‘लव्ह अँड लावणी’ : लावणीवरच्या प्रेमाचा आणि प्रेमातल्या लावणीचा एक आगळावेगळा सांगीतिक आविष्कार!
कला-संस्कृती - सतार ते रॉक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘लव्ह अँड लावणी’ या कार्यक्रमाची दोन छायाचित्रं
  • Sat , 10 February 2024
  • कला-संस्कृती सतार ते रॉक लव्ह अँड लावणी Love and Lavni भूषण कोरगावकर Bhushan Korgaonkar

कोणे एके काळी (म्हणजे सोशल मीडिया, यु-ट्यूब वगैरेच्या आधी) ग्रामीण महाराष्ट्रात राहणाऱ्या समाजाची करमणुकीची हक्काची जागा म्हणजे तमाशा, लावणी, भारूड, कीर्तनं वगैरे लोककला. या कला प्रकारांनी गेली अनेक शतके ग्रामीण महाराष्ट्राचे मनोरंजन तर केलेच, शिवाय प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समाजप्रबोधनही केले. एकविसाव्या शतकात जीवनाच्या अनेक क्षेत्रांत मूलभूत बदल झाले, तसे ते लावणीच्या जगातही झाले. आजकाल तर महाराष्ट्रातील एकही सांस्कृतिक समारंभ (मग तो सरकारतर्फे आयोजित केलेला असो की, खाजगी संस्थांनी) लावणीशिवाय पूर्ण होत नाही.

अलीकडच्या काळात दरवर्षी ‘लावणी महोत्सव’ भरतात. शिवाय अलीकडे अनेक ठिकाणी संपन्न होत असलेल्या नृत्यस्पर्धांत ‘लावणी’ हमखास सादर केली जाते. पाच-पंचवीस वर्षांपूर्वी सुरेखा पुणेकर वगैरे लावणी कलावंतांनी ‘नटरंगी नार, उडवी लावणीचा बार’ वगैरे प्रयोग करून लावणीला शहरी महाराष्ट्रात मोठा लोकाश्रय मिळवून दिला. हे प्रयोग परळचा दामोदर हॉल, नवी मुंबर्इचे भावे नाट्यगृह वगैरे ठिकाणी होत. यथावकाश हे प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिरात आणि पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरातसुद्धा झाले.

मात्र या कार्यक्रमांचा एक पॅटर्न ठरलेला असे. त्यात केवळ लावण्या सादर केल्या जात असत आणि जोडीला सूत्रधाराचे प्रसंगी अत्यंत सुमार विनोद असत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

या पार्श्वभूमीवर भूषण कोरगांवकर सादर करत असलेल्या लावणी कार्यक्रमांचे वेगळेपण जाणवते. नुकताच त्याने सादर केलेला ‘लव्ह अँड लावणी’ हा सुमारे सव्वा दोन तासाचा प्रयोग बघितला.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात मराठी, हिंदी आणि दखनी भाषेचा वापर केला आहे. यामुळे शहरी, नागर मराठीची सवय असलेला प्रेक्षक एका वेगळ्या दुनियेत जातो. अजून एक असे की, हा प्रयोग श्रीमती शबाना अश्टुरकर या नामवंत लावणी कलावंताच्या आयुष्यावर बेतलेला आहे. हे एक प्रकारे आत्मचरित्रात्मक नाटक आहे.

या प्रयोगात दर्जेदार लावण्या सादर केल्या जातात, शिवाय एका लावणी कलावंताच्या जीवनाचे, त्या कलावंताने केलेला संघर्ष वगैरे सर्वच प्रेक्षकांसमोर येते. त्यामुळे ही कहाणी फक्त शबानाची न राहता प्रातिनिधीक कहाणी ठरते.

एके काळी मराठी चित्रपट म्हणजे अन्याय-अत्याचार करणारा गावचा मिशीला सतत पिळ देणारा पाटील, तमाशा वगैरे नेहमीचा मसाला असायचा. यात थोडा बदल केला, तो शांतारामबापूंच्या मार्च १९७२मध्ये आलेल्या ‘पिंजरा’ने. तो तुफान चाललात. हा चित्रपट ‘द ब्लू एंजल’ या १९३० साली आलेल्या जर्मन चित्रपटावर आधारित होता, असं काही जाणकार सांगतात.

‘पिंजरा’नंतर मात्र लावणीवर आधारित चित्रपटाच्या क्षेत्रात फारसे बदल झाले नाहीत. जागतिकीकरणानंतर जीवनाच्या अनेक क्षेत्रांत खूप बदल झाले. त्यातील एक लक्षणीय बदल म्हणजे ‘लावणी’सारख्या कला प्रकाराकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालेला आमूलाग्र बदल. ‘लावणी’ या कला प्रकाराचा एकविसाव्या शतकातील अभ्यासक म्हणून सध्या भूषण कोरगांवकरला ओळखलं जातं. २००१पासून त्याला लावणीचे वेड लागलेलं आहे. त्यानंतर त्याने या कला प्रकाराचा बराच अभ्यास केला. २०१४ साली त्याचं ‘संगीत बारी’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. त्याच वर्षापासून त्याने प्रयोग सुरू केले.

लावणीच्या जगातील एक मोठं नाव म्हणजे श्रीमती शबाना अश्टुरकर (जन्म : १९६०). त्यांचं आयुष्य नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं. त्यांनी ऐन तारुण्यात फड गाजवायला सुरुवात केली. त्या जबरदस्त अदाकारा होत्या. तिशी ओलांडल्यानंतर त्यांना एक विवाहित प्रियकर भेटला. त्याच्या आग्रहास्तव त्यांनी घुंगरू बांधणं बंद केलं आणि संसारात रमल्या. अशा संसारात सहसा यथावकाश सुरू होतात, तशा कटकटी सुरू झाल्या. आणि अखेर तो मोडला. परिणामी वयाच्या चाळीशीत त्यांना पुन्हा घुंगरू बांधून फडावर उभं राहावं लागलं. त्यांनी जिद्दीनं पुन्हा नाव आणि पैसा कमावला.

अशी त्यांची खळबळजनक, फार मोठे चढउतार असलेली कथा. तीच रसिकांसमोर का सादर करू नये, या विचारांतून या अनोख्या प्रयोगाचा जन्म झाला. यात यात एक स्त्री आणि एक पुरुष या दोन कल्पक सूत्रधारांमार्फत शबानांची कथा उलगडत जाते. ही दोन पात्रं कधी सूत्रधार असतात, तरी कधी कथानकातील पात्रं.

लावणी कलावंतांच्या जगतात अनेक ठिकाणी मातृसत्ताक पद्धत प्रचलित आहे. त्यामुळे शबानाला लहानपणापासूनच नृत्याचे, अदाकारीचे आणि गाण्याचे धडे मिळाले. त्या योग्य वयात रसिकांसमोर उभ्या राहिल्या. त्यांच्या अदाकारीने समाजाला वेड लावले होते. 

ही सर्व कथा ठसकेबाज निवेदनातून आणि लावण्यांतून पेश केली जाते. हा अनोखा प्रकार आहे. म्हणूनच सूत्रधाराच्या भूमिकेतील अनिता दाते आणि संभाजी ससाणे यांचा खास उल्लेख करावा लागतो. कधी मराठी तर कधी दखनी हिंदीचा वापर कानांना फार गोड लागतो. अनिताने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येते. जिभेला सवय नसेल तर अनितासारख्या एका नागर मराठी रंगकर्मीला दखनी हिंदीचा सफार्इने वापर करणे अवघड ठरते. तसं अनिताचं झालं नाही.

शिवाय लावणी कलावंतांची देहबोलीसुद्धा फार वेगळी असते. तीही अनिताने सफाईने सादर केली. या प्रयोगात एकुण नऊ कलाकार आहेत, जे गरजेनुसार रंगमंचावर येतात. यातील काही नावं बघा : शंकुतलाबाई सातारकर, पुष्पा सातारकर, गौरी जाधव, चंद्रकांत लाखे, विनायक जावळे, सुमीत कुडाळकर, अनिता दाते आणि संभाजी ससाने. या प्रयोगाची संहिता आणि दिग्दर्शन भूषणचे आहे. या दोन्हींसाठी त्याने घेतलेली मेहनत स्पष्ट दिसते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

या प्रयोगात कोठेही निष्कारण भावनिक कढ आणले नाहीत. तमाशा कलावंत म्हणजे नेहमी समाजाची अवहेलना भोगावे लागणारे गरीब बिचारे कलाकार, या जुन्या प्रतिमेला हा प्रयोग सुरूंग लावतो. प्रयोगाच्या एका टप्प्यावर एक लावणी कलाकार तर थेट प्रेक्षकांशी बोलते आणि सांगते की, आमच्याबद्दल सहानुभुती दाखवण्याची गरज नाही… आम्ही कलाकार आहोत… आम्ही आमच्या मेहनतीचं खातो… कोणाच्या उपकारावर जगत नाही… आम्ही आमच्या व्यवसायात खुश आहोत’. ही ठाशीव विधानं बदललेल्या मानसिकेतचा पुरावा आहेत. मुख्य म्हणजे ही मानसिकता, हा प्रामाणिकपणा, हा सच्चा सूर स्वागतार्ह आहे.

‘लव्ह अँड लावणी’चा प्रयोग बघायला अनेक अ-मराठी रसिक नियमितपणे येतात. त्यांना भाषेची अडचण जाणवत नाही. मराठी भाषिकांइतकेच तेसुद्धा या प्रयोगात रमतात, योग्य प्रसंगी मनापासून दाद देतात. कोणतीही दर्जेदार कला देश-काल-परिस्थिती-भाषा वगैरेंची कुंपणं ओलांडून रसिकांशी संवाद साधते, तसाच हा प्रयोग वठतो.

येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे दोन प्रयोग होणार आहेत. एक संध्याकाळी पाच वाजता, तर दुसरा रात्री आठ वाजता. जमलं तर अवश्य बघा.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......