‘एकट्याचे गाणे’ : कविवर्य शंकर रामाणी यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्याच्याशी अविभाज्यपणे जोडली गेलेली त्यांची कविता, याचे दर्शन घडवणारे पत्रसंचित
ग्रंथनामा - झलक
परेश वासुदेव प्रभू
  • ‘एकट्याचे गाणे : कविवर्य शंकर रामाणी यांचे पत्रसंचित’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Fri , 20 January 2023
  • ग्रंथनामा एकट्याचे गाणे : कविवर्य शंकर रामाणी यांचे पत्रसंचित Yaktyache Gane परेश वासुदेव प्रभू Paresh Vasudeo Prabu शंकर रामाणी Shankar Ramani

‘एकट्याचे गाणे : कविवर्य शंकर रामाणी यांचे पत्रसंचित’ हा मौलिक ग्रंथ गोवा मराठी अकादमीतर्फे परेश वासुदेव प्रभू यांनी संपादित केला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या ग्रंथात रामाणी यांना मराठीतील जुन्याजाणत्या लेखकांपासून नवोदित लेखकांपर्यंत अनेकांना लिहिलेल्या पत्रांचा समावेश आहे. त्यातून रामाणी यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची काव्यधारणा, कविता, कविमनाची जडणघडण आणि काव्यनिर्मिती यांवर प्रकाश पडतो. या ग्रंथाला प्रभू यांनी लिहिलेल्या सविस्तर संपादकियाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

१.

कविवर्य शंकर रामाणी यांच्या आशयगर्भ गूढरम्य कवितेचे, तिच्या अम्लान, तेजस्वी शब्दकळेचे इंद्रजाल जाणकार मराठी काव्यरसिकांवर नेहमीच राहिले आहे. आपल्या आयुष्यामध्ये कवितेखेरीज रामाणींनी अन्य काहीही लिहिले नाही. आयुष्याची सहा दशके फक्त आणि फक्त कविता करणारा आणि ती प्रत्यक्ष जगणारा असा हा व्रतस्थ कवी.

खऱ्या अर्थाने रामाणी सर्वार्थाने ‘कविताव्रती’ होते. कवितेच्या या अविरत साधनेतून अवतरणारी त्यांची कविता सतत गुणवत्तेच्या चढत्या पायरीने आविष्कृत होत राहिली, हाही तिचा एक विशेष आहे. अशी सकस, सखोल आणि काहीशी गूढरम्य कविता लिहिणाऱ्या या थोर गोमंतकीय कवीची आणि त्याच्या कवितेची अस्सल ओळख नव्या पिढ्यांना घडावी, यासाठी या ग्रंथाचा खटाटोप केला आहे.

कविवर्य रामाणी यांच्या आयुष्यभराच्या वाटचालीतील उपलब्ध पत्रव्यवहाराचे हे संकलन आणि संपादन आहे. त्यामधून कविवर्य शंकर रामाणी यांचे एकूण व्यक्तिमत्त्व आणि त्याच्याशी अविभाज्यपणे जोडली गेलेली त्यांची कविता याचे अत्यंत जवळचे दर्शन काव्यरसिकांना घडावे, असा यामागील स्वच्छ, सरळ हेतू आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हा साहित्यिकांदरम्यानचा पत्रव्यवहार असल्याने वाङ्मयीन चर्चा हा त्याचा महत्त्वाचा भाग आहेच, परंतु त्यापेक्षाही रामाणींच्या स्वभावातील गुण-दोष त्यांच्या अवतीभवतीच्या सुहदांच्या आणि चाहत्यांच्या या पत्रोत्तरांमधून अपरिहार्यपणे प्रतिबिंबित होताना दिसतात. रामाणींच्या स्वभावाचे कंगोरे स्पष्ट करणारे अनेक उल्लेख त्यांना आलेल्या विविध साहित्यिकांच्या या पत्रांमध्ये आढळतील.

आपण पाठवलेल्या पत्राला दुसऱ्याने तत्परतेने उत्तर पाठवले नाही की, अतिशय अस्वस्थ होणारे आणि पत्रांमागून पत्रे पाठवणारे रामाणी, मागील पत्रात आपण पाठवलेल्या कवितेवर दुसऱ्याने आपले मत कळवले नाही तर विलक्षण नाराज होणारे, रागावणारे रामाणी, आपल्या कवितेतील शब्दाशब्दाप्रती सदैव सजग राहणारे आणि नेहमीच उत्कृष्टतेचा, परिपूर्णतेचा ध्यास घेणारे रामाणी, कुठे काही चांगले लिहिताना दिसलेल्या लेखक, कवींना आवर्जून पत्र पाठवून त्यांना प्रोत्साहन देणारे, कौतुक आणि मार्गदर्शन करणारे रामाणी अशी त्यांची अनेक मनस्वी रूपे या पत्रांमधून प्रकटताना दिसतील.

आपल्या कवितेविषयीचे इतरांचे मत विचारीत राहिल्याशिवाय रामाणींना चैन पडत नसे. आपल्या पत्राचे तत्परतेने उत्तर आले नाही तरी ते अस्वस्थ होत आणि पत्रांमागून पत्रे पाठवत राहत. या त्यांच्या सवयीमुळे विजय तेंडुलकरांनी एका पत्रात त्यांना लिहिले आहे, “तुम्हाला तुमच्या कवितेच्या शीलाविषयी शंका असल्यासारखे तुम्ही आम्हा ‘धोब्यां’ना मते विचारीत राहता. आम्हाला ती कशी वाटते, या काळजीने ग्रस्त होता. तुमच्या कवितेसारखी कुलीन, स्वच्छ चारित्र्याची, एकनिष्ठ आणि वर अलोट देखणी कविता क्वचित भेटते. त्यात ती विचाराने खोल आणि शहाणी आहे. मध्येच तिच्या अंगात पिसे संचारते आणि ती कुणाची रहात नाही. स्वैर उधळते. हेही तिचे रूप थक्क करणारे.”

रामाणींचे व्यक्तींविषयीचे, साहित्याविषयीचे ग्रह पूर्वग्रह ठाम असत. “मला भावेल असे बोल, नाही तर कट्टी असे काकांचे असायचे” असे त्यांचे पुतणे कै. श्रीकांत रामाणी यांनी ‘अपरांतक’ च्या शंकर रामाणी विशेषांकासाठी लिहिलेल्या लेखात नमूद केले आहे. “एखाद्याविषयी रामाणींनी ग्रह करून घेतला की, तो कायम राही. कितीही समजावले तरी ते मत बदलत नसे”, असा रामाणींचा सहवास दीर्घकाळ लाभलेल्या कोकणी कवी माधव बोरकर यांनी ‘जाग’ या कोकणी नियतकालिकातील एका लेखात त्याला दुजोरा दिला आहे. प्रल्हाद वडेर आणि रामाणी यांची प्रदीर्घ काळची घनिष्ठ मैत्री केवळ एका लेखात वडेरांनी त्यांच्या कवितेत त्याच त्याच प्रतिमा पुन्हा पुन्हा येतात, असा उल्लेख केल्याने १९८७ साली कशी तुटली, त्याचा किस्सा वडेरांनीही एका लेखात वर्णिलेला आहे.

अर्थात, रामाणींचे हे रूप त्यांच्या जवळ वावरलेल्या माणसांच्या दृष्टिकोनातून टिपले गेलेले. प्रत्यक्षात त्यांनी लिहिलेली आणि त्यांना आलेली पत्रे यातून प्रकटणारे रामाणी कसे आहेत?

२.

बा. भ. बोरकरांना आलेल्या पत्रांचा ‘बाकी संचित’ हा संग्रह दोन वर्षांपूर्वी मी संपादित केला, तेव्हा त्याला लिहिलेल्या प्रस्तावनेत ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी लिहिले होते, “पत्र हे एक ठिकाण असे आहे की, जिथे माणसे लेखकासारखी, प्रकाशकासारखी लिहीत नाहीत; माणसे माणसांसारखी लिहितात. सुखाचे, दुःखाचे प्रसंग एका जिवलग पातळीवर येऊन वाटून घेऊ पाहतात. कधी कधी पत्रांमधूनच शब्दांऐवजी हात हातात देतात घेतात.” किती खरे आहे हे! या पत्रसंवादातूनही रामाणींचे व्यक्तिमत्त्व आणि त्याचे विविध आयाम आपल्यापर्यंत पोहोचू शकतील असे निश्चितपणे वाटते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पाहणाऱ्याला रामाणींचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अबोल, आपल्याच विश्वात रममाण झालेले दिसे. भोवतीच्या जगाशी जणू काही संबंधच नसल्यागत लौकिक जीवनात वावरताना दिसणारे रामाणी कोणाचे काही लिखाण विशेष वाटले, आवडले की अत्यंत तत्परतेने आणि आवर्जून त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवण्यासाठी, पुढील लेखनास प्रोत्साहन देण्यासाठी कसे धडपडत त्याची साक्ष या पत्रोत्तरांमधून मिळते. माणसांमध्ये सहसा न मिसळणारे आणि साहित्यिक कार्यक्रम व प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच चार हात दूर राहत आलेले रामाणी आलेल्या पाहुण्यांच्या आतिथ्यामध्ये मात्र कोणतीही कसर राहू देत नाहीत. स्वखर्चाने त्यांचे मनः पूर्वकतेने आगतस्वागत करतात. दूरस्थ मित्रांशी वर्षानुवर्षे सतत पत्रव्यवहार जागता ठेवून ती नातीही जिवापाड जपतात. एका तपस्वी कवीच्या मनाचे हे असे गुंतागुंतीचे कंगोरे ही पत्रे उलगडल्याविना राहत नाहीत.

रामाणींची कविता सर्वार्थाने ‘एकल्याचे गाणे’ जरी असले तरी त्यांना एकलकोंडे म्हणता येणार नाही. त्यांचा विपुल पत्रव्यवहार, स्वतःहून इतरांना पत्रे पाठवून अभिनंदन करण्याची, कौतुक करण्याची त्यांची वृत्ती, आल्या - गेलेल्याचे मनःपूर्वकतेने पदरमोड करून आतिथ्य करण्याचे त्यांच्याकडून दाखवले गेलेले सौजन्य हे पाहिले तर कोणी त्यांच्यावर एकलकोंडेपणाचा आरोप करण्यास धजावणार नाही.

रामाणींचा प्रदीर्घ सहवास लाभलेल्या वि. ज. बोरकरांनी आपण त्यांना प्रथमच भेटायला गेलो, तेव्हा ‘सत्यकथे’त आपल्यासोबत ज्याची कविता प्रसिद्ध झाली आहे, असा तरुण कवी भेटीला आल्याचे लक्षात येताच त्यांनी कसे आपुलकीने स्वागत केले, घरी राहायला येण्याचे आर्जव कसे केले, ते ‘कविता आकळण्याची वेळ’ या ‘प्रास’ या आपल्या लेखसंग्रहातील एका लेखात विस्ताराने सांगितले आहे.

गोव्यात रामाणींकडे येऊन राहून गेलेल्या अनेक पाहुण्यांनी त्यांच्या आतिथ्याचे भरभरून कौतुक केलेले या पत्रांतूनही दिसते. ‘आपल्या स्नेहशील सौजन्याची ओळख पटली. अधिक काळ आपल्या संगतीत घालवू शकलो नाही याची रूखरूख वाटली’, असे श्री. बा. जोशी यांनी पत्रातून कळवले आहे, तर ‘तुमच्याकडचा मुक्काम आनंदाचा झाला’ अशी पावती मित्र श्रीनिवास विनायक कुलकर्णीनी दिली आहे. परंतु याच कुलकर्णीनी दिलेल्या आमंत्रणावर त्यांच्याकडे ‘साहित्यिक हवामान शून्य’ असेल, तेव्हाच आपण येऊ असे कळवायलाही रामाणी विसरत नाहीत.

चांगल्या लेखनाचे रामाणी नेहमीच स्वतःहून पत्र पाठवून कौतुक करताना, अभिनंदन करताना दिसतात. ‘कवितारती’चे संपादक पुरुषोत्तम पाटील त्यामुळे एका पत्रात लिहितात, “तुमच्यासारखा चांगल्या कवितांवर जीव लावणारा माणूस मी दुसरा पाहिला नाही.”

रामाणी कवितेवर भरभरून प्रेम करत आले. आपल्याच नव्हे, तर इतरांच्या कवितांनाही तत्परतेने दाद देण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. अनेक नवोदित कवींना त्यांनी ज्या आपुलकीने कौतुकाची दाद दिली आहे तो दिलदारपणा साहित्यजगतात आजही विरळाच आहे. स्वतःच्या कवितेच्या शब्दाशब्दाबाबत ते जसे सजग असत आणि इतरांची मतं विचारत, त्याचप्रमाणे इतरांच्या कवितांतील शब्दांची आणि ओळींची फिरवाफिरव करण्याच्या सूचनाही ममत्वाने ते करत असत. रामाणींनी सुचवलेल्या बदलांना सौजन्यपूर्वक पण ठामपणे नाकारणारी बा. भ. बोरकर, दा. अ. कारे यांची पत्रेही या संग्रहात आहेत. ‘आपल्या सूचनांचा माझ्या कवितेच्या विकासाला उपयोग होईल’ असे मंगेश पाडगावकर लिहितात, तर ‘तुमच्यासारख्या रसिक, गुणग्राही स्नेह्यांचा आधार वाटतो आणि धाकही’, अशी भावना विजया राजाध्यक्ष व्यक्त करतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मिलिंद बोकील, महेश केळुसकर, प्रवीण बांदेकर, अशा असंख्य नव्या कवी/लेखकांचे रामाणींनी आवर्जून पत्र पाठवून कौतुक केलेले दिसते. “केवळ कविताच जगणाऱ्या तपस्वी माणसानं माझ्यासारख्या कालच्या पोराची आपणहून दखल घ्यावी ही अमोल गोष्ट आहे,” असे महेश केळुसकर यांनी एका पत्रात लिहिले आहे, तर “आपल्यासारख्याची कौतुकाची पाठीवर पडणारी थाप खूप बळ देते”, अशी भावना प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली आहे.

मात्र, रामाणींच्या अशा सूचनापर पत्राचा काहींना राग आल्याचीही उदाहरणे आहेत. कवी वसंत सावंत यांचे असे संतापाने खदखदणारे एक पत्र या संग्रहात आहे. मात्र, हेच वसंत सावंत निधन पावले, तेव्हा महेश केळुसकर यांना लिहिलेल्या पत्रात रामाणी लिहितात -

“कविवर्य वसंत सावंत यांचे २३ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाल्याचे वाचून अतिशय वाईट वाटले. एक चांगला, मनमोकळ्या स्वभावाचा, आपल्या कवितांतून कोकणातल्या निसर्गाची विविध प्रत्ययकारी रूपे उत्कटतेने साकार करणारा कवी अकाली गेला याची हळहळ वाटली. अखेर आपण सगळेच नियतीशरण आहोत हे जाणवून देखील कविमित्र सावंत गेल्याने मन सुन्न झाले.” सावंत यांच्या अंत्यसंस्कारांवेळी स्मशानातील शोकाकुल वातावरणात त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने केळुसकर, अरुण म्हात्रे व परेन जांभळे यांनी काव्यगायन केल्याबद्दल ‘हा प्रकार अनौचित्यपूर्ण वाटल्या’ची खरडपट्टी रामाणींनी काढलेली दिसते.

पत्रांतून रामाणी सर्वांशी जोडलेले राहिले, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र एक प्रकारचा साहित्यिक अलिप्तपणा रामाणींनी सदैव जपला.

‘कोरड्याच जिव्हाळ्याची

इथे देणाऱ्याची भाषा,

इथे उमाळ्यावाचून

ओला डोळ्यांना दिलासा’

असाच दुनियेचा अनुभव आल्यामुळे असेल, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सर्वांपासून एक अंतर राखूनच ते राहिले. मित्र प्रल्हाद वडेर यांनी त्यामुळे “तुमचा साहित्यिक अलिप्तपणा समजला. तुम्हालाच तो जमू शकतो. मला मात्र तो जमणारा व परवडणाराही नाह”, असे एका पत्रात कळवले आहे. बा. भ. बोरकर तर रामाणींना म्हणायचे की, ‘मी लोकान्ती, तर तुम्ही एकान्ती कवी आहात!’ रामाणींच्या या वागण्याची सुसंगती अनेकांना लागत नसे.

“रामाणींचा आणि माझा सहवास गेल्या चाळीस-पन्नास वर्षांचा. हा माणूस मी पूर्णपणे कधीच समजू शकलो नाही, तशीच त्यांची कविताही”, अशी कबुली त्यांचे एकेकाळचे मित्र वि. ज. बोरकर यांनी दिली आहे. रामाणी हे आपल्यासाठी नेहमीच एक गूढ होऊन राहिले असल्याचे बोरकरांनी आपल्या ‘प्रास’मधील ‘कविता आकळण्याची वेळ’ या लेखात म्हटले आहे. रामाणींच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या कवितेचे हे गूढ उकलण्यास हा पत्रव्यवहार आपल्याला निश्चितच साह्यभूत ठरेल, याची खात्री आहे.

३.

रामाणींच्या जिव्हाळ्याच्या माणसांची ही सारी पत्रे या संग्रहात दिली आहेत. रामाणींच्या प्रदीर्घ काव्यजीवनाला साथसोबत करणाऱ्या या साऱ्या सुहृदांची ही पत्रे आहेत. रामाणींच्या व्यक्तिमत्त्वावरही त्यातून अनेक कवडसे पडत राहतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

रामाणींनीच म्हटल्याप्रमाणे, “काळ हा बुलडोझरासारखा असतो. तो सर्व भुईसपाट करत असतो.” त्यामुळे या सर्वभक्षक काळापासून वाचलेली ही पत्रे या पुस्तकामध्ये संकलित, संपादित करून, त्यातील खासगी हकीकती आणि ख्यालीखुशालीचा भाग शक्यतो वगळून, वाङ्मयीन महत्त्वाचा आणि पत्रलेखकाच्या तसेच रामाणींच्या व्यक्तिमत्त्वावर अधिक प्रकाश टाकू शकेल, असा आशय पुढील पिढ्यांपर्यंत ठेवण्याचा हा प्रांजळ प्रयत्न आहे. जी पत्रे उपलब्ध झाली, त्यातून अगदी वेचून, निवडून ही पत्रे या संग्रहात प्रस्तुत केली आहेत. पत्रलेखकांमध्ये दुर्गाबाई भागवत आहेत, विजय तेंडुलकर आहेत, पुलं व सुनीताबाई आहेत, बा. भ. बोरकर, दा. अ. कारे, शंकर वैद्य, मंगेश पाडगावकरांसारखे कवी आहेत, इंदिरा संत, शांता शेळके यासारख्या ज्येष्ठ कवयित्री आहेत, द. ग. गोडसे, वसंत सरवटेंसारखे चित्रकार आहेत, पं. जितेंद्र अभिषेकी, ज्योत्स्ना भोळे, प्रभा अत्रे यांच्यासारखे गायक गायिका आहेत, श्री. पु. भागवत, राम पटवर्धन, म. सु. पाटील, पुरुषोत्तम पाटील, आनंद अंतरकर यांच्यासारखे संपादक आहेत, डॉ. प्रल्हाद वडेर, डॉ. म. द. हातकणंगलेकर, यांच्यासारखे समीक्षक आहेत, अनेक तत्कालीन नवोदित व आजचे प्रस्थापित कवी लेखक आहेत.

वास्तविक रामाणींचा द. ग. गोडसे, जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर, पु. शि. रेगे यांच्याशी अतिशय महत्त्वपूर्ण वाङ्मयीन पत्रव्यवहार होता, तो काळाच्या ओघात गायब झाला आहे. श्री. पुं. ची काही महत्त्वाची पत्रे वासंती मुजुमदार संपादित ‘श्री. पु. भागवत : व्यक्ती आणि संपादक’ या ग्रंथात, जी.एं.वरील पत्रे त्यांच्या पत्रसंग्रहाच्या चौथ्या खंडात, तर चिं.त्र्यं.ची काही पत्रे जया दडकर संपादित ‘आदिपर्व’मध्ये आलेली आहेत. मात्र, रामाणींच्या संग्रहातील अत्यंत मौलिक अशी द. ग. गोडसे यांची जवळजवळ १५५ पत्रे सर्वतोपरी प्रयत्न करूनही सापडू शकली नाहीत. ही पत्रे उपलब्ध झाली तर या ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीमध्ये ती नक्कीच समाविष्ट केली जातील, कारण वाङ्मयोभ्यासकांसाठी तो ठेवा असेल.

स्वतः शंकर रामाणी यांनी आपला संपूर्ण जीवनवृत्तांत अरुणा ढेरे यांना लिहिलेल्या एका प्रदीर्घ आठ पानी पत्रात कथन केला होता. श्रीमती ढेरे यांनी अत्यंत जिव्हाळ्याने ते पत्र शोधून उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. कविवर्य शंकर रामाणी यांना आलेली मान्यवर साहित्यिकांची पत्रे हा या पुस्तकाचा पाया आहे.

गोव्याच्या काव्यपरंपरेतील महत्त्वाची त्रिमूर्ती म्हणजे कविवर्य दामोदर अच्युत कारे, बा. भ. बोरकर आणि शंकर रामाणी. कै. दा. अ. काऱ्यांच्या ‘नन्दादीप’ या एकुलत्या एका काव्यसंग्रहाला नव्या रूपामध्ये संपादित करून २०१९ साली तो प्रकाशित केला होता. त्यानंतर २०२० मध्ये कै. बा. भ. बोरकर यांची कवी म्हणून जडणघडण दर्शविणाऱ्या पत्रांचे संपादन ‘बाकी संचित’ या नावाने केले. २०२१ साली गोव्याचे असेच एक प्रतिभावंत सुपुत्र कै. गोपालकृष्ण भोबे यांच्यासारख्या एका अलक्षित व्यक्तीचे चरित्र आणि साहित्य ग्रंथरूपाने प्रकाशात आणता आले. आता २०२२ साली कविवर्य रामाणी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे हे पत्रसंचित आपल्यापुढे आणले आहे. ते नुसतेच आपल्यापुढे ठेवण्याऐवजी त्याच्या अनुषंगाने शंकर रामाणींचा संपूर्ण साधार चरित्रपटही येथे प्रथमच मांडला आहे. त्यांच्या कवितेची त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संगती लावण्याचाही प्रयत्न केला आहे. पत्रांना दिलेल्या तळटिपा साहित्याच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील.

रामाणींची कविता म्हणजे ‘पायफसणीची वाट’ आहे. तिचा अर्थ उलगडण्यासाठी आधी त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि जीवनप्रवास समजून घेणे अपरिहार्यच ठरते. त्यामुळे त्या दृष्टीने वाङ्मयाच्या अभ्यासकांना या साऱ्या धडपडीतून शंकर रामाणी आणि त्यांची कविता अभ्यासण्याची निश्चित दिशा सापडेल, अशी आशा बाळगतो.

‘एकट्याचे गाणे : कविवर्य शंकर रामाणी यांचे पत्रसंचित’ – संपा. परेश वासुदेव प्रभू

गोवा मराठी अकादमी, पणजी | पाने - ४०८ (मोठा आकार) | मूल्य – ४०० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......