‘कश्मकश’ : ...तेव्हा आर्थिक प्रलोभनांना बळी न पडणारे सामान्य लोकसुद्धा होते, असा व्यापक आशय व्यक्त करणारं नाटक
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘कश्मकश’ या नाटकाची पोस्टर्स
  • Sat , 04 February 2023
  • कला-संस्कृती नाटकबिटक कश्मकश KASHMAKASH इप्टा IPTA

जेव्हा समाजमान्य मार्गानं दारिद्रयावर मात करता येत नाही, तेव्हा सरळमार्गी व्यक्तीसुद्धा भ्रष्ट मार्गाचा वापर करायला मजबूर होते. जेव्हा त्या व्यक्तीचा ‘आतला आवाज’ जागृत होतो, तेव्हा मात्र ती पुन्हा सन्मार्गाला लागते, असं सरळ कथानक असलेलं ‘कश्मकश’ हे ‘इप्टा’ने सादर केलेलं हिंदी नाटक बघताना वेगळ्या प्रकारचा आनंद होतो. देबशीश मजूमदार यांचं मूळ बंगाली नाटक ‘ताम्रपट’चं हे निगम यांनी केलेलं हिंदी भाषांतर आहे. नाटकाची कथावस्तू भारतीय असल्यामुळे हिंदी भाषांतर खटकत नाही. १९४३ साली स्थापन झालेल्या ‘इप्टा’चं हे ८०वं वर्ष सुरू आहे. या निमित्तानं मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये डिसेंबर २०२२मध्ये एक नाट्यमहोत्सव भरला होता. त्यात ‘कश्मकश’चा हा प्रयोग पाहायला मिळाला.

या नाटकात पाच महत्त्वाची आणि तीन अगदी छोटी, अशी एकंदर आठ पात्रं आहेत. एक प्रौढ माणूस, त्याची पत्नी, तरुण सुशिक्षित बेकार मुलगा, लग्नाचं वय झालेली तरुण मुलगी आणि एक प्रौढ नातेवाईक, ही पाच मुख्य पात्रं. हे नाटक प्रेक्षकांचं मनोरंजन करता करता त्यांच्यातल्या नैतिकतेला आवाहन करतं.

नाटकाची सुरुवात होते, तेव्हा लक्षात येतं की, ही कथा बंगालमधील निम्नशहरी भागात राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबाची आहे. काळ आहे सत्तरचं दशक. तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय होती, हे लक्षात येतं. कुटुंब सुशिक्षित आहे. त्या काळी सुशिक्षित तरुणांना चटकन नोकऱ्या मिळत नव्हत्या. त्यामुळे समाजात ‘सुशिक्षित बेकार’ नावाचा तरुणांचा मोठा गट निर्माण झाला होता. या कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजे वडील. ते पुस्तकांचं बाईंडिंग करून कसाबसा कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतात. घरात लग्नाची वय झालेली तरुण मुलगी असते. तेव्हा मुली फारशा नोकऱ्या करत नव्हत्या. निम्ननागरी भागात तरुण मुलींसाठी फारसा रोजगारही उपलब्ध नव्हता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

वडील सतत स्थानिक आमदाराकडे जाऊन मुलाला नोकरी लावून द्या, असं मी सांगणार आहे, असं म्हणत असतात, पण प्रत्यक्षात त्यांचं जाणं होत नाही. शेवटी मुलगा तगादा लावतो आणि एकदा बाप-लेक आमदाराला भेटायला जातात. ते परत येतात, ती एक वेगळीच समस्या घेऊन. आमदार त्यांच्यासमोर एक नवाच पर्याय ठेवतो. सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्तीवेतन देण्याची योजना जाहीर केलेली असते. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी तुरुंगवास भोगला असेल, त्यांना सरकारतर्फे तहहयात निवृत्तीवेतन मिळणार, असं या योजनेचं स्वरूप असतं.

आमदार सांगतो की, ‘वडिलांनी या योजनेखाली अर्ज करावा, अर्ज मंजूर होऊन निवृत्तीवेतन सुरू होईल, याची जबाबदारी माझी’. अशा भ्रष्ट मार्गानं, सरकारला फसवून पैसे मिळवायचे की नाही, यावर या कुटुंबात बरीच उलटसुलट चर्चा होते, पण शेवटी अर्ज करायचा, यावर एकमत होतं. अर्ज केला जातो आणि आमदाराच्या कृपेनं निवृत्तीवेतन सुरू होतं. कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार होतं. कुटुंब सुखात जगायला लागतं. वडील बुक बाईंडिंगचा व्यवसाय बंद करतात.

आणि मग नवनवीन गोष्टी घडायला सुरुवात होते. शेजाऱ्यांना, मोहल्ल्यातील लोकांना आपल्या शेजारी एक स्वातंत्रसैनिक राहत आहे, याचा साक्षात्कार होतो. मग काय, एखाद्या शाळेत भाषण देणं, त्यात महात्मा गांधींच्या जीवनातील प्रसंग सांगणं, खादी वापरणं, १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला झेंडावंदनासाठी आमंत्रण वगैरे… असं नवीन प्रकारचं जगणं सुरू होतं. त्यांचा एक सधन प्रौढ नातेवाईक मात्र त्यांना अधूनमधून टोमणे मारत असतो की, तुम्ही स्वातंत्र्यलढ्याच्या काळात कधी तुरुंगात होता?

या नव्या स्थितीची, आलेल्या आर्थिक स्थैर्याची सुरुवातीला कुटुंबाला यात मजा वाटते. स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळत असलेला मानसन्मान हवाहवासा वाटायला लागतो. त्याचाच एक भाग म्हणून आमदार करत असलेला प्रचंड भ्रष्टाचारही दिसायला लागतो. वडील नंतर भाषणांतून या भ्रष्टाचारावर नावं घेऊन टीका करायला लागतात. यामुळे आमदार आणि त्याने पाळलेले गुंड बिथरतात. गुंड घरी येऊन वडिलांना धमक्या देतात. टीका बंद केली नाही, तर तुमच्या तरुण मुलीला उचलून घेऊन जाऊ वगैरे धमक्या देतात. मुख्य धमकी असते की, ‘आम्ही तुमचं रहस्य समाजासमोर आणू. तुम्ही खोटी कागदपत्रं बनवून सरकारकडून निवृत्तीवेतन मिळवत आहात, हे जाहीर करू. सरकारला फसवल्याबद्दल तुम्हाला अटक होईल…’

यामुळे आताआतापर्यंत आनंदात राहत असलेलं कुटुंब उदध्वस्त होतं. वडील मात्र आमदाराच्या भ्रष्ट मार्गांवर टीका करणं थांबवत नाहीत… थांबवू शकत नाहीत. एका प्रसंगी ते म्हणतात, ‘एकदा खोटं बोलून निवृत्तीवेतन मिळवलं, आता मात्र खोटं बोलवत नाही. आता काहीही झालं तरी माझ्या तोंडून खोटं बाहेर पडणार नाही. आता मी नकली का होईना स्वातंत्र्यसैनिक आहे. आता मी खोटं बोलणार नाही.’

नाटकाच्या शेवटी ते जुनी पुस्तकं घेऊन बसले आहेत आणि पुन्हा बुक बाईंडिंगचा व्यवसाय करत आहेत, हे दिसतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या नाटकाला सत्तरच्या दशकातील भारतातील राजकारणाचा ठसठशीत संदर्भ आहे. अर्थात तेव्हा आजच्यासारखं भ्रष्टाचारानं टोक गाठलेलं नव्हतं, तरी भ्रष्ट व्यवस्था बघताबघता एका सरळमार्गी व्यक्तीला कसा स्वत:चा भाग बनवते, यावर हे नाटक जळजळीत प्रकाश टाकतं.

मला हे नाटक बघताना टी. एस. ईलियटच्या ‘मर्डर इन द कथीड्रल’ या नाटकाची, ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘नमकहराम’ या सिनेमाची आणि वसंत कानेटकर यांच्या ‘बेईमान’ या मराठी नाटकाची आठवण येत होती. या तिन्ही कलाकृतीत मर्यादित अर्थानं साम्य आहे.

हे नाटक ईलियटची एक अजरामर कलाकृती मानली जातं. मूलत: कवी असलेल्या ईलियटने जी मोजकी नाटकं लिहिली, त्यात हे नाटक महत्त्वाचं मानलं जातं. यात ईलियटने ११७० साली इंग्लंडमध्ये घडलेली एक घटना घेतली आहे. त्या काळी हेन्सी (दुसरा) हा इंग्लंडचा राजा होता. त्याने धर्मगुरू थॉमस बेकेटचा खून घडवून आणला होता. या नाटकात राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यातील संघर्ष चितारला आहे. ईलियटचं हे नाटक १९३५ साली आलं. नंतर त्यावर याच नावाचे दोन सिनेमे आले. पहिला सिनेमा १९५१ साली, तर दुसरा १९६२ साली.

असाच संघर्ष ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘नमकहराम’ या चित्रपटातही आहे. मात्र यात ‘मालक विरुद्ध मजूर’ असा संघर्ष दाखवला आहे. हे संदर्भ लक्षात घेतले तर ‘कश्मकश’च्या गाभ्यात उतरणं सोपं होतं.

या नाटकातील वडील साधे असतात. त्यांचं कुटुंब तुटपुंज्या उत्पन्नावर, गरिबीत जगत असतं. अशा स्थितीत मोहाच्या एका क्षणी ते वाममार्गाचा वापर करतात आणि गरिबी दूर करतात, पण नंतर स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत शिरल्यानंतर त्यांच्यातील नैतिकता जागृत होते आणि ते आमदाराच्या, त्याच्या गुंडांच्या विरोधात आवाज उठवतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

विशेष म्हणजे यात अटळ आणि रक्तरंजित शोकांतिका न दाखवता नाटककाराने वडिलांना पुन्हा गरिबीतील जीवन स्वीकारताना दाखवलं आहे. ज्या गरिबीला कंटाळून, मोहात पडून ते भ्रष्ट काम करतात, त्याच गरिबीला ते नाटकाच्या शेवटी स्वीकारतात.

या नाटकात ‘इप्टा’ची बुजुर्ग मंडळी आहेत. नटांची निवड योग्य केल्यामुळे अर्धी लढाई जिंकली आहे. वडिलांच्या भूमिकेत अंजन श्रीवास्तव आहेत. त्यांच्या अभिनयाबद्दल नव्यानं काय लिहावं? १९८८-९० दरम्यान अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘वागले की दुनिया’ या दूरदर्शन मालिकेमुळे अंजन श्रीवास्तव हे नाव घरोघरी पोहोचलेलं आहे. त्यांना वडिलांच्या भूमिकेत रंगमंचावर बघणं हा एक वेगळा अनुभव ठरतो. वडिलांच्या मनात उठलेली वादळं, निर्माण झालेले नैतिक पेच श्रीवास्तव सहजतेनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य आहेत, तर ज्येष्ठ नातेवाईकाच्या भूमिकेत अवतार गिल आहेत. मुलीच्या भूमिकेत रंजना श्रीवास्तव, तर मुलाच्या भूमिकेत निरज पांडे आहेत. ही सर्व मंडळी ‘इप्टा’ची कसलेली टीम आहे.

या नाटकाला कुलदीपसिंग यांचं पार्श्वसंगीत आहे. नेपथ्य नाटकाच्या गाभ्याशी सुसंगत आहे. दिग्दर्शक रमेश तलवार यांनी नाटक नेटकं बसवलं आहे.

आजच्या राजकारणात भ्रष्टाचार किती बोकाळला आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. असा भ्रष्टाचार कमी-अधिक प्रमाणात पूर्वीही होता आणि भ्रष्ट मार्गाचा वापर करून समाजाला अंकित करणारे राजकीय नेते तेव्हासुद्धा होते. त्याचप्रमाणे तेव्हा आर्थिक प्रलोभनांना बळी न पडणारे सामान्य लोकसुद्धा होते, असा व्यापक आशय व्यक्त करणारं हे एक महत्त्वाचं नाटक आहे.

.................................................................................................................................................................

लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......