‘टेप’ : मनात रूतून बसलेल्या जुन्या घटना कशा आपल्यावर प्रभाव टाकतात, यावर भेदक प्रकाश टाकणारं नाटक
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘टेप’ या नाटकातील दोन प्रसंग
  • Sat , 05 August 2023
  • कला-संस्कृती नाटकबिटक टेप Tape स्टीफन बेलबर Stephen Belber

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्य रंगभूमीवर दोन-तीन व्यक्तींमधले संबंध, त्यांचे बालपणीचे अनुभव, त्या अनुभवांचा आजच्या संबंधांवर होत असलेला परिणाम वगैरे विषय हाताळलेले दिसतात. या मालिकेतील एक नाटक म्हणजे ‘टेप’.

स्टीफन बेलबर या अमेरिकन नाटककाराचे हे नाटक. यात तिशीला आलेले दोन मित्र आणि एक मैत्रीण यांच्या शालेय जीवनातील संबंधांवर आधारित आहे. त्या षोडश वर्षांत काही घटना आजही त्यांच्या भावविश्वात ठाण मांडून बसलेल्या आहेत आणि त्यांना मानसिक पातळीवर त्रस्त करत आहेत.

बेलबर यांनी हे नाटक १९९९ साली लिहिलं. नाट्यलेखनाव्यतिरिक्त त्यांनी पटकथालेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. त्यांनी सुरुवातीला काही एकपात्री एकांकिका लिहिल्या. त्यांच्या १९९७ साली आलेल्या ‘फायनली’ या नाटकाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘टेप’ नाटकाने त्यांना नाव मिळवून दिले. याच नाटकावर आधारित चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. आता हे इंग्रजी नाटक मुंबईतील ‘हिअर अँड नाऊ’ या नाट्यसंस्थेतर्फे मंचित झाले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

जॉन आणि व्हिन्सेंट शाळासोबती. दोघेही आता तिशीच्या आसपास आलेले आहेत. त्यांची वर्गमैत्रीण म्हणजे एमी रॅडल. जॉन आता होनहार चित्रपट निर्माता झालेला असून अमेरिकन समाजाच्या निकषांप्रमाणे ‘यशस्वी व्यक्ती’ आहे, तर व्हिन्सेंट पडेल ते काम करत जगत असतो. व्हिन्सेंटचा खरा व्यवसाय असतो गांजा विकणे. हा व्यवसाय अमेरिकेत गंभीर गुन्हा समजला जातो. नाटक सुरू होते तेव्हा संध्याकाळची वेळ असते. जॉनचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असतो. त्याचा प्रिमीयर शो बघण्यासाठी व्हिन्सेंट खास आलेला असतो. नाटक सुरू होते, तेव्हा व्हिन्सेंट त्याच्या लॉजच्या रूमवर जॉनची वाट पाहात असतो.

जुने मित्र खूप दिवसांनी भेटल्यावर हा काय करतो, ती काय करते वगैरे प्रकारच्या गप्पा सुरू होतात. या दरम्यान प्रेक्षकांना जॉनच्या यशस्वी आयुष्याबद्दल आणि व्हिन्सेंटच्या नुकत्याच झालेल्या घटस्फोटाबद्दल समजते. अर्थात दोघांतले अंतर त्यांच्या देहबोलीतूनसुद्धा सतत व्यक्त होत असते. या गप्पांदरम्यान व्हिन्सेंट वेगळ्या पातळीवर अस्वस्थ असल्याचे जाणवते. तो कधी बिअर पित असतो, तर कधी गांजा घातलेल्या सिगरेटी ओढत असतो.

गप्पांच्या एका टप्प्यावर व्हिन्सेंट अचानक त्यांची वर्गमैत्रिणीचा म्हणजे एमीचा विषय काढतो. अपेक्षेप्रमाणे जॉन एमीबद्दल बोलायला फारसा उत्सुक नसतो. दहा-बारा वर्षांपूर्वी शाळा संपल्यानंतर जॉनची आणि एमीची भेटसुद्धा झालेली नसते, तसेच कोणत्याच प्रकारचा संपर्क झालेला नसतो.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

नाटकाचा काळ ‘आजचा’ आहे. या नाटकात काही प्रसंगी पात्रं मोबाईल फोन वापरताना दिसतात. व्हिन्सेंट जरी अधूनमधून एमीचा विषय काढतो, तिच्याबद्दल छोटं-मोठं काही सांगतो, तरी जॉन फारसा रस दाखवत नाही. एका टप्यावर व्हिन्सेंट त्याला सांगतो की, एमी याच गावात नोकरी करत असून, ती जमलं तर आता थोडा वेळ्याने येथे येणार आहे. एमी तेथे ‘सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर’ म्हणून नोकरी करत असते.

खूप वर्षांनी भेटत असलेल्या मित्रांमध्ये जसं कधी जिव्हाळा, तर कधी जुने रागलोभ व्यक्त होत असतात, तसे व्हिन्सेंट आणि जॉन यांच्यातही होत असतात. व्हिन्सेंट त्याला अचानक हायस्कूलमधून उत्तीर्ण झाल्यानंतरच्या सेंड ऑफ पार्टीची आठवण करून देतो. त्यांच्या संभाषणातून प्रेक्षकांना समजते की, त्या रात्री व्हिंसेंटची तेव्हाची गर्लफ्रेंड म्हणजे एमी आणि व्हिन्सेंटचा सर्वांत प्रिय मित्र म्हणजे आता समोर बसलेला जॉन, एका हॉटेलात रात्र घालवतात. या घटनेच्या आधी व्हिन्सेंटचे आणि एमीचे प्रेमप्रकरण संपुष्टात आलेले असते. मात्र जेव्हा त्यांचे प्रेमप्रकरण सुरू असते, तेव्हा त्यांच्यात शरीरसंबंध आलेले नसतात. एमी आणि जॉन सेंड ऑफ पार्टीनंतर एका हॉटेलात रात्रभर राहून सेक्स करतात.

त्या रात्री काय घडले, हे एमीने व्हिन्सेंटला सांगितलेले आहे, हे जॉनला माहिती नसते. या माहितीच्या आधारे आता व्हिन्सेंट जॉनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो आणि ‘त्या’ रात्री काय घडले, याचा कबुलीजबाव दे, असा आग्रह धरतो. जॉनला सुरुवातीला हा काय प्रकार आहे, हेच उमगत नाही. तो रागारागाने व्हिन्सेंटवर असूयेचा आरोप करतो ‘व्हिन्सेंट, तू जीवनात अयशस्वी आहे, म्हणून मला असा त्रास देत आहे.’ व्हिन्सेंट हे सर्व मान्य करतो, पण ‘त्या’ रात्री जॉनने एमीबरोबर काय केले, हे सांग, हा हेका मात्र सोडत नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

एवढेच नव्हे तर व्हिन्सेंट जॉनला असेही सुनावतो की, त्याला वाटतं की, तो यशस्वी आहे. खरं तर तो तद्दन फालतू सिनेमे बनवत आहे, ज्यांना फारसा अर्थ नाही. दोघांत तुंबळ शाब्दिक युद्ध होते. हे युद्ध प्रसंगी शारिरीकसुद्धा होते. त्यांच्यात छोटीशी मारामारी होते. नंतर मात्र या मानसिक युद्धात दमलेला जॉन मान्य करतो की, ‘त्या’ रात्री त्याने एमीवर बलात्कार केला होता.

जॉनने दिलेली गुन्हयाची कबुली त्याच्याही नकळत व्हिन्सेंटने टेप रेकॉर्डरवर टेप केलेली असते. (म्हणून नाटकाचे शिर्षक ‘टेप’ आहे). दहा वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली आता पुराव्याच्या रूपाने उपलब्ध आहे, असे दिसल्यावर जॉन चिडतो आणि टेप परत मिळवण्यासाठी व्हिन्सेंटची झटापट करतो. यातून काही फायदा होत नाही. टेप व्हिंसेंटजवळच राहते.

कथानकाच्या या टप्प्यावर रंगमंचावर एमीची एंट्री होते आणि नाटक अधिक रंगायला लागते. नाटकाच्या कथानकाला निराळे आयाम मिळायला लागतात. सुरुवातीची काही मिनिटं ‘तू कसा आहे’, ‘मी कशी आहे’ वगैरे शिळोप्याच्या गप्पांत गेल्यानंतर व्हिन्सेंट सरळ सांगतो की, त्याने आजचा हा प्रसंग मुद्दामहून घडवून आणला आहे. त्याला एमीला आणि जॉनला समोरासमोर आणायचे होते. या वाक्याने एमी आणि जॉन दोघेही चमकतात.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

नंतर व्हिन्सेंट जाहीर करतो की, आता जॉन एमीची माफी मागेल. या घोषणेमुळे जॉनपेक्षा एमीला जास्त धक्का बसतो आणि ती उलट व्हिन्सेंटला उलटसुलट बोलते… तुला कोणी सांगितलं की, तो बलात्कार होता. मी स्वत: कधी त्याबद्दल तक्रार केली नाही. जॉन, तू कशाला ‘त्या’ रात्री काय घडले, हे सांगत बसला आहे… व्हिन्सेंट, ‘त्या’ रात्री काय घडले, यात तुला का रस वाटतो… वगैरे वगैरे.

एमीच्या या पवित्र्यामुळे जॉन आणि व्हिन्सेंट दोघेही हबकतात. नंतर एमी मोबाईल वरून पोलिसांना फोन करून सांगते ‘मी सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर बोलत आहे. या ठिकाणी गुन्ह्याची कबुली देणारी एक टेप आहे. दुसरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात गांजा आहे. येथे ताबडतोब या आणि दोघांना अटक करा’.

‘पोलिस’ म्हटल्यावर दोघांची गाळण उडते. व्हिन्सेंट चटकन बाथरूममध्ये जातो आणि टॉयलेटमध्ये गांजाची पाकिटं टाकून देतो तर जॉन ती टेप पायाखाली तुडवून निकामी करतो. दोन-चार मिनिटांनी एमी सांगते की, तिने पोलिसांना फोन केलाच नव्हता. तो फेक कॉल होता. मग एमी सांगते की, माझ्या आयुष्यातील निर्णय मी घेते. ‘त्या’ रात्री जे झालं तो बलात्कार होता की नाही, हे मी ठरवेन, तुम्ही नाही’ वगैरे म्हणत रंगमंचावरून निघून जाते. स्त्रीचे हे अनपेक्षित रूप बघून दोघेही स्तंभीत होता. येथे नाटक संपते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

फक्त तीन पात्रं, कमीत कमी प्रॉपर्टी, जेमतेम प्रकाशयोजना वगैरे असूनही हे नाटक सव्वातास प्रेक्षकांना खिळवून ठेवते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘टेप’ची संहिता जबरदस्त बांधली आहे. यात एका प्रकारचा सस्पेन्स आहे.

जॉनप्रमाणे प्रेक्षकांनासुद्धा समजत नाही की दहा वर्षांपूर्वी वयाच्या अठराव्या वर्षी घडलेल्या घटनेबद्दल व्हिन्सेंट एवढा का चिडला आहे. नंतर लक्षात येते की, तेव्हा एमी व्हिन्सेंटची प्रेयसी होती आणि ‘त्या’ पार्टीच्या काही दिवस अगोदर त्यांचं प्रेमप्रकरण संपुष्टात आलेले असते. या पातळीवर प्रेक्षकांना वाटत असते की, यातून व्हिन्सेंट स्वत:चे मानसिक गुंते सोडवत आहे. पण शेवटी जेव्हा एमी दोघांना सांगते की माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेत असते, तेव्हा त्यांच्याप्रमाणेच प्रेक्षकांनासुद्धा ‘आधुनिक स्त्री’चे दर्शन घडते.

तरुण दिग्दर्शक आकाश प्रभाकर हे नाटक योग्य प्रकारे सादर केले आहे. यात तो व्हिन्सेंटची भूमिकेत आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या त्याने लिलया पेलल्या आहेत. नाटकाच्या नेपथ्याचा खास उल्लेख करावा लागेल. रंगमंचाच्या डाव्या कोपऱ्यात एक टेबल, त्यावर व्हिन्सेंटची हँड बॅग आहे. उजव्या कोपऱ्यातून पात्रं रंगमंचावर येत-जात राहतात. डाव्या कोपऱ्याच्या आता बाथरूम असल्याचे प्रेक्षकांनी समजावे. रंगमंचावर मध्यभागी एक कॉट आहे. रूममध्ये सर्वत्र बिअरचे रिकामे कॅन्स आणि सिगरेटची थोटकं पडलेली आहेत. एका अविवाहित पुरूषाची हॉटेलमधली खोली जशी असेल, तशीच उभी केली आहे.

या अस्ताव्यस्त रूमद्वारे दिग्दर्शकाने व्हिन्सेंटचे आयुष्यसुद्धा असेच अस्ताव्यस्त असल्याचे सूचित केले आहे. अभिनयाबाबत तिन्ही पात्रांनी यथोचित अभिनय सादर केला आहे. आकाश प्रभाकर (व्हिन्सेंट), निशांक वर्मा (जॉन) आणि आयुषी गुप्ता (एमी) या तिघांनी आपापल्या भूमिकांत जान ओतली आहे. यातही आकाश प्रभाकर आणि आयुषी गुप्ताचा खास उल्लेख करावा लागतो. व्यक्तीचं भावविश्व, त्यातल्या उलथापालथी, मनात रूतून बसलेल्या जुन्या घटनासुद्धा कशा आपल्या ‘आज’वर प्रभाव टाकतात, यावर भेदक प्रकाश टाकणारे ‘टेप’ हे नाटक ‘बघितलेच पाहिजे’.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now                    

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......