फायबर केबलमार्फत देण्यात येणार्‍या इंटरनेट सेवेवर नियंत्रण समाजाचेच असले पाहिजे
ग्रंथनामा - झलक
मिलिंद बेंबळकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 30 December 2021
  • पडघम तंत्रनामा मोबाईल फोन Mobile Phoneफाइव्ह जी 5G रेडिओ फ्रीक्वेन्सी रेडिएशन Radio Frequency Radiation मोबाईल रेडिएशन Mobile Radiation मोबाईल टॉवर Mobile Tower

महाराष्ट्रात ‘मोबाईल टॉवर ग्रीव्हन्स फोरम’ची स्थापना करणारे आणि ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या पुस्तकाचे सहलेखक मिलिंद बेंबळकर यांचं ‘5G वायरलेस तंत्रज्ञान - दुष्परिणाम आणि उपाय’ हे नवं पुस्तक लवकरच ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले हे मनोगत...

..................................................................................................................................................................

वायरलाईन सेवा - लॅंडलाईन टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबलचे महत्त्व नागरिक आणि धोरणकर्ते यांच्यासमोर मांडणे आणि भारतातील पायाभूत सुविधांमध्ये वायरलाईन सेवांचे महत्त्व विशद करणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे.

वायरलाईन सेवा (लॅंडलाईन टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबल) आणि वायरलेस सेवा (3G, 4G, 5G सेवा) यांमधील फरक, सुस्पष्ट धोरणे आणि त्याच्या अंमलबजावणीअभावी खाजगी कंपन्यांनी ग्राहक आणि बाजारपेठेवर मिळवलेला कब्जा, याविषयीची चर्चा या पुस्तकात करण्यात आलेली आहे.

डेटाची गोपनीयता, सुरक्षितता, नेट न्युट्रॅलिटी, डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचा समानाधिकार, खाजगी कंपन्यांपासून सर्व सामान्य जनतेच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सरकारला आलेले अपयश, खाजगी कंपन्यांची एकाधिकारशाही, वायरलेस सेवांसाठीचा वीजेचा प्रचंड वापर, वायरलेस सेवांमुळे होणार्‍या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, याचा परामर्ष या पुस्तकात घेण्यात आलेला आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वायरलेस सेवांपेक्षा कित्येक पटीने वेगवान सेवा देणार्‍या फायबर ऑप्टिक केबलचे, कॉपर केबलचे, इथरनेट जोडणीचे समर्थन या पुस्तकात केलेले आहे. ज्याप्रमाणे पाणी, रस्ते, पूल, रेल्वे सेवा या पायाभूत सुविधांवर जनतेचा अधिकार आणि नियंत्रण असते (शासनयंत्रणेमार्फत), त्याचप्रमाणे ब्रॉडबॅंडमार्फत अतिवेगवान इंटरनेट सेवा देणार्‍या फायबर ऑप्टिक केबलवर जनतेचा अधिकार आणि नियंत्रण असले पाहिजे, खाजगी कंपन्यांचे नियंत्रण असू नये. फायबर ऑप्टिक केबलचे जाळे देशभर अंथरणे आणि त्याचे नियंत्रण आणि देखभाल स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत झाले पाहिजे. कारण ही सेवा अतिशय सुरक्षित, विश्वसनीय, टिकाऊ, सर्वांना परवडणारी आहे.

मागील दोन दशकांमध्ये वायरलेस सेवा (2G, 3G, 4G इ.), सेल्युलर फोन (मोबाइल फोन), इत्यादीस प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सेवा देणार्‍या कंपन्यांची वाढ आणि त्यांची आर्थिक प्रगती अतिशय वेगाने झाली. वायरलाईन सेवा - लॅंडलाईन टेलिफोन सेवा कालबाह्य झालेल्या आहेत, असा समज सगळीकडे झाला. इंटरनेट आधारित वायरलेस सेवांनाच (2G, 3G, 4G इ.) फक्त उज्ज्वल भवितव्य आहे, असे वातावरण निर्माण केले गेले. परंतु राजकारण्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असणार्‍या खाजगी कंपन्यांच्या दबावगटाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे, वायरलेस सेवांच्या कल्पनातीत प्रगतीस आक्रमक व्यापारी नीती, नियामक संस्थांचे आणि शासनाचे पक्षपाती धोरण कारणीभूत आहे. त्यामध्ये कोणतेही जनहित नाही.

वायरलेस उद्योगाची व्यावसायिक नीती, त्यांचा दृष्टीकोन, त्यांच्या बाजारपेठेविषयीच्या अवास्तव कल्पना आणि गैरसमज, त्यांची आक्रमक प्रचार यंत्रणा, कायदेमंडळांचे अपयश, नियामक संस्थांचे पक्षपाती धोरण, राजकारण्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असणारी खाजगी उद्योगांना अनुकुल धोरणे, यामुळे नागरिकांच्या वायरलेस सेवांविषयी अतिअपेक्षा निर्माण झालेल्या आहेत आणि पर्यायाने वायरलाईन सेवांकडे (लॅंडलाईन टेलिफोन आणि फायबर ऑप्टिक केबल) अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यासंबंधीचा ऊहापोह या पुस्तकात केलेला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

उत्तम दर्जाची प्रशासकीय यंत्रणा राबवण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारला आपल्या विविध सेवा आणि योजना उदा. ई-ग्रामपंचायत, ई-प्रशासन, ई-शिक्षण, ई-आरोग्य, ई-औषधे, ई-तक्रार निवारण, ई-शेती, ई-नागारिक सुविधा कमीत कमी वेळात थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि डिजिटल इंडिया, मेक इन  इंडिया, स्टार्ट अप इंडिया या महत्त्वाच्या सरकारी योजना यशस्वी करण्यासाठी फायबर ऑप्टिक केबलद्वारे इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही इंटरनेट सेवा वेगवान, सहजपणे परवडणारी, तटस्थ, टिकाऊ, शाश्वत, सुरक्षित, योग्य दर्जाची असावी. हे साध्य करण्यासाठी सर्व प्रशासकीय पातळ्यांवर प्रयत्न झाले पाहिजेत, परंतु त्याचे नियमन आणि अंमलबजावणी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत स्थानिक  पातळीवरच झाली पाहिजे.

आपण अशा एका वळणावर उभे आहोत, जेथे आपली संस्कृती, परंपरा, आचार-विचार स्वातंत्र्य, यावरच बंधने घालण्याचा काही मूठभर लोकांचा इंटरनेटमार्फत प्रयत्न चालू आहे. त्यास आव्हान देण्याची गरज आहे. म्हणूनच फायबर केबलमार्फत देण्यात येणार्‍या इंटरनेट सेवेवर नियंत्रण समाजाचेच असले पाहिजे, हे प्रतिपादन करण्यासाठी हा पुस्तकप्रपंच.  

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

‘रेडिओ फ्रीक्वेन्सी रेडिएशनसंबंधीची १९९६मधील मानके कोणतेही बदल न करता सध्याच्या काळात, २०२१मध्ये कशी लागू होऊ शकतात?’ 

युनायटेड किंगडममध्ये 5Gसंबंधीचे कोणतेही निर्णय नागरिकांच्या संमतीने घेण्यात आलेले नाहीत. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे

.................................................................................................................................................................

लेखक मिलिंद बेंबळकर यांनी महाराष्ट्रात ‘मोबाईल टॉवर ग्रीव्हन्स फोरम’ची स्थापना केली आहे. तसेच ते ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या पुस्तकाचे सहलेखकही आहेत.

milind.bembalkar@gmail.com

...............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......