‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ : तुमच्या हाती दिली जात आहेत, ती सवंग गाणी नाहीत, ही आहे एक हेलावत्या हृदयातील आरोही!
ग्रंथनामा - झलक
मेधा पाटकर 
  • ‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 06 January 2023
  • ग्रंथनामा झलक अस्वस्थ क्षणांच्या नोंदी Aswastha Kshananchya Nondi हेरंब कुलकर्णी Heramb kulkarni मेधा पाटकर Medha Patkar

शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा ‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ हा सामाजिक कवितांचा कवितासंग्रह नुकताच पुस्तक मार्केट प्रकाशनाच्या वतीने  प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…  

............................................................................................................................................

प्रिय वाचकहो, 

तुमच्या हाती दिली जात आहेत, ती सवंग गाणी नाहीत... नाही केवळ समीक्षक टिपण्णी, ही आहे एक हेलावत्या हृदयातील आरोही! आपल्याच अवतीभोवती देशभरातल्या दडलेल्या की, गाडलेल्या वस्तीत घडणाऱ्या घटना, सारेच पाहत असताना, कधी मन भरून येते, कधी आक्रोशाने सुन्न होते. मात्र या घडामोडींच्या बातम्यांना वर्तमानपत्रांत मिळालेला अवकाशही रद्दी बनून नजरेआड होतो. खबर एक बखर बनते. इतिहासातील अत्याचार, अन्याय भोगणाऱ्या लेकरांचे गिरणगावातील श्रमिकांचे, बेड्यावरच्या लेकुरवाळ्या पारधीबाईचे काय झाले? याची दखल न घेता काळ पुढे सरकतो. अशा वास्तवाची नोंदच नव्हे तर पोलखोल करणारे साहित्य मात्र भविष्याशी इतिहासाला जोडत राहते. वाचकांना हाती घेता देत राहते आठवण, करत राहते आवाहन परिवर्तनाचे!

अनेक वर्षांपासून मी अनुभवते आहे हेरंब कुलकर्णींच्या मनातला दर्द! त्यांची एकेका घडामोडीवरची कविता ही मनावर पडलेली छायाच नव्हे, तर त्यांची आभाळमायाही प्रकटत असते. एक शिक्षक बालकांच्या भवितव्याबाबत सतत चिंतीत हेरंबभाऊ प्रबोधक बनले आहेत. हेच त्यांच्या कवितेतील गर्द शब्दांकनातून कळू शकते. त्यांची भ्रमंती दारिद्र्याच्या शोधायात्रेतून सुरू झाली. नंतर जी फार पुढे जाऊन, खोलात उतरून आता शोध घेत निघाली आहे, लोकशाहीवरील आक्रमणाच्या, देशातील जन जनांना भोगाव्या लागणाऱ्या विषमतेचा! हेरंबभाऊंचा अभ्यास हा त्यांच्या काव्याचा पाया आहेच, पण त्यांची संवेदना ही त्याचा गाभा आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आज संवाद झाले आहेत अधिकतर भ्रामक. त्यातून काय पुढे येईल, ते सत्य असेल का, हे कोणी सांगू शकेल का! अशा परिस्थितीत युवांच्या हातीच काय, बुद्धीतही whatsapp असते, whats down नसते. म्हणूनच तर हेरंबभाऊंच्या या कवितांचे मोल आहे. एक एक घटनेला धरून त्यांनी उघडीनागडी विषमता ही कोट्यवधी जनतेला नागवते. बेघर बेरोजगार करते आणि नेतागिरीही त्यावरच पोसली जाते. हे आपल्या नेमक्या शब्दसंभारातून पुढे आणले आहे. ही सामाजिकच नव्हे, तर मानवीय बांधीलकी  वाचकांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत आहे! 

‘इंडिया’ आणि ‘भारत’ यामधील अंतर जेव्हा बीभत्स स्वरूपात आकडेवारीने अनेक अर्थाशास्त्रीही आपल्यासमोर मांडत आहेत. तेव्हाच त्यामध्ये भिंतीत उभे चिरडून टाकावे, तसे बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर, सारे कष्टकरी कसे विन्धले जात आहेत, हे समजणे गरजेचे नाही का? त्यांच्यावर आलेल्या वंचना, शोषण व व्यवस्थेनेच घडवलेल्या आत्महत्या नव्हे, हत्यांबाबत आपले मन द्रवते का? त्यांच्या वाहत्या अश्रूंमध्ये आपणास संविधानही वाहून जाताना दिसते का? 

महिलांवर, अल्पसंख्याकांवर जात्यंधतेची विविध रूपे भोगणाऱ्या दलितांवर आजही चोरीच्या फासात अडकवल्या जाणाऱ्या फासेपारध्यांवर शेकडो किलोमीटर पायी फोड घेऊन चालण्यास मजबूर अशा प्रवाशी मजुरांवर जे काही हिंसक हल्ले होत आहेत, त्यांच्या मुलाशी असलेली राजकीय असंवेदना जाणवते का? विस्थापितांनी प्रस्थापितांना आव्हान देऊन हक्क मागितला तर त्यांच्यावरच उलटणाऱ्या, त्यांना जायबंदी करू पाहणाऱ्या हुकूमशहांसमोर हिंमतीने आपण लिहितो का? बोलतो तरी का? या प्रश्नांची उत्तरे द्यायला भाग पाडणाऱ्या या कविता, केवळ आविष्कार नव्हेत, आव्हान देत आहेत. आपल्या वेदना संवेदनेला!!! ‘रस्त्यावर सैतान फिरताना मित्रांनो आपण सारे कुठे होतो? हा प्रश्न निश्चितच घेरणारा आहे, प्रत्येकाच्या निष्क्रियतेला!

आज अभिव्यक्तीवर ‘हल्लाबोल’ होतो आहे. माध्यमांची खरेदी-विक्री सुरूच आहे! राजकीय सत्ता अमृतमहोत्सवी ‘आझादी’वर तुटून पडत आहे. अशा काळात, अशा वातावरणात राजकारण्यांवर प्रश्नांच्या फैरी हिंमतीने डागणारे हेरंबभाऊ शिंदेसाहेबांपासून राहुल गांधींपर्यंत, सगळ्यांना सभ्य शब्दांतून दाखवून देत आहेत गरज राजनीतीत परिवर्तनाची!

लोकशाही त्यांच्या काव्यातून बोलते आहे. कर्जमाफीसाठी लढणाऱ्या बळीराजाचा हमीभाव न मिळाल्याने जाणारा बळी उद्योगपतींच्या अब्जावधी लुटीपुढे आक्रोशतो आहे. दिवाळीच्या दिवशीही रोजीरोटीची झालेली होळी करोडोंना अंधारात ठेवते, हे भयाण वास्तव या कविता मोजकेपणेच मापते आहे! 

नर्मदा ते मणिपूरच्या आंदोलनकारी संघर्षाने हृदय द्रवणारे असे कवीसुद्धा ‘आंदोलनजीवी’च मानायला हवेत. हेरंबभाऊ कवितांच्या पलीकडे करोनाग्रस्त विधवांपासून आजही हल्ले भोगणाऱ्या हुतात्मा गांधींपर्यंत, सर्वांची लेखनाद्वारे साथ देत आहेत. अनेक सामाजिक कार्य व कार्यकर्त्यांची जगाला लेखनाद्वारा ओळख करून देणारे हेरंब कुलकर्णी स्वत:चीही बिरादारी, विचारांची मांदियाळी आपणासमोर मांडत आहेत. 

वाचकहो, त्यांनी उघडून ठेवलेली ही कवितेची विराणी केवळ सोबत घेऊन समीक्षा नको, आपल्याला मिळावी दीक्षा व शिक्षा. या साऱ्या मानववादी मानवधर्मी कवितांमधून – सक्रिय होऊन कलमच नव्हे, तन‘man’ उभारण्याची!

हीच तर आहे आव्हानात्मक अपेक्षा, आपणा सर्वांकडून हेरंब कुलकर्णींची व माझीही...

‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ - हेरंब कुलकर्णी 

पुस्तक मार्केट प्रकाशन 

पाने – ७२ | मूल्य - १२५ रुपये.    

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......