रायकॉन्टिनेन्टल’, म्हणजे ‘त्रिखंड’, हे बुलेटिन सुरू केले. शोषित आणि दडपलेल्या देशांतील साम्राज्यवादविरोधी विचारवंतांच्या लिखाणाचे ते व्यासपीठच बनले.

या पहिल्या त्रिखंड परिषदेच्या संघटन समितीचे अध्यक्षस्थान भूषवले होते, मोरोक्कोच्या मेहदी बेन बर्का या महान मार्क्सवादी साम्राज्यवादविरोधी नेत्याने. परिषदेचे महत्त्व विषद करताना ते म्हणाले, “साम्राज्यशाहीविरोधी संघटनांची हवाना येथील ही बैठक अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. कारण ती सहमती आणि एकजुटीची निदर्शक आहे; जागतिक क्रांतीच्या समाजवादी ऑक्टोबर आणि तिसऱ्या जगातील राष्ट्रीय मुक्तीलढा या दोन समकालीन विस्तीर्ण प्रवाहांचा तो संगम आहे; आणि या दोन्ही क्रांत्यांची मूस असलेल्या क्यूबात ती भरत आहे.”

आपल्या युगातील साम्यवाद आणि साम्राज्यवादविरोध हे सूत्र घेऊनच या दोन प्रवाहांतील द्वंद्वात्मक नात्यांवर ‘चे’ गव्हेराने केलेले विचारमंथन आपल्याला या दोन लेखांत आढळून येईल.

हवाना येथे ही परिषद होत असताना ‘चे’ आफ्रिकेतील क्रांतिकारी लढ्याच्या मोहिमेत आकंठ बुडालेला होता. त्याने आपला संदेश या परिषदेसाठी नव्हे, तर वरील नियतकालिकाच्या १६ एप्रिल १९६७ रोजी निघालेल्या शुभारंभाच्या अंकाआठी लिहिला होता. त्या लेखाला स्वतः ‘चे’ने दिलेले शीर्षक होते – ‘दोन नव्हे, तीन नव्हे . . . अनेकानेक व्हिएतनाम : हाच आपला परवलीचा शब्द.’ दुसरा लेख होता मार्च १९६५ रोजी ‘मार्चा’ या युरग्वेच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला – ‘समाजवाद आणि क्यूबातील माणूस’ हा.

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘त्रिखंडाला संदेश’ या लेखात भांडवल आणि साम्राज्यवादाला मूठमाती देण्यासाठी जागतिक क्रांतिकारी उठावासाठी शस्त्र हातात घ्या, अशी हाक त्याने दिली होती. ही हाक देताना तो म्हणतो : “साम्राज्यशाही ही भांडवलशाहीची अंतिम अवस्था असून ती जागतिक व्यवस्था आहे. त्यामुळे जागतिक लढाईच तिचा पराभव करू शकेल… चला, खरा कामगारवर्गीय आंतरराष्ट्रीयवाद उभा करू या. चला, कामगारवर्गाचे सैन्य उभे करू या.”

दुसऱ्या ‘समाजवाद आणि क्यूबातील माणूस’ या लेखात क्यूबातील क्रांतिकारी बदलावर चिंतन आहेच, पण त्याचबरोबर कम्युनिझमचा, साम्यवादाचा अर्थ काय यावरील सखोल मननही आहे. साम्यवादामुळे उत्पादन व्यवस्था आणि वर्गसंबंध यांच्यात मूलभूत परिवर्तन होतेच, परंतु मुख्यतः माणसात आमूलाग्र परिवर्तन होते. ‘चे’ म्हणतो, “क्रांतिकारकांची सर्वोच्च आकांक्षा असते : आपल्या परात्मतेतून मानव मुक्त झाला आहे, हे पाहण्याची . . . सामाजिक जीव म्हणून व्यक्तीला सर्वंकष जाणीव प्रापत होईल, परात्मतेचे साखळदंड तुटले की, मानवतेचा संपूर्ण परिपोष होईल. मुक्त झालेल्या श्रमशक्तीद्वारा खऱ्या मानवी स्वभावाची पुनस्थापना होईल.”

यातील काही परिच्छेद वाचताना ‘चे’ जणू मार्क्सच्या १८४४च्या संहितेतील काही परिच्छेदांचे पुनर्लेखनच करत असल्याचा भास होतो. ते नुसते पुनर्लेखन नाही, तर त्याविषयी एक आग्रहही जाणवतो, ते स्वप्न याचि देही पाहण्याचा. ते आव्हान तातडीने स्वीकारून साध्य करण्याचा आग्रह. ते प्रत्येकात आणण्याची शक्यता क्यूबन क्रांतीने खुली केली आहे, आणि ती शक्यता त्रिखंडातील मुक्तिलढ्यांच्या रूपात आकारत आहे, याची त्याला खात्री आहे.

‘त्रिखंडाला संदेश’ची सुरुवातच शांततेविषयीच्या चिंतनाने होते. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाल्यानंतरच्या वीस वर्षांत गोडवे गायल्या गेलेल्या तथाकथित ‘शांततामय सहअस्तित्वाच्या’ संकल्पनेवर, तिचा थेट उल्लेखही न करता, तो कडाडून हल्ला चढवतो. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासतांच्या दरम्यान युद्ध झाले नाही, याची नोंद घेत असतानाच लेखाच्या आरंभीच्या काही परिच्छेदातच एका अध्याहृत प्रश्नाची त्याने चर्चा केली आहे : दोन महासत्तांमध्ये थेट युद्ध झालेले नाही म्हणजे खरोखरच जगात ‘शांतता’ आणि ‘शांततामय सहअस्तित्व’ नांदते आहे काय? हा प्रश्न तो विचारतो. इतकच नव्हे, तर त्याहीपुढे जाऊन त्याने विचारलेला प्रश्न आहे, साम्राज्यवादाशी ‘शांततामय सहअस्तित्व’ राखणे खरोखर शक्य आहे का? साम्राज्यशाही हीच या जगावर कायमच युद्ध लादणारी शक्ती नाही काय? त्यासाठीच आपल्या लेखाच्या आरंभीच तो दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच सुरू झालेल्या कोरियन युद्धाची चर्चा करतो. त्याच्याच शब्दांत सांगायच, तर ‘युनोचा बदनाम झेंडा हातात नाचवत अमेरिकेच्या लष्करी नेतृत्वाखाली डझनभर देशांनी कोरियावर आक्रमण केले.’ त्या युद्धात अमेरिकेने आपले वीस लाख सैनिक तैनात केले होते, ६,३५,००० टन वजनाचे बॉम्ब टाकले होते, त्यात ३२,५५७ टन वजनाचे नापाम हे विषारी बॉम्ब होते!

व्हिएतनामविषयीच्या चिंतनाच्या सुरुवातीलाच ‘चे’ त्या देशाला तीन खंडांतील फान्स, जपान आणि अमेरिका या तीन साम्राज्यवादी देशांशी युद्ध करावे लागल्याची नोंद घेतो. दुसऱ्या महायुद्धात सर्व देशांनी जेवढ्या वजनाच बॉम्ब वापरले त्याहून जास्त वजनाचे बॉम्ब अमेरिकेने व्हिएतनामवर टाकल्याची आपण नोंद घेतली पाहिजे. इंडो-चीनचा परिसर हा त्या काळातील अंतर्विरोधाचा केंद्रबिंदू असला, तरी दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या जगभरच्या दडपशाहीची उदाहरणे म्हणूनच ‘चे’ कोरिया आणि व्हिएतनाम यांचा उल्लेख करतो. खरे तर, अमेरिका आणि तिची मित्र राष्ट्रे देशोदेशांवर करत असलेली बेमुर्वत आक्रमणे पाहता, त्यांच्या युद्धखोरीने जणू तिसरे महायुद्धच छेडल्यासारखे होते. दोन महासतांच्या शांततामय सहअस्तित्वाच्या कालखंडात हे तिसऱ्या जगावर लादलेले युद्ध होते.

‘चे’चा हा युक्तिवाद म्हणजे तत्कालीन समाजवादी जगाचे पुढारपण करणाऱ्या देशांवरील सूचक पण प्रखर वैचारिक हल्लाच होता. ते देश व्हिएतनामच्या पाठीशी उभे रहायला अपुरे पडले होते, याची ती नोंद होतीच; तसेच, या साम्राज्यवादी युद्धाच्या काळात झालेल्या चीन-सोव्हिएत दुफळीमुळे निर्माण झालेल्या भयानक परिणामणांची चिकित्साही होती. कुणा एका घटकाला उदेशून न करता ‘चे’ जणू त्यांची कानउघाडणी करण्यासाठीच एक सर्वसाधारण सल्ला देतो : “आक्रमणाला बळी पडलेल्यांना आपण सुयश चिंततो की नाही, हा प्रश्न गैरलागू आहे. आपण त्याचे भागधेय आपलेही मानतो का मानत नाही हा मुद्दा आहे. मृत्यू येवो अथवा यश, आपण त्याला अखेरपर्यंत साथ दिली पाहिजे.” हाच मुद्दा आणखी विशद करताना तो म्हणतो :

“अमेरिकन साम्राज्यवाद स्वभावतःच आक्रमक आहे. त्याची महाभयानक गुन्हेगारी कृत्यं जगभरात ठायी ठायी दिसत आहेत. मित्रांनो, तो गुन्हेगार आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. पण गरज पडली तेव्हा व्हिएतनामला समाजवादी जगाचा अतूट हिस्सा करण्यात चालढकल केलेल्यांच्या अपराधाचं काय? जागतिक युद्ध पेटण्याचा धोका होता, हे खरंच; पण साम्राज्यवादालादेखील काही निर्णय घेणं भाग पडलं असतंच की. एकमेकांना शिवीगाळ करत आणि दुसऱ्याला अडकवण्यासाठी आपळे रचत भांडणाऱ्यांच्या पारड्यातही अपराधाचं माप टाकायला हवंच – जे भांडण समाजवादी जगाच्या दोन बड्या सत्तांनी बऱ्याच दिवसांपासून चालवलं आहे.

आपण एका प्रश्नाचं प्रामाणिक उतर दिलं पाहिजे : व्हिएतनाम एकाकी पडलाय, की नाही? एकमेकांशी भांडणाऱ्या दोन शक्तीच्या मध्ये तोल आवरत राहायची कसरत त्याला करावी लागतेय, की नाही?”

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

दोन भांडणाऱ्या सता म्हणजे सोव्हिएत युनियन आणि चीन हे उघड आहे. त्यांच्यात निर्माण झालेल्या दुफळीमुळे जागतिक कम्युनिस्ट चळवळच कमजोर झाली. ही केवळ ‘चे’ याची भूमिका नव्हती. त्याआधी हवाना विद्यापीठाच्या प्रांगणात १९६५ मध्ये बोलताना फिडेल म्हणाला होता :

“…समाजवादी कुटुंबाच्या अंतरंगात पडलेली दुफळी अगदी उत्तर व्हिएतनामवर हल्ले होत असूनही सांधली गेलेली नाही. ही दुफळी साम्राज्यशाहीच्या पथ्यावर पडत आहे, याविषयी कुणाला संशय आहे काय? साम्राज्यवादी शत्रूच्या विरोधात संयुक्त आघाडी झाली असती, तर जगाच्या त्या भागात हल्ले आणि हस्तक्षेप करायचं त्यांना धाडस झालं नसतं, याविषयीही कुणाला संशय आहे काय?”

खुद्द क्यूबाला जरी अमेरिकन साम्राज्यशाहीपासून थेट आणि भयंकर धोका असला, तरी एका भ्रातृभावी समाजवादी देशावर योग्य आणि आवश्यक टीका करण्याने एकजुटीला छेद जायचे कारण नाही, या विषयी फिडेल आणि चे यांच्या मनात बिलकूल शंका नव्हती. आक्रमणाचा बळी असलेल्या देशाशी एकजूट दाखवण्यातून त्यांच्याविषयी आत्मभाव व्यक्त होतोच, परंतु त्याच्या लढ्यात उतरून त्याचे भागधेयही आपल्या शिरावर घ्यायची तयारी हवी; व्हिएतनामचे संरक्षण करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर साम्राज्यशाहीचा पराभव करण्यासाठी ‘साम्राज्यवादी शत्रूविरुद्ध संयुक्त आघाडी’ करणे गरजचे आहे, यावर ‘चे’ आणि फिडेल यांचे ठाम एकमत होते. त्यातूनच ‘चे’ने त्रिखंडाला दिलेल्या संदेशाचे आशयसित्र सिद्ध झाले :  ‘दोन, तीन… अनेकानेक व्हिएतनाम’ निर्माण करण्याचा आग्रह. त्रिखंड परिषदेचा आणि तिने निर्माण केलेल्या संस्थांचा उद्देशही तोच होता : या तीन खंडात साम्राज्यशाहीविरुद्ध सशस्त्र लढा उभारण्याची व्यूहरचना. त्यामुळे साम्राज्यवाद्यांना आपले सैन्य जगात ठिकठिकाणी विखरून टाकावे लागले असते; त्यांची अर्थव्यवस्था धोक्यात येईल इतकी युद्धाची किंमत त्यांना मोजावी लागली असती; आणि परिणामी क्रांतीच्या शक्तीपुढे गुडघे टाकायची साम्राज्यशाहीवर पाळी आली असती.

अर्थात, हे आव्हान काही सोपे नाही, याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. साम्राज्यशाहीविरोधी आघाड्यांना मृत्यू आणि शोकांतिकांना सामोरे जावे लागले असतेच. हे विचार कवळ ‘चे’पुरते मर्यादित नव्हते. त्रिखंड परिषदेच्या समारोपाच्या भाषणात फिडेल हेच म्हणाला होता : “क्यूबन क्रांतिकारकांसाठी साम्राज्यशाहीशी लढण्यासाठी जग हीच रणभूमी आहे… जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात लढणाऱ्या क्रांतिकारक आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी हाक दिल्यास क्यूबन योद्धे तिला प्रतिसाद देतील… हवाना जाहीरनामा म्हणतो त्याप्रमाणे क्रांती करणे हेच प्रत्येक क्रांतिकारकाचे कर्तव्य आहे आणि ते नुसत्या शब्दांत व्यक्त करणे नव्हे, तर कृतीत उतरले पाहिजे.”

अशी आघाडी उघडण्यासाठी बोलिव्हियाला प्रस्थान ठेवत असतानाच ‘चे’ने हे लेख लिहिलेले आहेत. आपल्या विचारांसाठी आपण आपले प्राण पणाला लावत आहोत, याची त्याला स्पष्ट जाणीव होती. त्यामुळे त्याचा शेवटही एखादा मृत्यूगीतात शोभणारा आहे. उघड्या डोळ्यांनी मृत्यू कवटाळण्यासाठीच तो निघाला होता. त्याची पूर्वसूचना त्याने खालील शब्दांत व्यक्त केली आहे : ‘‘जेव्हा केव्हा आपण आपलं रक्त शिपून आपल्याश्या केलेल्या भूमीवर अखेरचा श्वास घेऊ, तेव्हा आम्ही हे व्रत अंधपणे स्वीकारलं नव्हतं, आम्ही स्वतःला कामगारवर्गाच्या महान सैन्यातील शिपाईच समजतो हे जगाला ओरडून सांगू… आमची हरेक कृती ही साम्राज्यशाहीविरुद्ध वाजवलेली दुंदुभीच असेल, अमेरिका या मानवतेच्या जिवावर उठलेल्या शत्रूविरुद्ध जनतेनं उभारलेल्या एकजुटीचा पोवाडा असेल. जेव्हा केव्हा युद्ध दत्त म्हणून आमच्यासमोर उभं ठाकेल, तेव्हा आम्ही त्याचं स्वागतच करू, पण तेही आमच्या युद्धगर्जना स्वागतशील कानावर पडल्या आहेत आणि नवनवे हात आमच्या हातातील शस्त्र घ्यायला उत्सूक झाले आहेत, नवनवे सैनिक मशिनगनच्या लयीवर उच्चरवात मृत्यूगीत गाऊ लागले आहेत, आसमंत भेदणारे विजयघोष करू लागले आहेत याची खातरजमा करूनच.”

‘समाजवाद आणि क्यूबातील माणूस’ या आपल्या दुसऱ्या लेखाच्या सुरुवातीला क्यूबातील क्रांतीच्या बांधणीचा काही तपशील ‘चे’ मांडतो. आणि ती मांडणी दोन पानातच संपवतो. लेखाच्या उर्वरीत सर्व भागात तो क्रांतिकारी प्रकल्पाच्या गाभ्याविषयी, म्हणजे साम्यवादाविषयी, कम्युनिझमविषयी, सखोल चर्चा करतो. आधीच्या काही लेखांमध्ये ‘चे’ने क्यूबन क्रांती आणि मार्क्सवाद यांच्यातील नात्याची एक अनोखी मांडणी कलेली आढळते.

‘पहिल्या लॅटिन अमेरिकन युवा परिषदे’पुढील भाषणात तो म्हणतो : “ही क्रांती मार्क्सवादी आहे असे म्हणायचे असेल – आणि नीट ऐका, मी मार्क्सवादी म्हणतोय – तर ते केवळ मार्क्सने दाखवलेला मार्ग क्रांतीला स्वतःच्या अनुभवातून, स्वतः विकसित केलेल्या पद्धतीतून सापडला, म्हणून. आम्ही इथे व्यवहारात राबवत आहोत तो मार्क्सवाद असेल तर तो आम्हाला इथेच आढळला आहे, म्हणून तो मार्क्सवाद आहे. त्या काळात माओ त्से तुंग याची एक पुस्तिका आमच्या हाती पडली. (आणि आमच्या लक्षात आलं), गनिमी युद्धाविषयी आजवर जे लिहिलेलं आहे, ते (न वाचताही) लोकांनी आचरणात आणले होते. त्यांनी आपले गनिमी युदतंत्र शत्रूपासून शिकून विकसित केले होते. हुकूमशाही वापरत असलेले तंत्र समजून घेऊन त्यांनी आपले तंत्र विकसित करून आत्मसात केले होते.”

आपल्या ‘क्यूबन क्रांतीच्या विचारसरणीविषयी नोंदी’ या लेखामध्ये तो लिहितो : “आपण सक्रिय क्रांतिकारक लढे उभे करत असताना शास्त्रज्ञ मार्क्सने सांगितलेल्या नियमांनुसारच प्रत्येक व्यवहार करत असतो. क्रांतीच्या मार्गावरून वाटचाल करत असताना आपण केवळ शास्त्रीय मार्क्सने केलेल्या भाकितानुसारच कृती करत असतो. क्यूबन क्रांतीच नेते काय दावा करतात, सैद्धान्तिक दृष्टीकोनातून ते हे क्रांतीचे नियम पाहतात की नाही याच्या निरपेक्ष रीतीने त्या घटना-प्रसंगांमध्ये मार्क्सवादाचे नियम कार्यरत असतातच…”

हे परिच्छेद असाधारणरीत्या मर्मग्राही आहेत. कामगारवर्गीय क्रांतीचा मार्क्सवादी सिद्धान्त ठाऊक नसतानाही कृती करणारे ‘चे’, फिडेल आणि त्यांचे सहकारी ‘व्यावहारिक क्रांतिकारक’ होते; तसेच, माओच्या गनिमी युद्धाच्या सिद्धान्ताविषयी पूर्ण अनभिज्ञ असूनही गनिमी काव्याने लढणारे सैन्य उभे करून अजाणता कामगारवर्गीय क्रांतीच घडवून आणत होते. किंवा त्यांच्या क्रांतिकारी व्यवहारानेच त्यांना मार्क्सवादी सिद्धान्ताचे वस्तुनिष्ठ सत्य प्रतीत झाले, असे म्हणता यईल. विकसित भांडवली विकासाच्या सर्व शक्यता संपल्या आणि ती अंतर्विरोधांनी पूर्णतः विद्ध झाल्यावरच क्रांती शक्य होते, या मार्क्सच्या सिद्धान्ताला चिकटून राहिल्याबदल ‘चे’ पाश्चात्य मार्क्सवाद्यांना ‘समाजवाद आणि क्यूबातील माणूस’मध्ये दोष देतो. त्याच वेळी लेनिनने या संकल्पनेच्या जागी साम्राज्यशाही आणि तिच्या साखळीतील कमजोर दुव्याचा सिद्धान्त प्रस्थापित केला होता, याची तो खास नोंद घेतो. याचा अर्थ यापुढे समाजवादी क्रांती विकसित भांडवली देशांऐवजी शोषित-पीडित देशांमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु त्याचबरोबर गरीब, पीडित अशा क्यूबासारख्याया देशाने क्रांती केल्यानंतर त्याला प्रगत पाश्चात्य देशांना गाठण्यासाठी ‘समाजवादी प्राथमिक संच्या’चे धोरण राबवणे भाग आहे का? की त्याला दुसरा काही मार्ग स्वीकारावा लागेल? हे प्रश्न महत्त्वाचे होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘चे’च्या या लेखांतील युक्तिवादानुसार त्रिखंडातील क्रांत्यांना एक आव्हान स्वीकारावे लागेल : फारसा औद्योगिक विकास आणि म्हणावी तशी ऐहिक समृद्धी नसतानाही चांगल्या दर्जाचे, समतानिष्ठ आणि सभ्य समाज उभारणे शक्य आहे. आपल्या पारंपरिक समजानुसार उत्पादनाच्या शक्ती आणि संबंध हे मूलभूतरीत्या बदलता येतीलच. जनतेच्या ऐहिक सुरक्षिततेसाठी, अत्यावश्यक सुखसोयीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी ते आवश्यक आहेच. पण भांडवलशाहीमुळे खुंटलेल्या, वाढ खुंटून विकृत अथवा नष्ट केलेल्या, पण एक समाजवादी मानवी समाज उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत स्वाभाविक अशा मानवी क्षमता पुनर्प्राप्त करण्यासाठीही हा बदल आवश्यक आहे.

या दृष्टीने पाहू जाता मानवी स्वभाव विकृत करणे, हा साम्राज्यवादाचा घोर अपराध आहे. तो त्याचा अंगभूत दोष आहे. मानवी स्वभावात दुसऱ्याप्रत एक उपजत आत्मीयता, खुलेपणा असतो. हा उपजत गुण साम्राज्यशाही दडपते. त्याजागी आत्मकेंद्री, अधाशी आणि इतरांच्या सुखदुःखाप्रत आस्था नसलेली व्यक्ती निर्माण करते. सामाजिक माणसाच्या जागी एकमेकांशी कसलाही आत्भाव नसलेल्या, त्यांच्याविषयी परकेपणा बाळगणाऱ्या व्यक्तीचा जमाव निर्माण करते. ज्याला ‘चे’ ‘नवा पुरुष आणि नवी स्त्री’ म्हणतो, अशा अपरात्म व्यक्तीच्या मानुष समाजाची धारणा करणे, हे समाजवादी व्यवस्थेपुढील मध्यवर्ती कार्य आहे.

व्यक्तींना ऐहिक सुरक्षिततेचा आधार नसल्यास व्यक्तीव्यक्तीमध्ये, एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी नैतिक संबंध प्रस्थापित होणे, प्रस्थापित झाल्यास ते टिकणे दुरापास्त असते, याची ‘चे’ गव्हेराला एका बाजूला जाणीव होती. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, पोषण या बाबी प्रत्येक व्यक्तीला समान प्रमाणात उपलब्ध होणे क्रमप्राप्त असते. क्यूबन समाजाच्या बांधणीत यावर कटाक्ष ठेवण्यात आलाच. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय भ्रातृभाव, एकजूट आणि उत्तरदायित्व यांची कासही सोडायची नाही असा क्यूबाचा निश्चय आहे. ‘चे’ गव्हेराची मर्मदृष्टी म्हणजे राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद यांची द्वंद्वात्मक घडण करणारी मूसच होती, हे कदापि विसरता येणार नाही.

..................................................................................................................................................................

ही पुस्तिका विनामूल्य वाचनासाठी क्लिक करा -

http://www.mahacpim.in

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 30 November 2020

वाचकहो,
येवडं शिरेस म्हट्रीयल वाचल्यावर वाईच हसाया नगं? ह्यो घ्या बुऱ्हाण वाण्याचे पिताश्री मुझफ्फर वाणींची मुलाखत ( ०३:१३ मिनिटे, साल २०१५) : https://www.youtube.com/watch?v=CGi9eK-MPFo
उपरोक्त मुलाखत २०१५ सालची म्हणजे बुऱ्हाण वाणी मरण्याच्या आगोदरची आहे. वाचा आणि पोट धरधरून हसा. तर हिच्यात हसण्यासारखं काय आहे, असा प्रश्न तुम्ही विचाराल. त्याचं उत्तर आहे की उपरोक्त मुलाखत बुऱ्हाण वाणी मरण्यापूर्वीची आहे. त्याला टपकावल्यानंतर बघा त्याचे पिताश्री काय म्हणाले ते :

बुऱ्हाणला भारताकडून क्रिकेट खेळायचं होतं व भारतीय सैन्यात रुजू व्हायचं होतं
.
फार छान. ही अक्कल वेळीच यायला होती ना? असो. या भेकडास भारतीय सैन्यात जायचं होतं, म्हणे. हसूया आता पोट धरधरून.
-गामा पैलवान
तळटीप : भारतीय प्रसारमाध्यमं कशी जिहादी मनोवृत्तीची आहेत ते वाचण्यासाठी हा लेख बघा : https://www.dailyo.in/politics/how-media-built-the-legend-of-burhan-wani-kashmir/story/1/11655.html


Gamma Pailvan

Sat , 31 October 2020

एजाज अहमद,

खाली गिरीश खरे यांचे पर्तिसाद पाहून लई प्येटलो. म्हनलं घवाऱ्याची घंटा बडवायचीच आता.

हां, तर काय झालं गव्हारा सापडला तेव्हा? हे महाशय त्यांच्या पन्नासेक कॉम्रेडांच्या टोळीसह बोलीव्हियातल्या एका पर्वतराजीत लपले होते. त्यांच्यापैकी एक जण फितूर होऊन पळाला. मग अशा वेळेस गव्हाऱ्याने लपण्याची जागा बदलणं अपेक्षित होतं. त्याऐवजी त्याने आपल्या टोळीस रात्रीच्या मुक्कामास एका खोलगट ठिकाणी ( युरो/चुरो घळई ) ठेवलं. यांस सुरक्षेचे मूलभूत नियम धाब्यावर बसवणं म्हणतात. आणि हा म्हणे क्रांतिकारक! उंबरखिंडीत कारतलबखान उझबेग असाच उंचावरच्या खोल ठिकाणी सापडलेला, आठवतंय? मग शिवाजीराजांनी जे काही केलं तिला लढाई म्हणवंत नाही. ती मोगलांची केलेली एकतर्फी लांडगेतोड होती.

हाच प्रकार सदर घळईत सुरू झाला. बोलिव्हियाच्या सैन्याने ( रेंजर बटालियन क्रमांक २ ने) त्या तथाकथित क्रांतिकारकांचा घटकाभरांत फडशा पाडला. त्या वेळेस गव्हारा काय करीत होता? तर हे साहेब घळईच्या वर येऊन शरणागती पत्करण्यात मग्न होते. मात्र तत्पूर्वी आपल्या कनिष्ठांना मरेपर्यंत लढा म्हणून आदेश द्यायला विसरले नाहीत. काय लायकीचा नेता आहे हा गव्हारा? ओळखा पाहू!

हा गव्हारा इतका थोर स्वाभिमानी होता की पकडला गेल्यावर अजीजीने वागून सैनिकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करीत होता. न जाणो सुटकेचा मार्ग सापडायचा. पण दुसऱ्या दिवशी बोलिव्हियाच्या शासनाकडनं उडवायचा आदेश आला. या दहशतवादी माथेफिरू गव्हाऱ्यास टपकावायला प्रत्येक सैनिक उत्सुक होता. अखेरीस सदर कारवाईत ज्या कमांडरचे तीन सैनिक कामी आले त्या कमांडरला हा मान मिळाला. त्याने मोठ्या आत्मीयतेने गव्हाऱ्यास यमसदनी पाठवलं.

असो.

हा गव्हारा ज्या पद्धतीने शरण आला ती लाचार पद्धत काश्मिरातले दहशतवादी अनुसरतात. त्याचं ठाशीव उदाहरण म्हणजे बुऱ्हाण वाणी. या इसमाकडे कुठल्याही प्रकारचं शस्त्र चालवायचं कौशल्य नव्हतं. त्याचप्रमाणे तो सैनिकी कारवायांत आजिबात प्रशिक्षित नव्हता. मग त्याला कमांडरचं पद कशासाठी दिलं होतं? ते फक्त मशीन गन्स सोबत टकाटक फोटो काढून फेसबुकवर डकवण्यासाठी होतं. दिसायला चिकनाचोपडा थोबडा होता ना, पोरी पाघळायच्या मग. पोरींना भुलवणं, झुलवणं हे मुख्य काम. अशा 'निवडलेल्या' काश्मिरी तरुणी नंतर दहशतवाद्यांना उपभोगार्थ उपलब्ध व्हायच्या.

एका सुरम्य दिवशी की रात्री बुऱ्हाण वाण्याचं असंच प्रेमळ चित्रसत्र ( फोटो सेशन ) चालू होतं. त्या वेळेस नेमकी भारतीय सैन्याची धाड पडली. ते कोणाला सोडणारेत होय! त्यांनी दहशतवाद्यांना परलोकात धाडण्यास सुरुवात केली. बुऱ्हाण वाण्यास हत्यार वापरता येत होतं कुठे? समजा येत जरी असतं तरी भारतीय सैन्यासमोर किती वेळ टिकाव धरणार ! चड्डी पिवळी झाली. तो भारतीय सैनिकांच्या समोर लोटांगण घालून दयेची भीक मागू लागला. रडून भेकून आपण अतिरेकी नाही याची कशीबशी साक्ष पटवू लागला. पण त्याच्या ष्टोऱ्यांनी सद्गदित व्हायला भारतीय सैनिक पाघळलेल्या तरुणी थोडेच होते ! त्यांनी नितांतसुंदर पद्धतीने पोरींच्या प्याऱ्यास अल्लाचा प्यारा बनवला.

सांगायचा मुद्दा काये की हा गव्हाऱ्या आणि हा बुऱ्हाण वाणी पडले एकाच जातीचे भेकड प्राणी.

बुऱ्हाण वाण्याच्या दयेच्या भिकेची बातमी एकूण एक वर्तमानपत्रांनी दाबून टाकली. गूगलवरही मिळंत नाही. घ्यायचा तो बोध वाचक घेतीलंच.

आपला नम्र,
-गामा पैलवान


Girish Khare

Thu , 15 October 2020

तुमच्या लाडक्या चे गव्हेराने कृष्णवर्णीय लोकांविषयी काय म्हटले होते बघा--- "The black is indolent and a dreamer; spending his meager wage on frivolity or drink" . असला वर्णद्वेषी माणूस तुमचा आदर्श कसा असू शकतो?


Udta Dukkar

Sun , 11 October 2020

चे आणि फिडेल ने केलेला लैंगिक धमाल यावर काही वाचायला मिळेल का ? फिडेल तर लिंगपिसाट होता ना ? आणि चे ने फायरिंग squad खाली पाडलेले मुडदे ? हे इतके महान असते तर कुबा इतका भिकार्डा देश कसा असता? बहुतेक कम्युनिस्ट देशातून मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसायात स्त्रिया जातात हे खरे आहे का ? राज्यकर्त्यांचा त्यात कट असतो का ? कि याचे सरकारी अधिकारी असतात ? उडता डुक्कर


Girish Khare

Sun , 11 October 2020

एवढा कडक गांजा कुठून मिळतो हो? इतके पानभर कुंथला आहात पण त्यात चे गव्हेराने फायरींग स्क्वाडमध्ये हजारो लोकांना ठार मारले होते याचा उल्लेखही नाही. फिडेल कॅस्ट्रो, चे गव्हेरा हा दक्षिण अमेरिका खंडातले मोठे दहशतवादी होते. ज्या देशात जन्माला आलेले १०% देशाबाहेर जातात असा एकमेव देश आहे आणि तो म्हणजे क्युबा. आणि ते करून दाखवले फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यासारख्या ह*मखो*नी.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......