केशव वेंकटराघवन : ‘तुमची व्यंगचित्रं तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही सांगतात’
संकीर्ण - मुलाखत
राम जगताप
  • केशव वेंकटराघवन त्यांच्या चित्रांसह
  • Mon , 05 December 2016
  • द हिंदू The Hindu केशव वेंकटराघवन Keshav Venkataraghavan राजकीय व्यंचचित्र Political Cartoons

एका शतकाहून मोठी परंपरा असलेलं ‘द हिंदू’ हे इंग्रजी वर्तमानपत्र भारतीय पत्रकारितेत आजही आपला आब राखून आहे. विशेषत: दक्षिण भारतात ‘द हिंदू’चं स्थान एखाद्या अनभिषिक्त सम्राटाप्रमाणेच आहे. विश्वसनीयता आणि गुणात्मक व्यावसायिक यश यामुळे ‘द हिंदू’बद्दल देशभर आदराने बोललं जातं. विचारानं काहीसं डावं असलं तरी ‘द हिंदू’ची तटस्थता, निष्पक्षपातीपणा वाखाणण्यासारखा असतो. गतवर्षी ‘द हिंदू’ने २७ नोव्हेंबरपासून कुठलाही फारसा गाजावाजा न करता, कुठलाही डिंडिम न वाजवता आपली मुंबई आवृत्ती सुरू केली. त्याला नुकतंच एक वर्षं झालं आहे. या वर्षभरात ‘द हिंदू’ने आपली विश्वसनीयता महाराष्ट्रातही सिद्ध केली आहे. ‘द हिंदू’च्या संपादकीय पानावर केशव आणि सुरेंद्र या दोन व्यंगचित्रकारांची व्यगचित्रं रोज प्रकाशित होतात. संपादकीय पानावर एवढी मोठी जागा व्यंगचित्रासाठी देणारं ‘द हिंदू’ हे बहुधा एकमेव वर्तमानपत्र असावं. शिवाय ही व्यंगचित्रंही तितकीच नितांतसुंदर असतात. माणसाचा दृष्टिकोन त्याची भूमिका घडवत असतो. या व्यंगचित्रकाराची व्यंगचित्रं ही ‘द हिंदू’च्या उज्ज्वल परंपरेला साजेशीच असतात. किंबहुना त्यांच्यासारखे राजकीय व्यंगचित्रकार अखिल भारतीय पातळीवरही फारसे कुणी दिसत नाहीत. त्यामुळे ‘द हिंदू’च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने केशव वेंकटराघवन यांची ई-मेलद्वारे घेतलेली खास मुलाखत.

..................................................................................................................................................................

प्रश्न : असं म्हणतात की, ‘द हिंदू’चे कित्येक समर्पित वाचक पेपर हातात घेतल्या घेतल्या आधी संपादकीय पान उघडतात. तुमचं व्यंगचित्र पाहण्यासाठी...

केशव : हो. काही जणांनी मलाही तसं सांगितलंय. ‘द हिंदू’सारख्या संस्थेमध्ये तीन दशकं काम केल्यानंतर अशा प्रकारचा प्रतिसाद मला सन्मानाचा वाटतो.

प्रश्न : ‘हिंदू’मधल्या तुमच्या वाटचालीबद्दल तुम्हाला काय वाटतं?

केशव : या प्रवासाने मला जगण्याची रीत शिकवली. आपल्या भोवतीच्या विभिन्न परिस्थितींना समजून कसं घ्यायचं, भावनांमध्ये वाहून जाणं टाळत, त्यांच्याकडे कसं पाहायचं हे शिकलो. कलाकार, व्यंगचित्रकारांना दिल्या गेलेल्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने वापर करायला, लक्ष्मणरेषा पाळायला शिकलो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रश्न : तुम्ही १९८७ साली ‘द हिंदू’मध्ये रुजू झालात. खरं तर तुम्ही बँकिंगच्या क्षेत्रातून इथं आला होता. पण त्या क्षेत्राला तुम्ही कायमचंच अलविदा केलंत.

केशव : मी बँकेत काम करत होतो हे खरंय, पण त्याच वेळी मी ‘आनंद विकटन’ नावाच्या एका तामिळ मासिकासाठीही काम करत होतो. हे मासिक कला आणि व्यंगचित्रांना प्रोत्साहन देणारं होतं. कित्येक थोर थोर व्यंगचित्रकारांची चित्रं तिथं छापून आली आहेत. माझ्या बाबतीत असं झालं की, सरावातून, कथा आणि विनोदांसाठी चित्रं काढून काढून रेखाटनं करायचं प्राथमिक कसब माझ्या हाती आलं. त्यानंतर पूर्ण वेळ व्यंगचित्रकार होण्याचं आव्हान मी स्वीकारलं.

प्रश्न : राजकीय व्यंगचित्रकार म्हणून तुमची जडणघडण होण्यामध्ये ‘द हिंदू’च्या जी. कस्तुरी यांचाही वाटा होता का?

केशव : हो, १९८७ साली मी ‘द हिंदू’ मध्ये लागलो तेव्हा जी. कस्तुरी संपादक होते. त्यांनी माझ्यातल्या व्यंगचित्रकाराला घडवलं, हे सांगायला मला अभिमान वाटतो. ते व्यंगचित्रांबद्दल कधीच बोलायचे नाहीत की काही सांगायचे नाहीत. पण त्यांना काय आवडतंय, काय खटकतंय यातून मला त्यांची विचार करण्याची पद्धत समजायची. मुख्य म्हणजे पत्रकारितेचं जग कसं चालतं हे समजायचं. क्वचित कधी ते चित्राबद्दल अगदी थोडक्या शब्दांत काही मार्मिक टिपण्णी करायचे. त्यातून मला दिशा मिळायची.

प्रश्न :  तुम्ही आजवर १५,००० राजकीय व्यंगचित्रं काढली आहेत आणि १०,००० रेखांकनं केली आहेत, असं सांगितलं जातं. कसा होता हा अनुभव

केशव : खूप छान. प्रत्येक टप्प्यावर नवं काहीतरी शिकायला मिळालं. तुम्हाला परिस्थितीवर व्यंगात्म पद्धतीने टिपण्णी करता येते. जगाकडे वस्तुनिष्ठपणे पाहायला तुम्ही शिकता. पण मी माझ्या चित्रांची मोजदाद ठेवलेली नाही. त्यामुळे वर दिलेले आकडे माझे नाहीत. अर्थात ती हजारांच्या घरात आहेत हे खरं.

प्रश्न : तुमच्या पार्श्वभूमीबद्दल थोडं सांगा. या क्षेत्रात कसे आलात?

केशव : मी अगदी लहान असल्यापासून चित्र काढतो आहे. माझे आई-बाबा सांगायचे की, मी अगदी लिहायला सुरुवात करण्याआधी चित्र काढायला लागलो. म्हणजे मी शिकलेली पहिली भाषा ही चित्रांची आहे. मी १९७७ सालापर्यंत हैदराबादमध्ये शिकलो. पुढे माझ्या वडिलांची बदली झाल्यामुळे आम्ही मद्रास (चेन्नई)ला रहायला आलो. भारतीय आणि पाश्चात्य शैलींतील चित्रं पाहून त्यांची नक्कल करण्याचा छंद मला इथंच लागला. इथल्याच ग्रंथालयांमध्ये मला विविध चित्रकार आणि व्यंगचित्रकार यांचं काम पाहता आलं, त्याबद्दल वाचता आलं. या ‘होमवर्क’चा पुढे मला खूप फायदा झाला. चित्रांद्वारे (दृश्य माध्यमातून) व्यक्त होणं हे माझं बलस्थान होतं आणि तीच आवड मला व्यंगचित्रकार बनण्याच्या दिशेनं घेऊन गेली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

प्रश्न : लहानपणीच्या चित्रकलेबद्दलच्या काही आठवणी आहेत का?

केशव : लहानपणी मी आमच्या घराच्या फरशीवर चित्रं काढायचो. खिडकीतून दिसणारी वेगवेगळी दृश्यं हाच साधारणपणे त्या चित्रांचा विषय असायचा.

प्रश्न : तुमचं पहिलं चित्रं तुम्हाला आठवतं का?

केशव : नाही. ती फारच पूर्वीची गोष्ट झाली. पण माझ्याजवळ तेव्हाचे, काही फोटोग्राफ्स आहेत. एक फोटो मांजरीचा आहे, एकात तेव्हाच्या काळातली हातगाडी आहे. तेव्हा त्यावरून केरोसीन विकायचे.

प्रश्न :  डेव्हिड लो, आर.के. लक्ष्मण, ओ.व्ही. विजयन आणि समकालिनांपैकी मारिओ मिरांडा हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार तुमची प्रेरणास्थळं आहेत.

केशव : हो, लो हा मूळ प्रेरणास्त्रोत म्हणता येईल. त्याशिवाय ‘पंच’ आणि ‘मॅड’ चे व्यंगचित्रकार पॅट ऑलिफन्ट, जेफ मॅकनेली, रोनाल्ड सिअर्ले, पॅट चॅपाटे अशा अनेक व्यंगचित्रकारांचा माझ्या कामावर प्रभाव आहे. भारतीय व्यंगचित्रकारांमध्ये शंकर, लक्ष्मण, अबू, विजयन, सुधीर धर आणि मारिओ यांच्याकडून मी प्रेरणा घेत आलो आहे. त्यांनी या क्षेत्रात नवे प्रवाह तयार केले.

प्रश्न : तुमचा आवडता कलाकार कोणता आणि का?

केशव : एखाद्याचं नाव घेणं कठीण आहे. आजवर डेव्हीड लो यांची व्यंगचित्रं मला आदर्श वाटत आलेली आहेत. त्याची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही. कलेच्या क्षेत्रात कितीतरी गुणी मंडळी आपापल्या क्षेत्रात चमकत आहेत. त्यामुळे रसिकाच्या भूमिकेतून चांगलं, त्याचा आस्वाद घेणं उत्तम. त्यातूनच अधिक शिकता येतं.

प्रश्न : तुम्ही दर दिवशी सोशल मीडिआवर कृष्णाचं एक चित्र टाकता...

केशव : मला पेंटिंग करणं आवडतं. अगदी बालपणापासून मी ते करत आलोय. त्याचा माझ्या व्यंगचित्रांशी काहीही संबंध नाही. तिथं मी भारतीय कला आणि प्रतीकांचा अभ्यास करतो. भारतीय आणि पाश्चात्य चित्रकलाशैलीही मी बऱ्यापैकी हाताळल्या आहेत. कृष्णाच्या स्वरूपातील पारंपरिक प्रतीकात्मकता तशीच ठेवून, त्याचा वेगळा अन्वयार्थ काढण्याचा मी प्रयत्न करतो.

प्रश्न : तुम्ही तुमच्या चित्रांमधून पुराणांतील अनेक मिथकांचा वापर केला आहे. पण कृष्ण तुमच्या सगळ्यात जास्त आवडीचा आहे. खरं तर गणेशाचं रूप कलात्मक प्रयोगांसाठी अधिक मोकळीक देणारं आहे. पण तुम्ही हे प्रयोग कृष्णरूपात करता.

केशव : आपल्या महाकाव्यांमध्ये प्रतीकात्मकतेची रेलचेल आहे. आपल्या पुराणांचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की, त्यातील पात्रं, प्रतीकं यांच्याद्वारे अनेक अमूर्त संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, आपले ग्रंथ सर्वसामान्य माणसालाही मुखोद्गत असतात. ते त्यातील श्लोक पुन्हा पुन्हा म्हणत राहिल्यामुळे. म्हणजेच वाणीद्वारे. पोपटाच्या प्रतिमेतून ही गोष्ट दाखवण्यात आली आहे. माझ्या गुरूंमुळे मी कृष्णाकडे आकर्षित झालो. त्यामुळे मी कृष्णाची चित्रं काढत राहतो. पण तसाच काही प्रसंग असेल तर गणेश, शिव, देवींची चित्रंही काढतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रश्न : तुमच्या व्यंगचित्रांसाठी तुम्हाला कल्पना कुठून सुचतात?

केशव : परिस्थितीच्या निरीक्षणातून आणि विविध अभ्यासकांनी केलेल्या विश्लेषणांच्या सखोल वाचनातून. त्यातून ‘काय सांगायचं’ इथवर पोहोचता येतं. ‘कसं सांगायचं’ हे मग आपोआपच जमतं. व्यंगचित्रकारांच्या कामातला ९० टक्के वाटा हा काय म्हणायचंय हे ठरवण्याचा असतो. डेडलाइन डोक्यावर असते आणि काही केल्या विषय सापडत नसतो, तेव्हा मोठीच छळवादी परिस्थिती असते ती.

प्रश्न : डिजिटल ड्रॉइंगमुळे व्यंगचित्र रेखाटनाच्या तंत्रामध्ये खूप सुधारणा झाली आहे असं दिसतं...

केशव : काळ्या-पांढऱ्या रंगातली व्यंगचित्रं सगळ्यात चांगली आणि जास्त प्रभावी असतात, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. तंत्रज्ञान बदललं आणि मासिकांच्या छपाईमध्ये रंग वापरले जाऊ लागले. तेव्हापासून व्यंगचित्रं काढण्यासाठीही नवनव्या पद्धती वापरल्या जाऊ लागल्या आहेत. मीही चित्रांत रंग भरण्यासाठी डिजिटल माध्यम वापरतो. चित्र काढतो मात्र जुन्या-पुराण्या पद्धतीनेच. कागदावर रेखाटनं करून. त्यातून मिळणारा आत्मानुभव इतर कशातही नाही.

प्रश्न : चित्रकलेसाठी दिवसातला किती वेळ देता?

केशव : प्रत्यक्ष व्यंगचित्र काढण्याच्या कामासाठी तास-अर्धा तास  पुरतो. खरं तर त्याहूनही कमी वेळ लागतो. पण त्यासाठीचं वाचन, विषयापर्यंत पोहोचणं यासाठी भरपूर तास खर्च होतात.

प्रश्न : कलाकाराच्या चष्म्यातून तुम्ही आपल्या जगण्याकडे, इथल्या राजकीय परिस्थितीकडे आणि आपल्या समाजाकडे कसं पाहता?

केशव : आम्ही मंडळी परिस्थितीचं निरीक्षण करणारी आहोत. त्यामुळे आम्ही राजकीय, सामाजिक, व्यापारी, आर्थिक, जागतिक घडामोडी, खेळ अशा बातम्यांचा विषय बनणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा मागोवा घेत असतो. भारत तर अशा घडामोडींचं विद्यापीठच आहे. इथं शिकण्यासारखं किती काही आहे.

प्रश्न : सर्वसामान्य जनता आणि राजकारणी यांच्यातील दुवा बनता सामान्य माणसाच्या मनात असंतोष जागा करणं हे राजकीय व्यंगचित्रकाराचं कर्तव्य म्हटलं जातं.

केशव : हो, सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करणं,  तो काय विचार करतो हे समजून घेणं पण तो वेगळ्या, तरीही त्याला समजेल अशा प्रकारे मांडणं हे आमचं काम आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

प्रश्न : एखाद्या व्यक्तीचं व्यंगचित्र बनवणं खूप कठीण वाटतं असं कधी होतं का? एखादं उदहारण, अनुभव सांगता येईल का?

केशव : देखणे चेहरे व्यंगचित्रांत उतरवणं कठीण असतं. मला राजीव गांधी, सुनील गावस्कर यांची व्यंगचित्र काढण्यात अडचण वाटायची. व्यंगचित्र\अर्कचित्रासाठी वापरता येईल अशी काही विशेष खूबी त्यांच्या नीटनेटक्या चेहऱ्यांत नव्हती.

प्रश्न : या क्षेत्रात महिलांची संख्या फार नाही याचं काय कारण असावं?

केशव : काही महिला व्यंग्यचित्रकार होऊन गेल्या आहेत, पण त्यांची संख्या अगदीच तुरळक आहे. याची कारणं अनेक असू शकतील. कदाचित त्या इथं चिकाटीनं टिकून राहत नसाव्यात किंवा त्यांची जीवनशैली त्यांना अशा प्रकारचं कार्यक्षेत्र निवडण्याची मुभा देत नसावी.
 
प्रश्न : राजकीय व्यंगचित्रांच्या नख्या बोथट आल्या आहेत असं वाटतं का?

केशव : सकृतदर्शनी तसं वाटत असलं तरीही प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. एखादं चांगलं प्रकाशन आजही चांगल्या व्यंगचित्रकारांना व्यासपीठ देऊ शकतं. व्यंगचित्रकारांचं कसब जोपासण्यासाठी संपादकाशी उत्तम संवाद असणं मात्र अत्यंत गरजेचं आहे. ते आता दुर्मीळ झाले आहे.

प्रश्न : व्यंगचित्र रेखाटन हे एक गंभीर काम आहे आणि उच्च दर्जाचा कलाप्रकार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं?

केशव : हो. हे  गांभीर्यानंच करायचं काम आहे, कारण यात जबाबदारी जास्त आहे. जितकं अधिक स्वातंत्र्य; जबाबदारीही तितकीच अधिक असणार.

प्रश्न : सध्या समाजात वाढत चाललेली असहिष्णुता व्यंगचित्रकलेसाठी अडथळा ठरते आहे का?

केशव : आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर याचा परिणाम नक्कीच होतो. पण काहीही झालं तरीही आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगायलाच हवं. राजकारणी आणि सरकारकडून काही बाबतीत असहिष्णुता दाखवली जातेय हे खरं असलं तरीही नागरिक आणि प्रसारमाध्यमांकडून अशा गोष्टींना सातत्यानं आव्हानही दिलं जात असतं. आपली प्रसारमाध्यमं जागरूक आहेत.
वाचकांच्या बाजूनं सांगायचं तर अनेक जण सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यामुळे आपल्यावर कुणाचं तरी लक्ष आहे हे भान सतत असतं. पण शेवटी आपल्याला काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे मांडण्याची आणि त्यामागे ठामपणे उभं राहण्याची धमक प्रत्येक व्यंगचित्रकाराकडे हवी.  मग असहिष्णुतेचा अडथळा होत नाही. शेवटी हा तुमच्या भूमिकेचा प्रश्न आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रश्न : तुमच्या व्यंगचित्रांमध्ये उपरोध नसतो, नकारात्मकताही नसते. असे का?

केशव : ही कला बऱ्याच अंशी नकारात्मकतेवर आधारलेली आहे हे मला मान्य आहे, पण तुमची टिपण्णी वाचकांपर्यंत त्याला समजेल, उमजेल अशा पद्धतीनं पोहोचवणं हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. मला वाटतं व्यंगचित्रकारानं दर वेळी उपरोधी सूर लावण्याची किंवा कठोर विधानं करण्याची गरज नसते. एखादी कल्पना तुम्ही सूक्ष्म टिपण्णी करत, आपला आब राखत मांडू शकता.  जसजसा काळ उलटत जातो तसतशी तुमची व्यंगचित्रं तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही खूप काही सांगून जातात.

..................................................................................................................................................................

केशव यांचा ई-मेल - kamadenu@gmail.com

केशव यांचा ब्लॉग - http://kamadenu.blogspot.in

केशव यांचा ब्लॉग - https://laughingpen.wordpress.com/

केशव यांची ‘द हिंदू’मधील व्यंगचित्रं पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......