पुस्तक हे एकच असतं. प्रत्येकाचं एक. आपल्या घरी आपलं विशिष्ट पुस्तक आलं की आपण त्या पुस्तकात प्रवेश करतो आणि ते आपल्यात
ग्रंथनामा - झलक
सचिन कुंडलकर
  • ‘मोनोक्रोम’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Wed , 26 April 2023
  • ग्रंथनामा झलक मोनोक्रोम Monochrome सचिन कुंडलकर Sachin Kundalkar कोबाल्ट ब्ल्यू Cobalt Blue समलिंगी संबंध Same-Sex Relationships

‘मोनोक्रोम’ ही कादंबरी-नाटककार आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी नवीकोरी कादंबरी नुकतीच पपायरस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालीय. ‘कोबाल्ट ब्लू’ ह्या बहुचर्चित कादंबरीनंतर वीस वर्षांनी प्रकाशित होणारी कुंडलकर ह्यांची ही दुसरी कादंबरी. ‘कोबाल्ट ब्लू’पेक्षा जास्त व्यापक कथासूत्र आणि मानवी वेदनेची खोल जाणीव बाळगणारी. ‘मोनोक्रोम’ ह्या दीर्घ कथासूत्राचा हा विलक्षण असा पहिला भाग - ‘रेशीम मार्ग’ आहे. नुकताच २३ एप्रिल रोजी ‘जागतिक ग्रंथ दिन’ साजरा झाला. त्यानिमित्तानं या आगळ्यावेगळ्या कादंबरीतला हा पुस्तकांविषयीच्या मजकुराचा संपादित अंश...

..............................................................................................................................................................

तो प्रवासामध्ये वाचत होता, ती कादंबरी बसमध्ये विसरला होता. त्या विसरलेल्या पुस्तकाचं पुढे काय होईल, ह्याचा विचार निशिकांतने तापलेल्या माळरानावर एकट्याने उभं राहून केला. कुणाला सापडलं आपलं पुस्तक आणि त्याला वाचनाची आवड असेल, तर तो ते ठेवून घेईल स्वतःकडे. पुस्तकाच्या मधल्या काही पानांवर आपल्या बोटांचे पुसट डाग आहेत, ते त्याला दिसतील. काही वेळा कुशीत घेऊन झोपतो आपण पुस्तक. आपण पुस्तकावर आपलं नाव लिहीत नाही. तो माणूस मिळालेलं पुस्तक आपलंसं करून स्वतःजवळ ठेवू शकेल. तो काही वेळा पुस्तकाकडे पाहून कधीही भेट न झालेल्या आपला विचार करेल. ‘कोण असेल हा माणूस? ज्याने हे पुस्तक घ्यायचं ठरवलं?’ आपल्याविषयी अनोळखी व्यक्तीने हळुवार विचार करावा म्हणून काही माणसं आवडती पुस्तकं सोडून देत असावीत. एकदा हरवलेल्या पुस्तकाची दुसरी प्रत आपण कधीच विकत घेत नाही. पुस्तक हे एकच असतं. प्रत्येकाचं एक. आपल्या घरी आपलं विशिष्ट पुस्तक आलं की, आपण त्या पुस्तकात प्रवेश करतो आणि ते आपल्यात. एखादं पुस्तक हरवल्यावर दुसरी प्रत आणली, तर तिच्यात पहिल्या प्रतीमध्ये झाला तसा प्रवेश होत नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्याने फार पूर्वी त्याचा पुस्तकाचा खण सोडून दुसऱ्याकडे निघून गेलेलं पुस्तक, अनेक महिन्यांनी एका अनोळखी मुलाच्या हातात पाहिलं होतं. सिनेमाचं तिकीट घ्यायला तो रांगेत त्या मुलाच्या मागे उभा होता. शाळा नुकताच संपवलेला. उकाड्याने ग्रासलेला. त्या मुलाच्या हातात निशिकांतने पूर्वी शाळेतील मित्राला वाचायला दिलेली आणि कायमची हरवून गेलेली जेम्स बाल्डविनची कादंबरी होती ‘जीओवान्नीज रूम’. निशिकांतने नीट इंग्रजी वाचता न येण्याच्या वयात एका बाजूला डिक्शनरी घेऊन सावकाश आणि परिश्रमपूर्वक ती वाचून काढली होती. मित्राने त्याच्याकडून वाचायला नेल्यावर कुठून कुठून प्रवास करत परत अनेक वर्षांनी त्याच्यासमोर पुन्हा आली होती. पानं मुडपून गेलेली. निष्काळजी माणसांकडून वाईट वागणूक मिळालेली. तिकीट काढायला पुढे उभ्या असलेल्या ह्या मुलाने हे पुस्तक निवडलं, म्हणजे त्याचं आणि माझं मन सारखं असणार. आज मला पाहायचा आहे, तोच सिनेमा त्यालाही पाहायचा आहे. माझ्यासारखाच एकट्याने बसून.

त्या दोघांनी उगीच काही जुजबी गप्पा मारून तिकिटं घेऊन सिनेमा सुरू व्हायच्या आधी एकत्र चहा प्यायला. दुपारी चहाच्या दुकानाबाहेरील कट्ट्याच्या फरशीला हवाहवासा वाटणारा उष्मा होता. आजूबाजूला चहा पिणारे त्या संध्याकाळी येऊ घातलेल्या वळिवाच्या थंडाव्याची गुपचूप स्वप्नं पाहत होते. तुझ्या हातातलं पुस्तक एके काळी माझं होतं, हे त्या मुलाला अजिबात न सांगता झाडांच्या गर्दीत वेढलेल्या त्या मुलाच्या घरी निशिकांत सिनेमा पाहून झाल्यानंतर गेला होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

त्या मुलाचे आईवडील दोघंही कामाला महिनाभर बाहेरगावी गेले होते, ह्याचं निशिकांतला अप्रूप वाटलं. त्यांनी ते सबंध मोठं घर त्या एकट्या मुलावर सोडून दिलं होतं. मी काही त्यांचा पूर्ण वेळचा व्यवसाय नाही, असं म्हणणारा त्याच्याच वयाचा मुलगा. त्याला राहायला वेगळी खोली दिली होती आणि हवं तेव्हा यायला-जायला घराची स्वतंत्र किल्ली. आल्याचा चहा करता येणारा, स्वतःची मतं असलेला, डिस्क प्लेअरवर इगोर स्ट्राव्हीन्स्कीचं संगीत ऐकणारा, त्याच्याच भाषेत बोलणारा मुलगा. आपल्या शहरात कित्येक अनोळखी सुंदर देश वसले आहेत, ह्याची जाणीव करून देणारा. खाजगीपणा बहाल करणं म्हणजे दुसऱ्याला एकटं सोडणं नाही. खाजगीपणाचा आदर करणं म्हणजे दुसऱ्याने त्याचा एकांत उपभोगताना काय केलं, ह्याची माहिती न विचारणं. माझे आईवडील मला आठवड्यातून एकदा फोन करतात. ते आणि मी लांब असलो तरी निवांत असतो. एकमेकांच्या फार चौकश्या करत बसत नाही. माझ्यावर विश्वास आहे त्यांचा, असं तो म्हणाला.

निशिकांतने स्वतःचं घर आठवून, संपूर्ण ओशाळून जाऊन त्या मुलाला अनावश्यक प्रश्न विचारणं बंद केलं. आपण आपलं घर सोडून जितक्या जास्त अनोळखी माणसांना न घाबरता भेटत राहू तितके आपण शांत आणि विस्तृत होत राहू, ह्याची जिथे पहिल्यांदा जाणीव झाली अशी ती भेट.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आपलं पुस्तक आपल्यासोबत आणि त्या मुलासोबत खोलीत आहे, हे जाणवून निशिकांत संकोचून गेला होता. पुस्तक ऐकत होतं. पाहत होतं. स्ट्राव्हीन्स्कीच्या अगोड संगीताने तयार होणारी अनोळखी आंदोलनं मनात सावकाश पसरू लागलेली. मग अंधारून आलं होतं आणि पाऊस सुरू झाला होता.

आज आपण बसमधून उतरल्यावर एखादी वाचनाची आवड नसलेली बाई जर आपण बसलो होतो, त्या सीटवर जाऊन बसली, तर ती आपण विसरलेलं पुस्तक सीटच्या खाली भिरकावून देईल. मग तिथून ते पुस्तक जाईल कचऱ्यात, तिथून ते पोहोचेल रद्दीवाल्याकडे. आणि मग मात्र आपल्या सहवासाने मळलेल्या त्या पुस्तकाचे देखणे कागद एका वाचनअप्रिय बाईच्या करणीने सुटे सुटे होऊन गावांत आणि शहरांत विविध कामांना लागतील.

‘मोनोक्रोम’ (भाग १ - रेशीम मार्ग) – सचिन कुंडलकर

पपायरस प्रकाशन, कल्याण (प.) | पाने – ११८ | मूल्य – ३२५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......