श्रीभाऊंसारखा दर्दी, नव्या विचारांचं स्वागत करणारा, आपल्या तरुण संपादकाच्या मागे भक्कमपणे उभा राहणारा आणि चांगल्या लेखनाला दाद देणारा संपादक यापुढे होणे नाही!

श्रीभाऊंसारख्या नामवंत संपादकाच्या मार्गदर्शनाखाली मला संपादनाचे धडे गिरवता आले. मी चार वर्षे त्रैमासिक स्वरूपातल्या ‘माणूस’चं संपादन केलं. श्रीभाऊंचे माझ्यावर खोल संस्कार आहेत. त्यामुळे आजही दिवाळी अंक चाळले आणि ढिसाळ संपादन दिसलं की, डोक्यात राग शिरतो. श्रीभाऊ ‘माणूस’च्या अंकांच्या अनुक्रमणिकासुद्धा किती काळजीपूर्वक तयार करत! त्यांच्या मते अनुक्रमणिका म्हणजे अंकात शिरण्याचा दरवाजा.......

‘ए स्मॉल फॅमिली बिझनेस’ : आर्थिक भ्रष्टाचाराच्या संदर्भात पूर्णपणे संवेदनाहीन झालेल्या माणसांचं, कुटुंबाचं आणि समाजाचं नाटक

आधुनिक शहरी जीवनात ‘आर्थिक भ्रष्टाचार’ (नैतिक भ्रष्टाचार नव्हे) अनेक प्रकारचा असतो आणि अनेक पातळ्यांवर घडत असतो. या मुद्दा या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. कथानक दिल्लीत घडतं. काळ आजचा. हा प्रयोग फार्सिकल असून हसवता हसवता गंभीर आशयाकडे नेतो. काळ ऐंशीच्या दशकातला आहे. तेव्हा भांडवलशाही, त्यातील सर्व पातळ्यांवरचा भ्रष्टाचार वगैरेंची चर्चा सुरू झाली होती. आता तर आपल्याला भ्रष्टाचाराबद्दल काहीही वाटत नाही.......

लेखक-कलाकार आणि त्यांना लगाम घालणारी शासनव्यवस्था, या दोन शक्तींत कायमच रस्सीखेच सुरू असते. म्हणूनच ‘बागी अलबेले’सारख्या कलाकृती सतत सादर होत राहिल्या पाहिजेत…

सामान्य दर्जाची कला समाजावर कितपत प्रभाव टाकू शकते? अशा कलांवर सरकारने बंदी घालावी का? यात सरकारात नोकरी करणाऱ्या नोकरशहांचा अहम गोंजारला जातो का? या नाटकात एक महत्त्वाचा संवाद आहे. ‘कलाकारों का कब्रस्तान’च्या दिग्दर्शकाला पोलीस इन्स्पेक्टर सांगतो- ‘नवीन नियमांप्रमाणे सत्य दाखवणे गुन्हा आहे. तुम्ही देशद्रोही आहात’. त्यावर दिग्दर्शक उत्तरतो- ‘आरसा तोडून कोणाचं भलं झालं आहे?’ .......

‘सिद्धार्थ’सारख्या तात्त्विक समस्येला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कादंबऱ्या एका वाचनात संपत नाहीत आणि समजतसुद्धा नाहीत. पण शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही कादंबरी आजही खिळवून ठेवते!

‘सिद्धार्थ’सारख्या कलाकृती सुबुद्ध वाचकांसमोर असंख्य प्रश्न उभे करतात. अशा प्रश्नांना गणितात असतात, तशी उत्तरं नसतात. या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला स्वतंत्रपणे शोधावी लागतात. शिवाय या उत्तरांत याचं उत्तरं बरोबर आणि त्याचं चुकीचं, असं काहीही नसतं. अशा आशयसूत्रावर जेव्हा कादंबरी संपते, तेव्हा वाचक स्वतःमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो.......

या पुस्तकामुळे पहिल्या घटनादुरुस्तीबद्दल इत्यंभूत माहिती उपलब्ध झालीच आहे, परंतु भारतीय प्रजासत्ताकाला नवे वळण देणाऱ्या झंझावाती पर्वाचे यथायोग्य दस्तावेजीकरणही झाले आहे!

नेहरूंनी पूरक आर्थिक धोरणं स्वीकारली नसती, तर भारतीय उद्योग कधीही सावरला नसता. जे १९९०च्या दशकात झाले, तेच १९५०च्या दशकात झाले असते. नेमका, हाच मुद्दा पहिल्या घटनादुरुस्तीच्या वेळीही होता. रांगणाऱ्या भारतीय प्रजासत्ताकाला, ज्याने नुकतीच देशाची रक्तरंजित फाळणी पचवली होती, ज्याला शेकडो निर्वासितांचे तातडीने पुनर्वसन करायचे होते, त्या प्रजासत्ताकाच्या नागरिकांना एवढे व्यक्तिस्वातंत्र्य देणे योग्य आहे का.......

घटना समितीने सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता. त्यामुळे जेव्हा दीड वर्षाच्या आत दुरुस्ती करण्याची वेळ आली, तेव्हा भुवया उंचावल्या गेल्या...

पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय १२ मार्च १९५१ रोजी आला आणि ‘जमीनदारी निर्मूलन कायदा’ घटनाविरोधी असल्याचे जाहीर झालं. काँग्रेस पक्षात नैराश्य पसरलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक विस्तृत टिपण तयार केलं. यात त्यांनी घटनादुरुस्तीच्या बाजूने मत दिलं. पटेलांनंतर केंद्रीय गृहमंत्री झालेल्या सी. राजगोपालचारींनी तर ‘न्याय्य बंधनांतील’ ‘न्याय्य’ शब्द काढून टाकावा, अशी शिफारस केली.......

घटना समितीने सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता. त्यामुळे जेव्हा दीड वर्षाच्या आत दुरुस्ती करण्याची वेळ आली, तेव्हा भुवया उंचावल्या गेल्या...

भारताची राज्यघटना विसाव्या शतकाच्या मध्यावर लिहिली गेली, तेव्हा जगातील सर्व महत्त्वाच्या देशांनी आपापल्या राज्यघटना लिहिल्या होत्या. आपल्या घटनासमितीने सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा तौलनिक अभ्यास केला होता. मात्र जेव्हा दीड वर्षांच्या आत दुरुस्ती करण्याची वेळ आली, तेव्हा भुवया उंचावल्या जाणे अगदी नैसर्गिक होते... अशा चित्तवेधक घटनांना कवेत घेणारे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेय.......

‘द काइट रनर’ बघताना मानवी जीवनात अपराधीपणा, विश्वासघात, नि:स्वार्थी प्रेम या भावनांचं केवढं महत्त्वाचं स्थान आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती येते!

एके दिवशी अमीरला त्याच्या वडिलांच्या अफगाणीस्तानातील मित्राचा, रहिमचा निरोप मिळतो. या भेटीत रहिम अमीरला जे सांगतो ते ऐकून अमीर अनेक पातळ्यांवर उदध्वस्त होतो. पहिलं म्हणजे अफगाणीस्तानचा त्याग करून अमेरिकेत आश्रय घेणं, यात मातृभूमीचा विश्वासघात आहे. हा धक्का अमीर कसाबसा पचवतो तर दुसरा धक्का त्याची वाटच बघत असतो. रहिम अमीरला सांगतो की, हसन त्याचा सावत्र भाऊ आहे. अमीरच्या वडिलांचे व हसनच्या आईचे संबंध असतात.......