‘काबुलीवाला’ : बिमल रॉय यांच्या या १९६१ सालच्या हिंदी सिनेमावर २०२३ साली हिंदी नाटक
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • बिमल रॉय यांच्या ‘काबुलीवाला’ हिंदी सिनेमाचं आणि त्यावर बेतलेल्या त्याच नावाच्या हिंदी नाटकाचं पोस्टर
  • Tue , 14 February 2023
  • कला-संस्कृती नाटकबिटक काबुलावाला Kabuliwala बिमल रॉय Bimal Roy रवींद्रनाथ टागोर Rabindranath Tagore

हिंदी चित्रपटसृष्टीत एकेकाळी मेहमूब खान (१९०७-६४) आणि बिमल रॉय (१९०९-६६) यांचा फार दबदबा होता.

‘अनमोल घडी’, ‘आन’, ‘अंदाज’ हे मेहबूब खान यांचे गाजलेले चित्रपट. १९५७ साली आलेल्या ‘मदर इंडिया’ने त्यांना भरपूर नाव मिळवून दिले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने २००७ साली भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट काढले.

दुसरीकडे बिमल रॉय! त्यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्दही अशीच देदीप्यमान होती. १९५५ साली आलेल्या त्यांच्या ‘देवदास’ने इतिहास घडवला. ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘दो बिघा जमीन’, ‘मधुमती’ हे त्यांचे गाजलेले इतर चित्रपट.

रिंकी रॉय-भट्टाचार्य यांनी वडिलांचं काम जतन करण्यासाठी १९९७ साली ‘बिमल रॉय फाउंडेशन’ स्थापन केलं. या फाउंडेशनचं हे रौप्य महोत्सवी वर्ष. त्या निमित्तानं अलीकडेच शर्मिला टागोर आणि सईद मिर्झा यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमात बिमल रॉय यांचं ‘काबुलीवाला’ हे हिंदी नाटक ‘इप्टा’तर्फे सादर करण्यात आलं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

‘काबुलीवाला’ ही गुरुदेव टागोरांनी १८९२ साली लिहिलेली मूळ लघुकथा. अफगाणिस्तानातून सुकामेवा विकायला कलकत्त्याला आलेला पठाण आणि एक चार-पाच वर्षांची हिंदू बंगाली मुलगी, यांच्या अनोख्या नात्यांवर ही कथा आहे. त्यावर बिमल रॉय यांनी १९६१ साली चित्रपट काढला. त्याचं दिग्दर्शन हेमेन गुप्ता यांनी केलं होतं. त्यातील पठाणाची प्रमुख भूमिका बलराज साहनी यांनी साकार केली होती. आता ‘इप्टा’ने याच चित्रपटावर दीड तासाचं त्याच नावाचं हिंदी नाटक सादर केलं आहे. चित्रपटावर आधारित असलेलं हे कदाचित पहिलंच नाटक असावं.

टागोरांची कथा तशी फार साधी आहे. त्या काळी भारताची सरहद्द अफगाणिस्तानशी भिडलेली होती. शिवाय पासपोर्ट, व्हिसा वगैरेंचे नियम आजसारखे एवढे कडक नव्हते. परिणामी अफगाणिस्तानातून अनेक पठाण भारतात व्यापारासाठी येत असत. असाच एक मध्यमवयीन पठाण- रहमत खान कलकत्त्याला येऊन सुकामेवा विकत होता. या दरम्यान त्याची ओळख पाच वर्षांच्या मिनी या मुलीशी होते. त्यासुद्धा याच वयाची मुलगी असते. व्यापारानिमित्त दूर देशी आलेल्या या पठाणाला मिनीमध्ये स्वत:ची मुलगी दिसते. रहमत खान नेहमी तिला भेटायला येतो आणि तिच्याशी गप्पा मारतो.

एकदा रहमत खानची व्यापारातील देवाणघेवाणीत बोलाचाली होते आणि तो एका व्यक्तीला जखमी करतो. परिणामी त्याला तुरुंगवास घडतो. मध्ये अनेक वर्षं जातात. रहमत खान तुरुंगातून सुटतो आणि मिनीला भेटायला येतो. त्या दिवशी तिचा विवाह असतो. रहमत खान मिनीला भेटतो, पण ती त्याला ओळखत नाही. मधल्या काळात ती या बालपणाच्या मित्राला विसरून गेलेली असते. रहमत खान मानसिक पातळीवर आणि आर्थिक पातळीवर उदध्वस्त होतो. मिनीचे वडील त्याला थोडे पैसे देतात आणि अफगाणिस्तानला परत जाण्यासाठी मदत करतात. अशी ही छोटीशी कथा.

बिमल रॉय यांनी यातील नाट्य, भावभावनांचे चढउतार आणि देशकालपरिस्थिती ओलांडून जाणारी माणूसकी अचूक हेरली आणि त्यावर अप्रतिम चित्रपट केला. त्यातील पठाणच्या भूमिकेतील बलराज सहानीचा अभिनय जेवढा गाजला, तेवढीच दोन गाणी गाजली होती. एक म्हणजे मन्ना डे यांच्या आवाजातील ‘ऐ मेरे प्यारे वतन…’ आणि दुसरं म्हणजे हेमंत कुमारच्या आवाजातील ‘गंगा आये कहाँ से, गंगा जाये कहाँ रे’…. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या पटकथेचे सहलेखक होते ‘रणांगण’कार विश्राम बेडेकर.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

चित्रपट आणि नाटक या माध्यमांत बरंच वेगळेपण आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नाटकात रंगमंचावरच सर्व घटना दाखवाव्या लागतात. चित्रपटांत ‘आउटडोअर शुटिंग’ करून जीवनदर्शन शक्य होतं. असं असूनही ‘इप्टा’ने या चित्रपटावर नाटक सादर करण्याचं आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीरित्या पेललंसुद्धा.

या नाटकाच्या नेपथ्याचा आधी विचार करावा लागतो. सिनेमात जे कॅमेऱ्यानं दाखवलं, ते काही प्रॉपर्टीच्या मदतीनं प्रेक्षकांना दाखवायचं होतं. ‘काबुलीवाला’चा प्रयोग शिवाजी पार्कच्या सावरकर स्मारकात झाला. हा रंगमंच बराच मोठा आहे. नेपथ्यकार रिंकी रॉय-भट्टाचार्य यांनी त्याचा खुबीनं वापरत करत कलकत्ता शहरातील एका सधन बंगाली घराचा हॉल उभा केला. दोन्ही विंगेतून पात्रं ये-जा करत होती. रंगमंचाच्या मागच्या बाजूला एका दरवाजा आणि एक लेव्हल दिली होती. त्यामुळे मिनीची आई माजघरातून रंगमंचावर ये-जा करू शकत होती. रंगमंचाच्या अगदी पुढल्या भागात सार्वजनिक बगिच्यात असतात, तसा एक मोठा बाकडं ठेवलं होतं. त्यावर बसून रहमत खान आणि मिनी गप्पा मारतात. मध्ये एक छोटी लेव्हल दिल्यामुळे मुख्य घर आणि बाकडं यातील नातं आणि अंतर स्पष्ट होत होतं. रंगमंचाच्या मध्यभागी एक मोठं टेबल होतं. त्यावर बसून मिनीचे लेखक वडील कथा लिहितात.

नाटकाच्या सुरुवातीला उच्चवर्णीय-मध्यमवर्गीय पती-पत्नीच्या घरगुती गप्पा दाखवल्या आहेत. या दरम्यान बडबडी, चुणचुणीत मिनी आणि घरातील एक खुळचट नोकर, ही पात्रं प्रेक्षकांसमोर येतात. मिनीच्या आर्इच्या बोलण्यातून समजतं की, तेव्हाच्या कलकत्त्यात लहान मुलं पळवून नेणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा स्थितीत घरी सुकामेवा विकायला आलेल्या रहमत खान या पठाणाशी मिनीची मैत्री होते. विशुद्ध प्रेमाचा भुकेला, मुलीच्या आठवणींनी त्रस्त असलेल्या रहमत खानला मिनीमध्ये त्याची मुलगी दिसते. हळूहळू त्यांची मैत्री रंगत जाते.

त्या काळी रहमत खानसारखे लोक दिलेल्या शब्दाला जागत असत. (इथं मला प्रकाश मेहराच्या ‘जंजीर’ चित्रपटातील एक दृश्य आठवलं. यात शेरखान या पठाणाच्या भूमिकेत प्राण आहे. इन्स्पेक्टर विजयला (अमिताभ बच्चन) दिलेल्या शब्दांनुसार प्राणने त्याचे जुगाराचे अड्डे वगैरे बेकायदेशीर धंदे बंद केलेले असतात. एका प्रसंगी प्राणला मोठ्या रकमेची गरज भासते. तो मारवाड्याच्या पेढीवर जातो आणि कर्ज मागतो. मारवाडी त्याच्याकडे तारण मागतो. त्या प्रसंगी प्राण त्याला सांगतो, ‘‘माझ्याजवळ तारण ठेवायला काही नाही. मात्र एक वस्तू आहे, ज्याची किंमत तुला करता आली तर कर. ती वस्तू म्हणजे ‘पठाणाचा शब्द!’ ”).

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

‘काबुलीवाला’ हे नाटक शोकांतिका-सुखांतिकेचा सुरेख संगम आहे. ही कथा ‘इप्टा’ने विलक्षण ताकदीनं सादर केली आहे. याचं श्रेय दिग्दर्शक रमेश तलवार यांना जातं. त्यांनी नेपथ्य, प्रकाशयोजना वगैरे नाट्यघटक योग्य प्रमाणात वापरले आहेत. मात्र खरी कमाल केली आहे रहमत खानच्या भूमिकेतील आसिफ शेख यांनी. मध्यमवयीन, प्रेमळ, दूर देशी आलेल्या मुलीसाठी जीव टाकणारा काबुलीवाला ज्या तरलतेनं त्यांनी सादर केला आहे, त्याला तोड नाही. इतर दोन महत्त्वाची पात्रं म्हणजे मिनीचे बाबा (निरज पांडे) आणि मिनी (अनम पांडे). अनम अतिशय सहजतेनं रंगमंचावर वावरते.

आपल्या समाजात एके काळी पठाण म्हटलं की, मूर्तीमंत क्रौर्य, भरमसाठ व्याजाचा दर आकारणारा वगैरे चित्रं मनात उमटायची. (सध्या शाहरूख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या गाजत आहे). टागोरांना मात्र वेगळा पठाण दिसला. एका प्रसंगी काबुलीवाला मिनीच्या वडिलांना हताशपणे सांगतो की, आमच्या प्रदेशात नोकरी-व्यवसाय काहीही नाही. आमच्याकडे भांडवल नाही, शिक्षण नाही, उद्योगधंदे नाहीत, म्हणून मग आम्हाला असं दूर देशी येऊन पोटा-पाण्यासाठी विविध व्यवसाय करावे लागतात.

हा संवाद ऐकताना माझ्या मनात आपोआपच ‘ऐ मेरे प्यारे वतन’च्या ओळी सुरू झाल्या. पोटा-पाण्यासाठी त्या काळी असं शेकडो मैल दूर राहावे लागणं म्हणजे काय, हे टागोरांना जाणवलं.

आज व्हॉटसअप कॉल, ई-मेल, विमानसेवा वगैरे सोयींमुळे स्थलांतरातील दाह खूप कमी झाला आहे. मात्र मार्च २०२०मध्ये करोनाच्या काळात जेव्हा गरीब मजूर शेकडो मैल पायी चालत आपल्या गावी गेले, तेव्हा पुन्हा एकदा पोटासाठी स्थलांतर करणाऱ्या गरिबांच्या व्यथा चव्हाट्यावर आल्या.

टागोरांनी ही कथा १८९२मध्ये लिहिली, तेव्हा आजच्या सोयी कोणी स्वप्नातही आणल्या नसतील. म्हणून टागोर मोठे लेखक ठरतात, त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळतो.

अशा तरल कथेला पडद्यावर आणणारे बिमल रॉय आणि आता तिलाच रंगमंचावर आणणारी ‘इप्टा’ची टीम आणि रमेश तलवार यांना सलाम!

.................................................................................................................................................................

लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Shriniwas Hemade

Wed , 15 February 2023

वाचलं उत्तम लिहिलंय सिनेमा फार पूर्वी पाहिला आहेच, बहुतेक माझ्याकडे सीडीही असावी. पुण्यात हा प्रयोग होणार असल्यास कृपया कळवावे..

Shriniwas Hemade

Wed , 15 February 2023

वाचलं उत्तम लिहिलंय सिनेमा फार पूर्वी पाहिला आहेच, बहुतेक माझ्याकडे सीडीही असावी. पुण्यात हा प्रयोग होणार असल्यास कृपया कळवावे..

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......