‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आ. श्री. केतकर
  • ‘प्रतिक्षमता’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 12 January 2026
  • ग्रंथनामा शिफारस प्रतिक्षमता Pratikshamta मोहन मद्वाण्णा Mohan Madwanna

‘प्रतिक्षमता’ हा शब्द आपण फारसा ऐकलेला नसतो. आपल्याला माहीत असते ती, फक्त प्रतिकारशक्ती. त्यामुळे ही ‘प्रतिक्षमता’ म्हणजे काय असा प्रश्न पडतो. प्रा. मोहन मद्वाण्णा त्यांच्या ‘प्रतिक्षमता’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच त्याचा उलगडा करतात. जैवविज्ञानामध्ये ‘प्रतिकारक्षमता’ म्हणजे बहुपेशीय सजिवांतील घातक सूक्ष्म जीवांना प्रतिकार करण्याची क्षमता. इंग्रजीमध्ये याला ‘इम्युनिटी’ असे म्हणतात. क्षमता आणि शक्ती यांचे नाते आहे. प्रतिक्षमतेत वाढ झाली की, प्रतिकारशक्तीही वाढते.

प्रतिकारक्षमतेत दोन बाबींचा समावेश होतो. विशिष्ट असलेले आणि विशिष्ट नसलेले घटक. (म्हणजे स्पेसिफिक अँड नॉन स्पेसिफिक काम्पोनन्टस). याचा उलगडाही ते करतात. विशिष्ट नसलेले घटक घातक जिवाणू शरीरात जाण्यास फक्त अडथळा आणतात. त्यांच्या प्रतिजन वैशिष्ट्याशी त्यांचा संबंध येत नाही. विशिष्ट घटक मात्र प्रतिक्षमता यंत्रणेतून प्रत्येक नव्या जीवाणू किंवा विषाणूजन्य आजारांविरुद्ध परकीय जीवाणूचा प्रतिकार करतो. म्हणजे ही गुंतागुंतीची जैविक यंत्रणा परकीय पेशी किंवा परकीय द्रव्य (बहुधा प्रथिन, विष) ओळखते आणि त्यानुसार ते द्रव्य सामावून घेणे किंवा नाकारणे, याची उपाययोजना केली जाते.

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो. आयुर्वेदातही वात, कफ आणि पित्त यांच्या बिघाडामुळे विविध रोग होतात, असे मानले जाते.

प्रतिक्षमतेचा पहिला उल्लेख अथेन्समधील त्थुसिडिडॅस (इ.पू. ४३०) यांनी तेथे आलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळी केला. एकदा हा आजार झालेल्याला पुन्हा तो होत नाही, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. ल्युकानस या कवीने त्याच्या ‘फ्रेझालिया’ या महाकाव्यात ‘इम्युनस’ या शब्दाचा वापर केला आहे. तो आफ्रिकेतील एका जमातीच्या सर्प विषाच्या प्रतिक्षमतेसंबंधात आहे.

ज्या वैज्ञानिकाने पूर्ण प्रतिक्षमता सिद्धान्त विकसित केला, त्या इल्या मायकॉव्हना १८८२मध्येच पेशीय भक्षण माहीत होते. लुई पाश्चर यांच्याबरोबर त्यांनी आजाराच्या जंतू सिद्धान्तावर काम केले. त्यानंतर युरोपमध्ये जीवाणूजन्य आजार, संसर्गजन्य आजार आणि प्रतिक्षमतेचा आरंभ देवीवरील लस उपचाराने झाला, पण प्रतिक्षमता उपचार त्याआधी हजार वर्षांपासून होत असल्याचे उल्लेख आहेत.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

देवी रोगाच्या फोडावरील खपलीच्या कोरड्या केलेल्या भुकटीचा (पावडरचा) वापर निरोगी व्यक्तीवर चिनी वैद्य करत होते. पंधराव्या शतकात भारत, ऑटोमन प्रदेश – सध्याचा तुर्किये, आणि भोवतीचे अरब युनानी वैद्य आणि पूर्व आफ्रिकेत देवीच्या कोरड्या खपल्या त्वचेवर घासून देवीला प्रतिबंध केला जात असे. जवळपास हजार वर्षांपासून असे उपचार होत असल्याच्या नोंदी आहेत. लसीकरणाची अधिक सुरक्षित पद्धत एडवर्ड जेन्नर यांनी शोधली. तिला १८८०मध्ये लसीकरण (व्हॅक्सिनेशन) जेन्नर यांच्या स्मरणार्थ लुई पाश्चर यांनी लसीची व्याख्या व्यापक केली आणि पोलिओ व्हॅक्सीन, मीझल्स (गोवर) व्हॅक्सीन असे शब्द वापरण्यात येऊ लागले.

या पुस्तकात प्रतिक्षमता संस्था, सहज प्रतिक्षमता, अनुकूल प्रतिक्षमता, निष्क्रिय प्रतिक्षमता, आरोग्यदायक प्रतिक्षमता उपचार, श्वेत पेशी, क्षीण प्रतिक्षमता आणि आरोग्य, स्वयंप्रतिक्षमता आजार, अवयवरोपण आणि प्रतिक्षमता, कर्करोगावरील प्रतिक्षमता उपचार, प्रतिक्षमता उपचारासाठी २०११चा नोबेल पुरस्कार, अशी अकरा प्रकरणे आहेत.

प्रतिक्षमता एका विशिष्ट ठिकाणी एकवटलेली नसते. विविध प्रकारच्या पेशी, उती, ग्रंथी आणि विशिष्ट प्रथिने मिळून ही संस्था बनते. शरीराचा घातक द्रव्यांशी संपर्क आल्यास प्रतिक्षमता यंत्रणा कामाला लागते. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत अनेक प्रकारच्या पेशींचा सहभाग असतो. या यंत्रणेत पांढऱ्या पेशी, प्लिहा, अस्थिमज्जा, लसिका संस्था-लीफॅटिक सिस्टिम, लसिका ग्रंथी, लसिका वाहिन्या,आणि यौवनलोपी ग्रंथीr (थायमस ग्लँड), टॉन्सिल्स, नासा गिलायू -अ‍ॅडेनॉइड, लहान व मोठ्या आतड्यांतील लसिका वाहिन्या यांचा समावेश असतो.

प्रतिक्षमता एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. शरीरात घातक अशा रोगाणूंचा (जीवाणू आणि विषाणू यांच्यासाठी ‘रोगाणू’ हा शब्द वापरला आहे) हल्ला झाला किंवा एखादी जखम उघडी पडल्याने झालेल्या संसर्गाला प्रतिक्षमता प्रतिकार करते. साधारण प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात काही प्रमाणात प्रतिक्षमता असते. प्रतिक्षमता काही प्रमाणात जन्मजात असते. लसीकरणाने तिच्यात वाढ होते. काही जणांत ती क्षीण असते. त्यांनी काय काळजी घ्यावी, हे डॉक्टर सुचवतात. योग्य आहार, व्यायाम आणि मद्यपान व धूम्रपान टाळले तर प्रतिक्षमता सुधारते. प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गतः सहज प्रतिक्षमता असते. ती परजीवींपासून शरीराचे रक्षण करते.

सहज प्रतिक्षमतेत त्वचा, सस्तन प्रण्यांच्या त्वचेतील तेल ग्रंथी, त्वचेवरील तेल, ओलसर नाक, कानातला मळ, जठर, लहान व मोठे आतडे यांची अंतःत्वचा, तोंड, घशातील आतल्या भागावर असलेल्या उती इत्यादी. यामुळे अनेक जीवाणू स्तरित त्वचेच्या थरातून शरीराच्या अंर्तभागात प्रवेश करू शकत नाहीत. प्रतिक्षमता यंत्रणेचे दोन भाग आहेत. सर्वसाधारण आणि विशिष्ट. सर्वसाधारण यंत्रणा कोणत्याही परजीवी विरुद्ध अडथळा निर्माण करते. म्हणजे संरक्षक भिंत, कुंपण यांच्यासारख्या पद्धतीने प्रतिकार करते, पण सर्वांचाच परिणामकारक पद्धतीने प्रतिकार करत नाही.

प्रतिकाराची दुसरी पद्धत म्हणजे काही पेशी प्रतिकारासाठी रसायने आवश्यकतेनुसार तयार ठेवतात. ही पहिली संरक्षण यंत्रणा आहे. दुसऱ्या रक्षक यंत्रणेत उती दाह आणि ताप येणे यांचा समावेश आहे. काही रासायनिक संकेतांमुळे उती दाह (इन्फ्लेमेशन) होतो. शरीराचे तापमान वाढणे बर्याच जीवाणूंना घातक असते. हीसुद्धा शरीराची जिवाणूंना प्रतिकार करण्याची सहज प्रतिक्षमता आहे. दोन दिवस ताप वाढल्याने जीवाणूंची संख्या आपोआप कमी होते.

शरीरातील श्वेतपेशी आणि लसिकाग्रंथी परजीवींना शरीराच्या परकीय पेशी म्हणून ओळखतात श्वेतपेशी रक्तातील तांबड्या पेशींहून मोठी असते. तिला केंद्रक असते. ती छद्मपादाच्या मदतीने हालचाल करते, परजीवी असलेल्या ऊतीमध्ये जाऊ शकते. ती बृहतभक्षी पेशी बनून संसर्ग झालेल्या ऊतीतील जीवाणू भक्षण करते. जीवाणूंबरोबर मोनोसाइट जीवाणूचे तुकडेही खाते. बृहतपेशी ही आकारमानाने मोठी श्वेतपेशी आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

निष्क्रिय प्रतिक्षमता ही क्रियाशील प्रतिक्षमता-द्रवीय प्रतिक्षमतेचे हस्तांतर. ही मातेकडून बालकाकडे येते. तिचे हस्तांतर कृत्रिमपणेही करता येते. नैसर्गिक अधिग्रिहत प्रतिक्षमता, उपार्जित प्रतिक्षमता, कृत्रिम निष्क्रिय प्रतिक्षमतेच इतिहास आणि व्यवहारातील वापर, पशी अवलंबी प्रतिक्षमता निष्क्रिय हस्तांतर (पॅसिव्ह ट्रान्फर ऑफ सेल-मिडिएडेड इम्युनिटी) तिचे फायदे-तोटे, आरोग्यदायक प्रतिक्षमता उपायांबाबत माहिती देताना, प्रतिक्षमता वाढवता येते का? 

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

जेव्हा परजीवी शरीराचा भाग नाही, हे निश्चित होते, त्या वेळी शरीरातील पांढऱ्या पेशी सायटोसिन नावाची प्रथिने बनवतात. बहुतेक सर्व पांढऱ्या पेशी आणि रक्तवाहिन्यांचा अंतःस्तर पेशी, सायटोसिन (‘सायटोसिन’साठी अद्याप योग्य मराठी शब्द नाही) निर्माण करतात. सायटोसिन प्रथिने  चाळीस प्रकारची आहेत. त्यामुळे पेशीविभेदन (डिफरेन्सिएशन), विस्तार (प्रॉलिफरेशन) आणि जनुक व्यक्तता (एक्स्प्रेशन) होण्यास मदत होते. अनुकूलन प्रतिक्षमता उपार्जित प्रतिक्षमता या नावानेही ओळखली जाते. सायटोसिनप्रथिने परजीवी पेशीही बनवतात. स्वपेशी आणि परजीवी पेशींनी बनवलेल्या सायटोसिनमुळे संसर्गग्रस्त नसलेल्या पेशीही सायटोसिन बनवतात. त्यांच्या एकत्र परिणामाने परजीवींची संख्या आटोक्यात राहाते.

सायटोसिनपैकी एक इंटरफेरॉन म्हणून ओळखले जाते. इंटरफेरॉनमुळे निरोगी पेशी काही विषाणू संसर्ग झालेल्या पेशीतून ते बाहेर पडते. इंटरफेरॉनमुळे निरोगी पेशी काही विशिष्ट प्रथिने स्रवतात. त्यामुळे विषाणूंच्या  पुनरुत्पानात अडथळा येतो. निरोगी पेशींना त्यातून संदेश मिळतो. इंटरफेरॉन बृहतभक्षी पेशी आणि इतर पेशींना क्रियाशील बनवते. सायटोसिनचा एक मोठा प्रतिक्षमता पेशी उत्तेजित करणारा गट म्हणजे इंटरल्युकिन. यानंतर लेखक नैसर्गिक मारक पेशी – कमांडोपेशी - माहिती देतात. कमांडो पेशी आकाराने मोठ्या असून त्यांचे केंद्रकही मोठे असते. त्या सतत रक्तातील संसर्गग्रस्त पेशींचा शोध असतात. कर्करोगाची वाढ थोपवण्याचा किंवा नैसर्गिकपणे आटोक्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे.

अनुकूलक प्रतिक्षमता (अ‍ॅडॉपिव्ह इम्युनिटी) उपार्जित प्रतिक्षमता या नावानेही ओळखली जाते. ती अतिशय वेगाने बदलक्षम (अ‍ॅडाप्टेबल) असण्याची दोन कारणे आहेत. कायिक परा उत्परिवर्तन या बदलामुळे प्रतिपिंडामध्ये विविधता येते. दुसरे जनुकीय पुनःसंयोजन. यामुळे पेशी प्रतिपिंडग्रही (अँटिबॉडी रिसेप्टर) लसिका पेशींच्या पृष्ठभागावर वैशिट्यपूर्ण पद्धतीने कार्य करतात. ग्राही स्मृती बी पेशी आणि स्मृती टी पेशी या दोन्हीमुळे प्रतिक्षमता प्रतिसाद आणि पेशी उद्भवी प्रतिक्षमता सक्रिय होते.  त्या जन्मभर कार्यरत राहतात. रोगाणूग्रही ओळखणे यामागील कारण पुनर्रचित जनुकांमध्ये आहे. नंतर प्रथमिक प्रतिक्षमता प्रतिसाद, लसिका पेशी (लिंफोसाइट), प्रतिजन सादरीकरण (अँटिजेन प्रेजेंटेशन), अपक्व व पक्व (इंडोजनस अँटिजेन्स) पेशी, अंतर्जात प्रतिपिंड, टीएच  आणि टीएच२ सहाय्यक पेशी प्रतिसाद, बी लसिका पेशी आणि प्रतिपिंड उत्पादन, समूहन, संपूरक सक्रियाकरण, ग्रहणक्षमता, निराकरण, प्रतिक्षमता स्मृती, निष्क्रिय स्मृती, क्रियाशील सक्रिय स्मृती, प्रतिक्षमता विविधता, अनुकूलन प्रतिक्षमता प्रकार, यांची माहिती दिली आहे.

निष्क्रिय प्रतिक्षमता ही क्रियाशील प्रतिक्षमता-द्रवीय प्रतिक्षमतेचे हस्तांतर. ही मातेकडून बालकाकडे येते. तिचे हस्तांतर कृत्रिमपणेही करता येते. नैसर्गिक अधिग्रिहत प्रतिक्षमता, उपार्जित प्रतिक्षमता, कृत्रिम निष्क्रिय प्रतिक्षमतेच इतिहास आणि व्यवहारातील वापर, पशी अवलंबी प्रतिक्षमता निष्क्रिय हस्तांतर (पॅसिव्ह ट्रान्फर ऑफ सेल-मिडिएडेड इम्युनिटी) तिचे फायदे-तोटे, आरोग्यदायक प्रतिक्षमता उपायांबाबत माहिती देताना, प्रतिक्षमता वाढवता येते का? क्षीण प्रतिक्षमता, आहार आणि प्रतिक्षमता, जीवनसत्त्वे आणि खनिजे, सुजीवाणू (प्रेबायोटिक्स), माशांचे तेल, दीर्घकाळ उपास, कुर्क्युमिन, उच्च मेद आणि उच व कॅलरी आहार, व्यायाम आणि प्रतिक्षमता आणि इतर प्रतिक्षमता घटक यांबाबत विवेचन केले आहे. श्वेत पेशी प्रकरणात त्यांचे प्रकार, कणिता पेशी-ग्रॅन्युलोसाइटस, अल्करागी-बॅसोफिल्स, आम्लरागी बा, लसिका पेशी, श्वेतपेशींची परिणामकारक स्थिती / परिणाम करणारे घटक यांबाबत माहिती आहे.

क्षीण प्रतिकारक्षमता आणि आरोग्याबाबत सांगताना सीडीसी- आजार प्रतिबंधासाठी घरातील वस्तू निर्जंतुक करणे, ताण नियंत्रण, पुरेशी विश्रांती, सकस आहार यांचे महत्त्व लेखक सांगतो. स्वयंप्रतिक्षमता आजारांत सार्वदेहिक आजार, अवयव विशिष्ट आजार, स्वयंप्रतिक्षमता व्याख्या, काही स्वयंप्रतिक्षम आजारांची लक्षणे, स्वप्रतिक्षमता त्वचा आणि संयोजित ऊती उपचार, पांढरे कोड; पचनसंस्थेशी संबंधित रक्तासंबंधी स्वयंप्रतिक्षमता आजार- प्रतिक्षमता रक्तक्षय-तांबड्या पेशींची कमतरता, पचनसंस्थेशी संबंधित स्वयंप्रतिक्षमता आजार, संप्रेरकावर परिणाम करणारे स्वयंप्रतिक्षमता आजार, चेतासंस्था संबंधित स्वयंप्रतिक्षमता आजार यांची माहिती देऊन लेखक म्हणतो की, अनेक प्रतिक्षमता आजार शरीरात होतात. काहींचे गंभीर परिणाम होतात. दिनचर्येवर त्याचे परिणाम होतात. बहुतेक स्वयंप्रेरणा प्रतिक्षमता आजार जीवघेणे नसतात, पण काही गंभीर असून त्यांपासून उतींची हानी होते. वेळेवर औषध, आहारात योग्यबदल आणि दिनचर्या यात बदल केल्याने आजाराची लक्षणे व परिणाम कमी होण्यास मदत होते.

अवयवरोपण आणि प्रतिक्षमता या प्रकरणात रोपण शस्त्रक्रियेचे काही प्रकार स्वयंरोपण (ऑटोग्राफ्ट), समजातीरोपण, (ऑलोग्राफ्ट), एबीओ अननुरूप (एबीओ इन्कॉम्पेटिबल), मूळपेशीरोपण (स्टेमसेल ट्रान्प्लांट), सांगून नंतर रोपित अवयव नाकारण्यामागील प्रतिक्षमता यांची माहिती आहे. प्रतिक्षमतेवरील संशोधनात रोपण विज्ञान आघाडीवर आहे. तरीही प्रतिक्षमता अवयव नाकारते, हा अद्याप मोठा अडथळा आहे. यातून सुधारित निदान आणि अधिक काळ अवयव प्रतिक्रियेशिवाय टिकवणे हा, आज तरी तुरळक अवयव उपलब्ध असल्याने, एवढाच पर्याय आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

यानंतर कर्करोगावरील प्रतिक्षमता उपचार या प्रकरणात त्या उपचाराच्या च्या दोन पद्धती, प्रतिक्षमता संस्था नेमके काय करते? तपासणी प्रतिबंधक उपचार कार्यपद्धत, स्वयंप्रतिक्षमता प्रक्रिया, कर्करोगावरील सायटोकिन उपचार, र्करोगावरील प्रतिक्षमता नियामक उपचार, कर्करोग लसी, वैयक्तिक नवप्रतिपिंड लसी, कृतक प्रतिपिंड उपचार, कर्कपेशी विघटक विषाणू उपचार यांबाबत सांगितले आहे.

शेवटचे प्रकरण ‘प्रतिक्षमता उपचारासाठी २०१८चा नोबेल पुरस्कार’ हे आहे. कर्करोगाने लाखो व्यक्ती मरण पावल्या आहेत. कर्करोग हे मोठे आव्हान आजतागायत शिल्लक आहे. शरीरातील प्रतिक्षमता संस्था कर्क पेशींवर परिणम करून कर्करोग आटोक्यात आणते, हा शरीरविज्ञान आणि औषधशास्त्रातील २०१८मध्ये दिल्या गेलेल्या नोबेल पुरस्काराच पाया आहे. जेम्स पी. अ‍ॅलिसन आणि तासुको हांजो यांना हा पुरस्कार देण्यात आला. लेखक म्हणतो की, २०१६मध्ये लसिका पेशीच्या कर्करोगाने बधित असलेल्या एका रुग्णवरील प्रतिक्षमता उपचार पूर्णपणे यशस्वी होण्यास २०१७ साल उजाडावे लागले. त्यांच्या मुंबईत एका रुग्णावर केलेल्या उपचाराचा आणि परिणामांचा मी साक्षीदार आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण बरा होण्यास अठरा महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर या उपचाराला २०१८मध्ये नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.

नंतर इंग्रजी शब्द आणि त्याचे मराठी नाव अशी शब्दावली देण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या अखेरीस संदर्भ दिले आहेत. त्यामुळे जिज्ञासूंना अधिक माहिती मिळू शकेल.

हे पुस्तक विद्यार्थ्यांनी, विशेष करून वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, तसेच वैद्यक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी वाचायलाच हवे. वापरलेल्या प्रत्येक इंग्रजी शब्दाला वा शब्दसमूहाला मराठीतील प्रतिशब्द-शब्दसमूह दिले आहेत आणि ज्यांचे अजून मराठीकरण झालेले नाही, ते शब्द तसेच ठेवले आहेत. सर्व इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगही दिले आहे. या बरोबरच भरपूर आकृत्याही आहेत. त्यामुळे पुस्तक समजणे सोपे जाते. त्याचबरोबर या क्षेत्रात संशोधनाला किती मोठा वाव आहे, हेही कळते.

‘प्रतिक्षमता’ - प्रा. मोहन मद्वाण्णा, संपादन - मराठी विज्ञान परिषद, मुंबई

आदर्श विद्यार्थी प्रकाशन, पुणे | पाने – ९६ | मूल्य - १५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.

aashriketkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 16 January 2026

मराठी प्रतिशब्दांबद्दल कौतुक. मराठी अशीच पुष्ट होणार आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......