अजूनकाही
‘GENOME : The Autobiography of a Species’ हे मॅट रिडले यांचे इंग्रजी पुस्तक आजवर जगभरात अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले आणि मोठ्या प्रमाणावर वाखाणलेले गेलेले आहे. नुकताच त्याचा मराठी अनुवाद ‘जीनोम : २३ गुणसूत्रांची चित्तवेधक आत्मकथा’ या नावाने प्रकाशित केला आहे. हा अनुवाद डॉ. सुनीती धारवाडकर यांनी केला असून तो मधुश्री पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. या पुस्तकाला मूळ लेखकाने लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
प्रस्तुत पुस्तकातून मी तुम्हाला आपल्यात असलेल्या आनुवंशिक गुणांविषयीच्या (हेरीडेटरी क्यारेक्टरीस्टिकस) मनोरंजक गोष्टी सांगणार आहे. प्रत्येक सजीवाचे जन्मजात असे (आई-वडिलांकडून आलेले) आनुवंशिक गुणधर्म असतात. ते त्याच्या पेशींमध्ये असलेल्या गुणसूत्रांत (क्रोमोझोम्स) साठवलेले असतात. आणि गुणसूत्रे डीएनए (डिओक्सिरिबो न्यूक्लिक अॅसिड) या जीवरेणूपासून बनलेली असतात. म्हणजे शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेला डीएनए हा आनुवंशिकतेचा जीवरेणू आहे. या भल्यामोठ्या डीएनए रेणूचे काही विशिष्ट छोटे भाग म्हणजे जनुके (जीन्स)!
सजीवाच्या आनुवंशिकतेचे गुणधर्म गुणसूत्रांतील जनुकांत असतात आणि ही जनुके डीएनए या जीवरसायनाची बनलेली असतात.
आता आपण आपल्याकडे- माणसाकडे येऊ. माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये २३ गुणसूत्रांच्या जोड्या असतात. मानवी जनुकांचा संपूर्ण संच, सर्व जनुकीय सामग्री म्हणजे मानवी जीनोम (जनुक संचय)! हा जिनोम माणसाच्या पेशींमध्ये असलेल्या केंद्रकामधील (न्यूक्लियस) २३ वेगवेगळ्या गुणसूत्रांच्या जोड्यांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत असतो. २३ गुणसूत्र-जोड्यातील २२ जोड्यांना त्यांच्या आकारांनुसार क्रमांक दिले गेले आहेत. सर्वांत मोठी जोडी - क्रमांक १ ते सर्वांत लहान जोडी क्रमांक २२. उरलेल्या २३व्या जोडीमध्ये दोन लैंगिक गुणसूत्रे - एक मोठे X आणि एक छोटे Y - असतात. स्त्रियांमध्ये दोन X ची जोडी, तर पुरुषांमध्ये एक X आणि एक Y अशी जोडी असते. आकारानुसार गुणसूत्र X हे गुणसूत्र क्रमांक ७ व ८ यांच्यामध्ये मोडते (७ पेक्षा मोठे आणि ८ पेक्षा लहान), तर गुणसूत्र Y हे सर्वांत लहान गुणसूत्र आहे.
२३ ही संख्या काही खास महत्त्वाची किंवा विशेष नाही. कपी (एप)मध्ये असलेल्या आपल्या जवळच्या नातेवाईकासारख्या प्राणीजातीमध्ये यापेक्षा जास्त गुणसूत्रे, तर काही प्राणीजातींमध्ये कमी गुणसूत्रे असतात. तसेच सारख्या प्रकारची व सारखी कार्ये असलेली जनुके एकाच गुणसूत्रावर आढळतील असेही नाही.
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
काही वर्षांपूर्वी मी आणि उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डेव्हीड हेग गुणसूत्रांविषयी बोलत होतो. तो जेव्हा म्हणाला की, गुणसूत्र १९ हे त्याचे आवडते गुणसूत्र आहे, तेव्हा मी थोडासा विस्मयचकीत झालो होतो. या गुणसूत्रावर अनेक ‘खोडकर’ जनुके असल्याने ते गुणसूत्र त्याचे खास लाडके बनले होते. त्यापूर्वी मी एखाद्या गुणसूत्राला व्यक्तिमत्त्व असू शकते, असा कधी विचारच केला नव्हता. गुणसूत्रे केवळ जनुकांचा एक अनियंत्रित साठा आहेत, असाच माझा समज होता. पण हेगने सहज उल्लेख केलेल्या या गोष्टींमुळे माझ्या डोक्यात एका कल्पनेने पक्के ठाण मांडले. मानवी जीनोमचे तपशीलवार संशोधन आज आपल्या हाती आलेले आहे, तर मग या जीनोमचीच कथा का उलगडून सांगू नये? प्रत्येक गुणसूत्रावरील एक जनुक निवडून ते या कथेत गुंफावे, अशी कल्पना माझ्या मनात घोळत होती. प्रिमो लेवीने त्याच्या आत्मचरित्रात्मक छोट्या कथांमध्ये मूलतत्त्वाच्या आवर्त सारणीची (पीरिओडिक टेबल) अशा प्रकारे गुंफण केली आहे. त्याच्या जीवनाबद्दलचं प्रत्येक प्रकरण एका मूलतत्त्वाबरोबर जोडत त्याने या कथा साकारल्या आहेत.
मी मानवी जीनोमचा विचार आत्मकथेच्या दृष्टीने करावयास सुरुवात केली. जीवनाची पहाट झाल्यापासूनच्या आपल्या प्रजातीचा आणि तिच्या वंशजांच्या इतिहासाचे वैशिष्ट ठरणाऱ्या सर्व उलथापालथी व शोध यांची जनुकीय भाषेतील एक नोंद म्हणून जीनोमकडे पाहता येईल. पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी प्राचीन समुद्रामध्ये एकपेशीय आदिजीवाचे प्रजनन होण्यास प्रारंभ झाला; तेव्हापासून आजपर्यंत अजिबात न बदललेली अशी काही जनुके आहेत. आपले पूर्वज कीटकासारखे असताना काही जनुके विकसित झाली, तर काही जनुके आपले पूर्वज माश्यांसारखे असताना! तर काही जनुकांच्या आजच्या स्वरूपासाठी अलीकडेच येऊन गेलेल्या रोगांच्या साथी कारणीभूत ठरतात. काही जनुकांचा उपयोग आपल्याला मागील काही सहस्रकांमध्ये झालेल्या माणसाच्या स्थलांतराचा इतिहास लिहिण्यासाठीही होऊ शकतो.
.................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
जीनोम म्हणजे मानवजातीच्या जीवनात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांच्या नोंदीची एक प्रकारची आत्मकथाचआहे. ती मध्ये ४ अब्ज (बिलीयन्स्) वर्षांपासून ते मागील काही शतकांपर्यतचा काळ चितारलेला आहे. ‘गुणसूत्रांतील वेचक : जनुकगोष्टीं’मधून मी जीवनाच्या पहाटेपासून ते भावी औषधीयुगापर्यंतचा मानवजातीचा इतिहासाचा पट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी मी प्रथम २३ गुणसूत्रांची एक यादी बनवली व नंतर प्रत्येकासमोर मानवी स्वभावाच्या सूत्रांची मांडणी करण्यास सुरुवात केली. मी माझ्या कथेला सूचक ठरतील अशा जनुकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. X व Y गुणसूत्रांची मांडणी गुणसूत्र ७ नंतर केली (कारण X गुणसूत्राचा आकार त्या जागी योग्य आहे) प्रस्तुत ग्रंथाच्या उपशीर्षकामध्ये तेवीस प्रकरणे आहेत असे नमूद करूनही शेवटच्या प्रकरणाला प्रकरण २२ असे का म्हटले आहे, हे आता आपल्या लक्षात आलं असेलच!
पहिल्या ओझरत्या उल्लेखात मी तुमची दिशाभूल केली आहे. मी ध्वनीत केले की, गुणसूत्र १ प्रथम आले, पण ते तसे झालेले नाही. तसेच गुणसूत्र ११चा संबंध मानवी व्यक्तिमत्त्वाशी आहे, असेही मी सूचित करत आहे, असे वाटले असेल, तर तेही तसं नाही. मानवी जीनोममध्ये जवळ जवळ ६० ते ८० हजार जनुके आहेत. त्यातील फक्त आठ हजारापेक्षा कमी जनुकांची ओळख पटलेली आहे (जरी दर महिन्याला काही शतकांनी ही संख्या वाढत आहे). आणि त्यातली बहुसंख्य जनुके निरस अशा जीवरासायनिक व्यवस्थापकाचे कार्य करतात. त्यामुळे मी तुम्हाला सर्व जनुकांबद्दल रसाळ गोष्टी सांगू शकत नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मात्र जीनोममधील काही जास्त मनोरंजक स्थळांच्या छोट्या थांब्यांच्या सहलीची, आणि ही स्थळे आपल्याबद्दल काय सांगू शकतात, याची एक सुसंगत झलक मी प्रस्तुत करू शकतो. मानवी ‘जीनोम’ हा जैविक ग्रंथ ‘वाचू’ शकण्याचा सुयोग आपल्या पिढीला लाभला आहे. आजपर्यंत विज्ञानाच्या प्रयत्नाने आपले मूळ, आपली उत्क्रांती, आपले स्वभाव व आपले मन यांविषयी जे काही ज्ञान मिळाले, त्यापेक्षा जास्त ज्ञान आपल्याला जीनोमच्या वाचनातून मिळणार आहे. मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, औषधोपचारशास्त्र, अस्मिभूत अवशेषशास्त्र अशा शास्त्रांमध्ये, तसंच प्रत्येक विज्ञान शाखेमध्ये हे अद्भुत ज्ञान क्रांती घडवून आणेल.
मला येथे स्पष्ट करायचं आहे की, मला इतर कोणत्याही घटकांपेक्षा जनुके महत्त्वाची आहेत, असा दावा करायचा नाही. जनुके जरी सर्वोच्च महत्त्वाची नसली तरी, त्यांचे स्वतःचे असे महत्त्व आहे, हे मात्र नक्की.
प्रस्तुत पुस्तक हे काही मानवी जनुक प्रकल्पावरचे किंवा जनुकीय नकाशे तयार करण्याच्या तंत्राबद्दलचे नसून मानवी जिनोम प्रकल्पामध्ये काय गवसले याबद्दलचे आहे. काही जण म्हणतील की, माणूस हा त्याच्यात असलेल्या जनुकांपलीकडे खूप काही आहे. मी हे नाकारत नाही. जनुकीय सांकेतिक लिपीपलीकडे आपल्यातील प्रत्येक जण खूप काही आहोत. मात्र आतापर्यंत मानवी जनुके पूर्णतः रहस्यमय होती. या रहस्याचा खोलवर ठाव घेऊ शकण्याची संधी मिळणारी आपली ही पहिली पिढी आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment