न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती लोकांच्या हक्कांचे राखणदार असले, तरी त्यांचं रक्षण फक्त त्यांची सद्सद्विवेकबुद्धी व सचोटी याच दोन बाबी करू शकतात!
ग्रंथनामा - झलक
मृदुला भाटकर
  • ‘हे सांगायला हवं!’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 11 April 2023
  • ग्रंथनामा झलक हे सांगायला हवं! He Sangayla Hava मृदुला भाटकर Mrudula Bhatkar रमेश भाटकर Ramesh Bhatkar

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता रमेश भाटकर यांना बलात्काराच्या एका खोट्या केसमध्ये गुंतवण्यात आलं होतं. भाटकरांची पत्नी मृदुला भाटकर न्यायमूर्ती असल्यामुळे हा बलात्काराचा डाग पूर्ण खोटा असला तरी तो पुसण्यासाठीची कायदेशीर लढाई अधिक कठीण होती.

या खटल्यामुळे भाटकर पती-पत्नींच्या आयुष्यातील काही वर्षे अक्षरशः उद्ध्वस्त झाली. मात्र ते एकमेकांच्या साहाय्याने, प्रेमाच्या आधारावर लढले. समाजाला या आणि अशा हादरवणाऱ्या घटनांची माहिती नसते. म्हणून ही न्यायासाठी, सत्याच्या आधाराने केलेल्या लढाईची गोष्ट मृदुला भाटकर यांनी ‘हे सांगायला हवं!’ या पुस्तकात कथन केली आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातल्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

प्रकरण संपलं! अ‍ॅडव्होकेट शमीम दळवींनी तातडीनं फोन केला व बातमी दिली. लगेच मी रमेशला फोन करून कळवलं. त्याला तर अनेक वर्षांचं ओझं उतरलं असं वाटलं. न्या. साधनांच्या रूपानं परमेश्वरानंच आम्हाला न्याय दिला होता. तो आदेश आम्हाला अमृतासमान होता. माझे डोळे आनंदानं भरून येत होते. फार मोठ्या अग्निदिव्यातून आम्ही गेलो, वाचलो आणि परत उमेदीनं जगण्यासाठी उभे राहिलो!

कोणत्याही कोर्टात तोंडी दिलेला आदेश टाईप होऊन, तपासून, सही करून, तो लोकांसाठी उपलब्ध व्हायला वेळ लागतो. विशेषतः एप्रिलच्या शेवटच्या पंधरवड्यातले आदेश. कारण तेव्हा उन्हाळ्याच्या सुटीमुळे खूप तातडीची कामं मध्येच सुनावणीस येतात. २५ एप्रिल २०१४ रोजी दिलेला आदेश मेच्या पहिल्या आठवड्यात सर्वांसाठी स्टेनोनं अपलोड केला. त्याची बातमी वृत्तपत्रं व प्रसारमाध्यमांनी दिली नाही; पण नवलाची गोष्ट म्हणजे ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं लगेचच न देता एक महिन्यानं हाय कोर्ट उघडण्याच्या दिवशी जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन कॉलमची मोठी बातमी दिली. ती भडक पद्धतीनं छापलेली बातमी वाचून मला व्हायचा तो त्रास झालाच. वास्तविक मला प्रसिद्धीपराङ्मुख राहून शांतपणे काम करणं बरं वाटतं, परंतु अशा काही घटना घडतात की, विनाकारण, इच्छा नसताना तुम्हाला चर्चेत ओढलं जातं. याचा अनुभव पुढे मला समाजमाध्यमांद्वाराही आला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

या सात वर्षांमध्ये मी जेव्हा जेव्हा सकाळी डोळे उघडत असे, तेव्हा रमेशकडे पाहून, तोंड फिरवून डोळे टिपत असे. फार वाईट वाटत असे. त्याची ही स्थिती पाहणं नको व्हायचं. तो निरपराधी असला तरी त्याला कोणताही खटला न चालवता ‘अपराधी’ ठरवलं गेलं होतं.

मी आधी नमूद केल्याप्रमाणे, दाखल झालेल्या या आरोपात कोर्टाच्या अवमानाचा प्रश्न नव्हता, ही रमेशची बदनामी होती. बदनामीचा खटला ज्या दिवशी घटना घडते, त्यानंतर एक वर्षाच्या आत दाखल करावा लागतो. रमेशनं वीरेंद्रच्या सल्ल्यानुसार - २७ डिसेंबर २००७ रोजी ‘मुंबई मिरर’नं - त्या मुलीची अर्धनग्न छायाचित्रं शहरात वाटली, अशी धादान्त खोटी आणि पूर्णतः काल्पनिक बातमी छापली होती. त्याविरुद्ध आम्ही ‘टाइम्स ऑफ इंडिया’विरुद्ध पाच कोटींचा बदनामीचा दावा डिसेंबर २००८ला दाखल केला. अर्थात माझी त्यास पूर्ण मान्यता होती. त्यासाठी रमेशनं त्याचे कष्टाचे तीन लाख रुपये कोर्ट फी म्हणून भरले. हा दावा अर्थातच उच्च न्यायालयात पडून राहिला, २०२० साली तो हे पुस्तक लिहून झाल्यावर मी मागे घेतला.

मला या साऱ्यामध्ये एक सत्य समजलं, न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती लोकांच्या हक्कांचे राखणदार असले, तरी त्यांचं रक्षण फक्त त्यांची सद्सद्विवेकबुद्धी व सचोटी याच दोन बाबी करू शकतात. कर्णाला कवचकुंडलं होती, तशीच ती सद्सद्विवेकबुद्धी व सचोटीची कवचकुंडलं न्यायाधीशाला/न्यायमूर्तीला मिळतात. ती असेपर्यंत तो/ती कायमच अभेद्य असतात. न्यायसंस्थेवर, न्यायाधीशावर शिंतोडे उडवले जातात, त्याचं/तिचं चारित्र्यहनन केलं जातं. तेव्हा ते नि:शस्त्र असतात. कोणालाच प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत. सोशल मीडिया, लोक किंवा माध्यमं, यांच्याशी त्यांना कायद्यानंच लढावं लागतं. कारण न्यायालयीन मूल्यांनी त्यांचं तोंड बंद केलेलं असतं व हात बांधलेले असतात. जबाबदारीचं भान त्यांना ठेवावंच लागतं. जे काही करायचं ते फक्त शांतपणे! एकाकी झुंज असते ती!!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

११ ऑगस्ट २०१५ रोजी माझ्याकडे जामिनाची कामं दिली होती. त्या वेळेस तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज माझ्यासमोर आला. सरकारनं त्याला जोरदार विरोध केला होता. सेटलवाड या ‘सबरंग’ नावाच्या त्यांच्या समाजसेवी संस्थेमार्फत गुजरातमध्ये काम करत. गोध्रा दंगलीनंतर त्या गुजरातमध्ये अ-शांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात, असा त्यांच्यावर आरोप होता. तसंच, त्यांच्या संस्थेस ‘फोर्ड फाउंडेशन’ या अमेरिकन संस्थेकडून पैसा पुरवला जातो. त्याचा विनियोग सामाजिक कामासाठी न करता, त्या वैयक्तिक कामासाठी करतात, असाही त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे ‘युनियन ऑफ इंडिया’नं त्यांच्यावर पिनल कोडच्या १२०इचे सेक्शन व ३५, ३७, ३, ११, आणि १९ या कलमांनुसार खटला दाखल केला होता. त्या व्यतिरिक्त देशद्रोहाचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ज्येष्ठ व निष्णात विधिज्ञ अ‍ॅस्पी चिनॉय हे अर्जदारांकडून आणि अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिलसिंग सरकारकडून होते. दोघांचा युक्तिवाद झाल्यानंतर मी आदेश दिला. त्यात असं म्हटलं-

“देशद्रोहाचा आरोप देशाच्या सुरक्षिततेसंदर्भात नक्कीच गंभीर आणि धोकादायक आहे. अशी कृत्यं कधीही सहन केली जाणार नाहीत. परंतु नागरिकांच्या विविध सामाजिक संस्थांमार्फत सुरू असलेल्या चळवळी, कामं तसंच वेगवेगळ्या विचारधारा, जरी त्या सरकारी यंत्रणेच्या विचारानुसार नसल्या तरी, सरकारनं त्या विरोधी विचारांचा सन्मान करायला हवा. दुसऱ्या विचारांशी असहमती असू शकली, तरी लोकांच्या विरोधी विचार करण्याच्या, मांडण्याच्या अधिकाराचं रक्षण करणं, हे सरकारचं कर्तव्य आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला स्वतःचा विचार, विश्वास, मतं बाळगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. व ते मांडल्यावर अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी सरकारची आहे. वेगवेगळे विचारप्रवाह असणं म्हणजे देशद्रोह नाही किंवा देशाच्या स्वायत्तत्तेस धोकादायकही नाही. देशाच्या विरुद्ध आणि सरकारच्या विरुद्ध या दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत.”

मी माझा अत्यंत सक्षम व विश्वासार्ह स्वीय सचिव विश्वनाथला निर्णयाचं पाच वाजता डिक्टेशन देऊन साडेपाच वाजता चेंबरमध्ये आले. विश्वनाथनं लगेचच मजकूर संगणकावर घातला आणि निर्णयाची मूळ प्रत तपासण्यासाठी व सही करण्यासाठी माझ्यासमोर ठेवली. सही करून दिल्यावर मी विश्वनाथला, अटकपूर्व जामिनाचा खटला असल्यानं हा आदेश लगेचच अपलोड करण्यास सांगून घरी निघाले. विश्वनाथनं निर्णय संगणकावर सुमारे सातपर्यंत अपलोड केला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मी ७.३०च्या सुमारास घरी पोचले. मी आणि रमेश रात्रीचं जेवण आटोपून बसलो होतो. तेवढ्यात सुषमाचा फोन आला. आम्ही दोघं कसे आहोत, ते विचारून ती म्हणाली, ‘केतन तिरोडकर नावाचा माणूस तुला माहीत आहे का?’ केतन तिरोडकर हा माझ्यासमोर मोक्का कोर्टात पोलीस अधिकारी दया नायक यांच्यासोबत आरोपी होता. त्या खटल्यातील त्याचा जामिनाचा अर्ज मी फेटाळला होता. या घटनेला सुमारे सात-आठ वर्षं झाली असावी. त्यानंतर माझ्या आठवणीनुसार माझ्यासमोर त्याची कोणतीच केस आली नव्हती.

सुषमा म्हणाली, ‘तिला तिच्या मुलाच्या मित्राचा फोन आला की, माझ्याविरुद्ध अत्यंत घाणेरडी पोस्ट फेसबुकवर केतन तिरोडकर या व्यक्तीनं टाकली आहे.’ तिनं मला ती पोस्ट वाचून दाखवली. ती पोस्ट सोशल मीडियावर सगळीकडे फिरत होती. ती इंग्रजीमध्ये होती, तसंच मराठीतही गलिच्छ मजकूर होता. त्यामध्ये तिरोडकर यांनी मला ‘न्यायालयीन वेश्या’ म्हणत, ‘बलात्कारी रमेश भाटकर यांची बायको’, ‘हिनं दुसरी वेश्या तिस्ता हिला अटकपूर्व जामीन दिला’ असं लिहिलं होतं. मराठीत माझ्याविषयी आणखीही आक्षेपार्ह, गलिच्छ मजकूर होता. पोस्ट फेसबुकवर लगेचच म्हणजे साडेसात-आठच्या सुमारास म्हणजे निर्णय अपलोड झाल्या झाल्या टाकली होती.

त्या गलिच्छ लिखाणाचा माझ्यावर व रमेशवर शून्य परिणाम झाला असला, तरी तेव्हा माझ्या लक्षात आलं की, सोशल मीडिया आता न्यायालयावर आक्रमकपणे वाटेल तसे वार करू लागला आहे. सोशल मीडियावर काहीही लिहिणं शक्य असतं आणि वाचकांनाही अत्यंत सहजपणे ते उपलब्ध होतं. मात्र त्यामुळे न्यायाधीश व न्यायमूर्ती यांबाबत चुकीचं मत तयार होऊ शकतं. त्याचा न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी खंबीर, कणखर व्यक्ती आहे. अशा प्रकारांनी माझी प्रतिष्ठा पणाला लागत नाही की, माझ्या नातेसंबंधावर त्याचे परिणाम होत नाहीत. मात्र मला नव्यानं न्यायदानाच्या क्षेत्रात येणाऱ्या तरुणवर्गाबद्दल काळजी वाटली. समाजात न्यायालयाचा एक प्रकारे धाक असतो. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं, तरी त्यात ‘reasonable restrictions’चा अटकाव असतो. आपल्या हक्कांचा आपण दहा वेळा उच्चार करतो, पण समंजस आणि परिपक्व लोकशाही वास्तविक कर्तव्यांवरसुद्धा आधारित आहे, असं मला वाटतं.

या आधी म्हणजे २००९मध्ये मी उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली, तेव्हा सोशल मीडिया असा व इतका आक्रमक अजिबात नव्हता. २०१२नंतर सोशल मीडिया अधिकाधिक वापरला जाऊन तो आक्रमक झाला, शक्तिमान झाला. अर्थात हा मार्ग समाजाला सुधारण्यासाठी, योग्य कारणांसाठीही वापरला जातो, तसा बिघडवण्यासाठी, चुकीच्या गोष्टींसाठीही त्याचा वापर होतोच.

मी व रमेश या अशा गोष्टींना किंमत देणार नव्हतो, तरी मला न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करणाऱ्या माझ्या स्त्री सहकाऱ्यांची व इतर स्त्री सहकाऱ्यांची काळजी वाटली. आज न्यायसंस्थेत कितीतरी तरुण स्त्रिया न्यायाधीश म्हणून काम करताहेत. त्यापैकी काही अविवाहित, विवाहित व विधवाही आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

एखादी व्यक्ती अशा भाषेत माझ्याविषयी, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीविषयी लिहू शकते, तर उद्या नवीन न्यायाधीशांबद्दल कोणी काहीही लिहील व फेसबुकवर टाकलं जाईल. मी आधी लिहिलं तसं, न्यायाधीश या गोष्टींना उत्तर देऊ शकत नाहीत. कारण ते न्यायालयीन बदनामीच्या मूल्यांविरुद्ध आहे व ते योग्यही आहे. मग उरतात दोनच मार्ग. एक- खटला, जो न्यायाधीशाला चालवणं खूप कठीण होतं. आणि दुसरं म्हणजे ते लिखाण व कृती कोर्टाचा अवमान होत असेल, तर त्याखाली उच्च न्यायालयाला काहीतरी कृती करण्याबद्दल विनंती करणं.

लोकांच्या विश्वासावर न्यायसंस्था उभी आहे, तो विश्वास डळमळीत करण्याचा हा प्रयत्न होता. मी ठरवलं की, याविरुद्ध मुख्य न्यायमूर्तीकडे दाद मागायची व कोर्टाच्या अवमानाखाली तिरोडकरला नोटीस काढा म्हणून विनंती करायची.

मला स्वप्नातही तिरोडकर नावाची व्यक्ती माझ्याबद्दल असं काही लिहील असं वाटलं नव्हतं. रमेशचा त्यानं ‘बलात्कारी’ म्हणून मुद्दाम मला चिडवण्यासाठी केलेल्या उल्लेखानं मला दुःख झालं. कारण खोट्या आरोपात अडकलेला एक माणूस त्यातून सुटण्यासाठी कायद्याची लढाई सात वर्षं यशस्वीपणे लढतो, तरी त्याच्यावर तिरोडकरसारखी माणसं चिखलफेक करतात. समाजातले काही घटक तुम्हाला तुमच्यावरचे खोटे आरोपही विसरू देत नाहीत. त्यांना ते ओझं तुमच्यावर सतत लादण्यातच आनंद मिळतो. मी आणि रमेश शांत होतो. याहून फार मोठ्या मानहानीच्या प्रकाराला आम्ही आधी तोंड दिलं होतं.

तिरोडकरला माझा तिस्ता सेटलवाड यांना जामीन देण्याचा निर्णय पटला नसेल, तर ते टीका निश्चितच करू शकतात. ते स्वागतार्हच आहे. त्यातून न्यायाधीश वाढत जातो, पण टीका आणि व्यक्तिगत गलिच्छ भाषेतील खोटा मजकूर यांत फरक आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक न्यायाधीश/न्यायमूर्ती अनेक निर्णय देतो/देते. त्यात तो एका पक्षाच्या विरुद्ध व दुसऱ्याच्या बाजूचा असतो. त्यामुळे ज्यांच्याविरुद्ध निकाल दिला, ते पक्षकार न्यायाधीशाविरुद्ध वाटेल ते लिहीत नाहीत किंवा त्याच्यावर हल्ला करत नाहीत. कारण न्यायाधीशाची कोर्टातली वागणूक निःष्पक्षपाती, पारदर्शक व नम्र हवी. स्पष्ट व कणखर असणं, म्हणजे उद्धट असणं किंवा वकील व पक्षकाराचा अपमान करणं नाही. या सर्व पद्धतींचं, मूल्यांचं बाळकडू प्रत्येक न्यायाधीशाला शिकवलं जातं आणि त्यास/तीस तसं स्वतःला शिकवावंही लागतं. त्याचं/तिचं शिकणं निवृत्त होईपर्यंत सुरूच राहतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माझ्या न्यायालयीन निर्णयावर ही हीन दर्जाची प्रतिक्रिया होती. म्हणून मी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांना केतन तिरोडकर यांच्याविरुद्ध ‘कोर्टाचा अवमान’ या कायद्याखाली कारवाई करावी, असं पत्र लिहिलं. व्यक्ती म्हणून नाही, तर स्त्री म्हणून मला खाली आणण्याचा, तसेच हा लैंगिक छळाचा प्रकार होता. एखाद्या न्यायमूर्तीला स्त्री म्हणून हेटाळणं अयोग्य होतं.

माझ्या विनंतीवर काहीच कारवाई केली गेली नाही. त्यानंतर काही दिवसांतच माझी उच्च न्यायालयातल्या ‘Sexual Harassment Act’ खालील समितीमध्ये नेमणूक झाल्याचं मुख्य न्यायमूर्तींचं पत्र आलं. मी त्यास वरील कारणानं लेखी नकार दिल्यानं परत मोहित शहा यांनी त्या पोस्टवर काहीतरी कारवाई करण्याचं ठरवलं. त्यांनी पोलीस अधिकारी धनंजय कमलाकर यांना बोलावलं, पण पुढे काहीच झालं नाही.

मी त्यांना सुषमानं या पोस्टविरुद्ध त्याच दिवशी, ११ ऑगस्ट २०१५ रोजी ऑनलाईन पोलीस तक्रार केली असल्याचं सांगितलं (अशा पोस्ट सायबर गुन्ह्याखाली येतात, म्हणून इ-मेलद्वारा सुषमानं तक्रार केली होती.). मात्र पोलिसांनी त्यावर कोणतीच कारवाई केली नाही, ही कल्पना दिली. पण मोहित शहा लवकरच निवृत्त झाले. त्यांनी वेळेअभावी काही करता आलं नाही. परंतु त्यानंतर इतर महिला न्यायमूर्तींविरुद्धही तिरोडकर व इतरांच्याही पोस्ट फेसबुकवर येऊ लागल्या. मी आधी लिहिलं तसं सत्याची पाठराखण करणाऱ्या न्यायाधीशाला शेवटी विचित्र अशा हल्ल्यांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी मला महात्मा गांधी आठवतात. ‘सत्यमेव जयते’चा उद्घोष मनात कायम ठेवावा, हे हृदयात रुजलेलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

स्वीकार आणि समजूतदारपणा हे शहाणपणाचे निदर्शक आहेत आणि परमेश्वरानं या दोन्ही गोष्टी माणसाला उदारपणे दिल्या आहेत. काही प्रश्नांची उत्तरं नसतात, तर काही गुंते कधीच सुटत नाहीत. रमेशच्या खटल्यानं अज्ञात शत्रूंनी आमच्या आयुष्याचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही त्याचं इंद्रधनुष्य केलं. आमचा आवाज बंद होऊन आम्हाला बोलता येईना, तेव्हा आम्ही मूकपणे आमचं सुरेल गाणं थेट हृदयातून गात राहिलो. आम्ही निःशस्त्र लढलो, फक्त हात हातात घेऊन. न्यायावरची निष्ठा, न्यायसंस्थेवरचा अढळ विश्वास आणि आमचं चिरकाल टिकणारं प्रेम, यामुळे आम्ही दोघं जिवंत राहिलो!

ज्या वादळातून बाहेर आलो, ते वादळ आता शमलं होतं. सगळं कसं शांत, स्वस्थ झालं होतं.

या सगळ्या काळात आम्ही दोघांनी आनंदानं काळ घालवला, कारण आमची आमच्या कामावरची श्रद्धा व प्रेम. मला न्यायखात्यात प्रवेश घेतल्याचा कधीही पश्चात्ताप झाला नाही. मला लोकांसाठी काम करण्याचं समाधान मिळालं. संध्याकाळी घरी जाताना मी कायम मनात गाणं घेऊनच जात असे. रमेशसुद्धा त्याच्या नाटक व टीव्हीवरील कामांत गुंतलेला होता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

नियतीनं माझी नेहमीच विचित्र परीक्षा घेतली आहे. सर्वांत मोठा घाव घातला, तो मार्चच्या २०१८मध्ये! रमेशला चौथ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचं समजलं. रक्तदाब, मधुमेह इत्यादी काही नसलेल्या, उत्तम प्रकृती असलेल्या, गेली बत्तीस वर्षं एकही सिगारेट न ओढणाऱ्या रमेशला कॅन्सर झाला. अकरा महिने मोठ्या धैर्यानं व अत्यंत शांतपणे त्यानं कॅन्सरशी टक्कर घेतली, पण तो वाचला नाही. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी, ज्या दिवशी ‘जागतिक कॅन्सर दिन’ असतो, त्याच दिवशी तो त्याच्या शेवटच्या प्रवासासाठी निघून गेला. मी एकटीच मागे राहिले. आमच्या या जिवंत राहण्याची, त्या लढाईची गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी...

‘हे सांगायला हवं’ - मृदुला भाटकर

ग्रंथाली, मुंबई | पाने – १६० | मूल्य – २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......