तिरंगा आपल्या देशाच्या हृदयाची स्पंदने दर्शवतो. कारण तो ‘विश्वासाच्या मागा’वर विणला गेला आहे...
ग्रंथनामा - झलक
आर. वेंकटरामन
  • भारताचा तिरंगा ध्वज
  • Tue , 23 August 2022
  • ग्रंथनामा झलक तिरंगा Tiranga Tricolour राष्ट्रध्वज National Flag काँग्रेस Congress पं. नेहरू Pandit Nehru

राष्ट्रीय ध्वज हा देशाचे सगळ्यात पवित्र चिन्ह असते. तो संपूर्ण देशाचे, त्याच्या सन्मानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. तो जेव्हा दोरी ओढून वर चढवला जातो, तेव्हा प्रत्येक नागरिकाचे हृदय अभिमानाने भरून येते. आपला राष्ट्रीय ध्वज – तिरंगा याचा संक्षिप्त इतिहास ‘आपला राष्ट्रीय ध्वज’ या पुस्तकात वाचायला मिळतो. हे लेफ्टनंट कर्नल कर्मवीर सिंह यांनी लिहिलेले (मराठी अनुवाद – अंजली नारगोलकर) पुस्तक १९९०मध्ये केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांनी आटोपशीर प्रस्तावना लिहिली आहे. ती संपादित स्वरूपात ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी…

.................................................................................................................................................................

भारतीय तिरंगा केवळ राष्ट्रीय ध्वज म्हणूनच कार्य करत नाही, तर तो आपल्या देशाच्या हृदयाची स्पंदने दर्शवतो. आपल्या भव्य, उदात्त भूतकालाची आठवण करून देतो. त्याच वेळेसच तो प्रत्येक देशभक्त व्यक्तीच्या मनात भविष्य काळाबद्दलच्या आशा जागवतो. असे होणे साहजिकच आहे, कारण हा झेंडा ‘विश्वासाच्या मागा’वर विणला गेला आहे.

जेव्हा शूर, प्रतापी मॅडम कामा आणि त्यांच्या हद्दपार केलेल्या क्रांतिकारकांच्या गटाने १९०७ साली युरोपियन भूमीवर तीन-रंगी राष्ट्रीयवादी झेंडा उभारला, तेव्हा त्याचे चिन्ह लोकांच्या मनावर उमटले. ‘वंदे मातरम्’ हे जादूचे शब्द त्याच्या मध्यावर छापले होते. त्यामुळे हा ध्वज व भारतीय प्रेक्षक यांच्यामध्ये लगेच एक खास दुवा निर्माण झाला. १९२१मध्ये बेझवाडा (आत्ताचे विजयवाडा) येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस सत्रामध्ये हा ध्वज महात्माजींना देण्यात आला. त्यांनी पिंगल वेंकय्या यांनी बनवलेल्या नकाशात काही महत्त्वाचे बदल केले आणि त्यानंतर काँग्रेसने हा ध्वज स्वीकारला. मध्यावर चक्र असलेला हा ध्वज लवकरच आपल्या देशाच्या कल्पनाशक्तीने व्यापला गेला. साध्या खादीचा हा ध्वज प्रत्येक शहर, खेडे, लहान खेडे यातील छोट्या-मोठ्या खाजगी घरांवर व रस्त्यातील कोपऱ्यांवर फडफडायला लागला.

‘विजयी विश्व तिरंगा प्यारा

झण्डा ऊँचा रहे हमारा’

(आपल्या प्रिय तिरंग्याने सारे विश्व जिंकावे,

आमचा झेंडा उंच रहावा)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हे सर्व उप-खंडामध्ये ऐकू येऊ लागले. काँग्रेस अध्यक्षाने प्रत्येक सत्राच्या वेळी शिष्टाचाराला साजेसा उभारलेला ध्वज हा एक अविस्मरणीय प्रसंग होता आणि त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात आशा निर्माण होत होती की, लवकरच इंग्रजांच्या ध्वजाला दूर करून हा तिरंगा दिल्लीमध्ये उभारला जाईल. जगातील ज्या भागात मी वाढलो, तेथे देशभक्त कवी सुब्रमण्य भारती यांचे गाणे प्रत्येकाच्या ओठी होते-

‘आपल्या मातृभूमीच्या महान झेंड्याकडे पहा.

त्याच्याखाली इमानी आणि विश्वासू देशभक्त आहेत.

जे हा ध्वज उंच फडकत ठेवण्यासाठी

त्यांच्या प्राणाचे बलिदान देण्यास तयार आहेत.

आपल्या मातृभूमीच्या महान झेंड्याकडे लक्ष द्या.’

भारतीचे स्वप्न व्यर्थ नव्हते. अनेक भारतीयांनी- ज्यात तरुण आणि वृद्ध, पुरुष व स्त्रियांचा समावेश आहे, हा झेंडा उंच करून नेला आहे. ते निर्भयपणे मिरवणुकीत जात असत व लाठीचा मार अगदी मरेस्तोवर झेलत. तामिलनाडूतील ‘तिरूपर’ कुमार नावाच्या शूर तरुण गिरणी कामगाराचे उदाहरण अविस्मरणीय आहे. त्याने कामगारांच्या चळवळीत ब्रिटिश राज्याला आव्हान दिले. स्वतःच्या हाताने तिरंगा वाहून त्याने लाठ्यांच्या भडिमाराला आमंत्रणच दिले. त्याचा प्राण गेला तरी ध्वज त्याच्या हातात घट्ट राहिला होता.

१९३०च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या व १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळेस तिरंग्याला अबाधित ताकद, शक्ती मिळाली. धैर्य व शूर कृत्यास हा जणू परवाना मिळाला. तो हातात धरलेला असो वा सार्वजनिक व्यासपीठावर उभारलेला असो, स्वातंत्र्यप्राप्ती होण्यास आवश्यक तो विश्वास व निर्भयपणाचे प्रतीक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचे आपले ध्येय जाहीर केले. ‘चलो दिल्ली’ ही त्यांची जादूमय घोषणा त्यांच्या अनेक पुतळ्यात व रंगीत चित्रात चिरस्थायी केली आहे. यांमध्ये नेताजींनी आपल्या हातात तिरंगा उंच धरला असून ते स्वतंत्र भारताच्या भावी राजधानीकडे बोट दाखवत आहेत, असे वर्णन केले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व सायंकाळी घटना समितीने एक सभा भरवली. तिचे अध्यक्ष व स्वतंत्र भारताचे भावी राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वतंत्र भारताचा नवीन ध्वज कसा असावा, यासाठी ही सभा बोलावली होती. अध्यक्षांखेरीज त्या सभेमध्ये अब्दुल कलाम आझाद, सी. राजगोपालचारी, सरोजिनी नायडू, के. एम. पन्नीकर, के. एम. मुन्शी आणि बी. आर. आंबेडकरांसारख्या थोर व्यक्ती होत्या. यात डॉ. राजेंद्र प्रसादांनी काँग्रेसने अनेक वर्षं उपयोगात आणलेला झेंडाच ‘राष्ट्रीय झेंडा’ म्हणून निवडला जावा, अशी तीव्र भावना देशात असल्यामुळे असे सुचवले की, त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. ही सूचना मान्य झाली.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

२२ जुलै १९४७ला जवाहर लाल नेहरूंनी हा झेंडा औपचारिकपणे घटना समितीला सादर केला (त्याचे सभासद असलेले) सर्वपल्ली राधाकृष्णन, सरोजिनी नायडू आणि महम्मद सादुला यांनी या सूचनेला मान्यता दिली. राधाकृष्णन त्यांच्या अविस्मरणीय भाषणात राष्ट्रीय ध्वजाच्या रंगांबद्दल म्हणाले -

“येथे हिरवा रंग आहे – जमिनीशी आपले नाते, ज्यावर सर्व जग अवलंबून असते, त्या झाडांशी आपले नाते (हा रंग दर्शवतो), या हिरव्या पृथ्वीवर आपण स्वर्ग उभा केला पाहिजे. जर हे साहस करण्यात आपणास यश हवे असेल, तर आपण सत्य (पांढरा) याचा आधार घेतला पाहिजे. सदाचार (चक्र) आचरणात आणला पाहिजे. आत्मनियंत्रण व त्याग (केशरी) या पद्धती अंगीकारल्या पाहिजेत. हा ध्वज आपल्याला सांगतो, नेहमी दक्ष रहा. नेहमी गतिशील रहा, उन्नती करा. स्वतंत्र-लवचीक, दयाळू, योग्य अशा लोकसत्ताक समाजासाठी कार्य करा, ज्यामध्ये ख्रिश्चन, शीख, हिंदू, मुसलमान बौद्धधर्मीय सर्वांना सुरक्षिततेचा आसरा मिळेल.”

आपले पहिले प्रिय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्याच्या तटावर हा ध्वज पहिल्यांदा फडकावला. हा एक महान क्षण होता. त्या वेळी इतिहासाबद्दल नेहमीच जागरूक असणाऱ्या जवाहरजींनी नेताजींचे लाल किल्ल्यावर ध्वज फडकवण्याचे स्वप्न होते, त्याचा उलेख केला. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने आलेल्या जनसमुदायाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

त्यामुळे आपला ध्वज म्हणजे आशीर्वाद व सावधानता दोन्ही आहे. ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, त्या सर्वांचे आशीर्वाद यात आहेत. तसेच योग्य (न्याय्य) व एकत्रित भारताचे त्यांचे जे स्वप्न होते, त्याची हा ध्वज जाणीव करून देतो. आपल्या देशाच्या सुरक्षेवर, ऐक्यावर व एकात्मतेवर आलेल्या गंभीर आव्हानाना आपण तोंड देत आहोतच.

या झेंड्याने आवाहन केले आहे- ‘न्याय्य व शांततापूर्ण देशाची स्थापना, ज्यात कोणत्याही जाती, संप्रदाय व लिंगाचे लोक आनंदाने राहतील.’ या आव्हानासाठी आपण स्वतःला वाहून घेतले पाहिजे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......