वाचलीच पाहिजेत अशी काही पुस्तकं - भाग २
ग्रंथनामा - झलक
टीम अक्षरनामा
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 01 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक

‘अक्षरनामा’वर दर शुक्रवारी मराठी पुस्तकांची परीक्षणे, त्यातील काही भाग किंवा संबंधित लेखकांच्या मुलाखती प्रकाशित होतात. फेब्रुवारी २०१८ या महिन्यात ‘अक्षरनामा’वर आलेल्या पुस्तकांविषयी...

.............................................................................................................................................

आठवणी गुरुजींच्या - प्रा. मधुकर राहेगावकर

वैचारिक निष्ठा आणि वैयक्तिक ऋणानुबंध यात मानसिक संघर्ष निर्माण करणारे प्रसंग गुरुजींच्या आयुष्यात अनेकदा आले. त्या वेळी सारे दोषारोप सहन करूनही त्यांचा कल मानवी संबंधांकडे अधिक झुकलेला असे. जीवनावरील व माणसांवरील अतीव श्रद्धेने ते असेच वागत राहिले. स्वत: स्वीकारलेल्या वैचारिक तत्त्वाविरुद्ध वागून लोकनिंदेने भाजून जात असताना आपण कुणाच्या तरी ऋणाची किंमत मोजत आहोत, यात अंतिमत समाधान आहे.

​​‘नरहर कुरुंदकर : ते होते जीवित’  ​- ​संपा. प्रा. मधुकर राहेगावकर, अभंग प्रकाशन, नांदेड, पाने - १६७, मूल्य - २३० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4346

.....................................................................................................................................

अश्लील, बीभत्स, शी शी! - सुनील कर्णिक

हे खळबळजनक पुस्तक प्रकाशित होऊन आता सहा महिने झाले; पण अजून त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. जणू काही तो प्रकार आपल्या घरात घडेपर्यंत आपण त्याची दखल घेणार नाही आहोत. ‘भारतातील मुलांच्या लैंगिक शोषणाच्या विदारक कहाण्या’ असं या पुस्तकाचं वर्णन मुखपृष्ठावर केलेलं आहे. आणि खरोखर या कहाण्या थरकाप उडवणाऱ्या आहेत.

म्हाताऱ्या बायका काय कामाच्या? - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4351

.....................................................................................................................................

मराठी पुस्तकवाल्यांचा मूळ पुरुष - सुनील कर्णिक

ज्ञानप्रसारासाठी झपाटून काम करणारी माणसं समाजाला किती मोलाचा ठेवा देऊन जातात याचं नमुनेदार उदाहरण म्हणून विल्यम कॅरे आणि त्याचं सिरामपूर गाव यांची कहाणी खरोखर विलक्षण आहे. हा विल्यम कॅरे होता कोण? त्याने बंगालमधल्या सिरामपूर गावी, इतक्या जुन्या काळी मराठी पुस्तकं लिहिण्याचा आणि छापण्याचा खटाटोप कसा केला? ते पहिलं पुस्तक ‘अ ग्रामर ऑफ द मऱ्हाटा लँग्वेज’ या नावानं असावं, याचं नेमकं कारण काय?

सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4353

.....................................................................................................................................

मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे - सुनील कर्णिक

मराठी साम्राज्याचा कर्ता शहाजी किंवा शिवाजी नव्हे, तर मलिक अंबर आहे, असा भालचंद्र नेमाडे यांचा दावा आहे. ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’ या नावाची त्यांची एक पुस्तिका आहे. आपले मुद्दे पटवण्यासाठी नेमाड्यांनी छोट्यामोठ्या मर्मभेदक हकिगती सांगितल्या आहेत. नेमाड्यांचं हे सुबोध, सुरेख पुस्तक हिंदी-इंग्रजीसह सर्व भाषांमध्ये अवश्य अनुवादित व्हावं इतकं मोलाचं आहे.

मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4352

.....................................................................................................................................

‘महानगर’चे दिवस - सुनील कर्णिक

त्यांनी शिवसेनेशी झुंज दिली आणि तिच्या फुग्याला ठोसा लगावून त्याच्यातली हवा घालवली. त्यांनी ‘निर्भय बनो’ आंदोलन छेडलं...आणि मग ते गुंडाळून ठेवलं. ते सुटाबुटात टीव्हीवर येतात आणि आवाज चढवतात. तो सूटबूट हे प्रस्थापितपणाचं प्रतीक आहे, तर समोरच्या नेत्याला आक्रमकपणे कोंडीत पकडणं हे प्रस्थापित-विरोधाचं लक्षण आहे! त्यांच्या विचारांना खोली नाही. त्यांच्या दृष्टीला दूरचं दिसत नाही.

‘महानगर’चे दिवस ​- सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4348

.....................................................................................................................................

स्वत:च्या विरोधात चार शब्द - सुनील कर्णिक

‘महानगरचे सुनील कर्णिक हे महाबिलंदर आणि महाबेरकी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी साहित्यिक ‘तळ आणि गाळ’ उपसणारे अनेक लेख ‘महानगर’मधून लिहिलेले आहेत. आणि श्री. पु. भागवत किंवा नारायण सुर्वे यांसारख्या साहित्यिकाबद्दल ‘न छापण्याजोग्या (पण चविष्ट) गोष्टी’ स्वत:च लिहिलेल्या आहेत.’ वगैरे. या वर्णनातील ‘महाबिलंदर आणि महाबेरकी’ ही विशेषणं वाचून मला मनातल्या मनात घेरी आली.

महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4350

.....................................................................................................................................

छापण्याजोग्या गोष्टी, लिहिण्याजोग्या आणि वाचण्याजोग्याही - विजय तेंडुलकर

वास्तविक या लेखनात आलेली माणसे, त्यांचे जग मला अपरिचित नव्हते. इतकेच नव्हे तर त्यातले काही अतिपरिचयाचे होते. तरीही या लेखनाने मला रमवले, काही नवे दिले, विचाराला प्रवृत्त केले, हे त्याचे यश म्हटले पाहिजे. कर्णिक चांगले संपादक आहेत हे माहीत होते. पण ते चांगले लेखक आहेत हे आता कळले.

न छापण्याजोग्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २२० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4349

.............................................................................................................................................

कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावणारा कादंबरीकार - राम जगताप

या पुस्तकानंतर तरी मराठी वाचक आणि समीक्षक मराठी कादंबरीचे अक्षांश-रेखांश धसाला लावणाऱ्या श्याम मनोहरांकडे जरा सहृदयतेनं पाहतील, अशी आशा करायला हरकत नाही. आता प्रश्न एवढाच आहे की, मनोहर यांचं हे नवं पुस्तक वाचून मराठी समीक्षक त्यांच्या कादंबऱ्यांना नव्यानं भिडण्याचं धाडस करतील की नाही? जे करतील, त्यांना हे लक्षात ठेवावं लागेल की, जुन्या हत्यारांनी नव्या लढाया लढता येत नाहीत, जिंकता तर अजिबातच येत नाहीत.

श्याम मनोहर यांची पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा - 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4354

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य - रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

मार्क्सवाद, नवभांडवलवाद, सुप्रजननशास्त्र (Eugenics) नववसाहतवाद, पर्यावरणवाद, यासारख्या परस्परविरोधी विचारसरणीही वेगवेगळ्या कालखंडात डार्विनवादाशी नाते सांगतात (व त्याद्वारे आपला वैज्ञानिक आधार मजबूत असल्याचा दावा करतात). या एका बाबीवरूनदेखील डार्विनच्या कामगिरीचा आवाका व व्यामिश्रता (तसेच वादग्रस्तताही) स्पष्ट व्हायला हरकत नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4355

.............................................................................................................................................

कहाणी मानवप्राण्याची - मानवी संस्कृतीची चित्तथरारक रहस्यकथा - कुमार केतकर

‘कहाणी मानवप्राण्याची’ इतकी चित्तथरारक, उत्कंठावर्धक आहे की, तिचे काहीसे संक्षिप्त रूपही आपल्याला एखाद्या रहस्यकथेप्राणे गुंतवून टाकू शकते. ही सिव्हिलिझेशनची रहस्यकथा मानवी संस्कृतीची रहस्यकथा असली तरी ती ‘हू डन इट’ शैलीत एका रात्रीत वाचून संपवण्यासारखी नाही. मानसिक व वैचारिक रवंथ करीतच ती ‘पचवावी’ लागेल. पण तिची चव मात्र सतत चांगलीच राहील हे निश्‍चित.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4357

.............................................................................................................................................

वैताग, करुणा आणि उदासी या तीन पेड्यांची पाऱ्यासारखी कविता - आशुतोष जावडेकर

वैताग, करुणा आणि उदासी या तीन पेड्यांची वेणी बांधावी आणि चिमुरडी ‘अच्छा’ म्हणत कुठे दूर खेळायला निघूनही जावी, तशी कविता आहे विठ्ठलची. ती हातात येणारी नाही. ती पाऱ्यासारखीच आहे. त्या पाऱ्याचा स्पर्श, त्याची चकाकी, त्याचं ओघळणं याचा आस्वाद घेणं मात्र आपल्याला शक्य आहे. आणि हे काम आनंदाचं, मैत्रीचं आणि समृद्ध करणारं असं आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4386

.............................................................................................................................................

कुठे भिंत खचली, खांब कलथूनी गेले… - कुमार केतकर

रक्ताटे आणि कांदळकर जेव्हा या चिरेबंदी वाड्यात आले, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात, तेव्हा त्यांना लगेचच दिसू लागले की, वाडा तसा चिरेबंदी नाही! कुठे भिंत खचते आहे, खांब कलथूनी जात आहे असे त्यांना दिसू लागले. पण त्या अशा मोठ्या चिरेबंदी वाड्याची उद्ध्वस्त धर्मशाळा होईल हेही शक्य नसल्याचे त्यांना जाणवत होते.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383

.............................................................................................................................................

...म्हणून मला उजळ माथ्यानं कुणबीपण मिरवताना विशेष आवडतं - श्रीकांत देशमुख

बापूजी आयुष्यभर ज्या खेड्याविषयी, ग्रामस्वराज्याविषयी बोलले त्याला भिडून पिढ्यानपिढ्या जगणारा आणि मातीवर राबताना माती होणारा हा विश्वव्यापी समूह आहे. म्हणून मला उजळ माथ्यानं कुणबीपण मिरवताना विशेष आवडतं. कुणबीपण ही कुठल्याही अर्थानं मला जात, प्रदेश, धर्म, भाषानिष्ठ संवेदना वाटत नाही. शेती करणं हे पवित्र काम आहे, असं मानणारा थोरो यासाठीच मला थोर वाटतो.

श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4335

.............................................................................................................................................

‘हळक्षज्ञ’चा श्रीगणेशा! - सतीश तांबे

पठडीबाह्य विचार हे नेहमीच योग्य, उपयुक्त वा कामाचे असतात असं नाही. त्यामध्ये गफलतीही असू शकतात. मात्र विचारांच्या क्षेत्रात त्यांचा वापर हा अत्यंत आवश्यक असतो. तावून-सुलाखून घेतल्याशिवाय शुद्ध विचार निर्माण होणं असंभव असतं. विचारसंकोचाच्या काळात तर ‘हळक्षज्ञ’ विचारांची मोठीच गरज असते. चिकित्सा ही गोष्ट आपण यापुढे सांस्कृतिक क्षेत्रातून बादच करायची आहे का?.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4390

.............................................................................................................................................

पुन्हा सुप्रिया सुळे आणि वसंत पुरके यांची ओळख कुणाला सांगितली नाही! - हेरंब कुलकर्णी

मला त्यांचा राग येण्यापेक्षा माझाच राग येत होता. आपल्याला कुणीतरी दलाल समजावं. हाच मला माझा अपमान वाटला. आपण इतके विकाऊ लोकांना का वाटलो? आपण शिक्षण सुधारण्यासाठी काही मुद्दे मांडतो, पण ती तळतळ करत काही प्रश्न मांडताना त्याचा बाजार किती थंडपणे मांडता येतो, हे या प्रकरणात माझ्या लक्षात आलं. पुन्हा सुप्रिया सुळे आणि वसंत पुरके यांची ओळख कुणाला सांगितली नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4388

.............................................................................................................................................

अल्पकाळाचे मुख्यमंत्री, निर्णय मात्र प्रदीर्घ स्वरूपाचे - डॉ. व्ही. एल. एरंडे

कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना निलंगेकर राज्य विधिमंडळाचे नेते झाले होते. मुख्यमंत्रिपदावर आरूढ होताच निलंगेकरांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे एक मॉडेल तयार केले. काँग्रेस पक्षाने आपल्यावर टाकलेली ही जबाबदारी आपण तेवढ्याच समर्थपणे केली पाहिजे, अशी खुणगाठ उराशी बाळगून ते कामाला लागले. त्यांना मुख्यमंत्री म्हणून फार मोठा कालावधी मिळाला नसला तरी अल्पकाळातदेखील त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4389

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......