या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

वागळेंसारख्या ज्येष्ठ पत्रकारावर झालेल्या हिंसक हल्ल्याची बातमी, ‘लोकमान्य लोकशक्ती’ असलेलं ‘लोकसत्ता’सारखं प्रतिष्ठित-नामांकित वर्तमानपत्र इतकं ‘सामान्यीकरण’ करून देत असेल तर…

‘लोकसत्ता’ची ही बातमी वाचून अनेक प्रश्न पडतात. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहेत. ते नुसते पाहताना आपलासुद्धा थरकाप उडतो. हा हल्ला केवळ निखिल वागळे यांनाच ‘टार्गेट’ करून केला गेला, हेही त्या व्हिडिओमधून सरळ सरळ दिसतं. हल्लेखोर केवळ वागळे यांनाच ‘टार्गेट’ करताना दिसतात. तरीही ‘लोकसत्ता’च्या बातमीचं शीर्षक आहे – ‘पुण्यात पुरोगामी कार्यकर्त्यांवर भाजपचा हल्ला’.......

देशात ‘भयमुक्त वातावरण’ आहे, असे राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचे म्हणणे असेल, तर मग निखिल वागळे यांच्यासारख्या एका पत्रकाराची एवढी भीती का वाटतेय तुम्हाला?

पत्रकार निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्याचा काल संध्याकाळपासून सोशल मीडियावर सर्व थरांतून मोठ्या प्रमाणावर तीव्र शब्दांत निषेध केला गेला आहे. आणि कालच्या वागळेंच्या सभेला पुणेकरांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला, त्यावरून ही सभा तर यशस्वी झालीच, पण वागळे-सरोदे-चौधरी यांच्या ‘निर्भय बनो’ या सादेलाही सुजाण पुणेकरांनी पाठिंबा दिला आणि हिंसक हल्लेखोरांना सणसणीत चपराक लगावली, असेच म्हणावे लागेल.......

सावंत : ‘मासिकं ही फुप्फुसांसारखी असतात. ती भाषेचं रक्त सतत शुद्ध करतात’; रिंढे : ‘मराठीमध्ये वाचनसंस्कृती नाही, असं मला वाटतं’

आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ तेरा-चौदा कोटी आहे आणि त्यातल्या मराठी भाषिक लोकांची संख्या साडेआठ कोटी आहे. म्हणजे मल्याळीपेक्षा जवळजवळ तिप्पट. मल्याळी भाषेत एखाद्या लेखकाची कादंबरी लोकप्रिय ठरते, तेव्हा तिच्या दोन लाख प्रती जातात. मराठीतला लेखक जेव्हा बेस्टसेलर होतो, तेव्हा त्याच्या पुस्तकाच्या किती प्रती जातात? पाच हजार? दहा हजार? पन्नास हजार किंवा एक लाख? हा फरक पाहिल्यावर लक्षात येईल की, इथं वाचकांची.......

अर्णब गोस्वामीच्या अटकेमुळे भारतीय ‘पत्रकारिता’ अजिबातच धोक्यात आलेली नाही. उलट ती मोदी सरकार आणि त्यांच्या छत्रछायेखाली चरणाऱ्या ‘गोदी मीडिया’वाल्यांनीच धोक्यात आणलेली आहे!

अर्णब गोस्वामी यांची ‘पत्रकार’ म्हणून असलेली विश्वासार्हता कधीच धोक्यात आलेली आहे. ‘पत्रकारिते’च्या नावाखाली ते जी काही मीडिया ट्रायल्स, उद्दामपणा करत आहेत, त्यातून एकंदर भारतीय ‘पत्रकारिते’चीच विटंबना होत आहे. ती होऊ द्यायची नसेल तर देशातल्या ‘कणा’ शाबूत असलेल्या पत्रकारांनी, संपादकांनी, प्रसारमाध्यमांनी गोस्वामींच्या अटकेचा संबंध पत्रकारितेशी, माध्यमांच्या स्वातंत्र्याशी लावू नये.......