भिलार : पुस्तकांचं गाव
ग्रंथनामा - झलक
टीम अक्षरनामा
  • सर्व छायाचित्रं : आनंद काटीकर
  • Thu , 04 May 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक भिलार Bhilar पुस्तकांचं गाव Books Village

महाबळेश्वरजवळील ‘भिलार’ या गावाची ओळख कालपर्यंत स्ट्रॉबेरीसाठी होती, आजपासून ते ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणार आहे. आज संध्याकाळी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ‘पुस्तकांच्या गावा’चं उदघाटन करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पुस्तकाच्या गावाची घोषणा केली होती, आज ती प्रत्यक्षात उतरलेली पाहायला मिळणार आहे.

……………………………………………………………………………………………

हा भिलार गावाचा कच्चा नकाशा. गावात २५ ठिकाणांचं ग्रंथालयात रूपांतर करण्यात आलं असून त्या ठिकाणी बसून मनसोक्तपणे पुस्तकं वाचता येणार आहेत. पुणे-सुरूर-वाई-महाबळेश्वर आणि सातारा-वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पुस्तकांच्या गावाचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. रंगरंगोटी करून संपूर्ण गाव आकर्षक करण्यात आलं आहे. ब्रिटनमधील 'हे ऑन वे'च्या धर्तीवर हे पुस्तकांचं गाव साकारलं आहे.

कथा, कादंबरी, कविता, ललित, बालसाहित्य, संतसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारातील सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त पुस्तके या ठिकाणी त्यांच्या विषयावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

भिलारची लोकसंख्या तीन-साडेतीन हजार. साधारण साडेपाचशे उंबऱ्यांचं हे गाव. सात घरं, सहा लॉज, तीन मंदिरं, दोन शाळा अन् एक खासगी कार्यालय या प्रकल्पात सामील झाले आहेत.

राज्य शासनाच्या या प्रकल्पासाठी स्वत्व या स्वयंसेवी संस्थेच्या सुमारे ७५ चित्रकारांनी गावातील निवडलेल्या २५ ठिकाणांची रंगरंगोटी करून सुशोभीकरण केलं आहे. या प्रकल्पासाठी एशियन पेंटस या कंपनीनेही मदत केली आहे.

एखादं गाव केवळ पुस्तकांचं असतं, पुस्तकप्रेमानं भारलेलं असू शकतं, याचा प्रत्यय भिलारमध्ये फिरताना येतो. पुस्तकांविषयी असोशी असणारी माणसं गावात सर्वत्र दिसतात.

महाबळेश्वर-पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. त्याचा फायदा होईल या अनुषंगाने भिलारची ‘पुस्तकांच्या गावा’साठी निवड करण्यात आली आहे. महाबळेश्वर-पाचगणी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची पावलं ‘पुस्तकांच्या गावा’त वळली, तिथं आपल्या आवडीच्या पुस्तकांच्या सहवासात काही काळ रमली, तर हे त्यातून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण होईल यात शंका नाही.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Rajendra Mundhe

Thu , 04 May 2017

mahiti purn lekh


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......