वाचलीच पाहिजेत अशी काही पुस्तकं - भाग ४
ग्रंथनामा - झलक
टीम अक्षरनामा
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 01 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक

‘अक्षरनामा’वर दर शुक्रवारी मराठी पुस्तकांची परीक्षणे, त्यातील काही भाग किंवा संबंधित लेखकांच्या मुलाखती प्रकाशित होतात. एप्रिल व मे २०१८ या महिन्यांत ‘अक्षरनामा’वर आलेल्या पुस्तकांविषयी...

.............................................................................................................................................

‘होमो सेपिअन्स’ म्हणजे ‘शहाणा माणूस’! - युव्हाल नोआ हरारी

‘Sapiens: A Brief History of Humankind’ हे युव्हाल नोआ हरारी यांचं जगभरात गाजलेलं पुस्तक. ‘A Brief History of Time’ नंतर सर्वांत जास्त गाजलेलं पॉप्युलर सायन्सचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या जगभरात १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ३० हून अधिक भाषात अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वासंती फडके यांनी केला असून ते १० मे रोजी प्रकाशित होत आहे.

या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

खरं सांगण्यापूर्वीचं ‘स्वगत’ - करण जोहर

मी जी निर्मिती करतो, त्याच्या फळाची  मी फार पर्वा करत नाही. पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल. जर सिनेमा हिट झाला, तर छानच! पुढच्या कामाला सुरुवात करा. आता एका अर्थानं यश आणि अपयश या बाबतीत माझ्या भावना बधिर झाल्या आहेत, असं म्हणता येईल.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4370

.............................................................................................................................................

‘चित्रभास्कर’ : चंदावरकरांच्या लेखनाचं भाषांतर करताना  - आनंद थत्ते

अरुण खोपकरांनी मला शिकवलं आणि त्यांना भास्कर चंदावरकरांनी. भाषांतर करताना मला असं वाटत होतं की, ‘पंडितजी मला शिकवताहेत. म्हणताहेत हे असं बघ, हे असंही बघता येतं. असा विचार करून बघ, जमतंय का.’ भास्कर चंदावरकरांना मी कधी भेटलो नाही. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं देखील नव्हतं. पण हे भाषांतर करत असतानाच्या दीड-दोन वर्षांच्या काळात मला त्यांचा स्नेहल सहवास लाभला. त्यांच्या निकटच्या सहवासात हे दिवस आनंदात गेले.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4288

.............................................................................................................................................

‘गावकळा’चं ‘ग्रामस्वच्छता’ हे मुख्य कथानक आहे. आणि हेच तिचं वेगळेपण आहे. ऋषिकेश देशमुख

‘गावकळा’ या कादंबरीचं ‘ग्रामस्वच्छता’ हे मुख्य कथानक आहे. आणि हेच तिचं वेगळेपण आहे. ही कादंबरी ग्रामीण वास्तवाचा वेध घेणारी आहे. सरकारी योजना राबवण्यासाठी किती पराकोटीचा संघर्ष करावा लागतो, याची कल्पना ‘गावकळा’ वाचल्यानंतर येते. गावातील लोकांच्या सुष्ट व दुष्ट वृत्ती-प्रवृत्तींचं दर्शन या कादंबरीतून घडतं.

गावकळा : प्रदीप धोंडीबा पाटील, राजहंस प्रकाशन, पुणे

पाने : २४८, मूल्य : २६० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4049

.............................................................................................................................................

‘लोकमान्य ते महात्मा’ हा प्रचंड मोठ्या विद्वत्तेचा विषय आहे!  - रामचंद्र गुहा

‘लोकमान्य ते महात्मा’ हा प्रचंड मोठ्या विद्वत्तेचा विषय आहे. तो गहन तर आहेच, पण त्याचा आवाकाही तेवढाच मोठा आहे. मराठीतून अभय दातार यांनी अत्यंत कौशल्यानं या दोन खंडांतील अभ्यासाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या पैलूंचा विस्मयचकित करणारा अभ्यास दिसून येतो. हा अभ्यास समाजशास्त्रीय आहे. कारण तो जाती, समाज आणि प्रदेश यांतील जातीय राजकारणावर संशोधन करतो.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4415

.............................................................................................................................................

‘सल्तनत-ए-खुदादाद’ : धर्मवेड्या, जमातवादी प्रचारास ठोस आव्हान देणारा ग्रंथ  - राम पुनयानी

सरफराज अहमद यांच्या पुस्तकानं विकृतीच्या ढिगाऱ्यातून खरा टिपू शोधून काढण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. अत्यंत नेटक्या, नेमक्या व ठोस संदर्भाच्या आधारानं टिपूचं व्यक्तित्व, कार्य,  राज्यकारभार, धोरणं, दृष्टिकोन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व महत्त्व जाणणं, यांसह आपल्या राज्याच्या विस्ताराबरोबरच सुस्थीर शासन, शांततापूर्ण प्रजाजीवन याबाबत तो कसा दक्ष व व्यापक क्षमतांचा धनी होता याचे अनेक पदर उलगडले आहेत.

या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4284

.............................................................................................................................................

तुकोबा अभंगांतून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे हे पुस्तक उदाहरण म्हणून पाहावे  - भास्कर हांडे

तुकोबांचे काव्य व त्यावरून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे विश्लेषण व विवेचन, तसेच तुकोबांच्या अभंगातील आशयाचा परामर्ष घेणे, हे दुहेरी पैलू ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकात आले आहे. आधुनिक चित्रकलेत हे आव्हानात्मक आहे, हे चित्र-शिल्प तयार करताना जाणवत होते. समकालीन आधुनिक कलाविश्वात काम करताना त्याची जाणीव होती. तुकोबांच्या गाथेतील चित्र-शिल्प संकल्पनेची सुरुवात फारच उत्साही वातावरणात झाली.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4422

.............................................................................................................................................

‘उष्टं’ : हा परिवर्तनाचा आलेख आहे… - कुणाल रामटेके

भारतीय वास्तवातील ‘भंगी’ समाजाच्या जीवनावर आधारित अत्यंत भेदक वास्तव चित्रण ‘उष्टं’च्या निमित्तानं वाचकांपुढं येतं. जातीयवादी व्यवस्थेनं थोपलेलं अत्यंत किळसवाणं असं हे जीवन वास्तव मात्र अजूनही बदलू शकलेलं नाही, हे विशेष. मुळात, इथला ‘भंगी’ समाज ज्या परिस्थितीत जगतो, ते आजही इथल्या सर्वसामान्य समाजासाठी निव्वळ अकल्पनीय आहे. ‘उष्टं’च्या माध्यमातून या वास्तवाची किळस आल्याशिवाय राहत नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4337

.............................................................................................................................................

भारतीय समाजाला धार्मिक असहिष्णुता, अवैज्ञानिक विचारपद्धती आणि संकुचित मानसिकता यावर मात करावी लागेल - विभूती नारायण राय

जमातवाद हे कुठल्याही एका समुदायाचे लक्षण नव्हे. लहान-मोठे सारेच धार्मिक समुदाय या प्रवृत्तीला बळी पडत आले आहेत. भारतीय संदर्भात जमातवादाचे स्वरूप समजून घेण्यासाठी या उपखंडातील दोन सर्वांत मोठ्या धार्मिक समुदायांच्या - हिंदू आणि मुस्लिमांच्या - परस्परसंबंधांचा अभ्यास करणे हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. हिंदू आणि मुसलमान सारेच किंवा त्यांच्यातले बहुसंख्य लोक हे स्वभावत:च जमातवादी आहेत, असा याचा अर्थ नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4423

.............................................................................................................................................

तरंग अंतरंग - पर्यावरणाच्या प्रश्नांचं अचूक भान जागवणारं पुस्तक - वर्षा गजेन्द्रगडकर

समकालीन पर्यावरणाची चिकित्सा करणारं हे पुस्तक पर्यावरण अभ्यासक आणि विद्यार्थी, निसर्गप्रेमी, माध्यम प्रतिनिधी, या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्वाचं आहे. उत्तम आशयाला मिळालेली उत्तम निर्मितीमूल्याची जोड लक्षात घेण्याजोगी आहे. त्यामुळे मुखपृष्ठ आणि मांडणी करणारे राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांनाही श्रेय द्यायला हवं...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4414

............................................................................................................................................

‘साहेब माझा स्वतःवर नाही एवढा विश्वास तुमच्यावर आहे’! - प्रा. अविनाश कोल्हे

मोटारसायकल सुरू करताना कलाल तिला म्हणाले ‘हे बघ. ती संधी सोडू नको. आमच्यासारख्यांच्या नोकरीचा काही भरवंसा नसतो. आज इथे तर उद्या तिथे. आज मी इथे आहे. त्या प्रोजेक्टमधील लोकं माझ्या परिचयाचे आहेत. पटकन तुझे काम होर्इल आणि तुझा स्वतःचा ब्लॉक होर्इल. फारसा विचार करू नको. माझ्यावर विश्वास ठेव.’ ‘साहेब माझा स्वतःवर नाही एवढा विश्वास तुमच्यावर आहे’.

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4424

............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......